भाग २
दोन दिवसानंतर प्रथम चा ऑफिस मधला पहिला दिवस होता, ज्याची त्याला थोडी देखील काळजी नव्हती. आणि इकडे कादंबरी चे दिवसानंतर प्रेसेंटेशन ती मात्र सर्व गोष्टी नीट केल्यात कि नाही सगळे पपेर वर्क कम्प्लीट झाले कि नाही हे चेक करत होती, एक एक मेल उघडून सर्वाना इन्फोर्म करून त्यांची योग्य मांडणी चालू होती. त्यात एक नवीन मेल आय डी समोर आला !!!!!!! हा कोण नवीन व्यक्ती ???? देव जाने आता शिंदे सरांनी सांगितल आहे तर मेल तर करावा लागणार. म्हणून तिने त्या मेल आय डी देखील मेल केला. इकडे प्रथम ला कंटाळा आला होता म्हणून तो सोशल मिडिया वर टाईम पास करत बसला होता, अचानक इतक्या उशिरा एक मेल पाहून तो थोडा विचारात पडला 🤔🤔🤔🤔, इतक्या उशिरा मेल आणि तो देखील कामाचा ????? कोण आहे इतक वर्क अॅडिक्टेड ज्याला आता झोपायच्या वेळेत पण काम करायला सुचत आहे अस म्हणून जोरजोरात हसू लागला. पण मग मेल पाहून त्याला लक्षात आले कि उद्या प्रेसेंटेशन आहे आणि माझा पहिला दिवस झोप आता नाहीतर काही खर नाही.
 
आज---
या सर्व गोष्टी आठवत असताना मध्येच फोन ब्लिंक होतो, आणि फोन वरील मेसेज पाहून परत जोरात हसू येते. प्रथम कस होणार माझ 🙃🙃🙃🙃 मी विचार केला याला थोड तरी सुधारेल उलट हा मलाच बिघडवत आहे ...........
मेसज- Sorry dear, I just woke up…….I will call you when I was get ready…. 🥰️ 🥰️ 🥰️ 🥰️ 🥰️ 🥰️ 🥰️
कादंबरी- काय मुलगा आहे हा !!!! मला म्हणाला लवकर उठ तुला एका ठिकाणी घेऊन जायचं आहे आणि आता स्वतः उशिरा उठला आहे. असच केल होत ऑफिस च्या पहिल्या दिवशी........
भूतकाळात- कादंबरी पुन्हा एकदा भूतकाळात रमली. आजही आठवतो तो दिवस इथे माझा पूर्ण ग्रुप gas वर होता . खूप महत्वाच प्रेसेंटेशन होत, एक जरी चूक झाली तर प्रोजेक्ट गेला हातातून..........
आणि प्रथम महाशय इथे सोमारील पार्टी येऊन बसली पूर्ण ग्रुप रेडी होता, शिंदे सर पप्रत्येकाला एक एक गोष्ट समजावत होते, पण काय फायदा जी व्यक्ती कादंबरी सोबत प्रेसेंटेशन देणार होती ती व्यक्ती गायब....... खूप फोन झाले पण हा फोन उचलेल तर ना !!!!!!!!!
खूप वेळा नंतर मेसज आला  On the Way just give me 10 mins………..
इकडे शिंदे सर कादंबरीला-  मिस. प्रधान तुम्ही मिस्टर. देशपांडे ना कळवल होत ना आजच्या मिटिंग बद्दल ????????
कादंबरी – हो सर, मी सर्वाना काल रात्री मेल हि केले होते आणि मेसज हि. तुम्ही हव तर मेल चेक करा त्यात मिस्टर. देशपांडे देखील आहेत.
शिंदे सर- हो ग कादंबरी पण आता जर हा नाही आला तर ????????
कादंबरी – सर अजून आपल्याकडे थोडा वेळ आहे अजून बॉस नाही आलेत त्यामुळे आपण तोपर्यंत backup तयार करू जर मिस्टर. देशपांडे आले तर उत्तमच नाही तर माझ्या सोबत तुम्ही प्रेसेंटेशन द्या............ 😑 😑 😑 😑 😑 😑 😑 😑
कादंबरी च्या या वाक्यावर शिंदे सरांनी होकार तर दर्शविला होता पण, बॉस ची ऑरडर होती काही झाल तरी हे प्रेसेंटेशन कादंबरी आणि प्रथम ने च दिले पाहिजे........... त्यामुळे त्यांना तरतरुन घाम फुटला होता.
आणि त्यांचे पूर्ण लक्ष हे कादंबरी काय बोलते या पेक्षा जास्त घड्याळात होते, आणि देवाकडे प्रार्थना चालू होती!!!!!!!! आज जर हा नाही आला तर प्रोजेक्ट तर जाईल पण माझी नोकरी देखील जाईल...... बॉस ला मीच भेटलो होतो का हि जबाबदारी देण्यासाठी......