Shaapit Pustak - 1 in Marathi Thriller by Amol Vaidya Patil books and stories PDF | शापित पुस्तक.. भाग 1

Featured Books
  • એઠો ગોળ

    એઠો ગોળ धेनुं धीराः सूनृतां वाचमाहुः, यथा धेनु सहस्त्रेषु वत...

  • પહેલી નજર નો પ્રેમ!!

    સવાર નો સમય! જે.કે. માર્ટસવાર નો સમય હોવા થી માર્ટ માં ગણતરી...

  • એક મર્ડર

    'ઓગણીસ તારીખે તારી અને આકાશની વચ્ચે રાણકી વાવમાં ઝઘડો થય...

  • વિશ્વનાં ખતરનાક આદમખોર

     આમ તો વિશ્વમાં સૌથી ખતરનાક પ્રાણી જો કોઇ હોય તો તે માનવી જ...

  • રડવું

             *“રડવુ પડે તો એક ઈશ્વર પાસે રડજો...             ”*જ...

Categories
Share

शापित पुस्तक.. भाग 1

" ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्‌।
"उर्वारुकमिव बन्धनान्मृत्योर्मुक्षीय माऽमृतात्‌॥

# अंत माझा अंत कोणीही करु शकत नाही, मी अमर आहे,
"माझ्या कानांवर हा एकच आवाज ऐकू येत होता,
चेहरा गरम झाला होता, बाजूने कुठून तरी घंटा नाद ऐकू येऊ लागला, एका मध्यम वयाच्या पुरुषाचा आवाज कानावर येत होता,
"तो माझी छाती जोर जोरात दाबत होता, माझ्या तोंडातून पाण्याची गुळणी बाहेर पडली..!!
आणि जोऱ्याचा ठसका लागला, मी डोळे हळूच उघडले,
सूर्याच्या पिवळसर प्रकाशाचे किरणे माझ्या चेहऱ्यावर पडले, होते,
अंग ठणकत होते, अंगात त्राण नव्हता, कानावर पाण्याचा आवज येतं होता,
मी उठून आजुबाजुला नजर फिरवली, मी कोण्यातरी नदीच्या तीरावर होतो,
नदीपासून थोड्या अंतरावर गर्द झाडी,
त्या झाडीतून पक्ष्याचा चिव चिव, असा मधुर आवाज ऐकू येऊ लागला,
तेव्हा कुठं मनावरचा ताण कमी झाल्यासारखा वाटला,
एक माझ्या वयाचा मुलगा,
आबा कोण हा, इथ कशा. आला आणि नदीच्या काठी काय करतो,
मी मनात विचार केला, हा व्यक्ती याचा बाप असावा,
आरे दादू तू जरा सा गप्प बस,
"हा बिचारा आता कुठं शुद्धीवर आला, पोरा नाव काय तुझ,
कुठून आलास,
कोणत्या गावचा आहेस, तुझे आई वडील कुठे,
आहेत, आणि तू इथे कसा आला,
मी फक्त एक टक त्यांच्याकडे पाहू लागलो, मला काही हि आठवत नव्हत, मी कोण कुठला इथ कसा आलो,
मला काय उत्तर द्यावे काहिच समजत नव्हत,
मी त्यांना म्हणालो मला भूक लागली,
"आबा आपण याला आपल्या घरी घेऊन जाऊ,
आबा ला पटलं, चल पोरा आमच्या घरी येतो का,
मी हो म्हणालो, त्यांच्या पाठीमागे निघालो, दहा मिनिट चालल्यावर आम्ही एका वस्ती जवळ येऊन पोहचलो,
त्या वस्तीवर वीस पंचवीस घरे, घरे कसली फक्तं राहण्यासाठी आधार, अंगण शेणाने सारवलेली घराच्या छतावर लाकडांच्या फळ्या, तीन चार वक्तीला राहता येईल एवढे घर,
अंगणात शोभेसाठी लावलेली मोठी मोठी नारळ, आंबा फणस,
जांभ , फुले यांची खुप सारी झाडे, अंगणात उजव्या बाजूस एक
लहानशी विहित, चिखल आणि दगडांनी बांधलेली, त्या मातीमध्ये
काळसर रंगाचे आजुन कशाचे तरी मिश्रण होत,
बहुतेक राख असावी,
आबांनी जेवणासाठी माशाच कालवण भाकरी गेली होती,
त्या बाप लेका बद्दल मनात आपुलकीची भावना निर्माण झाली,
आपण कोन कुठले, तरी पण ते आपल्यासाठी किती करतात,
आम्ही जेवायला बसलो, पण जेवतानी आबांनी कोणताही प्रश्न विचारला नाहि, एक एक घास पोटात जात होता, तसा तसा एक विलक्षण ताकद अंगात शांचारत होती,
असं वाटतं होत, की खुप दिवसा पासून मी जेवलोच नाहीं,
मी अधाष्या सारखा जेवत होतो, मनात असंख्य प्रश्न होते पण एकाही प्रश्नाचं उत्तर सापडत नव्हतं,
आम्ही जेवण झाल्यानंतर आंब्याच्या झाडाखाली घेऊन बसलो बाबांनी मला प्रश्न केला पोरा तुला खरच काय आठवत नाही का,
मी फक्त मानेनेच नाही म्हणून खून गेली,
दादू आबा ना म्हणाला आबा आपण याला आपल्या घरी ठेवून, घेऊ तसाही माझ्यासोबत खेळण्यासाठी कोणीही नाही वस्तीवरची मुलं माझ्यासोबत खेळत नाहीत ते म्हणतात तू आमच्या पेक्षा खूप लहान आहेस तू घरीच खेळत जा,
पण मी त्यांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण ते माझं काही ऐकत नाही आबा त्याला आपल्या घरी ठेवून घेऊन याला आपण राजू म्हणून बोलत जाऊ,
बाबा मला म्हणाले पोरा राहशील का आमच्यासोबत तसही आम्ही घरात दोघेजण आहोत त्याची आई लहान असतानाच देवाघरी गेली त्याचा सांभाळ मीच केला,
आज पासून तू याचा लहान भाऊ मी फक्त हो म्हणालो,
दादू च्या चेहऱ्यावर आता हसू होतं,
दादू आबांना म्हणाला आबा याला पोरा म्हणायचं नाही त्याला आज पासून राजू म्हणायचं तो माझा लहान भाऊ,
आबा हसून दादूला हो म्हणाले दादू माझ्या जवळ येऊन बसला आणि मला म्हणाला,
राजू वस्तीच्या बाजूला एक शाळा आहे तिथे मी शिकण्यासाठी जातो तू पण उद्यापासून माझ्यासोबत येणार रविवारची सुट्टी असली की मी आबांसोबत नदीवर मासे पकडण्यासाठी जातो खूप मजा येते हा,

आबा पण मला मासे कसे पकडतात ते शिकवतात जाळ कसं टाकायचं मासे कोणत्या दिशेला असतात,
मी कालच दहा मासे पकडले ती पण माझ्या हाताने तू पण येत जा आमच्यासोबत तुला पण सवय होईल,
चल आता तुला वस्ती दाखवतो, दादू आणि मी वस्तीच्या दिशेने निघालो,
आबा आमच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत होते आम्ही वस्तीच्या एका मंदिरासमोर घेऊन थांबलो दादू सांगू लागला हे आमच्या वस्तीचं महादेवाचे मंदिर खूप जागृत देवस्थान बाजूच्या गावाकडली लोकार्पण दर्शनासाठी येतात,
आम्ही मंदिरात गेलो समोर एक शिवलिंग होतं त्याच्यावर फुल आणि बेलपत्र वाहिलेलं होतं मंदिर अगदी स्वच्छ होतं,
मंदिराच्या पाठीमागे एक झोपडी होती मी दादाला विचारलं दादू ही झोपडी कोणाची,
दादू सांगू लागला ही झोपडी देवऋषी ते मंदिराचे पुजारी आहेत त्यांना वस्तीवरील लोक खूप मानतात,
चल त्यांची ओळख करून देतो,
आम्ही झोपडीजवळ आलो दादू ने आवाज दिला देवऋषी माझा लहान भाऊ आलाय बाहेर या ना त्याला तुम्हाला दाखवायचं,
झोपडीतून 40 वर्षाचा मध्य वयाचा पुरुष बाहेर आला उंचपुरा धारदार नाक डोळ्यात एक वेगळीच चमक काळे केस,
पिवळ दार शरीर, बाहेर आल्यावर त्यांची नजर माझ्यावर स्थिरावली ते एकटक माझ्याकडे पाहत होते मला काही समजत नव्हतं ते माझ्याकडे का पाहतात,
देवऋषी हा राजू दादू बोलू लागला हा आम्हाला नदीच्या तीरावर सापडला त्याला काही आठवत नाही त्याच्यामुळे आम्ही राजुला आमच्या घरी घेऊन आलो,
देवऋषी आणि राजू त्यांनी मला समोरच्या आंब्याच्या झाडाखाली बसण्याची खूण केली ते दोघेही माझ्या बाजूला येऊन बसले देवृषी अजूनही माझ्याकडे पाहत होते त्यांना माझ्यामध्ये काय दिसत होतं मला काही समजत नव्हतं, मी फक्त खाली मान घालून बसलो होतो,
देवऋषी ने माझ्या डोक्यावर हात ठेवला डोळे बंद केली,
आणि काही वेळ शांत बसून एक विजेचा झटका लागल्यासारखा हात त्यांनी मागे घेतला त्यांच्या डोक्यावरून घामाचे ओघळ खाली येत होते,
देवऋषी ने आम्हाला जाण्यासाठी सांगितले, दादू म्हणाला चल तुला आमची शाळा दाखवतो आम्ही शाळेच्या दिशेने निघालो,
स्त्रिया शेतात चालल्या होत्या,
शाळा लांब असल्यामुळे दादूने दूर वरूनच एका हाताने शाळेकडे बोट दाखवून म्हणाला,
हे बघ आमची शाळा आणि तुझी पण मी हो म्हणालो मी आपण उद्यापासून सोबतच शाळेत जात जाऊ,
दादू म्हणाला राजू तुला कोणत्याही गोष्टीची गरज लागली की मला सांगत जा तुझ्या मोठ्या भावाला तू स्वतःला कधीच एकटा समजू नको मी शेवटपर्यंत तुझ्या सोबत राहील, ऊन तापलं होतं सूर्य डोक्यावर आला होता उन्हाने अंग होरपळून
निघत होतं, दादू म्हणाला,
राजू चल बाजूला आपल् शेत आहे आबा पण शेतावर असतील शेतामध्ये जांबाचे आणि आंब्याची झाडे आहेत,
आम्ही दोघं पाच मिनिटात शेतावर येऊन पोहोचलो,
आबा समोरच आंब्याच्या झाडाखाली बसले होते त्यांनी आम्हाला त्यांच्याजवळ येण्याची खूण केली,
आम्ही अबांजवळ गेलो, आबानी जेवणासाठी माशाचे कालवण आणि भाकरी सोडून आमच्यासमोर ठेवली पोरांनो जेवून घ्या सकाळपासून नुसतं वस्तीवर फिरतात भूक लागली असेल ना,
मी हो म्हणालो,
तितक्यात दादू आंब्याच्या झाडावर चढला त्याने खाण्यासाठी चार कैऱ्या माझ्या समोर फेकल्या आणि खाली उतरला आम्ही जेवायला बसलो,
जेवण झाल्यावर आम्ही दोघेही आंब्याच्या गार सावलीत खेळत होतो,
अचानक मला चक्कर आली आणि खाली कोसळलो राजू माझ्याजवळ आला मला शुद्धीवर आणण्यासाठी त्यांनी माझ्या तोंडावर पाणी मारले मी लगेच उठुन बसलो,
राजू काय झालं होतं असा अचानक कसा पडला अजूनही तुला काही त्रास होतो का दादू काळजीच्या स्वरात मला विचारत होता मी फक्त माने ने नाही म्हणून खूण केली,
आम्ही दोघेही बाजूच्या खाटेवर जाऊन झोपलो दोघेही खूप थकलो होतो त्याक्षणी मला झोप लागली,
माझ्या स्वप्नात एक व्यक्ती मला निल म्हणून हाक मारत होता,,
पण त्या व्यक्तीचा चेहरा मला स्पष्ट दिसत नव्हता,
पण मला एक समजलं होतं माझं नाव नील आहे,
मला जाग आली तेव्हा सूर्य मावळला होता अंधार दाटू लागला,
माझ्या मनामध्ये एक वेगळीच भीती ने घर गेले होते दादू अजून झोपलेला होता,
मी दादूला उठवलं दादू आळस देत उठला दादू संध्याकाळ होत आली आपल्याला घरी जावं लागणार आबा वाट पाहत असतील,
आम्ही दोघे उठून लगेच घराच्या दिशेने निघालो पण मन आणखीनच बेचैन होत,
मनात असंख्य विचार चालू होते नील म्हणून हाक मारणारे व्यक्ती कोण होता म्हणजे मी निल आहे,
पण तो व्यक्ती कोण होता, काही समजत नव्हतं,
आबा दारात उभा राहून आमची वाट पाहत होते बाबांनी लगेच प्रश्न केला पोरांनो कुठे होतात इतका वेळ,
अंधार होताना मला काळजी होत होती,
मी बाबांना म्हणालो आबा आम्ही शेतात झोपलो होतो जागाच नाही आली जाग आली आणि लगेच घरी आलो मंग आबा शांत झाले,
मी आणि दादू हात पाय धुण्यासाठी मोरीत गेलो हात पाय धून बाहेर आलो आबांनी चहा घेण्यासाठी आवाज दिला,
चहा पोटात जाता क्षणी अंगात तरतरी आली मन हलकं झालं,
दादूला आई नसल्यामुळे आबा हातानेच स्वयंपाक करायची आंबा स्वयंपाकाला लागले दादू मी बाहेर अंगणात खेळत होतो अचानक ढग दाटून आले, प्रकाशाची जागा अंधाराने घेतली,
विजांचा कडकडात झाला दादू आणि मी फक्त आकाशाकडे पाहत होतो आकाशात प्रचंड विजांचा तांडव चालू होता,
त्यातलीच एक वीज सरळ आमच्या दिशेने झेपावली माझ्या अंगावरून स्थिरावली,
पण त्या विजेच्या धक्क्याने मला किंचितही हनी झाली नव्हती,
दादू एखाद्या आश्चर्याचा धक्का बसल्यासारखा माझ्याकडे एकटक पाहत होता,
क्रमशः