Premacha chaha naslela cup aani ti - 56 in Marathi Travel stories by Khushi Dhoke..️️️ books and stories PDF | प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - ५६.

Featured Books
  • નિતુ - પ્રકરણ 64

    નિતુ : ૬૪(નવીન)નિતુ મનોમન સહજ ખુશ હતી, કારણ કે તેનો એક ડર ઓછ...

  • સંઘર્ષ - પ્રકરણ 20

    સિંહાસન સિરીઝ સિદ્ધાર્થ છાયા Disclaimer: સિંહાસન સિરીઝની તમા...

  • પિતા

    માઁ આપણને જન્મ આપે છે,આપણુ જતન કરે છે,પરિવાર નું ધ્યાન રાખે...

  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

  • હાસ્યના લાભ

    હાસ્યના લાભ- રાકેશ ઠક્કર હાસ્યના લાભ જ લાભ છે. તેનાથી ક્યારે...

Categories
Share

प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - ५६.



सकाळी....

आज सगळे आश्रमात सत्कार सोहळ्याला जाण्यासाठी तयार होत असतात.....

थोड्या वेळा नंतर...... @हॉल....

सल्लू : "आम्मीजी...... चल आजोबा का कॉल था..... दस बजे तक पोहचने का ऑर्डर हैं....."

आजी बाहेर येत.....

आजी : "अरे हा..... आयी रे रुक तो..... ये रवी भी ना....."

सल्लू : "अब ये सब तू आजोबा को दिखाना....."

आजी : "झालं का बाळांनो.... निघा पटकन....."

सुकन्या सँडलची लेस बांधून रूम बाहेर पडते..... स्टेअर केस वरून खाली उतरताना आजीचं लक्ष तिच्याकडे जातं....

आजी : "सल्लू...... क्या तू भी वही देख रहा हैं...."

सल्लू : "अरे हां.... आज सूरज किधर से पुरब या पश्चिम....."

ऊर्वी : "कुठून ही निघू दे ना..... आज ती एकदम मस्त दिसतेय यापेक्षा काही इंपॉर्टन्ट आहे का....?"

खरंच आज सुकन्या वेगळ्याच लूक मध्ये तयार होऊन येते..... एकदम मस्त.... ही माझी फेवरेट हेरॉईन अँड मी माझ्या सुकन्याला अशीच इमॅजिन करते...





सुकन्या : "अरे, असे का बघताय सगळे....??"

सल्लू : "आज इतकी सुंदर दिसते आहे ना बच्चा तू...."

जया : "हो, कोणाची नजर नको लागायला....."

आजी : "तू शॉर्ट्स घालत जा..... सवय करून घे.... खूप क्यूट दिसतेस......."

सुकन्या : "म्हणून आज ट्राय केलं..... खूप दिवसांतून..... छान दिसतेय ना....?"

आजी : "खूप...."

सुकन्या : "अरे दादू..... कलिका मासी....??"

सल्लू : "ती आणि सचिन डायरेक्ट येतील...."

सुकन्या : "ओके......"

सल्लू : "बाबा कहां गये अब....."

जया : "अरे येतोय..... परफ्यूम......... त्यासाठीच गेलाय आत....."

आजी : "अच्छा......."

संजय : "चला.... थोडा उशीरच झाला....."

आजी : "बरं झालं आलास...... जयाला पाठवणार होते....."

जया : "काय ओ आई...."

सगळे मिळून आश्रमासाठी निघतात..... तिथे सगळी तयारी झालेली असते..... कलिका आणि सचिन तिथे आधीच पोहचलेले असतात...... सुकन्याला बघून....

कलिका : "हे.... लिट्ल प्रिन्सेस सुकू..... किती गोड दिसतेय तू....."

सुकन्या : "तुझ्यापेक्षा कमीच....."

कलिका : "काहीही का..... सच्चू बघितलं का सूकुला...."

सचिन : "बघितलं एकदम प्रिन्सेस शोभते आहे, ती तुझी..."

सगळे जाऊन बसतात..... थोड्याच वेळात सोहळ्याला सुरुवात होते..... सुकन्याचं लक्ष स्टेजकडे जातं.... ती बघते तर, तिला एक मुलगा ओळखीचा वाटतो..... पण, ती इग्नोर करत सोहळ्यावर कॉन्सन्ट्रेट करते....

संचालक : "तर मंडळी..... मी उपस्थित मान्यवरांना विनंती करतो त्यांनी समोर येऊन प्रतिमांना माल्यार्पण करावे....."

मुख्य अतिथिंच्या हस्ते माल्यार्पण करण्यात येतं..... सोहळा पुढे.....

संचालक : "आदरणीय गृहमंत्री साहेबांना मी विनंती करतो की, त्यांनी त्यांचे मोलाचे मार्गदर्शन उपस्थित जणांना करावे...."

गृहमंत्री साहेब उठून पुढे येतात आणि त्यांच्या भाषणाला सुरुवात होते.....

गृहमंत्री साहेब : "इथे उपस्थित तमाम माझ्या मित्रांनो.... आज आपण सर्वांसाठीच ही अतिशय गर्वाची बाब.... आपल्यातल्याच एका धाडसी आणि हुशार व्यक्तीने आज जे केलंय ते करायला साधारण माणूस हिंमत करणार नाही.... मात्र, त्याच साधारण माणसांतील एकाने आज त्याच्या धाडसातून किती तरी निष्पाप जीवांची सुटका केली आहे.... असं म्हणतात, लहान मुलांवर देशाचं भवितव्य अवलंबून असतं..... आणि आज त्याच भवितव्याला वाचवणाऱ्या त्या व्यक्तीला सलाम..... खरंच त्यांनी खूप उत्तम कामगिरी बजावली.... आपल्या जिद्दीला महाराष्ट्र शासनाने घेतलेली ही दखल, पुढे भविष्यात अशाच सकारात्मक कामगिरी करणाऱ्यांना प्रोत्साहन ठरेल ही अपेक्षा ठेऊन मी इथेच थांबतो...... जय हिंद...... जय महाराष्ट्र....."

संचालक : "आदरणीय गृहमंत्री साहेबांनी त्यांचे मोलाचे मार्गदर्शन केले, त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार....... आता मी जिल्हाधिकारी साहेबांना इथे त्यांचे मोलाचे मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित करू इच्छितो....."

जिल्हाधिकारी केशव दामले पुढे येतात.....

जिल्हाधकारी साहेब : "गूड मॉर्निंग ऑल..... मैं यहाँ ज्यादा कुछ तो नहीं बोलुगा..... हां लेकीन बात करते - करते वो ज्यादा हो गया तो संभाल लिजीएगा..... आज जिनके लिए ये प्रोग्रॅम रखा गया हैं...... सबसे पहले तो मेरा उनको तये दिल से सॅल्युट.... आजकल ऐसे ही युवाओं की हमारे देश को सबसे ज्यादा जरुरत हैं..... मुझे पुरा विश्वास हैं.... यही आदर्श हर युवा सामने रख कर देश के लिए कुछ सकारात्मक बदलाव करने की सोच रखेगा...... मी मध्यप्रदेश मधला आहो..... तसं तर मला मराठी जास्त येत नाय.... पण, तरी मला महाराष्ट्र त्याची कामगिरी साठी खूप आवडतो..... जय हिंद..... जय महाराष्ट्र....." (महाराष्ट्र त्याच्या ऐवजी महाराष्ट्र त्याची बोलतात ते... कारण, त्यांना मराठी जास्त येत नाही)

संचालक : "जिल्हाधिकारी साहेबांनी त्यांच्या उत्साहपूर्ण शब्दांतून आपण सर्वांना इतकं मोलाचं मार्गदर्शन केले, त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार..... आता मी आपल्या सोहळ्याची शान..... मिस्टर शौर्य यांना पुढे येऊन सगळ्यांसोबत त्यांचा कामगिरीचा घटनाक्रम सांगण्यासाठी आमंत्रित करतो....."

शौर्य नाव ऐकून सुकन्या आश्चर्य चकित होते..... तिला कळून चुकतं हा तोच आहे......

ऊर्वी : "व्हॉट हॅप्पंड....... तू इतकी का शॉक झालीस त्याला बघून......"

सुकन्या : "वहिनी यार हा तोच शौर्य......."

ऊर्वी : "व्हॉट????"

सुकन्या : "हो..... मी तरीच मघाशी बघितलं...... तेव्हाच मला जाणवलं तोच असेल...... बट, मी शांत बसले......"

ऊर्वी : "सुकू तसा दिसतो मस्त ग..... तितका ही वाईट नाही हा...."

सुकन्या : "जाऊदे तू नको सुरू होऊ आता..... तो काय बोलतो ऐकू दे...."

ऊर्वी : "ऐक....."

शौर्य, पुढे बोलायला उभा राहतो......

शौर्य : "आदरणीय अतिथीगण..... उपस्थित सर्व मंडळी.... सर्वांचे मनःपूर्वक आभार..... आपण आज माझ्या सत्कार समारंभाला हजर राहून मला इतका मान दिलात..... बाय द वे.... मला मराठी तितकी नाही जमत..... बट, माझ्याकडून इतकी प्रॅक्टिस करवून घेतल्यामुळे एवढं तरी बोललो..... आता मी पुढे, नॉर्मली जसा नेहमी फ्रेण्ड्स ऑर फॅमिली मध्ये बोलतो तसाच बोलणार....."

सुकन्या : "तेच म्हटलं हा इंग्रजी माकड..... एक डायलॉग नव्हता समजत आणि आज चक्क इतकी छान मराठी कसा काय बोलतोय...." (मनात)

ऊर्वी : "काही बोललीस का...??"

सुकन्या : "कुठे काय....?"

ऊर्वी : "भारी आहे हा शौर्य...."

सुकन्या : "व्हॉटएव्हर....."

शौर्य : "सो, लेट मी एक्स्प्लेन हे घडलं कसं..... वन डे माय पा फोर्स मी टू बाय समथिंग अँड इतकंच नाही तर, मला बार्गेनिंग करून बाय करायचे ऑर्डर्स होते...... बीकॉज.... अकॉर्डींग टू हिम..... आय एम लाईक, बीघडी हूई औलाद..... मला पैसे उडवायचा शौक आहे..... मनी व्हॅल्यू कळावी म्हणून हे सर्व प्लॅन केलं गेलं.... सो, त्यांचा असा प्लॅन होता की, मी मार्केट मध्ये जावं अँड शॉपिंग करून दाखवावी.... सो, त्यांनीच डीसाईड केलं की, मी त्यांच्या बिझिनेसच्या लायकीचा आहे की नाही हे चेक करून पहावं.... आय रिअली थँकफुल की, त्यांनी मला हा टास्क दिला...... नाही तर कधीच मी इथे ह्या प्लॅटफॉर्म वर नसतो..... त्यादिवशी शॉपिंग साठी मी बाहेर पडलो..... कार नव्हतीच सो, निघालो.... आय सॉ, काही मुलं सिग्नल वर थांबून, दे वर बेग टू पीपल...... खरं तर खूप विचित्र वाटलं लहान मुलांना असं मागताना बघून..... मग मी त्यांच्या ठिकाणाचा शोध घेतला..... आय वॉज शॉक्ड.... एक माणूस लहान मुलांना पैसे मागत होता.... जे की, त्यांनी भीक मागून कमावले होते.... एका लहान मुलाने दिले नाही म्हणून, त्याला ढकलून दिलं..... तो पडला अँड ब्लिडींग स्टार्ट झाली.... आय डीसाईडेड की, मी त्या मुलांना काहीही करून तिथून बाहेर काढणार..... अँड नेक्स्ट मोमेंट मी रेस्क्यू प्लॅनिंग केली.... त्यादिवशी जसे सर्व गुंड तिथून बाहेर पडले..... मी त्या मुलांना बाहेर काढलं आणि फ्रेंडला सांगून, त्या सर्वांना एका व्हॅन मध्ये पोलीस स्टेशन घेऊन जायला सांगितलं..... बट, तोपर्यंत कोणी तरी मला बघितलं होतं अँड तो माझ्यावर धावून आला.... कसं तरी त्याला मॅनेज करून, मी तिथून पळालो अँड एंटर्ड इंटू द मॉल..... बट, मॉलमध्ये ही ते मागावर होतेच..... बट, मी तिथून कसातरी निघून शेवटी पोलिस स्टेशन पोहचलोच..... अँड आय डीड.... दॅट इनोसंट चाईल्ड.... खरंच..... काहींच्या नशिबात माझ्या सारखी लाईफ स्टाईल नसते अँड दॅट्स व्हाय त्यांना किती काही सहन करावं लागतं..... त्यादिवशी जर पा तू मला बाहेर नसतं पाठवलं..... मला कधीच या गोष्टींचं रियलायझेशन नसतं झालं....... थँक्स टू यू, पा..... अँड, थँक्यू सो मच फॉर लिसनिंग मी गाइज.... थँक्यू...... जय हिंद..... जय महाराष्ट्र...."

सगळे टाळ्या वाजवून शौर्यला दाद देतात..... सुकन्याला, शौर्य वर खूप प्राऊड फिल होतो.... बट, अगेन ती एक्स्प्रेस होऊ देत नाही......

ऊर्वी : "यार कसला भारी आहे हा....."

सुकन्या : "खरंच आहे....."

ऊर्वी : "आं....."

सुकन्या : "टाळ्या वाजव..... माशी जाईल आत.... तोंड बंद कर..... तिकडे बघ....."

संचालक : "तर, मी आता विनंती करतो...... आदरणीय अतिथीगणांनी शौर्य यांना बक्षीस देऊन त्यांचा सत्कार करावा....."

शौर्यला महाराष्ट्र शासनाकडून एक प्रमाणपत्र आणि दोन लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात येतो..... आज त्याच्यासाठी धनादेश गौरवपूर्ण बाब असते..... पैसे म्हणून नाही तर सन्मान म्हणून.... तो आज खूप खुश असतो..... जाऊन आपल्या पा ला मिठी मारतो..... सगळे टाळ्यांच्या गजरात त्या दोघांचे कौतुक करतात.....

आभार प्रदर्शन.....

संचालक : "आदरणीय अतिथी गणांनी, विशेष उपस्थिती देऊन त्यांचे मोलाचे मार्गदर्शन केले, त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार...... सत्कार सोहळ्यात आपण सर्वांनी येऊन ह्या सत्कार सोहळ्याची शान वाढवली, त्याबद्दल आपल्या सर्वांचे ही परत एकदा मनःपूर्वक आभार..... आजचा सत्कार सोहळा इथेच संपला असल्याचं मी जाहीर करतो..... धन्यवाद.... जय हिंद.... जय महाराष्ट्र....."

सगळे मुख्य पाहुणे निघून जातात..... उरलेले सगळे नंतर ऊभे असता..... आजोबा शौर्य सोबत तिथे येतात.... त्यांना त्याचं खूप कौतुक वाटतं..... त्यांना सगळ्यांसोबत त्याची भेट घालून द्यायची असते......

शौर्य येताना बघून, सुकन्या चेहऱ्यावर एक ॲटीट्युड आणते..... ही नाही सुधरत....

आजोबा : "शौर्य बेटा...... ही माझी फॅमिली..... ह्या माझ्या मिसेस..... हा मुलगा संजय सून जया, दुसरा मुलगा सचिन त्याची वाइफ कलिका... नातू सलमान त्याची वाइफ ऊर्वी, आणि ही आम्हा सर्वांची लाडकी त्यापेक्षा माझी लाडकी नात, सुकन्या......"

शौर्य सर्वांना शेक हॅण्ड करत येतो आणि त्याच फ्लो मध्ये तो सुकन्याचा हात पकडतो..... इतका सॉफ्ट हात आणि कानावर सुकन्या नाव ऐकून तो हलकेच मान वर करून बघतो..... अँड काय, विकेट पडली ना राव....

शौर्य : "हे...... तू.... इथे...."

आजी : "म्हणजे??? सुकन्या, बेटा तू ओळखतेस शौर्यला???"

सुकन्या : "नींनी ते....."

शौर्य : "निंनी येस..... वुई नो इच अदर.... गुंड मागे लागले होते तेव्हा धडकलो होतो आम्ही...."

आजी : "बापरे..... हो....."

शौर्य : "अरे नींनि...... इतक्यातच बापरे नका म्हणू पुढे ऐका.... हर डायलॉग्ज ओह्ह्ह माय गॉड...... आय नेव्हर हर्ड....."

आजी : "अरे देवा..... सुकन्या बघ, हा तर हसून वेडा झालाय....."

सुकन्या : "एक्सक्युज मी...... ती फक्त माझी निन्नी आहे...... तू तिला निंनी नको म्हणू....."

शौर्य : "फाईन.... पण, तू इतकी का सिरीयस होते आहेस......"

सुकन्या : "... उम्मम..."

सुकन्या नकळत असं वागते..... तिच्या मनात नसून हे तीच्याकडून घडतं....

आजी : "कमॉन बेटा...... शौर्य चांगला मुलगा आहे..... तुम्ही चांगले फ्रेण्ड्स बनू शकता....."

सुकन्या : "फाईन...."

दोघेही शेक हॅण्ड करतात...... नंतर शौर्य आजोबा जवळ जातो.....

शौर्य : "इफ यू डोन्ट माईंड.... मी तुमचं ऑर्फनेज जॉईन करू शकतो का???"

आजोबा : "अरे वाह..... नक्कीच..... तसंही पुढे आम्ही मोठ्या प्रोजेक्ट वर काम करतोय.... तुझी नक्कीच मदत होईल..... जॉईन अस..... सुकन्या ही काही दिवसांत जॉईन होणार..... मग दोघे मिळून मदत करा.... यंग माईंड्स.... नक्कीच फायदा होईल तुम्हा दोघांचा...."

शौर्य : "वाऊ..... थँक्यू सो मच...."

सगळे जेवायला निघून जातात..... सुकन्याच्या सँडलची लेस खुलते.... म्हणून, ती बांधायला थांबून असते.... शौर्य ही तिला बघून बाहेरच थांबतो..... तो तिच्या मागे जाऊन उभा राहतो..... तिचं लक्षच नसतं.....

ती लेस बांधून सरळ उभी होते..... मागे तिला शौर्यचा धक्का लागतो..... ती चिडून मागे बघते.....

सुकन्या : "मंद..... तुला दिसतंय ना..... मी लेस बांधत होते....."

शौर्य : "हो...."

सुकन्या : "मग....."

ती रागात तिथून निघून जाणार.... तोच शौर्य तिला हात पकडुन थांबवून घेतो......

सुकन्या : "काय हा पांचटपणा..... लिव्ह.... आय सेड लिव्ह...."

शौर्य : "चूक केली का मी....."

सुकन्या : "खूप मोठी चूक केलीस..... माझा हात पकडून...."

शौर्य तिचा हात सोडून देतो.....

शौर्य : "सोडला..... बरं मला सांग, मी तुला कधी त्रास दिला का?"

सुकन्या : "........"

शौर्य : "टेल मी.... एव्हर फ्लर्ट??.... एव्हर लूक इन व्रोंग वे??..... ट्राय टू टेक अडवान्टेज ऑफ यू??..... अकॉर्डिंग टू मी, यातलं मी काहीही केलेलं नाहीये.... सो, व्हाय यू हेट मी.....?? आपण तर त्यदिवशी थोडाच वेळ भेटलो..... दॅट टाईम आय डीडंट हर्ट यू..... सो??"

सुकन्या : "............"

शौर्य : "लीसन सुकन्या..... तुला बोलायचं, बोल.... मिस-अंडस्टँडिंग नकोय मला..... बस...."

आता तो जायला निघणार.... तोच, सुकन्या त्याला मागून आवाज देते.....

सुकन्या : "शुक... शुक..... ऐक....."

शौर्य : "माझं नाव शौर्य आहे.... शुक.... शुक नाही...."

सुकन्या : "फाईन, शौर्य..... सॉरी.... मला तसं नव्हतं वागायला हवं होतं तुझ्याशी....."

शौर्य : "इट्स ओके ग.... सॉरी न म्हणता, प्रेमाने शौर्य बोलली असतीस..... तरी, मी माईंड नसतं केलं....."

तो आत निघून जातो..... मात्र ही त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे एकटक पाहत उभी राहते....
.
.
.
.
.
.
.
.
क्रमशः


❤️ खुशी ढोके ❤️