Savar Re - 8 in Marathi Love Stories by Amita Mangesh books and stories PDF | सावर रे.... - 8

Featured Books
Categories
Share

सावर रे.... - 8

एखाद्या सिंहाच्या गर्जने सारखा भारदस्त आवाज पुन्हा गरजला, या बसा हितं.

नितीन घाबरत पुढे सरकला आणि त्या भारदस्त आवाज असणाऱ्या व्यक्तीच्या पायांना स्पर्श करून त्यांचे आशीर्वाद घेतले. क्षणभरासाठी त्या कडक व्यक्तित्वाच्या डोळ्यात चमक आली पण आपला आवाजातील दरारा त्यानी तसाच कायम ठेवला आणि म्हणाले, राधिका पाणी घेऊन या पावण्यास्नी. पुढे त्यानी नितीन सोबत आलेल्या व्यक्तीकडे एक रागीट कटाक्ष टाकला तर ती व्यक्ती खाली मान घालून लगबगीने वाड्याच्या आत निघून गेली.
घाईतच आतून एक महिला पाणी घेऊन आली आणि नितीनला दिलं. त्याने प्याला भर पाणी घटाघट पिउन घेतलं आणि तो जवळच्या लाकडी दिवणावर बसला.

समोर एक लाकडी झोका होता. जुन्या मुव्ही मध्ये असतो तसाच त्यावर बसून नितीन वर नजर रोखून त्यानी पुन्हा धारधार आवाजात विचारले, हम्म बोला आता.

नितीन ने मनातच विचार केला की आता जे होईल ते होईल पण बोललं पाहिजे शेवटी जीवन मरणाचा प्रश्न आहे. एक आवंढा गिळून तो बोलू लागला. ते आबा साहेब मी नितीन जयंत सहाणे. मुंबईत रहातो.

आबासाहेबांनी हाताच्या ईशाऱ्याने त्याला थांबवत विचारले, ते राहुद्या अमास्नी पयल हे सांगा की आमच्या गौरी ला तुम्ही कसे भेटलात?

नितीन घाबरत च म्हणाला, अं… हो सांगतो,.....

एलेना चा निर्णय ऐकून यश ला मोठा धक्काच मिळाला त्याला सुचेना आता काय बोलायचं ते. तो कसतरी स्वतःला सावरत म्हणाला,
काय ? अस कसं अचानक ठरवलं तू मला एक शब्दाने पण विचारावं वाटलं नाही तुला?

यश तुला विचारुन निर्णय घ्यायला मी जाई नाही. माझं स्वतःच व्यक्तिमत्त्व आहे. आणि तसेही तू कुठे मला विचारून सगळे निर्णय घेतोस.

मी कुठला निर्णय तुला न विचारता घेतला ग? आजवर सगळे निर्णय आपण दोघांनी घेतलेत ना?

ओह रियली, हे तू बोलतोस यश?
मग जॉब सोडून कायमच इंडियात येण्याचा निर्णय मला विचारून घेतलास का?

अग ते आईला पाहिल्यावर माझ्या मनात आलं ग म्हणून बोललो मी.

अच्छा म्हणजे तू जॉब सोडणार नाहीस का? आणि तिकडेच स्थायिक होणार ना?
यश गोंधळून गेला होता.

हे बघ यश काय ते क्लियर कर आताच.

हो मी जॉब सोडून इकडे सेटल होणार आहे.

मग मला कधी सांगणार होतास तू?

अरे अजून सगळं ठरलं कुठं आहे, मी तुझ्याशी बोलणारच होतो. त्या शिवाय हा निर्णय घेतला असता का?

ओह यश तू ना अजून खूप इंमाँचुअर आहेस. तुला तुझा कोणताही डिसीजन नीट घेता येत नाही. ना जाई बद्दल, ना माझ्या बद्दल आणि आता तुझ्या बद्दल ही तू शुअर नाहीस.

पण मी तुझ्या बद्दल शुअर आहे एलेना, आपण दोन वर्षे एकत्र आहोत ते काय होतं मग? इथे आपण लग्न ठरवण्या साठी आलो होतो ना?

स्टॉप धिस नॉनसेन्स यश, मी नाही तुझ्या सोबत लग्न करू शकत. एक तर तू शुअर नाहीस आणि दुसरं मी माझा देश सोडून इथे नाही येऊ शकत.

अग पण आपण लग्न करणार आहोत ना? मग तुला इकडे यावे लागेल ना.

तिकडे माझे मॉम डॅड आहेत त्यांची एकुलती एक मुलगी आहे मी. करोडो चा बिजनेस अशी कशी सोडून येऊ शकते त्याना मी?

एलेना प्लिज असं नको बोलुस यार, थोडा तरी विचार कर आपलं…

आपलं नाही यश तुझं. मी इंडियात नाही येऊ शकत. त्यामुळे आता तू डीसाईड कर आणि मला सांग, मी वाट पाहीन. पण आता मी नाही थांबू शकत. प्लिज मला समजून घे.

एलेना आता कनविन्स होणार नाही. ती तिचे निर्णय ठाम पणे घेत असते हे यश ला माहीत होतं. म्हणून निराश मनाने तो तिला घेऊन घरी परत आला.

जाई आशु सोबत तिच्या कॉलेज मधून परत येत होती. कॉलेज मध्ये आशुसोबत काहीच बोलता आलं नाही म्हणून ती तिला घेऊन तिथेच आली जिथे यश आणि एलेना आधीच आलेले होते. जाईने त्या दोघांना लांबूनच पाहिले आणि ती मागे वळली मात्र आशूने तिला थांबवून म्हटले,

जाई तो यश आहे ना तिथे?

हो तोच आहे आणि ती एलेना आहे. त्याची…

तिला अर्ध्यात टोकून आशु म्हणाली,
हेच सांगणार होतीस का मला?

हो आशु पण आता नको चल इथून जाऊया आपण चल उगाच त्याना डिस्टर्ब नको.

ये थांब ना जाई, त्यांच्या कडे पाहून तर वाटतच नाही ते इथे एकमेकांना वेळ देण्यासाठी आले असतील.

म्हणजे, काय म्हणायचंय तुला?

अग बघ ना त्यांच्याकडे अस वाटतय भांडण करत आहेत दोघे.

काय?.......कस शक्य आहे?

जाई थोडं पुढे होऊन पाहू लागली तर त्यांच्या हावभावा वरून त्यांच्यात वाद चालू होता असंच दिसत होतं. आशु आणि जाई आणखी थोडं पुढे गेल्या आणि झाडाच्या मागे लपून पाहू लागल्या तेंव्हा त्यांना यश आणि एलेनाचे शेवटचे संभाषण ऐकू आले. यश आणि एलेना निघून गेल्यावर जाई विचारात पडली. तिला माहीतच नव्हते की एलेना ला तिचं यश सोबत असणं खटकतं. तिने फक्त एव्हढेच ऐकले होते की एलेना ला भारतात रहायचं नाही.

यश च्या चेहऱ्यावरची नाराजी आणि उदासी पाहून जाईला खूप वाईट वाटलं. तिने आशूला सारं काही सांगून टाकलं आणि एलेना सोबत बोलून तिला समजवण्याचा निर्णय करत ती घरी परतली.

यश चा उतरलेला चेहरा पाहून माई पण विचारात पडल्या पण त्याला काही विचारायचा आतच तो त्याच्या खोलीत निघून गेला.

एलेना माईंच्या जवळ येऊन नॉर्मल आवाजात त्याना म्हणाली माई मी आज रात्री परत जातेय घरी. मॉम चा कॉल होता आणि माझी सुट्टी पण संपली. सो आता निघावं लागेल.
माई काहीतरी क्लिक झाल्या सारखं म्हणाल्या,

अच्छा म्हणून साहेबांचा मूड खराब आहे तर?
एलेना कसनुस हसून सारिकाच्या खोलीत निघून गेली.

आबासाहेबांच्या समोर कस सांगावं ह्याच भ्रमात नितीन च्या तोंडून एकही वाक्य धड निघत नव्हतं. तत पप करत अखेर त्याने सुरुवात केली.

नितीन कामाला लागून सहा महिने झाले होते. त्याचा कामाप्रति प्रामाणिकता आणि त्याच्या मेहनती मुले त्याचं प्रमोशन झालं होतं. त्यांच्या कंपनी मध्ये नवीन भरती झालेल्या काही मुलं आणि मुलींना ट्रेनिंग देण्याचं काम नितीन वर सोपवण्यात आलं. ट्रेनिंग पूर्ण झाल्यावर त्या ट्रेनिंना कोणती पोस्ट द्यायची हे ठरणार होते.

ट्रेनिंगच्या पहिल्या दिवशी नितीनलाच ऑफिसमध्ये यायला उशीर झाला. तो घाईतच ऑफिस ला पोहोचला आणि लिफ्ट कडे धावत जात असताना दुसऱ्या। बाजूने त्याला एक मुलगी येऊन धडकली. अर्थात तिचीच चूक होती. परंतु ती पण खूप घाईत दिसत होती म्हणून सॉरी न बोलता ती लिफ्ट कडे धावली. नितीन पण तिच्या मागे लिफ्ट मध्ये गेला, त्याने रागाने तिच्याकडे पाहिले तर तिनेही त्याला टशन दिली. दोघेही एकाच वेळी एकाच फ्लोअर वर जाण्यासाठी लिफ्ट चे एकच बटन दाबायला गेले आणि पुन्हा एकमेकांच्या बोटांचा स्पर्श एकमेकाना झाला. त्यावर चिडून त्या मुलीने त्याला रागाने म्हटले, दिसत नाही का?

नितीन ला आधीच राग आलेला आपले दात ओठ खात तिला म्हणाला मला वाटतंय तुलाच नीट दिसत नाही मिस. जा जाऊन चष्मा बनवून घे.

ती तितक्याच रागात त्याला म्हणाली,
ओ मिस्टर, मला गरज नाही आणि तुमच्या सारखे टपोरी मुलं एकट्या मुलीला पाहून असले चाळे करतात ना ते मला चांगलं ठाऊक आहे.

आता नितीन चा ताबा सुटला आणि तो तिच्या वर खेकसत म्हणाला ये कुणाला टपोरी बोलतेस? आणि तुझ्या मागे पडायला काय तू स्वतःला अप्सरा समजतेस का? समोर आरश्यात बघ चपटे नाक आणि फुगलेले गाल एकदम माकड दिसतंय.

ती आता खूप रागात आली होती. पुढे काही म्हणणार तर त्यांचा फ्लोअर आला होता आणि नितीन सरळ बाहेर पडून निघून गेला. मागून ती ही पाय आपटत तू भेट पुन्हा मग दाखवते तुला माझा हिसका म्हणत बाहेर आली आणि रिषेप्शन कडे निघून गेली.

रिषेप्शन वर विचारल्यावर तिला कॉन्फरन्स रुम मध्ये जाण्यास सांगितले. ती घाईत तिथे गेली तर कॉन्फरन्स रूम मध्ये चार पाच मुलं आणि दोन मुली हजर होत्या आणि त्यांच ट्रेनिंग चालू झालं होतं.

तिने नॉक करून विचारले, मे आय कमिंग सर?

आणि त्याने वर मान करून पाहिलं तर ती शॉक झाली. कारण ट्रेनिंग इन्स्त्रक्टर नितीनच होता. तिचा मघासचा राग पळून जाऊन आता त्याची जागा भीतीने घेतली होती.
नितीन ला पण आश्चर्य वाटले आणि सोबत त्याच्या कपाळावर आटी आली मनातच, काय कटकट आहे आता ही मकडीन पण आहे का ट्रेनिंग साठी?

राग तर खूप येत होता मात्र तो काहीच बोलू शकत नव्हता म्हणून त्याने ईशाऱ्याने तिला आत या अस खुनवल. ती पण गुपचूप आतली आणि एक जागेवर बसली. त्याने तिच्या कडे कटाक्ष टाकला आणि तो म्हणाला मिस आधी इन्ट्रो द्या तुमचा.

ती जागेवर उभी राहिली आणि एक आवंढा गिळून त्याला म्हणाली, मी गौरी… गौरी पाटील.

रात्रीच जेवण झाल्यावर एलेना एअरपोर्ट ला निघणार होती यश तिला सोडणार होता तिने सगळी तयारी केली होती. सारिका आणि ती बोलत बसल्या होत्या तेव्हढ्यात तिथे जाई आली.

माईनी तिला आल्या आल्या मदती साठी बोलवलं. सारिका घरी असून मदत करत नाही किती सांगते थोडं शिकून घे पण काही उपयोग नाही पाळत्या घड्यावर पाणी.

असुद्या हो माई मी आलेय ना आता आपण करू पटकन जेवण. पण मला कळत नाही आज हे स्पेसिएल जेवण कोणासाठी?

अग हे एलेना साठी आहे. ती आज परत जातेय ना तिच्या देशात म्हणून म्हटलं थोडं गोडधोड बनवावं.

जाई मस्तीच्या मूड मध्ये येत म्हणते, अच्छा माई खूप लाड चाललेत हो सूनबाईचे.

माई पण तीच बोलणं ऐकून हसायला लागतात. पण मनात म्हणतात म्हणून तर तुला सून बनवणार होते म्हणजे तू पण माझे असेच लाड केले असतेस.

रात्रीचे जेवण होते तरीही जाईला एलेना सोबत एकांतात बोलता आले नव्हते. शेवटी न राहून तिने माईंना सांगितले की,
माई मी जाऊ का एअरपोर्ट वर एलेना ला सोडायला?

माई पण हसून म्हणाल्या आग विचारतेस काय जाना.

जाई घरी कळवते यायला उशिर होईल आणि ती एलेना सोबत जाते. जाई सारिकाला सोबत येण्यासाठी किती विनवण्या करते पण ती काही त्यांच्या सोबत जात नाहीं.

तिघेही गाडीत बसतात यश ड्राईव्ह करत असतो आणि एलेना त्याच्या बाजूला बसलेली असते. जाई आल्या पासून यश ने तिच्या कडे पाहिलेही नव्हते. कुठे तरी तो तिला दोष देत होता. एलेना मात्र काहीच झाले नाही अशी तिच्याधी बोलत होती.

एअरपोर्ट वर पोहोचल्यावर नितीन गाडी पार्क करण्यासाठी निघून गेला आणि ह्या दोघी एकट्या राहिल्या. जाई ने भीत भीत एलेना समोर विषय काढला.

एलेना तिच्या मतावर ठाम होती. जाईने अतोनात प्रयत्न केले तिला समजवण्याचा परंतु कसलाच उपयोग झाला नाही. एलेना फक्त एकूण घेत होती. शेवटी जाईचा नाविलाज झाला होता.

यश गाडी पार्क करून आला. आणि काहीच न बोलता एलेना ची बॅग घेऊन आत गेला. वैटिंग एरियामध्ये बसून ते तिघे वेळेकडे पहात होते बोलत कोणीच नव्हते. जाई कधी यश तर कधी एलेना कडे पहात होती. ती त्यांचा चेहरा वाचण्याचा प्रयत्न करत होती. यश च्या चेहऱ्यावर तिला खूप दुःख दिसत होतं. तिला आतून गहिवरून आलं होतं. ती समजू शकत होती त्याच्या भावना. ती पण तर त्याच वेदना सहन करत होती. पण कसं सांगणार कसं समजवणार तिला काहीच समजत नव्हतं. ती त्याची हालत काय झाली असेल आणि त्याला किती वेदना होत असतील याचा विचार करत होती.

काही वेळाने अनाऊन्स झाली आणि एलेना जायला निघाली. तिने यश कडे पाहिले त्याने काहीच न बोलता तिला मिठी मारली आणि लगेच दूर झाला. ती जाई कडे आली आणि तिने जाईला पण मिठी मारली आणि बाय बोलून पुन्हा मागे न बघता ती सरळ निघून गेली.

एलेना नजरेच्या आड होई पर्यंत ते दोघे तिच्या कडे पहात होते. जशी ती आत निघून गेली यश लागलीच बाहेर पडला. जाई त्याच्या मागे मागे बाहेर आली. त्याने गाडीजवळ येऊन एक जोरात पाय टायर वर मारला आणि तसाच गाडीच्या डोअर वर डोकं टेकून उभा राहिला. जाई खूप घाबरली होती तिने भीत भीतच त्याच्या पाठीवर हात ठेवला आणि त्याला बोलू लागली,

यश संभाळ स्वतःला, मला माहित आहे एलेना च्या जाण्याने तू तुटला असशील पण होईल रे सगळं ठीक. तू स्वतःला सावर, काहीतरी मार्ग नक्की निघेल.

तो तिच्या बोलण्याने अधिकच संतापला. तिच्याकडे वळून त्याने जळजळीत कटाक्ष तिच्याकडे टाकला तर तिच्या काळजात धडकीच भरली.

एका क्षणाचा विलंब न करता त्याने तिचे दंड हाताने घट्ट पकडून तिला गाडी कडे वळवले, गाडीला टेकवून तो तिच्यावर ओरडला.
काही ठीक होणार नाही समजलं, जो पर्यंत तू आहेस ना मध्ये काही ठीक होणार नाही.

त्याचा राग पाहून जाई घाबरून गेली होती. ती एव्हाना रडायला लागली होती. ती रडतच त्याला म्हणाली पण मी काय केलं?

त्यावर पुन्हा त्याच स्तरावर आवाज चढवून यश तिला म्हणाला, की एलेना ला वाटतंय तुझ्या आणि माझ्या मध्ये काहीतरी आहे. म्हणून ती निघून गेली आणि तू मला सांत्वन करत आहेस सगळं ठीक होईल म्हणून कस होईल ठीक? सांग ना? तुला काय माहीत किती वेदना होतात अस आपल्या प्रेमला दूर जाताना पाहून. तुला काय कळणार आहे मला आता काय फील होतंय ते? तुझ्याच मुले झालंय सगळं. तो तिला बाजूला करून म्हणाला जा दूर जा माझ्या पासून. तुझा चेहरा दाखवू नकोस मला पुन्हा.
यश तसाच गाडीत बसला आणि भर्रकन निघून गेला.

जाई अश्रु भरल्या डोळ्यांनी त्याला जाताना पहात तिथेच उभी राहिली.

क्रमशः.........


खूप उशीर केला म्हणून माफी मागते.... आणि सोबत दोन भागांची भेट पण देते. चला वाचून समीक्षा द्यायला विसरू नका.