The Author Sheetal Jadhav Follow Current Read भैरवनाथ आसन By Sheetal Jadhav Marathi Science-Fiction Share Facebook Twitter Whatsapp Featured Books मेरी गुड़िया सयानी हो गई ..... 'तेरी मेरी बने नहीं और तेरे बिना कटे नहीं' कुछ ऐसा ह... सर्द हवाएं लेख-सर्द हवाएं*******"" यूं तो सर्दियों के मौसम में जब... इश्क दा मारा - 45 यूवी गीतिका का हाथ पकड़ कर ले जा रहा होता है तभी गीतिका बोलत... लल्लन जी की अद्भुत नौकरी गाँव के एक छोटे से कस्बे में रहते थे लल्लन जी। उनका नाम ही उ... चुप्पी - भाग - 2 क्रांति की हॉकी खेलने की चाह को महसूस करके और उसकी ज़िद को हद... Categories Short Stories Spiritual Stories Fiction Stories Motivational Stories Classic Stories Children Stories Comedy stories Magazine Poems Travel stories Women Focused Drama Love Stories Detective stories Moral Stories Adventure Stories Human Science Philosophy Health Biography Cooking Recipe Letter Horror Stories Film Reviews Mythological Stories Book Reviews Thriller Science-Fiction Business Sports Animals Astrology Science Anything Crime Stories Share भैरवनाथ आसन (1) 3.4k 11k आसन म्हणजे बसण्याची जागा. प्रत्येकासाठी आसन हे आराम करण्याचे, निवांत बसण्याचे साधन तर कामाचा ठिकाणी हेच आसन काम करण्यातला थकवा घालवतो. आसन म्हणजे लाकडी हात असलेली खुर्ची. ज्यावर आपले हात निवांतपणे ठेवता येतात. पुर्वी राजा महाराजासाठी, त्यांचा मंत्रीमंडळासाठीही आसन असायची. चांदीची, सोन्याची, हिरेजडीत आसन असत. कोरीव नक्षीकाम केलेल राजाच आसन सर्वात किंमती व आकर्षक असायच. प्रत्येक राजा आपल आसन कस वेगळ असेल याचा विचार करायच. शिवाजीमहाराजांचाच आसन हे सोन्याच होत त्या आसनाचा दोन्ही बाजुला सिहांची प्रतीकृती होती. म्हणुन त्याला सिंहासन म्हणत.भगवान शंकर कैलास पर्वतावर राहयचे. त्याकाळात मानव झाडाची पान, प्राण्याची चामडी वस्ञ म्हणुन घालत असे. भगवान शंकर वाघाची कातडी अंगावर पांघरायचे. अश्मयुगात आसन दगडाची होती. शंकर हे दगडाचा शिळेवर बसत असे. गणपतीला बसण्यासाठी दगडाचा उंदीर शंकरानी करून घेतला होता तर कार्तिकेसाठी दगडाचा मोर बनवला होता. दोघानाही आपल आसन आवडल होत. आसन बनवलेल्या कारागीरानी शंकराला फणा काढलेला नागाची प्रतीकृती दिली होती. शंकरानी मोठ्या हौसेने ती गळ्यात घातली. तेव्हापासुन शंकर ती नागाची माळा गळ्यात घालत असे. गणपतीने संपुर्ण महाभारत उंदरासनावर बसुनच लिहले. गणपतीच्या या आसनाचे कुतुहल सर्वानाच होते. त्याकाळात दगडाला आकार देण्याची कला म्हणजेच शिल्पकला विकसीत होत होती. भगवान शंकराच्या काळातच दगडांचे भव्य महाल बांधले गेले असावे. शंकर कलेचा उपासक होता. त्या महालाचा भिंतीवर उत्तम कलाकृती आजही पहायला मिळते. नदीकिनारी पाण्याची सोय असेल अशी राहण्याची जागा निवडली जात असे. त्या काळातील काही घर आजही पहायला मिळतात. ती घर महालासारखीच होती. सभोवताली खुप मोकळी जागा असायची. दगडांच्या पक्क्या घरांचा शोध शंकराचा काळातच लागला असावा. केदारनाथ हे त्याचे उदाहरण आहे. कदाचीत गणपतीने ते बांधुन घेतल असाव. पांडवानी ही दगडाची पक्की घरे स्वतःचा संरक्षणासाठी बांधली. कांळातरानी ती घर आज मंदीर म्हणुन उभी आहेत. त्या मंदिराचा खोलवर अभ्यास केला तर तिथे थोर प्राचिन व्यक्ती राहत असल्याचा खुणा नक्की मिळतील.दगडाचे बांधकाम अजुनही टिकले आहे. अशा दगडी देवालयाकडे बारकाईने बघीतल तर त्याकाळातील स्थापत्य कला किती प्रगत होती हे समजते. कित्येक उन पावसाळे या वास्तुनी पाहीली आहेत. माझ्या आजोळी किडगावात भैरवनाथाच मंदिर आहे. किडगाव सातारा जिल्हयातील एक छोटस गाव आहे. देवळात पाय ठेवताच गारवा वाटतो. बिनाचपलेचे पाय जेव्हा दगडी पायरीवर ठेवतो तेव्हा त्या दगडांचा स्पर्श अल्हादीत करतो. वास्तुला मोठा लाकडी दरवाजा आहे. एखाद्या किल्याचा दाराप्रमाणे तो भासतो. दोन-तीन एकर जमिनीच्या उंचवट्या असलेल्या जागेची निवड करून त्या जागेचा सभोवती दोन मजले उंचीएवढे दगडी भिंत तिन्ही बाजुने आहेत. केवळ चार पायरीअसलेले हे देऊळ आत मध्ये मोठे भव्य मैदान आहे. तिथे असलेला दगडाचा अंदाजे सात फुटाचा दगडी नंदी येथील इतिहासाचा एकमेव साक्षीदार आहे. नंदी शंकराचे वाहन होते. मंदिरात प्नवेश करायचा आधी या नंदिला नमस्कार केेला जाताे. शंकराने नंदीची निवड का केली असावी. याविषयी मला तर वाटत हा नंदी शंकराला दिशा सांगण्यात मदत करत असेल. उत्तरेकडुन दक्षीणेकडे जाताना एखाद्या होकायंत्रासारख त्याचा वापर केला जात असावा. बाजुलाच तिन मजली दिपस्तंभ आहे. पुर्वी युद्धात वापरायचे असे गोलाकार दगड हि येथे पहायला मिळते. असे दोन दगड मंदीर परीसरात पहायला मिळतात. ते आता आकाराने लहान होत जात आहे अस म्हंटल जात. बाहेरून हे देऊळ अल्लाउद्दीनच्या गुहेसारखेच वाटते. रस्त्याचा कडेला हे मंदिर आहे. कदाचीत प्रवाशी लोकांसाठी हे देवालय बांधले असावे किंवा कधी काळी एखाद्या राजाचा महाल असावा. ज्याचे कालांतराने देवालयात रुपांतर झाले असावे. त्या काळच्या मजबुत बांधकामाच उत्तम नमुना पहाण्याची इच्छा असेल तर नक्की या मंदिराला भेट द्या. सातारा शहरापासुन बसने साधारण पंधरा मिनटावर हे गाव आहे. Download Our App