Reshmi Nate - 39 in Marathi Love Stories by Vaishali books and stories PDF | रेशमी नाते - 39

Featured Books
  • રેડ સુરત - 6

    વનિતા વિશ્રામ   “રાજકોટનો મેળો” એવા ટાઇટલ સાથે મોટું હોર્ડીં...

  • નારદ પુરાણ - ભાગ 61

    સનત્કુમાર બોલ્યા, “પ્રણવ (ૐ), હૃદય (નમ: ) વિષ્ણુ શબ્દ તથા સુ...

  • લગ્ન ને હું!

    'મમ્મી હું કોઈની સાથે પણ લગ્ન કરવાના મૂડમાં નથી, મેં નક્...

  • સોલમેટસ - 10

    આરવને પોલીસ સ્ટેશન જવા માટે ફોન આવે છે. બધા વિચારો ખંખેરી અન...

  • It's a Boy

    સખત રડવાનાં અવાજ સાથે આંખ ખુલી.અરે! આ તો મારો જ રડવા નો અવાજ...

Categories
Share

रेशमी नाते - 39

सकाळी सगळे आवरून आले. पिहू पण बाहेर आली सगळे तिला एकटक च बघत होते....

दी, नीट झोपली ना...काल....

हो,.... पण अस का विचारते....

काल पडली असती स्टेपवरून प्रांजल टेंशन मध्ये येत बोलते.... पिहू चे डोळे च ताठ होतात.... क... काय??

हू... हो जिजू ने पकडलं नसत ना.... प्रांजल बोलत विचार करत पिहुला हग करत बोलते.

वीरा ,आलिशा एकमेकींना कडे बघत ब्लँक होत पिहुकडे बघत होत्या.

प्रांजल कोण कोण बघितलं मला पिहु दोघींचे चेहरे बघत हळूच कानात बोलते. सगळेच तुला बघून शॉक मोड मधे गेले होते. प्रांजल खिखी हसत बोलते.पिहू तिच्या कडे रागाने बघते.

सगळे ब्रेकफास्ट करायला येतात.

वहिनी तुला कालच काहीच आठवत नाही का वीरा हसू कंट्रोल करत विचारते.

पिहू थोड हसत नाही म्हणते. त्यावर तिघी जोरात हसतात.

वहिनी, तुला बघुन मी ब्लँक झालो... डोळे झाकून कुठे चालली. नमन हसत बोलतो

ब्रो, दादाला ही माहित न्हवते. रात्री झोपेत पडली तेव्हा कळले . मला तर सकाळी कळले काय झालं वीरा हसत नमन कडे बघत बोलते.

दिवस भर ह्याच विषयावर बोलणार आहेत का ? विराट मागून येत चेयर बसत बोलतो.तसे सगळे शांत होत ब्रेक फास्ट करायला लागतात.

दादा, एक विचारू वीरा दबकत बोलते. विराट रोखून बघतो.

तू रात्री कधी दचकला आहेस का? वहिनी अशी चालत असताना.

विराट एक नजर पीहू कडे बघत गालात हसत नाही म्हणतो. पिहू हसत लाजते.

नमन खालून प्रंजलच्या पायाला पाय मरतो तशी प्रांजल दचकून त्याच्या कडे बघते.

तो तिला स्मायल करत डोळा मारतो. प्रांजल बारीक डोळे करत रागाने त्याच्या पायाला मारायला जाते. नमन पाय बाजूला करतो... तिचा पाय विराट लागतो.
प्रांजल नमन दोघे ही शॉक 🥵 एकमेकांना कडे बघतात.

विराट डोळे झाकून उघडत प्रांजल कडे बघतो.

सो..... 😐 सॉरी जिजु.... ते मी.... पाय सरळ करत होते
विराट नाही अशी मान हलवत खाली बघतो.
.
.
.

सगळे दुपरून निघाले घरी यायला जवळ जवळ रात्रच होते.सकळी सगळे थोड उशीराच उठले.

नमन, रिषभ विराट बरोबर साईट वर गेले. आलीशा पण तिचं काम होत म्हणून बाहेर गेली होती.पिहु सगळ आवरून ऑफिसच काम घेऊन बसली.
.
.

प्रांजल चल आपण किचन मध्ये काही तरी बनवू.....तिकडे कोण मला किचन मध्ये जाऊन देत नाही. आता दादा पण नाहिये घरी चल ना...

🙄wait, तुला येत असेल तर येते कारण मला काही कळत नाही. मी आमच्या किचन मध्ये पोटपूजा करायला जाते.

वीरा सिरियस होत नाही अशी मान फिरवते. ...प्रांजल मला वाटले वहिनीला इतक छान येते बनवता तुला ही येत असेल....

Oye, सिस्टर असलो म्हणून आम्ही सेम कुठल्या अँगल ने वाटल....हा....ती पूर्व तर मी पश्चिम आहे.

हो ते माहित आहे 😒...चल यू-ट्यूब बघून करू ना...वीरा तिचा हात खेचत किचन मध्ये घेऊन गेली.
दोघी पूर्ण किचनमध्ये नजर टाकतात. वीरा ने यूट्यूब ऑन केल....

वीरा,🥴🥴ज्याच्या साठी शिकते तो येणार आहे का खायला.

नाही ग,त्याला फोटो सेंड करते. 😆 मी बनवले म्हणून ....

इतकी मेहनत का घेते...कुठला तरी फोटो सेंड कर .सिम्पल ,

तुला काय करायचे नाहिये मी करणार आहे...तू शांत बस...

काय करू....वीरा सर्च करत बोलते.

त्याला काय आवडते...ते कर ना....

अम्म,मी कधी विचारले नाही , वीरा विचार करत बोलते.

ऑम्लेट कर ...

तो vegetarian आहे.

प्रांजल फ्रीज उघडते ...वीरा, कणीक भिजवलेली आहे .त्याची पोळी कर. ...

प्रांजल पोळी, 🙄

अग गोल करायची टेक्निक मी सांगते फक्त तू लाट....आणि तुझ्या सिद्धार्थला माहित आहे... तुला किचन कुठल्या दिशेला आहे हे पण माहित नसेल..मग तो तेवढ्यातच खुश होऊन जाईल. 😆😆

वीरा तिला एक लूक देत तीच काम चालू करते.

मॅडम गॅस ऑन करा...

तू, कर मी काम करते ना...

वाह, कणकेचा गोळा करणे तुझ्या भाषेत काम आहे...प्रांजल नाक मुरडत तवा ठेवून गॅस ऑन करते .

वीरा कशी तरी लाटते .प्रांजल बाउल घेउन त्याला राऊंड शेप देते....

😁😁झाली...आता टाकू कस 😐 चटका बसला तर...🤕

नाही बसत अस हातावर घे, आणि टाक..

तू टाक ...

ये हैलो मी अस काही कधीच करणार नाहिये....म्हणून मला शिकायची काही गरज नाहिये... क्षणात तीच्या समोर नमन चा चेहरा येतो..... काल पासून ती नीट बोललीच नव्हती . वीरा तिला हलवते तशी ती भानावर येते.

वीरा हातावर घेऊन हळूच टाकते .तवा खूप गरम झाल्याने एक बाजू करपते .वीरा कशीतरी भाजून प्लेट मध्ये ठेवते. आणि फोटो काढून सिद्धार्थ ला सेंड करते.

सिद्धार्थ अग्निहोत्री ... मल्टी नॅशनलकंपमी मधे जॉब ला होता. उंच, दिसायला सावळा काळेभोर डोळे, चेहर्‍यावरून शांत, जे आहे त्यात समाधानी होता.

सिद्धार्थ काम करत होता. मोबाईल ब्लिंक झाल्याने त्याने बघितल...वीरा चा मेसेज होता. त्याने ओपन करून बघितले. तर करपलेली पोळी होती.

सिद्धार्थ च्या चेहर्‍यावर स्माइल येते...mad girl तो तोंडातल्या तोंडात पुटपुटला ...त्याच लक्ष तिच्या dp वर जाते. विराट ,नमन आणि तिचा फोटो होता. त्याच्या चेहर्‍यावरचे हसूच गायब होते..... तो मोबाईल बंद करून विचारात पडतो.

फ्लॅशबॅक

( विराटची पार्टनर शिप मध्ये डील साईन होते. मोठी पार्टी ठेवली होती . तिथे सिद्धार्थ पण होता.

वीराचा चुकून एका मुलाला धक्का लागतो...

वीरा:- I am sorry...

ती व्यक्ति- आणि वीरा ची नजरानजर होते. हाय प्रणम ,वीरा हसत बोलते.

प्रणम हसत इकडेतिकडे बघत- hello ma'am

..प्रणम my name is veera ..

ma'am you are my boss's sister

yes, but we are friends right ...वीरा इंनोसंट फेस करत बोलली...

विराट ची नजर वीरा -प्रणमवर पडते... विराट, त्यांच्या जवळ येतो.

excuse me, ma'am प्रणम विराटला बघून मंद स्माइल देत दूसरीकडे जातो...

विराट वीराच्या जवळ येतो....वीरा दोन सेंकद विराटला बघुन दचकतेच...ती वरवर हसते...दादा..मी

विराट गालात हसत तिच्या गळ्यातलं पेन्डन नीट करत जवळ जातो.वीरा there are many high profile people around us.It doesn't suits you to talk to ordinary employees like that.everyone is observing you and you can't let them give an opportunity to start gossips about you...तो वीराशी हसत जरी बोलत असला तरी तो चिडला हे वीराला कळलं होते..

दादा he is my friend ती घाबरत बोलतच होती कि त्याने तिला मधेच थांबवल..yes ,but now he is our employee and I can't tolerate that you are talking to ordinary employee.तो दातांवर दात घासत हसत शांत बोलतो.

वीरा शांत होत मानेनेच हो बोलते.

सिद्धार्थ दोघांच्या मागेच असल्याने त्याने ऐकले होते. सिद्धार्थ ने विराट ला बघितले होते...वीरा चा चेहरा त्याला दिसला नाही....
विराट तिच्या गालावरुन हात फिरवत निघुन जातो. वीरा डोळे ताठ करत निघून जाते .)

सिद्धार्थचा मोबाइल वाजल्याने त्याची तंद्री तुटते. ...तो मोबाईल वर नजर टाकतो. दोन तीन वेळा मिसकॉल पडल्यावर त्याने वैतागतच फोन रिसीव करत कानाला लावतो. ..

सिद,मुद्दाम कॉल रिसीव करत नाही ना,वीरा चिडून बोलते.

माहित असून कॉल का करते. एकच गोष्ट किती वेळा सांगायची मला तुझ्यात काहीच इंट्रेस्ट नाहिये.... मला एकट सोड .. कितीदा एकच गोष्ट सांगू.....

मला रिजन कळू तर दे, काय प्रोब्लेम आहे . आपण शांतेत बसून बोलू ना वीरा रागावर कट्रोल करत प्रेमाने बोलते.

वीरा ,कॉल करुन मला डिस्टर्ब करू नकोस... ..तो रागाने बोलून फोन ठेवून दीर्घ श्वास घेतला.... आपल्या स्टेट्स मध्ये जमीन असमान चा फरक आहे. सॉरी वीरा आपल्या नात्याच फ्युचर नाही.... तो मोबाईल वर तीच्या फोटो वरून हात फिरवत बोलतो.
.
.

वीराचे डोळे रागाने लाल बुंद झाले होते...तिने रागाने मोबाइल फेकुन तिचा हात खाली कट्यावर आपटला...आणि गरम तवा वर हात पडला तशी ती जोरात च किंचाळली...

वीरा sss,प्रांजल ने पटकन तिचा हात धरून नळाखाली धरला.

पिहू आवाज ऐकून घाबरून पटकन बाहेर आली....आवाज किचन च्या दिशेने आला ती पळतच गेली.

वीरा, कस काय झाल...पिहू घाबरून तिचा हातावर नजर टाकत बोलते.

वीराच्या मधल्या तीन बोटाला चांगलेच भाजले होते....

दि...ते.

तुम्ही काय करता इथे...तिला बाहेर घेऊन चल. पिहू फ्रीज मधुन बर्फ घेऊन आली.

वहिनी हळू...वीरा रडतच बोलू लागली. पिहू क्रीम लावते.
तुम्ही दोघी किचन मध्ये काय करत होत्या. पिहु ओरडुन बोलते.दोघी शांतच बसतात. वीरा तिथेच डोळे झाकून पडते. पीहु पण शांत होत किचन मध्ये जाऊन बघते. प्रांजल वीरा चा मोबाईल घेऊन येते.

वीरा मोबाईल गेला प्रांजल वीरा ला मोबाईल देत बोलते. तिला त्याच काहिच फरक न पडल्याने मोबाईल घेत सोफ्यावर टाकते.

संध्याकाळी विराट नमन घरी येतात.

वीरा हॉल मध्येच शांत टीव्ही बघत बसली होती. नमन आल्या आल्या हसत तिला समोरचा पिलो फेकून मारतो.

ब्रो sss, वीरा चिडून पिलो दुसरीकडे टाकते.

विराट तिच्या वर नजर टाकत जातच होता की त्याची नजर तिच्या बोटांवर पडली...Veera what happened?तो घाबरून तिच्या जवळ येतच ओरडुन बोलतो.नमनच ही तिच्या हाताकडे लक्ष जाते.

विराट हात घेऊन बघत होता. Veera how did happened this?

ते..... ते.... दादा मी किचन वीरा ही घाबरत बोलत होती ...नमन तीच्या हातावर फुंकर मारतो. पिहू विराट चा आवाज ऐकून बाहेर येते. विराट दात ओठ खातच बोलतो.

आ.अहो.... ते विराट पिहुकडे नजर वळवतो.

Where are all the maids? Veera needs to go to the kitchen?विराट रागात बोलतो.पिहुला घाबरून काय बोलाव कळतच नव्हते.Speak up damn it...stop staring at me.

ते.... ते.... मी

दादा वहिनीला माहित नव्हते.... मीच टाईम पास म्हणून गेले होते.

कीचन काय टाइम पास करायची जागा आहे का??? विराट तिच्या बोटांवर फुंकर मारत बोलतो.....is it burning?... विराट काळजीने विचारतो.
वीरा डोळ्यात पाणी आणून मान नाही म्हणून हलवत त्याला बिलगते.विराट तिच्या केसावरून हात फिरवत ओठ टेकवत तिला जवळ घेतो.
What happened baby? नमन तिला प्रेमाने विचारतो.

पिहु पण रिलॅक्स होत शेजारी थांबते.

विराट वीराला थोड बाजूला करत तिचे केस नीट मागे घेतो. वीरा, परत किचन मध्ये जायचं नाही . तुला थोडा जरी त्रास झालेला मला सहन होणार नाहीये. विराट तिच्या डोळ्यात बघत बोलतो.... त्याला तिचे डोळे वेगळेच जाणवत होते. वीरा मानेने हो म्हणत नजर चोरत दुसरीकडे बघते.

विराट उठून फ्रेश होयला जातो.... त्याच विचारचक्र सुरू झाले होते.
.
.
.
.

सकळी सगळे मुंबई ला निघून गेले. पिहुचा चेहराच उतरला सात आठ दिवस तिला करमुन गेले होते. आता दोघच त्यात विराटच काम हि वाढले होते. सकळी लवकर जाऊन रात्री उशीर होतच होता. कुठल्याही परिस्थतीत त्याला दोन महिन्यात काम संपवायचे होते. अजून पुढचे प्रोजेक्ट त्याचे पेंडिग होते..... दिवसामागून दिवस जात होते.... विराट कामामुळे पूर्ण डिस्टर्ब झाला होता.... पिहुशी पण बोलायला त्याला वेळ नव्हता.

पिहुला सकाळी उठल्यापासून मळमळ होत होती. डोकं सुद्धा जड वाटत होते....

अहो,...

हम्म ,विराट जायच्या गडबडीत होता.

माझं डोक खूप दुखतय पिहु त्याला मागून मिठी मारत बोलते.

पिहु, पेन किलर घे... थोड झोप बर वाटेल. तो तिचे हात काढत कपाळावर किस करत घाईतच निघून जातो.
पिहु, विचारात पडते.

थोड्यावेळाने तिच्या आईचा कॉल येतो.

हॅलो पिहू,

हा बोल, पिहु बारीक आवाजातच बोलते.

झोपली होती का??? आवाज बारीक येतोय.

हो, झोपले होते . माझं डोक दुखतय म्हणून पडले होते.

हम्म, तु चेक कर ना महिना उलटून गेला. रेवती खूष होत बोलतात.

पिहुचे डोळे ताठच होतात. मम्मी ss... तुझं एक कही तरीच असते. तस काहीच नसणार ये.

हो, ग... म्हणून एकदा कन्फर्न करू ... चेक केल्यावर कळेलच ना....

मम्मी.. नको.... नको मला आधीच टेंशन आले .

अग बाळा त्यात काय टेंशन ... तू घरात चेक कर पॉझिटिव्ह आले की. Gynecologist दाखव....

मम्मी, किती कॉन्फिडंस ने सांगते.पॉझिटिव्ह आले की.... पिहु थोड चिडून लाजून बोलते

तुझा चेहरा सांगतोय .... आणि बघ पॉझिटिव्ह च येणार रेवती हसत बोलतात

मम्मी ठेव मी विचार करून .... (रेवती तिला तोडत बोलतात....) विचार नाही पाहिले चेक कर नाही तर मी विराट ला फोन करून सांगेल त्या ऑर्डर देतच बोलतात.

मम्मी sss ह्यांना तू फोन वैगेरे केली ना बघ....

मग ऐकत का नाही.... तिकडे एक तर एकटीच असते विराट काय गेला की दिवसभर तिकडेच जातो. काळजी वाटते. रेवती भावूक होत बोलतात.

ठीक ये करते बस का.. ठेव मी काही तरी खाते.

काय?? अग बारा वाजत आले अजून उपाशीच बसली तुला तुझी काळजी घेता येत नसेल ना .राहायचे नाही इकडे ये.. रेवती चिडून बोलतात.

मम्मी माझं आधीच डोक दुखतय आणि तू त्रास देत बसली.... पिहु चिडून कॉल कट करते. पिहु स्वतःशीच बडबड करत डायनिंग टेबलवर बसून प्लेट उचलते.

मॅडम, नाश्ता सगळा गार झाला तुम्हाला दुसर काही बनवू का...

पिहु ला तर काहिच खायची इच्छा होत नव्हती. आता तर तिचं मन ही मम्मी बोलतेय ते खर होईल असे वाटायला लागले.... मन चलबिचल झाले होते. विराट शी कसं बोलणार तो कसं रियाक्ट करणार. कधी बेबी बद्दल बोलणेच झाले नव्हते. एकदाच सहज बोलायला गेले तेव्हा च रिक्शन आठवून तिला धडकीच भरली.

मॅडम....

ह.. हा... पिहु विचारातून बाहेर येत बोलते.

हे घ्या ते नका खाऊ गार झाल. मेड तिच्या समोरची प्लेट बाजूला करत दुसरी प्लेट ठेवते.

पिहु थोड़स खाऊन रूम मधे येते. पिहू च डोकच काम करत नव्हते. चेक करू का नको हाच विचार डोक्यात घुमत होता.... किट आणून दोन दिवस झाले होते पण पिहु ची हिम्मतच होत नव्हती....पाहिले ह्यांच्या शी बोलते. ती मनात विचार करत परत ठेवून देते. रात्री विराट ला यायला थोडा लेटच होतो. विराट च्या चेहऱ्यावरून त्याचा मूड खराब आहे हे लक्षात येत होते.

दोघेही जेवण करून घेतात. पिहु सगळ आवरुन लाइट्स ऑफ करून रूम मधे येते.

विराट फोनवर मानवला ओरडतच होता. त्यानंतर नमन रिषभ दोघांवर सुद्धा चिडला होता. विराट च बोलणं तर इतकं विचित्र होत .विराट फोनवर त्यांना ओरडत होता तर इकडे पिहूला दोघांबद्दल वाईट वाटत होते.

विराट दीर्घ श्वास घेत फोन बेडवर फेकून डोळे झाकून पडतो.

अहो, किती चिडता ... पिहु हळूच त्याच्या केसांमधून हात फिरवत बोलते.

सगळे useless आहेत एक काम धड नीट हॅण्डल होत नाही.

पिहु शांतच बसते... कुठे तरी तो तिच्यावर भडकेल आज तर तिने ही कामाला हात लावला नव्हता.

पिहू, जेनी ने मेल सेंड केलेले चेक केलीस का?.... तो डोळे उघडतं तिच्याकडे रोखून बघतच बोलतो.

पिहु, आवंढा गिळत नाही अशी मान हलवते....

का!!! विराट तिचा हात काढत उठून बसला.

ते म.... माझं डोकं दुखत होते पिहु त्याच्यावकडे न बघताच पटकन कुशीत शिरत बोलते.

विराट शांत होत काहिच बोलत नाही. त्याला महित होते पिहु काही कामं दिल तर मन लावून करते.

अहो,

हम्म.... विराट तिला थोड बाजूला करत तिच्याकडे बघत बोलतो.

मला तुम्हाला काही तरी विचारायचे आहे. पिहु त्याच्या डोळ्यात बघत बोलते.विराट डोळ्यानॆच बोल म्हणतो.
अहो, आपण बेबी बद्दल कधीच बोललो नाही. तुम्ही ....

विराट चे हावभावच बदलतात. पिहु, कोण काही बोलल का ?

नाही ... ओ कोण कही बोलले नाही सहजच ते...

पिहु, माझं डोक आधीच गरम आहे उगाच मला ओरडायला भाग लावू नको. You just concentrate on your career... it's been long time you have joined office still your work is not perfect .

पिहुचा चेहराच उतरतो. अहो .... तुमच कधी डोकं गरम नसते. आणि घरी आलं तरी ऑफिस च बोलतात आपलं कधी बोलणारं आपण थोडा वेळ नीट बोलला तर काय जाईल पिहु थोड चिडून बोलते.

पिहु, आता मी काहीच बोलायच्या मूड मधे दिसतोय का तुला ... तो वैतागूनच बोलतो.

पिहु बाजुला सरकून ब्लँकेट ओढून झोपते. पिहु, मी शांततेत बोलतोय ना.... तो राग आवरत बोलत होता.पिहुचा मुसमुस करण्याचा आवाज येऊ लागला.

पिहु, मी काय बोललो लगेच रडायला. तो ब्लँकेट जोर लावून बाजुला करत बोलतो. पिहु त्याला पाठ करत कुस बदलते. विराट उसासा सोडत तडक रूमच्या बाहेर निघून जातो.
विराट डोळे टेकून आराम चेयर मध्ये विचार करत बसतो. त्याच्या डोक्यात कधी रिसॉर्ट चालू होते हेच पडले होते. तो काम संपवायचा विचारात होता पण कामं अजुन वाढतच होते . इथून सगळा बिजनेस हॅण्डल करायचे जड जात होत होते..... थोड्यावेळाने विराट रूम मध्ये येतो पिहु झोपली होती..... सकाळी पिहुला जाग आली तर विराट नव्हता..... पिहूने विराट ला कॉल केल्यावर तिला कळले की तो कोचीला गेला .

पिहूने किट घेतले आणि चेक केले.... तिने डोळे घट्ट मिटून घेतले. तिने हळूच डोळे उघडुन किट वर नजर टाकली .... किट वर दोन रेड लाईन आल्या होत्या.... पॉझिटिव्ह आल्याने पिहुला तर काय करू नी काय झाले होते.... मन तर हवेत उडत होते.... भीती, टेंशन , एक्सिमेंट आनंद सगळे भाव एकत्र झाले होते.... नंतर विराट चा विचार येताच तिला धडकीच भरते. विराट काय बोलेन त्याला आता बाळ हवं आहे की नाही अश्या विचाराने तिच डोकं उठले होते.

मोबाईल वाजल्याने ती विचारातून बाहेर येत कॉल रिसिव्ह करते. विराटचा कॉल असतो.

हॅलो ,

पिहु....

हा बोला.....

आपल्याला मुंबईला जावे लागेल .... दुपारची फ्लाईट आहे

का ??काय झाले? पिहु, ब्लँक होत विचारते.

पिहु, फिरायला तर जाणार नाही ना.... महत्त्वाच काम आहे म्हणून चाललो.... काही तरी विचारून टाइम वेस्ट करतेस...तो वैतागून च बोलतो.मी बारा एक पर्यंत येतो....

तिचा चेहराच उतरतो... मी फक्त विचारलं इतकं रागाला जायची काय गरज आहे ... त्याने ऐकून कॉलकट केला. पिहु मोबाईल बघत बोलते.

ती रेवतीला कॉल करून सांगते. रेवती यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.....

पिहु... विराट काय बोलला

मम्मी.. मी नाही सांगितले ....

काय? वेडी आहेस का. खरच इतकी वेंधली का आहेस कसं होणार तुझं रेवती चिडून बोलत होत्या... त्यांच्या लक्षात येताच त्या हळू बोलतात... पिहु... मी सांगू का?

नको मी सांगते.... कोणीच समजून घेत नाही मला पिहु कंठ दाटून बोलते...

अग बाळा, शांत राह... चिडचिड करू नकोस बाळासाठी चांगल नसते..... उद्या विराट बरोबर. Dr. कडे जाऊन ये....

मम्मी आम्ही आज येणार आहोत मुंबईला ...

का ? काय झाले अस अचानक... रेवती घाबरुन बोलतात.

ह्याचं काम आहे .

हम्म, रेवती रिलॅक्स होत बोलतात. इकडे आल्यावर मी येते.... मला तर कधी तुला जवळ घेउन लाड करू अस झाले ... रेवती खुश होत बोलतात. (पिहु खुदकन हसते) माझी छोटी परी आता आई होणार .... सुमनला मी सांगते.....

मम्मी थांब नाsss मला पहिले ह्यांना सांगायचे आहे.

बरं ... नाही सांगत , विराट ला सांगून पहिले dr. कडे जा... मी पुढच्या आठवड्यात येते.... चल आता काहीतरी खावून घे.... मी देवापुढे साखर ठेवते ....

पिहू हसून हो बोलते.... पिहु तिचं आवरुन घेते.... चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. ती पोटाला हात लावत स्वतः शीच लाजून हसते.

पिहु दोघांचं थोडफार सामान पॅक करते ..... तिला विकनेसपणा जाणवत होता. काही खायचे मन होत नव्हते.
विराट आल्यावर पिहु झोपलीच होती..... विराटने कर्टन बाजुला घेतले . चेहऱ्यावर प्रकाश आल्याने पिहूची झोपमोड झाली....

पिहु, ही वेळ आहे का.... झोपायची विराट त्याच्या फाईल चेक करत बोलतो.

पिहु,.... उठ लवकर फ्रेश हो. जेवण करून निघायचं आहे. ती अजुन पांघरून झोपली म्हणुन विराट थोड ओरडुन बोलतो. पिहु च मन बिलकुल नव्हते . ती उठून त्याला इग्नोर करत फ्रेश होऊन आली.विराट फोनवर बोलत तिच्याकडे नजर फिरवतो. पिहु तिचं शांतपणे आवरत होती. काल,आज ओरडल्या मुळे शांत असेल अस त्याला वाटत होते. तिला थोडस ही ओरडले की अशीच हिरमुसून जात होती.

पिहुच मन आतून दुखत होते. विराट साधं दोन मिनिट काढून तिच्याशी नीट बोलत नव्हता. दोघेही एअरपोर्ट येतात. ...

पिहुला फ्लाईट टेकऑफ होताना मळमळ होऊ लागली. तिने तोंडावर हात ठेवला होता.

पिहु, काय झालं विराट तिचा हात काढत डोक्यावरून हात फिरवत बोलतो.ती इशाऱ्यातच सांगते .

Close your eyes. And take a deep breath तो तीच्या डोक्यावरून हात फिरवत बोलत होता.पिहु, शांत डोळे झाकून बसते . थोड्यावेळाने तिला थोड बर वाटू लागते.

विराट विचारात पडतो . तिला आज पहिल्यांदा च त्रास झाला होता. किती तरी वेळा तिने ट्रॅव्हल केले होते तेव्हा कधीच तिला वोमेटिंग चा त्रास झाला नव्हता.
बोलत तर दोघेही नव्हते. विराट त्याच्या कामाच्या टेन्शन मध्ये होता . आणि पिहु विराट ची चिडचिड बघुन तिचं बोलायचं मनच होत नव्हते . नऊच्या दरम्यान दोघे घरी येतात.

गीता आई कूठे??पिहु सगळीकडे नजर वळवत बोलते.

वाहिनी घरात कोणीच नाहिये. सगळे फंक्शन ला बाहेर गेलेत . यायला उशीर होणार आहे.

पिहु गीता शी बोलून दोघांचं जेवण रूम मध्ये पाठवायला सांगते.
.
.
.

पिहुच डोक जड झाले होते. .... ती फ्रेश होऊन बेडवर आडवी झाली. फ्लाईट मध्ये तिला त्रास झाल्यापासून त्याच लक्ष पिहुवरच होते.

पिहु, डिनर करायचा मग झोप....... विराट फोन चार्जिंग लावत बोलतो.

मला भूक नाहीये.... ती नजर दुसरीकडे करत बोलते.

तुला नीट बोलायचं नसेल तर सांग तस नाही बोलत विराट चिडून बोलतो.

नाही बोलायचं मला ती पण कंठ दाटून चिडून बोलतो.

विराट मुठी आवळत दात ओठ खातच तिच्याकडे बघतो. पिहु, काय प्रॉब्लेम नीट का बोलत नाहिये तो तिच्या शेजारी येऊन तिच्या दंडाला पकडत बोलतो.

तुम्ही कुठे नीट बोलता कही बोलल की चिडून बोलायच. मूड नुसार बोलता .... काल पासून मला बोलायचं पण तुम्ही तुमच्या कामातच आहे.

आता सगळं काम सोडून तुझ्या समोरच बसतो.... लवकर बोलत पण नाही एक शब्द बोलायला तास लावते..... इतकं काय महत्वाचं बोलायचं....

म... मी क.....कधीच कामं सोडून माझ्या समोर बस बोलले नाही... इतक्या वेळ थांबून ठेवलेलं पाणी डोळ्यातून बाहेर येते.

पहिले रडून घे..... आणि आठवलं तर सांग नाही तर राहू दे. विराट तिचा दंड झटकत उभा होत बोलतो.

डोअर नॉक झाल्याने पिहु पटकन डोळे पुसत वॉश रूम मध्ये जाते...

विराट तिच्याकडेनजर टाकत राग शांत करत दार उघडत जेवण आत घेतो. तो दोघांसाठी प्लेट लावतो....

पिहु चेहऱ्यावर पाणी मारून बाहेर येते. पिहु बेडवर चालली होती तर विराट ने तिचा हात पकडला.....
पिहु डिनर कर मग झोप तो ऑर्डर देतच तिला चेअर बसावत्तो.

मला भुक नाहिये . ती डोळे पुसत बोलते.

आपण नंतर बोलू . तो शांततेत घेत होता.....

पिहु पण थोडी शांत होते.

तो तिच्या समोर स्पून धरतो... पिहु ने आ करत खाल्ल... ती पटकन उठून बाथरुम मधे जाते. विराट तिलाच बघत राहतो.
पिहुला उलट्या होत होत्या.

पिहु, dr. कडे जाऊ विराट बाथरूम मध्ये येत बोलतो....
तो तिच्या पाठीवरून हात फिरवत तिचा चेहरा नॅपकीन ने पुसत बाहेर आणतो.

विराट मोबाईल घेतो आणि dr. ला कॉल करतो. Dr. चा फोन लागत नव्हता.

अहो, मी ठीक आहे .... नका कॉल करू पिहु रुक्षपणे बोलून गॅलरीत येते

तिला त्रास ही होत होता आणि रडू ही येत होते. विराट समोर रडल की तो अजुन चिडेल म्हणुन तिने तिचा हुंदका तसाच दाबून ठेवला होता. .. तिची अजुन घालमेल होतच होती..... श्वास ही जड झाला होता.

विराट चेहऱ्यावरून हात फिरवत बेडवर पडतो. .... पिहु त्याला बघून नजर फिरवते. विराट तिच्या मागे जात हात पकडत जवळ जातो.

पिहु.... तो तिचा चेहरा दोन्ही हातांनी वर करत प्रेमाने बोलतो. पिहु नजर वर करत त्याच्या डोळ्यात बघते.... डोळे तर काठोकाठ भरले होते...विराट दोन्ही अंगठ्याने तिचे डोळे पुसतो....

पिहु, तुझ्यासाठी नवीन आहे का...... तुला ही माहीत आहे ना बिझनेस म्हंट्यावर कीती प्रॉब्लेम येतात. धावपळ करून माझी पण चिडचिड होते. आणि हया पंधरा दिवसात किती कामाचं टेन्शन आहे... थोड निवांत झालो की आपण एकमेकांसोबत टाईम स्पेंड करू..... मला हि कळते एकट तुला बोर होते. त्यामुळे तुझी चिडचिड .... तो बोलत होता की पिहु पटकन बोलते.

I am pregent.....

दोन सेकंद त्याला ती काय बोलली कळलेच नाही. जेव्हा शब्द कळले ...What did you said ??... तो ब्लँक होऊन गोंधुळन जोरात बोलतो.

पिहु दाचकतेच डोळ्यातून पाणी बाहेर येते.....am sorry ती घाबरल्यामुळे तो तिला छातीशी कवटाळून घेतो. पिहु चा हुंदका बाहेर पडतो.
Hey... शूssss.... तो तिच्या पाठीवरून हात फिरवत तिला शांत करत बोलतो...... त्याला पिहु अस अचानक बोल्यावर तो पूर्ण पणे गोंधळून गेला.... पिहु त्याची रिएक्शन बघून अजुन हुंदके देत रडु लागली. 😭

पिहु,calm down and tell me properly... what did you said? .....तो तिला घेऊन सोफ्यावर बसत.तो तिचे हात हातात घेत बोलतो. पिहु शांत होत त्याच्या कडे बघते. तो तिच्या डोळ्यात बघत होता कान ही आतूर झाले होते .

मी.... मी.. ती हुंदका आवरत बोलते.

हह... ह

पिरेडियस मिस होऊन आठ दिवस झाले मला आतून फिल होत होते . म्हणून मी चेक केले तर पॉझिटिव्ह आले पिहु हळु च बोलत नजर चोरते.

विराट ला काय बोलावं काहिच कळत नव्हते. पिहु तू नीट चेक केलं ना...

पिहु मान वर खाली करत हो म्हणते.

kit कूठे?? तो शॉक होत बोलतो. पिहु पर्स कडे इशारा करते. तिची पर्स उघडून किट काढले. त्यावर दोन रेड लाईन्स होत्या. तो केसामधून बोट फिरवत तिच्या कडे येतो. पिहु, एवढी मोठी गोष्ट तू आज् सांगतेस.... तो ब्लँक होऊन बोलतो.

मी शूअर नव्हते....

अग पिरेडियस मिस झाले ते तरी सांगायचं....

पिहु, काही न बोलता भरलेले डोळे पुसत दुसरीकडे बघते.
विराट किट कडे एकदा तर पिहुकडे एकदा बघतो. विराट काय वेड्यासारखे प्रश्न विचारतो तो स्वतः शीच बोलला आणि त्याच्या चेहऱ्यावर मोठी स्माईल आली.

पिहु... पिहु तो हसत बोलत तिला उचलून घेत गोल गोल फिरवत तिच्या गालावर 😘😘😘किस करत झोक्यावर घेऊन बसतो.पिहु तर ब्लँक होत त्याच्या कडे बघते....

ये सोना, रडते का ...... तुला आनंद नाही झाला.....

🙄🙄 पिहुला काय बोलावे कळतच नव्हते. विराट काय बोलेन ह्या विचाराने तिच डोकं आऊट झाले होते ... आणि हा उलट तिलाच विचारतो...

विराट. एक हात तिच्या गालावरून ठेवत तिच्या ओठांवर ओठ टेकवत तिला हळुवार कीस करतो... तेव्हा पिहु विचारातून बाहेर येत डोळे बंद करून त्याला साथ देते.

विराट तिचा चेहरा दोन्ही हातांनी धरत कपाळाला कपाळ टेकवत गालात हसतो.

तू... तुम्ही खरच खुश आहात ना.... पिहु चेहरा बाजुला करत त्याच्या डोळ्यात बघत बोलते...

पिहु आनंदाची गोष्ट म्हंटल तर खुश, असणारच ना तो तिचे गाल ओढत बोलतो... पण तुझा का चेहरा असा झाला तु खूश नहीयेस... तो गंभीर होत विचारतो.

मी तर खूश असणारच ना .... मला तुमचं टेंशन
आले होते तूम्ही कसं रिॲक्ट करणार पिहु कंठ दाबत बोलते.

माझं टेंशन, विराट कपाळावर आठ्या पाडून विचारतो.

हो, तुमचं ....मी दोन तीन वेळा बाळाचा विषय काढला की तूम्ही इग्नोर करता.... म्हणून मला वाटले तुम्हाला इतक्या लवकर नकोय पिहु रडतच बोलू लागली....

पण अस थोडी की मला कधीच नकोय....... आता इतक्या लवकर नको होत. पण फक्त तुझा विचार केला .. मला वाटले मॉम तुझी आई तुला बोलत असतील , आणि मॉम च मला माहीत आहे तिला सगळ्या गोष्टी ची घाई असते.... तू स्वतः तयार असेल तर मला काहीच प्रॉब्लेम नाहिये....

पिहुला काय बोलावं काहीच कळत नव्हते.... ती त्याच्या छातीवर डोकं ठेवून शांत बसली....

पिहु.... तू इतका काय विचार करते.... तो तिचे केस कानामागे घेत बोलतो.

इकडे बघ तो तिचा चेहरा वर करतो.... तुझ्या मनाच दडपण गेलं ना.... पिहु मानेनेच हो म्हणत परत त्याला बिलगते..

अरे सोना , आज किती खुशीचा दिवस आणि तू असा चेहरा पाडून बसणार आहेस का.

तूम्ही मला कधीच समजून घेत नाही..... ती त्याच्या शर्ट मध्ये तोंड झाकून रडत बोलते. त्यालाही गिल्टी वाटत होते... दोन तीन दिवस ती आतून कीती टेन्शन मध्ये असेल हे आज त्याला जाणवलं.

Sorry , सोना..... मी पण कामाच्या टेंशन मध्ये होता तो मिठी घट्ट करत बोलतो.

जेव्हा मला तुमची गरज असते तेव्हा तुम्ही कधीच नसता आणि काय बोलायला गेलं तर मलाच ओरडुन बोलता.... काल सांगत होते ना पण नाही तुमचं वेगळच चालु असते. दरवेळी वेळ गेल्यावर sorry बोलता. माहीत आहे तुमचा एक एक मिनिट महत्वाचा आहे पण आता मी ही तुमच्या लाईफ मधे आहे ना.. सगळ्यांसाठी कस न सांगता तुम्ही किती विचार करता तस माझा पण विचार कारा ना. आपल्यात आज तुमच्या बद्दल मला गैरसमज झाला त्याच कारण आपण कमी बोलतो . काही काही विषय वेळोवेळी बोलले की असे प्रॉब्लेम येत नाही... माझा आहे प्रॉब्लेम मला नाही लवकर खुलून बोलता येत . शब्दांची जुळवाजुळव करायला वेळ लागतो. तुमच्या सारखी मी परफेक्ट नाहिये. जमत नाही मला बोलायला वेळ लागतो. त्यापेक्षा न बोलले बर वाटते मला ओरडुन सुध्दा बोलता येत नाही. आपल्यात काहीच तालमेल नाहिये... तरी पण मी तुम्हाला समजून घेते . मग तुम्ही पण कधीतरी समजून घ्यायला हवं ना....

पिहु,.... मी घेतो समजून पण कधकधी वेळ चुकीची असते. आणि तू बघतेस ना नमन वीरा सर्वात मोठी जबाबदारी आहे.... नमन कसा तरी सेटल होईल... पण वीरा तिचं फ्युचर मला सिकॉयार करावे लगेल ना.... तुझी ही जबाबदारी आहे माझ्यावर सगळ्याचं विचार करावे लागते. मी थांबलो तर सगळच थांबेल ..... कामातून थोड रिलॅक्स झालो की मी तुझ्या सोबतच असतो ना . मला खुप वाटते तुझ्या बरोबर टाईम स्पेंड करायला पण मी मजबूर आहे. बोलताना त्याचा आवाज जड झाला होता.

पिहु, शांत होत त्याच्या कुशीत शिरते.... तो तिच्या केसांवर ओठ टेकवतो. तिलाही माहीत होते त्याला कामाचा किती भार आहे. तो जरी कोणाला सांगत नसला तरी त्याच मन पिहुला कळत होते.....

दोघेही शांत होतात... आता लाईफ मधे सर्वात मोठी गोष्ट आहे. तो क्षण त्यांना अनुभवायचा होता.

विराट पिहूच्या पोटाला हात लावत तिच्या कडे झुकून गालावर कीस करतो..... पिहु तू मला खुप अनमोल गिफ्ट दिल आहे thank you,😘😘😘 मी आज खुप खुष आहे... तू mom मी dad होणार...... पिहु लाजून त्याच्या गळ्यात हात घालते.

पिहु, आता रिलॅक्स राहायचं ..... तू फक्त तुझी आणि आपल्या बेबीची काळजी घ्यायची... तू 😊 हॅप्पी राहशील तर आपल बाळ ही आतुन हसेल ना..... पिहु हसून मान हलवत त्याच्या ओठावर हलके ओठ ठेवते.
विराट हसून तिला कवटाळतो....विराट हसत पायाने झोका देत होता.

अहो, झोका हलवू नका .... मला गरगरल्यासारखं होत. पिहु डोकं धरत बोलते...

पिहु ss, तू दुपारपासून मला काहीचं खाताना दिसली नाही विराट पटकन पायाने झोका थांबवत आठया पाडून बोलतो....

तुम्ही ना कधीच सुधारणार नाही... पिहु चिडून त्याच्या मांडीवरून उतरून गाल फुगवून सोफ्यावर बसते.

😬😬 विराट जीभ चावत तिच्या जवळ येऊन बसतो... विराट तुझं काही खर नाही कसं हॅण्डल करणार आहेस तो मानतच विचार करुन गालात हसतो.पिहु तिरकी नजर करत बघते....

पिहु चल ऊठ जेवण कर सगळ थंड झाल.... आता तू जास्त खायला हवं ..... तो तिचा हात पकडत उठवत बोलतो....

कसे आहात ओ तूम्ही .... तुम्हाला काहीच कळत नाही 😣😒

🙄 आता काय झालं....

मला जेवण जात नाहीये.....

जेवण जात नाही मग ,

ईई ई... तुम्ही ना.... विचारात सुध्दा नाही तुला काय खायचं 😡😡 पिहु त्याचा हात झटकत आत निघुन येते...

पिहु , डोकं थोड शांत ठेव.... त्रास तुला होणार आहे ..... विराट तिच्या मागे येत तिला मिठीत घेत बोलतो.... तिचा श्वास फुलला होता. दुपारपासून पोटात काहीच नव्हत त्यामुळे डोकं ही जड झालं होते... बस ये इकडे तो तिला बेडवर मागे टेकून बसवतो.... शांत सांग .. काय हव तो तिच्या डोक्यावरून हात फिरवत प्रेमाने बोलतो.

माहीत नाही ... काहीचं खायची इच्छा होत नाही आणि भूक पण लागली ती डोळ्यातलं पाणी आवरत बोलते....
त्याला ही सुचत नव्हते. एक तर पहिल्यांदा तो हे सगळ अनुभवत होता. मॉम पण नव्हती.

अहो,.... तुम्ही जेवा अकरा वाजून गेलेत .

तुला सोडून मला जेवण जाणार आहे का तो तिच्या गालावर हात ठेवत बोलतो.

पिहुच्या डोळ्यातुन पाण्याचा थेंब गालावर ओघळत येतो. विराट अंगठ्याने पुसत डोळ्यावर ओठ टेकवतो

आईस्क्रीम खा थोड बर वाटेल ... ह्मम.

विराट फोन करुन तिच्या साठी आईस्क्रीम मागवतो...
चार पाच फ्लेवर चे आईस्क्रीम तो तिच्या समोर ठेवतो.
ती सगळे बघुन विचारात पडते.....
पिहु काय विचार करते ,

खाल्ल की मळमळ होते पिहु बारीक चेहरा करत बोलते.

अग अस विचार केल्यावर कस सोना..... तो स्पून समोर धरत बोलतो... पिहु तोंड उघडते..... एक बाई ट खाल्यावर तिच्या पोटात गार पडते. दोन तीन वेळा उलटी झाल्याने तोंड कडू पडले होते.

अहो, बस .... तुम्ही जेवा ना तिला वाईट वाटू लागले आपण भांडण केले नसते तर विराट जेवला असता.. आणि आता वेळ पण निघुन गेली होती.

पिहु, माझी काळजी नको करु ... बेबीची कर विराट तिच्या पोटावर नजर टाकत हसत बोलतो. पिहू खुदकन हसते....

चल झोप आता खुप रडली आज... बेबी तुझ्यावर गेलं तर काही खर नाही माझं विराट हसत तिला जवळ घेत बोलतो.

पिहु लटक्या रागात त्याला पंच करत त्याच्या कुशीत शिरते...

मॉम ला सांगु मग dr. कडे जाऊ...

आईना खुप आनंद होईल.... ना

ह्ममं, तिचं स्वप्न खर होतय मग खुश असणारच .

पिहु बोलणारं कि विराट तिच्या ओठांवर बोट ठेवतो.... बस उदया बोलू झोप .... तो तिच्या डोळ्यावरून हात फिरवतो. पिहु पण थक्यामुळे थोड्यावेळात झोपी जाते... विराट हळूच तिच्या डोक्याखालून हात काढतो . मोबाईल घेत त्याचे आणि डॅड चे फोटो पाहून खूश होतो.... आज सगळी स्वप्न पूर्ण झाल्यासारखे वाटत होते. तो स्वतः डॅड बनणार होता. त्याने पिहुवर नजर टाकली आणि हसला. कधी त्या ला वाटले ही नव्हते आपला ही संसार उभा राहील. त्याची ही फॅमिली कंप्लीट होईल. लग्न झाल्यावर पिहु बरोबर त्याच्या मनात सुध्दा आल नाही की तो हिच्या प्रेमात पडेल. त्याच्या आणि तिच्यात जमीन असमान चा फरक होता. आज त्याला जग जिंकल्या सारखं फिल होत होते. तिला हळूच जवळ घेउन तो ही झोपी गेला.
.
.
.
सकाळी विराटला जाग आली तर पिहु नव्हती. तो पटकन उठून तिला शोधायला गेला. त्याचा जीव कासावीस झाला होता कालपासून ती नीट जेवली नव्हती .... पिहु.... पिहु तो पूर्ण घरात हाक मारत होता.....

विराट, काय झालं सुमन जवळ येत बोलतात.

मॉम, पिहु कुठे गेली . तो थोडा गोंधळून बोलत होता

अरे, पिहु आणि आजी मंदिरात गेल्या येतील थोड्या वेळात काय हवं होत का?

मंदिरात , ..... तो वॉच कडे बघत बोलला.

विराट मंदिरात सकाळीच जातात. सुमन हसत बोलतात.

तिला कश्याला पाठवलं . मला न सांगताच निघुन गेली.

ती पहिल्यांदा गेल्यासारखं विचारतोय.

मॉम तस नाही .... त्याला कसं सांगाव कळतच नव्हते. सुमन प्रश्न अर्थी नजरेने बघू लागल्या.

मॉम, पिहु तुला काही बोलली का?

नाही .... काल आम्हला उशीर झाला यायला आणि सकाळी आजी ची घाई मंदिरात चल म्हणून तिच आणि माझं बोलणंच झाल नाही का रे काय झालं असं का बोलतोय.

मॉम, त्याला कस सांगायचं कळतच नव्हते. पहिल्यांदा तो विचारात पडला होता.

बोल ना काय झालं का मला टेंशन नको देऊ. सुमन काळजी करत बोलू लागतात.

मॉम, टेन्शन काय लगेच तो अठ्या पाडतच बोलतो...

आजी आणि पिहु दरात दिसतात. पिहुला बघुन त्याच्या जीवातजीव आल्यासारखं झालं....

पिहु पटकन तोंड धरतच रूम मध्ये निघुन जाते.... सुमन विराट तिच्याकडेच बघत होते...

आई, पिहुला काय झालं. सुमन विचारतात

आम्ही येताना चहा घेतला तेव्हा पासून मळमळ होऊ लागलीआजी सोफ्यावर बसत बोलली.....

आजी, काय गरज होती चहा वैगेर प्यायची. विराट चिडून बोलतो.

अरे ती स्वतः हून बोलली मला चहा प्यायचा . आजी हसत बोल्याया.

विराट आजीच न ऐकताच पीहूच्या मागे गेला.

आई, तुम्ही पण चहा कमी करा . पिहु ला ही तुमच्या मुळे परत सवय लागेल. तिला त्रास होतो चहा पिल्यावर सुमन थोड दाटवतच बोलतात.

सुमन.... तिला बघ जा. मला नंतर बोल..... मला तर पिहुचा चेहरा वेगळाच काही तरी. सांगतोय. आजी हसत बोलतात सुमन चमकून बघतात.... आजी डोळ्यानेच हा म्हणतात. सुमनच्या चेहऱ्यावर हसू पसरते.....

आई, तुमच्या तोंडात साखर पडो.

आता कसली साखर तुझा मुलगा नजर ठेवायला आला की आजी तोंड वाकड करत बोलतात.

काय ओ ,आई मी आले सुमन हसत बोलून जातात.

पिहु वाशरूम मधून बाहेर आली उलटी झाल्याने अंग थर थर कापत होते.

(तो ओरडणार की त्याच्या लक्षात येताच त्याचा चेहरा नॉर्मल होतो) पिहु , काय गरज होती चहा घ्यायची तो तिला मिठीत घेत हळु आवाजात बोलतात.

मला इच्छा झाली होती . ती स्वत: चा श्वास नॉर्मल करत बोलू लागली. विराट तिला चेअर वर बसवून पाणी देतो.

सुमन रूममध्ये येतात. पिहु,... बर वाटतं ना सुमन तिच्या जवळ येत बोलतात.

पिहु गालात हसत मानेनेच हो बोलते.

मॉम,तिला परत परत कुठेही पाठवू नकोस मला न विचारता.... ,(तो बोलत की सुमन त्याच्या दंडला पकडत बाजुला सरकवतपीहुच्या बाजुला येऊन बसते), पिहुविराट कडे बघत सुमन कडे बघते.

पिहु, तुझा महिना उलटुन गेला आहे का? बोलताना सुमन च्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.

पिहु कावरीबावरी होऊन विराट कडे बघते.... विराट गालात हसत डोळ्याने सांग बोलतो.

पिहु लाजून मानेनेच होकार देते. सुमन चकित होत तोंडावर हात ठेवत विराट कडे बघतात....

वि.... विराट तू..... तु हेच सांगत होता ना. सुमन उठत विराट जवळ येत भावूक होत विचारतात.

मॉम, तिने घरात चेक केले पॉझिटिव्ह आले. विराट सुमनच्या डोळ्यातलं पाणी पुसत बोलतो. सूमन हसत पिहुला मिठी मारतात.. . डोळ्यातुन आनंदाश्रू वाह त
होते

पिहु खुप खुश आहे माझं स्वप्न पूर्ण होत आहे..सुमन तिच्या चेहऱ्यावर पप्पी घेऊ लागतात...... विराट जवळ जाऊन दोघींना जवळ घेतो.
मॉम, बस किती लाड करते. मी सुध्दा आहे इथे तशी.पिहु खुदकन हसली.
सुमन हसत विराटच्या चेहऱ्यावरून हात फिरवत पप्पी घेतात.

❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️,❤️❤️

कसा वाटला भाग नक्की कळवा . मागच्या comments ला खुप सारा thank you ☺️☺️❤️