Premacha chaha naslela cup aani ti - 51 in Marathi Travel stories by Khushi Dhoke..️️️ books and stories PDF | प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - ५१.

Featured Books
  • You Are My Choice - 41

    श्रेया अपने दोनो हाथों से आकाश का हाथ कसके पकड़कर सो रही थी।...

  • Podcast mein Comedy

    1.       Carryminati podcastकैरी     तो कैसे है आप लोग चलो श...

  • जिंदगी के रंग हजार - 16

    कोई न कोई ऐसा ही कारनामा करता रहता था।और अटक लड़ाई मोल लेना उ...

  • I Hate Love - 7

     जानवी की भी अब उठ कर वहां से जाने की हिम्मत नहीं हो रही थी,...

  • मोमल : डायरी की गहराई - 48

    पिछले भाग में हम ने देखा कि लूना के कातिल पिता का किसी ने बह...

Categories
Share

प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - ५१.



दिवसामागून - दिवस जात होते...... ते म्हणतात ना, मुली ह्या मुलांपेक्षा लवकर मोठ्या होतात तसंच काहीसं.... आपली सुकन्या मोठी होत होती.... आणि तितकीच समजूतदार ही..... प्रत्येक लहानात - लहान गोष्टीत आनंद शोधून खुश राहायची, जास्त कोणात लवकर गुंतायची नाही (मला वाटतं, हा गुण आता खूप महत्त्वाचा आहे...) तिचा पक्षी आणि मुक प्राणी यांमध्ये खूप जीव होता.... पक्ष्यांचं उडण बघून, स्वतः ही असंच उडावं, कुठेतरी दूर जाऊन मोकळ्या हवेत फिरून यावं असं तिला नेहमीच वाटायचं..... मूकं प्राणी किती प्रामाणिक असतात त्यांना जीव लावला त्याचं उपकार ते कधीही विसरत नाहीत असे निर्मळ भाव तिच्या मनात प्राण्यांविषयी होते....

शारीरिक बदल टप्प्याटप्प्याने घडून येतात..... हे वेगळं सांगायला नको...... आपलं शरीर हे एक मशीन असतं ज्याच्या वेगवेगळ्या फेज असतात.....

असेच दिवस, त्यामागे महिने, महिन्यामागे वर्ष उलटले.....

सुकन्या आता साधारण चौदा वर्षांची झाली होती..... शिक्षणात त्याचबरोबर इतर ही क्षेत्रात ती तितकीच हुशार....! नेहमी पुढे..... यावरूनच आपल्याला समजेल की, तिच्या ज्ञानात अधिकच भर पडली होती.... सध्या तिच्या शाळेत इयत्ता आठवीच्या परीक्षा सुरू होत्या...... वेळ असायची सकाळी ०८:०० ते ११:०० ....

दिवस होता सोमवार आणि विषय होता सुकन्याचा आवडता - भूगोल..... म्हणून, ती जरा जास्तच उत्साहात होती.....

तिला नेहमी पासूनच पृथ्वीचं कुतूहल होतं..... म्हणजे, इतके सगळे जीव एका भूगर्भात ह्याचं तिला कमालीचं नवल वाटायचं..... आणि तिचे तिच्या क्लासटीचरला इतके प्रश्न असायचे की, कधी - कधी सगळे स्टुडंट्स जाऊन सुद्धा आपली सुकन्या त्यांना थांबवून ठेवायची.....

ती तिचा पेपर सोडवत असता, तिला अचानक पोटात दुखायला लागलं..... वेदना खूप असह्य झाल्या होत्या..... तिला काळजी मात्र अजुन ही त्या पेपरचीच.... कारण, अभ्यासू मुलांना पेपरची जाम काळजी असते.... तापाने फणफणत असले तरी, पेपर द्यायचा असतो त्यांना..... त्यांचंही कुठं चुकतं? इतकी मेहनत केली ती वाया तर नाही ना जाऊ देणार!

सुकन्याला काहीच समजत नव्हतं...... आपल्यासोबत हे असं एकदम अचानक काय होतंय..... तिची चिडचिड व्हायला सुरूवात झाली, तिचं डोकं ब्लँक झालं आणि आता तिला मळमळ सुरू झाली..... तिला वाटलं की, तिने पेपरचं जाम टेन्शन घेतलं असावं..... पण, तिला कधी ना इतकं विचित्र वाटलं.... मग आजच का? हा प्रश्न तिला पडला होता ज्याने, तक अजूनच गोंधळून गेली होती.... तिचं डोकं आता रिस्पॉन्स देणं बंद झालेलं..... तिची तशी अवस्था बघून, चित्रा मॅडम तिच्या जवळ आल्या.....

सुकन्याचे बाबा आणि आजोबांनी शाळेला खूप मदत केली असल्याने, सुकन्याला शाळेत सगळेच ओळखत होते...... मॅडम चित्रा यांनी जवळ येऊन, तिची काळजीने विचारणा केली.....

चित्रा : "काय झालं बेटा सुकन्या..... तू ठीक नाहीस का बाळा..... काही होतंय का तुला??"

सुकन्या : "मॅम..... मला पोटात दुखतंय आणि वेगळीच फिलिंग आहे एकदम वेगळी.... या आधी असं कधीच वाटलं नाही..... मॅम प्लीज हेल्प मी...."

चित्रा : "शांत हो बेटा..... घाबरु नको.... मी आहे ना..."

सुकन्या त्यांचं पदर घट्ट पकडून ठेवते..... त्या तिच्या पाठीवरून मायेने हात फिरवतात.... तिला बॅग पॅक करायला सांगून, परीक्षा कक्षा बाहेर घेऊन येतात..... प्रिन्सिपॉल कडून रीतसर परवानगी घेऊन, सुकन्याच्या घरी कॉल करतात.... तोपर्यंत तिला त्या वॉश रूम जाऊन ये असं सांगत, स्वतः तिथेच तिची वाट बघत थांबतात.... त्यांच्या जागी दुसरा परीक्षक बदलायला त्या सांगून आलेल्या असतात..... सो, त्यांना परत जायची काहीच गरज नसते.....

साधरण दहा मिनिटांनी.......

सुकन्याच्या किंचाळण्याचा आवाज येतो..... चित्रा मॅडमला याची पूर्ण खात्री असल्याने, त्या तिथेच वॉश रूम बाहेर थांबून असतात.... तिची किंचाळण्याची आवाज ऐकून, धावतच आत शिरतात....... आत सुकन्या वॉशिंग बेसिन जवळ, एक हात स्वतःच्या स्कर्टला पकडून, ऊभी राहून कंटिण्यू रडत असते आणि तिची ही गोंधळलेली मनस्थिती पाहून, चित्रा मॅडम जे समजायचं समजून जातात.... त्या सुकन्याला मायेने जवळ घेतात.....

चित्रा : "डोन्ट वरी बेटा..... इट्स नॉर्मल.... काहीही झालेलं नाहीये..... ओके.... चल....."

त्या तिला बाहेर घेऊन येतात.... शाळेत कॉमन रूममध्ये एक सॅनिटरी पॅडचं मशिन असतं..... जे की, सुकन्याच्या पप्पांच्या एन. जी. ओ. कडून बसवण्यात आलं असतं..... तिथे कॉइन्स टाकून, त्या एक पॅकेट बाहेर काढतात आणि परत तिला घेऊन वॉश रूम जातात.... आत त्या तिला सगळी माहिती देऊन बाहेर येतात...... थोड्या वेळात ती बाहेर येऊन, चित्रा मॅडमचा हात घट्ट पकडते कारण, त्यांच्या सोबत तिला आता खुप सेफ फिल होतं..... त्या तिला कवटाळत......

चित्रा : "आता कशी आहेस बाळा....."

सुकन्या मानेनेच होकार देत, क्यूट स्माईल करते....

चित्रा तीला घेऊन त्यांच्या केबिनमध्ये जाते.......

चित्रा : "चॉकलेट खाणार...."

ती नकारार्थी मान हलवत, तिथल्या खुर्चीत बसते...... त्या येऊन तिच्या शेजारी बसतात....

चित्रा : "घाबरायचं काहीच कारण नाही ना बाळा...... हे नॉर्मल आहे रे बेटा..... आता तुला प्रत्येक महिन्याला अठ्ठावीस ते तीस दिवसांच्या अंतराने असं होत जाईल म्हणून, मनाची तयारी ठेव..... तशी तू स्ट्राँग आहेच...."

सुकन्या : "मॅम याचा माझ्या खेळण्यावर तर एफेक्ट होणार नाही ना....."

चित्रा : "नाही बाळा, तुला स्पोर्ट्स मध्ये पार्टिसिपेट करता येईल..... काही प्रॉब्लेम नाही.... आणि तसंही स्पोर्ट्स लास्ट विकमध्ये ऑर्गनाईझ केलेत सो डोन्ट वरी...."

सुकन्या आता थोडी रिलॅक्स फिल करत असल्यामुळे.....

सुकन्या : "मॅम माझा पेपर सॉल्व्ह करून येऊ मी....."

चित्रा : "सुकन्या बेटा..... आपण परमिशन घेतलीय प्रिन्सिपॉल कडून..... सो, डोन्ट वरी..... तुझ्या घरी फोन केलाय मी बघ येईलच थोड्या वेळात कोणी तरी....."

सुकन्या : "मग मी फेल झाले म्हणजे....."

पोरीला पेपरचीच काळजी....

चित्रा : "नाही बाळा...... तशा ह्या फायनल एक्झाम्स नाहीत..... सो, तू काळजी करू नकोस...... कोणी नाही रागावणार तुला..... मी तशी परमिशन घेतली आहे....."

त्या दोघी बोलत असता, मॅडम चित्रा यांना एक कॉल येतो......

चित्रा : "हो बोला...... हो बोलत आहे...... हो.... ती माझ्याच सोबत आहे..... बाहेर का.... हो...... आपण कोण??"

तिकडून : "...... ....... ........"

चित्रा : "हो, हो..... आलेच तिला घेऊन...."

त्या सुकन्याला, बाहेर सल्लू तिला घ्यायला आला असल्याचं सांगतात आणि तिला बाहेर घेऊन येतात.... सल्लू कार ला टेकून उभा असतो..... त्या तिला त्याच्या जवळ घेऊन जातात.... तिला बघताच तो तिला मिठीत घेत, तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवतो..... ती त्याच्या कुशीत शिरते.....

सल्लू : "इज एव्हरी थिंग ऑल राईट चित्रा मॅडम??"

चित्रा : "हो.... हो..... तुम्ही तिला घरी घेऊन जा आणि थोडं जपा.... विकनेस वाटत असेल तर, घरीच असूदेत काही दिवस...."

सल्लू : "ओह्ह्ह्ह...... हो, हो.... आम्ही काळजी घेऊ तिची...."

सुकन्या, चित्रा मॅडमला बाय करत गाडीत बसते..... त्या सल्लुला तिच्या मासिक पाळी विषयी कल्पना देतात...... पण, जेव्हा त्या तिला जपा असं खूणावून म्हणत असतात..... तेव्हाच सल्लू समजून गेलेला असतो..... तरी ही त्याला कल्पना देणं गरजेचं म्हणून त्या सांगतात आणि आत स्वतःच्या केबिनमध्ये निघून जातात.... सल्लू, सुकन्याला घेऊन घरी येतो..... ती धावतच जाऊन, आपल्या निन्नीला मिठी मारते.....

आजी : "सल्लू बेटा क्या हुआ था अपनी परी को....."

सल्लू : "आम्मिजी अरे कुछ नहीं रे..... बस उसके पिरेड्स आये हैं..... अपना बच्चा बिलकुल ठीक हैं..... हैं ना सलमा......"

सल्लूच्या तोंडून तो शब्द ऐकून, सुकन्या बिथरते...... नाही म्हटलं तरी ही फिलिंग तिला नवीनच सो, सल्लुकडून असं बोलणं ती एक्सपेक्ट करत नाही..... आजीच्या नजरेतून हे सुटत नाही आणि त्या सगळ्यांना हॉलमध्येच थांबायला सांगतात......

आजी : "परी बेटा कसं फिल होतंय आता.... माझं बाळ ते ग....."

सुकन्या : "निन्नी अग खूप अन् कंफर्टेबल वाटतंय...."

आजी : "बेटा आता हे तुला दर महिन्याला होईल.... सो डोन्ट वरी.... इट्स सिंपल ए प्रोसेस ऑफ आवर बॉडी...."

सुकन्या : "हा नीन्नी..... चित्रा मिसने सांगितलं..... बट, आय फिल सो अन् कंफर्टेबल यार नीन्नी..... जेव्हा सल्लू दादू तसं बोलला तेव्हा तर अजूनच....."

आजी : "बेटा... डोन्ट फील अन् इझी...... सल्लू दादू कोण आहे तुझा? सांग पाहू.....?"

सुकन्या : "मोठा भाऊ.... पण का?"

आजी : "मोठा भाऊ होण्याआधी??"

सुकन्या : "ओह्ह्ह्...... जे तू मला आधी शिकवलं ते ना......"

आजी : "हो ग राणी.... आता सांग पाहू...."

सुकन्या : "आपण सगळे ह्युमन बिंग आहोत आणि एकमेकांचा त्रास सहन करण्याची, त्यांना समजून घेण्याची क्षमता आपल्यात असली पाहिजे..... राईट नीन्नी....."

आजी : "एक्झॅक्टली...... आणि म्हणूनच, सल्लू दादू किंवा दुसरे कोणी.... यूअर् आजोबा, यूअर् पापा..... कोणासोबत ही तू आपल्या घरी ही प्रॉब्लेम शेअर करू शकतेस..... रादर प्रॉब्लेम न म्हणता इट्स नॅचरल सो, जास्त पॅनिक व्हायचं नाही... ओके..."

सुकन्या : "पण, जर बाहेर हा प्रॉब्लेम आला तर..... आज चित्रा मिस होत्या..... सो, तितकं नाही तरी फर्स्ट टाईम असल्यामुळे खूप भीती वाटली होती....."

आजी : "बाहेर आली तरी नो प्रॉब्लेम बेटा..... सोबत नेहमी सॅनिटरी पॅडचं एक पॅकेट ठेवायचंच आणि फक्त ते स्वतःच्या यूज साठी नाही तर, कधी कोणाला मदत म्हणून सुद्धा..... ओके...... हे बघ परी आता इथून पुढे अशा खूप गोष्टी असणार ज्या तुझ्यासाठी नवीन असतील..... म्हणून, तू बिनधास्त त्या घरी शेअर करायच्या...... आपण त्यावर डिस्कस करू आणि मग ठरवू काय बरोबर ते..... ओके बेटा....."

सुकन्या : "ओके नीन्नी....."

आजी : "गूड..... मेरा बच्चा....."

सुकन्या : "नीन्नी अग तुला एक गोष्ट सांगू...... खरं तर हे सिक्रेट आहे.... बट, वुई आर फ्रेण्ड्स नाऊ सो, सांगते....."

आजी : "सांग..... सांग....."

सुकन्या : "नीन्नी...... ती जयश्री आहे ना..... ती एका मुलासोबत मला दिसली होती एक दिवस..... नंतर क्लास रुममध्ये विचारलं तेव्हा, सांगत होती तिचा तो बॉय फ्रेंड आहे..... नीन्नी, अग इतक्या लहान वयात तिचा बॉय फ्रेंड....! म्हणून, सगळे क्लास रूममध्ये तिच्याच विषयी नको ते बोलत असतात पण, तिला याचा काहीही फरक पडत नाही....."

आजी : "परी, बाळा मला सांग तुझ्या मनात असं काही फिल होतं का..... कोणा विषयी...."

सुकन्या : "छे! मी तसला विचारच करत नाही..... उलट मला मुलांचा किळस आहे....."

आजी : "परी, बाळा मी काय सांगते नीट ऐक..... मनात अशा फिलिंग्ज चुकीच्या नाहीत, मात्र त्या फिलिंग मध्ये वाहून जाणं आणि नको ते उद्योग करण्याचं हे वय नाहीये.... आता हेच बघ ना तुझा सल्लू दादू आणि उर्वी वहिनी एकमेकांवर किती प्रेम आहे त्यांचं.... पण, तुला माहिती नसेल ते लग्न व्हायच्या आधी पासून एकत्र आमच्या सोबत राहायचे.... पण, कधीच त्यांनी त्यांच्या लिमिट्स क्रॉस केल्या नाहीत कारण, त्यांचे गोल्स त्यांना अचिव करायचे होते.... आज उर्वी एका प्रतिष्ठित कंपनीत स्टेक होल्डर आहे.... सोबतच दुसऱ्या एका कंपनीत बोर्ड ऑफ डायरेक्टर...... अँड आपला सल्लू तुला तर माहीतच आहे ना..... तो एक पब्लिक स्पीकर आहे ते..... सो, मला काय म्हणायचं बेटा......"

आजीला मधातच थांबवत....

सुकन्या : "बट, नीन्नी..... सल्लू दादू अँड ऊर्वी वहिनी लग्ना आधी या घरात असं कसं.... ती तिच्या घरी रहात असेल ना....."

आजी एकदा जयाकडे आणि एकदा सल्लुकडे बघून, डोळ्यांनीच सांगू का असं विचारते.....

सल्लू : "आम्मीजी..... बता दे रे, अब सलमा बडी हो चुकी हैं.... वैसे भी उसे जानने का पुरा हक हैं..... इस फॅमिली ने कितने दर्द सहे हैं..... शी इज मॅच्युअर् इनफ रे......"

जया : "हो ना..... आणि लाईफ मध्ये काही डिसिजन घ्यायला तिला मदत होईल.... म्हणजे, जर आपण तिला सचिन अँड सल्लू विषयी सांगितलं....... त्यांच्या अन् कंडिशनल लव्हशिप बद्दल सांगितलं तर, होऊ शकतं तिला तिच्या लाईफ मध्ये सुद्धा इझी जाईल...... तिच्यासाठी योग्य कोण हे निवडायला......."

आजी दोघांच्या मताने पुढे सुकन्याला एखादी मूव्ही सांगितल्याप्रमाणे सर्व सांगून टाकते..... सुकन्या सर्व काही डोळे विस्फारून ऐकत असते..... जेव्हा जॉलीचा इन्सीडंन्स आजी सांगत असते तेव्हा, सगळयांच्या डोळ्यात पाणी असतं.... इतकंच नाही तर आपल्या सुकन्याच्या सुद्धा...... आजींना सर्व समजून सांगायला थोडा उशीरच लागतो.... कारण, परत सर्व डोळ्यासमोर येऊन वेदना तर होणारच आणि तसंही खरंच फॅमिलीने बरंच काही सहन केलंय.....

तीन तास कसे निघून जातात कळत नाही...... सगळे डोळे पुसतात.... सुकन्या जाऊन सल्लूला मिठी मारते.....

सल्लू : "सलमा, बच्चा क्या हुआ.....?"

सुकन्या : "सन्नु दादू......"

सल्लू : "आम्मीजी देख ना रे..... मेरी सलमा रो रही हैं....."

आजी : "आता तुम्हीच बघा तुमच्या सलमाला, पब्लिक फिगर आहात...... त्यापेक्षा एक मोटिव्हेशनल स्पीकर.... सांभाळा....."

सल्लू : "सलमा इधर देख..... क्या हुआ???? रो क्यूँ रही हैं बुध्दू......"

तो तिच्या कपाळावर किस करत, तिला शांत करतो....

सुकन्या : "तू किती प्रेम करत होता यार दादू.... नेहमी करतोस..... म्हणून, थोडे इमोशनल झाले.... आणि आपल्या जुन्या आठवणी ऐकून, आज तू माझ्या लाईफमधला सगळ्यात इंपॉर्टन्ट पर्सन असल्याची जाणीव झाली... आय प्रॉमिस काहीही झालं आधी तुला येऊन सांगेन......"

सल्लू : "अरे बिलकुल..... अँड टेन्शन...."

तो काही बोलणार की सगळे.....

सगळे : "टेन्शन नक्को रे...."

आजी : "एकदम १० वर्ष मागे गेल्यासारखं वाटलं..."

सल्लू : "मेरा बच्चा कोन सा फ्लेवर खाएगा??"

सुकन्या : "चॉकलेट......"

सल्लू : "ओके........"

सगळे आइस्क्रीम एन्जॉय करतात..... सगळे खूप खुश असतात..... शेवटी सुकन्या सगळं ऐकून, समजण्याईतपत मोठी झाली होतीच..... काही गोष्टी योग्य वेळीच समजलेल्या बऱ्या असतात......

पुढे असेच दिवसामागून - दिवस जात होते...... जो - तो आपापल्या कामात बिझी..... मामा आता मुलांच्या शिक्षणात, परत शेताची जबाबदारी त्यांच्यावरच सो, या सगळ्यांत कधी - तरी येऊन, सगळ्यांना भेटून जायचा..... आणि सचिनची पोस्टिंग नागपूरला असल्याने, कली आणि सचिन दोघंही तिकडे राहायला होते..... सो, इथे ह्यांचीच फॅमिली होती.....
.
.
.
.
.
.
क्रमशः


❤️ खुशी ढोके ❤️