A cup without love tea and that - 34. in Marathi Travel stories by Khushi Dhoke..️️️ books and stories PDF | प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - ३४.

Featured Books
  • You Are My Choice - 41

    श्रेया अपने दोनो हाथों से आकाश का हाथ कसके पकड़कर सो रही थी।...

  • Podcast mein Comedy

    1.       Carryminati podcastकैरी     तो कैसे है आप लोग चलो श...

  • जिंदगी के रंग हजार - 16

    कोई न कोई ऐसा ही कारनामा करता रहता था।और अटक लड़ाई मोल लेना उ...

  • I Hate Love - 7

     जानवी की भी अब उठ कर वहां से जाने की हिम्मत नहीं हो रही थी,...

  • मोमल : डायरी की गहराई - 48

    पिछले भाग में हम ने देखा कि लूना के कातिल पिता का किसी ने बह...

Categories
Share

प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - ३४.

इकडे हॉस्पिटलमध्ये सल्लू आणि आजी - आजोबा आले असतात..... पिल्लू, संजय आणि जया सोबत घरीच थांबणार असते..... कली आणि सल्लू चेअरवर बसले असतात..... तर, आजी - आजोबा येरझाऱ्या मारत असतात....

सल्लू : "कली क्या हुआ... तू आयी तब से नोटीस कर रहा हुं.... कूछ अपने ही खयालो में खोई हुई....?🙄"

कलिका : "यार सल्लू...... मैने एक ही लड़की को गाड़ते हुए देखा था.... फिर.... दो डेड बॉडी......?? हाऊ??"

सल्लू : "क्या...😳😳😳"

कलिका : "शू...... हॉस्पिटल हैं ये..... कितने जोर से चिल्लाएगा....🙉"

सल्लू : "लेकीन कली..... इट्स व्हेरी डेंजरस.....😳"

कलिका : "यही तो नहीं समझ रहा....🧐"

सल्लू : "डोन्ट टेक स्ट्रेस..... अपना यारू सब ठिक करेगा..... ओके....."

कलिका : "रिअली मॅन..... सचिन इज सच ए डॅशिंग ऑफिसर..... यार किती कॉन्फिडन्सने सगळं मॅनेज करतो.... सगळ्यांना गप करतो.....🤩"

सल्लू : "कली.....🙄 आर यू सीरियस..... तू सचिन यारू के बारे में ये सब....."

कलिका : "हां तो जो रिॲलिटी हैं वही बोल रही हु.... लाईन नहीं मार रही.....😁"

सल्लू : "अच्छा वो सब छड..... टेल मी.... कुछ खाया तुने.....🤨"

कलिका : "नहीं यार.....😣"

सल्लू : "यार ये यारू भी ना....😐"

कलिका : "अरे उसने पूछा था.... मैने ही मना कर दिया....😐"

सल्लू : "तू भी ना..... आम्मिजी.... चल ना यार इसने कुछ नहीं खाया बोल रही हैं.... आजोबा कॅन्टीन चलते ना...."

आजोबा : "यहाँ कौन रूकेगा??"

आजी : "मी थांबू का....?"

आजोबा : "नको राणी सरकार.... तुम्ही तिघे जाऊन या मी थांबतो....🙂"

आजी : "ओके....🙂"

सगळे कॅफेटेरिया जातात... आजोबा तिथंच थांबतात.....🙂

तिकडे पोलीस स्टेशनमध्ये...... वरिष्ठ पोलिस अधिकारी निशिकांत मोरे पोलीस स्टेशनच्या मेन केबिनमध्ये सचिनच्या येण्याची वाट बघत बसले असतात..... थोड्याच वेळात तिथे सचिन आपल्या टीमसोबत हजर होतो....😎

निशिकांत : "सो, मिस्टर सचिन घडलेली घटना सविस्तर सांगा....🤨"

सचिन : "सर..... काही महिन्यांपूर्वी शहरात एक अटेम्प्ट टू मर्डर मिस्ट्री घडली होती..... जी मिस. कलिका यांनी त्यांच्या फोनने व्हिडिओ रेकॉर्डिंग केल्याने, प्राथमिक तपासात काही प्रमाणात सिद्ध झाली सुद्धा... पण, घटनास्थळी आम्ही आणखी खोलवर तपास केला असता तिथे एक नसून दोन डेड बॉडी असल्याचं समजलं.... दुसरी डेड बॉडी एका मुलाची होती.... आरोपींना अरेस्ट करण्यात आले आहे.... त्यांच्या कडून आम्ही माहिती काढूच.....😎"

निशिकांत : "गूड...... तुम्ही चांगल्या पध्दतीने केस हाताळताय यात काहीच शंका नाही..... सायंकाळ पर्यंत मला रिपोर्ट करा मिस्टर सचिन...."

सचिन : "हो सर.....😎"

निशिकांत : "गूड लक...👍"

सचिन : "थँक्यु सर"

निशिकांत मोरे दुसऱ्या केस संदर्भात काही काम असल्याने निघून जातात..... इकडे सचिन लॉकअप कडे मोर्चा वळवतो....😎😎 आत यशराज आणि पूर्ण ग्रुप असतो..... त्यांची अजुन अकड गेलेली नसते..... सचिन आत जातो......

सचिन : "तावरे..... चेअर घेऊन या.....🤨"

चेअरवर रुबाबात बसत......

सचिन : "कसंय मित्रांनो..... तुम्ही मला स्वतःहून सगळं सांगा नाहीतर......🤨"

सगळे त्याच्याचकडे बघत असतात.....

सचिन : "यशराज.... काय थर्ड डिग्रीने पोट नाही का भरलं की, यांच्या सोबत परत मेजवानी हवी आहे.....🤨"

सगळे एकमेकांकडे बघतात.....

यशराज : "रिलॅक्स..... हा फक्त बोलतो करत काहीच नाही....😏😏"

सचिन : "असच नाही मला पगार देत महाराष्ट्र शासन.... रोज किती तरी जणांना तोडल्याशिवाय पागराला हातही लावत नसतो मी..... काय मिस्टर यशराज.....🤨 आणि कोण रे तुमच्या पैकी ट्रस्टीचा मुलगा..... अनिकेत साठे..... काय रे जास्त मस्ती का तुमच्या अंगात..... का मारलात त्या मुलीला...... आता इथून पुढचे फक्त सात मिनिटे मिळतील त्यात तुमच्याकडे दोनच पर्याय आहेत.... एक, सगळं खरं सांगणे...... दोन, सगळं खरचं सांगणे..... कारण, खरं सांगितल्याशिवाय तुम्हाला बाहेर पडताच येणार नाही..... आणि तसही आमच्याकडे काही फुटेज आहेतच....😎 सो, डोन्ट बी ओव्हर स्मार्ट ओके.....🤨"

यशराज : "साला त्या कलीला संपवली असती तर बरं झालं असतं.....😤"

त्याचे हे शब्द ऐकून सचिन इतका रागात येतो की, हातातला बांबू जोरदार यशराजच्या तोंडावर भिरकावतो..... तो मार जोरात बसल्याने त्याचा समोरचा एक दात तुटतो.....

सचिन : "मुलींविषयी चुकीचे शब्द इथून पुढे वापरलास ना.... तर, याद राख.... आता फक्त दात तोडला..... पुढे काय - काय तोडेन......😠😠🤬 आता सर्वांकडे फक्त चार मिनिटं उरली आहेत.....😠 आणि हो..... जो सगळं खरं सांगेल त्याचा मार..... जो काहीच न सांगता गप राहील त्याला बसेल...... म्हणून विचार करा....🤨"

यशराज सोडून सगळेच घाबरतात..... जरी कॉलेज ट्रस्टीचा मुलगा अनिकेत असला पण, मेन लीडर यशराज असतो..... म्हणून, सगळे त्याच्याकडे बघून घाबरत असतात....

सचिन : "अरे त्याला कशाला घाबरता..... तो स्वतः इथुन वाचणार नाही..... मला वाटतं, तावरे....."

तावरे : "हो सर.....😁"

तावरे तिकडून "बाजीराव" (पोलीस स्टेशनमध्ये आरोपींना तोडण्यासाठीचे उत्तम साधन) घेऊन येतो......😁

सचिन : "अरे वाह तावरे.... हुशार आहात...."

तावरे : "साहेब कोणाला नसतं हो बघायचं तुम्हाला हे करताना..... या हरामखोरांना हीच भाषा समजेल.... तुम्ही बिनधास्त हाणा साल्यांना.... कुठल्याच मुलीसोबत पुढे असे वागण्याआधी विचार करतील....🤬"

सचिन : ".. हमममम..... घ्या कामाला लागा मग...🤨"

तावरे सगळ्यांची कापडं काढून, त्यांना दोन्ही हात वर बांधून लटकवतात..... सचिन खाकीचा दम दाखवतो.....😎😎 (आय जस्ट लव्ह धिस थ्रिल.... हाणा साल्यांना...🤬😠)

सचिन : "भारत माझा देश आहे.... सारे भारतीय माझे बांधव आहेत..... माझ्या देशावर माझे प्रेम आहे..... नाही का! पण, तुमच्या सारख्या नराधमांनी हे शाळेत कधीचं ऐकलं नसल्याने, असं करायची तुमची हिम्मत होते....."

साधारण पंधरा मिनिटं सचिन त्यांना हाणतो..... पूर्ण राग त्यांच्यावर काढतो.... ऑब्विअस यार..... एका मुलीचा विनाकारणच त्यांनी जीव घेतला आणि त्याची जॉली इंडिरेक्ट्ली का असुदे पण, आज याच नालयकांमुळे इतक्या वाईट अवस्थेत आहे....🥺😟 चांगलचं तुडवलं पाहिजे.....🤬 पण, अशा मानसिकतेला काहीच फरक पडत नसतो.... हे साले असेच राहणार.....🤬

अनिकेत : "आ..... आ..... थांबा मी सांगतो.... सगळं सांगतो.....😭"

यशराज : "बे हरामखोर इथ आम्ही काय चुतिया दिसतो का बे.... मार आम्हीही खात आहो.... आमच्यापैकी कोणी बोलला का... साल्या वाटलं नव्हतं तू फसवणार.....🤬 थू.....🤬"

फाड्.... एकच तोंडावर पडते आणि यशराज थोडा नरमतो......

सचिन : "तू तर काही बोलूच नकोस....😠🤬 सांग तू...."

अनिकेत सांगायला सुरुवात करतो......

अनिकेत : "ऋचा...... ऋचा यादव..... खूप आवडायची मला ती..... पण, त्या हरामखोर राजच्या प्रेमात होती..... काय नव्हतं माझ्याकडे...... माझे पप्पा ट्रस्टी होते कॉलेजचे..... मला.... मला ॲटिट्युड दाखवायची साली.....😠 म्हणून गेम करायचं ठरवलं..... खूप हौस होती तिची कॉलेज टॉपर बनायची..... मग काय राजला आधी फ्रेंड बनवला आणि त्याच्या मदतीने तिला रूमवर बोलावलं.... ती आली.... काय दिसायची ती एकदम..... खरच खूप प्रेम होतं माझं..... पण.... संपवावं लागलं.... आणि संपवायचंच होतं मग असच फायदा न घेता संपविण्यात काय मजा.....😏 तिच्याच बॉय फ्रेंड समोर तिच्यावर जबरदस्ती केली.... त्याचा विरोध करत बाहेर पळाली साली..... आधी तर फक्त तिला संपवू असा प्लॅन होता...... पण, नंतर साला तो राज जास्तच उड्या मारत होता.... म्हणून, मग काय तिला आणि तिच्या त्या सो कॉल्ड बॉय फ्रेंड राजला संपवूनच दम घेतला......😤"

सचिन : "ओह्ह्ह्..... आय सी....🤨 म्हणजे ती सेकंड डेड बॉडी....."

अनिकेत : "हो ती त्याच हरामखोराची...... पोलिसांना कंप्लेंट करेन म्हणत होता साला..... संपवला त्याला ही..... आम्हाला धाक दाखवत होता साला......😠😏"

सचिन : "ऐकलत तावरे.... आजकाल जनरेशन किती वाईट विकृतीची आहे..... काय रे ये....🤬 तुझा बाप ट्रस्टी झाला म्हणून तू कॉलेजवर आपला हक्क सांगणार का.... आणि कोणाचं प्रेम कोणावर असावं हे तुमच्यासारखे.....😏 ज्यांना, प्रेमाची साधी बाराखडीही माहिती नसेल ते सांगणार का.... छे!! लाज वाटते तुमच्यासारख्या नालायकांची....🤬 मिस्टर यशराज..... आता सांगा मिस. कलिका यांची किडनॅपिंग घडवण्यामागे काय कारण होते....🤨"

यशराज : "मिळवायचं होतं तिला.... पण, ती...🤬"

फाड.... तोंडावर एकच पडते.....

सचिन : "मानुसकित बोलायचं....😠🤨"

यशराज : "प्रेम करायचो तिच्यावर..... पण, तिने आमची व्हिडिओ रेकॉर्डिंग केल्याचं एकाने येऊन सांगितलं.... तोच राग मनात होता आणि म्हणून तिला संपवायचं होतं.... पण, वाचली....🤬 परत हाती आली की सोडणार नाही.....🤬"

सचिन : "ती हातात यायला तुम्ही सगळे इथून बाहेर तर निघायला पाहिजे ना..... तावरे ही घ्या रेकॉर्डिंग या सगळ्यांनी आता जे काही कबुल केले..... सगळं मी रेकॉर्ड केलंय..... निशिकांत सरांकडे सगळं सुपूर्द करा आणि उद्या यांच्या न्यायालयीन चौकशीची तयारी करा.... साल्यांना अशी शिक्षा झाली पाहिजे ना..... की बास....😠🤬"

तावरे : "येस सर.....😎"

सचिन येऊन केबिनमध्ये बसतो.... घटनास्थळी गायतोंडे यांना कॉल करतो....

सचिन : "हॅलो...... हा, गायतोंडे त्या जागेची पूर्ण शहानिशा करून, तिथून सिल हटवा आणि तिकडून लगेच रवाना व्हा..... आणि हो येताना लॅब मधून डेड बॉडीजच्या पोस्टमार्टम रिपोर्ट्स सोबत घेऊन या.... एम आय क्लिअर??"

गायतोंडे : "येस सर.....😎"

सचिन : "अरे तावरे कॉफी पाठवा की....."

तावरे : "हे काय सर.... घ्या....."

सचिन : "अरे बसा तुम्ही सुद्धा...🙂"

तावरे : "साहेब एक विचारू....😟"

सचिन : "अरे विचारा ना....🙂"

तावरे : "साहेब.... जॉली मॅडम कशा आहेत.... परिच्या वाढदिवसाला भेटलेलो.... खूप चांगल्या मनाच्या दिसल्या.... देव लवकर बरा करो त्यांना....🙏😟"

सचिन : "... ह्ममम्मममम... अजुन तरी शुध्दीवर आली नाही....😐 बघू काय वाढून ठेवलंय देवाने....😑"

तावरे : "काळजी घ्या साहेब..... येतो मी.....🙂"

सचिन : "हमम्मम...."

तावरे निघून जातात.... इकडे सचिन डोकं टेबलवर टेकवत बसतो..... त्याला त्याची जॉली आठवते..... क्यूट अँड सिंपल विथ डिंपल.....🥺 तो इमोशनल होतो पण, लगेच सावरतो आणि हॉस्पिटलसाठी रवाना होतो...... तिकडे कलिका, सल्लू, आजी - आजोबा सगळे असतात....

आजी : "सचिन.... आलास बाळा.... काही खाल्लस की नाही..... कली बेबी उपाशीच होती.... चल तूही चल.... कॅफेटेरीया.... खाऊन घे आधी.....🤨"

सचिन : "मला सर्वांना काही सांगायचंय...🙄"

आजी : "ते सर्व नंतर..... चल आधी...."

आजी जबरदस्ती त्याला घेऊन जाते आणि भरवते.... सगळं आटोपून ते परत येतात..... सचिन सर्वांना आज घडलेला प्रकार सांगतो..... आणि उलगडतो तो डबल मर्डर मिस्ट्री केस.....

आजी : "फायनली....😤"

आजोबा : "हमम्ममम..... बाळा पुढची प्रोसेस....🧐"

सचिन : "..हो बाबा.... मी रिपोर्ट्स सबमिट करतोच उद्या आणि यांची रवानगी ही होईल कोर्टात..... न्यायालय काय तो निर्णय देईलच... होऊ शकतं या प्रोसेसला थोडा उशिरही लागेल... पण, मी शेवट पर्यंत झटेल.....😎"

आजी : "खरच बाळा तू खूप हिम्मतवाला आहेस.... आपल्या माणसाला काही दुखापत झाल्यावर पॅनिक होणं स्वाभाविक आहे त्यात सर्व सामान्यच काय तर एक अधिकारीही आलाच.... पण, त्याच इमोशन्समध्ये अडकून न राहता तू पुढे केसची दिशा ठरवली.... खूप छान.... असच काम करत रहा....."

सल्लू : "हां ना....."

आज सगळे समाधानी असतात..... ॲटलिस्ट.... जॉलीला या अवस्थेत पाठविणाऱ्या आरोपींना अटक करण्यात आली होती..... काही वेळ सगळे हॉस्पिटलमध्ये थांबतात.... थोड्या वेळाने.....

आजी : "सचिन बेटा तू घरी जाणार की, पोलीस स्टेशन....?"

सचिन : "मला पोलीस स्टेशन जावं लागेल लगेच...... निशिकांत सरांचा मेसेज आहे....😎"

आजी : "ओके बाळा काळजी घे....."

सचिन निघून जातो.....

आजी : "सल्लू तू कलि के साथ चले जा.... मैं रुकती हू.... आजोबा हैं मेरे साथ..... टेक केअर बेबिज....😘"

सल्लू : "ओके आम्मिजी....🙂🙂"

कली आणि सल्लू घरी जातात..... फ्रेश होऊन जेवणं करून, सगळे आपापल्या रूममध्ये निघून जातात.....

रात्री.....@०३:४७

सचिनच्या फोनची रींग वाजते..... फोनच्या पलीकडून जे काही त्याला सांगण्यात येतं..... ते ऐकून त्याच्या आयुष्यात भूकंप येतो......

.
.
.
.
क्रमशः

❤️ खुशी ढोके ❤️