आठवणींचे पक्षी - पुस्तक परीक्षण in Marathi Book Reviews by Suraj Kamble books and stories PDF | आठवणींचे पक्षी - पुस्तक परीक्षण

Featured Books
  • નિતુ - પ્રકરણ 64

    નિતુ : ૬૪(નવીન)નિતુ મનોમન સહજ ખુશ હતી, કારણ કે તેનો એક ડર ઓછ...

  • સંઘર્ષ - પ્રકરણ 20

    સિંહાસન સિરીઝ સિદ્ધાર્થ છાયા Disclaimer: સિંહાસન સિરીઝની તમા...

  • પિતા

    માઁ આપણને જન્મ આપે છે,આપણુ જતન કરે છે,પરિવાર નું ધ્યાન રાખે...

  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

  • હાસ્યના લાભ

    હાસ્યના લાભ- રાકેશ ઠક્કર હાસ્યના લાભ જ લાભ છે. તેનાથી ક્યારે...

Categories
Share

आठवणींचे पक्षी - पुस्तक परीक्षण

आठवणींचे पक्षी - प्र.इ.सोनकांबळे

फार दिवसांपूर्वी म्हणजे जवळपास सहा- सात महिन्यांपूर्वी प्रतिलिपी च्याच एका मैत्रिणीने " आठवणींचे पक्षी " या पुस्तकांविषयी काही माहिती सांगितली होती आणि मला वाचनाची आवड असल्याने, विशेषतः दलित साहित्य व आत्मकथन वाचनाची आवड असल्याने " आठवणींचे पक्षी " या पुस्तकांविषयी मनात एक कुतूहल निर्माण झाले होते. मग ते पुस्तंक शोधण्यासाठी बराचं प्रयत्न केला पण काही केल्या ते पुस्तक हाती लागतंच नव्हते. मी बरेच दा आपल्या प्रतिलिपी मित्र-मैत्रिणींना सुद्धा आपल्या जिल्यात कुठे हे पुस्तकं मिळते का याचा जरा शोध घ्या आणि मिळत असेल तर मला ते पोस्ट करा इथपर्यंत मी मागणी केली होती पण काही केल्या या पुस्तकाचा शोध लागत नव्हता.. ते कसं आहे न एकदा का एखाद्या व्यक्तीविषयी म्हणा किंव्हा मग पुस्तकांविषयी म्हणा ,कुतूहल निर्माण झाले की मग ते वाचण्यासाठी कितीतरी धडपड केली जाते, जोपर्यंत ती व्यक्ती वा ते पुस्तकं मिळत नाही तोपर्यंत..
आज पर्यंत बरीच पुस्तके वाचलीत ज्यात उपरा,कोल्हाट्याचं पोर,अक्करमाशी,आमचा बाप आणि आम्हीं,आई समजून घेतांना,तराळ-अंतराळ,बलुतं ,मृत्यूंजय,छावा,
पावनखिंड,अजून बरीचशी...यांतील काही साहित्यकृती या दलित साहित्याशी निगडित पुस्तके आहे ज्यांनी जे घडलं , जसं घडलं,तसंच आपल्या भाषेत मांडण्याचा प्रयत्न केला.त्यामुळे हे साहित्य लोकांना आवडलं आणि ते अजरामर झालं..तसचं हे आठवणीने पक्षी पुस्तकं..एवढी पुस्तके वाचली पण फक्त वाचत गेलो ज्या गोष्टी मनाच्या कोपऱ्यात,डोक्यात होत्या त्या डोक्यातच राहिल्या,फक्त इतरांना त्या पुस्तकांविषयी काही थोडं बहुत सांगत असायचो,पण आठवणींचे पक्षी वाचतांना त्यातील प्रसंग,शब्द,ती बोलीभाषा आणि काही मुद्दे मी वाचतांना लिहून ठेवले ,आणि आज प्रतिलिपी च्या माध्यमातून आपणांस इथे या पुस्तकांविषयी उलगडा करण्याचा प्रयत्न करतो आहे...
वर शीर्षक मध्ये जरी मी पुस्तक परीक्षण म्हटलं असलं तरी मी एवढा ही काही मोठा नाही की एवढ्या अजरामर झालेल्या साहित्याची समीक्षा किंव्हा परीक्षण करेल.फक्त वाचतांना जो अनुभव,पुस्तकांत असणाऱ्या घडामोडी ,प्रसंग हे अंगावर काटा उभे करणारे आहेत,तसेच काही प्रसंगातून न राहता डोळ्यांतून अश्रूही बाहेर येतात.अश्या पुस्तकाचा शोध घेता घेत एक ' विद्या प्रकाशन ' औरंगाबाद ईथल्या बुक डेपो वरून हे पुस्तक मागविले..सुरुवातीला पैसे भरावे लागतात,परंतु लॉकडाउन असल्याने ते पुस्तंक येणार की नाही याची शाश्वती नव्हती..पैसे जाईल तर जाऊदेत पण ते पुस्तकं यायला हवं म्हणून त्या पुस्तकाची ऑर्डर केली. पुस्तक ऑर्डर करून आठ दिवस वाट पाहिली आणि शेवटी ते पुस्तक हाती पडलं.काल पुस्तंक वाचून पूर्ण झालं.वाचण्यासाठी थोडा जास्तचं वेळ लावला कारण ते प्रतिलिपी च्या वाचक वर्गाना त्या पुस्तकांविषयी सांगायच होतं.म्हणून प्रसंग,काही वाक्ये लिहून ठेवत गेलो..काल पुस्तक जरी वाचून पूर्ण झालं तरी आताही असंच वाटत आहे की अजूनही काही प्रकरणे त्या पुस्तकांत असायला हवी होती,ते पुस्तकं कधीही समाप्त होऊ नये असंच वाटत होतं.पण एखाद्या पुस्तकाचा शेवट असतो,त्यालाही कुठंतरी थांबावचं लागतं आणि शेवटी ते पुस्तकं वाचून पूर्ण झालं..डोळ्यात अश्रू,मनात नवी उमेद,खितपत पडलेल्या मनाला चेतना देण्याचं काम या आठवणींचे पक्षी ने आज केलं. या पुस्तकानविषयी मला ज्या मैत्रीण ने सांगितले तिचे यासाठी विशेष धन्यवाद. कारण या पुस्तकांविषयी मला तरी माहिती नव्हती,आणि तसं काही वाचनात आलेलं नव्हतं..नाही तर दलित साहित्य मी आवर्जून वाचत असतो..दुसरे ज्यांनी माझ्यासाठी हे पुस्तकं मिळावं यासाठी प्रयत्न केला त्यांचं ही धन्यवाद....
ज्याप्रमाणे एखादा पक्षी तहानेने व्याकुळ होतो आणि मग खूप प्रयत्न केल्यावर त्याला पाणी मिळते,तो तृप्त होतो, ज्याप्रमाणे भूक लागली की लहान बाळ म्हणा की आपण म्हणा अन्न ते थोडं का होईना मिळाल्यावर मन तृप्त होते,पोटाची आग शमली जाते, ज्याप्रमाणे चातक पक्षी हा पाण्यासाठी आसुसलेला असतो आणि मग त्याला ढगातून पाणी मिळालं की तो ही तृप्त होतो, ज्याप्रमाणे आपल्या मनासारखं घडलं की व्यक्ती थोड्या प्रमाणात का होईना संतुष्ट होत असतो अगदी तसंच आठवणींचे पक्षी वाचतांना मी वाचलेली पुस्तकें एका बाजूला आणि आठवणींचे पक्षी दुसऱ्या बाजूला,जर हे पुस्तक वाचनात आले नसते तर कदाचीत माझ्या वाचनाचा तृप्तपणा पूर्ण झाला नसता,अजूनही झालेला नाही पण काही प्रमाणात का होईना झाला..आज पुस्तक वाचून या पुस्तकांविषयी लिहू वा ना लिहू,लिहू तर बरचं काही आणि नाही लिहीले तर एवढं अजरामर साहित्य लोकांच्या वाचनात येणारचं नाही मग माझ्या वाचनाचा फायदा काय????म्हणून इथेचं का होईना आपणांस निवडक,वेचक प्रसंग काही लेखकांच्या शब्दांत तर काही माझ्या शब्दांत मांडण्याचा प्रयत्न मी करतो आहे....

ज्या चळवळीने आम्हां साऱ्यांना इथपर्यंत आणले व आमच्या अनुभूतीला अभिव्यक्ती प्राप्त करून दिली,त्या चळवळीचे महान प्रणेते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन ..प्र.ई.सोनकांबळे

इथून या पुस्तकाची सुरुवात होते.. दुःख हे सांगता येतंय.ते आनंदाकडे नेत असते. दुःखातून होणारा आनंद हा आपोआपच दुःख विसरायला लावते. अनेकजण दुःख झालेल्या जवळ आले की दुःख आपोआपचं कमी होते अन् हाच हेतू असतो जवळ येण्याचा -जवळ करण्याचा ..अश्या शब्दांत लेखकांनी आपल्या पुस्तकात मांडणी केलेली दिसते. "आठवणींचे पक्षी " म्हणजे दुःख,दैन्य,दास्य व वेदनांचे आतील बाहेर व्यक्त होणे होय. लोकांना दुःख जास्तचं आवडतं आणि ज्या दुःखाला वेदना त्या ही खऱ्या खुऱ्या , प्रामाणिक असतात ते जास्तचं वाचकांना सुद्धा भावल्या जातं असंच हे आठवणींचे पक्षी हे पुस्तकं लेखक प्र.ई.सोनकांबळे यांनी अगदी पोटाच्या आततिडकीने,सोप्या ,सहज कुठेच रागाचा उद्रेक झालेला दिसत नाही वा कुठे वाचतांना कंटाळा येत नाही.समोर काय झालं,समोर लेखक कसे- कसे घडले याची उत्कंठा मनाला लागलेली असते आणि जेव्हा पुस्तकांचा शेवट येतो तेव्हा मात्र आपलं मन वाचून झाल्यावर तृप्त तर होतेचं पण उदासीन सुद्धा होऊन जातं,कारण अजूनही त्यात आठवणींचे पक्षी असते तरी ते आवर्जून वाचलेचं जातील अशी अपेक्षा असते,चला तर जाणून घेऊया आठवणींचे पक्षी.....

प्रल्हाद इरनाक सोनकांबळे उर्फ परल्या,परलू ,परलू महाराज अश्या कित्येक नावाने हाका मारलेला , लहानपणीच आई -बाबांचे छत्र हरपल्यामुळे ,परदिसा म्हणून जगत आलेला, लहानपणापासून बहिणीच्या घरीच वाढलेला, परिस्थिती मुळे कधी बहीण बोलायची,पण प्रेम ही तेवढीच करायची, कधी भीक मागुन जगणारा, महार जातीचा असल्याने बामन किंव्हा उतीम लोकांकडून हेटाळलेला परल्या, कोणत्याही शुभ कार्यात महार समोरून गेला तर अशुभ म्हणून बोलणी खाणारा,पोटासाठी ,कोर भर भाकरीसाठी कोणतंही पडेल ते काम करणारा, कधी दाजी( भाऊजी) कडून फसवलेला,जेवण कमीचं असायचं म्हणून तुडुंब पोटभरून पाणी पिणारा, व आपल्या पोटाची आग थांबविणारा, दोन्ही बहिणीकडे अठराविश्वे दारिद्र्य असून जगतो आहे म्हणूनच जगणारा, कधी चोरी केली नाही तरी बोल खाणारा, शिक्षणाची आवड असल्याने पोटापेक्षा बुद्धीची किंमत करणारा, सदैव रोगाने ही पछाडलेला तशी परिस्थिती असल्याने, पडली ती कामे,व कमी वयात आपण बहिणीच्या अंगावर बोजा होऊ नये म्हणून सतत काम करणारा,असा हा परलू शिक्षणाच्या ओढीने मोठा होत जातो..
परल्याचा/ लेखकांचा जन्म उस्मानाबाद जिल्यातील उदगीर तालुक्यातील सुल्लाळी या गावी झाला. १९५६ पूर्वी म्हणजे भाषांवर प्रांतरचनेपूर्वी ते बिदर जिल्ह्यात होत.लहानपणीचं आईबापाच छत्र हरपल्यामुळे मोठ्या बहिणीकडे म्हणजे चेऱ्याला लहानाचा मोठा होतो. हडोळतीला,चेऱ्याला प्राथमिक शिक्षण घेऊन पुढे शिकायचं शिकण्याची ओढ असल्याने गावातून पैसा ज्याला एकप्रकारे वर्गणीच,किंव्हा देणी म्हणून लातूर,तर नंतर अहमदपूर येथे शिक्षण घेत असतो. गणितात जास्त रस नसलेला पण इंग्रजी बऱ्यापैकी जमत असल्याने मॅट्रिक परीक्षेत सेकंड क्लास श्रेणीमध्ये पास होतो. पास होतो तेव्हा मात्र कुणाला विश्वास बसत नाही,जे त्याची टिंगल करणारे असते ते मात्र अगदी काठावर तर काही नापास झालेले असतात.मग नंतरच्या शिक्षणासाठी औरंगाबाद येथील मिलिंद महाविद्यालयात प्रवेश घेत,बोर्डिंग मध्ये जे भेटेल तेच खाऊन सुखी असणारा, हा प्रल्हाद मोठा होत जातो.आणि शेवटी मोठा होऊन प्राचार्य ते ही इंग्रजी विषयांचा असा हा प्रवास लेखकाने आपल्या वेगळ्या भाषेत,करतासे,(करत असे) अश्या सोप्या ग्रामीण भाषेत हा आठवणींचे पक्षी रेखाटतांना दिसतो आहे..
आठवणींचे पक्षी या पुस्तकांत ,पुस्तक म्हणण्यापेक्षा दुःखाने भरलेला , अमानवी कृत्याने छळलेला ,सत्य,विदारक चित्रण या जीवनपटात काही प्रकरणाद्वारे, पुस्तकांची मांडणी केलेली आहे.. ज्यात गोष्ट पाटी-पुस्तकांची,बिन हिश्यांचा हक्क,तुबी माणूस हैस,बाभळीची साल,हडकं,गिरणीचं पीठ,बिदवा,शिकार ,चेलमा,उंटावरचा प्रवास ,पैश्याला एक दगड,देवा तुझा आशीर्वाद इत्यादि प्रकरणे विशेष करून मनाला लागून जातात. त्या प्रकरणातील काही निवडक प्रसंग आपणांस इथे सादर करतो...

गोष्ट पाटी- पुस्तकाची :
लहानपणीचं आई _वडिलांचं छत्र हरपल्यामुळे बहिणीच्या गावी म्हणजे चेऱ्याला परलू रहातसे. बहिणीकडे दारिद्र्य असल्याने तरी ती एक पाटी आणि अंकलिपी/ उजळणीचं पुस्तक बाजारातून आणून देऊन सरकारी शाळेत नाव टाकते.रस्त्यात चालत असतांना परलू ची चुकी नसतांना रामाची( बहिणीच्या जाऊ चा मुलगा) पाटी खाली पडतासल्याने ती फुटते व त्याचा आरोप परलू वर लागतो म्हणून त्याची माय त्याची पाटी व उजळणीचं पुस्तक घेते,मग दोन्ही जावा चं चांगलंच भांडण होते पण काही केल्या परलू चं पुस्तक अन् पाटी काही केल्या भेटत नाही..मग बहीण परलू ला विचारते तू दिलीच का??आणि बोल मात्र परलू ला पडते. कारण बहिणीकडे दारिद्र्यचं असल्याने व घरच्यांच्या विरोधात म्हणून ती लहानपणी भावाला घरी घेऊन येते,या सर्व प्रकरणात बहीण म्हणते, " निस्पुरी भाड्या,मायबाप गिळला,आता मला गिळाय बसला " एवढ्या शब्दांत ती आपल्या भावाला बोलते.रागातच असल्याने बोलते पण आक्काचा जीव आपल्या परलुत जास्त असतो,पण दारिद्र्याची गंगा घरातूनच सुरू असल्याने तिची चिडचिड आपल्या परलू वर निघते,अशी ती पाटी -पुस्तकाची गोष्ट...

बिन हिश्याचा हक्क :
मेलेल्या जनांवरच, मुर्दाड मांस मी खात नसल्याने कधी कधी जिवंत, हलाल केलेलं जे कापतात ते खायचो. कारण माझ्या मायीनं लहानपणी च पंढरीला नेलं व्हतं आणि गळ्यात धागा असल्याने. मग कुणी हलाल करताना दिसलं की मी जात असू. लहानचन असल्याने मी हलालाचा पाय पकडत असे.जोर तर पुरत नसायचा त्यामुळे मग तो पाय निसटून जायचा व कधी मधी रगताची धार उडायची पण मी जपत असे, कारण शाळेत जायचं असायचं.मग पाय पडताना मला काही जास्त ओळखत नसायचे तर कधी ज्यांना ओळख असायची ते म्हणायचे अरे परदिसा आहे बिचारं!!! मला तेंव्हा लई वाईट वाटायचं पण वाटा मिळायचा. मग आक्का कामाला जात असल्याने मी मात्र त्याला मीठ मिरची लावून शिजवून ठेवतासे.मग आक्का घरी आल्यावर तिला मात्र खूप आनंद होत असायचा. मग तीच म्हणायची," आरं बापू,चिंचोक्यांन पोट भरना!! खारं ,आज जरा लई है म्हणून सुले खांड केल्यात. कधी भाजी पहिलीच नसल्याने चिंचोके खाऊन सुद्धा जगावं लागत असते असं जगत जगत हा परलू मोठा होत असतो...

तूबी माणूस हैस :
भीमराव बापूच्या मळ्यात परलू नेहमी जात असे. शाळा सुटली की मळा गाठायचा,आणि पडलं ते काम करायचो,शेण काढायचो, केरकचरा काढायचो, त्यामुळे भीमराव बापूंची मर्जी माझ्यावर जमली होती,आणि ते मग काही का होईना तुकडा भाकर द्यायचे. एक दिवस जरी दिसलो नाही तर आपल्या शिवाजी बापू पोराला म्हणायचे परलू महाराज आज कुठे गेले, त्याला तू सतावत नको जाऊ. बाई मात्र कधी कधी द्यायची नाही ,द्यायची तर कधी पत्रावळीवर तर कधी जमिनीवर पडलेलं पण नाईलाजाने मला ते खावं लागायचं.मी कधी घरी अंघोळ करायचो नाही,आणि केली की लोक चिडवायचे की आता परल्याबी मजेत राहायलाय म्हणून. बाहेर जिकडे भाकर जिकडे पाणी पिता येईल तिकडे अंघोळ . जिथे जायचो तिथं अंघोळ करायचो ते भी वंजळीने करत असू.नेहमी घाण पाण्याने अंघोळ करत असल्याने अंगाला खाज नेहमीच असायची..
एकदा मळ्यात उसाच्या चिपाडावर झोप लागली तिकडून एक मारकुंडा बैल आला आता उठाव तर बैल मारेल म्हणू तसाच उसाच्या चिपाडीत पडून राहिलो तर त्या बैलासोबत अजूनही दोन चार बैल आले आणि ते उसाची चिपाड तुडवून चालले गेले..तो बैलाचा मार असल्याने सगळं अंग दुखू लागलं.पाटलाला कळलं तेव्हा त्यांना ही हळहळ वाटू लागली..हा प्रसंग वाचतांना सुद्धा एक वेगळाच अनुभव मनात येऊन जातो..

बाभळीची साल आणि हडकं :
बाभळीच्या सालीच असं माझं की नुसते कातडे कमवण्यात मदत करत नाही ते त्यातून तयार झालेल्या कातड्यातून चप्पल,जोडे करून लहान मोठ्यांच्या पायाला सुरक्षित ठेवून त्यांच्या जीवनालाच आधार देण्याच्या कामात मदत करते तशीच ती साल परलू च्या आयुष्यात कामात पडली.बाभळीची साल विकून शाळेत असणाऱ्या परलू ला काही पैसे मिळू लागले म्हणून ती माझ्या कामात ,माझ्या जीवनाला ही रंग देण्याचं काम या बाभळीच्या सालीने केलं.पण बाभळीची साल तोडतांना खबरदारी घ्यावी लागत असायची . बामण,उतीम लोकांच्या नजरेत आलं की त्यांच्यापासून शिव्या ऐकाव्या लागत असे पण त्यापरिस दुसरा व्यवसाय ज्यात गुंतवणूक काहीच नसून मेहनत व फायदा एवढाच हा व्यवसाय तो म्हणे हडकं वेचने ..कुठलाही व्यवसाय हा कोणत्या एका व्यक्तीशी निगडित नसतो तर त्याला परिस्थिती ते काम करायला लावत आणि लेखक परदिसा असल्याने जनावरांची हाडं जमा करून ते विकत असायचे आणि त्यातून ते पैसे आक्का ला देत असायचे.शाळा सुटली की हाडं जमा करायची. पण हे एखाद्या सरांना दिसलं की पंचायत वायची, ते काही म्हणायचे नाही पण मनाला लागून जायचं आणि मग शाळेतील मुलांना दिसलं की ते सारख चिडवायची, तेव्हा मात्र मनाला त्या वेदना व्हायच्या,पण कुणावर माझा बोजा होऊ नये,बहिणीची फजिती होऊ नये म्हणून हा ही व्यवसाय करून काही पैसे कमवत असायचो..

बिदग्याचं काम :
कुंभाराला मडके तयार करण्यासाठी बारीक माती लागत असायची,मग मी ती माती गोळा करायचो,घाण कचरा, गाळून ती एकत्र करून कुंभाराला मदत करायचो..मग मडके तयार झाले की कुंभार सुद्धा मदत करतासे. की तो सुद्धा पैश्याची मदत करीत असे.पण रस्त्यावरून बिदग्याचं काम करताना शाळेची पोरं हसत असायची,पण तेव्हा मन घट्ट करून हे दिवसही जातील अशी उमेद वाटायची..

परक्षा :
एकदा गंगाबाईच्या घरी कुत्र मेलं होतं. त्याचा जिकडे तिकडे वास सुटला होता, ते काम म्हाताऱ्या गंगाबाईने मला सांगितलं व त्याबदल्यात तुला अर्धी चतकोर भाकर देईल असं कबूल केलं होतं.पोटासाठी वाटेल ते काम करण्याची तयारीच असल्याने मी/ लेखकांनी ते काम करण्यास होकार देतात .हातात कुत्र्याचं शेपूट पकडलं तर ते तुटून आलं,एवढं ते सडून गेलं होतं. त्या कुत्र्याचा वास आला तरी थुका थुंकायचो नाही, मधल्या मध्ये गिळायचो,थुंकलो तर जाणारे येणारे म्हणतील की " एवढी चिळ वाटतोय तुला मग करतूस कश्याला हा धंदा" पण त्यांना कुठे माहिती होत की सर्व पोटाची आग आणि पोटासाठी भुकेचा लोभ माणसाला काय करवून घेत..एकदाचं ते कुत्र दूरवर नेऊन टाकलं. हात धुतले तरी काही त्याचा वास काही जात नव्हता तसाच गंगाबाईच्या घरी जाऊन बाहेर थांबलो.बराच वेळ झाला होता गंगाबाई ने कबूल केलं की अर्धी चतकोर देईल म्हणून पण ती काही मिळाली नव्ह्ती..शेवटी गंगाबाई ची सून आली आणि म्हणाली या महारड्यांना कितीही म्हटलं तरी जाणार नाही, तरी बलुतं नेतात वरून यांना भाकर ही हवी असते आणि अर्धी चतकोर देऊन ते ही बोलणे करून चालली गेली..काम केलं आणि त्याचा मोबदला असा मिळतोय हा ही प्रसंग चटका लावून जातोय..

कुपाटी -
एकदा बोर्डिंग मध्ये राहत असतांना परलू /लेखकांला कवूळ आणि खरूज झालेली..पूर्ण अंग लस लस करत असे . चालतांना ही त्रास व्हायचा,अंगाला खाज सुटायची,पण शाळेतील पोरं हसतील म्हणून ती दाबून घेयचो.काही केल्या आराम होत नव्हता,इकडे तिकडे औषध घेऊन सुद्धा काही आराम होत नव्हता,कुणीतरी एक उपाय सांगितला म्हणून एकट्याचं रात्री उठून नगरपालिकेच्या वाचनालयाजवळ जाऊन सर्व कपडे काढून पूर्ण अंगाला खोबरेल तेल आणि मीठ लावतात,पूर्ण अंगाची लाही लाही होते,पण तो नंतर खरूज बसला जातो.इथे सांगायच हेच की आई वडील असले की आपल्या मुलांची काळजी घेतात,इथे मात्र परदिसा,बहिणीकडे असलेला,आणि स्वतःच त्याला प्रयत्न करावे लागतात..

आठवणींचे पक्षी - प्र.इ.सोनकांबळे

फार दिवसांपूर्वी म्हणजे जवळपास सहा- सात महिन्यांपूर्वी प्रतिलिपी च्याच एका मैत्रिणीने " आठवणींचे पक्षी " या पुस्तकांविषयी काही माहिती सांगितली होती आणि मला वाचनाची आवड असल्याने, विशेषतः दलित साहित्य व आत्मकथन वाचनाची आवड असल्याने " आठवणींचे पक्षी " या पुस्तकांविषयी मनात एक कुतूहल निर्माण झाले होते. मग ते पुस्तंक शोधण्यासाठी बराचं प्रयत्न केला पण काही केल्या ते पुस्तक हाती लागतंच नव्हते. मी बरेच दा आपल्या प्रतिलिपी मित्र-मैत्रिणींना सुद्धा आपल्या जिल्यात कुठे हे पुस्तकं मिळते का याचा जरा शोध घ्या आणि मिळत असेल तर मला ते पोस्ट करा इथपर्यंत मी मागणी केली होती पण काही केल्या या पुस्तकाचा शोध लागत नव्हता.. ते कसं आहे न एकदा का एखाद्या व्यक्तीविषयी म्हणा किंव्हा मग पुस्तकांविषयी म्हणा ,कुतूहल निर्माण झाले की मग ते वाचण्यासाठी कितीतरी धडपड केली जाते, जोपर्यंत ती व्यक्ती वा ते पुस्तकं मिळत नाही तोपर्यंत..
आज पर्यंत बरीच पुस्तके वाचलीत ज्यात उपरा,कोल्हाट्याचं पोर,अक्करमाशी,आमचा बाप आणि आम्हीं,आई समजून घेतांना,तराळ-अंतराळ,बलुतं ,मृत्यूंजय,छावा,
पावनखिंड,अजून बरीचशी...यांतील काही साहित्यकृती या दलित साहित्याशी निगडित पुस्तके आहे ज्यांनी जे घडलं , जसं घडलं,तसंच आपल्या भाषेत मांडण्याचा प्रयत्न केला.त्यामुळे हे साहित्य लोकांना आवडलं आणि ते अजरामर झालं..तसचं हे आठवणीने पक्षी पुस्तकं..एवढी पुस्तके वाचली पण फक्त वाचत गेलो ज्या गोष्टी मनाच्या कोपऱ्यात,डोक्यात होत्या त्या डोक्यातच राहिल्या,फक्त इतरांना त्या पुस्तकांविषयी काही थोडं बहुत सांगत असायचो,पण आठवणींचे पक्षी वाचतांना त्यातील प्रसंग,शब्द,ती बोलीभाषा आणि काही मुद्दे मी वाचतांना लिहून ठेवले ,आणि आज प्रतिलिपी च्या माध्यमातून आपणांस इथे या पुस्तकांविषयी उलगडा करण्याचा प्रयत्न करतो आहे...
वर शीर्षक मध्ये जरी मी पुस्तक परीक्षण म्हटलं असलं तरी मी एवढा ही काही मोठा नाही की एवढ्या अजरामर झालेल्या साहित्याची समीक्षा किंव्हा परीक्षण करेल.फक्त वाचतांना जो अनुभव,पुस्तकांत असणाऱ्या घडामोडी ,प्रसंग हे अंगावर काटा उभे करणारे आहेत,तसेच काही प्रसंगातून न राहता डोळ्यांतून अश्रूही बाहेर येतात.अश्या पुस्तकाचा शोध घेता घेत एक ' विद्या प्रकाशन ' औरंगाबाद ईथल्या बुक डेपो वरून हे पुस्तक मागविले..सुरुवातीला पैसे भरावे लागतात,परंतु लॉकडाउन असल्याने ते पुस्तंक येणार की नाही याची शाश्वती नव्हती..पैसे जाईल तर जाऊदेत पण ते पुस्तकं यायला हवं म्हणून त्या पुस्तकाची ऑर्डर केली. पुस्तक ऑर्डर करून आठ दिवस वाट पाहिली आणि शेवटी ते पुस्तक हाती पडलं.काल पुस्तंक वाचून पूर्ण झालं.वाचण्यासाठी थोडा जास्तचं वेळ लावला कारण ते प्रतिलिपी च्या वाचक वर्गाना त्या पुस्तकांविषयी सांगायच होतं.म्हणून प्रसंग,काही वाक्ये लिहून ठेवत गेलो..काल पुस्तक जरी वाचून पूर्ण झालं तरी आताही असंच वाटत आहे की अजूनही काही प्रकरणे त्या पुस्तकांत असायला हवी होती,ते पुस्तकं कधीही समाप्त होऊ नये असंच वाटत होतं.पण एखाद्या पुस्तकाचा शेवट असतो,त्यालाही कुठंतरी थांबावचं लागतं आणि शेवटी ते पुस्तकं वाचून पूर्ण झालं..डोळ्यात अश्रू,मनात नवी उमेद,खितपत पडलेल्या मनाला चेतना देण्याचं काम या आठवणींचे पक्षी ने आज केलं. या पुस्तकानविषयी मला ज्या मैत्रीण ने सांगितले तिचे यासाठी विशेष धन्यवाद. कारण या पुस्तकांविषयी मला तरी माहिती नव्हती,आणि तसं काही वाचनात आलेलं नव्हतं..नाही तर दलित साहित्य मी आवर्जून वाचत असतो..दुसरे ज्यांनी माझ्यासाठी हे पुस्तकं मिळावं यासाठी प्रयत्न केला त्यांचं ही धन्यवाद....
ज्याप्रमाणे एखादा पक्षी तहानेने व्याकुळ होतो आणि मग खूप प्रयत्न केल्यावर त्याला पाणी मिळते,तो तृप्त होतो, ज्याप्रमाणे भूक लागली की लहान बाळ म्हणा की आपण म्हणा अन्न ते थोडं का होईना मिळाल्यावर मन तृप्त होते,पोटाची आग शमली जाते, ज्याप्रमाणे चातक पक्षी हा पाण्यासाठी आसुसलेला असतो आणि मग त्याला ढगातून पाणी मिळालं की तो ही तृप्त होतो, ज्याप्रमाणे आपल्या मनासारखं घडलं की व्यक्ती थोड्या प्रमाणात का होईना संतुष्ट होत असतो अगदी तसंच आठवणींचे पक्षी वाचतांना मी वाचलेली पुस्तकें एका बाजूला आणि आठवणींचे पक्षी दुसऱ्या बाजूला,जर हे पुस्तक वाचनात आले नसते तर कदाचीत माझ्या वाचनाचा तृप्तपणा पूर्ण झाला नसता,अजूनही झालेला नाही पण काही प्रमाणात का होईना झाला..आज पुस्तक वाचून या पुस्तकांविषयी लिहू वा ना लिहू,लिहू तर बरचं काही आणि नाही लिहीले तर एवढं अजरामर साहित्य लोकांच्या वाचनात येणारचं नाही मग माझ्या वाचनाचा फायदा काय????म्हणून इथेचं का होईना आपणांस निवडक,वेचक प्रसंग काही लेखकांच्या शब्दांत तर काही माझ्या शब्दांत मांडण्याचा प्रयत्न मी करतो आहे....

ज्या चळवळीने आम्हां साऱ्यांना इथपर्यंत आणले व आमच्या अनुभूतीला अभिव्यक्ती प्राप्त करून दिली,त्या चळवळीचे महान प्रणेते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन ..प्र.ई.सोनकांबळे

इथून या पुस्तकाची सुरुवात होते.. दुःख हे सांगता येतंय.ते आनंदाकडे नेत असते. दुःखातून होणारा आनंद हा आपोआपच दुःख विसरायला लावते. अनेकजण दुःख झालेल्या जवळ आले की दुःख आपोआपचं कमी होते अन् हाच हेतू असतो जवळ येण्याचा -जवळ करण्याचा ..अश्या शब्दांत लेखकांनी आपल्या पुस्तकात मांडणी केलेली दिसते. "आठवणींचे पक्षी " म्हणजे दुःख,दैन्य,दास्य व वेदनांचे आतील बाहेर व्यक्त होणे होय. लोकांना दुःख जास्तचं आवडतं आणि ज्या दुःखाला वेदना त्या ही खऱ्या खुऱ्या , प्रामाणिक असतात ते जास्तचं वाचकांना सुद्धा भावल्या जातं असंच हे आठवणींचे पक्षी हे पुस्तकं लेखक प्र.ई.सोनकांबळे यांनी अगदी पोटाच्या आततिडकीने,सोप्या ,सहज कुठेच रागाचा उद्रेक झालेला दिसत नाही वा कुठे वाचतांना कंटाळा येत नाही.समोर काय झालं,समोर लेखक कसे- कसे घडले याची उत्कंठा मनाला लागलेली असते आणि जेव्हा पुस्तकांचा शेवट येतो तेव्हा मात्र आपलं मन वाचून झाल्यावर तृप्त तर होतेचं पण उदासीन सुद्धा होऊन जातं,कारण अजूनही त्यात आठवणींचे पक्षी असते तरी ते आवर्जून वाचलेचं जातील अशी अपेक्षा असते,चला तर जाणून घेऊया आठवणींचे पक्षी.....

प्रल्हाद इरनाक सोनकांबळे उर्फ परल्या,परलू ,परलू महाराज अश्या कित्येक नावाने हाका मारलेला , लहानपणीच आई -बाबांचे छत्र हरपल्यामुळे ,परदिसा म्हणून जगत आलेला, लहानपणापासून बहिणीच्या घरीच वाढलेला, परिस्थिती मुळे कधी बहीण बोलायची,पण प्रेम ही तेवढीच करायची, कधी भीक मागुन जगणारा, महार जातीचा असल्याने बामन किंव्हा उतीम लोकांकडून हेटाळलेला परल्या, कोणत्याही शुभ कार्यात महार समोरून गेला तर अशुभ म्हणून बोलणी खाणारा,पोटासाठी ,कोर भर भाकरीसाठी कोणतंही पडेल ते काम करणारा, कधी दाजी( भाऊजी) कडून फसवलेला,जेवण कमीचं असायचं म्हणून तुडुंब पोटभरून पाणी पिणारा, व आपल्या पोटाची आग थांबविणारा, दोन्ही बहिणीकडे अठराविश्वे दारिद्र्य असून जगतो आहे म्हणूनच जगणारा, कधी चोरी केली नाही तरी बोल खाणारा, शिक्षणाची आवड असल्याने पोटापेक्षा बुद्धीची किंमत करणारा, सदैव रोगाने ही पछाडलेला तशी परिस्थिती असल्याने, पडली ती कामे,व कमी वयात आपण बहिणीच्या अंगावर बोजा होऊ नये म्हणून सतत काम करणारा,असा हा परलू शिक्षणाच्या ओढीने मोठा होत जातो..
परल्याचा/ लेखकांचा जन्म उस्मानाबाद जिल्यातील उदगीर तालुक्यातील सुल्लाळी या गावी झाला. १९५६ पूर्वी म्हणजे भाषांवर प्रांतरचनेपूर्वी ते बिदर जिल्यात होत.लहानपणीचं आईबापाच छत्र हरपल्यामुळे मोठ्या बहिणीकडे म्हणजे चेऱ्याला लहानाचा मोठा होतो. हडोळतीला,चेऱ्याला प्राथमिक शिक्षण घेऊन पुढे शिकायचं शिकण्याची ओढ असल्याने गावातून पैसा ज्याला एकप्रकारे वर्गणीच,किंव्हा देणी म्हणून लातूर,तर नंतर अहमदपूर येथे शिक्षण घेत असतो. गणितात जास्त रस नसलेला पण इंग्रजी बऱ्यापैकी जमत असल्याने मॅट्रिक परीक्षेत सेकंड क्लास श्रेणीमध्ये पास होतो. पास होतो तेव्हा मात्र कुणाला विश्वास बसत नाही,जे त्याची टिंगल करणारे असते ते मात्र अगदी काठावर तर काही नापास झालेले असतात.मग नंतरच्या शिक्षणासाठी औरंगाबाद येथील मिलिंद महाविद्यालयात प्रवेश घेत,बोर्डिंग मध्ये जे भेटेल तेच खाऊन सुखी असणारा, हा प्रल्हाद मोठा होत जातो.आणि शेवटी मोठा होऊन प्राचार्य ते ही इंग्रजी विषयांचा असा हा प्रवास लेखकाने आपल्या वेगळ्या भाषेत,करतासे,(करत असे) अश्या सोप्या ग्रामीण भाषेत हा आठवणींचे पक्षी रेखाटतांना दिसतो आहे..
आठवणींचे पक्षी या पुस्तकांत ,पुस्तक म्हणण्यापेक्षा दुःखाने भरलेला , अमानवी कृत्याने छळलेला ,सत्य,विदारक चित्रण या जीवनपटात काही प्रकरणाद्वारे, पुस्तकांची मांडणी केलेली आहे.. ज्यात गोष्ट पाटी-पुस्तकांची,बिन हिश्यांचा हक्क,तुबी माणूस हैस,बाभळीची साल,हडकं,गिरणीचं पीठ,बिदवा,शिकार ,चेलमा,उंटावरचा प्रवास ,पैश्याला एक दगड,देवा तुझा आशीर्वाद इत्यादि प्रकरणे विशेष करून मनाला लागून जातात. त्या प्रकरणातील काही निवडक प्रसंग आपणांस इथे सादर करतो...

गोष्ट पाटी- पुस्तकाची :
लहानपणीचं आई _वडिलांचं छत्र हरपल्यामुळे बहिणीच्या गावी म्हणजे चेऱ्याला परलू रहातसे. बहिणीकडे दारिद्र्य असल्याने तरी ती एक पाटी आणि अंकलिपी/ उजळणीचं पुस्तक बाजारातून आणून देऊन सरकारी शाळेत नाव टाकते.रस्त्यात चालत असतांना परलू ची चुकी नसतांना रामाची( बहिणीच्या जाऊ चा मुलगा) पाटी खाली पडतासल्याने ती फुटते व त्याचा आरोप परलू वर लागतो म्हणून त्याची माय त्याची पाटी व उजळणीचं पुस्तक घेते,मग दोन्ही जावा चं चांगलंच भांडण होते पण काही केल्या परलू चं पुस्तक अन् पाटी काही केल्या भेटत नाही..मग बहीण परलू ला विचारते तू दिलीच का??आणि बोल मात्र परलू ला पडते. कारण बहिणीकडे दारिद्र्यचं असल्याने व घरच्यांच्या विरोधात म्हणून ती लहानपणी भावाला घरी घेऊन येते,या सर्व प्रकरणात बहीण म्हणते, " निस्पुरी भाड्या,मायबाप गिळला,आता मला गिळाय बसला " एवढ्या शब्दांत ती आपल्या भावाला बोलते.रागातच असल्याने बोलते पण आक्काचा जीव आपल्या परलुत जास्त असतो,पण दारिद्र्याची गंगा घरातूनच सुरू असल्याने तिची चिडचिड आपल्या परलू वर निघते,अशी ती पाटी -पुस्तकाची गोष्ट...

बिन हिश्याचा हक्क :
मेलेल्या जनांवरच, मुर्दाड मांस मी खात नसल्याने कधी कधी जिवंत, हलाल केलेलं जे कापतात ते खायचो. कारण माझ्या मायीनं लहानपणी च पंढरीला नेलं व्हतं आणि गळ्यात धागा असल्याने. मग कुणी हलाल करताना दिसलं की मी जात असू. लहानचन असल्याने मी हलालाचा पाय पकडत असे.जोर तर पुरत नसायचा त्यामुळे मग तो पाय निसटून जायचा व कधी मधी रगताची धार उडायची पण मी जपत असे, कारण शाळेत जायचं असायचं.मग पाय पडताना मला काही जास्त ओळखत नसायचे तर कधी ज्यांना ओळख असायची ते म्हणायचे अरे परदिसा आहे बिचारं!!! मला तेंव्हा लई वाईट वाटायचं पण वाटा मिळायचा. मग आक्का कामाला जात असल्याने मी मात्र त्याला मीठ मिरची लावून शिजवून ठेवतासे.मग आक्का घरी आल्यावर तिला मात्र खूप आनंद होत असायचा. मग तीच म्हणायची," आरं बापू,चिंचोक्यांन पोट भरना!! खारं ,आज जरा लई है म्हणून सुले खांड केल्यात. कधी भाजी पहिलीच नसल्याने चिंचोके खाऊन सुद्धा जगावं लागत असते असं जगत जगत हा परलू मोठा होत असतो...

तूबी माणूस हैस :
भीमराव बापूच्या मळ्यात परलू नेहमी जात असे. शाळा सुटली की मळा गाठायचा,आणि पडलं ते काम करायचो,शेण काढायचो, केरकचरा काढायचो, त्यामुळे भीमराव बापूंची मर्जी माझ्यावर जमली होती,आणि ते मग काही का होईना तुकडा भाकर द्यायचे. एक दिवस जरी दिसलो नाही तर आपल्या शिवाजी बापू पोराला म्हणायचे परलू महाराज आज कुठे गेले, त्याला तू सतावत नको जाऊ. बाई मात्र कधी कधी द्यायची नाही ,द्यायची तर कधी पत्रावळीवर तर कधी जमिनीवर पडलेलं पण नाईलाजाने मला ते खावं लागायचं.मी कधी घरी अंघोळ करायचो नाही,आणि केली की लोक चिडवायचे की आता परल्याबी मजेत राहायलाय म्हणून. बाहेर जिकडे भाकर जिकडे पाणी पिता येईल तिकडे अंघोळ . जिथे जायचो तिथं अंघोळ करायचो ते भी वंजळीने करत असू.नेहमी घाण पाण्याने अंघोळ करत असल्याने अंगाला खाज नेहमीच असायची..
एकदा मळ्यात उसाच्या चिपाडावर झोप लागली तिकडून एक मारकुंडा बैल आला आता उठाव तर बैल मारेल म्हणू तसाच उसाच्या चिपाडीत पडून राहिलो तर त्या बैलासोबत अजूनही दोन चार बैल आले आणि ते उसाची चिपाड तुडवून चालले गेले..तो बैलाचा मार असल्याने सगळं अंग दुखू लागलं.पाटलाला कळलं तेव्हा त्यांना ही हळहळ वाटू लागली..हा प्रसंग वाचतांना सुद्धा एक वेगळाच अनुभव मनात येऊन जातो..

बाभळीची साल आणि हडकं :
बाभळीच्या सालीच असं माझं की नुसते कातडे कमवण्यात मदत करत नाही ते त्यातून तयार झालेल्या कातड्यातून चप्पल,जोडे करून लहान मोठ्यांच्या पायाला सुरक्षित ठेवून त्यांच्या जीवनालाच आधार देण्याच्या कामात मदत करते तशीच ती साल परलू च्या आयुष्यात कामात पडली.बाभळीची साल विकून शाळेत असणाऱ्या परलू ला काही पैसे मिळू लागले म्हणून ती माझ्या कामात ,माझ्या जीवनाला ही रंग देण्याचं काम या बाभळीच्या सालीने केलं.पण बाभळीची साल तोडतांना खबरदारी घ्यावी लागत असायची . बामण,उतीम लोकांच्या नजरेत आलं की त्यांच्यापासून शिव्या ऐकाव्या लागत असे पण त्यापरिस दुसरा व्यवसाय ज्यात गुंतवणूक काहीच नसून मेहनत व फायदा एवढाच हा व्यवसाय तो म्हणे हडकं वेचने ..कुठलाही व्यवसाय हा कोणत्या एका व्यक्तीशी निगडित नसतो तर त्याला परिस्थिती ते काम करायला लावत आणि लेखक परदिसा असल्याने जनावरांची हाडं जमा करून ते विकत असायचे आणि त्यातून ते पैसे आक्का ला देत असायचे.शाळा सुटली की हाडं जमा करायची. पण हे एखाद्या सरांना दिसलं की पंचायत वायची, ते काही म्हणायचे नाही पण मनाला लागून जायचं आणि मग शाळेतील मुलांना दिसलं की ते सारख चिडवायची, तेव्हा मात्र मनाला त्या वेदना व्हायच्या,पण कुणावर माझा बोजा होऊ नये,बहिणीची फजिती होऊ नये म्हणून हा ही व्यवसाय करून काही पैसे कमवत असायचो..

बिदग्याचं काम :
कुंभाराला मडके तयार करण्यासाठी बारीक माती लागत असायची,मग मी ती माती गोळा करायचो,घाण कचरा, गाळून ती एकत्र करून कुंभाराला मदत करायचो..मग मडके तयार झाले की कुंभार सुद्धा मदत करतासे. की तो सुद्धा पैश्याची मदत करीत असे.पण रस्त्यावरून बिदग्याचं काम करताना शाळेची पोरं हसत असायची,पण तेव्हा मन घट्ट करून हे दिवसही जातील अशी उमेद वाटायची..

परक्षा :
एकदा गंगाबाईच्या घरी कुत्र मेलं होतं. त्याचा जिकडे तिकडे वास सुटला होता, ते काम म्हाताऱ्या गंगाबाईने मला सांगितलं व त्याबदल्यात तुला अर्धी चतकोर भाकर देईल असं कबूल केलं होतं.पोटासाठी वाटेल ते काम करण्याची तयारीच असल्याने मी/ लेखकांनी ते काम करण्यास होकार देतात .हातात कुत्र्याचं शेपूट पकडलं तर ते तुटून आलं,एवढं ते सडून गेलं होतं. त्या कुत्र्याचा वास आला तरी थुका थुंकायचो नाही, मधल्या मध्ये गिळायचो,थुंकलो तर जाणारे येणारे म्हणतील की " एवढी चिळ वाटतोय तुला मग करतूस कश्याला हा धंदा" पण त्यांना कुठे माहिती होत की सर्व पोटाची आग आणि पोटासाठी भुकेचा लोभ माणसाला काय करवून घेत..एकदाचं ते कुत्र दूरवर नेऊन टाकलं. हात धुतले तरी काही त्याचा वास काही जात नव्हता तसाच गंगाबाईच्या घरी जाऊन बाहेर थांबलो.बराच वेळ झाला होता गंगाबाई ने कबूल केलं की अर्धी चतकोर देईल म्हणून पण ती काही मिळाली नव्ह्ती..शेवटी गंगाबाई ची सून आली आणि म्हणाली या महारड्यांना कितीही म्हटलं तरी जाणार नाही, तरी बलुतं नेतात वरून यांना भाकर ही हवी असते आणि अर्धी चतकोर देऊन ते ही बोलणे करून चालली गेली..काम केलं आणि त्याचा मोबदला असा मिळतोय हा ही प्रसंग चटका लावून जातोय..

कुपाटी -
एकदा बोर्डिंग मध्ये राहत असतांना परलू /लेखकांला कवूळ आणि खरूज झालेली..पूर्ण अंग लस लस करत असे . चालतांना ही त्रास व्हायचा,अंगाला खाज सुटायची,पण शाळेतील पोरं हसतील म्हणून ती दाबून घेयचो.काही केल्या आराम होत नव्हता,इकडे तिकडे औषध घेऊन सुद्धा काही आराम होत नव्हता,कुणीतरी एक उपाय सांगितला म्हणून एकट्याचं रात्री उठून नगरपालिकेच्या वाचनालयाजवळ जाऊन सर्व कपडे काढून पूर्ण अंगाला खोबरेल तेल आणि मीठ लावतात,पूर्ण अंगाची लाही लाही होते,पण तो नंतर खरूज बसला जातो.इथे सांगायच हेच की आई वडील असले की आपल्या मुलांची काळजी घेतात,इथे मात्र परदिसा,बहिणीकडे असलेला,आणि स्वतःच त्याला प्रयत्न करावे लागतात..

मॅट्रिक ची परीक्षा तालुक्याच्या ठिकाणी असल्याने सर्व मुलांचं अगदी व्यवस्थित असायचं,आणि मी मात्र तसाचं असायचो,अगदी जेवणाच्या बाबतीत सुद्धा.त्या परीक्षेच्या काळात काही मुलांनी विचारलं की जेवला का????मी हो म्हणालो,पण त्यांना माहिती होत की जेवलो नाही,म्हणून मुलांनी पोटभर जेवण करून दिले,मी ही पोटभर जेवण केले.शेवटी एक तुकडा ,कुटका उरला होता,तर ते म्हणाले की टाकून दे,पण माझं मन तयार होईना,म्हणून मी तो कुटका कुणाला दिसणार नाही,असा पटकन लपवून घेतला व दुसऱ्या दिवशी पेपरच्या अगोदर तहसील कचेरीच्या मागील संडासाकडे जाऊन खाऊन टाकला,कारण तो तुकडाच माझा त्या दिवसाच्या भुकेचा साथीदार होता...
ते अगदी असं होतं," आली सुगी फुलले गाल,नी गेली सुगी मागचे हाल" एका तुकड्याला ही तरसलेला हा परलाद...

शिकार प्रसंग :
ते अस झालं की दुरून कुत्र्याच्या तोंडात एक लोंबकळत असणारा तो तुकडा दिसला,जवळ जाऊन बघतो तर तो मांसाचा तुकडा . आता तो तुकडा आपल्याला मिळावा म्हणून लोभ सुटतो, हा सर्व लोभ फक्त पोटासाठी असतो बरं का..मग त्या कुत्र्याला गोटा मारतो तर तो काही केल्या तुकडा सोडत नाही,आणि तो कुत्रा अंगावर येऊन तीन दा चावतो,भुकेसाठी केलेला हा ही प्रसंग मनाला चटका लावून जातो..शिकार घेण्यासाठी गेलो मातर शिकार होऊन आलो..

चेलमा :
रस्त्यावर एक खोल गड्डा व आजूबाजूला बाहेरून दगडाने गोल केलेले असते,त्याला चेलमा म्हणत असे.त्यात फक्त कुणब्याचे बैंल पाणी पीत असायचे,दुसऱ्याना महार ,मांगाला त्यात पाणी पिण्याची मुभा नसायची.रस्त्यात चालतांना परलू ला तहान लागली असते म्हणून कुणाला दिसू नये भीत भीत पाणी पिण्याचा प्रयत्न करत असतो.शेवटी जे न व्हायचं तेच होते आणि हे पाणी पितांना एक माणूस बघतो आणि म्हणतो, " आरं गांडीच्या तुला कळत नाही का???हा चेलमा हमचा उतीम लोकांचा है म्हणून..म्हणजे एवढा कटुअनुभव घेऊन लेखक मोठे होतात.एकीकडे पाणी निसर्गाची देणगी ,उतीम लोकांच्या बैलाला पाणी चालत पण आम्ही महार लोकांनी पिले तर ते बाटते,कसली ही मानसिकता..तो इसम एवढ्यावरच थांबत नाही तर तो ओंजळीने पहिले पाणी फेकतो आणि मगच बैलांना पाजतो...

आठवणींचे पक्षी :
औरंगाबाद महाविद्यालयात शिकत असतांना हॉस्टेल मध्ये एक दिवस आदरणीय,ज्यांनी लेखकाला घडवलं असे वानखेडे सर अचानक येतात,त्यावेळी मी खाली सतरंजी,ते ही दुसऱ्या सरांनी दिलेली असते ती खाली टाकून ,त्याखाली हाताईव्हढ्या फळ्या त्याखाली टाकल्या असतात.माझी ती अवस्था पाहून ती सतरंजी काढायला लावतात तर त्याखाली कितीतरी ढेकूण दिसतात,हे पाहून सर म्हणतात की उद्याला जाऊन मला माझ्या नावाचा सर्वांनी अर्ज करा आणि गादी घेऊन या..पुढे आदरणीय वानखेडे सरांमुळे त्यांच्याच कॉलेजमध्ये नोकरीस लागतात.व आपल्याच बहिणीची मुलगी लेखकांना देतात,म्हणजे त्यांच्याशी लग्न लावून देतात..

हुरडा :
लेखक प्राध्यापक झाल्यावर बामण मास्तरांच्या मळ्यात हुरडा खाण्यास जातात.माळी कणसे भाजून आणून ठेवतो व हुरडा तयार करतो.मी/ लेखक तरी दूरच बसतात,पण आता शिकलेला असल्याने बामण मास्तर जवळ बसण्यास आग्रह करतात,पण हे माळ्याला पसंत पडत नाही व तो मास्तराला सांगतो की उतीम लोकांनी ,पाटील लोकांनी या लोकांना जवळ करू नये,इथे ही त्या माळ्याकरवी मात्र लेखकांची जात काढली जाते..

धुलीवंदन / कर :
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांच्या ओळखीचा जगताप नावाचा मुलगा असतो.नवीन नवीन कडपे,टीप टॉप राहायचा.त्याचा खमीज व पायजामा नेहमी चांगला असायचा.सर्व धुलीवंदनात खुश असतात,त्यांच्याकडे पैसे असल्याने ते खेळतात,रंग घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसल्याने मी मात्र काही खेळत नाही.माझं लक्ष मात्र जगताप च्या आणि इतर मुलांच्या कपड्याकडे असायचं.धुलिवंदन खेळून झाल्यावर ते कपडे कुठे फेकतात याकडे माझं/ लेखकांच लक्ष असायचं.शेवटी ते सर्व कपडे कचऱ्यात फेकले जातात.मी जगताप चा तोच पायजामा आणि शर्ट लपून कचऱ्यातून उचलून आणतो.तो साबनाणे स्वच्छ करतो व कुणाला कळू नये,ओळखू येऊ नये म्हणून काही दिवसांनी घालतो,पण ते तो शर्ट आणि पायजामा ओळखतात,पण त्यांना वाईट वाटतं,आणि एक प्रकारे चांगलही वाटतं,की धुवून वापरलेत,अशी परिस्थिती लेखकावर असते..कितीतरी वर्षे परलू हा चप्पल सुद्धा घालत नाही,कारण घेण्यासाठी पैसे आणि पोटाची भूक आडवी येत असायची..

उंटावरचा प्रवास :
लेखक प्राध्यापक झाल्यानंतर आपल्या पत्नी सौ.कुमुद सोबत सुल्लाळी या आपल्या बहीण भावंडाकडे जाण्यास निघतात,त्यावेळेस प्रवास हा उंटावरूनच करावा लागत असे, सर्व गाड्या गेलेल्या असल्याने कारण तशी सोय तेव्हाच नव्हती.पत्नीला तो प्रवास नवीन असतो पण मला नसतो.कोट घालून असून सुद्धा कुणी उंट द्यायला तयार होत नाही,कारण सर्वाना माझी जात माहिती पडली असते.गावातील एक त्याच उंटवाल्या व्यक्तीला अगोदरच सांगून देतो,त्यामुळे एवढा सूट बुटात असणारा,प्राध्यापक असणारा मला कुणी उंट देत नाही.त्याच गावातील जवळचा मित्र उंट शोधून देतो,आणि त्याचे भाडे तो उंटवाला आठ रुपये ठरवतो..जे वाजवीपेक्षा जास्त असते पण पर्याय नसतो म्हणून हा उंटावरचा प्रवास सुरु असतो.रस्त्यात जातांना उंटवाल्या व्यक्तीच्या ओळखीचा म्हातारा भेटतो.तो नुकताच आपल्या पोरीला सोडून आलेला असतो.मोटारीचा प्रवास मानवत नसल्याने तो पायदळ रस्त्याने जात असतो.माझी राहणीमान ,कपडे पाहून तो सुरुवातीला चांगले चांगले विचारतो,काय करता???लई पगार असेल म्हणून सुद्धा विचारतो..शेवटी म्हातारा कोणत्या जातीचे व्हा???असा प्रश्न विचारतो आणि लेखक महार म्हणून सांगतात,त्यानंतर एवढा बोलका असणारा म्हातारा बोलणंच सोडून देतो आणि निघून जातो. उंट वाला सुद्धा गाव येइपर्यंत काहिच बोलत नाही..ते दोघेही वंजारी असतात पण फक्त जात माझी महार असल्याने तो म्हातारा बोलणं सोडून निघून जातो,एवढा काय या लोकांना जातीचा द्वेष असावा??..माणूस म्हणून जन्माला आलो,प्राध्यापक असून सुद्धा जातीचा अपमान यांना प्रत्येकच वेळी सहन करावा लागतो..

दुसऱ्या प्रसंगात लेखक मरसंगीचे मुसलमान पाटील ते लेखकांच्या वडिलांचे मित्र असतात म्हणून लेखकांना आपल्या पत्नीसह जेवायला बोलवतात..इथे मात्र कसलाज दुजाभाव जाणवत नाही,एकत्र जेवण,सर्व सोबत बसून जेवण करतात आणि रमाकांत मित्राच्या घरी गेल्यावर दारावरच पाहुणचार केला जातो,तिथे मात्र सर्व दुरूनच केल्या जात,एवढा विटाळ आम्हा माणसांचा इथे होतो...

देवा तुझा आशीर्वाद :
एकदा परलू बोर्डिंग मध्ये शिकत असतांना गावात असणारा एक मित्र,जो खोली करून राहतो आणि परलू हरिजन बोर्डिंग मध्ये राहत असतो..त्या मित्राचं नाव प्रभुदेव म्हणजे प्रभाकर ..वरच्या जातीचा असल्याने व माझ्याच गावचा असल्याने मला तो एक काम सांगतो,की गावाला जा आणि माझ्यासाठी माझ्या घरून पीठकुठ ,मीठ मिरची घेऊन ये.शाळा बुडेल ही भीती असते पण आज याच काम केलं तर याच्या घरच्यांची मर्जी माझ्यावर बसेल आणि कधी बोर्डिंग मध्ये अडचण आली तर याच्या खोलीचा आधार आपल्याला घेता येईल,म्हणून परलू जाण्यास तयार होतो..चेरं गाव जवळपास अहमदपूर पासून सहा कोस असतं व परलू तेव्हा गाडीची सोय आणि पैसा नसल्याने पायदळ निघतो..गावाला लागूनच बहिणीचं घर असल्याने तो घरी न जाता सरळ प्रभुदेवाच्या घरीं जातो,आणि त्याच्या राजाराम देवभटाला ' देवा तुमच्या पाया पडतो' तशी उतीम लोकांना म्हणायची प्रथा असा म्हणतो,व प्रभादेवाने सांगितलेला निरोप सांगायचा तर तो म्हातारा उलटंच बोलतो..व म्हणतो," आरं गाडीच्या कश्याला आलास???तुझं तोंड काळ कर..परत जा..आमची मुलगी पयल्यानं नांदायला चालली नी हा महारडा पुढं येतो,आडवा येतोय"
महारांनी पुढे येणे म्हणजे अपशकुन ,अशुभ..एवढंच बोलून थांबत नाही तर तो म्हातारा मुलगी घोड्यावर बसायच्या पूर्वी आपल्या पोरीला ओवाळून टाकतो,
काम त्याचंच ,त्याच्या घरच तरीही वागणूक ही अपमानास्पद मिळते...

अश्या प्रसंगातून परलू घडत जातो. कधी विषाचे घोट पिऊन जगतो,तर कधी जातीय चटके घेऊन अपमानास्पद वागणूक घेऊन जगतो,तर एक दाजी चांगला नसल्यांने बरेच दा बहिणीकडे न जाता सरळ मंदिरात बसून असतो,आणि जेव्हा बहिणीचे पोरं परलाद मामा आला हे जाऊन सांगतात तेव्हाच बहीण घरी घेऊन जाते,तर कधी कोणत्या पोरांकडून,गावातील काही उतीम लोकांची हेटाळणी करत परलाद जगतो,आणि आयुष्याच्या शेवटापर्यंत परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव जपतो,त्यांच्या विचारांवर चालतो,आणि आठवणींच्या पक्षी या पुस्तकाची सुरुवात ही त्यांच्याच नावाने करतो. ज्यांच्या मुळे एका परदिसा व्यक्तीला,मुलाला शिकता आलं,आणि इंग्रजीचा प्राध्यापक होता आलं..आठवणींचे पक्षी चा असा प्रवास लेखकांनी आपल्या शब्दात मांडलेला दिसतो..शेवटी प्र.ई.सोनकांबळे आपल्याला २०१० मध्ये जगाला सोडून निघून जातात,आपल्या हाती ठेवून जातात अजरामर,बहुमूल्य,शब्दांत व्यक्त न होणारी अशी ही दलित साहित्य कृती " आठवणींचे पक्षी "

✍️ संकलन आणि शब्दांकन
सुरज मु.कांबळे
☎️ ९८९०२३७८७९
------- - --------------------- --------------

आठवणींचे पक्षी
लेखक -प्र.ई.सोनकांबळे
प्रकाशिका -सौ .कुमुदिनी प्र.सोनकांबळे
प्रकाशन-चेतना प्रकाशन
पुनमुद्रण - १६ डिसेंबर २०१८
मुखपृष्ठ - प्रा.दिलीप बडे
एकूण पाने -२३१

( एकदा तरी प्रत्येकच मराठी वाचक लेखक वर्गाने आठवणींचे पक्षी हे पुस्तकं नक्कीच वाचायला हवे. आठवणींचे पक्षी हे पुस्तकं वा इतर साहित्य पाहिजे असल्यास मी जिथून ऑर्डर केलं ते म्हणजे " विद्या बुक्स पब्लिशर्स " औरंगपुरा,औरंगाबाद इथून घरपोच मागवू शकता..फोन न. ९४२२२०२२९३९ / ९७६४४१६८३१)

🙏 धन्यवाद🙏जय भीम🙏