Rakumar Dhruval - 3 in Marathi Children Stories by vidya,s world books and stories PDF | राजकुमार ध्रुवल - भाग 3 - अंतिम भाग

Featured Books
  • નિતુ - પ્રકરણ 64

    નિતુ : ૬૪(નવીન)નિતુ મનોમન સહજ ખુશ હતી, કારણ કે તેનો એક ડર ઓછ...

  • સંઘર્ષ - પ્રકરણ 20

    સિંહાસન સિરીઝ સિદ્ધાર્થ છાયા Disclaimer: સિંહાસન સિરીઝની તમા...

  • પિતા

    માઁ આપણને જન્મ આપે છે,આપણુ જતન કરે છે,પરિવાર નું ધ્યાન રાખે...

  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

  • હાસ્યના લાભ

    હાસ્યના લાભ- રાકેશ ઠક્કર હાસ્યના લાભ જ લાભ છે. તેનાથી ક્યારે...

Categories
Share

राजकुमार ध्रुवल - भाग 3 - अंतिम भाग

राजकुमार ध्रुवल ला पोट दुखी चा त्रास सुरू होतो..आर्य वीर वैद्यांना बोलावून त्याच्या वर उपचार करतो परंतु काहीच फरक पडत नाही..रात्री राजकुमार झोपला असताना सेनापती पुन्हा त्याच्या दा लना कडे जातो...सकाळी एक दासी पहाते की सेनापती राजकुमाराच्या दाल ना पुढे मरून पडला आहे ..ती घाबरून ओरडू लागते ..सर्व जण गोळा होतात..ध्रुवल मात्र गाढ झोपलेला असतो..राजा चौकशी करतो तेव्हा सेनापतीच्या पायाला साप चावल्याच समजते ..तो पूर्ण राजवाड्यात सापाचा शोध घ्यायला सांगतो पणं साप कुठेच सापडत नाही.
ध्रुवल दिवस भर पोट दुखी ने त्रस्त असायचा पण रात्री मात्र गाढ झोपायचा..दूर दूर वरून वैद्य येऊन त्याचं उपचार करू लागले पणं कोणालाच त्याच्या दुखण्याचे निदान लागेना.. एकी कडे ..ध्रुवल ची पोट दुखी आणि दुसरी कडे..रोज रात्री कोणा ना कोणाचा जाणारा जीव ...आर्य वीर खूप चिंतित होता...राज्यातली शांती भंग झाली होती..राजवाड्यात यायला आता सर्व जण घाबरु लागले होते..देविका ही खूप चिंतित होती ..ध्रुवल ची वाढणारी पोट दुखी पाहून ती खूप रडत असे...एकदा ती राज्यातल्या महादेवाच्या मंदिरात ध्रुवल घेऊन दर्शनाला गेली तेव्हा तिथल्या पुजाऱ्याने .. डोंग रा पलीकडे गुहेत राहणाऱ्या एका साधू बद्दल तिला सांगितले व ते तिची मदत करतील ..ध्रुवल ला त्यांच्या कडे घेऊन जाण्याचा सल्ला पुजाऱ्याने देविका ला दिला.
देविका ने आर्य वीर ला सांगितले ..पहिल्यांदा तर तो तयार झाला नाही पणं देविका ने त्याला समजावले तेव्हा ..आर्य वीर ,देविका व ध्रुवल एका रथात बसून साधू च्या गुहेकडे निघाले...साधू जवळ पोहचल्या वर सर्वांनी साधू ला नमस्कार केला..देविका ने साधू ला विनंती केली ..ध्रुवल ला ठीक करण्याची..साधू महाराज अनेक विद्या न मध्ये पारंगत होते..अलौकिक शक्ती होती त्यांच्या कडे ..बरेच वर्ष तपशच्र्या केली होती त्यांनी..साधू नी त्यांना त्या रात्री तिथेच थांबण्या स सांगितले ..रात्र झाली तेव्हा सर्व जण झोपी गेले ..पणं ध्रुवल ला झोप वून..सर्व जण गुहेच्या एका बाजूला लपून बसले...थोड्या वेळ वाट पाहण्यात गेला की ..ध्रुवल च्या पोटातून एक साप बाहेर आला ..तशी देविका ,आर्य वीर सर्व जण खूप घाबरुन गेले..साधू ने त्यांना शांत राहायला सांगितले.. साप तोंडातून बाहेर येऊन इकडे तिकडे फिरू लागला..देवाच्या मूर्ती जवळ आलेले दूध त्याने पिऊन टाकले .. व तो पुन्हा ध्रुवल च्या तोंड वाटे त्याच्या पोटात गेला..देविका ते पाहून रडू लागली..आर्य वीर ही खूप चिंतित झाला..साधू ने त्यांना एक उपाय सांगितला..दुसरा दिवस ही ते साधू च्या गुहेत च राहिले ..ध्रुवल झोपला तसे त्याच्या पासून थोड्या अंतरावर देविका ने दूध भरून छोटी छोटी मडकी ठेवली... व ती ही गुहेच्या एका बाजूला जाऊन लपून बसली.. साप पुन्हा पोटातून बाहेर आला .. वळ वळ करत त्या दुधाच्या मडक्यात त्याने आपले तोंड घातले तसे आर्य वीर ने आपल्या तलवारीने त्या सापाचे दोन तुकडे केले..तसा साप म रून पडला...आर्य वीर व देविका ने साधू ला साप ध्रुवल च्या पोटात कसा गेला असेल विचारले ..तेव्हा साधू ने आपल्या दिव्य दृष्टी ने पाहून त्यांना सांगितले की सेनापती ने तो साप ध्रुवल च्या दालनात सोडला पणं तो साप पाण्याच्या भांड्यात जाऊन बसला..गडबडीने ध्रुवल ने रात्री ते पाणी न पाहतच पिले त्यामुळे त्या पाण्याबरोबर त्याच्या पोटात गेला..सेनापतीने दुसऱ्याचा वाई ट विचार करून केलेलं कृत्य त्याच्या वरच उलटले ..सापाचा पाहिलं दंश सेनापतीला च झाला..देविका ,आर्य वीर व ध्रुवल साधू महाराजांचा आशीर्वाद घेऊन पुन्हा आपल्या राज्यात परत आले..ध्रुवल ची पोट दुखी कायम ची बंद झाली ..तो पूर्वी सारखा सर्वत्र बागडू लागला.. हळू हळू प्रजेला वाटणारी राजवाड्याची भीती नाहीशी झाली..राज्यात पुन्हा ..शांती निर्माण झाली.

समाप्त