The Light - Murder and the New World in Marathi Crime Stories by Utkarsh Duryodhan books and stories PDF | प्रकाशज्योत - मर्डर आणि नवीन विश्व

Featured Books
  • રેડ સુરત - 6

    વનિતા વિશ્રામ   “રાજકોટનો મેળો” એવા ટાઇટલ સાથે મોટું હોર્ડીં...

  • નારદ પુરાણ - ભાગ 61

    સનત્કુમાર બોલ્યા, “પ્રણવ (ૐ), હૃદય (નમ: ) વિષ્ણુ શબ્દ તથા સુ...

  • લગ્ન ને હું!

    'મમ્મી હું કોઈની સાથે પણ લગ્ન કરવાના મૂડમાં નથી, મેં નક્...

  • સોલમેટસ - 10

    આરવને પોલીસ સ્ટેશન જવા માટે ફોન આવે છે. બધા વિચારો ખંખેરી અન...

  • It's a Boy

    સખત રડવાનાં અવાજ સાથે આંખ ખુલી.અરે! આ તો મારો જ રડવા નો અવાજ...

Categories
Share

प्रकाशज्योत - मर्डर आणि नवीन विश्व

Disclaimer-

सदर कथा पूर्णपणे स्वलिखित असून, कथेवर पूर्णपणे लेखकाचा हक्क आहे. तरी चुकूनही पुढील कथेची चोरी करण्याचा अथवा नक्कल किंवा प्रत काढून, ह्या कथेची ह्याच अँपवर किंवा दुसऱ्या कुठल्याही अँपवर प्रकाशित करू नये, जर असे आढळल्यास, आपण कारवाईस पात्र ठरेल...

पूर्ण कथा काल्पनिक असून, प्रत्येक पात्र, वस्तू, प्राणी, जागा, पूर्णपणे कल्पनिकरित्या घेतल्या गेलेले आहे. ह्या कथेतून कुणाच्याही भावना दुखविण्याचे ह्यामागचे हेतू मुळीच नाही.

कथा पूर्णपणे काल्पनिक असल्याने, कुणाला कथा आवडणार नाही, कुणाला ह्यामगचा तात्पर्य समजणार नाही किंवा कथेचा भाग समजणार नाही, जर असे असल्यास, कॅमेन्टमध्ये मला सुचवू शकता, पण पूर्ण कथा वाचून झाल्याशिवाय नाही. कुणाला माझी भाषा आवडणार नाही, कुणाला शुद्ध वाटणार नाही, तरी फक्त कथेचा मूळ विषयाकडे लक्ष द्यावे हीच विनंती, पुढे येणाऱ्या कथा, मागील कथेपेक्षा जास्त शुद्धतेत लिहिण्याचा नेहमी प्रयत्न राहील. माझी भाषा पूर्णतः शुद्ध नाहीच आहे, तरी मी प्रयत्न करणार, शुद्ध लिहिण्याचा.

पूर्ण कथा, स्वतःच्या इच्छेनुसार आणि वेळ देऊन वाचत असाल, तर जरा खबरदारी घ्या, कदाचित कथा आवडणारही नाही. तेही तुम्ही कॅमेन्ट मध्ये सुचवू शकता, जर कथा काहीशी आवडली, तरी तुम्ही माझ्या दुसऱ्या कथा नक्की वाचा,...

जर पूर्ण कथा वाचून झाल्यावर, असे वाटत असेल की पूर्ण वेळ वाया गेलाय, तर मला माफ करा.., पण माझ्या पूर्ण कथा इमॅजिनेशन वर बेस असतात, खऱ्या आयुष्यावर नाही. हीच खबरदारी घ्यावी,

धन्यवाद...





सुरुवात...
प्रकाश देठे, अत्यंत प्रामाणिक, शिस्तप्रिय आणि प्रेमळ मुलगा. ज्याचे शिक्षण सध्या पुण्याला सुरू आहे. तो B.B.A. च्या दुसऱ्या वर्षाला आहे. लहानपणापासून अत्यंत हुशार असल्याने आणि वाचायची ओढ असलेल्या प्रकाशला आपल्या शिक्षणामध्ये जराही अडचण येत नाही. ही गोष्ट नोंद करण्यासारखी आहे की, तो वयाच्या दहाव्या वर्षांपासून वेगवेगळी पुस्तके वाचत येत आहे आणि प्रत्येक वाचलेल्या पुस्तकांना तो आपल्या खोलीत संग्रहित करून ठेवतो. पण आता अशी स्थिती झालेली आहे की त्याला आपली खोलीच बदलावी लागली, कारण त्याचे एवढे पुस्तक वाचून झाले आहेत की, पूर्ण त्याची खोली पुस्तकाने गच्च भरलेली आहे. असे असतानादेखील तो त्या वाचलेल्या पुस्तकांना कधीही फेकत नसतो, विकत नसतो वा कुणाला हातही लावू देत नसतो. तो इथेच थांबला नाही आहे, तो अजूनही वेगवेगळी पुस्तके वाचतच असतो, अभ्यासाव्यतिरिक्त. त्याची फक्त एकच कमजोरी होती, ती म्हणजे त्याला टेक्नॉंलॉजीचे जराही कळत न्हवते, जराही नाही. त्याच्याजवळ मोबाईलही साधा आहे, किप्याडचा. जास्त समजत नसल्याने तो सोशल मीडियावर जराही ऍक्टिव्ह नाही. असे नाही की तो टेक्नॉलॉजीचे ज्ञान शिकू इच्छित न्हवता, पण त्याला त्यातलं काहीही कळत न्हवते, अक्षरशः तो शून्य होता, टेक्नॉलॉजीच्या बाबतीत. त्याच्या घरीही लॅपटॉप नाही, फक्त एक डेस्कटॉप कॉम्पुटर, ज्यावर तो कधीकाळी गेम खेळतो, किंवा मुव्ही बघत बसतो.
त्याची बोलण्याची शैली अत्यंत प्रभावशाली आहे. तो काहीही बोलायच्या आधी अगदी दोन सेकंदमध्ये विचार करून घेतो की, जर असे बोलले तर हे होईल किंवा ते होईल. त्याच्या ह्या सवयीने त्याच्या बोलताना कधीच चूका होत नसत. सोबतच त्याची मधुर वाणी मोहात पाडणारीच. सर्वांची मदत करण्याची त्यांची शैलीमुळे, वर्गातील सर्वच मुले त्याच्याशी मैत्री तर केलीच आहे, पण प्रकाश फक्त आपल्यासोबत रहावा, फक्त आपलाच मित्र बनवा म्हणून त्याच्या वर्गातील मुले आटापिटा करत असतात. प्रकाश सोबत राहण्याचे खूप फायदे आहेत, एक तर तो खुप हुशार आहे, तो मदत करायला ही मागेपुढे बघत नाही. तो सोबत असला की पैश्याची कधीच कमतरता भासत नाही, कारण प्रकाश पैश्याची मदत करायला जराही मागेपुढे बघत नाही. पण प्रॉब्लम असा की, प्रकाशला जास्त मुलांची संगत नकोय, कारण जर तो मित्रांतच राहिला तर, त्याचा खूप वेळ वाया जाईल, त्याला तो वेळ पुस्तके वाचण्यात घालावयास आवडेल किंवा त्याच्या गर्लफ्रेंड सोबत राहायला.
त्याची गर्लफ्रेंड राखी देवतळे. दिसायला गोरी पान, टोकदार शरीर, डौलदार केस, अत्यंत भारावून टाकणारी. तिच्या मागे खूप मुलांची रांग, त्यात प्रकाशही. पण खास प्रकाशला पसंत करण्याची खूप कारणं होती. सर्वात महत्वाचं कारण त्याचा भोळा स्वभाव आणि प्रामाणिकता. दोघांची जोडीही प्रभावी दिसत होती. दोघांचं रिलेशनशिप तीन वर्षांच होतं. दोघांत एवढा स्ट्रॉंग बॉण्ड बनलेलं होतं की, दोघांनाही एकमेकांची प्रत्येक लहानसहान गोष्ट सुद्धा माहीत होते.
प्रकाशच्या घरी त्याचे वडील जे चांगलेच बिजनेस मॅन आहेत, त्याची सावत्र आई आणि त्या सावत्र आईची मुलगी, म्हणजे त्याची सावत्र बहीण मोना. प्रकाशचे वडील तर आपल्या दोन्ही मुलांवर समान प्रेम करतात, पण प्रकाशची सावत्र आई, फक्त आपल्या मुलीवरच प्रेम करते, शेवटी सावत्रच ना ती! प्रकाशची आई तो जन्माला येतात मरण पावली होती. प्रकाशला आईची कमी भासू नये म्हणून त्याच्या वडिलांनी दुसरे लग्न केले, त्यांना वाटलं त्याची सावत्र आई, त्याच्या खऱ्या आई एवढे प्रेम नाही पण काही प्रमाणात करेल, जेणेकरून त्याला आईची जास्त उणीव भासणार नाही. सुरुवातीला काही प्रमाणात मिळाले त्याला सावत्र आईकडून प्रेम, पण त्या सावत्र आईला ही स्वतःचे मूल हवे होते. प्रकाशच्या वडिलांना चांगलेच ठाऊक होते की, जर त्यांना मूल झाले तर, प्रकाशला आईचं प्रेम मिळणं मुश्किलच! पण प्रकाश च्या सावत्र आईने त्याच्या वडिलांना समजावलं की, ती दोघांवरही सारख प्रेम करेल. तिच्या आग्रहापोटी लग्न केल्यानंतर काही दिवसाने त्यांना एक मुलगी झाली. मुलगी होताच, त्याच्या आईचे आपल्या मुलीप्रति प्रेम जास्त दिसू लागले, प्रकाशवरचे प्रेम हळूहळू कमी झाले. खूप वेळेस प्रकाशच्या वडिलांनी तिने दिलेले वचन म्हणजे दोघांनाही समान प्रेम करेल, हे कित्येकदा आठवण करून दिले, पण ती आपल्या मुलीप्रतिच जास्त झुकत होती, ती नेहमीच म्हणत होती की, मुलगी काय काही वर्षानंतर आपले घर सोडून निघून जाणार, तोपर्यंत तर तिला चांगले प्रेम मिळाले पाहिजे ना, असे म्हणून प्रकाशच्या वडिलांची बोलती बंद करून द्यायची.
आईचे खूप जास्त लाड आणि प्रेम मिळाल्याने प्रकाशची बहीण मोना खूप बिघडली होती. ती नुसते पैसे उडवत होती. मित्रांसोबत रात्रभर पार्ट्या करत होती, दारू पित होती, कधीकधी ड्रग्सही घेत होती, तिचं अफेअर पण चालू होतं, तेही एका गुंडासोबत. आपली कार वेगात चालविणे, लोकांना त्रास देणे, कुणाचीही कदर न करणे, हेच तिचे जीवन. अभ्यास आणि कॉलेज तर केव्हाच सोडलं. हे सर्व ती घरच्यांपासून लपवून ठेवण्याचा प्रयत्न करत येत होती, पण तिचे प्रयत्न सफल ठरत न्हवते, म्हणजे घरी सर्वांनाच तिच्या करनाम्याची खबर होती. जर तिला काही कुणी बोलले तर, तिचा बचाव करण्यासाठी तिची आई मध्ये येत होती. म्हणून मोना पूर्णपणे बिनधास्त एन्जॉय करत असे.
प्रकाशचे वडील बिजनेस मॅन असल्याने, त्याच्यावर जास्त लक्ष ते देऊ शकत न्हवते. घरी त्याची आई व बहीण त्याला आपलं समजत न्हवते, नेहमी तिरस्कार करत असत, म्हणून तो आपल्या खोलीत राहून पुस्तक वाचत असे किंवा राखी म्हणजे त्याच्या गर्लफ्रेंड सोबत वावरत असे. त्याला रखीवर खूप विश्वास होता, खरंतर त्याचे खूप प्रेम होते तिच्यावर, कारण त्याच्या आयुष्यात फक्त तीच एक होती जिच्यावर तो पूर्णपणे आणि डोळे झाकून विश्वास करू शकत होता. पण जेव्हकधी राखी बिजी राहत असे, तेव्हा तो आपल्या खास मित्र योगेश सोबत आपला वेळ घालवत असे.
दोघांची मैत्री लहानपापासून ते सध्या दोघेही शिक्षण एकाच पदवीसाठी आणि एकच वर्गात घेत आहेत. दोघांचे स्वभाव मिळतेजुळते असल्याने आणि विश्वास असल्याने त्यांची मैत्री खूप घट्ट झालेली होती. सायंकाळच्या फावल्या वेळात, त्याला आपल्या घरी बोलवून व्हिडीओ गेम खेळत असे किंवा मुव्ही बघत असे. कधी कधी तर योगेश त्याच्याच घरी झोपून जात असे. मग दुसऱ्या दिवशी सकाळी कॉलेजला मिळून जात असे. पण काही दिवसांपासून दोघांत खूप वाद झाले होते. दोघांचे वाद जराशा लहानश्या गोष्टीतून वाढले होते. खरंतर ती लहानशी गोष्ट फक्त एक कारण होतं, पेट्रोलला ठिणगी देण्याचं. पण दोघांचेही मत खूप डिव्हाईड होऊन बदलली आणि एक दुसऱ्याहुन वेगळी झालीत. समजत न्हवते की, कुणाचं चुकत आहे, पण वाद मात्र वाढत चालले होते.
काही दिवसानंतर प्रकाशला कळले की, योगेश सोबतचे वाद आता थांबायला हवे, कारण त्याच्या जीवनात योगेशच एकमात्र विश्वासाचा मित्र आहे, म्हणून आपले वाद मिटविण्यासाठी तो स्वतःवर पूर्ण आरोप घेण्यास तैयार होता, पण योगेशला आता प्रकाश सोबत राहायचे न्हवतेच. त्याला त्यांच्या मैत्रीला इथेच थांवायचे होते. प्रकाश खूप वेळेस योगेशची समजूत काढायचा प्रयत्न करत होता, पण योगेश मात्र त्याचे एकही ऐकायला तैयार न्हवता, तो आता आपल्या करिअरवर आणि अभ्यासावर फोकस करू इच्छित होता. आता एवढे समजावून सांगून सुद्धा, तो आपले एकही ऐकण्यास तयार नाही म्हटल्यावर त्यानेही नाईलाजाने त्याचा रस्ता मोकळा केला. आता त्याच्या जीवनात हक्काचं आणि प्रेमच एकच नात उरलं होतं, ते म्हणजे त्याचे रिलेशनशिप राखी! त्याला सांभाळायला त्याचे वडील होतेच, पण त्यांना आपल्या बिजनेसवर जास्त फोकस करावा लागत असल्याने, ते प्रकाशसाठी जास्त वेळ काढू शकत न्हवते. म्हणून त्याला आता कुठल्याही परिस्थितीत राखीसोबतच नातं टिकवून ठेवावं लागणार होतं.
तरीही पुढची दक्षता घेता, त्याने नवीन मित्र बनविण्याचा प्रयत्नात होता, पण त्याला विश्वासाचे मित्र मिळतच न्हवते. फक्त काम चालवू मित्र मिळायचे, काही तर फक्त पैसे खाऊ मित्र मिळू लागलेत. हे बघितल्यानंतर त्याला समजले की, राखी त्याच्या जीवनात किती मोलाची आहे.
प्रकाश योगेशसोबतच्या मैत्रीच्या वेगळ्या झाल्याने खूप एकटा पडला होता. योगेशसोबतचे प्रत्येक क्षण त्याला आठवू लागले होते. खास करून सायंकाळी त्याच्यासोबत तासंतास गेम खेळत बसने, मुव्ही बघत बसने किंवा रात्री उशिरापर्यंत गप्पात वेळ घालविणे त्याला खूप आठवू लागले. तो अक्षरशः राडण्यावर आला होता. तो पुन्हा प्रयत्न करू लागला की, चुकून तरी त्याचा फोन लागेल, किंवा आपला म्यासेज बघेल, ह्या आशेपोटी तो त्याला दिवसातून खूप वेळेस फोन करत होता आणि म्यासेजही टाकत होता. पण योगेशने स्पष्टपणे त्याला फोन करून सांगितले की, आता तो प्रकाशसोबत आपला वेळ घालवू शकणार नाही. आणि हे ही ठामपणे सांगितले की, त्याने प्रकाशसोबत, याआधी खूप वेळ वाया घालविला, आता पुढे पुन्हा वेळ न वाया घालविता, तो अभ्यासात आपले लक्ष लावणार आहे.
योगेशचे स्पष्टपणे सांगणे, प्रकाशला पटू लागले. प्रकाशला ही वाटू लागले की, त्याचा हा निर्णय योग्य आहे, आणि ही वेळही योग्य आहे असा निर्णय घेण्याची, कारण दोघांत वाद झाला आहे, आता वेगळे राहणे आणि आपल्या करिअर वर फोकस करणे मोलाचे ठरेल. असे असले तरी प्रकाशला कुठेतरी वाटत होते की, योगेशने आपला फायदा उचलला आहे. तो प्रत्येक क्षण आठवू लागला, जिथे योगेशचा त्याच्या जीवनात सहभाग होता. त्याला चांगलेच समजू लागले की, योगेश फक्त आपल्याकडून काम काढून आणि फक्त मज्जा करून तेही आपल्या पैशावर, आता तो सर्व विसरून आणि आपल्याला दूर करून अभ्यासाचा बहाणा देत आहे. खरंतर तो आता आपल्यापासून बोअर झाला आहे, असे प्रकाशला वाटू लागले.
प्रकाशनेही निश्चय केला की, तो ही आता झालं गेलं सारं विसरून जाऊन, उरलेल्या सेमिस्टरची आणि सोबतच UPSC ची ही तयारी करणार. त्याला हे चांगलेच ठाऊक होते की, तो आपले मन नक्कीच अभ्यासात लावून, झालेल्या सर्व गोष्टी विसरून जाऊ शकतो.
कॉलेज जास्त वेळ राहत नसल्याने, तो घरी येऊन आपला अभ्यास करत बसे किंवा आपले छंद जोपासणे, म्हणजे वेगवेगळी पुस्तके वाचन करत राही. पण एवढे करूनही दिवस काही संपेना. शेवटी मानवाचा स्वभाव ना? त्याला आजूबाजूला वावरायला आपली माणसं हवी, मानव आधीपासून समुदायात राहणारा माणूस, एकटा किती काळ राहील? असा विचार करून तो आणखीनच दुःखी होत होता. त्याला आपल्या माणसांची उणीव भासत होती. मुव्ही बघायला बसले की, मन लागत नसे, गेम खेळायला बसले की, लक्ष लागत नसे. मग त्याच्याकडे शेवटचा पर्याय दिसत होता. तो आपल्या प्रिय गर्लफ्रेंडला फोन करत असे. पण तीही ह्याच्यासोबत किती वेळ बोलणार. आणि ती पण फक्त त्याच्यासोबत फक्त बोलूच शकते, त्याच्या घरी येऊ शकत नाही.
पण योगेशसोबतचा वाद होण्यापूर्वीपासूनच राखी, प्रकाशला दुर्लक्ष करू लागली होती. राखी कामात व्यस्त असेल, असे समजून प्रकाश तिला प्रश्न करीत न्हवता, पण तीच इंग्नोरंस वाढत चाललंय, हे बघून प्रकाशने तिला समोरासमोर भेटून ह्यामागच्या कारणांची विचारणा केली. त्याला वाटू लागलं होतं की, तिचं आपल्यावरच प्रेम तर कमी होत नाही आहे ना? पण तिला जाब विचारले असता, त्याच्या हाती काहीही लागलं नाही. "मी तुला जास्त वेळ नाही देऊ शकत, मला दुसरेही काम आहे, पण प्रेम मात्र तुझ्यावरच आहे माझं" असं बोलून तिने आपली बाजू सांभाळून मजबूत करून घेतली.
ती ठामपणे आपले मत तर मांडले, पण खरं काय आहे, हे काही समजत न्हवते. त्याला कुठेतरी वाटू लागले की, तिला कुणीतरी दुसरा तर मिळाला नसेल ना? त्याच्यावर दुःखाचं संकट एकावर एक येऊ लागलं होतं. त्याचे मन अशांत झाले होते.
पण सुदैवाने, त्याला एक विश्वासू मित्र मिळालाच. तो त्याचा सिनिअर होता, पण वयाने त्याच्या एव्हढाच. तो ही त्याच्याच कॉलेज मध्ये होता, पण सद्यस्थितीत त्याच शेवटचं वर्ष. त्याच नाव होतं, मयांक. मयांकही प्रकाश सारखाच एकटा पडलेला आणि नुकताच त्याचा एक मुलीसोबत ब्रेकप झाला होता. त्याला ही स्वतःला सावरण्यासाठी एका सोबतीची गरज होती. त्याला ती प्रकाशच्या रुपात दिसू लागली.
दोघेही आपापल्या जीवनाचे दुःख एकमेकांपुढे मांडू लागले होते. पण मयांकचे दुःख अगदी काही वेळातच सांगून संपले, पण प्रकाशचे दुःख सांगून संपत न्हवते. दोघांनाही समजू लागले की, ह्या क्षणी एकमेकांची साथ किती मोलाची आहे.
ह्या वेळी मात्र प्रकाश जरा सावधगिरी बाळगू लागला होता. कारण त्याला वाटू लागले की, योगेशप्रमाणे मयांकही फक्त आपल्या पैश्याच्या मोहापायी मैत्री टिकवून ठेऊ नये, तर ही दोस्ती अगदी पावसाच्या पाण्याएवढी शुद्ध असायला हवी. म्हणून तो मयांकला आपल्या घरी कधी बोलावीत न्हवता. पण प्रकाशला समजले की, त्याचे वडीलही, आपल्या वाडीलांप्रमाणे एक चांगलेच बिजनेसमॅन आहेत म्हणून, म्हणजे त्याच्याकडेही पैश्याची कमतरता नसेल हे कळून चुकले. प्रकाशला वाटू लागले की, त्यांची ही मैत्री नक्कीच अतूट राहील.
एकदा प्रकाश बोलता बोलता, त्याच्या गर्लफ्रेंड, राखीचा विषय निघाला; की तो तिच्यावर किती प्रेम करतो, तिच्यासाठी काहीही करायला तैयार आहे. पण सध्या ती आपल्याकडे तेवढे लक्ष देत नाही आहे, हे ही मयांकला सांगितले. सुरुवातीला मयांक प्रकाशची ही दुखभरी कहाणी ऐकून, त्यालाही वाईट वाटू लागले. पण हळूहळू राखी बद्दल कळताच, त्याला समजले की, ही तीच राखी, जिच्या मागे तो सातेक वर्षांपासून लागून होता.
मयांकने सर्वात आधी पुष्टी करून घेतली की, ही तीच राखी आहे की नाही म्हणून. पण जशी माहिती प्रकाश तिच्याबद्दलची सांगू लागला, तसतसे त्याला समजू लागले की, ती राखी तीच होय.
मयांकने सांगितले की, ती राखी त्याच्याच घराजवळ असते. ती दिसायला खूप सुंदर असल्याने, तो ही तिच्या प्रेमात पडला होता, अगदी शाळेत असताना पासून. त्याने तेव्हाच निश्चय केले की, जर लग्न करायचे झाले तर फक्त राखीशीच करणार. पण सर्वात आधी तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढण्यासाठी तो कित्येक प्रयत्न करू लागला. पण कोणत्याही प्रयत्नात तो सफल होत न्हवता. ती राखी त्याला जराही भाव देत न्हवती. पण तरीही त्याने हार पत्करली नाही. पुढे जाऊन त्याने तिच्याबद्दलची पूर्ण माहिती काढली की, तिचे कुणाबरोबर आधीपासूनच प्रेमप्रकरण सुरू तर नाही आहे? तेव्हा त्याला कळले की, तिचे प्रेम एका त्यांच्याच एरियातल्या सचिन नावाच्या एका मुलासोबत अफेअर सुरू आहे. त्याने पुन्हा माहिती गोळा केली तर त्याला समजले की, तिचे सचिनसोबतचे प्रेम, त्याच्या एकतर्फी प्रेमाहूनही जुने आहे. त्याला समजले की, सचिन आणि राखी पुढे जाऊन लग्न करणार आहेत. हे ऐकताच प्रशांतला मयांकचा खूप राग आला की, तो राखीबद्दल असा कसा बोलू शकतो, पण मयांकने प्रशांतला सांगितले की, काही दिवसानंतर मयांकने तिला प्रपोज केले होते, पण पहिल्यांदा ती त्याला नाही म्हणाली, पण तिला त्याच्या वडिलांच्या बिजनेसबद्दल, आणि तो किती गर्भश्रीमंत आहे हे सांगितल्यावर तिने लगेच होकार दिला, तिला वाटलं की, ह्याला सचिनबद्दल काहीही ठाऊक नसेल आणि ती आपल्याला लुटून चालली जाईल, पण त्याला तिच्याबद्दल पूर्ण ठाऊक असल्याने तो थोडक्यात वाचला असे मयांकने प्रशांतला सांगितले. हे ऐकताच प्रकाशला खूप राग आला, आणि त्याने रागाच्या भरात मयांकच्या कानाखाली लावून दिली.
प्रकाशला हे सर्व खोटं वाटू लागलं होतं. त्याला जराही विश्वास बसत न्हवता मयांकच्या ह्या बोलण्यावर. मयांकला खूप राग आला होता प्रकाशचा, कारण त्याच्यावर कुणीतरी पहिल्यांदा हात उचलला होते. पण स्वतःची गोष्ट सिद्ध करण्यासाठी, मयांकने त्याच्या काही मित्रांना फोन करून राखीबद्दलची विचारणा केली. त्यांनाही राखीबद्दल माहीत होतं. पण तरीही प्रकाशचा विश्वास बसला नाही, मयांकवर. मग शेवटी कुठूनतरी मयांकने राखी आणि सचिनचे फोटोस त्याला दाखविले. त्यात काही फोटो अश्लील रुपात होते. हे बघून प्रकाशच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्याला राखीचा प्रचंड राग येऊ लागला होता. पण तरीही स्वतः ला सावरत, स्वतःलाच एक प्रश्न विचारला की, हे खरंच असेल काय? राखी असे खरंच आपल्यासोबत करत असेल काय? मयांक आपल्यासोबत खोटं बोलून एखादी डाव तर साधला नसेल ना? अशी वेगवेगळी प्रश्ने त्याच्या डोक्यात फिरू लागली. मयांकलाही समजले की, प्रकाशचे अजूनही त्याच्यावर विश्वास बसला नाही आहे. म्हणून तो स्वतःहून प्रकाशला म्हणू लागला की, राखीला लगेच फोन कर आणि सचिन बद्दल विचारणा कर, जर ती बोलताना अडकली, तर समजून जा की ती तीच राखी, जी राखी नसायला पाहिजे.
मयांकच्या बोलण्यावरून प्रकाशने राखीला फोन लावला, तिला विचारले की, सचिनला ओळखतेस काय? राखी सचिनचे नाव ऐकून, घाबरून गेली, ती फोनवर अडकत बोलली की, कोण सचिन, मी नाही ओळखत त्याला, तुला काहीतरी गैरसमज होत असेल.
तिच्या तोंडून हे ऐकताच, प्रकाशला समजले की, मयांक जे बोलत आहे, ते सारं खरं आहे. राखीला म्हणाला की, काही नाही गं, मी सचिन तेंडुलकरबद्दल बोलत होतो. हे ऐकताच तिने सुटकेचा श्वास घेतला.
मयांक जोरजोरात हसू लागला. एवढ्या दुःखाच्या क्षणी मयांकचे जोरजोरात हसणे प्रकाशला जराही आवडले नाही. त्याने विचारले की तो का एवढा हसत आहे ते, त्यावर तो म्हणाला की, त्याने त्याच्या मित्राकडून ऐकले होते की, राखी सचिन सोबत मौज करून, एका श्रीमंत मुलाला फसवून त्याच्याकडून लुटून आपण ऐश करत आहे. त्याला आता समजले की, ती कुणाकडून पैसे लुटत होती. तो प्रकाश होता, जो राखीची सर्व लाड पुरवत होता. हे बघून मयांक आणखीनच जोरजोरात हसू लागला. मयांक म्हणाला की, कुणी कितीही प्रेमात असला तरी एवढा मूर्ख कसा काय असू शकतो?
प्रशांतचे दुःख सांभाळायचे सोडून त्याच्यावर मयांक हसत होता, हे बघून त्याने मयांकला म्हटले की, आता आपली मैत्री इथेच संपत आहे. जो आपल्या मित्राच्या दुःखाच्या समयी साथ न देता उलट हसत असेल तर तो कसला मित्र? असे म्हणून प्रशांतने त्याच्यासोबचे मैत्रीचे नाते तोडले. पण ह्यावर मयांक म्हणाला, असा मूर्ख मित्र मलाही नकोच, जो एका मुलीपाई आपल्या मित्रावर हात उचलतो, आणि ती मुलगीची गर्लफ्रेंड बनण्याच्या पात्राची नसेल तर झालं मग... मला ही नको तुझी मैत्री असे बोलून मयांक तिथून चालला गेला.
प्रकाश आतून पूर्णतः होरपळून गेला. त्याच्या दुःखाला पारावार न्हवते. त्याला नागविले गेल्यासारखे, त्याचे शोषण केल्यासारखे वाटू लागले. जिच्यावर प्राण ओतून प्रेम केले, जिच्यावर एवढा जीव लावत होता, ती दुसर्यासोबत सुख उपभोगत आहे, तेही कित्येक वर्षांपासून. सोबतच तिने ह्याबाबत जराही भनक लागू दिली नाही. जिच्यासाठी तो आपला जीव देण्यासाठी तैयार होता, जीव ओवाळून टाकण्यासाठी तैयार होता, जिला बघून त्याचे आधीच असलेले दुःख उच्चाटन करून घेत होते, आज तिनेच सर्वात मोठा विश्वासघात केलाय, हे समजल्यावर त्याच्या जीवनात खूप मोठी पोकळी निर्माण झाल्यासारखे वाटते. तो ऑक्सबोक्शी रडू लागला. पण तो रस्त्यावर स्वतःला सावरू शकणार नाही म्हणून, तो आपल्या घरी येऊन आपल्या खोलीत स्वतः ला बंद करून घेतले.
प्रकाशचे असे रडलेल्या अवस्थेत येणे आणि जोरात दार आदडणे, हे सामान्य लक्षणं नाहीत, हे ठाऊक असून सुद्धा, आणि त्याची सावत्र आई व त्याची सावत्र बहीण बघून सुद्धा त्याला कसलीही विचारणा केली नाही, एवढेच काय, तर त्याला दुर्लक्षही केले आणि दोघेही पुन्हा आपल्या कामात व्यस्त झालेत. प्रकाशला हे चांगलेच समजले होते की, दोघांनी आपल्याला बघितले असताना सुद्धा त्यांनी आपली कसलीही विचारणा केली नाही. ह्यावरून त्याला चांगलेच समजले की, जरी आपण मेलो तरी ह्या दोघांना कसलाही फरक पडणार नाही, ह्याची जाणीव झाली. तसेही त्यांच्याकडून काही अपेक्षाही नाहीच, असे समजून, पुन्हा त्याला राखीसोबतचे क्षण आठवू लगले. त्याचे किती तिच्यावर जीव होते, आणि तिने असा डबल गेम खेळला, असे मनातच बोलून जोरजोराने रडू लागला. तो आतून पूर्णपणे तुटला होता. प्रेमावरच त्याचा विश्वास पूर्णपणे तुटला होता. तो एवढा जीव लावून तिच्यावर अंध प्रेम करत होता, पण त्याने कधीही चौकशी करायचा प्रयत्न का केला नाही? का त्याने तिच्याबद्दल जाणून घेण्याचा कधी प्रयत्न केला नाही? का तिच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला? असे मनालाच प्रश्न विचारून आपल्या हाताने स्वतःच्याच गालावर जोरजोराने मारू लागला. एकानंतर एक-एकानंतर एक मारल्यानंतर त्याचा गाल लालबुंद झाला, पण त्याने स्वतःला मारणे सोडले नाही.
तो खाली कोसळला. चेहरा पूर्ण लालबुंद होऊन, डोळ्यातून आणि नाकातून पाणी सतत वाहत होतं. त्याला स्वतः श्रीमंत असल्याचा खूप राग येऊ लागला होता. त्याला वाटू लागले की, जर त्याच्याजवळ जास्त पैसेच नसते, तो गर्भश्रीमंतच नसता, तर कदाचित ती आपल्यासोबत चिटिंग केली नसती. असे समजून तो पुन्हा पुन्हा दुःखी होऊ लागला.
त्याला आता कुणाचीतरी गरज होती, स्वतःचे दुःख कमी करायला. तो तसा नेहमी दुखीच राहत होता, पण चेहऱ्यावर स्मितहास्य नेहमीच असायचे, त्या हास्याच्या मागे आपले दुःख लपवत होता, पण आज जे त्याला दुःख झाले, आतापर्यंत झालेल्या सर्व दुःखाची बेरीज केली तरी कमी पडेल, त्याला जीवनात एवढे दुःख कधीच झाले न्हवते. तो हे दुःख सांगून, स्वतःला सावरण्यासाठी आपल्या सावत्र आई आणि बहिणीकडे ही जाऊ शकत न्हवता. त्यांना तसाही फरक पडणार नाही, हे ठाऊकच होते. त्याला ह्या क्षणी योगेशचे आठवण झाली, तो नेहमीच त्याला प्रत्येक दुःखातून मार्ग काढण्यासाठी मदत करत येत होता. आज त्याला योगेशची खरी उणीव भासू लागली. त्याने सर्व विसरून, योगेशला फोन लावला, ह्या आशेपोटी की, तो आपले दुःख ऐकून नक्कीच काहीतरी मदत करेल. पण योगेशला फोन लावण्याचा प्रयत्न केला तर, त्याचा फोन बिजीच दाखवीत होता. खूप वेळेस फोन लावल्यानंतरही त्याचा फोन लागला नाही. काही वेळानंतर समजले की, त्याने आपला नंबर ब्लॅक लिस्ट मध्ये टाकले असेल.
त्याला समजत न्हवते की, आता तो आपले दुःख घेऊन कुणाकडे जावे? त्याने पुन्हा विचार केला की, मयांकसोबत बोलून आपले मन हलके करावे, पण तेही शक्य न्हवते, कारण मयांक सोबत त्याने आत्ताच मैत्री तोडली होती. तो तेव्हाच सांभाळायचे सोडून आपल्यावर हसत होता, आता तो काय मदत करणार? असे समजल्यावर त्याला जाणीव होऊ लागली की, तो ह्या जगात किती एकटा आहे? त्याच्या ह्या जगातून जाण्याने कुणाचेही काहीही जाणार नाही. त्याने खूप प्रयत्न केले, दुःखाला जरा कमी करायचे, त्यासाठी त्याने त्याचे एक आवडते पुस्तक वाचायला घेतले, पण मन लागेना, मुव्हीही बघण्याचा प्रयत्न केला, पण तिथेही मन लागत न्हवते, मुव्ही कॉमेडी असून सुद्धा तो रडत होता. त्याने आपली कॅम्पटर स्क्रीनच फोडून टाकली. पूर्ण जग एका बाजूने आणि तो एकटा एका बाजूने असल्यागत त्याला वाटू लागले.
त्याला खूप राग येऊ लागला होता, स्वतःचा, त्याच्या परिस्थितीचा, त्याच्या जवळील सर्व सुख-चैनीच्या वस्तूंचा, आणि स्वतःच्या जन्माचा. त्याला हे दुःख सहन होऊ शकणार न्हवते. त्याने निश्चय केला की, आता आपले आयुष्य संपवायचे...
त्याने ह्या श्रुष्टीची प्रार्थना केली की, ह्यापुढे जन्म मिळत असेल तर, त्याला कुणीही बनवो, पण एवढं एकटं असणार आयुष्य नको, मग जरी त्याच्याजवळ काहीही नसले तरी चालेल, पण असे निर्जीव असल्यासारखे आयुष्य नको, अशी प्रार्थना करत, त्याने स्वतःला फासावर लावण्यासाठी, खिडकीच्या पडद्याला फासाचा आकार देऊन, पंख्याला बांधले. आपल्या सख्या आईची आठवण काढून, गळ्यात फास लावले आणि खालील टेबलला ढकलून दिले. तो तडफडू लागला. त्याचा हात सहज पंख्यापर्यंत पोहोचू शकतो, हे ठाऊक असूनसुद्धा तो स्वतःला वाचविण्याचा जराही प्रयत्न करत न्हवता. त्याने एकदा आपल्या स्मार्टवॉच वर नजर वळविली, जी हार्ट बिट कमी होत असल्याने, बीप-बीपचा आवाज करू लागली. एवढ्यातच त्याला वडीलांबद्दल आठविले. तो तरीही दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करीत होता, पण त्याच्या ह्या दुःखमयी जीवनात तेच एक असे व्यक्ती होते, जे नेहमी आपली बाजू मांडून सुख देत राहिले, त्यांना शेवटचे न बोलणे, हे त्यांच्यावर खूप मोठा अन्याय होईल, असे त्याला वाटू लागले. आणि शेवटच्या क्षणी त्याने आपले हात पंख्यावर पोहोचविले.
तो खाली उतरला. त्याच्या मानेवर खूप मोठी खूण झाली होती. गळ्याला चांगलीच दुखापत झाल्यामुळे, तो खोकत होता. त्याला बोलताही येत न्हवते, तरी त्याने शेवटचे वडिलांसोबत बोलायचे म्हणून त्याने वडिलांना फोन लावला.
त्याचे वडील, बिजनेसच्या संदर्भात दुबईला गेले होते. ते मिटिंगमध्ये असतानासुद्धा त्यांनी प्रकाशचा फोन उचलला. प्रकाशचा फाटलेला आवाज ऐकून, त्यांनी ते मिटिंग सोडून बोलायला बाहेर आलेत. प्रकाशने रडत, भेंगरलेल्या आवाजात, दम टाकत पूर्ण कैफियत वडिलांपुढे मांडली. पण त्यांना हे सांगितले नाही की तो आता आत्महत्या करणार आहे. जर त्यांना सुसाईट बद्दल सांगितले तर, त्यांना खूप मोठा धक्का बसणार, म्हणून त्याने फक्त घडलेला पूर्ण प्रकार त्यांना सांगितला.
राखीची कधीकाळी घरी ये जा असल्याने प्रकाशच्या वडिलांनी तिला बघितले होते. तिच्या बोलण्यावरून आणि त्याच्या स्वभावावरून त्यांना जराही वाटत न्हवते की, ती अशी देखील करू शकते म्हणून. पण तरीही त्यांनी प्रकाशला सावरले आणि सांगितले की, "दुःख हे जीवनाचा अविभाज्य घटक आहे. ज्याप्रमाणे नदी सरळ वाहून समुदात मिसळू शकत नाही, तर तिला वेळोवेळी वळण घ्यावेच लागते, अन्यथा ती समुद्र कसा गाठेल. त्याचप्रमाणे नदी म्हणजे जीवन, वळण म्हणजे दुःख आणि समुद्र म्हणजे सुख/निर्वाण/मोक्ष. मोक्षाची प्राप्ती करायची असल्यास ह्या सर्व वळणाना म्हणजेच दुःखाना पार करावंच लागतं. "
वडिलांच्या ह्या सल्ल्यावरून चांगलेच समजले की, तो जे काही करणार होता, ते चुकीचं होतं. त्याने ह्यावरून निश्चित केले की, आता तो आत्महत्या करणार नाही. आता तो तसाही आत्महत्या करणार नाही, म्हणून त्याने वडिलांना सांगून टाकले की, तो आत्महत्या करणार होता. हे ऐकून त्याच्या वडिलांना खूप दुःख झाले. ते म्हणाले, "तू कशाला असे ठोस पाऊल उचलण्याचा प्रयत्न करत आहेस? माझे काय होईल ह्याचा विचारही केला नाही. एका क्षुल्लक कारणावरून एवढा मोठा निर्णय? याची जराही अपेक्षा न्हवती तुझ्याकडून. आत्महत्या करून तू जीवन संपवू शकतोस, पण निर्वाण प्राप्ती करू शकत नाही, दुःख मुक्त जीवन सुटू शकत नाही, समाधानी मृत्यू मिळू शकत नाही, कारण हे मनाने केलेली आपल्या शरीराची हत्या होय! ह्याने मन तर शांत होईल, पण शरीर नक्कीच मनाला गुन्हेगार मानत बसेल. आणि तू पण कोणासाठी आपला जीव देत आहे, एका मुलींसाठी, जिने तुझ्यावर कधी प्रेम केले नाही, ती स्वतः तुझ्या पैश्याला लुटून, ती स्वतः मौज करत आहे, पूर्ण सुख घेत आहे, तिच्यासाठी? जर आत्महत्या केलास तर, ती पापमुक्त होईल आणि तू गुन्हेगार बनणार, तेही स्वतःचाच!"
वडिलांचे असे म्हणणे, त्याच्या काळजात रुतले, तो स्वतःलाच कोसू लागला. वडिलांना तात्पुरता विश्वास दिला की तो स्वतःहून आयुष्य कधीच संपविणार नाही, असे सांगून फोन कट केला. तिकडे वडिलांना जरा दिलासा मिळाला की आपल्या समजविण्याने आता आपला मुलगा असे टोकाचे पाऊल उचलणार नाही, असे समजून ते चिंतामुक्त झालेत.
प्रकाश बेडवर लोटला. तो विचार करू लागला की, वडिलांचे ते बोल, किती महत्वाचे आहेत. जिने आपल्याला दगा दिलाय, ती मस्त मौज करून घेत आहे आणि आपण इकडे एवढे दुःखी होऊन डिप्रेशनने आत्महत्या करायला जातो आहे, हे मुळीच स्वीकार्य नाही आहे. मरायला आपण नको, ती हवी, असे त्याला वाटू लागले. तिने आपला वेळ घालविला, पैसा तर लुटून टाकला, विश्वासघात केला, आपल्या स्वप्नांना तोडून मरोडून दगा दिला, एवढे सगळे करूनही तिला शिक्षा मिळाली नाही आणि आपण काहीही न करता, साधे भोळे राहून जग आपलाच फायदा उचलत आहेत, आपला उपयोग करून घेत आहेत, स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या सुखसोई साठी आणि त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा आपणच स्वतःवर घ्यायची काय? हे समजल्यावर तो उठून जागा झाला. त्याला समजले की, ह्या जगात जेवढे साधे, जेवढे प्रामाणिक राहिले, जेवढे निस्वार्थी राहिले, तेवढा लोक फायदा घेतात आणि गरज संपली की लाथ मारून सोडून देतात. साधेपणाचा हा कसला न्याय? असे स्वतःलाच बोलून दणाणून जागी झाला, त्याचे डोळे उघडले होते. त्याने निश्चय केले की, आता तो एवढा साधा सरळ मुळीच राहणार नाही, पण जिने आपल्याला एवढा मोठा डाव दिला, तिलाही सोडणार नाही, असे मनात निश्चित केले. त्याने तेव्हाच विचार केला की, राखीला ठार करायचे, तिच्या करनाम्याची शिक्षा तिलाच मिळाली पाहिजे, तेही शिक्षा फक्त तिच्या मृत्यूनेच मिळेल, असे बोलून त्याने निश्चय घेतला की, तो तिला ठार करणार. त्याला आता सूड हवा होता. पण त्याला समजत न्हवते की, तिला ठार कसे करायचे? कारण जर तिला ठार केले आणि पोलीस इन्वेस्टीगेशन झाली आणि चुकून एखादा पुरावा सापडला, तर पोलीस आपल्याला सोडणार नाहीत, हे चांगलेच ठाऊक होते. पण आपला सूड घेतल्याशिवाय चैन काही पडायची नाही, म्हणून त्याने निश्चय केले की, खूप मोठी प्लॅनिंग करून तिला ठार करायचे. पण त्याने याआधी कुणाला ठार काय, तर कुणासोबत खोटंही बोललेलं न्हवतं. पण त्याला आता आपले दुसरे आयुष्य मिळालेले आहे, असे समजून ह्या नव्या आयुष्यात, तिचा मर्डर हीच पहिली पायरी हे स्वतःला समजावून घेतले.
त्याने आपली एक नोटबुक घेतली, तिथे त्याने लिहायला सुरुवात केली. सर्वात मोठा प्रश्न, तिला ठार कुठे करायचे? तिच्या घरी, कॉलेज मध्ये की कुठे बाहेर? त्यानंतरच प्रश्न तिच्या प्रेतेला कुठे गायब करायचे, जेणेकरून तिचे शव कुणालाही दिसता कामा नये. हे सर्व होऊन जाईल, पण हे सर्व करताना आपल्याला कुणी बघू नये म्हणून कुठली सावधगिरी घ्यायची? सर्व झालंच सुरळीत, पण चुकून पोलिसांनी पकडले, तर शेवटपर्यंत आपण निरपराधी आहोत हे असे सिद्ध करायचे? त्यांनी खरं बोलताय की नाही हे चेक करण्यासाठी ती मशीन(lie detector machine) लावली तर स्वतःला कसे वाचवायचे? पुरावे कुठले पोलिसांना मिळतील? त्या पुराव्यांना कसे लपवायचे?... अशाप्रकारचे त्याने खूप प्रश्न आपल्या त्या डायरीमध्ये लिहून घेतले.
प्रकाशने चांगलीच प्लॅनिंग केली, जशी प्लॅनिंग प्रत्येक मर्डरर स्वतःला वाचविण्यासाठी करत असतो. पण त्याला ही प्लॅनिंग अगदी साधी वाटली. त्याला ह्या प्लॅनला बघून जोश येत न्हवता. त्याला आणखीनच एडवांस प्लॅन हवा होता. तो विचार करू लागला की, आपल्या प्लॅनला अत्याधुनिक कसे बनवायचे, जे परफेक्ट मर्डर ठरेल? तो दोन दिवस ह्याच विचारात बुडून होता.
तो विचार करू लागला की, लोक त्याला कसे संबोधतात? त्याला कसे बघतात? लोकांना आपल्याबद्दल काय ठाऊक आहे? अश्या प्रश्नांची त्याला उत्तरे ठाऊक होती. त्याला चांगलेच ठाऊक होते की, लोक त्याला खूप साधं-भोळा समजतात. त्याच्या जवळपासच्या खूप लोकांना ठाऊक आहे की, तो जेव्हा खोटं बोलतो, तेव्हा तो खाली मान टाकून, डोळे मिचकावत मान इकडे तिकडे हलवीत असतो, सोबतच पायही थरथर कापत असतात, शब्द उच्चारता येत नाही. हे फक्त खोटं बोलताना होत असते. ह्या लक्षणांवरून लोक समजून जात होते की तो खोटं बोलत आहे. पण त्याला चांगलेच कळले की, जर ह्या सवयीला ताब्यात आणले नाही तर, पुढे जाऊन खूप मोठा घोळ होईल. म्हणून त्याने सर्वात आधी खोटं बोलण्याची प्रॅक्टिस सुरू केली, तेही पुढच्या व्यक्तीच्या डोळ्यात डोळे टाकून आणि शब्दाचे स्पष्ट उच्चार काढून खोटं बोलण्याचा सराव करून बघितला. खूप जनांसोबत खोटं बोलून, खूप प्रॅक्टिस करून त्याला आता खोटं चांगल्या प्रकारे बोलता येत होतं, पण अजूनही खोटं बोलताना त्याचा पाय थरथर कापत होता. पण थोडी आणखी प्रॅक्टिस केल्यानंतर ते थरथर कापणेही बंद झाले. पण हे लोकांना कळता कामा नये की, तो खोटं बोलूनही त्याची लक्षणे दाखवीत नाही आहे, म्हणून तो एखाद्या विशिष्ट वाक्यावर त्याची लक्षणे दाखवू लागला, जी वाक्य खोटं नसून खरी होती. म्हणजे तो आता आपल्या त्या खोटं बोलताना होणाऱ्या लक्षणांवर नियंत्रण करू शकत होता आणि लोकांना आत्ताही वाटत होते की, तो फक्त खोटं बोलतानाच आपली लक्षणे दाखवितो.
ह्याच काळात, इंटरनेटच्या माध्यमातून आणि युट्युबच्या माध्यमातून पूर्ण कॉम्पुटरचे ज्ञान आत्मसात केले. लोकांना चांगलेच ठाऊक होते की याला टेक्नॉलॉजी बद्दल काहीही ठाऊक नाही, अशी लोकांची विचारधारा पुढे जाऊन कामी येणार आहे, हे मात्र प्रकाशला ठाऊक होते. सोबतच तिला ठार करण्यासाठी एक चांगल्या क्वालिटीची पिस्तूल आणि सायलेन्सर, जेणेकसून गोळी सुटल्यानंतर आवाज येऊ नये म्हणून, विकत घेतली. पण विकत घेताना, दुकानदाराला आगाऊ जास्त पैसे दिले, म्हणजे तो दुकानदार आता कुणालाही सांगणार नाही की, प्रकाशने त्याच्याकडून बंदूक घेतली म्हणून, कुठल्याही परिस्थितीत. कॉम्पुटरचे ज्ञान घेत असतानाच, बंदूक चालविणेही शिकून घेतले होते, जंगलात जाऊन.
आता पूर्ण प्लॅन रेडी झाला होता. त्याला आपला प्लॅन अंमलात आणायचा होता. पण ह्या प्लॅन सोबत प्लॅन B ही तैयार करायचा होता, जर चुकून पहिले प्लॅन सक्सेस झाले नाही, तर दुसरे प्लॅन तैयार राहील, वेळेवर. पूर्ण दोन्ही प्लॅन बनविल्याच्या दुसऱ्या रात्री आपले काम करायचे होते.
प्रकाश प्लॅननुसार, दुसऱ्या रात्री, ठीक बारा वाजता आपल्या घरून निघाला. घरून निघण्याआधी, त्याने एक महत्वाचे काम केले. तो आपल्या टेबलवर एक पुस्तक ठेऊन वाचण्याचे नाटक करू लागला, आणि तशातच हळूच कॉम्पुटरने आपल्या खोलीचे, घरातील हॉल मधले आणि घराबाहेरील गेटववरचे CCTV फ्रिज मोड वर करून घेतले. त्याने आधीच फिक्स केले होते की, तो आपले काम करून रात्री तीन वाजयच्या आत, घरी आपल्या खोलीत येऊन जाईल. खोलीत आल्यानंतर तो CCTV कॅमेराला पुन्हा सुरू करेल, तेही पुन्हा त्या टेबलावर पुस्तक वाचत आहे, ह्या अवस्थेत असताना. आणि दोन्ही फ्रेमला एडिट करून, फ्रिज झालेल्या वेळेत, म्हणजे घटनेच्या तीन तासांत जेव्हा प्रकाश घरी नसतो, त्या वेळी सुद्धा एडिटिंग केल्यावर असे भासेल की, प्रकाश आपल्या टेबलावर बसून रात्रीचे तीन वाजेपर्यंत वाचनच करत आहे. म्हणजे पुढे जाऊन पोलीस चौकशी झालीच तर हे CCTV फुटेजवरून तो स्वतःला सिद्ध करू शकतो. बाहेरच्या CCTV मध्येही थोडीफार एडिटिंग केल्यानंतर, असे भासणारच नाही की, प्रकाश रात्री बाहेर पळाला म्हणून. तो कार ने तिच्या घराकडे निघताना रस्त्यात त्याला खूप विचार येऊ लागले की, हे करणं बरोबर असेल काय? आपण खूप मोठी चूक तर करत नाही आहोत ना? एकदा तिच्यासोबत बोलावे काय? पण त्याला ठाऊक होते की, ही वेळ पुन्हा येणार नाही आणि त्याला समजलेच होते की, तिने खरंच विश्वासघात केलाय, कारण एवढ्या दिवसांत तिने एकदाही फोन केलेला नाही; जर ती खरंच आपल्यावर प्रेम करत असती तर एकदा तरी फोन केलाच असता तिने. आता थांबायला कुठलेही कारण नाही म्हणून तो आपल्या कारची गती आणखी वाढविली.
आपल्या कारने तिचे घर, जेमतेम पंधरा मिनिटांत गाठले. रात्रीचे सव्वा बारा वाजले होते. ती रात्री साडे अकराच्या सुमारास रोज झोपते, हे त्याला चांगलेच ठाऊक होते. त्याच्या कारचा जराही आवाज येत नसल्याने, ह्याचा चांगलाच फायदा झाला. पण त्याला चांगलेच ठाऊक होते की, तिच्या घरासमोरील चौकात रोडच्या मधोमध असलेल्या खांबावर एक सरकारी CCTV कॅमेरा आहे, आणि दुसरा आणि महत्वाचा CCTV कॅमेरा, तिच्या घराच्या परिसरात पर्सनल कॅमेरा आहे. रोडवरच्या कॅमेराबद्दल तो एक गोष्ट करू शकत होता, ती म्हणजे, तो आपल्या कारला तिच्या घरामागील गल्लीत पार्क करू शकत होता आणि तसाच मागूनच पाईपच्या साहाय्याने सरळ तिच्या ग्राउंड फ्लोर वरून फर्स्ट फ्लोर, म्हणजे लास्ट फ्लोरच्या खोलीच्या खिडकीवर जाऊन पोहोचू शकत होता. ती वरची तिचीच खोली होय. पण त्याला ठाऊक होते की, तिच्या खिडकीला लोखंडी ग्रील लावून आहे, तिथून तर आत जाऊ शकणार नाही, पण ती सध्या खरंच झोपलेली आहे की, नाही हे तर नक्कीच पाहता येईल आणि त्या खिडकीच्या साहाय्याने पुन्हा वर चढून टेरिस वर पोहोचू शकत होता.
त्याने आपल्या प्लॅननुसार तसेच केले. त्याने खिडकीतून बघितले, त्याला ती झोपलेल्या अवस्थेत दिसली. तो मग वर चढला, डायरेक्ट टेरेस वर. आपल्या हाताचे ठसे उमटू नये म्हणून तो स्पेशल ग्लॅव्हस लावले होते, हातापायाची नखेही पूर्ण कापली होती, सोबतच आधीच फुल शेव्ह करून, चेहरा क्लीन केला होता आणि आता डोक्यावर टोपी लावली होती. पायांत असे बूट लावले होते, ज्याची जराही ग्रीप नाही, म्हणजे चुकूनही नख, केस, हाताचे/ पायांचे ठसे असे कुठलेही पुरावे सुटून जाता कामा नये ह्याची खबरदारी घेतली होती.
तो टेरेस वर चढल्यानंतर, खाली उतरण्यासाठी सिड्यांचा वापर केला. खाली तर उतरला पण पूर्णपणे नाही, म्हणजे जर पायऱ्या सोडून, पुढे आले तर, दाराबाहेर असलेले CCTV नक्कीच कॅच करेल. आता सर्वात आधी ह्या कॅमेराचे काहीतरी करावे लागणार होते. आता त्याच्याकडे कुठलाही पर्याय दिसत न्हवता, म्हणून त्याने आपल्या बंदुकीतून निशाणा लावला, तो सरळ कॅमेरावर. पहिलीच बुलेट त्या कॅमेराला लागली. आता तो सरळ आत जाण्याचा प्रयत्न करू लागला, पण दार आतून बंद आहे, हे त्याला चांगलेच ठाऊक होते. जरा बाजूने असलेले किचनची खिडकीला खेचले, ती खिडकी नेहमीच खुलेली असते हे ठाऊक होतेच. पण तिथेही लोखंडी ग्रील असल्याने आत जाता येत न्हवते. पण त्याने आपल्यासोबत स्क्रू ड्रायव्हर मशीन आणली होती. पण ग्रीलची दिशा बाहेरील होती, ह्याचा फायदा झाला. त्या मशिणीने खिडकीला अट्याच असलेले ते स्क्रू काढून टाकले आणि ती लोखंडी ग्रील निघाली. तिथून त्याने आत प्रवेश केला.
तो आत जाताच, सरळ तिच्या खोलीत गेला. तिथे जाताच, आपली पिस्तूल काढली, सर्व सेट आहे की नाही हे चेक केले आणि निशाणा साधला, सरळ तिच्या डोक्याचा आणि गोळी सुटली. पहिलाच निशाणा बरोबर लागला आणि डोक्यातून रक्त बाहेर पडू लागले. ती ठार झाली आहे, हे समजताच, त्याने तिच्या डोक्यावर, सोबत आणलेली पट्टी लावली, म्हणजे पुन्हा रक्त बाहेर पडता कामा नये आणि कुठलाही पुरावा मिळता कामा नये. आता बाहेर पडायची वेळ.
त्याने त्याच स्क्रू ड्रायव्हर मशीनच्या मदतीने, खिडकीच्या आतून असलेले स्क्रू काढले, आणि ती लोखंडी ग्रील काढली. अगदी खालीच त्याची कार होती. त्याने आपल्या कारच्या 'की' ने, कारचे रुफ खोलले, म्हणजे आता वरूनही कारच्या आत काय आहे हे बघता येत होते. त्याने राखीच्या शवाला उचलले आणि त्या खिडकीच्या माध्यमातून तिला खाली फेकले. वरून फेकल्यामुळे आवाज तर झाला, पण जास्त नाही, कारण ती सीटवर पडली होती आणि कारची सीट जरा नरम असल्याने आवाज एव्हढाही आला नाही की, कुणाला झोपेतून उठवू शकेल. ती सरळ त्याच्या कार मध्ये जाऊन पडली. तो ही खिडकीतून, त्या पाईपच्या साहाय्याने खाली उतरला. गाडीचे रुफ बंद केले, तो कार मध्ये बसला आणि शवाला घेऊन तिथून निघाला.
प्रकाशसोबत प्रेत असलेल्या कारला तो खूप वेगाने पळवू लागला. त्याला शहराबाहेर जायचं होतं. पण तो मेन रोडने जाऊ शकत न्हवता. मेन रोडने गेल्यास, एकतर टोलनाका मध्ये कित्येकवेळा पडणार आणि जरी टोलनाक्यातून वाचले तरी, रस्त्याच्या काही अंतरावरच असलेले CCTV कॅमेरे टप्याटप्याने लावून आहेत, तर त्यांच्यापासून वाचून सुटणे मुश्किलच. पण प्रकाशने ह्याचाही चांगलाच प्लॅन बनविला होता. जसा मेन रोड लागेल, तसा तो गावाकडे जाणारा एक कच्चा रोड पकडणार. त्या कच्च्या रस्त्याने जंगलातून होऊन एका गावाजवळ जाणार, जिथे खूप शेती आहेत.
त्याचा पूर्ण प्लॅन तैयार होता. घड्याळीत रात्रीचे दीड वाजले होते. रस्ता पूर्णपणे सानसून होता. पण त्याला तो रस्ता जरा ही नवा वाटत न्हवता, कारण प्लॅन बनविल्यानंतर त्याने ह्या रस्त्याचा सराव करण्यासाठी, रस्त्याबद्दल पूर्ण जाणून घेण्यासाठी त्याने खूप वेळ ये जा केली, म्हणून त्याला ह्या कच्चा रस्त्याबद्दल खूप माहीत होते, त्याला हे ही ठाऊक होते की, किती वेळानंतर, किती दूर गेल्यानंतर मोड येईल आणि कुठे कुठे रस्त्यावर खड्डे आहेत, हे सुद्धा ठाऊक होते.
तो प्लॅननुसार एकाच्या शेतापुढे जाऊन पोहोचला. तेच त्याचे फायनल पॉईंट होते. तो गाडीतून उतरला, राखीच्या शवाला उचलून, शेतात शिरला. शेतात एकही वृक्ष न्हवते, मुळातच शेत पडीत होते. त्या शेताचे मालक, खूप म्हातारे झाले होते. सरकारच्या मदतीने त्यांनी आपल्या शेतात पाणी पुरवठा करण्यासाठी एक बोअरवेल लावण्यासाठी अर्ज केला होता, पण म्हातारपणे ते कालवश झाले. त्यांच्या निधनाच्या काही महिन्यांपूर्वी त्यांची पत्नी सुद्धा दिर्घ आजाराने मरण पावले होते. त्यांना एकही मुलं-बाळ नाहीत, जवळचे नातेवाईक नाही, ज्यांच्या नावाने ही शेतजमीन करता येईल असे कुणीही नाहीत. म्हणून ही लहानशी शेत पडीत होती.
प्रकाशच्या प्लॅननुसार, तो राखीच्या शरीराला घेऊन, त्या बोअरवेल जवळ पोहोचला. त्या बोअरवेलचा फक्त खड्डा खणलेले होते. त्यात पाईप वगैरे काहीही न्हवते. प्रकाशने राखीच्या शवाला त्या जवळपास पन्नास फुटाच्या बोअरवेलच्या खड्ड्यात टाकले. जशी ती खाली पडताच, सुरुवातीला काही दगडं, नंतर माती त्या खड्यात टाकू लागला. त्या पन्नास फुटाच्या खड्ड्याला चाळीस फूट एवढे केले, जेणेकरून पुढे जाऊन कुठलाही वास सुटता कामा नये, ही खबरदारी घेण्याकरिता. सर्व फिक्स झाले, हे समजल्यावर तो कुठे पुरावे तर सुटले नाहीत ना, हे बघण्यासाठी तो आत्तापर्यंत ज्या रस्त्याने राखीच्या शवाला उचलून आणले, त्या प्रत्येक पायदळ रस्त्याने शेवट वेळ बघून घेतले. सर्व फिक्स केल्यानंतर, तो परत आपल्या गाडीत आला, गाडीचे दार लावले, सुटकेचा श्वास घेतला. तो गाडीच्या काचेतून बोअरवेलकडे डोकावून बघितले. त्याचे डोळे पाणावले. तो आपल्या मनालाच म्हणाला, "एवढा वाईट कसा झालोय मी?" असा म्हणून तो ढसाढसा रडू लागला. पण काही वेळातच त्याने स्वतःला सावरले, गाडी पालटून तो परत आपल्या मार्गाने निघाला. रस्त्यातून येताना त्याला राखीसोबतचे प्रत्येक क्षण आठवत होते, जे त्याला आठवायचे न्हवतेच, पण त्याचे मन तेच ते दृश्य दाखवत होते.
तो अडीच वाजता आपल्या घरी परतला. त्याने आपली कार पार्क केली, आणि हळूच आपल्या खोलीत गेला. आत गेल्याबरोबर घरच्या CCTV कॅमेऱ्याची सेटिंग आपल्या प्लॅननुसार करून, आपल्या बेडवर पडला. मनात दुःख होते, डोळ्यात पाणी होते, दिमाखात आठवणी फिरत होत्या. रात्रीची तीन वाजली, तो झोपण्याचा प्रयत्न करू लागला पण त्याला झोप काही लागेना. पहिल्यांदा एवढा मोठा गुन्हा केला आहे, ज्याने कधी चोरीही केलेली न्हवती, पण आजचा प्रकाश पूर्णतः बदललेला आहे. आता तो स्वतःला पालटू शकत न्हवता. त्याने खूप मोठा गुन्हा केलाय, हेच त्याचे सत्य होते. पण गुन्ह्याला लपविणे खूप मोठी जबाबदारी होती. त्याने स्वतःलाच समजावीले की, "गुन्हा तोपर्यंत गुन्हा ठरणार नाही, जोपर्यंत मी तो कबुल करणार नाही, कोर्टात. म्हणजे आता फक्त पुराव्यांचा बंदोबस्त केले म्हणजे झालं."
तो स्वतःची कितीही समजूत काढली तरीही तो स्वतःला आतून गुन्हेगारच ठरवीत होता. त्याला वाटू लागले की, जर फक्त एकदा तिच्यासोबत बोलणे झाले असते तर ह्यावर काहीतरी तोडगा निघाला असता. पण जेव्हा स्वतःला संपविण्याच्या वेळी, ह्या तोडग्याची आठवण झाली नाही, तर आता आठवण करून काय उपयोग? जर आपण मेलो असतो, तर खरच तिला आपल्या एवढा पश्चाताप झाला असता काय? हाच प्रश्न तो स्वतःला वारंवार विचारत होता.
पहाटेची साडेचार वाजली आहेत. प्रकाशचे अश्रू काही थांबायला तैयार नाहीत. त्याला राखीचा खून केलाय, ह्या दुःखापेक्षा, आपल्या हातून खून झालाय, ह्याचे जास्त दुःख होते. त्याने पूर्ण तयारी केलेली असूनसुद्धा, त्याला खूप भीती वाटू लागली होती. त्याच्या मनात हाच विचार येत होता की, जर चुकून पोलिसांना आपल्याबद्दल कळलं, तर कदाचित जीवनभर कारागृहात राहावे लागणार. त्यापेक्षा आपण तेव्हाच मेलो असतो, तर आज, कमीतकमी ती तरी आनंदी असती. असे भलते-सलते विचार त्याच्या मनात येऊ लागले होते. त्याचे एका ठिकाणी मन लागतच न्हवते. तो जेव्हा आत्महत्या करायला जाणार होता, तेव्हासुद्धा मन एवढेच भारी झाले होते. पण त्याला आता मुळीच आत्महत्या करायची न्हवती. पण त्यावेळी जसे त्याच्या वडिलांनी सांभाळले, तर आता कोण आपली समजूत काढणार? हा प्रश्न त्याला पडला होता.
तो खूप जास्त डिप्रेस होऊ लागला. त्याला जराही चैन पडत न्हवती. त्याला तेव्हाच आठविले की, त्याच्या वडिलांच्या फ्रिज मध्ये काही दारूच्या बॉटल आहेत. तो कशाचाही विचार न करता तो वडिलांच्या खोलीत गेला. त्याने खूप वेळेस ऐकले होते की, दारू प्यायल्याने खूप प्रमाणात दुःख कमी होते. त्याला आता आजमवायचे होते. त्याने जीवनात कधी दारूला हात लावली न्हवती, आणि त्याला लावायचीही न्हवती, पण परिस्थितीच अशी होती की, त्याला प्यावी लागणार होती.
त्याने वडिलांच्या खोलीतील एक बाटली घेऊन, आपल्या खोलीत आणली. परत येताना मात्र त्याच्या सावत्र आईने दारूची बाटली घेऊन जाताना बघितले. तेव्हा तिने प्रकाशला कुठला प्रश्न केला नाही. तो आपल्या खोलीत आला. त्याला दारूची चव कशी असते हेही ठाऊक नाही आणि दारू कसे पितात ह्याबद्दलही काही जाणकारी नाही. पण पुढचं पुढं, असं म्हणून, बॉटलचे झाकण खोलले आणि सरळ बॉटलच तोंडाला लावून घट-घट पिऊ लागला. त्याचे लक्ष दारू पिण्यावर जराही न्हवते. त्याला आपल्या गुन्ह्याचा खूप पश्चाताप होत होता. घट-घट पिता पिता, काही वेळातच त्याच्या गळ्यात जडजड होऊ लागले. तो मग थांबला. दारूकडे बघितले असता, अर्धी बॉटल संपली होती. त्याचे डोके जरा फिरू लागले. हळूहळू दुःख कमी होऊ लागले, पण तो आपले चित्त आणि शुद्धी गमावू लागला होता. त्याने पुन्हा बॉटल तोंडाला लावली आणि पुन्हा पिऊ लागला. थोडीशी पिऊन झाल्यानंतर बॉटलला बाजूला ठेवले. बॉटलमध्ये अजूनही जराशी दारू उरलेली होती. आता त्याला खऱ्या अर्थात चढलेली होती.
त्याचा तोल गडबडू लागला, डोळे लाल आणि अर्धवट झाले होते, तोंडातून उच्चार स्पष्ट येत न्हवते. अगदी कोरी दारू प्यायल्याने पोटात जडजड वाटू लागले होते, त्याला तहान लागली होती. तो अश्याच अवस्थेत पाणी पिण्यासाठी बाहेर आला. बाहेर त्याची सावत्र आई सोफ्यावर बसलेली होती. प्रकाशने पाणी पिले आणि आपल्या खोलीकडे जाऊ लागला.
मध्येच प्रकाशच्या आईने टोकले आणि म्हणाली, "आजपर्यंत कधीच दारू प्यायल्यास नाही, मग आज असे का झाले की, दारू पिण्याची वेळ आली?"

"तुम्हाला काय करायचे आहे, तुम्ही आपले काम करा ना? आणि एवढ्या सकाळी माझ्यावर लक्ष ठेवायचे कारण?" ,प्रकाशने तुटलेल्या आवाजात प्रश्न केला.

"जरी मी तुझी सावत्र आई असली तरीही तू मला आई समजून आपले दुःख माझ्यापुढे मांडू शकतोस, मी तैयार आहे, तुझे दुःख ऐकायला..." प्रकाशाची आई त्याला म्हणाली...

"नको! असू द्या!! मी माझं मी म्यानेज करील!!!" प्रकाश हळू आवाजात म्हणाला.

"सांग रे! कशाला मला दुरावल्या सारखे वागवतोस? आता एकाच घरी आपण असतो म्हणजे आपुलकीची भावना असतेच ना मनात? आता तू माझं जराही ऐकणार नाहीस काय?" प्रकाशची आई म्हणाली.

खरंतर प्रकाशच्या सावत्र आईला, खरं काय हे जाणून घ्यायचं आहे. त्याच्या परिस्थितीनुसार ती आपला फायदा बघून निर्णय घेण्याचा विचारात होती. म्हणजे जर प्रकाश कुठल्या वाईट संगतीत गेला असेल तर, ती त्याची तक्रार वडिलांकडे करून, आपल्या मुलीचा बचाव करू इच्छित होती. जर कारण दुसरे असले तर त्यानुसार निर्णय घेणार होती, म्हणून तिला प्रकाश सोबत काय घडले, हे जाणून घेण्यासाठी एवढी उत्सुकता होत होती. प्रकाशला ही जरा जरा वाटू लागले होते की, जर हिला आपले दुःख सांगितले तर आपले दुःख आणखीनच कमी होईल, म्हणजे एकांतरीत प्रकाशला तिच्यावर विश्वास होऊ लागला होता. आणि तो दारू प्यायल्यामुळे त्याला पूर्ण शुद्ध न्हवतीच.

"तुम्ही खरंच, कुणालाच सांगणार नाही?" प्रकाश गांभीर्याने विचारले.

"एवढा तरी विश्वास ठेव माझ्यावर! अच्छा ठीक आहे, मी प्रॉमिस करते की, मी माझ्या मुलीला सुद्धा सांगणार नाही, आता तरी झाले? तुला ठाऊकच आहे की, मी केलेले प्रॉमिस कधीच मोडत नाही म्हणून! सांग आतातरी, आपलंसं करून!" प्रकाशाची आई म्हणाली.

प्रकाश इथेच फसला. त्याला वाटले की, घडलेला पूर्ण प्रकार तिला सांगून आपले दुःख कमी होईल, आणि कदाचित ह्या दुःखातून बाहेर पडण्याचा काही मार्ग तरी सांगेल, म्हणून त्याने तिला घडलेला आणि त्याने घडविलेला एकोनेक पूर्ण प्रकार तिला सांगितला.
प्रकाशने दारूच्या नशेत, आपल्या सावत्र आईला, आपण खून केले असल्याचे सांगितले, सोबतच तिला, प्रेत कुठे पुरविले ह्याबाबतही सांगितले. एवढेच काय तर त्याने CCTV च्या सेंटिंग बद्दल, तिच्या घरी कसे शिरून तिचा खात्मा केल्याबद्दल आणि पुरावे कशाप्रकारे मिटविल्याबद्दल, पूर्ण एकोनेक गोष्ट तिला सांगितले. त्याला दारूच्या नशेत विश्वास वाटत होतं की, ती कुणालाही सांगणार नाही आणि कदाचित ती त्याच्या विश्वासावर खरी उतरणार होती. पण आपला फायदा बघून.
त्याचे हे करतुत ऐकून ती स्तब्ध झाली. तिला जराही विश्वास बसला नाही की, तो असे ही काही करू शकतो. पण दारूच्या नशेत त्याने जे काही सांगितले, हे तर सत्य आहे, हे मात्र तिला कळून चुकले. पण एवढा साधा मुलगा, एका मुलीसाठी स्वतःचे आयुष्य संपवायला निघाला, पण नंतर स्वतःचे आयुष्य संपविण्याचे सोडून, सूड घेण्याच्या नावाखाली, तिचा डायरेक्ट मर्डर केला, तेही असा तसा मर्डर नाही, तर अगदी प्लॅनिंग करून, अगदी परफेक्ट मर्डर केला. ती विचार करू लागली की, जर ह्याने मला मर्डर बद्दल दारूच्या नशेत काही सांगीतले नसते, तर हे मर्डर, गुपितच राहिले असते, पुरावे मिळणे आत्ताही तसेच कठीण.
सोबतच तिला आठविला तिचा फायदा. ती प्रकाशाच्या परिस्थितीनुसार त्याचा फायदा उचलू इच्छित होती. पण आता तिला असा मुद्दा मिळाला आहे की, ती त्याला अक्षरशः स्वतःचा गुलाम बनवू शकते. तिला हे तर चांगलेच समजले की, जो मुलगा, आपले सूड घेण्यासाठी मर्डर करून येतो, पण त्याला स्वतःचे आयुष्यही तेवढेच प्रिय आहे, त्याने तेव्हाही आत्महत्या करून स्वतःला संपविले नाही आणि आता आपला बदला घेऊन आल्यानंतरही पोलिसांपासून, कारागृहात जाण्यापासून घाबरत आहे, त्यासाठी त्याने दारू ही पिलेली आहे. म्हणजे ह्यावरून समजते की, ह्या गुन्ह्याच्या शिक्षेसाठी तो किती घाबरत आहे. पण त्याच्या कारागृहात जाण्याची किल्ली आपल्या हातात आली आहे, हे तिला चांगलेच समजले.
तिने विचार पक्का केली की, आता प्रकाशकडून कुठलेही काम काढायचे, त्याला प्रत्येक काम करायला लावायचे, त्याला आपणच कॅट्रोल करायचे आणि त्याला ऑर्डर द्यायचे, कमांड द्यायचे, मुळात त्याला आपले गुलाम बनवायचे. जर त्याने असे केले नाही, तर त्याच्या गुन्ह्याची किल्ली, पोलिसांकडे सोपविण्याची धमकी द्यायची, म्हणजे तो घाबरून आपला गुलाम नक्कीच बनून जाईल. पण जर असे झाले नाही तर, शेवटी पोलिसांना सांगूनच टाकायचे त्याच्या करतुती बद्दल, ह्यात आपले काय जाईल? फायदा तर आपल्यालाच होत आहे ना? असे म्हणून तिने हे फिक्स केले. आता तिला आपले आणि आपल्या मुलीचे भविष्य खूप उज्वल दिसू लागले. कारण त्यांना आता नवीन गुलाम मिळाला आहे. पण ती, ही गोष्ट आपल्या मुलीला म्हणजे मोनाला मुळीच सांगणार न्हवती.
सकाळचे सहा वाजायला येत होते. प्रकाशची दारू अजून उतरलेली न्हवती, तो आपल्या खोलीत जाताच, आपल्या बेड वर पडला आणि गाढ झोपी गेला. तो एवढा झोपला की, डायरेक्ट रात्री आठ वाजता उठला, म्हणजे पूर्ण दिवस त्याने झोपेतच काढला. तो खूप दिवसापासून पूर्ण झोप घेऊ शकला न्हवता, पण दारू पिऊन असल्याने त्याला वेळेचे जराही भान राहिले नाही, पण झोप मात्र पुरेशी झाली.
रात्री आठ वाजता उठताच, त्याचे डोके खूप जड झाले होते, डोकं खूप भयंकर दुखत होते. पण तो तरीही उठून घड्याळीत बघितले, पण त्याला समजले नाही की, आता तो कसा उठला आहे? पण झोपला केव्हा होता, हेही त्याला आठवत न्हवते. पण फ्रेश होता होता त्याला आठविले की, त्याने कालच्या रात्री राखीचा मर्डर केला आहे आणि नंतर काही वेळाने हेही आठविले की, त्याला ह्याचे खूप दुःख झाले आणि म्हणून त्याने दारू प्यायली. त्याला समजले की ह्याच्यामुळेच तो एवढ्या वेळ झोपी गेला होता. पण त्याला घरी असलेल्या दोघांचाही, म्हणजे मायलेकींचा राग येऊ लागला, कारण त्यांनी आपल्याला आधी उठविले नाही. पण ह्यावरून त्याला आठविले की, दारू पिल्यानंतर त्याच्यासोबत काहीतरी झाले आहे, पण काय झाले, हे त्याला आठवत न्हवते. तो अर्ध्या तासात फ्रेश झाला आणि आपल्या खोलीच्या बाहेर आला.
तो रात्रीचे जेवण करायला डायनिंग टेबलवर बसला. नेहमी जेवण त्याची सावत्र आईच करत होती, फक्त त्याला स्वतःच्या हाताने घ्यावं लागत होतं. पण आज जेवण घ्यायला भांडे उघडून बघितले तर त्याला पूर्ण जेवण संपलेलं दिसलं. त्याने प्रश्न केला की, जेवण कुठे आहे? त्यावर त्याची आई म्हणाली, "आजचे जेवण संपले आहे, जर तुला जेवायचेच असेल तर, किचन मध्ये सर्व वस्तू उपलब्ध आहेत, जाऊन बनवून घे, जे लागेल ते!"

"नेहमी तर जेवण असते ना, आजच कसं संपलंऽऽ?", प्रकाश जरा रागातच म्हणाला.

"रागात येण्याचे काहीही कारण नाही, आज जेवण बनविण्याची प्रॅक्टिस कर, उद्यापासून रोज सायंकाळी तुलाच आपल्या तिघांचे जेवण बनवायचे आहे, म्हणून आजच पूर्ण ट्रेनिंग घेऊन घे." त्याची आई आनंदी होऊन म्हणाली...

"कायऽऽ? मी कशाला जेवण बनवू? तुमच्या हाताला वगैरे दुखापत झाली आहे कायऽऽऽ?" प्रकाश काळजीने विचारला.

"नाही दुखापत नाही, पण आजपासून मला सुखच सुख मिळणार आहे... चिंता करू नको, फक्त सायंकाळचे जेवण तू बनवीत जा, मी सकाळचं म्यानेज करून घेते, ठीक आहेऽऽ?" त्याची आई स्मित हास्य देत...


"पण काऽ? मी जेवण वगैरे का करणारऽऽ? तुम्ही असतानाऽऽऽ?" प्रकाश खूप रागात बोलला.

"आवाज खाली करून बोलायचे, आणि प्रश्न तर मुळीच करायचा नाही, समजलं नाऽऽ? जर उद्यापासून सायंकाळचे जेवण बनविलास नाही, किंवा माझ्यासोबत मोठ्या आवाजात वा रागात बोललास किंवा आजपासून माझे म्हणणे ऐकला नाहीस, तर तुझी रात्रीची कहाणी जगजाहीर करेल, मग तर तुला खूप लोकांसाठी जेवण बनवावं लागेल, हे चालेल कायऽऽ?" त्याची आई तिरक्या नजरेने त्याला म्हणाली...

प्रकाशला विचार आला की त्या रात्रीच्या, कोणत्या गोष्टीला लोकांपुढे आणण्याची गोष्ट ती करत आहे, आणि खूप लोकांना मला जेवण बनवायची धमकी देत आहे, हे त्याला समजत न्हवते. पण त्याला जरा संशय आला की, तिला आपल्या कांड बद्दल माहिती तर झाले नसेल ना? खूप लोकांचे जेवण बनविण्याची गोष्ट म्हणजे कारागृहात राहून लोकांसाठी जेवण बनवावे लागते, ह्याची उपमा तर देत नसेल ना? असे खूप प्रश्न त्याला पडू लागले. त्याचे आता चिंता होऊ लागली होती. पण त्याने कालपासून जेवण न केले असल्यामुळे, त्याला खूप जास्त भूक लागली होती. अश्या खाली पोटाला घेऊन किचन मध्ये जाऊन जेवण बनविणे कठीणच, म्हणून त्याने हॉटेलातून पार्सल ऑर्डर केला. काही वेळातच जेवणाचे पार्सल घरी आले. पण जेवण करण्यात त्याचे लक्ष लागतच न्हवते. डोक्यात तेच प्रश्न पडू लागले होते की, त्यांना आपल्या बद्दल खरंच माहीत झाले असेल काय? आणि माहीत झाले तरी कसे? हे प्रश्न त्याला सुखाने जेवण करू देत न्हवते.
तो कसाबसा जेवण करून आपल्या खोलीत गेला. तो विचार करू लागला की, त्यांना ठाऊक झालेच तरी कसे? त्यांची नजर तर न्हवती ना आपल्यावर? जर त्यांना खरंच माहीत झाले असेल आणि दुसऱ्या लोकांना ह्या घटनेबद्दल सांगितले असेल तर आपले काही खैर नाही, ह्या चिंत्यानेच त्याचे मन खदखद लवत होते. जर ही गोष्ट खरच त्यांना ठाऊक झाली असेल तर आपला पूर्ण प्लॅन फ्लॉप होईल, म्हणून तो एकोनेक गोष्ट आठवू लागला, की त्याने कुठे चूक तर केली नाही? पण त्याला चांगलेच समजले होते की, त्याने पूर्ण प्लॅन अगदी बारकाईने पार पाळले होते. मग चूक झाली कुठे? कारण तिच्या बोलण्यावरून हे तर समजत होते की, तिला आपल्याबद्दल काहीतरी ठाऊक आहे, म्हणूनच त्या एवढ्या खंबीर आहेत.
खूप विचार केल्यानंतर त्याला समजले की, रात्रीच काहीतरी घडले असेल, म्हणून तो रात्रीच्या CCTV कॅमेऱ्याची फुटेज चेक केले. पूर्ण क्लिअर होती. पण दारू पिल्यानंतर काय घडले असेल, हे चेक करण्यासाठी त्याने जरा पुढचे रेकॉर्डिंग चेक केले. तो अगदी सकाळीच आपल्या खोलीबाहेर जाताना त्याला दिसला. बाहेर जाताच त्याने CCTV कॅमेराची रेकॉर्डिंग बाहेरची लावली. तिथे त्याला दिसू लागले की, तो त्याच्या आईसोबत कसलेतरी संभाषण करत आहे.
एवढ्यातच त्याची आई त्याच्या खोलीत आली. तशी ती कधीच त्याच्या खोलीत येत नाही, कारण कधी कामच पडत नाही, म्हणून तो आईला बघताच खूप घाबरला, त्याने पटकन कम्प्युटरच्या कॅमेराची रेकॉर्डिंग बंद केली.

"काही फायदा नाहीऽऽ! माझ्यापासून आता लपविण्यकाचा काहीही फायदा नाही... मला सर्व ठाऊक आहे तुझ्याबद्दल, तुझ्या कालच्या रात्रीच्या इनसिडेन्स बद्दल!" त्याची आई म्हणाली.

तिचे असे म्हणणे ऐकून त्याला आणखीनच भीती वाटू लागली. त्याचे डोळे मोठे झाले होते, घाम फुटू लागला होता. त्याच्या तोंडातून शब्द बाहेर पडत न्हवते, पण तरीही त्याने आपल्या आईला विचारले की, "कसेऽ... माहीतऽऽ तुम्हालाऽऽऽ?"

"काल तू माझ्याजवळ आला होतास, CCTV मध्ये चेक कर तुला दिसेल. आता काय, CCTV कॅमेऱ्याची रेकॉर्डिंगही एडिट करू शकणार नाहीस, कारण तू बाहेरील पुरावे मिटवू शकतोस, पण माझ्या मेमरीमध्ये साठलेले, म्हणजे माझ्या डोक्यात तूच काल भरलेले पुरावे, कसा मिटवशीलऽऽ?" त्याची आई...

"मी तुम्हाला काय काय सांगितलेऽऽ?" घाबरतच प्रश्न केला.


"सर्वच, तुझ्या आत्महत्याच्या प्रयत्नापासून ते राखीच्या शवाला कोणत्या शेतात पुरविले व पूर्ण पुरावे मिटविण्यापर्यंत... सारंचऽऽ! थँक्स टू यस्टरडेस वाइन, ज्याने तुझे मन तर हलके केले, पण पुरावे माझ्याजवळ आणून सोडले." त्याची आई हसत म्हणाली.

आता त्याला समजू लागले की, त्याने दारू पिऊन किती मोठी चूक केली आहे ते. पण आता पुढे काय? म्हणजे तीला काय हवंय आपल्याकडून, जेणेकरून ती आपल्याला कारागृहात जाण्यापासून वाचवेल.

"मग तुम्ही आत्तापर्यंत पोलिसांना ह्याबद्दल सांगितले का नाहीऽऽ?" हळूच आवाजात म्हणाला.

"वेडा झाला की काय तू? मी माझा सावत्र मुलगा असला तरीही मुलगा आहेस तू माझा आणि मी आपल्या मुलाला जेल मध्ये काशी पाठवेलऽऽ? पण तू माझे म्हणणे मानत असेल तोपर्यंत, जर माझ्यामनाप्रमाणे घडले नाही, तर मला माफ कर, तुला चांगले संस्कार घडविण्यासाठी कारागृहात तर पाठवावेच लागेल नाऽऽ? मी तुझी चिंता करते रे, बाकी काही नाही!" त्याची आई हसत म्हणाली.

"ओके! तुम्ही जसे म्हणाल, तसा मी वागेल, पण प्लिज पोलिसांना किंवा बाबांना सुद्धा सांगू नका, प्लिजऽऽ! तुम्ही मोनाला तर सांगितले नाही ना?" हात जुळून प्रकाश म्हणाला...

"अरे चिंता करू नको रेऽ! चिल मारऽऽ! मी कुणालाही सांगितलेलं नाही आणि सांगणार ही नाही, मी काय पागल झाली आहे काय, लोकांना सांगत फिरायला? राहिली गोष्ट मोनाची, तिलाही अजून काही माहीत नाही आणि काळजी नको तिला माहीतही होणार नाही, कारण मी तुला कालच वचन दिले होते की, ह्याबाबत तिला सांगणार नाही म्हणून, तू विसरलास असशील पण मी नाही आणि मी वचन खूप काळजीपूर्वक पार पाळते हे तर तुला ठाऊक असेलच ना? पण फक्त माझे मन दुखवू नकोस, जर माझे मन दुखले ना, मग माझ्या तोंडून तुझे पूर्ण सत्य, दोनचा पाढा म्हटल्यासारखे पटपट बाहेर पडेल. मग म्हणायचे नाही की, सांगितले नाही म्हणून... म्हणून म्हणते, मी जशी तुला ऑर्डर देते ना, तसे तू वागायचे, ठीक आहे, मी तशीच वचनबद्ध राहील, नाहीतर कारागृहात पूर्ण जीवन काढावं लागेल, तिथे तर म्हणे पोलीस खूप मारतात, खूप कामं करायला लावतात, बंदिस्त बनवून पूर्ण जीवन तुझे नष्ट होईल. पण गुन्हा केल्यानंतर शिक्षा तर व्हायला हवी ना? हा तर नियमच आहे ना? काही हरकत नाही, मी आहे ना, तुला खूप छोटे छोटे शिक्षा देत जाईल, अगदी नगण्य! तिथल्यापेक्षा तर, माझ्या हातच्या शिक्षा परवडेल ना? नाही काऽऽ?"

प्रकाशला समजले की, आता ती आपल्याकडून एकोनेक काम करवून घेणार, ती तिच्या म्हणण्यानुसार आपल्याला वागविणार, आपल्यात नोकरसारखे वागवणूक देणार, कदाचित त्यापेक्षाही भयंकर, ती आपल्याला आता गुलामच बनवून घेणार, हे त्याला कळून चुकले. पण कारागृहात जाण्यापेक्षा आणि आपले जीवन नष्ट करण्यापेक्षा इथे गुलाम बनून स्वतंत्र राहिलेलं बरं. पण त्याला आता दारूचा खूप राग येऊ लागला होता.
"अगं, तू त्या प्रकाशवर कोणती जादू केली आहेस, की तो तुझं सारंच ऐकायला लागलाय कालपासूनऽऽ? तुला काळं जादू वगैरे, वशीकरण वगैरे शिकलीस की कायऽऽऽ?" मोना तिच्या आईला म्हणाली...

"वशीकरण आणि काळी जादू वगैरे काही नाही गंऽ! मला त्याच्या जीवनाला चालविण्याची अशी चावी मिळाली आहे, ज्याद्वारे मी त्याला बंदराप्रमाणे नाचवू शकते किंवा नोकराप्रमाणे त्याला काम करायला लावू शकते, ह्यावर त्याला आता विरोधही करता येऊ शकत नाही, विरोध केला, म्हणजे त्याच्या खेळ खल्लास, हे त्याला चांगलेच ठाऊक आहेऽऽ." तिची आई अगदी हसत म्हणाली.

"बापरे, स्वतःच्या मर्जीचा मालिक असणारा प्रकाश आता, तुझ्या बोलण्यावरून कामं करेल? तुनी सांगितलेलं प्रत्येक गोष्ट ऐकेल? अरे वाहऽऽ! मलाही सांग ना, तू कशी त्याला कंट्रोल करत आहेस? आणि कोणत्या किल्लीची तू गोष्ट करत आहेसऽऽ? मला पण त्याला कॅट्रोल करायचे आहे..." मोना उत्सुकतेने तिला म्हणाली...

"नकोऽऽ! मी तुला काहीही सांगणार नाही, कारण मी त्याला वचन दिले होते की, मी त्याची ती गोष्ट कुणालाही सांगणार नाहीये, आणि मी वचन कधीच मोडत नाही, तुला ठाऊकच असेल. पण काळजी करू नकोस, तुही त्याला कॅट्रोल करू शकतेस, तू फक्त त्याला ऑर्डर दे, जर तो ऐकला नाही, तर फक्त एवढं म्हण की, 'मी आईला सांगेलऽ!' बस्स झालंऽऽ! मग बघा तो कसा तुझी गुलामगिरी करेलऽऽ." तिची आई हसून म्हणाली.

"खरंचऽऽ? तो माझा प्रत्येक ऑर्डर ऐकेलऽऽऽ? वाह मस्तचऽ! म्हणजे आपल्या मालमत्ताचा अर्धा मानकरी, ह्या घराचा अर्धा हिस्सेदार माझा गुलामऽऽ! वाह वाह... मला डेमो हवाय! आत्ताच, मला आत्ताच बघायचे आहे की, गुलाम कसे असतात, मला ट्रायल बघायचे आहे मम्मी." मोना उत्सुकतेने म्हणाली.

"ओके, आत्ताच त्याला बोलावते, आणि तुला जे काही काम त्याच्या कडून करून घ्यायचे आहे, ते तू त्याला सांग..."
तिच्या आईने प्रकाशला बाहेर बोलाविले. बाहेर येताच, प्रकाशला मोनाने एक काम सांगितलं की, तिचे कपडे वॉशिंग मशीन मध्ये न धुता, त्याने स्वतःच्या हाताने धुवावे. प्रकाशने स्वतःचेच कपडे कधी धुतले नाहीत, मुळात कधीच कपडे धुतले नाही, आणि ह्या मोनाचे कपडे का म्हणून धुवावे? म्हणून त्याने प्रश्न केला की मी कशाला धुवू?
त्याचा प्रश्न ऐकताच, त्याची आई म्हणाली, "अरेऽ? विसरलास तूऽऽ? तू तर माझं सारं म्हणणं ऐकणार होतास नाऽऽऽ? तू तर पहिल्याच दिवशी प्रश्न करून राहिलासऽऽ? तुला इथे राहायचं नाही आहे काय? तुझा भांडाफोड करू कायऽऽ?"

"पण मी तुमचं ऐकणार, असं आपल्यात डील झालं होतं ना? मग ही का म्हणून ऑर्डर देत आहे मलाऽऽ? तुम्ही हिला पण सर्व सांगून टाकले की कायऽऽ?" प्रकाश रागात म्हणाला.

"अरे मी कशाला सांगणार रे बाळाऽऽ? मी वचन कधीच मोडत नाही, ठाऊक नाही काय तुलाऽऽऽ? मी मोनाला काहीही सांगितलेलं नाही, पण तरीही मला वाटतं की तू तुझ्या बहिणीचं सारं ऐकावं... कारण ती माझ्या काळजाचा तुकडा आहे, तिचा ऑर्डर म्हणजे माझा ऑर्डर असे समजून काम करून टाकायचे, झालंऽऽ! आता तू आपल्या बहिणीला दुरावणार? तिला नकार दिला म्हणजे इंडियरेक्टली मला नकार दिल्यासारखे होईल, असे नको करू रे, आम्हा दोघांचंही ऐकून घेत जा, ठीक आहेऽऽ! आता पटकन मोनाचे कपडे धुवून घे बरंऽ! धुशील नाऽऽ?" त्याची आई, तिरक्या नजरेने, हसतच म्हणाली.

प्रकाशकडे दुसरा कुठलाही मार्ग दिसत नसल्याने, त्याची इच्छा नसूनसुद्धा त्याला तिचे पूर्ण कपडे धुवावे लागले. हे बघून मोना मात्र खूप आनंदी झाली. ती प्रकाशला एकावर एक ऑर्डर देऊ लागली आणि प्रकाशला ते सर्व ऑर्डरचे पालन करावे लागत होते. त्या ऑर्डर मध्ये सोप्प काम, जसे तिच्या जवळच असलेल्या रिमोट आणण्यापासून ते तिचे सॅंडल साफ करण्यापर्यंत; मध्यम काम जसे तिच्यासाठी कॉफी बनवून आणण्यापासून ते तिला जे आवडते ते बनवून देणे व तोच स्वतःच्या हाताने खाल्लेले तिचे उष्टी भांडी साफ करणे; जड कामामध्ये, तिला एंटरटेनमेंट करण्यासाठी नाचून दाखविण्यापासून ते तिचे हातपाय चेपून देने असे काम त्याला करावे लागत होते.
मोनाच्या कामातून फुरसत मिळाली तशी त्याची आई त्याला एकावर एक काम देत होती. अख्या बंगल्याला झाडू लावणे, कपडा मारणे, धूळ साफ करणे आणि अशे अनेक काम त्याला करावी लागत होती. आता प्रकाशच एवढी कामं करत आहे म्हणून, त्या दोघींनी घरातील आधीपासून असलेल्या सर्व नोकरांना कामावरून काढून टाकले. आता त्या सर्व नोकरांची कामे, व त्या दोघींची पर्सनल कामेसुद्धा प्रकाशलाच करावी लागत होती.
एका महिन्यातच तो पूर्णपणे थकला, त्याला आता नको होते हे गुलामगिरीचे हे जीवन. त्याला सुटका पाहिजे होती अश्या आयुष्याची. त्याच्याजवळ एवढे पैसे असून सुद्धा काहीही करू शकत न्हवता. त्याला ह्या बंदीस्त जीवनातून सुटका मिळविण्यासाठी एक आयडिया आला की, तो आपल्या आईलाच ठार करणार, म्हणजे काही आपल्यावर एवढे अन्याय होणारच नाही. आणि आपल्या करनाम्याचे रहस्य फक्त तिलाच ठाऊक आहे, ती नसली की, तिची मुलगी मोना आपल्याला कुठलेही ऑर्डर देणार नाही. पण मग त्याला आठविले की, आधीच एक मर्डर केल्यावर एवढा मोठा घोळ झालाय, आता तो आपल्याच आईला मारले तर काय काय होईल आणि तिला मारले म्हणजे तिच्या मुलीला म्हणजेच मोनालाही ठार करावे लागेल. नाहीतर ती आपल्याला कारागृहात नक्कीच पाठवेल आणि सद्यस्थितीत तिच्या आईला काहीही झाले तरी, ती आपल्यावरच पूर्ण आरोप टाकेल, म्हणजे ते नोकरसारखे वागवून घेत असल्यानेच, मीच त्यांना ठार करण्याचा प्रयत्न केला असे ती समजेल. म्हणजे दोघांनाही मारावे लागणार. आणखी किती खून करायचे? आपण काय सीरिअल किलर आहोत काय? हाही त्याला प्रश्न पडला. सोबतच वाडीलांबाबतही विचार आला की, जर ह्या दोघांना मारले तर त्यांना किती दुःखी होईल? त्यांची सख्खी मुलगी आणि त्यांची दुसरी बायकोही मरण पावल्याचे दुःख ते सहन करू शकणार नाही. आणि काहीही असो, जरी ती आपल्याला नोकराप्रमाणे वागवीत असली तरी ती आई आहे. ती नेहमीच प्रेमाने बोलणे, जरी आपल्याकडून कामं काढून घ्यायची असली तरीही ती अगदी मायेने सांगते. आधीच सख्ख्या आईचे सुख लाभले नाही, आता सावत्र आई म्हणून तरी ती जेवढे प्रेम करते तेवढेच बरे, जर तीही राहिली नाही तर मी किती एकटा पडणार? हा त्याला प्रश्न पडू लागला. मग त्याने विचार पक्का केला की, आता तो कुणाचेही मर्डर करणार नाही. जसे जीवन चालत आहे, तसे चालू द्यायचे हे निश्चित केले.
प्रकाशला मर्डरवरून आठविले की, राखीचा केसचं काय झालं असावं? तो तिच्या घराच्या आजूबाजूच्या लोकांपासून माहिती घेऊ लागला. त्याला समजले की, पोलीस अजूनही तिला शोधतच आहेत. अजून तिचा पत्ता लागला नसल्यामुळे त्या केस मध्ये काहीही अपडेट आलेली नाही. पोलीस फक्त जवळपासच्या लोकांची चौकशी करत आहेत, म्हणजे आपली पण चौकशी कधीना कधी नक्कीच करणार, कारण तिचा दुसरा बॉयफ्रेंड आपणच, म्हणून आपल्यावर संशय त्यांना नक्कीच येईल, म्हणून तो आपल्या स्टेटमेंटची प्रॅक्टिस करू लागला. आणखी जराशी माहिती काढल्यानंतर प्रकाशला माहीत झालं की, पोलिसांनी तिच्या घरापुढील CCTV कॅमेराच्या फुटेज जमा केल्यात. त्यात ते CCTV कॅमेरा आधीच फुटलेले आढळला. प्रकाशने काढलेल्या खिडकीच्या ग्रीलबद्दल आणि तिच्या खिडकीला काढलेल्या ग्रीलवरून असा प्राथमिक निष्कर्ष काढला की, तिचे कुणीतरी अपहरण केले असावे, जो खालच्या किचनच्या खिडकीतून येऊन, राखीला घेऊन तिच्या खिडकीतून बाहेर पळवून नेले असेल, पण राखीच्या घरचा मेन दरवाजा सकाळी खुला असलेला आढळला. पण प्रकाश तर खिडकीने आत शिरला होता, मग दार कसे उघडे? प्रकाशला वाटू लागले की, जर दार खुले आहे हे तेव्हाच ठाऊक असते तर, खिडकीचे ग्रील काढण्याची मेहनत वाचली असती. त्या दारच्या खुल्या असल्याने पोलिसांना असे वाटू लागले की, कदाचित राखी स्वतःहुन बाहेर गेली असेल. पण तिचा पत्ता लागेपर्यंत काहीही करता येणार न्हवते.
प्रकाशच्या अंदाजवरून पोलीस त्याची विचारपूस करायला त्याला बोलाविले. पण प्रकाशने आधीच प्लॅनिंग केली होती की, त्यांच्या पुढे काय बोलायचे आहे, म्हणून पोलिसांनी त्याच्यावर जराही संशय आला नाही. त्याने सांगितले की, दोघांचे आधीच ब्रेकप झाल्याने त्यांच्यात तेवढा संपर्क राहिलेला नाही. त्याची कॉल लिस्ट चेक केल्यानंतर शेवटचे तिच्यासोबतचे बोलणे खूप दिवसाआधी झालेले आढळले. ब्रेकप करण्याचे कारण विचारले असता, त्याने सांगितले की, दोघांचेही विचार वेगवेगळ्या दिशेने जाऊ लागले होते, प्रेमही उरले न्हवते. पोलिसांनी त्याच्यावर विश्वास ठेवून, त्याला सोडून देण्यात आले.
दिवस सरत गेलेत, माय-लेकीची कामेही वाढत गेलीत, प्रकाशवर ओझं टाकत गेलीत. अश्यातच तो वेळात वेळ काढून अभ्यास करून आपली B.B.A. ची डिग्री कॉम्प्लेट केली. आता पुढे काय करावे, हाच त्याच्यापुढे प्रश्न उभा होता. त्याला त्याच्या शहरातून म्हणजेच पुण्यातून निघायचे होते. जर इथेच राहिले तर, ते मायलेकी मिळून आपल्यावर अत्याचार करतच राहतील. म्हणून शिक्षणाच्या किंवा नोकरीच्या बहाण्याने तरी त्याला ते शहर सोडून दुसरीकडे जायचे होते.
तीन महिन्यानंतर प्रकाशचे वडील घरी परतले. त्यांना बघून प्रकाशला एक आशा दिसू लागली की, आतातरी वडील पुढे असताना आपल्याला त्यांची कामं करायला लागणार नाहीत. पण त्याचा हा गैरसमज होता. प्रकाशाचे वडील आलेले आहेत, हे बघताच, प्रकाशची आई त्याला एकट्यात म्हणाली की, "त्यांना ह्याबद्दल काहीही माहीत होता कामा नये. त्यांच्यापुढे आमची किंवा इतर कुठलीही कामं करायची गरज नाही, पण जसे ते आपल्या ऑफिस मध्ये जातील, तसे घरातील सर्व कामं आणि आमची कामसुद्धा करून टाकायची, तेही तुझ्या वडिलांना काहीही कळू न देता."
प्रकाशला ठाऊकच होते की, असे होणार म्हणून. तो आपली कैफियत वडिलांनाही सांगू शकत न्हवता. जर असे केले तर कदाचित ती आपला पूर्ण भांडाफोड पोलिसांना सांगून टाकेल. कारण तिला काहीही फरक पडणार नाही, आपण जेल मध्ये गेलो तरी. म्हणून आता त्याला कुठल्याही परिस्थितीत ते घर सोडून बाहेर जावं लागणार होतं, पण कसं हे त्याला समजत न्हवते.
एकदा मोनाची खोली साफ करता करता, त्याला मोनाचा मोबाईल तिच्या बेडवर दिसला. ती आंघोड करायला गेली होती. त्याने तिच्या मोबाईलला दुर्लक्ष केले. पण त्यावर एक कॉल येऊ लागले होते, ते नंबर 'my life' ह्या नावाने सेव्ह होते. प्रकाशने याआधीही एकदा मोनाच्या फोन वर 'my love' नावाने सेव्ह असलेल्या तिच्या गुंड बॉयफ्रेंडचा फोन येताना बघितला होता. पण आत्ता जो नंबर येत आहे, तो नंबर ओळखीचा वाटत आहे. त्याने तो फोन उचलला आणि कानाला लावला. प्रकाश काहीही बोलला नाही, फक्त पुढच्याचे ऐकणार होता.
पुढच्या व्यक्तीचा आवाजही ओळखीचा वाटू लागला होता. मग त्याला आठविले की, हा तर योगेशचा आवाज आहे. योगेश म्हणजे त्याचाच बालपणीपासूनचा मित्र... पण तिचा आणि योगेशचा संबंध काय?
फोनवर तो म्हणत होता की, "एक खूप आनंदाची बातमी आहे डार्लिंग, तू ते ऐकशील तर तू मला डायरेक्ट हग करायला माझ्या घरी येशील... हॅलो! डार्लिंग?..."
प्रकाशने कॉल कट केला आणि मोबाईल ठेवला. मोनाची प्रत्येक कामं करत असताना तिच्या मोबाईलकडे कधी न कधी नजर जायचीच, मग ते पाय चेपून देत असताना असो, वा डोक्याची मसाज करत असताना; त्याला तिच्या मोबाईलचा पासवर्ड ठाऊक होता. ती अंघोड करून येण्याआधीच त्याने तिचा मोबाईल चालू करून, कॉल लिस्ट मध्ये गेला. आपल्या मोबाईलने पटकन "my life" ह्या कॉन्टॅक्टचा फोटो घेतला आणि नुकताच उचललेला फोन कॉल हिस्ट्री डिलीट केली, म्हणजे मोनाला कुठलाही संशय येता कामा नये की आपण तिचा कॉल पीक अप केल्याची. तो आपल्या खोलीत गेला आणि त्या नंबरला चेक केले असता, त्याने पुष्टी केली की, तो नंबर नेमका योगेशचाच होय. योगेश तोच जो लहानपणापासूनचा त्याचा मित्र होता. पण प्रकाशला समजत न्हवते की, योगेश आणि मोना एकमेकांना ओळखतात कसे? आणि तो तिला फोन वर डार्लिंग-डार्लिंग म्हणून बोलत होता, म्हणजे ती त्याची नवी गर्लफ्रेंड तर नाही ना? पण मोनाचा बॉयफ्रेंड तर एक गुंड होता ना? त्याचे काय झाले मग? प्रकाशने निश्चय केला की, मुळात ह्यांच्या दोघांचं रिलेशन आहे तरी काय?
प्रकाशने सर्वात आधी, हळूच तिच्या मोबाईलला घेऊन, तिच्या कॉल रेकॉर्डिंग नेहमी चालू राहील, अशी सेटिंग केली. जसजसे मोना आणि योगेशचे बोलणे व्हायचे, प्रकाश आपल्या खोलीतूनच, आपल्या कॉम्प्युटरने तिच्या मोबाईलला वायफायने जोडून, त्या दोघांची रेकॉर्डिंग ऐकू लागला. त्याने ह्या दोन -तीन महिन्यांच्या काळात साधारण ह्याकिंगही शिकून घेतली होती. दोघांच्या बोलण्यावरून वाटत होते की, दोघांचेही एकमेकांवर खूप प्रेम आहे, हे प्रेम खरे होय की खोटे, हे त्यांनाच ठाऊक! योगेशच्या बोलण्यावरून हे तर समजले की, तो जे मगाशी कुठल्यातरी आनंदाच्या बातमी बद्दल सांगणार होता ती बातमी म्हणजे, तो पहिल्याच प्रयत्नात UPSC ची परीक्षा पास झालाय. तो लकवरच CBI च्या स्पेशल क्राईम ब्रँच पोस्ट वर रुजू होणार आहे.
पण एवढे संभाषण ऐकल्यानंतर सुद्धा, त्याला समजले नाही की, त्यांचे प्रेम जुळलेच कसे? ह्याला हे जाणून घेण्यात खूप रुची वाटू लागली. तो अश्या संधीच्या शोधत होता, ज्याने योगेशला आणि मोनाला फसवून, आपला सूड घेता येऊ शकतो काय? ह्या प्रश्नाचे उत्तर त्याला हवे होते. जर दोघांना कॅट्रोलमध्ये आणलं नाही, तर ते आपल्यावर वर्चस्व करेल, ते महागात पडणार म्हणून, तो दोघांच्या रिलेशन बद्दल जाणून घेण्यासाठी खूप आटापिटा केली. आधीच्या मोनाच्या त्या गुंड बॉयफ्रेंडच्या मित्रांची विचारपूसही केली. त्यांच्याकडून एवढेच ठाऊक झालं की, दोघांचे ब्रेकप झाले आहे. तिला दुसऱ्याच मुलावर प्रेम आलेलं आहे, ती त्याच्यासोबत आहे. तो मुलगा म्हणजे योगेश! खूप शोधाशोध करूनसुद्धा त्याला काहीच मिळाले नाही, म्हणून शेवटची संधी म्हणून त्याने आपल्याच घरचे खूप पुराणे CCTV फुटेज चेक करू लागला. त्याला खूप शोधल्यावर असे दिसले की, जेव्हा जेव्हा योगेश आपल्या घरी येत होता, नेहमी दोघांचे डोळ्यांनीच इशारे चालायचे. ते लपून लपून बोलत होते. जेव्हा प्रकाश आणि योगेश गेम खेळत होते, योगेश पाणी पिण्याच्या किंवा बाथरूमला जाण्याच्या बहाण्याने तो मोनासोबत बोलत होता. ज्या वेळी योगश प्रकाशच्या घरी मुक्काम करायचा, त्यावेळी रात्री जेव्हा सगळे झोपून असायचे, तेव्हा तो मोनाच्या खोलीत जाताना त्याला CCTV कॅमेरामध्ये दिसले. प्रकाशला हे तर समजले की, ह्यांच लफडं खूप दिवसाआधीपासूनचं आहे. कदाचित मोना त्या गुंडाला फसवून, योगेशसोबत रात्र काढत होती.
दोघेही आता एकत्र आहेत, पण योगेशने आपली मैत्री का तोडली? खरंतर, माझ्यामुळेच तो इथे येऊ शकत होता ना? इथे येत असल्यामुळेच मोनासोबतची भेट झाली आणि त्यांचं प्रेमप्रकरण घडलं. जर आपणच नसतो तर हे दोघे एकत्र असते काय? असे असूनही योगेशने माझे उपकार फेडायचे सोडून, मला खूप काही बोलून, एवढी चांगली मैत्री आणि आपली साथ सोडून दिली, असा प्रकाश विचार करू लागला. त्याला असेही वाटू लागले की, कदाचित मोनानेच त्याला सांगितले असेल की, त्याने आपला साथ सोडावा. म्हणून तिचे ऐकून असे केले असावे. जर हे खरे असेल तर, ह्यावरून निष्कर्ष लागू शकतो की, मोना जे म्हणेल ते योगेश करायला तैयार होईल आणि वाईट गोष्ट म्हणजे, आता योगेश CBI मध्ये काम करणार आणि लवकरच प्रोमोशन मिळाले तर, तो CBI अधिकारीही होऊ शकतो. जर असे झाले तर आपली काही खैर नाही, हे प्रकाशला कळून चुकले. जर योगेश CBI अधिकारी बनलाच, आणि मोनाच्या म्हणण्यावरून आपल्यावर नजर ठेवायला सांगितले किंवा आपण असे काय केले आहे भूतकाळात, ज्याने आपली आई आपल्याला कॅट्रोल करत आहे, हे शोधून काढायला लावले तर? जर आपण पुढे जाऊन कुणाचा चुकून पुन्हा मर्डर केला, आणि योगेश आपल्या मजेसाठी किंवा मोनाच्या बोलण्यावरून आपला पिच्छाच केला तर? असे त्याला खूप प्रश्न पडू लागलेत. जरी प्रकाशाचा एक मर्डर जवळजवळ सक्सेस झालेला असला तरीही, एक चालता-फिरता पुरावा म्हणजे त्याची आई आहेच, त्याची जराही काळजी न करणारी. तिने सांगून टाकले तर, त्याचा पूर्ण खेळ खल्लास होईल आणि त्याला असे नको होते.
तो विचार करू लागला की, त्याने आता काय करावे, जेणेकरून तो आपल्या घरापासून खूप दूर जाऊन, शांतीने राहू शकेल. प्रकाश तसा कारण नसताना सुद्धा दुसरीकडे जाऊ शकतो, पण त्याला परत यावेच लागेल, जर त्याचं आईने बोलाविले तर... पण जर कॉलेजसाठी किंवा नोकरीसाठी बाहेर गेले तर, तिला कुठलाही बहाणा मिळणार नाही, परत बोलविण्याचा. प्रकाश आता अश्याच संधीच्या शोधत होता.
त्याने खूप रिसर्च केले. त्याला समजले की, जर त्याने UPSC देऊन, IAS बनला तर, त्याची शिपमेंट कोणत्याही जिल्ह्यात होऊ शकते. सोबतच एक्सपिरिइन्स वाढले तर, तो DS म्हणजेच जिल्हाधिकारीही बनू शकतो. मग जर असे झाले तर, त्याची आई पण त्याला त्रास देणार नाही आणि त्याची बहीण आणि योगेश सुद्धा त्याच्या मागावर येणार नाही. आता प्रकाशला हाच मार्ग सुखदायी वाटू लागला, जरी सुरुवातीला खूप मेहनत करावी लागणार असली तरीही.
प्रकाशने निश्चित केले की, त्याला कुठल्याही परिस्थितीत एकाच अटेम्प्ट मध्ये UPSC ची परीक्षा पास व्हावे लागेल, मग त्यासाठी कितीही मेहनत करावी लागली तरीहीही बेहत्तर. त्याने, ही परीक्षा देणार हे निश्चितच केले म्हणून, त्याने अभ्यासक्रमाचे पूर्ण पुस्तकं विकत घेतले. त्याच्या आईच्या आणि मोनाच्या कामातून जसा सुटका मिळाला तसा तो, अभ्यासाला बसत होता. तो अभ्यासात हुशार आधीपासूनच असल्याने, नेहमी पुस्तकं वाचत असल्याने आणि त्याला सामान्य ध्यान खूप जास्त असल्याने, त्याला ह्या परीक्षेचे जास्त ओझे वाटत न्हवते. तो ह्या काळात, फक्त चार ते पाच तास फक्त झोपत होता. उरलेल्या पूर्ण वेळ तो, त्यांचे काम सोडलीत तर, अभ्यासातच देत होता. उरलेल्या फावल्या वेळात, किंवा जास्तच बोअर झाले तर तो, कॉम्प्युटरबद्दल वेगवेगळी माहिती घेऊ लागला होता, जसे की, ह्याकिंग बद्दल कोडिंग बद्दल, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट बद्दल अश्या अनेक कोर्स तो घरबसल्याच ऑनलाइनने करू लागला होता. मुळात त्याला कंम्प्युटरचे जास्त ज्ञान नसल्याने त्याला खूप अवघड जात होते, पण तरीही तो वेळात वेळ काढून कॉम्प्युटरसाठीही मेहनत घेत होता.
मोना, प्रकाशचे असे कोणते गतायुष्य किंवा भूतकाळातील घटना आहे, ज्याद्वारे तिची आई प्रकाशला कंट्रोल करू शकत आहे, हे तिला जाणून घ्यायचे आहे. म्हणजे ती अश्या सापळ्याच्या शोधात आहे, ज्याने ती आपल्या वडिलांच्या संपत्तीची एकटी मालकीण बनेल. जर प्रकाश खरंच कारागृहात गेला, तर पूर्ण संपत्ती आपली होईल आणि मोनाला हेच हवे आहे, म्हणून ती प्रकाशचे अतीत शोधू इच्छित आहे. पण तिला काही दिवसांआधी राखी, म्हणजे प्रकाशची गर्लफ्रेंड गायब असल्याची बातमी तिच्या कानावर पडली. मोनाला राखीच्या गायब होण्याचा आणि तसेच प्रकाशचे कंट्रोल आपल्या आईच्या हातात गेल्याचे कसले ना कसले कनेक्शन दिसत होते. मोनाची आई काहीही सांगणार नाही, हे मोनाला चांगलेच ठाऊक होते. पण जर खरंच प्रकाशचा हात, राखीला गायब करण्यामागे असेल आणि हे जर आपण सिद्ध केले, तर प्रकाश जेलात आणि इकडे पूर्ण संपत्तीसोबत आपण एशोआरामत राहू शकतो, हे तिला चांगलेच कळले.
मोनाचा बॉयफ्रेंड म्हणजे योगेश, इन्वेस्टीगेशन डीपारमेन्ट मध्ये नुकताच लागलेला असल्याने, त्याच्या मदतीने प्रकाशला एक्सपोज करता येऊ शकते म्हणून तिने पूर्ण प्रकार योगेशला सांगितला. जर मोनाच्या वडिलांची प्रॉपर्टी, पूर्णपणे मोनाची झाल्यास, मोनासोबत पुढे जाऊन लग्न झाले तर खूप मोठी संपत्तीही असणार आणि नोकरी तर लागलेलीच आहे चांगल्या पगाराची, अशी योगेशची धारणा होती. पण योगेशला राखीच्या केसची जबाबदारी मिळत न्हवती. तो नवीनच असल्याने त्याला आधी पूर्ण ट्रेनिंग करून घ्यावी लागणार होती आणि दुसरी गोष्ट म्हणजे राखीचा एवढ्या महिन्यानंतरही ठावठिकान लागलेला नसल्याने, काहीही करता येत न्हवते, म्हणजे अजूनही ती केस पोलिसांच्या अंडर मध्येच होती. पण योगेश आपला पूर्ण प्रयत्न करत होता की, राखीची केस योगेशच्या टीमकडे यावी!
मोना घरूनच प्रकाशबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करत होती. ती कधी आईला प्रश्न विचारत होती, तर कधी प्रकाशलाच आपल्या विचित्र प्रश्नांच्या भोवऱ्यात अडकवत होती. तिची आई तर काहीच सांगणार न्हवती, पण प्रकाशला मात्र मोनावर जरा जरा संशय येऊ लागला होता. पण सर्व गोष्टींना इग्नोर मारून, तो आपल्या अभ्यासात जास्त फोकस करत होता.
18

मोनाच्या आईलाही, तसेच करायचे होते, म्हणजे आधी प्रकाशकडून, काम काढून घायचे होते, नंतर जसे त्याच्याकडून काम काढून घेतले, आणि नंतर पुढे जाऊन प्रकाशची गरज भासली नाही, तसे पोलिसांना सांगून, प्रकाशला आमरण कारावास करायसाठी कारागृहात पाठवायचे आणि मोनाला पूर्ण संपत्तीची मालकीण बनवायचे. जेणेकरून मोना, पूर्णपणे सुखी राहू शकेल. पण मोनाला जराही सैय्यम न्हवता. तिला खूप उत्साह होऊ लागला की, केव्हा प्रकाश बंदिस्त होईल आणि केव्हा आपल्या हातात पूर्ण संपत्ती येईल. तिचा उतावळेपणा तिचा आईला जराही आवडला नाही. जर तिने मोनाला विचारले, की ती कशाला प्रकाशच्या मागे पडली आहे, त्याचे अस्तित्व जाणून घेण्यासाठी; तर मोना उलट प्रश्न विचारले की, तिला काय प्रकाशबद्दल काय ठाऊक आहे आणि जर विचारलेच की, राखी प्रकाशमुळेच गायब झाली काय? तर कोणतेही उत्तर दिले तरी मोना लगेच पकडून घेईल आपली चोरी. जर असे झाले तर, प्रकाश सारखा वाफादर गुलाम हातून जाईल, ही मोनाच्या आईला भीती होती. ती प्रकाशचा पुरेपूर फायदा उचलू इच्छित होती, सोबतच मोनालाही प्रकाश कडून फायदा काढून देऊ इच्छित होती. तिला हे तर ठाऊक होते की, तिचा नाव बॉयफ्रेंड योगेश होय, जो प्रकाशचा आधी मित्र होता. तिला हे तेव्हाच ठाऊक झाले, जेव्हा मोना गर्भवती राहिली होती, मोनाला मूल झाल्याचे जराही हरकत न्हवते, पण तिच्या आईनेच गर्भपात करायला फोर्स केले. पण तिच्या आईला, हे ठाऊक न्हवते की, मोनाने तिच्या बॉयफ्रेंडला ह्या केस मध्ये इंव्होल व्हायला सांगितली असेल म्हणून.
मोना खूप जास्त उत्साही होऊ लागली होती, प्रकाशबद्दल जाणून घेण्यासाठी आणि पूर्ण संपत्ती हडपण्यासाठी. मोनाच्या म्हणण्यावरून योगेश तिकडे आटापिटा करत होता, जेणेकरून प्रकाशची फाईल त्याच्या टीमकडे येईल ह्याची. खरंतर योगेश, मोनापासून बोअर झाला होता.
योगेश प्रकाशच्या घरी, रोज रोज येत असल्याने मोनासोबत रोज बोलणे व्हायचे, हळूच त्यांच्या बोलण्यातून दोघांत प्रेम निर्माण झाली. पुढे जाऊन, योगेश फक्त मोनासोबत रात्र काढायला मिळेल यासाठीच प्रकाशच्या घरी येत होता. दोघांनाही शारीरिक सुख हवं होतं, म्हणून योगेश उशीर झाल्याच्या कारणाने प्रकाशच्याच घरी मुक्काम करत होता, पण शारीरिक सुखासाठी रात्रीच्या अंधारात मोनाच्या खोलीत जाऊन सुख अनुभवत होता. दोघांचेही एकमेकांवर खूप प्रेम होते, पण एवढी वर्षे, तिचा जेवढा उपयोग करायचा होता, तेव्हढा योगेशने करून घेतलेला होता. आत्ताही तिच्यावर प्रेम असलं तरीही, आता प्रतिष्टीत नोकरीही लागलेली होती. आता कोणताही बाप आपली मुलगी आपल्याला देईल आणि नवीन मुलगी उपभोगायला मिळेल, म्हणून तो मोनाला सोडून, दुसऱ्या चांगल्या घराण्यातील मुलीसोबत लग्न करून, पुढचे जीवन जगू इच्छित होता. पण जसे मोनाच्या प्रॉपर्टी बद्दल त्याला ठाऊक झाले, तसा त्याचे प्रेम, मोनाच्या प्रॉपर्टीमुळे आता मोनावर पुन्हा अडकले होते. आता मोनासारखी आकर्षित मुलगी आणि सोबतच तिची पूर्ण प्रॉपर्टीही मिळत असल्यावर, तो आनंदाने तिच्यासोबत लग्न करू शकत होता.
योगेशने आपला पूर्ण प्रयत्न लावला की, राखीची फाईल त्याच्याकडे येईल. काही महिन्यांच्या कालावधीनंतर, योगेश आणि मोनाचे स्वप्न अखेर पूर्ण झालेच. योगेशची ट्रेनिंगही जवळजवळ पूर्ण झाली होती आणि राखीची केस CBI कडे जावी म्हणून, त्याने राखीच्या आईवडिलांना प्रवृत्त केले, सोबतच पोलिसांनाही आगाऊ पैसे दिलेत, खूप मेहनतीनंतर, शेवटी राखीची केस योगेशजवळ आलीच. योगेशचा सिनिअर अधिकारी आणि तो केस ची इन्वेस्टीगेशन करू लागला. योगेश उत्साही होता की, केव्हा प्रकाश त्याच्या पुढे बसलेला असेल, आणि केव्हा तो त्याला प्रश्न विचारणार. कारण योगेश आता अश्या पोस्टवर होता की, प्रकाशला खाली मान टाकून राहावे लागणार होते, जरी योगेश प्रकाशवर ओरडला तरी प्रकाशला काहीही करता येणार न्हवते, त्याला शांततेने उत्तर द्यावे लागणार होते.
प्रकाशचा त्याच्या स्पर्धापरीक्षेचा जवळपास अर्ध्याहून जास्त अभ्यास झालेला होता. परीक्षेला आता खूप कमी महिने शिल्लक होते. प्रकाश स्पर्धा परीक्षेची तैयारी करत आहे, हे फक्त त्याच्या वडिलांना सोडून, बाकी कुणालाही ठाऊक न्हवते. जणू तो गुप्तपणेच अभ्यास करत होता. अभ्यासासोबत त्याचे लक्ष तिघांवरही होते, मोना तिची आई आणि तिचा बॉयफ्रेंड. प्रकाशलाही नुकतंच ठाऊक झाली की, राखीची केस आता योगेशच्या हातात आलेली आहे. पण त्याला समजत न्हवते की, प्रकाश आपल्या मागे एवढा हात धुवून का मागे लागला आहे? त्यालाही कुठंना कुठं वाटू लागलं की, तिघेही आपला उपयोग करण्याच्या हेतूत आहेत. त्यालाही संशय आला की, मोना पूर्ण प्रॉपर्टी मिळविण्यासाठीच करत असावी.
दिवस सरत गेलेत, प्रकाशची परीक्षा जवळ जवळ येऊ लागली होती. अश्यातच योगेशच्या केस मध्ये कुठलेही पुरावे मिळाले नसल्याने, संशयास्पद असलेल्या लोकांची विचारपूस करून काही तोडगा निघतो काय, ह्या मार्गाने जाण्याचा विचार करू लागले. योगेशला हेच हवे होते, प्रकाशची विचारपूस... कारण योगेशला चांगलेच ठाऊक होते की, प्रकाश जेव्हा जेव्हा खोटं बोलतो, तेव्हा त्याचे पूर्ण हावभाव बदलून जातात आणि जर खरंच गुन्हा केला असेल तर, लगेचच त्याला ओळखून घेईल, कारण योगेश, प्रकाशला खूप वर्षांपासून ओळखत आहे, त्याच्यासोबत राहून आहे. त्याच्या तोंडून खरं काय, हे उघडायला त्याला जास्त कष्टाची गरज नाही, असे त्याला वाटू लागले.
योगेशच्या टीमने सर्वात आधी, राखीच्या आईवडिलांची चौकशी केली. त्यांची विचारपूस केल्यानंतरही त्यांच्या हातात काही लागलं नाही. फक्त त्यांना ठाऊक झालं की, राखीचे दोन बॉयफ्रेंड आहेत, एक खरा बॉयफ्रेंड, जो तिच्यावर जीवापाड प्रेम करतो, तशीच राखीही त्याच्यावर खूप प्रेम करते, आणि दुसरा बॉयफ्रेंड म्हणजे प्रकाश, ज्याचा फक्त उपयोग करण्यासाठी बनविलेले होते. सर्वात आधी तिच्या पहिल्या बॉयफ्रेंडची चौकशी करण्यात आली. त्याचे नाव प्रणय होते. तो राखीच्या गायब होण्याच्या बातमीने, आतून कोसळला होता. त्याने कित्येक दिवस जेवण बरोबर केलेले न्हवते. तो अक्षरशः वेड लागल्याप्रमाणे वागत होता. चौकशी दरम्यान प्रणय वारंवार आपल्या मोबाईल कडे बघत होता. त्याला प्रत्येक क्षणांत भास व्हायचा की, आता राखीचा फोन आला असेल.
प्रणयची चौकशी केल्यानंतर काहीही सापडले नाही. आता वेळ होती, प्रकाशची! सर्वाना प्रकाशवरच संशय येत होता, कारण राखीने प्रकाशचे विश्वासघात केले, कारण ती त्याच्यावर खरे प्रेम करत न्हवती, ह्याच कारणाने, प्रकाशने कदाचित सूड घेण्याच्या बहाण्याने तिचे अपहरण केले असेल, असे सर्वांचे मत होते. प्रकाशची कसून चौकशी करण्याची निर्णय घेतला होता. मग त्याला खरं बोलायला, मारले तरीही चालेल, असे निश्चित केले.
प्रकाशचा पेपर चालू महिन्यातच होता. प्रकाशला ठाऊकच होते की, आता आपलीच वेळ आहे चौकशीची. त्याने पूर्ण तैयार केलेली होती. त्याला चौकशी करिता बोलाविण्यात आले. तो योगेश पुढे, असा बोलणार की जणू त्याला ठाऊकच नाही की, तो CBI अधिकारी झाला आहे.

"अरे तू योगेश ना? कित्ती दिवसानंतर आपली भेट होत आहे! तू तर खूप मोठा साहेब झालास आता! डायरेक्ट CBI मध्ये! वाह वाहऽऽ!" , प्रकाश म्हणाला...

"माझं सोड! पण तू राखीला कुठं लपवून ठेवला आहेस? पटकन सांग, नाहीतर मला तुझ्यावर हात उचलावा लागेल!" योगेश रागात म्हणाला...

"राखी? कोण? अच्छा ती! अरे आमचं तेव्हाच ब्रेकप झालं होतं, म्हणजे डायरेक्ट ब्रेकप म्हणता येणार नाही, पण तसंच काहीतरी! कारण ती माझ्याकडे खूप कमी लक्ष देत होती. मी तिला भेटायला ये म्हटलं तर ती यायचीच नाही, खरंतर तिचे लक्ष माझ्यावर जराही दिसत नसल्याने, मीच फोन तिला फोन करणे बंद केले, मला वाटलं,काही दिवसांनी ती मला फोन करेल, पण तिचा एकही रिस्पॉस आला नाही, तिने मला कधी फोनही केले नाही आणि म्यासेजही नाही... मग मीच तिला दुर्लक्ष करत होतो. आणि एवढ्यातच माझ्या कानावर पडलं की, ती काही दिवसांपासून गायब आहे म्हणून!" प्रकाश स्पष्टतेने म्हणाला...

"माझ्यापुढे खोटं बोलू नकोस! तुला ठाऊक झालं की, तिचं लफडं दुसरीकडे आहे, म्हणून तू रागाच्या भरात, तिच्या घरी जाऊन तिला पळवून नेले... बरोबर आहे ना? सांग तिला कुठं लपवून ठेवला आहेस ते! खरं काय ते सांग, माझा पारा चढायचा आत पूर्ण सांग!" योगेश आपले खोटे राग दाखवून त्याला म्हणू लागला...

"कायऽऽ? तिचं लफडं चालू होतं? दुसर्यासोबत?म्हणजे ती माझ्यासोबत डबल गेम खेळत होती? बापरेऽऽ! म्हणजे मी एकतर्फी तिच्यावर प्रेम करत होतो, मला वाटले की, ती पण माझ्यावर प्रेम करते! पण हे काय ऐकत आहे मी? हे खरं आहे काय?" प्रकाश आश्चर्याचे भाव दाखवून म्हणू लागला...

योगेश प्रकाशच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवून होता. तो खोटं बोलल्यानंतर ज्याप्रमाणे घाबरतो, तो खाली मान टाकतो, असले कुठलेच हावभाव प्रकाशच्या चेहऱ्यावर दिसत न्हवते. म्हणजे तो खरंच बोलत आहे काय, असेच त्याला वाटू लागले.


"तुला मार हवाच वाटतं! मी आता तुझा मित्र नाही, एक CBI अधिकारी आहे, माझ्यापुढे जराही खोटं बोललेलं चालत नाही...सांग तिला कुठं नेऊन ठेवलाय?" योगेश तरीही रागातच म्हणाला...

"अरे तुला माझ्यावर का संशय येतो आहे? मी काहीही नाही केलोय? आणि तुला ठाऊकच आहे ना, की मी एवढ्या कॉन्फिडन्स ने खोटं बोलू शकत नाही ते? ओके तुला खोटंच वाटत असेल तर, तू माझ्या कॉल रेकॉर्ड चेक कर, हा घे माझा मोबाईल, बघ तिच्यासोबत माझं केव्हा बोलणं झालं ते! जर आमचं बोललेलं संभाषण ऐकता येत असेल तर ते पण ऐकून घे! पण तू तर मला चांगल्या प्रकारे ओळखतो ना? तरीही तुला माझ्यावर संशय येतो आहे?" प्रकाश त्याचं डोळ्यात डोळे टाकून म्हणाला...

प्रकाशची चाचणी घेण्यासाठी, योगेशने त्याला एक प्रश्न विचारले, "तुम्ही एवढे वर्षे एकत्र राहिलात, तर दोघांचे कधी शारीरिक संबंध प्रस्थापित झाले काय?"
योगेशला ठाऊक होते की, प्रकाश आणि राखीचे कधीच शारीरिक संबंध झालेले नाही, जर झाले असते तर त्याने नक्कीच आपल्याला सांगितले असते. आणि जर मैत्री तुटल्यानंतर झाले असेल तरीही तो खोटं नक्कीच बोलणार की त्यांचं झालंय म्हणून! आधी योगेश नेहमीच प्रकाशला हा प्रश्न विचारत होता की, दोघांचं कधी सेक्स झालं की नाही, त्यावर प्रकाश नेहमी खोटं बोलायचं की, त्यांचं सेक्स खूप वेळेस झालंय. त्याच्या खोटं बोलण्यावरून योगेश पटकन ओळखून घेत होता. पण प्रकाशला ठाऊक होते की, आता त्याला खोटं बोलावं लागेल, म्हणजे योगेशला जराही संशय येणार नाही की, तो खोटं मुद्दाम बोलायचा प्रयत्न करत आहे ते!

"होय! म्हणजे खूप वेळेस!! पण त्यात आम्हा दोघांचीची मर्जी होतीच, बरं का!" प्रकाश बोलताना, डोळे मिचकावू लागला, मान खाली टाकून इकडे तिकडे बघू लागला, मुद्दाम स्वतःचे पाय थरथर कापण्याचे ढोंग करू लागला, आणि लटकत बोलू लागला.

योगेशला, प्रकाशच्या बोलण्यावरून समजले की, प्रकाश रखीसोबत संभोग केल्याचे खोटं बोलत आहे, ज्याप्रमाणे तो नेहमीच खोटं बोलत आला आहे, स्वतःला कुल दाखविण्यासाठी! ह्यावरून योगेशला समजले की, प्रकाशने नक्कीच राखीला किडण्याप केलेले नसावे, जर असे असते, तर शेवटच्या प्रश्नाप्रमाणे त्याचा पूर्ण हावभाव बदलले असते. पण असे झाले नाही.
पुष्टी करण्यासाठी, प्रकाशचा मोबाईल चेक करण्यात आला. तर त्यांना खूप महिन्यापासून राखीसोबत संपर्क आलेला दिसला नाही. आणि जेव्हापासून राखी गायब आहे, त्याच्या चार पाच दिवसाआधी शेवटचा कॉल केला होता, तेही खुप कमी वेळ त्यांचं बोलणं झालेलं होतं. पुन्हा खात्री करण्यासाठी त्यांनी प्रकाशच्या घरचे, त्या राखीच्या गायब झालेल्या दिवशीचे CCTV फुटेज चेक केलेत. पण तरीही काहीही सापडले नाही. पुराव्याविना त्याला सोडून देण्यात आले.
प्रकाश तर इथून वाचला, पण योगेश आपला पिच्छाच सोडणार नाही म्हणून लवकरात लवकर तो परीक्षा देऊन, आपले घर सोडून नेहमीसाठी दुसरीकडे जाण्यासाहित सज्ज होता. त्याचा पूर्ण अभ्यास झालेला होता.
त्याची परीक्षा संपली. पेपर अगदी त्याच्या मनाप्रमाणे गेला. तो नक्कीच पास होणार ह्याची खात्री होती. फक्त आता निकाल येण्याची आणि इंटरव्ह्यूची प्रतीक्षा होती. तो इंटरव्ह्यूची तैयार जोमाने करू लागला.
दुसरीकडे योगेशचे चौकशी सत्र सुरूच होते. राखीचा पत्ता लावण्याची तैयार जोरात होती. मोना घरूनच परेशान होत होती, की केव्हा प्रकाश जेलात जाईल आणि केव्हा पूर्ण संपत्तीची मालकीण ती बनेल. ती पण आपली तर्हेने प्रयत्न करत होती, पुरावे गोळा करायची. ती तरीही तिच्या आईला प्रकाशबद्दल विचारणा करत होती, पण तिची आई, गुलामगिरीतला प्रकाश एवढ्या सहजगत्या सोडून देणार न्हवती, म्हणून तिने मोनाला काहीही सांगितले नाही. म्हणूनच मोनाने विचार केला की, ती योगेशला आपल्या आईची चौकशी करण्यासाठी बोलवावे. तेव्हा नक्कीच, प्रकाश बद्दल तिला काय ठाऊक आहे, पूर्ण सांगेल...
निकाल लागला, प्रकाश मेन परीक्षेतही पस झाला आणि इंटरव्ह्यू मध्येही पास झाला. त्याला एका महिन्याची ट्रेनिंग होती. प्रकाश UPSC मध्ये पहिल्याच प्रयत्नात पास झालाय, ही खबर वाऱ्यासारखी पसरू लागली. प्रकाश IAS बनणार, आणि कदाचित तो दुसऱ्या जिल्ह्यात शिफ्ट होणार, ह्या भीतीने मोनाच्या आईला हाती धत्तूरा येते की काय? तिची पूर्ण मेहनत वाया जाते की काय असे तिला वाटू लागले. त्याची ट्रेनिंग संपली, आता त्याची शिपमेंट कोणत्या जिल्ह्यात होते, ते बघायचे होते.

पण पुणे जिल्ह्यातील जिल्हाधिकारीला हार्ट अटॅक आल्या मुळे, प्रकाशाची जागा पुण्यातच देण्यात आली. म्हणजे प्रकाशला पुण्यातच सेवा द्यावी लागणार होती.
सध्याच्या जिल्हाधिकारीला हार्ट अटॅक आल्याने आणि पुण्यातूनच खूप जास्त मार्काने पास झाल्याने, प्रकाशची निवड, पुणे जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी म्हणून झाली. प्रकाश, आपल्याच शहरातील असल्याने, आपल्याला समजून घेईल ह्या आशेने पुण्यातील लोक, खूप आनंदी होऊ लागले होते. प्रकाशला वेगवेगळ्या ठिकाणी बोलवून गौरविण्यात आले, त्याचा सत्कार करण्यात आला. ह्याने सर्वच आनंदी होते, फक्त प्रकाशला सोडून. त्याने मेहनत घेतलीच ह्या करिता की, तो ह्या शहरातून दूर जाऊन, दुसरीकडे कुठेही निकरी मिळाली, तर तो तिथे तरी सुखाने नांदू शकेल/जगू शकेल, पण त्याचे हे स्वप्न स्वप्नच बनून राहणार असे त्याला दिसत होते. त्याच्या नशिबी जणू गुलामगिरीच लिहिलेली असावी असे भासत होते.
ह्या सर्वांत जास्त आनंदी होती, ती म्हणजे त्याची सावत्र आई. तिला ह्याचा आनंद न्हवता की, प्रकाश UPSC मध्ये पास झालाय, तर तिला आनंद ह्याचा होत होता की, प्रकाश पुढेही आपल्या घरीच राहणार, आणि आपण गुलामगिरी करत राहणार, तेही आता मोठ्या पोस्ट वर राहून. प्रकाश जिल्हाधिकारी झाल्याने, मोनाला आणखीनच राग आणि इर्षा होऊ लागली होती. तिला वाटले की, तिचे पूर्ण संपत्तीचे स्वप्न इथेच संपले असावे आणि तो एवढ्या प्रतिष्टीत पोस्ट वर आहे, त्याचे सर्वच जण ऐकणार, त्याचा एक शब्द, पूर्ण पुण्यात संपूर्ण निर्णय म्हणून संबोधले जाणार, आपली आता त्याच्यापुढे जराही किंमत उरणार नाही, असे तिला वाटू लागले. ती आतून जळत होती, त्याच्या यशप्राप्ती वर, की हा प्रकाश आपल्या पुढे गेलाच कसा!
प्रकाशला समजत न्हवते की, तो आनंदी व्हावं की दुःखी व्हावे. पण त्याला कुठेतरी वाटू लागले की, आता आपण जिल्हाधिकारी बनलेलो आहे, म्हणजे ती सावत्र आई, आपल्यावर आधीसारखा हुकूम देणार नाही. आपणही आपल्या कामात बिजी राहणार. प्रकाशचे वडील, आपल्या बिजनेसची ब्रँच वाढविण्याकरिता, बेंगळुरूला गेलेले होते. प्रकाशच्या यशची खबर त्यांच्यापर्यंतही पोहोचली होती. त्यांनी आपल्या मुलासाठी, आधी फोनवरून शुभेच्छा दिल्या, नंतर एक गिफ्ट पाठवून.
प्रकाश जिल्हाधिकारी झालाय, हे ऐकताच योगेशची मात्र दातखडी बसली. त्याला विश्वासच झाला नाही की, योगेश असा कारनामा करू शकणार म्हणून. आता यापुढे तो प्रकाशवर जराही दबाव आणू शकणार नाही, हे त्याला कळून चुकले. पण तरीही ती केस, तोच हँडल करणार आणि प्रकाशला कश्या ना कश्या तर्हेने, गुन्ह्यात अडकविणारच असा निश्चय केला होता. तो आत्ताही आपल्या केसवर लक्ष देऊन होता.
प्रकाशच्या सावत्र आईला, हे समजत न्हवते की, आता ह्यापुढे प्रकाशला कंट्रोल करायचे तरी कसे? आता तो कुणाचेही ऐकणार नाही. पण तरी तिच्याजवळ प्रकाशची अशी किल्ली होती, जी पोलिसांना स्वाधीन केले तर, प्रकाशला पोलीस, सर्वात आधी जिल्हाधिकारीच्या पदवीतुन हकालपट्टी तर करेलच आणि काराववास तर वेगळाच. ह्याचाच फायदा ती घेणार होती. ती आता त्याला गुलामसारखे न वागवता, आपल्या स्वार्थाला, त्याच्या पोस्टच्या माध्यमातून उंचीवर नेण्याचे ती स्वप्न बघत होती. म्हणजे त्याच्या जिल्हाधिकारीच्या खुर्चीचा उपयोग करून ती स्वतःला आणखीनच गर्भ श्रीमंत आणि आपापल्या मुलीला जिल्ह्यात काहीही करण्याचे स्वतंत्र देऊ इच्छित होती. ती आता काळे धंदे, प्रकाशच्या खुर्चीचा वापर करून वाढवू इच्छित होती. मग पूर्ण संपत्ती मोनाच्या नावे करून आणि प्रकाश कारागृहात, राखीच्या मर्डरच्या शिक्षेसाठी आणि आपल्याला काळे धंदे करायला मदत केले म्हणून त्याची शिक्षा आणखीनच वाढेल. इकडे राखी आणि योगेश मजेत राहील, असा तिचा प्लॅन बनला होता.
मोना व तिच्या आईचे संभाषण घडले. मोना फोर्स करत होती की, तिने पोलिसांना सर्व काही सांगून टाकावे, प्रकाशबद्दल आणि पूर्ण प्रॉपर्टीला आपल्या नावाने होण्याचा मार्ग मोकळा होऊ द्यावे. पण तिच्या आईला हे जराही मंजूर न्हवते की, एवढ्या लवकर आपण प्रकाशचे खरे रूप लोकांपुढे आणावे. तिने तर पूर्ण प्लॅन बनवूनही घेतला आणि त्या कामाला सुरूही केले. .ती एका ड्रॅग डीलरला पूर्ण पुणे शहरात, ड्रग सप्लाय करायला हायर केले. जर कुठे अडथडा आलाच, पोलिसांनी जर पकडलेच, तर प्रकाश आहेच, आपला गुलाम, पोलिसांना सांभाळायला.
पण मोनाला ह्याबद्दल काहीही ठाऊक न्हवते. तिला वाटत होते की, आपल्या आईला, सर्व ठाऊक आहे, आणि ती मुद्दाम पोलिसांना सांगत नाही आहे, खरं काय आहे ते. मोनाला वाटू लागले की, आपल्या आईलाच वाटत नाही आहे की, आपण ह्या पूर्ण संपत्तीची मालकीण व्हावे. तिला तर आपलेच स्वार्थ दिसत आहे, प्रकाशला आपल्या कामासाठी गुलाम बनविण्याचे. मोनाला आता आपल्या आईपेक्षा, येणारी प्रॉपर्टीच महत्वाची वाटू लागली. ती पोलिसांपुढे कबुली देणार होती की, तिच्या आईला प्रकाश बद्दल आणि राखी बद्दल सारं काही ठाऊक आहे, पण ती मुद्दाम सांगत नाहीये.
प्रकाशचे ऑफिस, उच्चदर्जाचे मिळाले होते. त्या ऑफिसमध्येच सर्व सोयीसुविधा होत्या. नवीन जिल्हाधिकारीला भेटायला, आमदार, खासदार, पूर्ण मंत्री, सिनेश्रूष्टीतले जवळपासचे कलाकार, असे खूप लोक भेटायला येऊ लागले होते. पूर्ण पुणे शहर सांभाळायचे असल्याने, प्रकाशवर जास्त ओझं येऊ नये म्हणून त्याची मदत करायला एक असिस्टंट देण्यात आले, ज्याचे काम, फक्त प्रकाशची मदत करणे होय. तरीही जास्तच बर्डन आले तर, ते जिल्ह्यातील उपजिल्हाधिकारीकडे काही कामं सोपविणार होती. प्रकाशला मिळालेल्या असिस्टंटचे नाव, अरफाज खान होते. प्रकाशचा आपल्या असिस्टंटवर जराही विश्वास वाटत न्हवता, एकतर नवीन असल्याने आणि त्याचा स्वभाव जरा विचित्र असल्याने. पण अरफाज खानला आपल्या बॉसचा विश्वास जिंकायचाच होता, कुठल्याही परिस्थितीत. त्यासाठी प्रकाशसोबत आधी मैत्री करावी लागणार होती. प्रकाश त्याला अरफाज म्हणून बोलवू लागला, पण त्याने प्रकाशला विनंती केली की, तो आपले नाव 'खान असिस्ट' म्हणून घ्यावे. त्याच्या म्हणण्यावरून प्रकाश त्याला खान असिस्ट म्हणूनच हाक देऊ लागला. येथे खान म्हणजे त्याचे आडनाव आणि असिस्ट म्हणजे असिस्टंट.
ऑफिसचे पूर्ण काम करून, प्रकाश आपल्या घरी परतला. घरी येताच आपल्या खोलीत गेल्यावर त्याची सावत्र आई त्याच्या मागे आली.

त्याची आई, "कसा गेला आजचा दिवस?"

प्रकाश, "ते सोडा, पण मला माफ करा! आता मी तुमची जास्त कामं करू शकणार नाही, मला दिवसभर खूप काम असतात, त्यांना पूर्ण करून आल्यानंतर, मी पूर्णतः थकलेला असतो, माझ्यात एवढी ऊर्जा नाही की, ऑफिस सांभाडून, तुमची सारी काम करून घेईल."

त्याची आई, "ठीक आहे बाळा! पण तू खूप मोठ्या पोस्ट वर पोहोचला आहेस, तर कामं ही खूप असतील, मी समजू शकते, मला अभिमान आहे, की तू आमचे नाव रोशन केले. काही हरकत नाही, आमच्या कामाचं जास्त लोड घेऊ नकोस, मी सर्व काम करायला पुन्हा नोकर ठेवील, पण तुला माझी काही कामं करून द्यावी लागेल... नाही! काम सोप्पीच आहेत, तू ते अगदी सहजगत्या करू शकतोस. त्यात तुझा वेळी जाणार नाही!"

प्रकाश(जरा आनंदातच), "सांगा, कोणती कामं?"

त्याची आई, " काही खास नाही, मी एक छोटासा बिजनेस चालू केला आहे, पण मला ते बिजनेस करायला, एक अडथळा येतो, नेहमीच, फक्त त्या अडथडाला तू सांभाडून घे, बस्स झालं... तो अडथळा म्हणजे पोलीस!"

प्रकाश, "असा कोणता बिजनेस आहे, की तुम्हाला पोलिसांची भीती वाटत आहे?"

त्याची आई, "काही नाही रे, बिजनेस अगदी साधाच आहे, खूप जास्त आजारी श्रीमंत लोकांना, महागड्या औषधी त्यांच्या घरी पोहोचवून द्यायच्या! म्हणजे सरळ सांगायचे झाल्यास, ड्रग्सच्या आहारी गेलेल्या अतिश्रीमंत लोकांना, ड्रग्स पुरवून, जराशा पावडरसाठी तडपून राहिलेल्या त्या लोकांचे प्राण वाचविणे आणि त्यांचे आशीर्वाद घेणे! हा साधासा बिजनेस!!"

प्रकाश, "काय? तुम्ही ड्रग्स सप्लाय करणार? हे इल्लीगल आहे, ठाऊक नाही काय तुम्हाला? तुमच्याकडे पैश्यांची काय कमतरता आहे, की तुम्हाला पुन्हा पैसे हवेत? आणि मी त्यात काय मदत करू?"

त्याची आई, "अरे पैसे कितीही असले तरी ते कमीच पडत असतात, माणसाने काहीतरी काम करत राहिले पाहिजे! ड्रग सप्लाय केलं तर काय झालं? काही अपराध वगैरे नाही त्यात, आणि पोलिसांना माहीतच होऊ दिले नाही तर कसला अपराध? आणि त्यासाठीच तर तुझी मदत हवी आहे ना मला.... हे बघ, आता तू जिल्हाधिकारी झाला आहेस, तू सर्व पोलिसांना कंट्रोल करू शकतोस... म्हणून मी तुला म्हटले की, जर पोलिसांनी आम्हाला पकडले, तर तू सांभाडून घे, त्या पोलिसांना तू कंट्रोल कर, बस्स एवढंच तुझं काम, हे तू ऑफिस मधूनच, एका फोन कॉल वरूनच हे करू शकतोस!"

प्रकाश, "हे पूर्णतः गैरकानूनी आहे! मी असे काहीही करणार नाही, मी आपल्या अधिकारांचा असा फायदा उचलूच शकत नाही, कुठल्याही परिस्थितीत! जर असे केले आणि लोकांना ठाऊक झाले, तर माझी काय इमेज राहील, लोकांसमोर?"

त्याची आई, "जर तू पोलिसांना कंट्रोल केला नाहीस, तर मी त्याच पोलिसांना तुझ्या करनाम्याची पूर्ण खबर देईल, आणि अजून राखीचे शव पूर्ण विघटित झाले नसेलच... जर पोलिसांना तू केलेल्या कत्तलीबद्दल सांगितले तर, तुझी इमेजच काय, तुझी नुकतीच लागलेली नोकरी तर जाईलच, ज्यासाठी एवढी मेहनत केलीय, सोबतच कारावास तो वेगळाच! आता बघ तुला काय करायचे तर!!"

प्रकाशकडे आता दुसरा कोणताही पर्याय शिल्लक न्हवता. ह्या गुलामगिरीतुन कधीच मुक्तता मिळणार नाही, असेच त्याला वाटू लागले. त्याला हे नको होतं, त्याला स्वातंत्र्य आयुष्य जगायचं होतं. त्याला एवढ्यातच आठवले की, तो आत्महत्या करायला जाणार होता, तेव्हाच त्याने निश्चय केले होते की, तो ह्यापुढे अगदी मनमर्जीने आयुष्य जगणार. पण त्याची सावत्र आई अशी होऊच देत न्हवती. त्यावेळी त्याने पूर्णपणे, स्वइच्छेने निर्णय घेण्याचे त्याने ठरविले होते, पण त्याची आई, त्याला त्याच्या इच्छेनुसार काहीही होऊ देणार न्हवती. त्याला कुठेतरी वाटतच होते की, पुढे जाऊन, जेव्हा तिचा पूर्ण आपला उपयोग करून होईल, तेव्हा ती आपल्याला जेलात नक्कीच कोंबेल आणि पूर्ण संपत्ती आपल्या मुलीच्या नावे करून घेईल, अशी त्याला भीती वाटत होती. ही त्याची भीती खरी असली तरीही, तो ह्यात काहीही करू शकत न्हवता. पण जेव्हा त्याने राखीला ठार केले, फक्त काही दिवस चिंतेत गेले, पण नंतर तिच्या जाण्याने, मनात आनंदच होता, शांती होती, तिच्या कर्माची शिक्षा तिला मिळाली होती, असे त्याला वाटू लागले. पण जर त्याच्या आईला ठाऊक झाले नसते, तर किती चांगले झाले असते, असा त्याला विचार आला. त्याच्या मनात हा एक विचार नक्कीच येत होता की, ज्याप्रमाणे राखीला ठार केल्यानंतर, सर्व ठीक आणि सुरळीत दिवस गेलेत, तसेच सावत्र आईला ठार केल्यानंतरही कदाचित अशीच सुखाची सरंगिनी येईल, असे त्याला वाटू लागले. कमीतकमी गुलामगिरीचे आयुष्य तर सुटून जाईल. ती राहिली नाही तर, तिची मुलगी, मोना आपल्यावर हुकूम टाकणार नाही आणि महत्वाची गोष्ट म्हणजे, राखीच्या खुनाची पूर्ण माहिती, सावत्र आईच्या मृत्यूसोबतच नष्ट होईल. पण तरीही त्याला आपल्या सावत्र आईला ठार करण्याची जराही हिम्मत होत न्हवती, मुळात त्याला पुन्हा गुन्हा काही करायचा न्हवताच!
मोनाने योगेशला साथीदारांना, म्हणजेच CBI च्या बाकीच्या सदस्याला सांगून टाकले की, तिच्या आईला, राखी बद्दल आणि प्रकाशाच्या तिच्यासोबतच्या कनेक्शन बद्दल ठाऊक आहे. ती त्या अधिकाऱ्यांना म्हणाली की, आपल्या आईकडून ते सत्य तिच्या तोंडून काढावा, जर ती सांगायला नकार देत असली, तर तिला जरा टॉर्चर करून सत्य माहीत करून घ्यावे जर तिला ह्यासाठी मारावे लागले तरी चालेल. मोनाच्या म्हणण्यानुसार, तिच्या आईला बोलाविण्यात आले, चौकशीकरिता.
ती चौकशीसाठी गेली आहे, हे प्रकाशला ठाऊक झाले होते. त्याला भीती वाटू लागली की, ती आपल्याबद्दल सारं सांगून तर टाकणार नाही म्हणून! तिला अधिकाऱ्यांनी खूप प्रश्न विचारलेत. अगदी वेगवेगळ्या तर्हेने, जेणेकरून, ती कॉन्फ्युज व्हावे आणि सत्य काय ते सर्वाना सांगून द्यावे. पण तिला मारूनही तिने CBI च्या अधिकाऱ्यांना काहीही सांगितले नाही. तिने आपले वचन मोडले नाही.
मोनाला, तिच्या आईबद्दल ठाऊक झाले की, तिने प्रकाशबद्दल काहीही सांगितले नाही, ह्याने मोना खूप रागावली. ती आपला राग काढण्यासाठी, तिला आपल्या खोलीत बोलाविले. मोनाचे आईने सर्वात आधी तिचा ड्रग्स बद्दलचा प्लॅन, मोनाला सांगितला. पण मोनाचा राग आसमानात पोहोचलेला होता.

"का सांगितली नाहीस गं, प्रकाश बद्दल? मला ठाऊक आहे की, तुला सर्व माहीत आहे म्हणून! पण तरीही त्यांना सांगितलंस का नाही?" मोना अगदी रागात तिला म्हणाली...

"अगं तू कशाला त्याचा त्रास घेते आहेस? ती रागावू नकोस बरं! मी करेल ना सगळं ठीक, विश्वास ठेव माझ्यावर! मी नेहमीच तुझ्या भल्याचाच विचार करत असते, मी जे काही लपवत आहे, ते तुझ्याच भल्यासाठी आहे. मी प्रकाश कडून काम काढून, जेवढा मझ्याने पैसा जमेल, तेवढा फक्त तुझ्यासाठीच कमावून, नंतर वेळ आली की, सांगेल ना, जे मला ठाऊक आहे ते! आता शांत हो बरं!!" मोनाची आई तिला शांत करत म्हणाली...

"मला ठाऊक आहे की, तुला राखी बद्दल सारं ठाऊक आहे म्हणून...तर सांगून टाक ना, त्यांना, सांगून हो ना मोकळी! तू माझ्या भल्याचा एकही विचार करत नाहीयेस, जर करत असतीस तर तू केव्हाच सांगून टाकले असती... तुला तर त्याला गुलाम बनवूनच ठेवायचे आहे. तू तर स्वतःचंच स्वार्थ बघत आहेस. तुला ठाऊक आहे की, प्रकाशचे सत्य त्यांना सांगून टाकले की, प्रकाश जेलात असेल आणि माझ्या हाती संपत्ती, आणि मी एशोआरामत राहील. असे असूनसुद्धा तू सांगत का नाही आहेस? ह्यावरून हेच समजते की, तू फक्त स्वतःचे स्वार्थ बघत आहे! जर खरंच माझी चिंता होत असेल तर, सांगून टाक सारंच! मला नकोय तो गुलाम, आणि तू कमावलेली मालमत्ता, मला फक्त त्याची संपत्ती हवीय, तो गुलाम नाही!! तुला समजत कसं नाही गं? की तुला समजायचं नाही? मला सुखात बघायचं नाही?" मोना खूप रागात आणि रडत दम घेत म्हणाली...

मोनाला आलिंगन देऊन, " शांत हो मोना! ठीक आहे, जर तुला प्रकाश कारागृहात गेल्यावरच चैन पडत असेल, तर ठीक आहे! मी त्यांच्यापुढे प्रकाशचे, राखीबद्दलचे पूर्ण सत्य सांगून टाकेल, पण तू अशी रडू नकोस आणि रागावू नको! हे बघ मी तुझ्यावर खूप प्रेम करते, तुझ्यासाठी त्याला जेलातच काय तर फासावर लटकवायला तैयार आहे... पण तू शांत हो, आता बस्स झालाय प्रकाशाच्या गुलामगिरीच्या खेळ आणि माझ्या पैसे कामविण्याची हौस, मी CBI अधिकाऱ्यांना सारंच सांगून टाकेल, ओके बेबी? आता तरी खुश?"
प्रकाश आपल्या ऑफिसमधून, सायंकाळी नुकताच आला होता. त्याला मोनाचा रडतानाचा आणि ओरडतानाचा आवाज येऊ लागला होता. तो तिच्याच खोलीबाहेरून आत काय चाललंय हे ऐकत होता...
प्रकाशने दोघांचं संभाषण पूर्ण ऐकलं. दोघांचे आपल्याविरुद्धचे काय प्लॅन आहेत, त्याला कळून चुकलं. म्हणजे ह्यांच्या म्हणण्यानुसार, आपल्याला कारागृहात टाकणार आणि आपल्या वडिलांची पूर्ण संपत्ती, मोना आपल्या नावाने करणार...
प्रकाश आपल्या खोलीत आला. आता त्याच्याकडे कुठलाही पर्याय दिसत न्हवता. आत्ताही प्रकाशचे दोघींवर लक्ष होते. त्याला भीती होती की, त्याची आई, मोनाला सारंच सांगून तर टाकणार नाही ना? जर मोनाला आपल्याबद्दल कळलं, तर स्वतःला कारागृहात जाण्यापासून वाचविण्यासाठी, दोघांनाही एकतर गायब करावं लागेल, ते शक्य न्हवतं, किंवा दोघांनाही ठार करावं लागणार होतं. पण रात्री झोपेपर्यंत त्याच्या आईने मोनाला राखीबद्दल काहीही सांगितलेलं न्हवतं. त्याची आई, सरळ CBI अधिकाऱ्यांना सांगणार होती, म्हणजे प्रकाशसोबत केलेले एक वचन, म्हणजे मोनाला राखीबद्दल काहीही सांगणार नाही, ती हे मोडणार न्हवती.
मायलेकी दोघेही आपापल्या खोलीत झोपी गेलेत. त्याच्या आईला, आपण उद्या सारंच CBI अधिकाऱ्यांना सांगणार आहे आणि आपला इमानदार गुलाम आता कारागृहात जाणार आहे म्हणून तिने, चिंतेने रात्रीचे जेवण केले नाही. मोनाला, तिचा पूर्ण प्लॅन सक्सेस होत आहे, ह्या आनंदाने भूक काही लागली नाही आणि ती अशीच झोपी गेली. प्रकाश आपल्या खोलीत, विचारात बुडाला होता.
प्रकाशला ठाऊक झाले की, आता सावत्र आईला ठार केल्याशिवाय दुसरा कुठलाच पर्याय दिसत नाही आहे. पण तिला ठार करायचेच कसे? हा त्याच्यापुढे प्रश्न! ती उद्याच सांगणार आहे, आपले पूर्ण सत्य. म्हणजे तिला आजच्याच रात्री ठार करावे लागणार, हे निश्चित होते. फक्त मोनालाच ठाऊक आहे की, ती उद्या आपल्या विरुद्ध विधान देणार आहे. पण रात्रीच ठार करून, तिला न्यायचे कुठे? पूर्ण प्लॅन बनला तर नाहीच! जर काही चुकी झाली तर... आणि पोलिसांना दोन्ही खुनाचे रहस्य आपणच आहोत हे समजले तर?... पण रिस्क तर घ्यावीच लागणार होती.
ती खोलीत एकटीच झोपलेली असेल. तिच्या खोलीत कॅमेरा नाही, मात्र बाहेर हॉल मध्ये आहे, त्याला आधी एडिट करावे लागणार होते. प्रकाशला ठाऊक होते की, दोघांनाही ठाऊक नाही आहे की, आपण घरी आलेलो आहे म्हणून. ह्याचा फायदा नक्कीच प्रकाशला होणार होता. पण तरीही, संशय आपल्यावर येईल, हे निश्चित होते. ह्यासाठी, हे सिद्ध करावे लागणार होते की, आपण अजून घरी आलेलो नाही. म्हणजे आपण रात्रीचा मुक्काम, आपल्या ऑफिसमध्येच केला आहे. सोबतच काहीही संशय येता कामा नये म्हणून, तिला अगदी नैसर्गिक मृत्यू द्यावा लागेल. पण आपण ऑफिस मध्येच आहो, ह्याचा काय पुरावा? ठीक आहे ऑफिस मधल्या CCTV कॅमेराला जरा एडिट करून घेऊ, पण तरीही, जिल्हाधिकाऱ्यांची सावत्र आई असली तरी काय झाले? पण चांगलीच चौकशी होईल, हे निश्चित होते, सोबतच मोना ह्या केसला सहजगत्या सोडणार नाही, हेही तितकेच खरे. प्रकाशला अश्याप्रकारची खूप प्रश्ने येऊ लागली होती.
अश्या स्थितीत आपली बाजू, पूर्णपणे सुरक्षित करण्यासाठी, कुणीतरी आपल्या पक्षात बयान देणारा हवा; पण असा कोण असेल, जो आपल्याला वाचविण्यासाठी खोटं बोलू शकतो? त्याला तेवढ्यातच आठविले, खान असिस्ट बद्दल! पण त्याच्यावर विश्वास ठेवणे म्हणजे, आणखी एक मोठी रिस्क घेणेच होय, जसे पहिल्यांदा त्याने दारूच्या नशेत मनन हलके करण्यासाठी रिस्क घेऊन त्याच्या सावत्र आईला सांगून टाकले तसेच. पण आत्ताची स्थिती पाहता, खान असिस्ट वर विश्वास ठेवावाच लागणार होता.
प्रकाशने रात्री बारा वाजेपर्यंत, खूप विचार करून प्लॅन बनवून टाकला. आधीप्रमाणेच त्याने दोन प्लॅन बनवून ठेवले, प्लॅन A आणि प्लॅन B. प्लॅन बनविला, आता जराही वेळ न घालविता, प्लॅनला सत्यात घडवायचे होते. पण सगळ्यात महत्त्वाची कडी म्हणजे, खान असिस्ट. जर त्यानेच नाही म्हटले, तर हा प्लॅन सक्सेस होऊच शकणार नाही, हे मात्र फिक्स होते. म्हणूनच सर्वात आधी, त्याने खान असिस्टला फोन केला. तो नुकताच झोपला होता.

"बोलीये साहब, इतनी रात को कॉल किया? काही गडबड आहे काय?" खान असिस्ट अर्ध झोपेत पण गांभीर्याने विचारला.

"मला तुझी मदत हवीय, एक खूप मोठं काम करायला!" प्रकाश म्हणाला...

"हुकूम दिजीए साहब! मुझे क्या करना होगा? तुम्ही जे म्हणाल ते मी करेल साहब, फक्त एकदा बोलून तर बघा!" खान असिस्ट उंच आवाजात म्हणाला.

"एकाचा खून करायचा आहे" प्रकाश.

"क्या? मर्डर? किसका? खरंच काय साहब?" खान असिस्टला घाम फुटू लागला.

"होय... मर्डर! तेही आत्ताच... जर मी असे केले नाही तर, माझे जीवन नष्ट होईल. मला आधी सांग की, तुला जमणार की नाही?" प्रकाश म्हणाला.

"अगर आपकी जान को बचाने के लिये होगा तो, ठीक है! पण मी असं कधीच नाहै केलं साहेब! म्हणजे मर्डर मलाच करावा लागेल काय? पर मै अभी इसके लिये तैयार नाही हू साहब!" खान असिस्ट अडकत म्हणाला.

"मर्डर तुला नाही मलाच करायचा आहे, तुला फक्त माझी मदत करायची आहे..." प्रकाशने असे म्हणून त्याला आपला पूर्ण प्लॅन समजावून सांगितला.

बॉसचा ऑर्डर आल्याने, आणि असे केल्याने बॉसचे खरंच प्राण वाचत असेल तर, हीच ती वेळ आहे, आपल्या बॉस चे मन जिंकायची, म्हणून त्याने पुढचे पुढे जे होईल ते बघितल्या जाईल, असे म्हणून प्रकाशला होकार दिला आणि दोघेही प्लॅनचा आरंभ केला.
प्लॅननुसार, सर्वात आधी प्रकाशने, खान असिस्टला आपल्या घरी बोलाविले, पण तेही मागील बाजूने. तो येईपर्यंत प्रकाशने, मेन हॉल मध्ये, एका कोपऱ्यात एक फाईल ठेऊन दिली. तो फाईल ठेऊन परत आपल्या खोलीत आला. आता त्याला आपल्या घरातील CCTV कॅमेराचा पूर्ण खेळ बद्दलवायचा होता. प्रकाश जसा ऑफिस मधून घरी आला, आणि जसा तो आपल्या कार मधून उतरला, त्याला तो सिनच कापायचा होता. प्रकाश काही तासापूर्वी घरी आल्याबरोबर कारमधून उतरणार, त्या भागाला फ्रिज केले. म्हणजे तो अजून कार मधून उतरला नाही. त्याची एडिटिंग झाली.
नंतर त्याने आपल्या घरातील मेन हॉलच्या CCTV एडिटिंग करायला सुरुवात केली. तो काही तासापूर्वी जसा घरात शिरणार होता, तो भागच एडिट करून कापून टाकले. म्हणजे तो घरात अजून शिरलेला नाही. ह्या दोन सेटिंग ने झाले असे की, आता पुरावा नाहीच की, तो घरी आला आहे म्हणून. सोबतच मोना आणि तिच्या आईलाही ठाऊक नाही की, प्रकाश घरी आलाय म्हणून. पण मग कार कोण आणली? ह्याचा पण तोडगा होता प्रकाशकडे.
एवढ्यातच खान असिस्ट, प्रकाशच्या घराच्या मागे आला आणि फोन केले. प्रकाश मागूनच त्याला घरी आणले. त्याला आपल्या प्लॅनबद्दल सांगितले. बाहेरील CCTV अजूनही फ्रिज होऊन आहे. प्लॅननुसार हळूच खान असिस्ट, मागूनच प्रकाशच्या कार जवळ पोहोचला. कारचे दार उघडले आणि आत बसला. जसा तो आत बसला, तसा प्रकाशने, फ्रिज केलेला CCTV पुन्हा चालू केला. प्लॅननुसार खान असिस्ट कार मधून बाहेर आला, आणि घरात शिरणारच, एवढ्यात, प्रकाशने आतूनच, मेन हॉल मधला फ्रिज केलेला CCTV कॅमेरा चालू केला. खान असिस्ट कोपऱ्यात ठेवलेली फाईल घेऊन, परत कार मध्ये बसून, तिथून निघून गेला, तो मेन रोड ने न जाता, गल्ल्यातून गेला, जिथून CCTV नसेल, अश्या तर्हेने सरळ तो आपल्या घरी गेला.
प्रकाशने आपल्या जागी, खान असिस्टला असे फिट बसविले की, जणू, प्रकाश घरी आलाच न्हवता, तर खान असिस्ट, प्रकाशच्या कारने येऊन,फाईल घेऊन आपल्या घरी गेला. असे करण्याचे कारण म्हणजे, तो फक्त घरील CCTVला कंट्रोल करू शकत होता, पण मेन रोडवरील CCTV कॅमेरात तर कैद झालेच होते की, प्रकाशची कार त्याच्या घराकडे निघाली. पण कुणाला ठाऊक की, आत मध्ये प्रकाश होता की, खान असिस्ट? घरील कॅमेरे बघितल्यावर, असे दिसेल की, खान असिस्ट गाडीतून उतरून फाईल घेऊन आपल्या घरी गेला.
म्हणजे आता प्रकाश घरी आल्याचा एकच पुरावा राहतो, ते म्हणजे त्याच्या ऑफिस मधील एक CCTV कॅमेरा, तो ते नंतर बघणार होता. आता प्रकाश सरळ त्याच्या सावत्र आईच्या खोलीत गेला. ती झोपलेली होती, तिला सर्वात आधी झोपेतून उठविले.

"मी काही वेळापूर्वी, मोना आणि तुमचं सारं संभाषण ऐकलं! तुम्ही उद्या राखीबद्दल सारंच CBI अधिकाऱ्यांना सांगणार? म्हणजे तुम्ही माझा विश्वासघात करणार?" प्रकाश.

"अरे नाही रे! म्हणजे... तसं नाही, मी फक्त खोटं..." तिचं वाक्य पूर्ण होण्याआधीच प्रकाश म्हणाला, "आता मला वेड्यात काढू नका! तुम्ही मला आता जेलात टाकून, पूर्ण संपत्ती, मोनाच्या नावे करणार? म्हणजे सरळ सरळ म्हणायचं झालं तर, आधी माझ्या परिस्थितीचा फायदा घेऊन, मला नोकरासारखे वागवून घेतले, आता काम झाल्यानंतर, मला कारागृहात टाकायचा तुमचा प्लॅन सुरू आहे?" प्रकाश डोळ्यात डोळे टाकून म्हणाला...

"हे बघ, मला ते काहीही ठाऊक नाही! तू गुन्हा केलाय, म्हणजे तुला शिक्षा तर मिळायलाच हवी... हे बघ आपण काहीतरी तोडगा काढू शकतो ह्यात! मी जसे म्हणते तू तसे कर, कदाचित तू कारागृहात जाण्यापासून वाचू शकतोस. जर माझे म्हणने ऐकला नाहीस तर, मी आत्ताच्या आत्ता जाऊन सांगून टाकेल..." त्याची सावत्र आई, घाबरून.

"मला वाटत होते की, आईच प्रेम मला तुमच्या रुपात कधी ना कधी नक्कीच मिळेल, कधीतरी तुमच्या मनात माझ्याबद्दलची मायेची भावना नक्कीच जागरूक होईल, पण असे कधीच झाले नाही, मला आईचं सुख कधीच लाभलं नाही. तरीही मी तुमचं मन राखायला, तुमच्या मनात माझ्या बद्दलची एक प्रेमाची जागा मिळवायला, तुम्ही सांगितलेलं, तुमचा प्रत्येक आदेश, आत्तापासूनच नाही, तर खूप आधीपासून ऐकत आलेलो आहे. नेहमीच तुमच्या बोलण्यातून एक मायेची भावना, माझ्या मनात निर्माण होत होती, पण दुसऱ्याच क्षणी ती फक्त पोखड माया आहे, हे समजून जात होते. शेवटी खरी आई ती खरीच ना? ती फक्त आपल्याच मुलावर प्रेम करेल, दुसऱ्याच्या कशाला करेल? मी पण अगदी वेडा, अश्या आशेत होतो की, तुमचं प्रेम नक्कीच मिळणार, जरी त्यासाठी खूप काळ वाट बघावा लागला तरी चालेल, पण आज समजलं की, मला फक्त विश्वासघातच मिळणार होता." प्रकाशचे डोळे पाणावलेले होते.

"हे बघ मी तुझ्यावर कधीच प्रेम केलेले नाही, तू माझ्या पोटचा मुलगा नाहीच ना? ते सोड, पण आत्ताही आपण काहीतरी करू शकतो, मी माझ्या मुलीला वचन दिले की, उद्या मी तुझी पूर्ण पोळ CBI जवळ खोलणार, आणि मी वचन कधीच मोडत नाही. माझ्याकडे एक प्लॅन आहे, तू आज रात्रीच इथून पळून कुठेतरी दूर जा आणि तुझे पूर्ण अस्तित्व, तुझी पूर्ण संपत्ती विसरून जा, दूर कुठेतरी जाऊन नवीन आयुष्य सुरू कर, पोलीस तुला जास्त काळ शोधू शकणार नाही, एवढ्या दूर तरी निघून जा... माझं ऐक, नाहीतर, मी आत्ताच पोलिसांना सारंच सांगेल बरं!" त्याची सावत्र आई म्हणाली.

"तुम्हाला काय वाटतं? अजूनही मी तुमचा गुलाम आहे? आणि मी एकाचा (राखीचा) खून केलाय म्हणजे ह्यापुढे एकही खून करू शकणार नाही? असे तुम्हाला वाटते? तुम्ही चुकत आहेत! खरंतर तुम्ही मला गुलाम बनवूनच खूप मोठी चुकी केलीत. आता राखीप्रमाणे, तुम्हालाही मरावं लागेल आणि ह्यावेळी तुम्हाला मारल्यानंतर मी दारू ही पिणार नाही आणि कुणालाही तुमच्या खुनाबद्दल सांगणार नाही. तुम्ही कुणालाही राखीबद्दल सांगितले नाही, ह्याचे मी तुमचे आभारी राहील, पण आता तुम्हाला मरावं लागेल" प्रकाश रागात म्हणाला.

प्रकाशचे काही सांगता येणार नाही म्हणून त्याची सावत्र आई, घाबरून आरडाओरड करून, मोनाला उठविण्याचा प्रयत्न करू लागली आणि दाराजवळ जाऊन, बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागली. पण प्रकाशने तिचा हात धरून, ओढून तिच्या बेडवर आपटले. ती बेडवर झोपलीच असता, तो तिला खूप घाबरविण्याचा प्रयत्न केला. "मी तुम्हाला सोडणार नाही, तुम्हाला आता मारून टाकणार, तुम्ही आता इथेच मरणार आहे, तुम्हाला कुणीच वाचवू शकणार नाही, तुमचीही राखीसारखी अवस्था होईल..." असे म्हणून म्हणून, प्रकाशने तिला खूप जास्त घाबरविले. ती खूप घाबरली गेल्याने, ती घामचित्त झाली होती, तिच्या डोळ्यांची बुबुळे मोठे झाली होती, तिच्या तोंडून एकही शब्द बरोबर बाहेर पडत न्हवता, तरीही तिच्या तोंडून काही शब्द बाहेर पडले, "माझ्या मोनाला... जगू दे..." अश्यातच प्रकाशने उशी घेतली आणि तिच्या तोंडावर लावायच्या आतच तिचे प्राण गेले. तिला हार्ट अटॅक आला. तिला आधीच हाय ब्लड प्रेशरचा त्रास होत, हे प्रकाशला ठाऊक होते.
प्रकाशने तिच्या खोलीतील सारं नीट नेटके करून, आपल्या खोलीत परतला. जणू असेच भासत होते की, तिला जणू झोपेतच हार्ट अटॅक आला असावा. प्रकाशने आपल्या खोलीतून, सारं चेक केले की, सगळं प्लॅननुसार घडत आहे की, नाही ते. तो मागील दरवाजातूनच, जिथून खान असिस्ट आला होता, तिथून घराच्या बाहेर पडला.
प्लॅननुसार,खान असिस्ट, प्रकाशची कार आपल्या घरी ठेऊन, आपली बाईक घेऊन आला होता. बाहेर खान असिस्ट, आपली बाईक घेऊन हजर होता. प्रकाश त्याच्या गाडीवर बसुन, गल्ल्यातुनच त्यांचे ऑफिस गाठले. प्रकाश आत गेला. आत जाताच आपला लॅपटॉप खोलले. ऑफिसच्या मेन CCTV कॅमेराला आधी फ्रिज केले आणि खान असिस्टला, आत बोलावून, कॅमेरा चालू करून, बाहेर जाण्यास सांगितले. खान असिस्ट बाहेर गेला, तो सरळ आपल्या घरी. प्रकाश तिथेच झोपी गेला.
आता CCTV कॅमेरानुसार असे दिसेल की, प्रकाशच्या बोलण्यावरून, खान असिस्ट, ऑफिस मधून गेला, प्रकाशची कार घेतली त्याच्या घरी गेला, फाईल घेऊन आपल्या घरी गेला. प्रकाश तिथेच झोपी गेला. प्रकाश घरी आलाच नाही, हेच मोनाला ठाऊक होते. मोनाच्या आईला, झोपेतच हार्ट अटॅक आला, हे ह्यावरून सिद्ध होते.
मोना सकाळी लवकरच झोपून उठली, खूप दिवसानंतर पहिल्यांदा उठली असेल कदाचित. तिला उत्सुकता होती, आजच्या दिवसाची, कारण आज तिची आई, CBI अधिकाऱ्यांना सारंच सांगून टाकणार होती, जे तिला प्रकाशबद्दल ठाऊक आहे. त्यानंतर, प्रकाश कारागृहात, आणि ती योगेशसोबत मजेत राहील, असा तिचा प्लॅन होता. ती पटकन स्वतःला सावरून घेतले, फ्रेश होऊन तैयार झाली. सकाळचे आठ वाजायला येत होते. मोना तिच्या आईच्या खोलीत गेली, हे बघायला की, ती अजून उठली की नाही. जशी मोना तिच्या खोलीत गेली, ती झोपलेल्याच अवस्थेत होती. मोना ओरडली, "मम्मा! अजून उठली नाही काय तू? उठ बरं पटकन! आपल्याला जायचं आहे ना, योगेशकडे! विसरली काय?" एवढे म्हणूनही तिची आई काही उठली नाही.

"मम्मा... ए मम्मा... उठ ना, काय झालंय? तब्येत ठीक नाही काय तुझी?"
तरीही उत्तर नाही. मोनाला काहीतरी गडबड वाटू लागली. ती, तिच्याजवळ गेली. तिला हलवून उठविण्याचा प्रयत्न केला, पण ती अगदी स्तब्ध अवस्थेत होती. मोनाने लगेच, तिचे श्वास चेक केले. ती श्वास घेत न्हवती. हे बघून मोना खूप घाबरून गेली, तिने पुन्हा तिला उठविण्याचा प्रयत्न केला. आता तिला कळून चुकले की, तिची आई ह्या जगात नाही.
मोनाला हे समजताच, तिचा बांधा फुटला. ती ऑक्सबोक्शी रडू लागली. तिला समजत न्हवते की, हे झालेच कसे? पण तरीही स्वतःला धीर देऊन, स्वतःला सावरत, अम्ब्युलन्सला फोन केला. काही वेळातच अम्ब्युलन्स आली, पण नर्सने, ती मरण पावल्याची खबर दिली.

"असे कसे होऊ शकते? ती कालपर्यंत माझ्यासोबत खूप चांगली बोलत होती... ए तुम्हाला काही समजत नाही, तुमच्या डॉक्टरला बोलवा, तेच बघतील, तेच ठीक करतील माझ्या मम्माला!" मोना दम टाकत रडून म्हणाली.

"नाही मॅडम, आता ह्या आपल्या जगात नाहीत... सावरा स्वतःला!" ती नर्स.

मोना खूप घाबरून गेली, तिने लगेच योगेशला फोन करून, आपल्या घरी बोलावून घेतले. मोना खूप जास्त घाबरत बोलताना बघून, योगेश पटकन तिच्या घरी आला. येताच, मोनाला सावरले, आणि तिच्या आईला, पोस्टमार्टेम करायला नेण्यास सांगितले.

"योगेश, प्लिज तिला वाचव ना! तिला आपण खूप मोठ्या हॉस्पिटल मध्ये नेऊयात, नकीच वाचेल ती!" मोना योगेशला घट्ट पकडून म्हणाली.

"मोना... स्वतःला सांभाळ! ती आता आपल्या सोडून गेलीय! पण मला सांग हे झालेच कसे?" योगेश तिला शांत करून म्हणाला.

"माहीत नाही योगेश! काल आमचं बोलणं झालं, ती आज तुमच्या पूर्ण CBI टीम वाल्याणा, प्रकाश आणि राखी बद्दल सारंच सांगणार होती, तिला मी कालच कॉन्व्हेंस केलं होतं, पण आज सकाळी तिच्या खोलीत येऊन बघते तर ती..." मोना खूप रडू लागली...

"शांत हो! पण तो प्रकाश कुठे आहे? घरीच असेल ना तो?" योगेश म्हणाला.

"मला नाही ठाऊक! कदाचित तो काल घरी पण आला न्हवता... पण प्लिज योगेश काहीतरी कर ना! मी आईशिवाय नाही जगू शकत... मला नकोय पूर्ण प्रॉपर्टी, प्रकाशलाच ठेऊन घे म्हण! पण माझ्या आईला परत आन ना!" मोना रडून म्हणाली.

"मोना! बी प्रॅक्टिकल! सावर स्वतःला!! ती परत येणार नाहीये! पण आपण, खुलासा नक्कीच करू की, तिचा मृत्यू नैसर्गिक होता की, घातपात!" योगेश म्हणाला.

"म्हणजे? तुला काय म्हणायचे आहे?" मोना स्वतःला सावरून म्हणाली.

एवढ्यातच योगेशला पोस्टमार्टेमचा प्राथमिक अंदाज कळविण्यात आले. तिला कदाचित हार्ट अटॅक आला असावा असे निष्कर्ष लावण्यात आले. सोबतच तिच्या शरीरावर कुठल्याही प्रकारचा घातपात आढळून आला नाही. ही माहिती, योगेशने लगेच मोनाला दिली.

"काय? हार्ट अटॅक? पण ती तर स्वतःची खूप काळजी घ्यायची ना! ती नेहमीच ब्लड प्रेशरच्या गोळ्या नियमित घेत होती. ती टेन्शनही घेत न्हवती कधीच. सर्वांसोबत अगदी कमी आवाजात बोलायची, मग असे अचानक झालेच कसे?" मोना योगेशला म्हणाली.

"इथेच तर मला काहीतरी गडबड वाटत आहे! हे बघ, ती आपल्या पर्हेनें आपली पूर्ण काळजी घेत होती. मी आत्ताच तुझं घर चेक केलंय, प्रकाश घरी नाही आहे! तुम्ही काल, प्रकाश आणि राखी बद्दल, आम्हाला सांगणार होता, अशी तुमची बातचीत झाली. मला असं वाटतं की, कदाचित, प्रकाशने तुमचे संभाषण ऐकले असेल आणि त्यानेच कदाचित प्लॅनिंग करून, तुझ्या मम्मीला ठार केले असेल. असे होऊ शकते, खूप चान्सेस आहेत... कारण राखीबद्दल फक्त तुझ्या मम्मीलाच ठाऊक होते... तिला ठाऊक होते म्हणून, प्रकाशने तिची गुलामगिरी पत्करली असावी... पण कदाचित काल त्याला कसे ना कसे ठाऊक झालेच असेल की, आज तुझी आई त्याला एक्सपोज करणार आहे, म्हणून त्याने कदाचित एखादी अगदी परफेक्ट मर्डर सारखा प्लॅन बनविला असेल, जसा राखीला गायब करायला बनविला... हे खूप इंटर लिंक आहे! मला पूर्ण संशय प्रकाश वरच येतो आहे." योगेश म्हणाला.

"काय? तो प्रकाश? जर ह्यामागे खरंच प्रकाश असेल तर त्याला मी सोडणार नाही. मी आत्ताच त्याला शोधून, त्याच्या कानाखाली लावून, पूर्ण खरं काय हे, माहीत करून घेते!" मोना रागात म्हणाली, आणि ती प्रकाशला शोधायला बाहेर जाऊ लागली.

योगेश(तिला थांबवून), "शांत हो! हे फक्त माझं एक अनुमान आहे, हे सत्य असेलच असे नाही... पण तरीही ठीक आहे, तुमच्या घरी CCTV कॅमेरे लावून आहेत ना? मी लावतो पत्ता... तू चिंता करू नकोस!"

प्रकाश ऑफिसमधून घरी परतला. त्याच्या सावत्र आईचे पोस्टमोटर्म झालेलं होतं. तिला हार्ट अटॅक आलंय, हेच सिद्ध झालं होतं. तिचे अत्यंसंस्कार कारायला नेण्यात आले. प्रकाश तिथे उपस्थित होता, त्याला जराही आनंद न्हवता की, तो त्याच्या प्लॅनमध्ये सफल ठरला म्हणून. त्याला खूप दुःख होऊ लागले होते, त्याचे डोळे पाणावले होते. जिला तो आई म्हणू शकेल, ती त्याच्या मुळेच आज जगात नाही, ह्या विचारानेच त्याचे मन कासावीस झाले होते. तो रडू लागला होता. पण त्याच्या वडिलांनी, तिला अग्नी देऊन, प्रकाशला शांत करायला त्याच्या जवळ आले. त्याला शांत केले.
दुरूनच बघत असलेल्या मोनाला, त्याचे रडणे, मगरीचे अश्रू वाटू लागले होते. तो रडायचे नाटक करत आहे, असेच तिला वाटले. तिचा पारा अजूनच वाढला, ती त्याला अपराधी म्हणायला जाणारच, एवढ्यात बाजूला असलेल्या योगेशने तिला अडविले. तो तिला समजावू लागला, "हे बघ, शांत हो तू आधी! मी छडा नक्कीच लावेल, आता तू त्याला काहीच म्हणू नकोस... तो जिल्हाधिकारी आहे, त्याला आरोपी म्हणणे, तेही पुराव्याशिवाय, तर लोक आपल्याला मारतील. तू शांत हो आधी, मी नक्कीच काहीतरी करेल, आणि प्रकाशने आपले सत्य लपविण्यास तुझ्या आईला ठार केले असेल ना, तर त्याला सोडणार नाही. तू बघच आता, मी काय करतो ते!"

मोना, "तू ह्या गोष्टीच छडा लावणार आहे म्हणून मी जरा शांत होते. पण जर तुला काही सापडले नाही, म्हणजे मला काहीतरी क्लू मिळाला की, ह्यानेच आईला ठार केले असल्याचे, तर ह्याला सोडणार नाही, ठार करणार, मग नंतर मला जेलात जावं लागलं तरीही चालेल!"

दुसऱ्याच दिवसापासून, योगेशने शोधमोहीम सुरू केली. सर्वात आधी त्याने मोनाच्या घरील, कालच्या रात्रीचे कॅमेरे चेक केलेत. त्याला असे दिसले की, प्रकाशची कार घेऊन, एक वेगळाच माणूस आला आणि घरात शिरला, एक फाईल घेतली आणि त्याच कार ने परत गेला. म्हणजे रात्री प्रकाश खरंच घरी आला न्हवता. पण तरीही त्याला जरा संशय येऊ लागला होता. त्याने प्रकाशला कस्टडी मध्ये बोलविले, विचारपूस करायला. पण प्रकाश तैयार झाला नाही, कारण त्याला खूप काम होते. खरंतर प्रकाश मुद्दाम जाऊ इच्छित न्हवता, कारण तो अजूनही दुःखातून सावरला न्हवता. प्रकाशला वाटत होते की, जर योगेशने कसून विचारपुस केली आणि दुःखाच्या भरात एखादी काही तोंडून निघून गेले तर, मोठी प्रॉब्लम होईल. पण तिकडे योगेशला वाटू लागले की, प्रकाश मुद्दाम येत नाही आहे, त्याला स्वतःला आपल्यापेक्षा ग्रेट दाखवायचे आहे, त्याला दाखवायचे आहे की, तो किती बिजी आहे. असे त्याला वाटू लागले. पण महत्वाची चौकशी म्हणून, एका अपॉईंटमेंट वरून त्याला योगेशपुढे हजर राहावेच लागले.
योगेशने त्याला खूप प्रश्ने विचारलेत, पण प्रकाशला खूप दुःख आहे, हे त्याच्या बोलण्यावरून समजत होते. प्रकाश खोटं बोलला की, तो ओळखून घेऊ शकत होता, पण प्रकाश एकही वाक्य, न विचार करता बोलत न्हवता. योगेशने एक महत्वाचा प्रश्न विचारला की, रात्री, त्याच्या गाडीने, तो कोणता माणूस आला होता? आणि फाईल घेऊन परतला? ह्या प्रश्नचे उत्तर प्रकाशने दिले की, तो त्याचा असिस्टंट खान होता. प्रकाशकडून काहीच माहीत होणार नाही म्हणून, योगेशने त्याला सोडून दिले.
प्रकाशनंतर, त्याच्या म्हणण्यावरून त्याच्या असिस्टंट खानला बोलाविण्यात आले. पण त्याच्याकडूनही काहीच माहिती मिळाली नाही. पण तो असिस्टन्सच काहीतरी नक्कीच बाहेर काढेल, जर त्याला दोन चार फटके लावले तर; पण योगेशला परवानगी न्हवती, मारायची, खरंतर चौकशी करायचीही परवानगी न्हवती, पण तरीही, मोनाच्या रिपोर्टच्या बेसिस वर चौकशी करत आहे, असे तो दाखवीत होता.
मोना आता तिच्या घरी राहू इच्छित न्हवती. तिच्या हातात, पूर्ण प्रॉपर्टीही आली नाही उलट तिला जीव लावणारी आई, तिला सोडून गेली. तिला भीती वाटत होती की, प्रकाश रात्री येऊन आपल्या ठार तर करणार नाही... म्हणून तिने योगेशला फोन केला की, ती आता त्याच्यासोबत राहणार म्हणून विनंती केली. योगेशला ठाऊकच होते की, आता मोनाला पूर्ण प्रॉपर्टी काही मिळणार नाही, पण मोनाचा आपल्याप्रति विश्वास कधीच कमी झाला नाही वा प्रेमही कमी झाले नाही, म्हणून तो पुढे जाऊन नक्कीच तिच्यासोबतचे लग्न करणार हे निश्चित करून टाकले आणि तिला रात्री आपल्या घरी येऊन झोपायची परवानगी दिली. ती मुळात, रात्री योगेशच्या घरी झोपणार होती, पण दिवसभर ती आपल्याच घरी राहणार होती. कारण तिला भीती होती, जर ती कायमचीच योगेशच्या घरी राहायला आली तर तिची पूर्णच प्रॉपर्टी हातून निसटून तर जाणार नाही. आणि ती योगेशसोबत आत्ताच लग्न करणार तर नव्हातीच. तिला आधी, तिच्या आईचा नैसर्गिक मृत्यू होता वा प्रकाशने केलेला घातपात, हे जाऊन घ्यायचे होते. योगेश ह्या केस मध्ये, नियमांत आणि मर्यादेत राहून काय करू शकणार, हे तिला चांगलेच ठाऊक होते, त्याच्याकडून जास्त काही आशा तिला न्हवत्याच, म्हणून ती दुपारी आपल्या घरी राहून, काहीतरी पुरावा गोळा करू इच्छित होती, जर एकही पुरावा सापडला, की प्रकाशनेच घातपात करून तिला ठार केले असे, तर ती प्रकाशला डायरेक्ट ठार करणार होती, असे तिने निश्चित केलेलेच होते. मोना दिवसभर तिच्याच घरी राहून, शोधाशोध करत होती.
सायंकाळच्या वेळेस, खान असिस्ट आपले काम निपटून, आपल्या घराकडे जाऊ लागला होता. पण मध्येच, योगेशच्या लोकांनी त्याला पकडले आणि एका निर्जन ठिकाणी नेले, त्याला खूप मारहाण केली, चेहऱ्यावर काळा कापड लावून. त्याला बांधून, अजून मारहाण केली आणि त्याला विचारपूस केली की, प्रकाशच्या सावत्र आईला मारण्यामागे, कुणाचा हात आहे, त्याचा की प्रकाशचा. पण खान असिस्टला एवढे मारल्यानंतरसुद्धा त्याने आपल्या तोंडून एक शब्दही काढले नाही...
खान असिस्टला खूप मार लागला होता. त्याने प्रकाश बद्दल आणि त्याने केलेल्या खुनाबद्दल त्यांना काहीही सांगितले नाही. योगेशची टीम, त्याला मारून, पळून गेली. खान असिस्ट, तश्याच दुखापत झालेल्या अवस्थेतच, तेवढ्या रात्री दावखण्यात जाऊन, उपचार घेऊन आपल्या घरी गेला. तेवढा मार लागलेला असतानासुद्धा तो दुसऱ्या दिवशी, ऑफिसमध्ये हजर राहिला. प्रकाशला समजले नाही की, त्याला एवढ्या इजा झाल्याचं कुठून? त्याने विचारपूस केले असता, खान असिस्टने, प्रकाशला सांगून टाकले की, काल रात्री काही लोक, त्याला उचलून निर्जन स्थळी नेले, आणि त्याला बेदम मारहाण केली, ह्याच उत्तरासाठी की, मोनाचे आईचा खून कुणी केला. खान असिस्ट ने स्पष्ट केले की, एवढा मार शोषून सुद्धा, त्याने त्या लोकांना एकही शब्द सांगितला नाही.
खान असिस्टचा प्रामाणिकपणा आणि वाफादर वृत्ती ऐकून, प्रकाश खूप आनंदी झाला. पण त्याला प्रश्न पडला होता की, त्याने एवढे मार का सहन केले, त्यांना सांगून का टाकले नाहीत? ह्यावर तो म्हणाला, त्याला आपली वाफादरी सिद्ध करायची होती, आणि त्याचा विश्वास जिंकायचा होता. जर ह्यासाठी त्याचे तिथेच प्राण गेले असते तरी, चालले असते. पण त्यांना तो काहीही सांगणार न्हवता. प्रकाशचा, खान असिस्ट कडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला. त्याच्यावर पूर्ण विश्वास बसला. प्रकाशला ठाऊक झालं की, तो आपल्यासाठी काहीही करू शकतो. पण तो असे नेमका का करत आहे? म्हणजे तो आपल्याला एवढा समर्थन का देत आहे, जेव्हा आपण गुन्हा करत आहोत, तरीही! ह्यावर खान असिस्टचे म्हणणे होते की, त्यालाही एकेकाळी, IPS अधिकारी बनायचे होते, पण केलेला अभ्यास आठवण राहत नसल्याने, त्याचे सिलेक्शन कधीच होऊ शकले नाही. आता तर त्याला UPSC ची परीक्षाही देत येणार नाही, कारण त्याने परीक्षा देण्याची मर्यादा पूर्णपणे ओलांडली आहे. तो जरी IAS, IPS होऊ शकला नाही, तरी तो उच्चपदावर असलेल्या लोकांची सेवा करून, त्यांचे मन आणि विश्वास जिंकून, सुख अनुभवायचे होते. त्याला ऍडव्हेंचर आवडत असल्याने, जसे त्याला ठाऊक झाले की, प्रकाश पहिल्याच प्रयत्नात पास झालाय, तेव्हाच त्याला समजले की, प्रकाश दुसऱ्या व्यक्तीसापेक्ष खूप वेगळा आहे. पहिल्याच अटेम्प मध्ये पास होणे म्हणजे, त्या विद्यार्थिला जबाबदारीची जाणीव आहे. एकतर त्याची हालाकीची परिस्थिती असावी, किंवा त्याची जिद्दच ती असावी. प्रकाश मात्र खूप गर्भ श्रीमंत आहे, त्याला कसलीही कमी नाही आहे, म्हणजे त्याला ही जिद्दच असावी कि, तो जिल्हाधिकारी व्हावे. हे एक कारण होते, आणि प्रकाशने मर्डर करण्याचे जेव्हा खान असिस्टला कळविले, तेव्हा तो खूप उत्सुक झाला. त्याला काहीतरी असेच करायचे होते, त्याच्यासाठी जणू ते ऍडव्हेंचरच होते.
खान असिस्टचा असा स्वभाव जाणून घेतल्यानंतर, प्रकाशची त्याचायबद्दलची रुची, आणखीनच वाढू लागली. आता तो बिनधास्त होता, खान असिस्टला पूर्ण आपलं सत्य सांगायला. पण आपले सत्य सांगायच्या आधी त्याने, खान असिस्टला वचन देण्यास लावले की, तो हे सिक्रेट कुणालाही सांगणार नाही. ह्यावर खान असिस्ट म्हणाला, कालच काही लोकांनी आपल्याला पकडल्यानंतरसुद्धा, त्यांना काही सांगितले नाही, जरी तो खून प्रकाशने केला की नाही, हे स्पष्ठपणे ठाऊक नसून सुद्धा, मग आता ठाऊक झाल्यानंतर, तो त्याचे प्राण गेले तरीही सांगणार नाही. पण असे असताना सुद्धा प्रकाशला भीती वटू लागली, की जर खान असिस्टला ब्लॅकमेल केले, किंवा त्याच्या घरच्या लोकांना पकडून, खरं काय सांगायला फोर्स केले तर, तो आपले सत्य त्यांना सांगून टाकू शकतो असे त्याला वाटू लागले. प्रकाशला ठाऊक होते की, आपल्याकडे अशी कोणतीही व्यक्ती नाही, वडिलांना सोडून, ज्यांना पकडून, ब्लॅकमेल करून मारण्याची धमकी देऊन आपल्याकडून सत्य काढायला कुणीच नाही, पण खान असिस्टकडे त्याची फॅमिली आहे. पण ह्यावर खान असिस्ट म्हणाला, जर अशी वेळ आली तर तो स्वतःलाच संपवून टाकेल, ह्याचे त्याने वचन दिले. खान असिस्टच्या ह्या प्रवृत्तीला बघून, प्रकाशने त्याला आपले पूर्ण सत्य सांगून टाकले, त्याने आत्तापर्यंत कोणत्या संकटांचा सामना केला आणि त्या संकटांचा सामना करण्यासाठी त्याने कोणकोणते गुन्हे गेले, हे सारेच सांगितले. प्रकाशचे हे सत्य ऐकून, खान असिस्ट अत्यानंदी झाला. तो प्रकाशला विनंती करू लागला की, आता ह्यापुढे, प्रकाशच्या प्रत्येक गुन्ह्यात तो शामिल होणार आहे, त्याची साथ देणार आहे. तो पण ह्या ऍडव्हेंचरच्या सफर मध्ये प्रकाशच्या सोबत असणार आहे.
प्रकाशने समजले की, काल खान असिस्टला मारणारे लोक, दुसरे तिसरे कुणी नाही, योगेशची च माणसं असावीत. कारण त्यांना जाणूनच घ्यायचे आहे की, मोनाच्या आईचा खून झालाच कसा. प्रकाशला जरा जर संशय येत होता की, योगेश नक्कीच मोनाच्या म्हणण्यावरून, तिच्या आईची फाईलच बघत असेल, राखीच्या केस सोबत. प्रकाश आता सावध राहणार होता, योगेश पासून!
योगेशला मोनाच्या आईच्या खुनीचा पत्ता लावायचा होता, त्याला पूर्ण संशय होता की, प्रकाशनेच तिचा खून केला असावा, पण त्याला परवानगी दिल्या गेली न्हवती की, तो मोनाच्या आईच्या केसला हात लावू शकेल. कारण पोस्ट मार्टम मध्ये तर, सरळ सरळ नैसर्गिक मृत्यू झालाय, असे सिद्ध झाले होते, पण तरीही योगेशने मोनाच्या आग्रहापोटी आणि प्रकाश वर पूर्ण संशय येत असल्यामुळे तो राखीच्या केस सोबतच, मोनाच्या आईच्या केसची पाळताळणी अगदी छुप्या रितेने करत होता.
योगेश आपल्या केस साठी, मोनाची मदत घेत होता. तो तिला, प्रकाशच्या घरून, किंवा त्याच्या रूममधून काही पुरावे सापडते काय ह्याची चौकशी करायला सांगून, तो सुद्धा प्रकाशबद्दल एकोनेक पुरावे शोधण्याचा प्रयत्नात होता. योगेशने सर्वात आधी, मोनाच्या घरचे पूर्ण CCTV कॅमेरे चेक केलेलेच होते, पण त्याला अजून त्या घटनेच्या दिवसाचे पूर्ण CCTV फुटेज हवे होते. त्यासाठी त्याने प्रकाशच्या ऑफिसमधले त्या दिवसाचे CCTV फुटेज मागवून घेतले. त्या CCTV फुटेजमध्ये सुद्धा, खान असिस्ट कार घेऊन जाताना दिसला, सोबतच प्रकाश तिथेच झोपला होता, असे दिसले. हे तर ठाऊक झाले, पण प्रकाशला जसे ठाऊक झाले की, योगेशने आपल्या ऑफिसचे CCTV फुटेज पाळताळणीसाठी घेतले आहे, तसाच त्याने, CBI हेड ऑफिस गाठले आणि ह्याबाबत योगेशच्या वरच्या अधिकाऱ्यांना सांगितले की, योगेश आपल्या मागावर लागून आहे, तो आपल्या ऑफिसचे CCTV फुटेज घेऊन, त्याच्या सावत्र आईच्या खुनात, आपल्याला फसविण्याच्या प्रयत्नात आहे. जिल्हाधिकारीचे CBI ऑफिसमध्ये असे येऊन सांगणे, योगेशला चांगलेच महागात पडले. त्याला वॉर्निंग देण्यात आली की, जर ह्यापुढे मोनाच्या आईच्या केसचा विचार जरी केला आणि जिल्हाधिकारी म्हणजे प्रकाशला ह्यापुढे त्रास जरी झाला, तर योगेशला खूप मोठी किंमत मोजावी लागेल.
योगेश आता मोनाचे आईच्या केसमध्ये ह्यापुढे जराही काही करू शकणार न्हवता. आता त्याचे हात बांधल्या गेले. पण मोना मात्र आपल्या मर्जीची मालकीण होती, ती पूर्णतः स्वतंत्र होती, तिला जाणूनच घ्यायचे होते की, खरंच प्रकाशने तिला ठार केले तर नाही ना? जर खरंच प्रकाशने ठार केल्याचे एकही कच्चा पुरावा मिळाला तरी ती प्रकाशला प्लॅन करून ठार करणार आणि त्याच्या वाटणीची पण प्रॉपर्टी हडपण्याचा तिचा प्लॅन होता. ती दररोज दुपारी प्रकाशच्या खोलीमध्ये हुंदळून बघत होती की, एक तरी पुरावा सापडणार, पण तिच्या हाती रोज निराशाच लागत होती. तिला प्रकाशच्या कम्प्युटरचे पासवर्ड ठाऊक न्हवते, म्हणून ती त्याच्या कॉम्पुटरला हात लावत न्हवती. खरंतर तिला ठाऊक होते की, प्रकाशला कॉम्पुटर बद्दलची जराही माहिती नाही, म्हणून ती तशीही त्याच्या कॉम्पुटरला इग्नोरच करणार होती.
मोनाच्या हाती, एक जरी पुरावा, प्रकाशच्या विरोधात मिळाला, तरी ती ठार करणार हे निश्चितच केले होते, त्यासाठी तिने आधीच, प्रकाशला ठार करण्याचा प्लॅन बनवून घेतला. ती प्रकाशलाही नसर्गिक मृत्यू देणार होती. सध्या ती फक्त, पुराव्याच्या शोधात होती. ती विचार करू लागली की, तिच्या आईला प्रकाशबद्दल ठाऊक झालेच कसे? एकाच दिवशी प्रकाश, आईचा गुलाम झालाच कसा? त्या रात्री असे झाले तरी काय? प्रकाशने आपल्या आईला राखीबद्दल माहिती दिली की, आईनेच प्रकाशकडून माहिती मिळवून घेतली? खरंच प्रकाशने राखीचे अपहरण केले असेल काय? असे तिला खूप प्रश्न पडू लागले. तिने ह्याबाबत खूप विचार केला की, ती त्या रात्री आईसोबत प्रकाशचे झालेले संभाषण कसे ऐकावे? खूप वेळ विचार केल्यानंतर तिला कळले की, जर त्या रात्रीचे दोघांत झालेलं संभाषण आपल्या घरातील CCTV कॅमेरा मध्ये चेक केले तर, काहीतरी हाती नक्कीच लागेल. ह्या आशेपोटी, तिने आपल्या घरातील CCTV फुटेज बघायला सुरुवात केली. तिने त्या दिवसाचा रेकॉर्ड मध्ये शोध घेतला, जेव्हा प्रकाश आणि तिच्या आईचे संभाषण घडले होते आणि तिला ती रेकॉर्डिंग सापडली.
तिला दिसले की, पहिल्यांदा प्रकाशने त्या रात्री दारू प्यायली होती. तो दारूच्या नशेत अगदी पहाटे, बाहेर आला होता. बाहेर तिची आई सोफ्यावर बसलेली होती. मग दोघांत संभाषण सुरू झाले, ते संभाषण करत आहे, हे दिसत होते, पण काय बोलत आहेत, हे समजत न्हवते. कॅमेरा प्रकाशच्या मागे असल्याने, तो काय बोलत आहे, हे तर काहीही समजत न्हवते, पण तरीही, कॅमेरा मधून, तिची आई काय त्याला उत्तर देत आहे, हे तिच्या ओठाच्या हालचाली वरून ती समजून घेण्याचा प्रयत्न करत होती. तिला जास्त काही समजत न्हवते, पण खूप वेळेस लक्ष देऊन बघितल्यानंतर, पुन्हा पुन्हा रेकॉर्डिंग लावून ओठवाचन केल्यानंतर, तिला हे समजले की, तिची आई, त्याला वचन देत आहे की, ती त्याचे सत्य कुणालाही सांगणार नाही. तिने हेही वचन दिले होते की, ती आपल्या मुलीला सुद्धा ह्याबाबत सांगणार न्हवती. पण ह्यानंतर प्रकाश बोलू लागला, मग तर मोनाला काहीही करता येत न्हवते. पण प्रकाशचे बोलून झाल्यानंतर तिच्या आईने, खूप आश्चर्याचा धक्का लागल्यासारखे रिऍक्शन दिले. त्यांनतर ती, कदाचित स्वतःलाच म्हणाली, "बापरे! एवढा साधा मुलगा, सरळ मर्डर केलाय?"
मोना पुन्हा पुन्हा बघू लागली की, तिची आई कोणाच्या मर्डरची गोष्ट करत आहे? पण तिच्या आईने कुणाच्या मर्डरबद्दल काहीही म्हटले नाही. पण प्रकाशने खून केलाय, हे मात्र ह्यावरून सिद्ध होत होते. मोनाने तेवढी क्लिप आपल्या मोबाईल मध्ये सेव्ह करून घेतली. प्रकाश घरी येण्याची वेळ झाला असल्याने, ती योगेशच्या घरी जाण्यासाठी निघाली. योगेशच्या घरी पोहोचताच, तिने योगेशला पूर्ण प्रकार सांगू केला. पण योगेशचे दुःख आधीच खूप होते, कारण त्याला पहिल्यांदाच आपल्या बॉसची वॉर्निंग आली होती. तो तिच्यावर ओरडला की, तिच्यामुळेच त्याला आज बॉसचे ऐकावं लागलं. जर तिच्या आईच्या केसच्या संदर्भात गेलो नसतो तर, कदाचित त्याला आजचा दिवस बघायला मिळाला नसता असे म्हणून तो मोनावर खूप चिडला, आणि तिचे एकही ऐकून घेतले नाही. मोना पण समजू शकत होती, की तिच्यामुळे त्याला आज त्याच्या बॉसचे एवढे बोलणे ऐकावं लागले. म्हणून ती आता योगेशला ह्याबाबत काहीही सांगणार न्हवती, त्याचप्रमाणे ती, आपल्या रिसर्चलाही थांबविणार न्हवती.
मोनाने रात्रभर विचार केला की, प्रकाशने कोणते खून केले असावे? प्रकाशच्या तोंडून ते सत्य कसे काढावे? रात्रभर विचार केल्यानंतर तिला एक युक्ती सुचली, प्रकाशचे तोंड उघडायची.
दुसऱ्या दिवशी, प्रकाश आपल्या ऑफिसमध्ये जाताच, मोना, घरी पुन्हा एकदा शोधाशोध करून घेतली. तिच्या हाती असे एक पुरावे मिळाले, ते जर पोलिसांना कळले, तर प्रकाश नक्कीच जेलात जाईल. पण मोना, प्रकाशला फक्त जेलातच टाकू इच्छित न्हवती, तर आजीवन कारावास किंवा फाशीची शिक्षा होईल, असा पुरावा शोधू इच्छित होती. म्हणून तिने रात्री केलेला आपला प्लॅन चालविण्याचा विचार केला. त्या प्लॅनद्वारे ती, प्रकाशचे तोंड उघडू इच्छित होती. पण तिला आत्ताच शोधमोहीम करताना जो पुरावा सापडला आहे, त्या पुराव्याला सर्वात आधी, सेव्ह करू इच्छित होती, कारण जर प्रकाशचे तोंड उघडताना, तिचा प्लॅन चुकला, तर प्रकाश तिलाही ठार करेल आणि तो पुरावा पण आपल्यासोबत चालला जाईल, असे होऊ नये म्हणून तिने, तो पुरावा एका ठिकाणी सेव्ह करून घेतले, सोबतच ते पुरावे कुठेतरी सेव्ह केले आहे, हे योगेशला माहीत व्हावे म्हणून, तिने मोबाईलमध्ये एक व्हिडिओ बनविला, ज्यात तिने सांगितले की,
"प्रकाशने कुणाचातरी खून केलाय, पण कुणाचा, हे मी आज जाणून घेणार आहे, तेही प्रकाशच्या तोंडूनच! पण त्याआधी मला प्रकाशचा पुन्हा एक पुरावा सापडला आहे, ज्याद्वारे प्रकाशला चांगलीच शिक्षा होऊ शकते. तो पुरावा तुलाच शोधून काढायचा आहे. मी तो पुरावा कुठेतरी सेफ ठिकाणी सेव्ह केला आहे, जे फक्त तुलाच ठाऊक होईल की तो पुरावा कुठे सेव्ह केला असेल ते... माझा हा व्हिडीओ बनविण्याचा उद्देश हा आहे की, कदाचित प्रकाशचे तोंड उघडण्याच्या बेतात, माझा प्लॅन फ्लॉप झाला आणि प्रकाशने मला ठार केले, तर हा व्हिडीओ तुला मिळाला असेल, ह्याने हे सिद्ध होईल की, प्रकाशनेच माझा खून केलाय! सोबतच हेही ठाऊक होईल की, तो पुरावा मी कुठेतरी लपविला आहे... तुला नक्कीच ठाऊक आहे तो पुरावा कुठे लपविला आहे, जरा आठवण कर योगेश, मी कुठे तो पुरावा सेव्ह केला असेल! तुला नक्की आठवेल!!" मोनाने हा व्हिडीओ योगेशसाठी बनविला, जसा प्रकाश घरी येणार, तशी मोना आपला पुढचा प्लॅन सुरू करणार, प्रकाशला बोलते करण्याचा. आणि तेवढ्यातच योगेशला हा व्हिडीओ व्हाट्स अँपने पाठवून देणार. जरी प्रकाशने आपल्याला ठार केले, तरी व्हिडीओ एक पुरावा राहील, आपल्याला ठार केल्याचा. पण जर व्हिडीओ आत्ताच पाठविला आणि योगेशने आत्ताच बघितला तर, तो आपल्याला असे काहीही करू देणार नाही, हे मोनाला चांगलेच ठाऊक होते, म्हणून ती, तो व्हिडीओ प्रकाश आल्यानंतर आणि आपला प्लॅन सुरू केल्यानंतरच योगेशला पाठविणार होती.
प्रकाशला परवाच मुंबईला जायचे होते. महाराष्ट्रातील, जवळपास सर्वच जिल्हाधिकाऱ्यांना मुंबईला जाऊन, मुख्यमंत्रीसोबतची मिटिंग अटेम्प्ट करायचे होते. प्रकाशही तैयार झाला, मिटिंगला जायला. पण आज प्रकाश जरा उशिराच घरी पोहोचला. आज ऑफिस मध्ये जास्तच कामं होती.
मोना, घरी प्रकाशचीच वाट बघत होती. तिचा पूर्ण प्लॅन रेडी होता. जसा प्रकाश घरी आला, त्याला आश्चर्याचा धक्का बसला, कारण त्याची सावत्र आई मरण पावल्यानंतर पहिल्यांदाच, मोना एवढ्या रात्रीपर्यंत घरी होती. खूप उशीर झाल्याने, योगेशसुद्धा मोनाला वारंवार फोन करत होता, पण मोना त्याचा फोन कट करून,म्यासेज टाकत होती की, ती लवकरच येईल, पण सर्वात आधी त्याने वॉट्स अँप वर ऑनलाइन राहावे. कारण मोना आपला मिशन जसा सुरू होईल, तशीच ती योगेशला व्हाट्स अँपने तो बनविलेला व्हिडीओ पाठविणार होती.
प्रकाशनेच प्रश्न केला, "आज गेली नाहीस? पहिल्यांदा एवढ्या उशिरापर्यंत इथे दिसत आहेस!"

"का? माझा हक्क नाही काय ह्या घरावर? मी राहू शकत नाही काय?" मोना प्रतिउत्तरात.

"अगं तुझंच घर आहे हे! राहू शकते की नाही का विचारत आहेस? नाही, पहिल्यांदा तुला ह्या वेळेवर बघितले ना, म्हणून म्हटलं!" प्रकाश म्हणाला.

"मला तुझ्यासोबत काही बोलायचं आहे! तुझ्याकडे वेळ आहे काय?" मोना.

"अगं बोल ना! वेळेचं काय घेऊन बसलीस?" प्रकाश.

"तुला आठवितेय काय? आपलं कधी बोलणं झालं असा एखादा दिवस?" मोना.


"खरंतर आठवायची गोष्टच नाही... कारण आपलं मनसोक्त बोलणं कधीच झालं नाही!" प्रकाश.

"का रे? मी तुला कधीच पसंत पडली नाही काय? म्हणजे मला बहीण म्हणवून घ्यायला लाज वगैरे वाटते काय? सॉरी म्हणजे, मला ही लाज वाटायला हवी की, मी तुला कधीच भावाचा दर्जा दिला नाही! पण असं का झालं? तुला माझा स्वभाव का आवडला नाही कधी?" मोना म्हणाली.

"खरं सांगायचं तर होय! मला तुझा स्वभाव कधीच आवडला नाही... तू खूप सुंदर आहेस, खूप हुशारही, पण तुझ्या सवयी मला कधीच आवडल्या नाहीत. म्हणजे तुझं खूप जास्त मॉडर्न असणं, म्हणजे ड्रग्स, दारू, सिगारेट, रात्री अपरात्री फिरणे, वेगवेगळे बॉयफ्रेंड ठेवणे, घरच्यांची कधी रेस्पेक्ट न करणे, जास्तच मनमर्जी करणे, हे मला पटत नाही!! म्हणजे तू मुलगी आहेस म्हणून नाही, मी कधी भेदभाव केलाच नाही असा, पण मला ही अशी संधी मिळाली तरी मी असे कधीच केले नसते...मला वाटते तू तुझे एवढे सुंदर आयुष्य, तुझ्या जिद्दीपायी नष्ट करत आहेस!" प्रकाश.


"हा! तुला हे सगळं आवडणार नाही. पण मी काय करू? मला प्रेमच एवढं मिळालं की, मी कशी बिघडत गेले, मलाही कळलं नाही!" मोना मान खाली टाकून म्हणली.

"आत्ताही काही बिघडल नाही, योगेश आणि तू एकमेकांवर खूप प्रेम करता ना? माझ्यामते तुम्ही लग्न करून टाका! आणि तू स्वतःला सावर, झाल गेलं सगळं विसरून जा, आणि नवीन जीवन सुरू कर, खरंच खूप सुखात राहशील. योगेशला मी चांगलाच ओळखतो, तो तुला खूप सुखात ठेवेल, असे मला वाटते." प्रकाश.

"लग्न तर आम्ही करणारच आहोत, पण आपलं असं कधी बोलणं झालं का नाही? म्हणजे तुला कधीतरी असे वाटले नाही काय? की मला बहीण म्हणावं, आणि माझी समजू काढावी, किंवा प्रेमाने बोलावं, मैत्री करावी, असं काहीतरी! मी माझं सांगायचं झालं तर, मला तर तुला कधीच आपला भाऊ म्हणून स्वीकारायचा न्हवता. मला नेहमीच तू जवळ असला की, राग यायचा, खरं सांगायचं झालं तर, तू मला जवळ नकोच होता! तुला वाईट वाटेल, त्यासाठी सॉरी, पण मी खरं बोलतीये!!" मोना.

"बोल गं काहीही बोल, मला राग नाही येणार! कारण सत्य कटू असलं तरीही आपलं बोलणं तर होत आहे ना, हे महत्वाच! पण ह्यात तुझी चूक नाही! तुझे संगोपनच तसे झाले आहे त्यात तुझी काय चूक? तुला आईवडिलांच, खास आईचं खूप प्रेम मिळालं! ती तुला खूप प्रेम तर करतच होती, पण ती मुलीच्या प्रेमात एवढी आंधळी झाली होती की, तिला तुझे चांगले वागणे आणि वाईट वागणे, ह्यात फरक दिसत न्हवता. ती तुझ्या चुकीच्या वागण्यावर सुद्धा काहीही म्हणत न्हवती, उलट जर कोणी तुझी चुकी दाखवून देण्याचा प्रयन्त केला, तर ती, तुझा उलट बचाव करत होती. म्हणून तुला चांगलं आणि वाईट काय? हे कळू शकलं नाही. तुला ठाऊक होते की, जर आपण काही चुकी केली तरीही आपली आई आहेच बचाव करायला!" प्रकाश म्हणाला.

"हे तुझं म्हणणं पटतंय मला, पण तुझा विचार काय आहे, आईबद्दल? म्हणजे तिचा मृत्यू कसा झाला असेल? आणि आपल्या वडिलांच्या पूर्ण प्रॉपर्टी बद्दल तुझं म्हणणं काय आहे? आपण दोघांत अर्धे अर्धे करायचे की, तूच पूर्ण घेणार आहेस?" मोना.

"तिच्या मृत्यूचे मलाही खूप दुःख आहे! मी आत्ता हळू हळू सावरू लागलो आहे, त्या दुःखातून! पुन्हा एकदा, जिला आई म्हणू शकेल, ती आपल्यात राहिली नाही आहे. मला नकोय प्रॉपर्टी, मला आता नोकरी लागली आहे, मला स्वतःच्या पायावर उभे होऊन कमवायचे आहे. पण तू हे का विचारत आहेस?"

"काही नाही रे, म्हणजे ह्यापुढे आपल्यात कधी भांडण व्हायला नको! हे घे जाम, एक घोट घेऊन टाक!! मला आईने सांगितले की, एकदा तू घेतला होतास म्हणे! मला विश्वासच बसला नाही की, तू पण पितोस म्हणून!" मोना त्याला दारू देऊन म्हणाली.

"नाही! नकोय मला!! मी पाणीच पितो!! (हातात पाण्याचा ग्लास घेऊन) तुला आणखी काय सांगितलं तिने माझ्याबद्दल?" प्रकाश जरा घाबरून म्हणाला.

"बाकी काही नाही रे, ती मला खूप काही सांगणार होती, पण त्याआधीच ती सोडून गेली!" मोना म्हणाली.

प्रकाशची शुद्धी हळूहळू जाऊ लागली होती. त्याच डोकं घुमायला लागले होते, डोळे हळू हळू बंद होऊ लागले होते. त्याला समजलेच नाही की, त्याला होत काय आहे?

"काय होतं त्या पाण्यात? मला असे का वाटत आहे? त्या पाण्याची टेस्टही कडू वाटत..." एवढ्यातच प्रकाश खाली पडला.
मोनाने त्या टेबलावर पाण्याऐवजी वोडका ठेवला होता. सोबतच त्या वोडका मध्ये, झोपेची गोळी टाकली होती. चव जास्त कडवट येऊ नये म्हणून, त्यात काही प्रमाणात सुक्रोज टाकले होते. मोनाला ठाऊक होते की, प्रकाशला दारू ऑफर केली की, तो नक्कीच नाही म्हणणार, त्याऐवजी तो मुद्दाम पाणी पिणार. पण पाण्यासारखे दिसणारे ते वोडका होते.
प्रकाशची जवळपास शुद्ध हरपलीच होती. मोना त्याचा कॉलर पकडून, त्याला विचारू लागली, "सांग! माझी मम्मा मला खूप काही सांगणार होती, तुझ्याबद्दल, पण आधीच ती कशी गेली? राखीला तुने कुठे लपवून ठेवले आहे? तिला तुने ठार तर केले नाही ना? सांग पटकन!"
प्रकाशला वोडका चढला होता. तो काय बोलतो आहे, हे त्याला समजत न्हवते, पण तो काय ऐकत आहे, हे मात्र काही प्रमाणात समजत होते. तो नशेच्या धुंदीत, मोनाला सारंच सांगून टाकले. मोना आपल्या मोबाईलने, प्रकाशने सांगितलेलं रेकॉर्ड करून घेतले. प्रकाशने कशाप्रकारे राखीला ठार केले, सोबतच त्याच्या सावत्र आईला कसे ठार केले, सारंच प्रकाशने सांगून टाकले.
"बस्स, तुझा खेळ खल्लास आता! तुला ठाऊक आहे? मी तुझं सर्व सत्य रेकॉर्ड केलं... आता हे सत्य सरळ, योगेशला दाखविणार! तुला आजीवन कारावास किंवा फाशी! आणि मी इकडे पूर्ण प्रॉपर्टीची मालकीण!! तसेही तुला नकोच आहे ना प्रॉपर्टी? ठीक आहे! मीच ठेवते!! आता माझ्या मम्माला न्याय मिळणार बघ!" मोना म्हणाली.

मोना तिथून जाऊ लागली. प्रकाशला समजले की, त्याने खूप मोठी चूक केली आहे, मोनाला काहीही करून आता अडवले नाही तर ती, रेकॉर्ड केलेला पूर्ण व्हिडीओ पोलिसांना दाखवून, आपल्याला जेलात टाकणार. प्रकाश अर्धशुद्धीच्याच रुपात, बाजूला असलेला टेबलावर ठेवलेली शोकेसची कुंडी हातात घेतली आणि मारायला तिच्याजवळ गेला. पण तो शुद्धीवर नसल्याने त्याचे डोळे फिरू लागले होते, त्याचा नेम चुकला, त्या कुंडीचा वॉर हवेत गेला. मोना थोडक्यात बचावली. पण दुसऱ्यांदा प्रकाश तिला मारणार, एवढ्यातच मोनाने त्याच्या हातून कुंडी हिसकावून घेतली आणि त्याच कुंडीला त्याच्या डोक्यावर फोडली. प्रकाशच्या डोक्यावर कुंडी फुटल्याने तो रक्तबंबाळ झाला आणि खाली कोसळला. मोनाने घराला बाहेरून लॉक केले आणि आपल्या कार मध्ये बसताच, आत्ताच केलेला प्रकाशचा व्हिडीओ, योगेशला पाठविला. नेट जरा स्लो असल्याने जायला वेळ लागणार होते, पण तशीही ती आता योगेशच्याच घरी जाणारच होती. तिने गाडी चालू केली आणि तशीच ती योगेशच्या घराकडे निघाली. प्रकाश घरी बंद होता...
प्रकाशवर प्राणघातक हल्ला करून, त्याला घरात बंद करून, मोना कार ने थेट, योगेशच्या घराकडे निघाली होती. जातानाच योगेशला तो प्रकाशच्या पूर्ण सत्याचा व्हिडीओ, त्याला सेंड करून दिला होता. जवळपास अर्धा व्हिडीओ सेंड झालाच होता. ती कार वेगाने नेऊ लागली.
प्रकाश आपल्याच घरी बंदिस्त झाला होता. पूर्णपणे नशेत बुळलेला प्रकाश, रक्तबंबाळ झालेला, खाली कोसळलेला होता. पण त्याला हे ठाऊक होते की, मोनाने त्याची चित्रफीत काढली आहे ती आपल्यावर हल्ला करून पळून गेली आहे. त्याने खिशात असलेला मोबाईल काढला. पण त्याला एवढीही शुद्ध न्हवती की, तो कुणाला फोन करू शकेल. पण एवढ्यातच खान असिस्टचा फोन आला.
प्रकाश जसा घरी आला होता, मोना घरी आहे हे बघताच, त्याला संशय आला होता की, ती काहीतरी नक्कीच करेल. सतर्कता म्हणून त्याने, मोनासोबतचे संभाषण सुरू होण्यापूर्वीच, खान असिस्टला हळूच एक म्यासेज टाकला की, 'घरी मोना आहे, पुढे काहीही होऊ शकते, तैयार रहा!" ह्या म्यासेजला प्राप्त करताच, खान असिस्ट तैयार झालेला होता, पुढच्या संकटांचा सामना करण्यासाठी!
खूप वेळ झाला, बॉसने फोन केले नाही, त्यांच्यासोबत काही वाईट तर घडले नसेल ना? ह्याची खात्री करण्यासाठी त्याने सहजच फोन केला होता. पण तो फोन प्रकाशसाठी गेम चेंजर बनू शकत होता. प्रकाशला फोन लावायची सुद्धा शुद्धी न्हवती. पण अश्यातच खान असिस्टचा फोन आल्याने, कसेबसे थरथर कापणाऱ्या बोटानेच फोन उचलला. "बॉस काय झाले? सर्व ठीक आहे ना?" खान असिस्ट म्हणाला...
"मोनाला थांबावं! ती घरून निघाली आहे, तिने मोबाईलमध्ये रेकॉर्ड केले..." असे तुटलेल्या आवाजात बोलून, प्रकाश बेशुद्ध पडला. फोन वरून खान असिस्ट हॅलो-हॅलो करतच राहिला.
खान असिस्टला समजले की, प्रकाश एकतर बेशुद्ध झाला असेल, अथवा मरण पावला असेल. आता खान असिस्टकडे दोन ऑप्शन दिसत होते, एकतर प्रकाशच्या घरी जाऊन त्याला लवकरात लवकर दवाखान्यात भरती करून, जर तो जिवंत असेल, शेवटचे श्वास घेत असेल, तर त्याचे प्राण वाचविणे किंवा दुसरा ऑप्शन म्हणजे, प्रकाशला मरणाच्या दारावर ठेऊन, आणि त्याने दिलेला ऑर्डर फोल्लो करणे.
खान असिस्ट खूप कन्फ्युज झाला, त्याला समजत न्हवते की, त्याने काय करावे. पण जर प्रकाशच्या आदेशाचे पालन केले नाही, आणि त्याला वाचवायला गेले, जरी कदाचित त्याचे प्राण वाचेन, पण त्याचा विश्वास मात्र तुटून जाईल आणि कदाचित मोना सफल होईल तिच्या प्लॅन मध्ये! म्हणून प्रकाशच्या प्राणाचा पुढे विचार न करता, प्रकाशच्या आदेशाचे पालन करण्याचे ठरविले. कारण जरी प्रकाशला वाचवू शकले नाही तरी, प्रकाशचेच वचन पाळायला गेल्याने विश्वासही तुटणार नाही आणि मोनाला अडविले तर कदाचित, प्रकाशचे अस्तित्व जगापुढे येणार नाही, तो अगदी निर्दोष म्हणूनच मरणार, जर मरण आले तरीही!
खान असिस्टने आपली कार काढली. त्याला ठाऊक होते, मोनाची कार कोणती आणि तिच्या गाडीचा नंबर काय! त्याला हेही ठाऊक होते की, योगेशचे घर कोणत्या रस्त्यावर आहे. तो आपल्या कारला जास्तीत जास्त वेगाने नेऊ लागला. त्याने आपल्या कारला एवढ्या वेगाने कधीच चालविले न्हवते. रात्रीची वेळ असल्याने जास्त ट्राफिकही न्हवती. त्याच्या कारची गती शंभराच्या खाली उतरतच न्हवती. तो काही वेळातच मोनाच्या कारच्या मागे पोहोचला. त्याला समजले की, ती मोनाचीच कार! त्याने आपल्या कारची गती वाढवून एकशे पन्नास च्या वर नेली आणि सरळ तिच्या कारला मागून ठोकली. आदडण्याचा वेग एवढा होता की, मोनाची कार क्षणातच, रोडच्या बाजूला उडून, झाडावर आदळली.
खान असिस्टने आपल्या कारचा वेग कमी केला, कारला थांबविले आणि खाली उतरून तिच्या कार जवळ गेला. मोनाच्या कारचे एअरब्याग खुलले असूनसुद्धा तिच्या डोक्यावर चांगलाच मार लागला, म्हणून ती बेशुद्ध पडली. खान असिस्टने तिच्या बाजूला ठेवलेला तिचा मोबाईल घेतला, तिचे बोट, मोबाईलच्या फिंगरप्रिंटला लावले आणि तिच्या मोबाईलचा लॉक खुलला. तो चेक करू लागला की, तिने मोबाईल मध्ये काय काय केले आहे. कारण प्रकाश फोनवर काहीतरी रेकॉर्डिंग बद्दल बोलत होता. गॅलरीमध्ये त्याला प्रकाशचा व्हिडीओ दिसला, त्याने तो व्हिडीओ, आपल्या मोबाईल मध्ये घेऊन, लगेच डिलीट केला. त्यानंतर तो व्हाट्सअँप मध्ये गेला, तिथे, मोनाने योगेशला तो व्हिडीओ पाठवलेला होता. दुर्दैवाने तो व्हिडीओ योगेशला मिळाला होता आणि योगेशने तो व्हिडीओ बघितला पण होता, कारण त्या व्हिडीओला ब्ल्यू टिक आलेले होते. पण तरीही खान असिस्टने क्षणाचाही विलंब न लावता, तो व्हिडिओचा म्यासेज डिलीट फॉर एवरीवन करून टाकले. म्हणजे आता जरी योगेशने तो व्हिडीओ बघितला असला तरीही, त्याच्या कडूनही डिलीट झाल्याने, तो पुन्हा त्या व्हिडीओला बघू शकत न्हवता. पण मोनाने, प्रकाशच्या व्हिडिओ आधी सुद्धा एक व्हिडिओ योगेशला पाठविला होता, ज्यात मोना कुठेतरी प्रकाशचा एक पुरावा लपवून ठेवल्याचे सांगत होती. खान असिस्टने तो व्हिडिओसुद्धा आपल्या मोबाईल मध्ये घेऊन, त्या व्हिडिओला सुद्धा डिलीट फॉर एव्हरीवन केले.
मोनाच्या मोबाईलचे फॅक्टरी रिसेट करून टाकले. आता मोनाच्या मोबाईलमधले सारेच फाईल डिलीट झाले, थोडक्यात सांगायचे झाले तर, तिचा मोबाईल पूर्णपणे नवा बनला. खान असिस्टने तो मोबाईल तिच्याच गाडीमध्ये ठेवला, पण मोनाला उचलून आपल्या गाडीमध्ये टाकून आपल्या घरी आणले. तिला घरी आणून, आपल्या खोलीत रस्सीने घट्ट बांधले, तिच्या तोंडाला टेप लावले, पूर्ण खात्री करूनच तो प्रकाशच्या घरी गेला.
प्रकाशचे मेन गेट, बाहेरून लॉक होते. त्याने ते लॉक खोलले, आत प्रकाश बेशुद्ध अवस्थेत पडलेला दिसला. त्याला आपल्या कारमध्ये टाकून, एका ओळखीच्या दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले.
रात्रभर उपचार चालल्यानंतर प्रकाशला सकाळीच शुद्ध आली. प्रकाशने डोळे उघडतात, त्याच्या समोर, खान असिस्ट होता. प्रकाशला सुरुवातीला समजलेच नाही की, तो कोण आहे? तो कुठे आहे? पण काही वेळातच त्याला समजले की, काल मोनामुळे बेशुद्ध पडला होता. पण मोनाने आपले एक व्हिडीओही रेकॉर्ड केले आहे, हेही त्याला आठविले. तो प्यानिक होऊ लागला. अश्यातच खान असिस्टने प्रकाशला शांत केले आणि सांगितले की, सर्व ठीक झालं आहे. त्याने काल घडलेला पूर्ण प्रकार प्रकाशला सांगितला आणि हेही सांगितले की, त्याने मोनाला आपल्या घरी अगदी सुरक्षितपणे बांधून घेतले आहे. ती त्याच्या घरी कैद आहे.
योगेशला मोनाचे दोन व्हिडिओ प्राप्त झाले होते, पहिल्या व्हिडीओमध्ये, ती प्रकाशच्या एका खूप खास पुराव्याविषयी बोलत होती, पण तिने ते पुरावे कुठेतरी लपवून ठेवले असे सांगितले होते, तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये प्रकाश, त्याने केलेल्या दोन्ही खुनाबद्दल सांगत होता. त्याच्याकडे पहिला व्हिडीओ सेव्ह झाला होता. त्याने ते व्हिडीओ लगेच सेव्ह केले होते. पण दुसरा व्हिडीओ बघताच, मोनाने डिलीट केल्याने, त्याला जरा संशय येऊ लागला. त्याने मोनाला फोन केले, पण ती फोन काही उचलत न्हवती. तो घाबरून गेला. त्याला तो व्हिडीओही परत हवा होता आणि मोनाचा शोधही लावायचा होता. त्याने व्हिडीओ परत मिळविण्यासाठी थर्ड पार्टीचा अँप इन्स्टॉल करून, तो व्हिडीओ परत मिळविण्याचा प्रयत्न केला, पण तो व्हिडीओ काही सापडला नाही. आता एकच आशा होती, त्या व्हिडीओला परत मिळविण्याची; ती म्हणजे मोनाचा मोबाईल, जिथून शूट केला गेला तो व्हिडीओ. पण तिचा मोबाईल शोधण्यासाठी सर्वात आधी तिला तर शोधावे लागणार होते. तो रात्रीच तिला शोधायला निघाला. रस्त्यातच त्याला मोनाची कार सापडली. तो लगेच कार जवळ गेला; आत बघितले असता, कार मध्ये कुणीच न्हवते. पण मोनाचा फोन होता. त्याने तो फोन चालू केले तर, तो फोन पूर्णपणे फॉरमॅट मारलेला आढळला. त्याने त्या व्हिडीओची आशा सोडून, मोनाला शोधायची शोधमोहीम, रात्रीपासूनच राबविली. त्याला पूर्णपणे संशय प्रकाशवरच येत होता, की त्यानेच मोनाचे अपहरण केले असेल. म्हणून तो सरळ प्रकाशचाच घरी गेला. पण त्याचे घर बाहेरून लॉक केलेले आढळले. घरात प्रकाश न्हवताच! आता तर संशय खरा ठरत होता की, नक्कीच प्रकाशनेच मोनाला किडण्याप केले असेल. आता योगेशची टीम, सर्वात आधी प्रकाशला शोधायला निघाली.
प्रकाश, खान असिस्टने टाकलेले समजदार पाऊल आणि हुशारी बघून तो, खान असिस्टवर आणखीनच आनंदी झाला. त्याला खान असिस्ट सारखा असिस्टंट मिळाल्याने, खूप गर्व होत होता. उपचारामुळे, रक्तस्त्राव थांबलेला होता आणि घाव जास्त खोलात नसल्याने त्याला सायंकाळपर्यंत डिस्चार्ज देण्यात येणार होते. पण प्रकाशला हे मान्य न्हवते, कारण त्याला ठाऊक होते की, योगेश नक्कीच आपला पत्ता शोधत असेल, जर त्याला आपण इथे आढळलो, तर तो आपल्याला मोनाचा पत्ता नक्कीच विचारेल, सोबतच डोक्याला लागलेल्या मारबद्दलही विचारणा नक्कीच करेल. जरी आपण खोटं सांगितलं तरी, काल रात्री काय घडलं, हे बघायला तो आपल्या घरी जाण्याची जिद्द करेल, तो CCTV नक्कीच चेक करेल कालचे. जर CCTV रेकॉर्डिंग दिसली तर, तो समजून जाईल की, मोनानेच आपल्याला अश्या परिस्थितीत आणले आणि त्यानुसार तो पुढील शोधमोहीम राबवनार. प्रकाशला ह्यातलं काहीही नको होतं.
प्रकाशने लगेच हॉस्पिटलमधून स्वतःला डिस्चार्ज करून घेतले. तो पटकन खान असिस्टसोबत त्याच्या घरी आला. त्याच्या घरी एका स्पेशल खोलीत, मोनाला लपवून ठेवले होते. ती अजूनही बेशुद्ध अवस्थेतच होती. खान असिस्टने तिच्या चेहऱ्यावर पाण्याचे काही थेंब शिंपडले. तिला हळू हळू शुद्धी येऊ लागली. तिच्या तोंडावरील पट्टी काढण्यात आली.
मोनाने डोळे खोलले असता, तिला तिच्या समोर, एक सुटबुटातला माणूस दिसला, जो खान असिस्ट होता. बाजूलाच प्रकाशही दिसला.
"झाली काय झोप पूर्ण? कसं वाटत आहे मला बघून?" प्रकाश म्हणाला.

"मी इथे कशी? मी इथे काय करत आहे? मला असे का बांधून ठेवले आहे? एक मिनिट! मी तर काल योगेशच्या घरी जायला निघाले होते ना? मध्येच मागून एका कारने मला ठोकर मारली, त्यानंतर काय झाले?... पण प्रकाश तू इथे कसा? तुला तर मी..." मोना घाबरत म्हणाली.

"एक मिनिट सांगतो सगळं! काल जो अपघात तुझ्यासोबत घडला होता ना? तो ह्या सुटबुटातला माणसाने, म्हणजे माझ्या असिस्टंटने घडविला होता. त्यानेच कार वेगात नेऊन तुला आदळले आणि नंतर ह्यानेच तुला इथे आणून ठेवले आणि मला हॉस्पिटल मध्ये नेले! तुला काय वाटत, तूच हुशार आहेस? मी काल जसा घरी आलो होतो, तेव्हा तुला घरी बघितले तेव्हाच मला काहीतरी नक्कीच होणार असा अंदाज मला आला होता, तेव्हाच मी, माझ्या ह्या खान असिस्टला म्यासेज करून सांगितले होते. थँक्स टू खान असिस्ट! ज्याच्यामुळे आज तू अश्या अवस्थेत आहेस, हरलेल्या! होय! तू हरली आहेस!!" प्रकाश आनंदाने म्हणाला.

"नाही मी नाही हरू शकत! मी कधीच हरले नाही आहे! आणि मी तुझ्यापासून तर कधीच हरणार नाही आहे, समजलं? मी कालच एक व्हिडिओ योगेशला सेंड केला होता, कदाचित त्याने बघितलाही असेल आणि आता तो तुला शोधतही असेल, तुला आजीवन कारावासात अडकवायला! त्या व्हिडीओ मध्ये मी तुझे सारे सत्य रेकॉर्ड केले आहे, त्याद्वारे तू जेलात असशील आणि मी एशोआरामात!" मोना घाबरत पण हसून म्हणाली.

"तुला हारायची भीती असल्यानेच तू माझा कधी मुकाबला करत न्हवतीस! तू नेहमीच माझ्या पुढे जाऊ इच्छित होती, पण मेहनत करून नाही, तर फुकटात! म्हणून मला तुझा स्वभाव कधीच पसंत पडला नाही!! आणि राहिली गोष्ट त्या व्हिडीओची, होय योगेशने तो कालचे दोन्ही व्हिडीओ बघितलेले आहे! पण तुझं दुर्दैव म्हणा, की माझ्या खान असिस्टची चपळता म्हणा.. कालच खान असिस्टने ब्ल्यू टिक होताच, व्हिडीओ, डिलीट फॉर ऑल करून टाकलं! तू तर माझ्या खान असिस्ट पेक्षाही स्लो निघाली आणि तुझा मोबाईलही! आता? आता सांग कोण जिकलाय? पहिल्या व्हिडीओ मध्ये तू माझा कोणतातरी पुरावा लपविल्याची माहिती देत होतीस? कोणत्या पुराव्याची गोष्ट करत होती आणि तो पुरावा कुठे आहे?" प्रकाश म्हणाला.

"मी नाही सांगणार, तूच शोध लाव, जर तुझ्याकडे खरंच शार्प मेंदू असेल तर!" मोना म्हणाली.

"ठीक आहे, नको सांगू! मीच लावेल पत्ता!" प्रकाश.

"आता तू माझ्यासोबत काय करणार आहेस?" मोना घाबरून म्हणाली.

"तेच जे तुझ्या आईसोबत केलं!" प्रकाश...

"नाही! प्लिज नो!! मला मारू नकोस! मला सोडून दे, प्लिज!! मी तुझ्यापुढे भीक मागते... मी खरंच सांगते, मी काल पासून ते आजपर्यंत घडलेलं कुणालाही सांगणार नाही, योगेशलाही नाही! मी विसरून जाईल की, तुने कुणाचा खून केलाय ते! पण प्लिज मला सोड ना! माझे वयच काय आहे? मला मरायचे नाही आहे, प्लिज! ओके ठीक आहे, तुने माझ्या आईला ठार केले, तसेही तिचे वय झालेच होते, पण माझ्याकडे बघ ना! मी अजून काहीही बघितलं नाही आहे, प्लिज माझ्यावरदया कर आणि विश्वास ठेव, मी कुणालाही सांगणार नाही, प्लिज मला सोड! मला नकोय तुझी संपत्ती, पण मला मारू नकोस!" मोना रडत म्हणाली.


"तुला सोडलो असतो गं! पण काय करू? तुझ्यावर विश्वास राहीलच नाही माझा! तू खूप मोठी स्वार्थी आहेस. तुझ्या आईला जेव्हा ठार केले होते, तेव्हापासून तीन दिवस मी जेवणाचा एक कण सुद्धा पोटात टाकला न्हवता. मला खूप दुःख झाले होते. पण तू, आज स्वतःच्या स्वार्थासाठी आईचे खून झाले ते चांगले झाले असे तू इंडायरेक्टली म्हणत आहेस.मी तुझ्यावर विश्वास ठेऊच शकत नाही. ज्याप्रमाणे मी तुझ्या आईवर विश्वास ठेवून तिला माझे सत्य सांगितले, आणि तिने दगा दिला, तू तर तिचीच मुलगी. तुझ्या आईनेचे मला गुलाम बनविले होते, तू तर मला काय करशील पुढे जाऊन काय ठाऊक? तू माझा खूप उपयोग करून घेतलास. तुझे पाय धुवून देण्यापासून ते डोक्याची मालिश करून देण्यापर्यंत सारंच केलंय तुझं, म्हणजे तू माझ्याकडून करवून घेतलंस, त्याची तर शिक्षा तुला मिळालाच हवी ना? राखीला ठार केलं होतं तेव्हा मला खूप जास्त दुःख झाले होते, तुझ्या आईला ठार केले होते तेव्हाही दुःख झाले होते, पण जास्त नाही आता तुला ठार केल्यानंतर, मला जराही दुःख होणार नाही, हे मी नक्कीच सांगू शकतो. तुला तर मरावंच लागेल. "
प्रकाशने तिचा गळा दाबला, काही वेळातच मोना तिथेच ठार झाली.
प्रकाशला उद्या मुख्यमंत्री सोबतच्या मिटिंग साठी मुंबईला जायचे होते. प्रकाशने निश्चित केले होते की, मोनाच्या प्रेताला मुंबईलाच नेऊन, तिथेच गायब करावे.
योगेशकडे मोनाचा पहिला व्हिडीओ होता आणि प्रकाशकडे सुद्धा! ज्यात मोना पुराव्याबद्दल सांगत असते, जो मोनाने कुठेतरी लपविलेला होता, दोघांनाही मोनाच्या त्या पुराव्यांचा शोध लावायचा होता, एकाला स्वतःला वाचविण्यासाठी दुसऱ्याला आपली केस जिंकायसाठी!
उद्याच प्रकाशची मिटिंग आहे, मुख्यमंत्री सोबत. पण प्रकाशला आजच जायचे आहे, मुंबईला... खरंतर उद्या मिटिंग दुपारी दोन वाजता आहे, तो उद्याही निघाला तरी, तो अगदी दोन ते तीन तासांत पोहोचू शकतो, पण तरीही तो आजच मुंबईला जाऊ इच्छित आहे. ह्याचे महत्वाचे कारण म्हणजे, प्रकाश आणि खान असिस्ट ने बनविलेली प्लॅनिंग, मोनाच्या प्रेताचा बंदोबस्त करायची. दोघांनी मिळून असा प्लॅन बनविला आहे, ज्यात खूप मोठी रिस्क तर आहे, पण जर त्यांचा प्लॅन सफल ठरला तर, मोनाला योगेशच काय? स्वतः प्रकाशही शोधू शकणार नाही.
प्लॅननुसार, खान असिस्ट आणि प्रकाश स्पेशल गाडी करून निघायच्या तैयारीला लागले. प्रकाशने आपली पूर्ण तैयारी, खान असिस्टच्याच घरून केली. कारण जर तो आपल्या घरी गेला असता आणि मध्येच योगेशची इन्ट्री झाली तर पुढे गडबड होता काम नये, म्हणून तो दक्षता घेत होता. पूर्ण तैयारी करून झाल्यानंतर, आता मुख्य काम करायचे होते.
मोनाला, एका अश्या लांबट बॉक्समध्ये झोपविले, जे लाकडी बॉक्स होते, आणि त्याच्या खाली चार चाक होती. ज्याद्वारे त्या बॉक्सला हलविता येऊ शकणार होते. त्या लाकडी बॉक्सला वरून खूप सुंदर डिझाईन लावली, अगदी अशी, जशी जणू एखादं सुंदर गिफ्टच. सोबतच खान असिस्टने मुंबईला असलेल्या त्याच्या एका मूर्तिकाराला फोन करून एक ऑर्डर दिला.
प्रकाश आणि खान असिस्ट, मोनाला बॉक्स मध्ये बंद करून घेऊन जाऊ लागले. प्रकाश जिल्हाधिकारी असल्याने, त्याला कुणीही विचारले नाही की, ह्या बॉक्स मध्ये काय आहे. तसेही ते बॉक्स, बाहेरून जणू मोठे गिफ्टच असावे असे दिसत होते. दोघेही मोनाला घेऊन, अगदी काही तासांतच मुंबईला पोहोचले. मुंबईला पोहोचताच त्यांच्या राहण्याची व्यवस्था करून देण्यात आली. त्यांना एक खास अपार्टमेंट तर मिळाले, पण त्यांना, अजून एक महत्वाच काम करायचं होतंच. मोनाच्या प्रेताचे बंदोबस्त. दोघेही जरा नास्ता करून, मुंबई फिरण्याच्या बहाण्याने, मुद्दाम प्रकाश आणि खान असिस्ट फिरू लागले, मोनाच्या बॉक्सला त्या अपार्टमेंट मध्येच ठेऊन. एक दोन तास फिरल्यानंतर, खान असिस्टला कॉल आला होता, की त्यांचे काम झाले आहे. खान असिस्टने, त्या फोनवरील माणसाला, त्याचे ऑर्डर, मध आयलंड बीचच्या पश्चिमेला काही दूरवर, समुद्रातच १५५६७ नंबरच्या शिपवर डिलिव्हर करून द्यायला सांगितले.
प्रकाश आणि खान असिस्ट दोघेही आपल्या अपार्टमेंटकडे गेलेत. तिथून मोनाच्या बॉडीच्या बॉक्सला घेऊन जाऊ लागले. मध्येच काही पोलिसांनी त्यांना विचारले की, ह्यात आहे तरी काय? ह्यावर खान असिस्ट म्हणाला की, ह्याच्यात एक गिफ्ट आहे, ते गिफ्ट उद्या मुख्यमंत्रीला द्यायचे आहे. प्रकाश जिल्हाधिकारी असल्याने, पोलिसांनी जास्त चौकशी केली नाही आणि त्यांना जाऊ दिले. दोघेही १५५६७ नंबरच्या शिपने, समुद्राचा फेरफटका मारायला म्हणून, निघालेत.
पुण्यात योगेश, मोनासोबतच प्रकाशलाही शोधण्यात व्यस्त होता. त्याने प्रकाशच्या घराबाहेर काही पोलीस तैनात करून ठेवली होती, जसा प्रकाश घरी येईल, तसे ते पोलीस त्याला इंफॉर्म करावे म्हणून. पण योगेशला खबर मिळाली की, प्रकाश मुंबईला रवाना झाला आहे. सोबतच त्याला हेही ठाऊक झाले की, प्रकाशने आपल्यासोबत, एक आगळेवेगळे बॉक्स सोबत नेले आहे. त्याने त्या बॉक्सचे इमेजेस मागविलेत, जे त्याला मुंबईच्या एका सरकारी इमारतीच्या बाहेरील CCTV कॅमेऱ्यातून सापडले... ते बॉक्स खूप मोठे होते, लांबट होते, एवढे लांब की, त्यात एखादी माणूस नक्कीच फिट बसेल. त्या बॉक्सला प्रकाशचा असिस्टंट ओढत नेत होता. म्हणजे त्यात नक्कीच काहीतरी असेलच. योगेशला पूर्ण संशय आला की, त्यात नक्कीच मोना असावी. योगेशने मुंबईच्या पोलिसांना, तात्पर त्या बॉक्सची इन्कवैरी करायला सांगितले. त्या बॉक्स मध्ये काय आहे, हे माहीत करायला सांगितले. पण पोलिसांनी योगेशला सांगितले की, प्रकाश त्या बॉक्सला घेऊन, समुद्राच्या दिशेने एका शिपद्वारे गेला आहे, जसा तो किनाऱ्यावर येईल, तशी त्याची चौकशी करणार, असे आश्वासन दिले.
प्रकाशची शिप, त्यांच्या मुख्य केंद्रात पोहोचली. काही वेळातच, खान असिस्टच्या ऑर्डरची शिप तिथे पोहोचली. त्या शिपमधील माणसाने, त्यांचे ऑर्डर त्यांना दिले, खान असिस्टने त्या ऑर्डरची पेमेंट दिली. पेमेंट मिळताच, ते शिप निघाले. खान असिस्टने, पुण्याला असतानाच मोनाला प्याक केलेल्या वरील बॉक्सचे आणि डिझाईनचे फोटो काढून, मुंबईच्या त्या मूर्तिकाराला पाठविले होते, सोबतच त्या बॉक्सचे मोजमापाही दिले. त्याला सांगून ठेवले की, अगदी हुबेहूब बॉक्स बनवून ठेवायचे.
ते ऑर्डर, अगदी हुबेहुन, त्या बॉक्ससारखेच होते. तेवढीच लांबी-रुंदी, तशीच डिझाईन, अगदी सेम तू सेम. खान असिस्टने, त्या शिपचालकाला त्याची शिप पुन्हा खोल समुद्राकडे नेण्यास सांगितले. काही दूरवर गेल्यानंतर, जिथे दुसरे कुठलेही जहाज न्हवते, आणि माणसांचा वावर न्हवता, अश्या ठिकाणी, मोनाच्या बॉक्समधून, मोनाला बाहेर काढले. तिला दोर बांधला आणि तिला पाण्यात सोडले. दोर लांब होते, ती पाण्यात, शिपपासून जरा दूरवर गेली. तिला पाण्यात टाकण्याआधी तिच्या शरीरावर, चाकूने काही घाव केले.
काही वेळातच, मोनाच्या घावातुन निघालेल्या रक्तामुळे, चार ते पाच शार्क तिच्या शरीराकडे आकर्षित झाली. अगदी काहीच मिनिटांत, त्या शार्कने मोनाच्या पूर्ण बॉडीला खाऊन टाकले. मोनाला शार्कने खाल्ल्याची जाणीव होताच, त्या तिला बांधलेल्या दोरीला आणि तिच्यावर केलेल्या घावाच्या चाकूलाही पाण्यात फेकून दिले, आणि परत किनाऱ्याकडे त्यांची शिप निघाली.
शिप किनाऱ्याजवळ पोहोचताच, पोलिसांची टीम त्यांची वाट बघतच होती. पोलिसांनी, प्रकाशला त्या बॉक्स बद्दल विचारणा केली आणि त्या बॉक्समध्ये काय आहे, हे जाणून घेण्यासाठी काही पोलीस त्या बॉक्सला आपल्या ताब्यात घेतले.
पोलिसांनी बॉक्स खोलले. त्या बॉक्स मध्ये एक सुंदर मूर्ती होती, एका मुलीची, झोपलेल्या अवस्थेत असलेली. प्रकाशला ह्या मूर्तीबाबत विचारले असता, प्रकाशने सांगितले की, हे गिफ्ट उद्या होणाऱ्या मिटिंगनंतर मुख्यमंत्रीला भेट म्हणून, ही मूर्ती देणार आहे. मूर्ती असल्याने, प्रकाशची पुढे चौकशी झाली नाही. नंतर दोघेही आपल्या अपार्टमेंटमध्ये गेलेत. पोलिसांनी योगेशला कळविले की, त्या बॉक्स मध्ये एक मूर्ती असल्याचे.
दोघांचाही प्लॅन सक्सेस झाला होता. दोघेही आपल्या अपार्टमेंट मध्ये आलेत. प्रकाशला पहिल्यांदा कुणाचा खून केल्याबद्दल समाधान वाटत होते, कारण ह्याधीचे दोन्ही खून केल्यानंतर, त्याला खूप दुःख झाले होते. पण तिघांचेही खून केल्यानंतर त्याला हे कळून चुकले की, आता त्याचे जीवन किती चांगले झाले आहे, आता त्याच्या जीवनात, दुःख देणारे लोक उरले नाहीत, ह्याच विचाराने तो आनंदी झाला. रात्रीच खान असिस्टसोबत अपार्टमेंटमध्येच एक छोटीशी पार्टी केली.
दुसऱ्या दिवशी, मुख्यमंत्रीसोबतची मिटिंग पार पाळून आणि त्यांना मूर्ती गिफ्ट देऊन झाले होते. त्या सुंदर महिलेची झोपलेल्या अवस्थेत असलेली ती मूर्ती मुख्यमंत्रीला खूप पसंत पडली, ह्यासाठी त्यांनी प्रकाशचे विशेष आभार मानले. सायंकाळीच प्रकाश आणि खान असिस्ट मुंबईहून, पुण्याला निघणार होते.
योगेशला खबर मिळाली की, प्रकाश रात्री आठ वाजेपर्यंत, पुण्याला येणार आहे. तो पुण्याला येताच, योगेश त्याची विचारपूस करणार होता. पण विचारपूस करण्यापूर्वी, प्रकाशला त्याच्या घरी घेऊन जाऊन, त्याच्या घरातील CCTV कॅमेरा चेक करणार होता, की नेमके रात्री काय झाले होते. योगेशने प्रकाशच्या घरी, खूप जास्त प्रमाणात पोलीस तैनात करून ठेवली होती. तो स्वतः त्याच्या घरापुढे होता, प्रकाशाची वाट पाहत.
प्रकाश घराकडे परतू लागला. अर्धा रस्ता पार झाल्यावर, त्याला कुठेतरी गडबड वाटू लागले. तो कुठेतरी चुकत आहे, असे त्याला वाटू लागले. ही गोष्ट त्याने खान असिस्टला सांगितली. अश्यातच त्याला वाटू लागले की, योगेश आपला पिच्छाच धरून नक्कीच असेल. तो आपली वाट नक्कीच बघत असेल, कारण समुद्रकिनाऱ्यावर पोलिसांचे आपल्याला असे विचारणे, अशी चौकशी करणे की, त्या बॉक्स मध्ये कुठली वस्तू आहे, हे नक्कीच योगेशचेच काम असेल, असे त्याला वाटू लागले. एवढ्यातच त्याला समजले की, त्याने परवा घडलेल्या मोना सोबतच्या इनसिडेन्सला CCTV कॅमेरात कुठलेही फेरबदल केलेले नाही. योगेश नक्कीच उत्सुक असेल की, मोना आणि आपल्यासोबत त्या रात्री काय झाले हे बघायला. त्याला हे तर समजलेच की त्याच्या घरी नक्कीच योगेश किंवा पोलीस असेलच, पण एवढ्या लवकर CCTV कॅमेरात फेरबदल करायचा कसा? मुख्य म्हणजे, घरात शिरून, आपल्या खोलीत जाऊन कॅमेरामध्ये बदल करायचाच कसा? कारण पोलीस बाहेर नक्कीच असेल. प्रकाश ह्याबद्दलच विचार करू लागला होता.
काही तासांतच प्रकाश घरी पोहोचला. त्याच्या संशयानुसार योगेश आणि पोलीस त्याची वाट पाहत त्याच्या घरापुढे होती. प्रकाशला सांगण्यात आले की, पटकन दाराला उघडून, CCTV कॅमेऱ्याची, परवाची रेकॉर्डींग द्यायला सांगितले. प्रकाशकडे दुसरा पर्याय नसल्याने, त्याने आपल्या घराचे दार खोलून, CCTV कॅमेऱ्याची रेकॉर्डिंग योगेशकडे सोपविली.
योगेशने, ती रेकॉर्डिंग बघता, त्याला समजले की, त्या रात्रीची, सोबतच त्यानंतरची कुठलीही रेकॉर्डिंग घरात झालेली नाही. ह्याचे कारण विचारले असता, प्रकाशने सांगितले की, त्याच्या घरातील CCTV कॅमेरा बंद पडले आहे, कुठलीतरी तांत्रिक अडचण आल्याने. पण बाहेरचे CCTV चालू असल्याची कबुली प्रकाशने दिली.
बाहेरील CCTV कॅमेरामध्ये असे दिसले की, त्या रात्री मोना जरा गडबडीत, पण खूप आनंदात घरून निघताना दिसत होती. ह्यावरून हे समजत होते की, मोना त्या रात्री आनंदी होती. पण काही तासानंतर, प्रकाशचा असिस्टंट, प्रकाशच्या घरी येऊन त्याला घेऊन जाताना दिसले. प्रकाशची शुद्धी हरपली, असे दिसत होते, सोबतच त्याच्या डोक्याला मार लागलेलेही दिसत होते. योगेशने ह्याबाबत विचारणा केल्यावर, प्रकाशने सांगितले की, त्याने त्या रात्री खूप जास्त दारू प्यायल्याने, त्याचा तोल गेला आणि घरातच एका कुंडीवर तो पडला, ह्यामुळेच त्याच्या डोक्याला मार लागला होता. त्यानंतर प्रकाशने खान असिस्टला उपचारासाठी बोलविल्याची कबुली दिली. घरात, मोनाच्या रक्ताचे किंवा तिला कुठे लपविले काय? ह्याची खात्री करून घेण्यासाठी पूर्ण घराची चौकशी करण्यात आली, पण त्यांना काहीही सापडले नाही. त्यांना खाली हात परतावे लागले.
प्रकाश पुण्याला पोहोचण्याआधीच, खान असिस्टला दुसऱ्या गाडीने जलद गतीने, आपल्या घरी जाण्यास सांगितले होते. खान असिस्ट प्रकाशच्या घरी पोहोचला. तो मागील रस्त्याने, लपून, प्रकाशाच्या खोलीत शिरला आणि त्याचे कॉम्पुटर चालू करून, प्रकाश जसा त्याला ऑर्डर देत होता, तसा तो कॉम्पुटर वर सेटिंग करून फेरबदल करत होता. त्याने त्या रात्रीपासूनचे CCTV फुटेज पूर्णतः डिलीट करून टाकली, सोबतच कॉम्पुटरद्वारेच, वायफाय असलेल्या CCTV कॅमेरा मध्ये आणि त्याच्या रेकॉर्डिंग हार्ड डिस्क मध्ये मालवेअर सोडून दिले. ह्यानंतर ते कॅमेरा बिघडून गेला. तसाच खान असिस्ट बाहेर आला, पुढून प्रकाश घरासमोर आला, खान असिस्टही प्रकाशच्या जवळ पोहोचला.
प्रकाशचा हा प्लॅन तर सक्सेस झाला, पण मोनाने त्याच्यासंबंधीतचे कुठलेतरी पुरावे, तिने कुठे लपवून ठेवले, हे काही कळत न्हवते... त्या पुराव्यांचा शोध घेणे, प्रकाश आणि योगेश दोघांनाही गरजेचे होते.
प्रकाशचे एकानंतर एक, प्रत्येक प्लॅन सफल ठरत गेले होते. तो जसा विचार करायचा, जसा प्लॅन बनवायचा, अगदी तसेच घडत होते. त्याने तीन मर्डर केले, ह्याबद्दल कुणालाही ठाऊक झाले नाही, ज्यांना ठाऊक झाले, प्रकाशने त्यांना सुद्धा, मृत्यूच्या कवेत टाकले. साधा सरळ मुलगा, आज परफेक्ट मर्डरर बनला आहे. महत्वाचे म्हणजे, जसा तो पहिला मर्डर केला होता, तेव्हा जेवढा दुःखी झाला होता, पण जो शेवटचा, मोनाचा खून केलाय तेव्हा तेवढाच त्याला आनंद झाला आहे. त्याच्या मते आता त्याला खरे स्वतंत्र मिळत आहे, असे त्याला वाटू लागले आहे. त्याच्यावर नजर ठेवलेली, वाईट करू इच्छिणारी, त्याला फसविणारी आणि नको असलेली माणसं आता ह्या जगात नाही, ह्यामुळे प्रकाशला खूप आनंद होऊ लागले होते. आता प्रश्न फक्त योगेशच होता. पण योगेशही आता काहीही करू शकणार न्हवता, कारण त्याच्याकडे आता कुठलेही पुरावे नाहीत, जे हे सिद्ध करू शकेल की, प्रकाशच सर्वांचा गुन्हेगार आहे. प्रकाश आणि खान असिस्टने ह्या गोष्टीवर, पुन्हा एकदा पार्टी केली.
योगेश आतून पूर्णतः तुटला होता. त्याची पहिलीच केस तो जवळपास हरलाच होता. त्याने आपल्या प्रिय गर्लफ्रेंड मोनाला गमावून बसला होता. त्याला ठाऊक होते की, आता कितीही शोधाशोध केली तरी मोना काही सापडायची नाही, कारण अजून राखीचाच पत्ता लागला नाही, तर मोनाचा कुठून लागणार? परवानगी नसताना सुद्धा, योगेश फक्त राखी, मोना आणि मोनाच्या आईच्या केसवरच फोकस करत होता. त्याला कित्येकदा सांगितले की, ह्या तीन केसच्या मागे लागू नको, ही केस पूर्णतः क्लिअर आहे, वरून त्याला ज्याच्यावर संशय येत आहे, तो जिल्हाधिकारी आहे, त्याच्यावर नजर पाळत ठेवणे, त्याच्यावर संशय घेणे, तेही पुराव्याशिवाय हे कुणालाच मान्य होणार नाही. असे असूनसुद्धा आणि आपल्या वरील अधिकाऱ्यांची वॉर्निंग मिळूनसुद्धा तो फक्त ह्या तिघांच्याच केसची चौकशी करत होता. हे वरील अधिकाऱ्यांना समजताच, त्यांनी शेवटची वॉर्निंग दिली की, जर त्याने ह्या केसला सोडले नाही तर, त्याला नोकरीतून काढल्या जाईल. पण ह्यावर योगेश म्हणाला, "मी स्वतःहुन ही नोकरी सोडून जाईल सर, जर प्रकाश ह्या सर्वांचा गुन्हेगार निघाला नाही तर! पण प्लिज मला सध्यातरी ह्याच केसवर काम करू द्या! मी तुम्हाला वचन देतो की, ह्या केसचा निकाल कसाही असो, मी त्यानंतर ही नोकरी स्वतःहुन सोडून देणार... पण मला ह्या केसचाच शोध घेऊ द्या सर! ह्या केस मुळे माझे सारंच पणाला लागलं आहे, माझी होणारी बायको गायब आहे, तिच्या आईचा खून झाला आहे, ह्या सर्वांचा खुनी कोण आहे, हे मला ठाऊक असतानासुद्धा, मी काहीही करू शकत नाही आहे... पण मला हे सिद्ध करायचेच आहे की, ह्यामागे खरंच प्रकाशचाच हात आहे की, त्या तिघांचेही खून नसून एक योगायोग आहे!" असे म्हणून त्याने आपल्या बॉसला पटवून दिले की, तो ह्याच केसला तोपर्यंत लढत राहणार, जोपर्यंत त्याचे ध्येय साध्य होणार नाही. सोबतच त्याने बॉसला रिजाईन लेटर तैयार ठेवायला सांगितले, जर तो आपले ध्येय साध्य करण्यास असफल ठरला तर, तो ही CBI अधिकाऱ्याची प्रतिष्टीत नोकरी सोडून जाणार!
प्रकाश घरी आनंद साजरा करतच होता, एवढ्यातच, त्याचे वडील घरी परतले. त्याच्या वडिलांना समजले की, मोना काही दिवसांपासून गायब झाली आहे... प्रकाशला धीर द्यायला ते आले होते. प्रकाशला आता स्वतःला जरा सावरावे लागणार होते, वडीलांपासून वाचून आणि सावध राहावे लागणार होते. प्रकाश आपल्या ऑफिसमधून येताच, त्याच्या वडिलांनी त्याला विचारले, "काय मिळाले असे करून? का तुने दोघांचाही खून केलास? तुझ्याकडून माझी अशी अपेक्षा मुळीच न्हवती. एवढा साधा सरळ मुलगा, एवढा निर्दयी कसा होऊ शकतो, काय मिळालं, आपल्या आईला व आपल्या बहिणीला ठार करून? पडलास ना पुन्हा एकटा? तुला माझ्याबद्दल कधीच आठविले नाही काय? माझे काय होईल, त्यांच्या विना? मी त्या दोघांवरही तेवढेच प्रेम करतो, जेवढे तुझ्यावर करतो! तुला ते चांगली वागवणूक देत न्हवते, तुझ्यासोबत चांगले बोलत न्हवते, ह्याची एवढी मोठी शिक्षा? खरं सांग, तुनेच दोघांना ठार केले आहे ना?"
प्रकाशच्या वडिलांचे, अचानकपणे असे म्हणणे, सोबतच त्यांना ह्याबद्दल ठाऊक झालेच कसे, ह्या विचाराने त्याला घाम फुटू लागला... आता ह्यापुढे खरं उत्तर द्यावे की खोटं द्यावं, हे त्याला समजत न्हवते, कारण पुढे त्याच्यासोबत काय होणार, हे त्यालाही अंदाज लागत न्हवता. तरीही प्रकाश पहिली खबरदारी म्हणून, आणि स्वतःला निर्दोष असल्याचे चेहऱ्यावर हावभाव दाखवीत, त्यांना विचारले, "तुम्ही असे का विचारत आहेत? तुम्हाला असे का वाटते की, मीच त्यांचा खून केला म्हणून? तुम्ही कोणत्या पुराव्यावरून मला म्हणत आहेत? मी असे काहीही केलेले नाही!" प्रकाश अडकत अडकत, आपल्या तुटल्या आवाजत म्हणाला!
"आता माझ्यापासून लपविण्याचा काहीही फायदा नाही! मला तुझ्याबद्दल सारंच ठाऊक झालं, आता खरं काय? हे मला पूर्ण सांग!" प्रकाशचे वडील रागात त्याला विचारले.
प्रकाशला समजत न्हवते की, त्याने आता काय करावे? तो वडीलांपासून काहीही लपवू शकत न्हवता, मुळात तो आपल्या वडिलांसोबत कधीही खोटं बोलत न्हवता. तो नक्कीच वडिलांना सारं सत्य सांगून टाकणार होता, त्यानंतर त्यांनी दिलेली कुठलीही शिक्षा भोगायला तो तैयार होता. पण त्याआधी त्याने वडिलांना विचारणा केली की, "मी तुम्हाला माझं सारं सत्य सांगेल, पण त्याआधी तुम्ही मला हे सांगा की, तुम्हाला माझ्याबद्दल कसं ठाऊक झालं?"
ह्यावर त्याचे वडील म्हणाले, "मला तुझी खूप काळजी लागून होती. मला भीतीही वाटत होती की, माझ्या मुलाला, माझी बायको आणि मोना खूप त्रास देईल, मी घरी नसलो तर. मला काळजी वाटू लागली की, तू नक्कीच एकटा पडणार, मी जेव्हा दुबईला आणि त्यानंतर बंगरुळूला बिजनेससाठी गेलेलो असेल तेव्हा. तुझ्या काळजी पोटी, आणि मोना आणि तिच्या आईवर नजर ठेवण्यासाठी, मी मुद्दाम एक छुप्या कॅमेरा, आपल्या हॉलच्या AC च्या बाजूला लावून घेतला होता, तो कॅमेरा असा होता, ज्याला शोधून काढणे खूप मुश्किल, एवढा लहान कॅमेरा. ह्या बाबत, माझ्याशिवाय कुणालाही ठाऊक न्हवते. मी कॅमेरा लावला तर खरा, पण मला घरी रोज रोज नजर ठेवणे, आणि घरात काय सुरू आहे, हे रोज रोज बघणे जमणार न्हवते. म्हणून विचार केला की, मी जेव्हा जेव्हा घरी येत जाईल, तेव्हा तेव्हा आतापर्यंत घडलेला सर्व प्रकार बघत जाईल. ह्या आधी मी घरी आलो होतो, तेव्हा तू जिल्हाधिकारी बनलेला न्हवता. त्या वेळी मी माझे CCTV कॅमेरा रेकॉर्डिंग चेक केल्यानंतर मला समजले होते की, मोना आणि तिची आई, तुझ्यावर खूप अत्याचार करून घेत आहेत, तुला अगदी नोकराप्रमाणे काम करवून घेत आहेत. त्यासाठी त्यांनी आपल्या घरातील सर्व नोकरांना कामावरून काढून टाकले. मला ते दृश्य बघून खूप दुःख झाले. मी मोनाच्या आईला ह्याबद्दल विचारणा केली, पण तिचे उत्तर खूप उडवाउडवीची होती. तिला मान्यच न्हवते की, ती तुझ्यासोबत असे काही करत आहे म्हणून. मला त्यानंतर लगेच बंगळुरूला जायचे असल्याने, मी काही करू शकलो नाही. पण मला ठाऊक झाले होते की, तू आपल्या खोलीत, जसा वेळ मिळाला तसा अभ्यास करत होता. मी तुझे पुस्तकं बघितले असता, मला समजले की, तू UPSC ची तैयारी करत आहेस. मला तुझ्यावर पूर्ण विश्वास होता की, तू नक्कीच परीक्षेत पास होशील, आणि ह्या बंधनातून मुक्त होऊन, दुसरीकडे सेटल होशील. मी ह्याच खात्रीने इथून निघालो. तू पास तर झालाच होता, पण तुझी जिल्हाधिकारीची सेवा, इथेच लागली. काही दिवसांत मोनाच्या आईचे निधन झाले. पण मला तो संशयास्पद वाटले. मी जेव्हा तिच्या निधनाला घरी आलो होतो, तेव्हा मी पुन्हा तो, मी लावलेला CCTV कॅमेरा चेक केला. त्यात मला स्पष्ट दिसले की, तू रात्री मोनाच्या आईच्या खोलीत रागात गेला, आणि येताना घाबरत आला. पण बाहेर येण्याच्या वेळी, दारातुन दिसले की, मोनाची आई बेडवर पडली आहे. मला समजले की, तिला नक्कीच तुनेच ठार केले असेल. पण मी त्यावेळेस काहीही म्हटले नाही. कारण तुझ्यावर तिने एवढा अत्याचार केला, तू एवढा अभ्यास करून जिल्हाधिकारी बनला तरी तिचा अत्याचार कदाचित थांबला नसावा, म्हणून स्वतःला स्वतंत्र करण्यासाठी तुने तिला ठार केला म्हणून मी त्यावेळेस तुला काहीही म्हटले नाही. पण त्यानंतर आज मी CCTV चेक केले असता, मला त्या रात्री घडलेला पूर्ण प्रकार दिसला. तू दारूच्या नशेत तिला मारायला गेला, पण मोनानेच तुला मारून, दार बाहेरून लावून गेली. पण त्यानंतर तुने कुणालातरी फोन करून काहीतरी सूचित केले. त्या दिवसानंतरचे रेकॉर्डिंग चेक केले असता, मला हळूहळू समजू लागले की, नक्कीच तुनेच तिचा खून केला असावा. कारण त्याच रात्री तिच्या कारचा अपघात होणे, कार मधून गायब होणे, तुझ्या सोबतच्या एका माणसाचे घरात मागून शिरणे, तुझे त्यानंतर एन्जॉयमेंट करणे, ह्यावरून हेच समजते की, तुनेच तिचा खून केला असावा! पण तुने असे का केले? तिला कशाला ठार केले? तिला तरी सोडून द्यायचे ना? तिच्यापासून तू दूर राहून, दुसरीकडे आपले घर बांधून राहिला असता, दोघेही वेगवेगळे जीवन जगले असते, तर दोघेही आपापल्या जीवनात आनंदीच असते ना? मग एवढे मोठमोठे गुन्हे करण्याचे काय कारण?"
प्रकाशकडे आता पूर्ण त्याचे सत्य सांगण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय दिसत न्हवता. त्याने आपल्या वडिलांना आत्तापर्यंत घडलेला पूर्ण प्रकार सांगून टाकले. तो आत्महत्त्या करत असणाऱ्या इव्हेंट पासून, त्याच्या वडिलांनी त्याला कशी त्याची समजूत काढली आणि त्यातूनच राखीचा खून करण्याची भावना जागण्यापासून, त्याच्या पूर्ण प्लॅनपासून ते राखीला ठार करण्यापर्यंत, त्यानंतर त्याच्या आईला चुकून त्याचे पूर्ण सत्य सांगण्यापासून, तिच्या गुलामगिरीच्या जीवनापासून मुक्तीसाठी आणि तिचे कटकारस्थान ज्यात, त्याला त्याला जेलात टाकून, पूर्ण संपत्ती मोनाच्या नावे करून देण्यापासून तर, तिचा खून कसा केला, ह्याबद्दलही. त्यानंतर मोनाला ठार करण्याचे कारणही रडत रडत सांगून, तो मोकळा झाला. प्रकाश त्याची आत्तापर्यंत घडलेली पूर्ण कहाणी सांगताना ढसाढसा रडून, प्रत्येक वाक्यात वडिलांची क्षमा मागत त्यांना एकोनेक किस्सा सांगून टाकला. पूर्ण सांगून झाल्यानंतर प्रकाशने स्पष्ट केले की, आता ह्यानंतर त्यांनी प्रकाशला कुठलीही शिक्षा दिली तरी, तो स्वखुशीने शिक्षा भोगायला तैयार आहे. मग तो आजीवन कारावास असो, वा फाशीच असो! सोबतच हेही स्पष्ट केले की, ह्यानंतर तो कुणाचाही खून करणार नाही.
प्रकाशची आत्तापर्यंतची पूर्ण गोष्ट ऐकल्यानंतर ते खूप दुःखी झाले. ते म्हणाले, "जर मला ठाऊक झाले नसते तर, तू आणखी किती जणांचा खून केला असता?"
प्रकाश म्हणाला, "ज्यानं ज्यांना माझ्याबद्दलचे पुरावे सापडत जाईल, प्रत्येकानं संपवून टाकणार होतो. पण आता मला समजले आहे, माझे डोळे उघडले आहे, आणि आता मी ह्यानंतर कुणाचाही खून करणार नाही, असे माझे वचन आहे, पण मला माफ करा, हवे तर मला कुठलीही शिक्षा द्या, पण मला दुराऊ नका! कारण तुमच्या शिवाय माझं कुणीही जवळचं नाही!"
त्याचे वडील म्हणाले, "आता तर मलाही तुझ्याबद्दल ठाऊक झाले आहे, आता माझाही खून करशील?"
प्रकाशने आपल्यावडिलांचे पाय पकडले, आणि रडत रडत म्हणाला, "असे मी मुळीच करू शकत नाही बाबा! मी तुम्हाला कसा मारू शकणार? तुम्ही मला जन्म दिलाय, मी हा विचारच करू शकत नाही, असा विचार येण्याआधीच मी स्वतःला संपवून टाकेल, पण असे काहीही करणार नाही! तुम्ही माझे पूर्ण पुरावे, पोलिसांना द्या, हवं तर मी साक्ष देण्यास तैयार आहे, पण असे म्हणू नका बाबा!"
त्याचे वडील त्यांच्या लॅपटॉपवर काहीतरी करू लागलेत! प्रकाशने ह्याबाबत विचारणा केली असता, त्यांनी सांगितले की, आतापर्यंत त्यांच्या CCTV कॅमेराने जे काही रेकॉर्ड केलं आहे, ते सर्वच डिलीट करून टाकत आहेत. प्रकाश त्यांना असे करण्यापासून अडवू लागला, तो म्हणाला, "प्लिज हे डिलीट करू नका, तुम्ही हे पोलिसांना दाखवून, मला शिक्षा द्या, प्लिज! मी तीन लोकांचा खून केलाय, ह्याची शिक्षा तर मला मिळायलाच हवी... थांबा एक मिनिट, मी आत्ताच पोलिसांना फोन करून त्यांना घरी बोलावून घेतो. (पोलिसांना फोन लावून) हॅलो! पोलीस!! (मध्येध त्याच्या वडिलांनी, त्याचा फोन घेऊन, फोन कट केला), बाबा, मला पोलिसांना बोलवू द्या! मला आता अडवू नका, मला आता शिक्षा झालीच पाहिजे!!"
"तुझ्यावर पूर्ण जिल्ह्याची जबाबदारी आहे! आत्तापर्यंत तुने जे काही केले आहे, ते तुझ्या स्वाभिमानाला वाचविण्यासाठी आणि स्वतःचे रक्षण करण्यासाठी केले आहे! जर तू ह्यानंतर एकही खून करणार नसशील तर, तुला काहीही गरज नाही पोलिसांना सांगायची. तुझ्या जिल्हाधिकारीच्या कालखंडात, एवढ्या कमी वेळेत, खूप जास्त प्रगती होत आहे, तुला लोक खूप पसंत करत आहेत, तुझे कौतुक करून, गुणगान सुद्धा करत आहेत, आता अश्या स्थितीत, त्यांना हे समजले की, त्यांचा प्रिय जिल्हाधिकारी गुन्हेगार आहे, ह्यानंतर त्यांचा चांगल्या माणसावरचा विश्वास निघून जाईल त्यांना खूप मोठा धक्का बसेल. त्यांना वाटेल की, प्रत्येक चांगला आणि साधा-सरळ दिसणारा माणूसही गुन्हेगार निघू शकतो. पुढे जाऊन लोक प्रत्येक साधारण आणि भोळ्या माणसांवर संशय घेईल. असे होता कामा नये... मी तुझ्या काळजीपायी कॅमेरे लावले, जरी तुने गुन्हे केले असले तरी, एकदम परफेक्ट केले आहे. मी केलेल्या गुन्ह्याला प्रोत्साहन करत नाही आहे, पण मला असे वाटते की, जर ते तुझ्या काळजीपोटी कॅमेरे लावले नसते तर, तुझे हे सत्य कधीच मला कळले नसते. मी हे काळजीपोटी लावलेल्या कॅमेराचा जोरावर तुला जेलात मुळीच टाकू शकत नाही. सोबतच तू मला वचनही दिले आहे की, तू ह्यानंतर खून करणार नाही, मग तुला जेलात टाकायचा प्रश्नच येत नाही."
"हो बाबा, ह्यानंतर मी कुणाचाही खून करणार नाही... पण जेव्हा तुम्हाला वाटले की, माझ्यासारख्या गुन्हेगाराला जेलात असायला हवे, तेव्हा तुम्ही बिनधास्त पोलिसांना सांगू शकता. मी साक्ष नक्कीच देईल. तुमची शप्पत!" प्रकाश म्हणाला...
योगेश दिवासरात्र फक्त प्रकाशच्याच केसवर काम करत होता. तो एकोन एक असे प्रत्येक पुरावे जमा करत होता, असे लहानात लहान, ज्याला प्रत्येक माणूस इग्नोर करत असतो. त्याने स्वतःला हे ही समजावून सांगितले की, त्याला आपल्या मर्यादेत राहून काम करायचे आहे, काहीही असले तरी प्रकाश जिल्हाधिकारी आहे, ठोस पुराव्याशिवाय तो कुठलेली पाऊल उचलणार न्हवता. तो आपला अर्धा वेळ स्वतःहून पुरावा गोळा करण्यात व्यस्त राहत होता, आणि अर्धा वेळ, मोनाने कुठेतरी लपवून ठेवलेला पुरावा शोधण्यात मग्न रहात होता. मोनाने लपविलेला पुरावा शोधण्यासाठी, तो तिच्या लॅपटॉपवर शोधाशोध करत होता, तिच्या घरी दुपारी लपून, प्रकाश नसताना येऊन तिथेही शोधमोहीम करत होता. पण त्याला कुठलेही पुरावे सापडत न्हवते.
अशातच त्याला एक असा वेगळा पुरावा सापडला, ज्याद्वारे प्रकाश खूप मोठ्या संकटात सापडू शकत होता, मोठ्या संकटातच काय? तो नक्कीच त्यांनतर जेलात जाऊ शकत होता.
मोना गायब झाल्याचे ऐकून, तिचे वडील घरी परतले होते. पण त्यांना प्रकाशचे पूर्ण सत्य कळले. पण प्रकाशने ह्यापुढे कुठलेही गुन्हे करणार नाही, ह्यापुढे कुणालाही ठार करणार नाही, असे वचन देऊन तो मोकळा झाला. प्रकाशवर आणि त्याने दिलेल्या वचनावर विश्वास ठेवून, पुन्हा ते बंगळुरूला परतले.
प्रकाश पूर्णतः एकटा पडला होता. आता त्याच्या वडिलांचेही प्रेम मिळणे कठीणच होते. फक्त एक विश्वास होता, तोच त्याला टिकवून ठेवायचा होता. तो पुन्हा एकदा खूप दुःखी झाला, त्याने केलेल्या प्रत्येक गुन्हाचे तो प्रायश्चित करू इच्चीत होता, पण तो आता काहीही करू शकत न्हवता. त्याच्या जीवनातील त्याला दुःख देणारे लोक आता नाहीत, असे असूनसुद्धा त्याला दुःख ह्यामुळे आहे की, ते लोक त्याच्यामुळेच नाही. तो रडू लागला, पण याआधी दुःख कमी करण्यासाठी घेतलेली दारू, जे त्याच्या पुन्हा विनाशाच्या दारात ओढले होते, ते त्याला पुन्हा प्यायची न्हवती. पण त्याचे दुःख कमी करण्यासाठी त्याने आपल्या घरी खान असिस्टला बोलावून घेतले. खान असिस्टला त्याने पूर्ण कैफियत सांगितली. खान असिस्टलाही ह्याचे खूप दुःख झाले. पण तरीही त्याने प्रकाशला चांगलाच धीर दिला, आणि काही दिवस ऑफिस मध्ये न येता, घरीच आराम करण्याच्या त्याने सल्ला दिला. प्रकाशला मात्र हे कळून चुकले की, त्याने आपल्या गुन्ह्याला, आपल्या चुकीला कितीही लपविले, तरीही तो पूर्णतः स्वतःला निर्दोष म्हणून सिद्ध करू शकत नाही. त्याला हळू हळू समजू लागले की, त्याला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा कधीना कधी नक्कीच मिळेल!
योगेश, आपली शोधमोहीम राबवतच होता. तो पुरावे शोधण्यासाठी आटापिटा करत होता, तो जणू वेड्यासारखेच वागत होता. त्याला आता फक्त पुरावे हवे होते. तो पुरावे शोधण्याच्याच बेतात असताना, त्याला एक असा पुरावा आणि असा साक्षीदार सापडला, जो प्रकाशाच्या केसला नवे वळण देऊ शकेल. राखीच्या घारामागेच असलेला, 'जीग्नेश' नावाच्या एका व्यक्तीने, प्रकाशचे एक असे छायाचित्र घेतले होते, ज्याची प्रकाशच्या केससाठी गरज होती, अशी खबर योगेशला मिळाली. योगेश आपली पूर्ण टीम घेऊन जीग्नेशच्या घरी गेलेत. योगेशने विचारले की, त्याने असे काय बघितले आणि असे कोणते छायाचित्र बघितले ज्याच्या आधारे त्याने पूर्ण पोलिसांना आपल्या घरी बोलावून घेतले?
प्रकाश जेव्हा राखीचा खून करून, खिडकीद्वारे राखीला खाली, आपल्या गाडीत म्हणजे वरून आपल्या कार वर फेकले, तेव्हा जरासा आवाज झाला होता. त्या वेळेत जीग्नेश उठलेला होता. तो आवाज कसला आहे, हे बघण्यासाठी गेला असता, त्याला त्याच्या घराच्या पुढच्या रोडवर असलेल्या एका आलिशान कार मध्ये एक मुलगी विचित्र अवस्थेत पडलेली दिसली. चांगले बघितले असता, त्याला समजले की, ती राखीच होय, त्याच्या घरापुढे राहणारी. त्याने लगेच आपला फोन काढला आणि पटपट एकावर एक छायाचित्र आपल्या फोनमध्ये सेव्ह करून घेतले. त्याला एक मुलगा, तिच्या खिडकीतून, पाईपद्वारे खाली उतरताना दिसला होता. जीग्नेशने पटकन त्याचेही छायाचित्र काढून टाकले. ह्याच पुराव्याच्या जोरावर त्याने शोधाशोध करत असलेल्या योगेशला घरी येऊन एक ऑफर देण्याचे ठरविले.
जीग्नेश एक खूप मोठा जुगार होता. त्याला कुठलीही नोकरी नाही, त्याने लॉटरी, जुगार, फसवणूक असे धंदे करून, आपल्या जीवनात खूप कमाई करून घेतली. पण त्याने पूर्ण संपत्ती त्याच्या एका चुकीमुळे गमावून टाकली. त्याला वाईट गोष्टींची लतही लागली होती. त्याची बायकोही त्याच्या ह्या कारणामुळे त्याच्यापासून दूर झाली. तो एकटा पडला होता. तरीही त्याने लॉटरी लावणे, जुआ खेळणे सोडले नाही. अश्यातच तो कर्जबाजारी झाला होता.
जीग्नेशने योगेशला तो छायाचित्र दाखविला तर न्हवता, सोबतच त्याने हेही सांगितले न्हवते की, त्याच्याकडे नेमके कोणते पुरावे आहेत. त्याने फक्त योगेश आणि पोलिसांना बोलाविले होते, एक डील करायसाठी. तो योगेशला सांगणार होता की, त्याने प्रकाशची गाडी बघितली होती, ज्या रात्री राखी गायब झाली होती. पण ते संगण्याआधी त्याने योगेशकडे पाच लाखांची मागणी केली. तो पुरावे देण्यासाठी पैश्याची मागणी करत आहे, हे समजताच, एका पोलिसाने त्याच्या कानाखाली एक जोरदार झापड मारली. पण जीग्नेशने स्पष्ट केले की, त्याला कितीही मारले तरी तो आपल्या तोंडून एकही शब्द सांगणार नाही आणि पुरावेही दाखविणार नाही जोपर्यंत त्याला त्याचे पाच लाख मिळणार नाही.
योगेशला कुठल्याही परिस्थितीत पुरावे हवे होते. म्हणून योगेशने स्वतःजवळ असलेले पाच लाख, बँकेतून थेट त्याच्या बँकेत ट्रान्सफर केलेत. पाच लाख प्राप्त होताच, जीग्नेशने सांगितले की, त्याने रात्री प्रकाशची गाडी बघितली होती, अगदी राखीच्या खिडकीच्या थेट खाली. पुढचे सत्य सांगायला, तो पुन्हा तीन लाखांची मागणी करू लागला. तीन लाख मिळाल्यावर तो त्यांना सांगणार होता की, त्याने राखीला मृत अवस्थेत, प्रकाशच्या गाडीत बघितले होते म्हणून. पण पुन्हा तीन लाखांची मागणी करत आहे, हे माहीत झाल्यावर, त्याला पोलिसांनी त्याला घेऊन आपल्या कस्टडीत नेले, तिथे नेऊन त्याला खूप मारले. पण एवढा मर सहन करूनही त्याने आपल्या तोंडून एक शब्दही उच्चारला नाही. योगेशला समजले की, त्याला पैसे दिल्याशिवाय तो काहीही सांगणार नाही. त्याने आपल्या बचत खात्यातून तीन लाख काढून त्याच्या बँकेत ट्रान्सफर केलेत. पैसे मिळताच, त्याने सांगितले की, त्या रात्री त्याने थेट प्रकाशलाच बघितले होते, त्याच्या कार मध्ये मोना पडलेली होती, त्यानेच तिला घेऊन गेले.
आता त्या घटनेचे पुरावे, म्हणजेच छायाचित्र दाखविण्याचे दहा लाख मागत होता आणि कोर्टापुढे साक्ष देण्यासाठी पुन्हा पाच लाख मागत होता. म्हणजे पंधरा लाख त्याच्या खात्याचा जमा झाल्यावर त्याच्याजवळ असलेले पूर्ण पुरावे तो योगेशला सोपविणार होता. पण असे ठाऊक होताच, त्याला पुन्हा खूप मारले, त्याच्या मोबाईलला चेक केले, तिथे पासवर्ड होते म्हणून, एका हॅकरला बोलावून मोबाईल चालू करण्यास सांगितले. मोबाईल चालू झाल्यानंतर सुद्धा योगेश आणि योगेशच्या टीमला काहीही सापडले नाही. पोलिसांनी त्याच्या घरीही शोधाशोध केली, पण तरीही त्यांना जीग्नेशच्या घरी काहीही सापडले नाही. जीग्नेशला खुप मार मिळाल्याने, तो बेशुद्ध झाला होता. त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले.
प्रकाश अजूनही दुःखात होता. खान असिस्ट रात्री प्रकाशच्याच घरी मुक्काम करणार आहे, असे निश्चित केले. प्रकाशला सर्व दुःखाचे मूळ कारण, घरी लावून असलेल्या कॅमेरा मुळेच झाले, असे त्याला वाटू लागले, म्हणून त्याने घरातील बंद पडलेले कॅमेरे आणि घराबाहेरील चालू असलेले कॅमेरे काढून फेकून दिले. त्याला आता जरा चांगले वाटू लागले होते.
जीग्नेश हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी असतानाच, रात्रीच्या वेळेस, त्याला काय झाले काय ठाऊक? तो पोलिसांपासून लपून, एका कॉमपौंडरचे रूप घेऊन, मेन गेटनेच पळून गेला. त्याने थेट, प्रकाशचे घर गाठले.
प्रकाश आत असतानाच त्याला, कुणीतरी बाहेर असल्याचे बाहेरील बेल रिंगने समजले. त्याने दार खोलले असतानाच त्याला एक बँडेज पट्ट्याने बांधलेल्या अवस्थेत एक माणूस दिसला. त्या जीग्नेशने प्रकाशला घरात धक्का देऊन, त्याचे दार बंद केले. प्रकाशने त्याची विचारणा केली की, तो कोण आहे आणि त्याला काय हवंय? जीग्नेशने त्याला समजावून सांगितले की, योगेश त्याच्या मागावर आहे, तो त्याच्याकडून पुराव्यांच्या अपेक्षेत आहे.
प्रकाशने जीग्नेशला सोफ्यावर बसविले. मागून खान असिस्टही आला. त्याला पाणी दिले आणि त्याला पूर्ण घटनाक्रम काय झालं आहे, हे विचारले!

"मी जीग्नेश! मी राखीच्या घराच्या मागे राहतो. मला कुठलीही नोकरी नाही, पण मी कोणत्याही नोकरीपेक्षा पाच ते दहा पटीने जास्तच कमावून घेत होतो. मी जुआ खेळून, लॉटरी लावून, प्रत्येक खेळात सट्टेबाजी करून, खूप संपत्ती कमावून घेतली होती. माझे नुकतेच लग्न झाले होते, म्हणजे लग्नाला जवळपास आठ ते दहा महिने झाले असावे! मी माझ्या आयुष्यात आनंदी होतो, पण माझी बायको न्हवती, ती मला फोर्स करू लागली की, मी हे सट्टेबाजीचे काम सोडून द्यावे, पण मला ते मुळीच सोडायचे न्हवते. कारण त्यामुळेच मी एवढा धनवान झालो होतो की, माझ्याकडे कुठल्याही वस्तूंची कमतरता न्हवती. आमचं अरेंज म्यारेंज झालं होतं. तिला अगदी साधं आयुष्य हवं होतं. माझा एक खूप मोठा बंगला सुरतला आहे, पण तिला त्या बंगल्यात जराही करमत न्हवते, म्हणून आम्ही इकडे पुण्याला शिफ्ट झालो. मला राखीच्या घरामागे, काही महिन्यांपूर्वीच एक घर मिळालं, मी तिथेच राहू लागलो होतो. नवीन लग्न झाले असल्याने, तिच्यावर माझं खूप प्रेम होतं, तिचा मान राखून मी आपल्या धंद्याला सोडून, एखाद्या नोकरीच्याही शोधात होतो. तीन ते चार महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे, मी आपल्या घराच्या टेरिसवर फिरू लागलो होतो, तेव्हा मला पुढच्या घराच्या खिडकीतून एक जवान मुलगी दिसली. तिने अगदी छोटे छोटे कपडे घातले होते. तिच्या खोलीत लाईट असल्याने, ती मला स्पष्ट दिसत होती, आणि माझ्या घरावर लाईट नसल्याने ती मला बघू शकणार नाही, हे मला चांगलेच ठाऊक होते. ती तिला तासंतास बघत होतो, ती अगदी लाईट बंद करून झोपायला जाईल, तोपर्यंत! मग मला तिला बघण्याची ओढ लागून होती. राखीवर माझे जणू एकतर्फी प्रेमच जुडले होते... मी एवढा तिच्या प्रेमात आंधळा झालो होतो की, मी दुर्बीण घेऊन, तिच्या खोलीत रोज रात्री फक्त तिलाच न्याहाळून बघत होतो. मी तिला रोज रात्री, अधिकाऱ्यांसोबत फोन करण्याच्या बहाण्याने, वर जाऊन तिला बघून जणू नशाच करत होतो. ती नंतर माझी सवयच बनून गेली. मी तिला बघितल्याशिवाय झोप लागत न्हवती, रात्र-रात्र फक्त तिचाच विचार, अश्यातच माझ्या पत्नीवरचे प्रेम कधी कमी झाले, मलाही ठरूक झाले नाही! मी जेव्हा जेव्हा माझ्या पत्नी कडे बघत होतो, तेव्हा तेव्हा फक्त तिच्या रुपात राखीच दिसत होती. मला माझ्या पत्नीचा कंटाळा आला होता. मला आता राखीच हवी होती, कुठल्याही परिस्थितीत!
मी नोकरी शोधायच्या बहाण्याने घराबाहेर पळत होतो, आणि राखी कुठे कुठे जाते, तिचा पाठलाग करत होतो. मी मुद्दाम टोपी लावून तिला कळू न देता, गर्दीच्या ठिकाणी, तिचा मागून हळूच सुगंध घेत होतो. नंतर मला तिच्या मनमोहक सुगंधाची ओढ लागली होती. मी रोज तिचा पाठलाग करत असल्याने, मला तिच्याबद्दल एक गोष्ट ठाऊक झाली, ती म्हणजे तिचे अफेअर एका दुसऱ्याच मुलासोबत चालू होते, त्याचे नाव होते, सचिन! त्या दोघांचे प्रेम म्हणे, खूप वर्षांपासूनचे. हे ऐकल्यानंतर मला खूप राग येऊ लागला होता. असे असताना देखील, मी तिचा पाठलाग सोडला नाही. ती माझ्यासाठी जणू एखादी ड्रगच बनली होती.
हळूहळू मी तिच्या नजरेत पडू लागलो होतो. मी तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात फसविण्याचा प्रयत्न करू लागलो. पण ती मला जास्त भाव देतच न्हवती. मी मग निश्चय केला की, तिला आता कुठल्याही परिस्थितीत प्रपोज करायचा. मला आता तिच्यासोबत लग्न करून, पळून जायचे होते, तिच्यासोबत वेगळा संसार करायचा होता. मी माझ्या खऱ्या पत्नीला माझी पूर्ण संपत्ती देऊन, राखीसोबत लग्न करून खुशाल जीवन जगायचा माझा प्लॅन सुरू होता. पण तिला प्रपोज करताच ती मला म्हणाली की, तिला आधीच एक बॉयफ्रेंड आहे, प्रकाश नावाचा! मी विचारात पडलो, की मला तर सचिन बद्दल कळले होते, तर आता हा प्रकाश कोण आहे? मग मी प्रकाशबद्दल म्हणजे तुझ्याबद्दल विचारपूस करू लागलो. मला समजले की, राखी डबल गेम खेळत होती. ती खरे प्रेम सचिनवर करत होती, आणि प्रकाशची लूटमार करत होती... मग मला समजू लागले की, आपल्याला काही राखी पटणार नाही! मी तिला विसारण्याचा खूप प्रयत्न करू लागलो, मी माझ्या बायकोसोबत फिरायला गेलो, खूप दुरवर जेणेकरून राखीला मी विसरू शकेल. मी माझ्या पत्नीला रिक्वेस्ट केली की, आपण ती जागा सोडून दुसरीकडे राहू, पण तिला तीच जागा खूप आवडली होती. तेथील लोक, तिच्या जवळची बनली होती. ती तिथून कुठेही जाणार नाही, हे फिक्स होते.
मी नकळतपणे, पण मुद्दाम, वर येत होतो, माझा मेंदू वर जायला थांबविता होतं तर माझे मन वर नेट होते. माझ्या मेंदूपुढे माझे मन हरून जात होते, आणि तिला पुन्हा रोज वर जाऊन बघत होतो. मला फक्त एकदातरी तिच्यासोबत रात्र काढायची होती. तिच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या शरीराला रात्रभरात आपलं करायचं होतं. खरंतर मला, तिच्यासोबत एकदा तरी संभोग करायचा होता. मला हे तर ठाऊक होते की, ती पैश्याची खूप लालची आहे, म्हणूनच ती प्रकाशला म्हणजेच तुला प्रेम आहे असे दाखवून, तुझ्याकडून पैसे लुटून घेत होती.
एकदा टेरिसवरून मला ती दिसली नाही. मी तिला बघण्यासाठी तडपून गेलो. ती काही त्या खोलीत दिसतच न्हवती. माझे मन कासावीस होऊ लागले. पण मी मनाला सावरत, खाली आलो. दुसऱ्या दिवशीही ती मला काही दिसली नाही. आता मी वेडा होऊ लागलो. तिसऱ्या दिवशी ती खोलीत होती, पण तिने खिडकी लावून घेतली होती. ती घरी असून सुद्धा मी बघू शकत नाही आहे, ह्यामुळेच माझे मन खूप विचलित होऊ लागले. मला राहावं गेलं नाही. मी रात्री सगळे झोपी गेले असताना, तिच्या घरी शिरण्याचा प्रयत्न केला. तिच्या खिडकीपर्यंत पोहोचलो होतो आणि खिडकी ठोकून तिला आवाज देऊ लागलो. ती खिडकीजवळ आली आणि मला असे बघून ती घाबरू लागली. मी तिला समजावीत होतो की, मी तिच्यावर किती प्रेम करतो ते, पण ती माझे काहीही ऐकायला तैयार न्हवती. मी मग एक डिसीजन घेतला. तिच्यापुढे एक प्रपोजल ठेवले, तिला मी म्हणालो की, तिने मला फक्त एक रात्रभर संभोग करू द्यावे, ह्याच्या बदल्यात, माझी पूर्ण दहा कोटीची संपत्ती तिच्या नावे करून, इथून निघून जाणार, पुन्हा कधीच तिच्या मागे लागळणार नाही, मुळात तिला विसरूनच जाईल. पण तिला माझ्यावर जराही विश्वास होत न्हवता. म्हणून मी घरून माझे सर्व रेडी केलेले डाकूमेंट घेऊन, तिच्या पुढे माझी स्वाक्षरी देऊन, सोबतच माझ्या ब्यांकेत असलेले वीस ते तीस लाख, आणि घरी कॅश ठेवलेले सत्तर लाख, तिच्या हवाले केले. ती एवढी संपत्ती बघून, तिने लागेच मला होकार दिला. तिने त्याच रात्री मला तिच्या मेन दरवाज्यातून घरी, आपल्या खोलीत आणले. त्या रात्री माझी पूर्ण इच्छा पूर्ण झाली. पूर्ण रात्र तिच्यासोबत काढले असल्याने, अगदी पहाटेच सहा वाजता, आम्हा दोघांनाही झोप कशी लागली, हे कळलेच नाही. हीच माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी चूक. माझी बायको माझ्या घरून शोधत आली, आणि राखीच्या घरचे, तिला खाली बोलवू लागले. आम्ही दोघेही गाढ झोपी गेल्याने, आम्हाला काही आवाज आला नाही. राखीच्या आईला काहीतरी गडबड वाटू लागली. तिला काही झाले तर नसावे, ह्या भीतीने, तिच्या वडिलांनी दार ढकलून काढले. ते दारही खूप कमजोर असल्याने लगेचच निघाले. खूप जास्त आवाज झाल्याने आम्ही दोघेही उठलोच होतो. राखीच्या घरी आरडाओरड होत असल्याने, माझी बायकोही राखीच्या आईला विचारपूस करू लागली होती की, काय झाले. राखीच्या आईचे आणि माझ्या बायकोचे चांगलेच पटत होते, म्हणून ती देखील खोलीबाहेर होती. जसा दरवाजा खुलला, आम्ही दोघेही नग्न अवस्थेत आढळलोत. माझी बायको बेशुद्ध झा...
त्यानंतर काय झाले हे मला पुन्हा आठवायचे नाही. पण त्यानंतर माझी बायको माहेरी गेली. राखीच्या आईने माझ्या विरोधात पोलीस केस केली. मी पोलिसांना काहीही सांगितले नाही, पण राखीच्या कानाखाली दोन बसल्यानंतर तिने सर्व पोलिसना सांगून टाकले. तिच्या बँकेत ट्रान्सफर केलेले चाळीस लाख सोडून, आणि काही कॅश सोडून, पूर्ण संपत्ती पोलिसांना सांगितली. एवढ्या संपत्तीबद्दल विचारपूस केल्यानंतर, मला ती कुठून मिळाली, हे खरं सांगावंच लागलं. त्यानंतर माझी पूर्ण संपत्ती जप्त करून टाकली. मला एक महिन्यांचा कारावास भोगावा लागला. ही गोष्ट जास्त लोकांना ठाऊक झाली नाही, त्यामुळे राखी आपल्या घरीच राहत होती. मी पण माझ्या घरी एकटा होतो. मला काही दिवसानंतर समजले की, तिने आपल्याजवळ खूप संपत्ती ठेऊन घेतली, पोलिसांना अर्धीच संपत्ती परत केली. मी राखीला ह्याबाबत विचारणा केली. ती म्हणाली, तिने मला शरीरसुख दिले, ह्याबद्दल तिच्याजवळ काहीतरी असायला हवेच ना? मोबदला म्हणून! पण मी आंधळा होऊन तिला संपत्ती दिल्यामुळे मला माझाच खूप राग येऊ लागला होता. माझ्याकडे आता पैश्याची चणचण भासू लागली. मला नोकरीही नसल्याने, मी माझ्या नशिबाचा खेळ, पुन्हा आजमाऊ इच्छित होतो. मी इकडून-तिकडून कर्ज घेऊन पुन्हा लॉटरी, सट्टेबाजी खेळू लागलो. जेणेकरून काही पैसे कमवू शकेल. पण ह्यावेळी मात्र मी कर्जबाजारी होऊन बसलो. माझे नशीब माझी साथ देऊ इच्छित न्हवते. माझी बायकोही मला सोडून गेली होती. आमचा चांगला संसार पूर्णता उध्वस्त झाला होता. आता मला खऱ्या अर्थाने स्वतःचा आणि त्या राखीचा ही राग येत होता. मला तिला सुद्धा माझ्यासारखेच उध्वस्त होताना बघायचे होते. कारण ती आता झालेली गोष्ट विसरून, त्या माझ्याच पैश्याची मौज करून, तिचे सचिनसोबत प्रेम चालूच होते. पण ह्यावेळी मी काहीही करू शकणार न्हवतो. फक्त कर्जबाजारी होऊन बसलो होतो.
अश्यातच मला एका रात्री, एक आवाज आला, तेही राखीच्या घरामागून. मी लपून बघितले असता, राखी एका कार मध्ये विचित्र अवस्थेत आढळली. मला कळून चुकले की, ती मरण पावली आहे. मला समजलेच नाही की, मी काय करावे. अश्यातच तू मला खाली उतरताना दिसला. मला समजले की, हा तर प्रकाश होय, राखीचा दुसरा बॉयफ्रेंड! मी लगेचच आपला फोन काढला आणि तुझे आणि राखीच्या त्या अवस्थेचे फोटो घेऊ लागलो. मला आता ह्याच फोटोद्वारे तुला ब्लॅकमेल करून, पैसे घ्यायचे होते, तुझ्याकडून! कारण मी कर्जबाजारी होतो, मला पैश्याची गरज होती. मला ठाऊक होते की, तुझ्याकडे खूप पैसे आहेत. मी ते फोटो घेतलो आणि पटकन लपून घरी परतलो.
मला त्या रात्री खूप आनंद होत होता, कारण मला तसेही राखीला बरबाद होताना बघायचे होते, पण ती आता तर मेली आहे, ह्याच विचाराने खूप आनंदी होऊन गेलो. पण मला तुझ्याकडून पैसे काढायची कधीच हिम्मत झाली नाही, कारण जरी मी कर्जबाजावी असलो तरी, मलाही राखीने खुप मोठा दगा दिला होता. पण तू सरळ तिचा खून केलाय म्हणजे तिने तुला किती मोठा दगा दिला असेल? ह्या विचारानेच तुझ्यावर खूप दया येऊ लागली. मी उद्या ब्लॅकमेल करतो, परवा करतो असे म्हणून म्हणून दिवसं जाऊ लागलेत. पण माझी हिम्मत काही होत न्हवती. नंतर मला काही दिवसानंतर कळले की, तू आपल्या जिल्ह्याचा जिल्हाधिकारी झाला आहेस. हे अगदी बॉलिवूड सिनेमासारखे मला वाटत होते. मी मग विचार केला की, आता तुला पैसे मागून काहीही फायदा होणार नाही, म्हणून मी ह्या पूर्ण गोष्टीला विसरून गेलो.
माझ्याजवळील पूर्ण पैसे संपले होते. ज्यांच्याकडून कर्ज घेतले होते, ते सर्व पैश्याची मांग करत होते. अश्यातच मला योगेश नावाचा CBI अधिकारी राखीच्या केस बद्दल शोधाशोध करत आहे असे समजले. आता माझ्याकडे हाच एक उपाय होता, ज्याद्वारे मी पैसे कमावून, मी कर्जमुक्त होऊ शकेल. मी निश्चय केला की, तुझ्या त्या फोटोला पोलिसांना देऊन, पण फोटोंच्या आधारेच, पैसे मिळवून कर्जमुक्त होऊन, हे शहर सोडून, जमलं तर माझ्या बायकोची पाय पकडून माफी मागून, एखाद्या दुसऱ्या शहरात जाऊन, नव्याने आयुष्य सुरू करण्याचा विचार होता. आणि मी तसेच केले सुद्धा! कालपासून योगेशकडे पैश्याची मागणी करून, त्यांना एक-एक पुरावे देत गेलो. त्यासाठी मी एवढा मार सुद्धा झेललो. पण पैसे मिळाल्यानंतर मला कळून चुकले की, एवढ्याश्या पैश्याने माझे कर्ज तर संपणार नाही आणि ह्यापुढे योगेश मला काही पैसे देणार नाही, हवं तर जेलात नक्कीच टाकेल. मी त्यांना तुझे फोटो अजून दिले नाहीत, मी अंधाराचा फायदा उचलून, दवाखान्यातून पोलिसांच्या नजरेतून वाचून, इथे आलो आहे.
माझे आयुष्य आता काही सुधारणार नाहीच! म्हणून मी विचार केला की, तुझेही आयुष्य मी का नष्ट करावे? म्हणून मी तुझ्या घरी पळून आलो आहे. मला योगेश आणि त्यांची टीम नक्कीच शोधत असेल. तू मला तुझा मोबाईल दाखव. (प्रकाशने आपला मोबाईल त्याला दिला, जीग्नेशने मोबाईलवर एक इमेल आयडी लॉग इन केली, नंतर गुगल ड्राइव्ह डाउनलोड केले, तिथे सेव्ह केलेले फोटो प्रकाशला दाखविले) हे घे ते फोटो, आता तुला जे काही करायचे आहे ते कर, हवं तर डिलीट करून टाक!
मला चांगलेच समजले आहे की, माझे ह्यापुढे जेलात जाणे अटळ आहे. म्हणून मी एक निर्णय घेतला आहे, मला एक कागद आणि पेन मिळेल काय? (खान असिस्ट कागद आणि पेन देऊन) मी ह्या कागदावर आत्महत्या करायचे लिहीत आहे...(प्रकाशला बोलतानाच थांबवून) नाही प्रकाश, मला ठाऊक आहे, तू माझी मदत नक्कीच करू इच्छित आहे, पण आता माझे आयुष्य पूर्णता नष्ट झाले आहे, माझ्याकडे आता दुसरा पर्याय नाहीच... आणि जरी मी तुझ्याकडून पैसे घेऊन कर्जमुक्त झालो तरी माझी बायको मला कधीच नवरा म्हणून म्हणणार नाही, कारण मी तिला काही वेळेपूर्वीच PCO ने फोन केला होता, तिला माझ्यासोबतच मुळीच बोलायचे नाही, तिने माझ्यासोबतचे पूर्ण नाते तोडून टाकले आहे, आता माझा जगण्याचा काय उपयोग? जर तुला माझी मदत करायचीच असेल तर मला जे पैसे पाठविणार होतास, ते आणि माझ्या बँक अकाऊंट मध्ये असलेले योगेशचे पूर्ण पैसे, एका बँक अकाउंट वर ट्रान्सफर कर... हा घे तो बँक नंबर! हा माझ्या बायकोचा बँक अकाउंट नंबर आहे... माझ्यामुळे तिचे आयुष्य, फुकट बरबाद झाले, कदाचित तिचे आयुष्यच नष्ट झाले असेल. तिला मी एकही सुख बरोबर देऊ शकलो नाही. तू प्लिज माझ्या नावाने तिला पैसे पाठवून दे! तिला एक आधार म्हणून!! (लिहिलेली आत्महत्या करत असणाऱ्या चिट्टीवर आपली साइन करून, बोटाचा ठसा उमटवून प्रकाशकडे दिले.) हे घे प्रकाश, ह्यामुळे तुला कुठलाही त्रास होणार नाही, मला माझ्या कर्माची शिक्षा हवीय, मी ती शिक्षा घेण्यासाठी उत्सुक आहे..."

जीग्नेशने आपल्या पोटात लपविलेला कटर काढून लगेचच आपला स्वतःचा गळा चिरला. प्रकाशला जराही वेळ मिळाला नाही, त्याला थांबवायचा! योगेश आणि त्याची टीम तेवढ्यातच प्रकाशच्या घरी आली.
जीग्नेशच्या मानेतून भडाभडा रक्त बाहेर पडू लागले होते. तो खाली कोसळला. प्रकाश त्याला सावरूच लागला होता, खान असिस्टने सल्ला दिला की, जर लवकरात लवकर ह्याला जवळच असलेल्या दवाखान्यात नेले तर, तो कदाचित वाचू शकतो. तो जवळचा दवाखाना, प्रकाशच्या घरापासून अगदी दोनशे मीटर दूर होते. खान असिस्टने जीग्नेशला उचलले आणि तिकडे प्रकाशने जसे आपल्या घराचे दार खोलले, बाहेर योगेश आणि त्याची टीम त्याच्या दाराबाहेर होती. योगेशने घरात डोकावून बघितले असता, त्याला खान असिस्टने रक्तबंबाळ झालेल्या जीग्नेशला पकडलेले आढळले. योगेश आणि त्याची टीम पटकन घरात शिरली.
"जीग्नेशला तुम्ही कुठे घेऊन जाणार होते? ह्याचा खून तुम्हीच केलाय ना? तुम्ही ज्याप्रमाणे राखी आणि मोनाला कुठेतरी लपविणे, तसेच ह्याच्यासोबतही करणार होता ना? (योगेशने आपला फोन काढून, पटपट फोटो घेऊ लागला.) आता हे पुरावे, तुम्ही दोघांना कारागृहात टाकायला पुरेसे राहील. तुझा खेळ संपलाय प्रकाश!" योगेश म्हणाला.

"आपण ह्याबद्दल नंतर बोलूया काय? आता खूप जास्त महत्वाचे म्हणजे, जीग्नेशचे प्राण वाचविणे होय! त्याने आत्ताच आमच्यापुढे स्वतःच्या गळ्याला कटरने चिरले. त्याचे रक्त खूप वाहत आहे... दवाखाना अगदी दोनशे मीटरवर आहे, कदाचित ह्याचे प्राण आपण वाचवू शकतो. नंतर तुला जे तपासणी करायची आहे, ते तू करू शकतोस! पण आता ह्याचे प्राण वाचविणे खूप गरजेचे आहे, असे मला वाटते!!" प्रकाश घाईघाईने म्हणाला.
योगेशने आपल्यासोबत असलेल्या पोलिसांना, जीग्नेशला दवाखान्यात नेण्यास सांगितले. पोलीस जीग्नेशला घेऊन गेलेत, पण योगेश अजून प्रकाशच्या घरी होता. योगेशने सर्वात आधी CCTV कॅमेराच्या रेकॉर्डिंगची मागणी केली. पण प्रकाशने, सांगितले की, त्याचे सर्व कॅमेरे काढून टाकले आहेत. ह्याचे कारण प्रकाशने नवीन चांगल्या कंपनीचे कॅमेरे लावणार आहे, असे दिले. ज्या कटरने जीग्नेशने आपला गळा चिरला, त्या कटरची तपासणी करायला सांगितले योगेशने. त्याला संशय होता की, जरूर प्रकाशनेच जीग्नेशचा गळा चिरला असावा, तो स्वतःला वाचविण्यासाठी खोटं बोलत असावा. एवढयातच हॉस्पिटल मधून बातमी आली की, जीग्नेशला वाचविण्यास अपयश आले आहे. योगेशने, आत्महत्या करताना जवळ असलेल्या प्रकाश आणि खान असिस्टला विचारपूस करण्यासाठी कस्टडीत बोलाविले. प्रकाशने जीग्नेशने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली चिट्टी योगेशला दिली. योगेशने आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केल्याच्या संशयावरून, प्रकाश आणि खान असिस्टची चौकशी करणार होते.
प्रकाशला विचारण्यात आले की, जीग्नेश आत्महत्या करण्यपूर्वी त्यांच्यात काय घडले होते? ह्यावर प्रकाशने सांगितले की, "जीग्नेश घरी आला आणि माझी क्षमा मागू लागला. त्याच्याजवळ कुठलेही फोटो न्हवतेच, ज्याद्वारे तो मला फसवू शकणार असता. तो फक्त पैश्यांसाठी असे करत होता, हे सांगितले. सोबतच तो सट्टेबाज असल्याने, तो कर्जबाजारी झाला होता, त्यासाठीच, असे नाटक केले की, त्याच्याजवळ माझ्याविरोधातले फोटो आहेत. सोबतच त्याने तुझ्याकडून पैसे घेऊन पळून जाण्याचा बेतात होता, पण त्याला समजले की, तो आता पळून जाऊ शकणार नाही." असे प्रकाशने योगेशला सांगितले.
त्यानंतर खान असिस्टने सांगितले की, प्रकाश आणि जीग्नेश एकमेकांना आधीपासून ओळखत होते, पण जीग्नेश ह्याच ओळखीचा फायदा उचलून प्रकाशला फसवून, आणि योगेशकडून पैसे लुटून पळून जाणार होता. पण अश्यातच त्याला प्रकाशची मैत्री आठविली, त्याला पाश्चाताप होऊ लागला होता की, तो प्रकाशसारख्या साध्या सरळ माणसाला फसवून पाप करत आहे, असे समजल्यावर त्याने प्रकाशची माफी मागून आत्महत्या केली. (मुळात प्रकाश आणि खान असिस्ट दोघेही खोटं बोलत होते)
प्रकाशने त्यावर सांगितले की, "त्याला एवढा पश्चाताप झाला होता की, त्याने तुझ्याकडून लुटलेले पैसे मला दिले, हे घे तुझे पैसे, तुझ्या बँकेत ट्रान्सफर करू काय? UPI आयडी सांग मला!"
योगेशला विश्वासच बसत न्हवता की, जीग्नेशने खरंच असे केले असावे म्हणून! त्याने जीग्नेशने लिहिलेली चिट्ठी वाचली असता, त्याला प्रकाश खरं बोलत आहे, असे समजू लागले होते. योगेशने आपले पैसे परत मिळविले. सोबतच प्रकाश आणि खान असिस्टला सोडून देण्यात आले.
प्रकाश घरी आल्याबरोबर सर्वात आधी, जीग्नेशने दिलेल्या त्याच्या बायकोच्या बँक अकाउंट नंबरवरून, UPI आयडीने जीग्नेशच्या नावावरून, एक कोटी रुपये पाठविले. सोबतच जीग्नेशने लिहिलेल्या त्या आत्महत्या केलेल्या चिट्ठीचा फोटोही तिला पाठविला. सोबतच तिला हेही सांगितले की, ह्याबद्दल तिने कुणालाही सांगू नये. जीग्नेशच्या बायकोच्या अकाउंटवर एक कोटी जाताच, प्रकाशने, गुगल ड्राइव्ह ओपन करून जीग्नेशने लॉग इन केलेल्या इमेलवर जाऊन, त्याचे पूर्ण फोटो डिलीट केले. म्हणजे आता जीग्नेशने काढलेल्या 'त्या' फोटोअभावी योगेशला काहीही सापडणार नाही. प्रकाशने, डिलीट झालेले फोटो, गुगल ड्राइव्हच्या trash मध्ये जमा झालेलेही फोटो डिलीट केले आणि तसेच त्या अकाउंटला लॉग आउट करून टाकले. प्रकाश आता भयमुक्त झाला.
योगेशला जराही पटले नाही की, जीग्नेश आपल्यासोबत असा गेम खेळू शकतो म्हणून. कारण त्याच्या मनात खूप दुःख आहे हे त्याच्या डोळ्यांतून समजत होते. आणि खरंच त्याला फक्त पैश्यांचीच गरज असती, तर तो एवढा मार खाल्या नंतर पटकन पूर्ण खरं काय हे सांगून टाकले असते, त्याऐवजी तो प्रकाशच्या घरी जाऊन स्वतःचा जीव दिला नसता. आणि त्याला आता आपल्याकडून पैसेही मिळाले होते, त्याच्या जागी दुसरा असता तर, तो हॉस्पिटल मधून पळून जाऊन प्रकाशच्या घरी चुकूनही न जाता, दूर दुसरीकडे गेला असता, असे विभिन्न संशय योगेशला येऊ लागले होते. आपली कुठेतरी चूक होत आहे, असे त्याला वाटू लागले होते. त्याने जीग्नेशच्या आत्तापर्यंतच्या रेकॉर्डची माहिती गोळा करायला आपल्या अधिकाऱ्यांना सांगितले. त्याला समजले की, तो कर्जबाजारी झाला होता, त्याचे कर्जबाजारी होण्याचे महत्वाचे कारण म्हणजे राखी होय, हे समजले होते. तो राखीपायी एका महिन्यासाठी जेलातही गेला होता हेही माहीत झाले. पण मुळात जीग्नेश प्रकाशच्या घरी गेलाच का? हे त्याला समजत न्हवते. पण त्याला संशय येऊ लागला होता की, जीग्नेशने नक्कीच प्रकाशसोबत कुठलीतरी डील केली असावी, ती फोटो लपविण्याची अथवा डिलीट करण्याची. आता योगेशला फक्त त्या डीलला जाणून घ्यायचे होते. पण त्या आधी योगेश हा विचार करू लागला की, जीग्नेशने ते फोटो कुठे लपवले असावेत? योगेशला हे तर ठाऊक होते की, जीग्नेशचे ते फोटो त्याच्या मोबाईल मध्येच असावे! कारण जीग्नेश आपल्याजवळ मोबाईल असा जपून ठेवताना दिसत होता की, जणू त्याच्याच मोबाईलमध्ये ते फोटो असावे. पण पूर्ण मोबाईल चेक केले असता, त्या मोबाईलमध्ये एकही फोटो दिसले न्हवते.
योगेश विचारात पडला की, फोटो नक्कीच मोबाईल मध्ये असावे पण कुठे? त्याने मोबाईलला पुन्हा चेक केले की, तिथे कुठले गुप्त स्पेस किंवा गॅलरी वॊल्ट तर नाही. पण शोधाशोध करूनही त्याला काही सापडले नाही. अश्यातच त्याला गुगल ड्राइव्हबद्दल आठविले. ज्यात ऑनलाइन फोटो सेव्ह करून ठेवता येतात. पण त्याच्या मोबाईलमध्ये गुगल ड्राइव्ह डाउनलोड होऊन न्हवते, पण योगेशने मुद्दाम ते डाउनलोड केले, आणि डाउनलोड होताच, जीग्नेशची इमेल आयडी वरून त्याचे गुगल ड्राइव्ह ओपन झाले. पण गुगल ड्राइव्ह ओपन होऊनही त्याच्या हातात काहीही सापडले नाही, कारण ते गुगल ड्राइव्ह खाली होते. योगेशच्या आशा मावळू लागल्या.
पण गुगल ड्राइव्हला ओपन केल्यानंतर तिथे लास्ट मॉडीफीकेशन काही वेळापूर्वीचे आढळले. पण जीग्नेश तर मरण पावला आहे, मग ह्याचे अकाउंट कुणी ओपन केले. योगेशच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, त्याने गुगल ड्राइव्ह मधला ट्राश फोल्डर चेक करावा, कारण तिथे डिलीट झालेले फोटो जमा होतात. योगेशने ते चेक केले असता, त्याला एक फोटो सापडला.
प्रकाशने ट्राश मधले फोटो घाईगडबडीत डिलीट केले होते, अश्यातच एक फोटो राहून गेला होता. योगेशने तो फोटो पटकन आपल्या मोबाईलमध्ये सेंड केले. तो फोटो प्रकाशचा होता, प्रकाशने नुकतेच मास्क काढले आहे, तो एका भिंतीवरून उतरला आहे, कारण त्याचा एक हात पाईप वर दिसत आहे, त्याची कार दिसत आहे, सोबतच त्याच्या कार मध्ये एका मुलीचा हात दिसत आहे. योगेशला ठाऊक होते की, तो हात नक्कीच राखीचा असावा. त्या फोटोला जास्त प्रकाश वर फोकस केले असल्याने, त्याची कार पूर्ण दिसत नाही आहे, म्हणून कार मधील राखीही पूर्ण दिसत नाही आहे. पण एवढे पुरावेही खूप आहे, प्रकाशची पुढील इन्वेस्टीगेशन करायला. मोना योगेशला नेहमीच म्हणत होती की, प्रकाशवर कधीच विश्वास ठेवू नको, आज त्याला समजले की, ती अशी का म्हणत होती.
योगेशच्या टीमने जीग्नेशच्या बायकोला कस्टडीत बोलाविले. कारण योगेशला जीग्नेशबद्दल जवळपास पूर्णच ठाऊक झाले होते, जसे की तो राखीच्या प्रेमात कसा पडला, त्याने तिला एका दिवसासाठी मिळविण्यासाठी काय काय केले, कसा तो कर्जबाजारी झाला, आणि त्याची बायको त्याला सोडून का गेली, हे सर्वच! त्याची बायको कस्टडीत येताच, तिने योगेशला सांगून टाकले की, तिला कुणीतरी एक कोटी रुपये, जीग्नेशच्या नावाने पाठविले आहे, सोबतच जीग्नेशने लिहिलेली चिट्ठीचे फोटोही पाठविले आहे, ह्याबाबत कुणालाही न सांगण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. योगेशने त्या अन्नोन नंबर वरून पत्ता लावला की, तिला एक कोटी कुणी पाठविले. त्याला समजले की, प्रकाशच त्या चिट्टीचे फोटो काढले असेल आणि तिला पाठविले असेल, आता त्याला हळूहळू समजू लागले की, प्रकाश आणि जीग्नेशमध्ये कोणती डील झाली आहे. एवढे पुरावे पुरेसे होते, प्रकाशची कसून चौकशी करण्यासाठी.
योगेश आणि त्याची टीम प्रकाशच्या घरी जाणारच होती, प्रकाशला पकडायला, पण एवढयातच योगेशला त्याच्या एका अधिकाऱ्याचा फोन आला की, राखीचा खरा गुन्हेगार सापडला आहे म्हणून...
त्यांच्या मते राखीचा खरा गुन्हेगार सचिन आहे, राखीचा पहिला आणि खरा बॉयफ्रेंड.
योगेश अत्यानंदीत झाला होता. त्याच्याकडे असे पुरावे होते की, तो प्रकाशला नक्कीच संकटात टाकू शकत होता. पण त्याच्या ह्या आनंदाला एक नजर लागली. तो जसा आपले पूर्ण पुरावे घेऊन, सर्व अधिकाऱ्यांपुढे सादर करायला जाणार होता, आणि पुढे प्रकाशची चौकशी आणखीनच वाढविणार होता, तो ऑफिसमध्ये जायला निघाला, तेवढ्यातच त्याला एक फोन कॉल आला, त्याच्या एका सिनिअर ऑफिसरचा. त्यांनी योगेशला सांगितले की, राखीला ठार करणारा दुसरा तिसरा कुणीच नाही, तर तिचा पहिला बॉयफ्रेंड सचिन होय!
योगेशला जणू धक्काच बसला. त्याने प्रकाशबद्दल एवढे पुरावे जमा केले, पण आता त्याचा खरंच कुठलाही फायदा होणार नाही काय? असेच त्याला वाटू लागले. कुठल्या पुराव्यांच्या आधारावर, ते अधिकारी सचिनला गेन्हेगार ठरवीत आहेत, हेच बघायला योगेश ऑफिसमध्ये पोहोचला. कस्टडीत सचिनला ठेवले होते. एक अधिकारी, त्याची विचारपूस करत होता. योगेशने लगेच माहिती काढली की, त्यांच्या हातात, कुठले पुरावे लागले आहे? योगेशला समजले की, ज्या दिवशी राखीचा खून झाला होता, त्या रात्रीची CCTV रेकॉर्डिंग बघितली असता, तो कॅमेरा तिचा खून होण्याच्या खूप आधी, म्हणजेच साडे नऊच्या दरम्यान बंद पडला होता. तो बंद कसा पडला, हे जाणून घेण्यासाठी, इन्वेस्टीगेशन सुरू होती. त्यासाठी, त्याच CCTV कॅमेरामध्ये तो बंद होण्याआधीचे रेकॉर्डिंग बघितले असता, त्या कॅमेऱ्याच्या डाव्या बाजूला, एक माणूस, कॅमेरावर गुलेरने निशाणा लावताना दिसत होता. त्या माणसाने, खूप वेळेस त्या कॅमेरावर गुलेरने दगड मारलेत, पण त्याचा निशाणा काही लागत न्हवता. खूप वेळ प्रयत्न करूनसुद्धा निशाणा लागत नसल्याने, रागात, तो माणूस जरा पुढे आला, आणि चांगला निशाणा लावला. तो निशाणा थेट त्या कॅमेरावर लागला आणि त्याचे वरील ग्लास फुटून, आतील लेन्स फुटले, तसाच कॅमेरा बंद पडला. त्या माणसाला झूम केल्यानंतर, त्याची दाढी, त्याचे रूप, त्याचे शरीर अगदी सचिनसोबत म्याच करत होते. सचिन दूरवर असल्याचे तो कॅमेरात बरोबर दिसत न्हवता, पण झूम केल्यानंतर त्याची छबी दिसत होती. सचिनला वाटले की, तो दूर राहून, आणि अंधारात तो कॅमेराच्या नजरेत पडणार नाही, पण अधिकाऱ्यांच्या सतर्कतेने, हालचाल करण्याऱ्या वस्तूवर झूम केले असता, त्यांना एक माणूस दिसला होता. तो माणूस अगदी सचिन प्रमाणेच होता. म्हणून ह्या आधारावर त्याला कस्टडीत बोलाविले. त्याची अजूनही चौकशी सुरू आहे. असे योगेशच्या कानावर पडले.
योगेशला समजत न्हवते की, त्याने आता काय करावे? कारण जर सचिनच राखीचा खरा गुन्हेगार ठरला तर, प्रकाश पूर्णतः दोषमुक्त होईल. सचिनची चौकशी जवळपास झालीच होती. त्याने सांगून टाकले की, तोच त्या रात्री, राखीच्या घरात शिरून तिचा खून केलाय म्हणून. त्याने एवढे कबूल केलेच होते म्हणून, आणि खूप जास्त रात्र झाली असल्याने, पुढील चौकशी दुसऱ्या दिवशी करणार होते. तसेही आता सचिनला त्या रात्री कस्टडीतच राहावे लागणार होते. सचिनने सांगूनच टाकले आहे की, त्याने खून केलाय म्हणून...
CBI ऑफिस मधील सर्व अधिकारी आपापल्या घरी जायला निघाले होते. रात्रीचे आठ वाजायला येत होते. फक्त काहीच लोक शिल्लक होते, जे रात्रीची ड्युटी करत होते. योगेशही थांबला होता. योगेश विचारात बुळला होता. जर सचिनने पूर्णत: सिद्ध केले की, तो स्वतःच गुन्हेगार आहे आणि त्याने ह्याबद्दलचे काही पुरावे सादर केले तर, सचिनला शिक्षा तर होणार, पण प्रकाश निर्दोष ठरणार! हेच योगेशला नको होते. प्रकाश निर्दोष ठरला तर, तो बाकीच्या दोनही केसमध्ये जवळजवळ निर्दोषच ठरवून जाईल; कारण योगेशकडे प्रकाश विरोधातील पुरावे, फक्त राखीच्या केस संबंधितचे होते, ह्यावरूनच प्रकाशची कसून चौकशी करणार होता, पण जर राखीच्या केसमध्येच तो निर्दोष ठरला तर, पुढील प्रवास योगेशसाठी खूप कठीण होऊन जाईल, ह्या विचारानेच तो कासावीस होऊ लागला.
ऑफिस मध्ये सर्व आपापल्या कामात व्यस्थ असताना, हळूच तो सचिनला ठेवलेल्या कस्टडीत गेला. त्याने आधीच बघून घेतले की त्याला कुणी बघत तर नाही आहे म्हणून! तो सचिन पुढे आला, त्याला म्हणाला, "का तू खोटं बोलत आहेस की, तूच राखीचा खून केलाय म्हणून? तुला असे बोलायला प्रकाशने पैसे दिलेत की काय? सांग मला खरं काय ते, कारण माझ्याकडे प्रकाश विरोधातील ठोस पुरावे आहेतच, त्यात स्पष्टपणे समजत आहे की, प्रकाशनेच राखीचा खून केलाय म्हणून! तू त्याच्या पापाची शिक्षा का भोगायला निघाला आहेस? त्याचा बचाव का करत आहेस?"

"काय? कोण प्रकाश? मी कोणत्याही प्रकाशला ओळखत नाही! त्याचा माझ्यासोबत कुठलाही संबंध येत नाही." सचिन दुःखी आवाजात पण रागात म्हणाला.

" अरे तोच प्रकाश, ज्याच्यावर राखी प्रेम करत होती, म्हणजे प्रेम करायचे सोंग करत होती, त्याला ती लुटत होती, शेवटी प्रकाशला राखीबद्दल ठाऊक झाले आणि त्यानेच तिला ठार केले! तोच तो प्रकाश!!" योगेश सचिनच्या नजरेला आपली नजर भिडवून बोलत होता.

" असो! मला ह्याची परवा नाही!! मी आता आपला गुन्हा जास्त काळ लपवून ठेऊ शकत नाही, मला खूप वेदना होते आहे, मी कित्येक दिवसांपासून बरोबर झोप घेतली नाहीये, फक्त ह्या गुन्हामुळे! शेवटी पोलिसांना ठाऊकच झाले की, तो गुन्हा मीच घडवून आणला म्हणून; केलेला गुन्हा किती काळ लपून राहू शकत होता? शेवटी आलाच लोकांपुढे!" सचिन हळू आवाजात म्हणाला.

" अरे ज्या गुन्ह्याची गोष्ट तू करत आहेस, तो गुन्हा तू घडविलाच नाही आहे! राखीला प्रकाशनेच मारले!! " योगेश रागात म्हणाला.

" हे कसे शक्य आहे? मी स्वतः तिचा गळा दाबून ठार केले आहे? मग दुसरा तिसरा कुणी येऊन, मेलेल्या माणसाला कसे मारू शकतो?" सचिन आश्चर्याने योगेशला विचारले.

" एक मिनिट, मला पूर्ण खरं काय ते, म्हणजे त्या रात्री नेमके काय घडले, पूर्ण सांग, म्हणजे माझे कॅफ्युजन दूर होईल!" योगेश असे बोलून सचिनचे म्हणणे कान देऊन ऐकण्यास सज्ज झाला. हळूच योगेशने आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग सुरू केली.


" त्या रात्रीची गोष्ट करण्याआधी मी माझी पूर्ण प्रेमकथा तुम्हाला सांगू इच्छितो, तेव्हाच तुम्हाला समजेल की, मी जे काही केलं, ते अगदी बरोबर केलं की नाही ते!
राखी, माझे पाहिले आणि शेवटचे प्रेम! तिला मी लहानपणापासून बघत आलो आहे. पण सातव्या वर्गात असताना, मला प्रेम काय असतं ते कळू लागलं होतं. आमचं रोज बोलणं, एकत्र राहणं होतंच, कारण दोघेही घराजवळचे आणि एकच शाळेतले. आठवीत जाईपर्यंत ती माझी क्रश बनली होती. खरंतर माझं एकतारी प्रेम होतंच, पण ती माझ्यापासून दुरावी नये म्हणून, तिला मी कधीच सांगितले नाही की, मी तिच्यावर प्रेम करतो ते. पण दहावीमध्ये असतानाच तिला प्रपोज करायला गेलो असता, त्याआधी तिनेच मला प्रपोज केले आणि चालू झाली आमची लव्ह स्टोरी. तिच्याव्यतिरिक्त माझं जणू कुणीच न्हवतं. आम्ही अकरावी बारावीपासून असे वागू लागलो की जणू दोघेही नवरा बायकोच! पण ही गोष्ट कदाचित आमच्या घरच्या मंडळीतील कुणालाही ठाऊक झाली नाही. आमच्यात बारावीत असतानाच शारीरिक संबंध घडले, त्यातच ती गर्भवती राहिली. विचार केला की, तिला आता आपली बायकोच बनवून, नवीन आयुष्याची सुरुवात करावी, पण तिला हे मुळीच मंजूर न्हवते. तिला शिक्षणही घ्यायचे होते आणि खूप पैसे मिळवून मौजही करायची होती. एकांतरीत तिच्या मते तिने अजून जराही जीवनाचा रस उपभोगले नाही आहे, तिला पुन्हा काही वर्षे जीवन जगायचे होते, नंतर जेव्हा लग्नाची वय येईल, तेव्हा ती लग्न करणार, अशी तिने इच्छा दर्शविली. मला तिच्या ह्या इच्छेपुढे काहीही करता आले नाही. तिने आपले बाळ पाळून टाकले, अबोर्शन करून. पण तरीही आमचं प्रेम सुरूच होतं एकमेकांवर!
दिवस सरत गेलेत, तश्या तिच्या इच्छाही बदलत गेल्यात. मध्येच तिला पैसे कामविण्याची ओढ लागली होती. तिला अमीर बनायचे होते. पण तिला ठाऊक न्हवते की, अमीर बनायचे कसे? तिने खूप आटापिटा केली, स्वतःला श्रीमंत बनविण्याची, पण तिचे एकोनेक प्रयोग असफल ठरत गेले. त्यानंतर तिने बँकेत काम करणे सुरू केले. सोबतच फर्जी चिट फंडही सुरू केले. एवढ्यातच तिचे मन भरले नाही, तिने प्रकाश नावाच्या एका श्रीमंत मुलाला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात फसविलेच होते, पैश्यापायी. त्याला ती वेळोवेळी लुटतच होती, पण त्यानंतर असे वाटू लागले की, राखी आपल्यापासून दुरावली जात आहे. मला असे वाटू लागले की, राखी फक्त पैश्यांच्याच मागे लागलेली आहे, तिला जर खूप पैसेवाला मुलगा लग्नासाठी मिळाला तर, ती नक्कीच त्याच्यासोबत लग्न करून टाकेल. मी तिच्यासोबत ह्याबाबत बोलून घेतले की, तिच्या मनात सध्या चाललंय तरी काय? ती मात्र मला कोणतेही उत्तर देण्यास तैयार न्हवती. फक्त एवढी आश्वती दिली की, ती लग्न मात्र माझ्यासोबतच करेल. मलाही तिच्या बोलण्यावर विश्वास बसू लागला. पण त्यानंतर आमची भेट होत होती, तेव्हा वेगवेगळ्या दिवशी तिचा वेगवेगळा स्वभाव असायचा. कधी माझ्यासोबत खूप प्रेमाने वागायची, बोलायची; तर कधी खूप रागात राहायची त्यावेळी मला हात देखील लावू द्यायची नाही. पण त्याच्या दुसऱ्याच दिवशी माझ्याकडून शारीरिक सुखाची मांग करायची. कधी, पहिल्यांदा भेटले असलेल्या मुलगा व मुलगी प्रमाणे वाटायचे तर कधी नवरा बायको असल्यागत वाटायचे. मला हे खूप विचित्र वाटू लागलं होतं. तिला कुठलातरी मानसिक आजार किंवा मानसिक त्रास आहे की काय? असेच वाटू लागले होते. अशायतच तिचे प्रकाशसोबतची जवळीकता वाढत चालली होती. मला हे आवडलं नाही. मी तिला स्पष्ट सांगितले की, जर प्रकाशसोबत ह्यापुढे दिसली तर, त्या प्रकाशला तुझ्याबद्दल सर्व सांगून टाकेल. त्यावर ती म्हणाली की, तिचे प्रकाशसोबत कुठलेही संबंध नाही आहे, प्रकाशने तिला हात देखील लावला नाही असे तिचे म्हणणे होते. राखी प्रकाश सोबत प्रेमाचे संबंध ठेऊन आहे, कारण तिला प्रकाश कडून पैसे काढायचे आहे. तिच्या ह्या बयानानंतर मी तिला काहीही म्हटलो नाही.
पण काही दिवसांतच तिला खूप पैसे मिळाले होते. ती खूप मौज करू लागली होती. तिचे वागणेही बदलले होते, तिचा रुबाब पूर्णता बदलला होता. मी तिला विचारणा केली की, तिच्याकडे एवढे पैसे आलेच कुठून? तर तिने ह्या प्रश्नाचे उत्तर देण्यास टाळाटाळ करत होती. मला वाटलं कदाचित प्रकाशकडून लुटले असावे, पण मी स्वतः चौकशी केली असता, मला समजले की, तिने एका जीग्नेश नावाच्या जुगरकडून पैसे लुटले आहे, तेही एका रात्रीसाठी आपले शरीर त्याच्या हवाले करून! मला आता खरा राग चढू लागला होता. मला पुन्हा माहिती मिळाली होती की, राखीने ह्याधी मयांक नावाच्या एका बीजनेसमॅनच्या मुलालाही एका रात्रीसाठी स्वतःला गहाण ठेऊन, त्याच्याकडून सुद्धा खूप पैसे मिळविले. मला आता तिचा राग येऊ लागला होता. मी तिला ह्याबाबत विचारणा केली, पण ह्यावर ती म्हणाली की, फक्त एका रात्रीसाठी आपले शरीर कुणाला मौज करायला दिला, आणि त्याबदल्यात भरमसाठ पैसे मिळत असले तर काय हरकत आहे? जवान आणि सुंदर असल्याचा हाच तर एकमेव फायदा. सोबतच मलाही शरीरसुख वेळोवेळी देताच आहे, तेही फुकटात आणि पुढे जाऊन लग्न करण्याचे आश्वासनही दिले आहे, मग काय बिघडत आहे? असे तिचे म्हणणे होते. मला त्याच दिवशी तिला समजावून सांगायचे होते की, ती जे करत आहे ते चुकीचे आहे. पण तिला अजून कुणाकडून तरी पैसे मिळवायला जायचे होते, म्हणून ती घाईघाईत निघून गेली.
त्यानंतर मी तिला फोन करून सांगितले की, आपले लग्न पुढे जाऊन काही होणार नाही. मला अशी बायको नकोच होती. मी तिच्यासोबत लग्न करण्यासाठी झटपट करत आहे आणि ती असले धंदे करून पैसे कमवत आहे. माझा तिच्यावरचा विश्वास पूर्णपणे तुटला होता. पण तिला समजावून सांगत असताना सुद्धा तिला पश्चात्ताप तर सोडाच, जणू तिला गर्व होत होता, ती करत असलेल्या कामाचा. तिने मला स्पष्टपणे सांगितले की, तिलाही माझ्यासोबत लग्न करायचे नाही आहे, पण तिने मला एवढ्या वेळेस शारीरिक सुख अनुभवू दिले, ह्याबद्दल ती माझ्याकडून पाच लाखांची मागणी करू लागली. जर पाच लाख दिले नाही तर, ती माझी खोटी तक्रार पोलीसात करेल.
पाणी डोक्यावरून गेलं होतं. जर तिला पश्चाताप झाला असता, तर एवढे झाल्यानंतर सुद्धा मी तिच्यासोबत लग्न करायला तैयार होतो. पण ती उलट मला मोबदला मागत आहे, प्रेमाचा! मी तिच्यावर अतोनात प्रेम केले, तिच्यासाठी मी घरच्यासोबत वाद घातला, मी तिच्यासाठी पूर्ण जग सोडायला तैयार झालो, पण ती उलट मला लुटायला निघाली होती. मी तैयार होतो तिचे पाच लाख द्यायला, पण मला माझ्यासारख्याच कित्येक लोकांची चिंता होऊ लागली होती की, ती अश्या किती लोकांना फसवणार आहे? मला हे थांबवावे लागणार होते. पुढचा श्रीमंत तिच्या जाळ्यात फसण्याआधीच!
मी अगदी दुसऱ्याच रात्री तिच्या घरी गेलो. तिच्या घरापुढे कॅमेरा लावून आहे, हे मला ठाऊक होते, मी गुलेरने त्या कॅमेराला फोडले. त्यानंतर तिचे दार ठोठावला. तिने दार खोलले आणि मी आत गेलो. तिला म्हणालो की तिच्यासोबत काही बोलायचे आहे. तिला तिच्या खोलीत घेऊन गेलो. तिला पुन्हा एकदा समजावून सांगायचा प्रयत्न केला, पण तिला माझं काहीही एक ऐकायचं न्हवतं. ती मला वारंवार पाच लाखांची मांग करत होती. मला आला राग! मी रागाने लालबुंद झालेलो होतो, प्रेमाची किंमत पाच लाख? मी तिचा गळा दाबला, तोपर्यंत दाबून ठेवला, जोपर्यंत तिचे प्राण गेले नाही. तिचे प्राण जाताच, तिला बेडवर डोळे बंद केलेल्या अवस्थेत तसेच ठेवले. आणि तिथून बाहेर पळालो. तिच्या घरचे दार उखळ लावून, मागच्या मार्गाने घरी परतलो.
ती तर मेली, पण मी घरीच वेड्याप्रमाणे वागू लागलो होतो. मी माझे पूर्ण जीवन तिलाच समर्पित केल्यामूळे, तीच माझ्यासाठी पूर्ण जग होती. तिचा खून केल्याचे मला खूप दुःख होऊ लागले होते. मला भूक लागत न्हवती वा झोप येत न्हवती. मला वाटत होते की, पोलीस येईल, माझ्या हाताचे फिंगरप्रिंट मिळेल आणि मला जेलात टाकणार. तिथेतरी कदाचित मी केलेल्या गुन्हाचे प्रायश्चित करण्याचा एक चान्स मिळेल. पण ती त्याच रात्री गायब झाली होती. तिला कोण गायब केले? का गायब केले? कुणालाही ठाऊक नाही! पण इकडे माझा फायदा होत चालला होता. कारण मी पोलिसांच्या हाती लागलो न्हवतो. पण फायदा कसला? मला तर माझाच खूप राग येऊ लागला होता. मला माझ्या कर्माची शिक्षा हवी होती, पण मी स्वतःहून जाऊन पोलिसांत सांगणारही न्हवतो की, मीच तो गुन्हा केलाय म्हणून! कारण गायब करणाऱ्यालाही शिक्षा मिळायला हवी असे मला वाटत होते. जरी मी तिला मारले अशी कबुली दिली, मग पोलीस मलाच विचारणार की, तिला कुठे लपवून ठेवले? मग माझ्याकडे कुठलेही उत्तर उरले नसते.
एवढा मोठा गुन्हा करूनसुद्धा मी पोलिसांच्या हाती लागलो नाही, ह्याचे मला सुरुवातीला समाधान वाटत होते, पण नंतर हळूहळू मी पुन्हापुन्हा दुःखी होऊ लागलो होतो. पाण्याविना वाळवंटातील माणसाची जशी स्थिती होते, तशी माझी शिक्षेविना आणि राखीविना गती होऊ लागली होती. माझे जीवन संपल्यागत मला भास होऊ लागले होते. मला मरावेसे वाटत होते, पण हिम्मतच होत न्हवती आत्महत्या करण्याची.
पण आता पोलिसांना ठाऊक झाले आहे की, मीच राखीला ठार केले आहे, आता मला शिक्षा नक्कीच मिळणार! मला शिक्षाच तर हवी होती, शिक्षा किंवा मृत्यू!" सचिन एवढे बोलून, सुटकेचा श्वास घेतला.

योगेश विचार करू लागला की, आता त्याने काय बोलावे, " पण तुला ठाऊक आहे काय, राखीच्या बॉडीला तिच्या घरून कुणी पळविले ते? तिला प्रकाशने पळविले!"


" अच्छा! म्हणजे आता त्यालाही शिक्षा होणार!! गुन्ह्याची शिक्षा सर्वानाच मिळते." सचिन म्हणाला.

"प्रकाशला मिळणार नाही! कारण तू गुन्ह्याची कबुली दिली आहेस, त्याने नाही!! आणि तुला ठाऊक नाही आहे की, राखीचा खरा गुन्हेगार, मुळात तुझे जीवन नष्ट करणारा, राखीला एशोआरामाची ओढ लावणारा, तुझ्यापासून दुरावणारा, तिला अश्या धंद्यात नेणारा, तोच एकमेव प्रकाश आहे!" योगेश तिरक्या नजरेतून बघत म्हणाला.

"काय? हे कसे शक्य आहे? राखी तर त्याच्यावर प्रेम करायचे सोंग करत होती. ती फक्त त्याच्याकडून पैसे लुटत होती. मग तो तिला एवढे कसे बदलवू शकतो?" सचिन डोळे लहान करून म्हणाला.

" तुला नाही ठाऊक रे प्रकाशबद्दल! अजून कुणालाही ठाऊक नाही, त्याने राखीच्या प्रेताला कुठे लपविले आहे ते! त्याची चौकशीही करू शकत नाही, कारण आता तो जिल्हाधिकारी बनला आहे ना!" योगेश म्हणाला.

" काय? प्रकाश जिल्हाधिकारी आहे? मला तर ठाऊकच नाही, मी माझ्याच दुःखात होतो, जिल्हाधिकारी बदलला आहे, हे मलाही ठाऊक नाही! ते असो पण, राखी तर मला म्हणाली होती की, तिने प्रकाशला कधी हात लावू दिला नाही. पण एक गोष्ट आहे, ती माझ्यानंतर जास्त काळ प्रकाशसोबतच बोलत होती." सचिन चिंतेत म्हणाला.

" तुला नाही ठाऊक रे काहीच! राखीने त्यालाही वचन दिले होते की, ती त्याच्यासोबतच लग्न करणार... कदाचित हेच कारण होते की, राखी त्याला शरीरसुख देऊ इच्छित न्हवती. ती लग्नानंतरच त्याच्यासोबत शारीरिक संबंध ठेवणार होती, पण प्रकाशला हे मुळीच मंजूर न्हवते, तो तिला पैसे दाखवून, तिच्यासवे रात्र काढत होता." योगेश जरा घाबरतच म्हणाला.

" पण हे तुम्हाला कसे ठाऊक? त्यांच्या दोघांमधल्या गोष्टी? आणि तुम्ही सरळ त्याच्यावर एवढे मोठे आरोप कसे लावू शकता?" सचिन म्हणाला.

" प्रकाश! भयंकर आणि हरामी माणूस आहे!! राखीने त्याच्याकडून पैसे लुटले, हे त्याला खटकले नाही, पण तिने जीग्नेशसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केला हे त्याला ठाऊक झाल्यावर, तिला ठार करायला तिच्या घरी गेला. त्याने पूर्ण प्लॅनिंग केली होती, तू केलेल्या पूर्ण योजने पेक्षाही कित्येकपट भयंकर प्लॅनिंग! त्याला वाटलं की, राखी झोपलेल्या अवस्थेत आहे, तरी त्याने चाकूने मारले की, बंदुकीने मारले, पण तिला तिला ठार करून, आपल्या गाडीत टाकून, कुठे लपविले, कुणालाही ठाऊक नाही. ह्या घटनेची जराशी भनक, त्याच्या आईला झाली, त्याने त्याच्या आईलाही ठार केले. आईचा खून नक्कीच प्रकाशने केला असावा, ह्या संशयावरून त्याची बहीण मोनाने पोलिसांत केस केली, तर त्याने मोनालाही ठार केले. त्याला त्या जीग्नेशचा पत्ता लागला, त्यालाही त्याने सोडले नाही. म्हणजे एकांतरीत जे कुणी त्याच्या रस्त्यात येईल, त्याला तो ठार करत जात आहे, पण त्याच्या विरोधात एकही पुरावा नाही आहे. तू मला विचारला ना? की मला हे कसं ठाऊक? मी कित्येक महिन्यापासून, फक्त त्याच्याच केसच्या मागे लागलेला आहे. कारण त्याने त्याच्या बहिणीला म्हणजे मोनाला ठार केले आहे ना, ती माझी होणारी बायको होती. जर तुला खोटं वाटत असेल तर, तू फक्त त्याच्यावर एक आरोप टाक, की प्रकाशने खून केलाय म्हणून, आरोप केल्याच्या दुसऱ्याच दिवशी तुझाही मृत्यू होईल, कुणालाही ह्याची भनक सुद्धा लागणार नाही." योगेश म्हणाला.

"बापरे! एवढे सारे गुन्हे!! तरीही तो मोकाट फिरत आहे? पण मला विश्वास बसत नाही की, त्यानेच माझ्या राखीला अश्या विचारधारेत बदलविले म्हणून!" सचिन म्हणाला.

"प्रेम तू करत होता रे, राखी वर! पण राखीचे प्रेम खरंच होते काय तुझ्यावर? कदाचित होते असेल, सुरुवातीला, पण तुला नंतरची गोष्ट ठाऊक नाही. ती हळूहळू प्रकाशच्या प्रेमात पडू लागली होती. तिला त्याच्याकडून पैसेही मिळत होते, आणि प्रेमही. तिला पैसेच हवे होते ना? लग्नानंतर तुझ्याकडून तिला काय मिळत असते? फक्त प्रेम? प्रेम तर प्रकाशही तिच्यावर करत होता, पण प्रेमासोबतच तो तिला पैसे एवढी मोठी संपत्ती देणार होता. तू म्हणाला होतास ना, की ती तुझ्यानंतर प्रकाशसोबतच जास्त बोलत होती. आतातरी समजून घे तूच!" योगेश म्हणाला.

" मग प्रकाशने तिला ठार का केले?" सचिन म्हणाला.

" मी प्रकाशचा बालपणापासूनचा मित्र! मीच मदत केली, राखीला त्याला पटवून देण्यासाठी. राखी तुला खोटं बोलत होती की, तिने प्रकाशला कधीच हातही लावू दिला नाही म्हणून. तुला ठाऊकच आहे, राखीला पैसेच हवे होते, प्रकाश कडे पैश्याची कमतरता न्हवती. तुझ्याआधी तिने प्रकाश सोबत संभोग केला आहे. त्याचे पुरावे मी स्वतः माझ्या डोळ्याने बघितले आहे. त्याने तिचा एवढा उपयोग करून घेतला होता की, तो बोअर झाला होता, तिच्यापासून. पण काय करणार, तिनेही त्याला ब्लॅकमेल केले की, जर त्याने तिच्यासोबत लग्न केले नाही तर, पोलिसांना सांगून टाकेल की, लग्नाचे अमिश दाखवून, संभोग केला म्हणून. प्रकाशने सांगितले की, तिने तुझ्यासोबत लग्न करावे, पण तिचे प्रेम प्रकाशवरच अडकले होते म्हणून, ती तुझ्याकडून पैसे घेऊन तुला सोडून, प्रकाशसोबत लग्न करणार होती. तसा प्रकाशही तैयार झाला राखी सोबत लग्न करायला. पण मध्येच जीग्नेशची इन्ट्री झाली आणि जीग्नेशसोबत तिने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याच्या रागाच्या भरात त्याने राखीचा खून करून तिला लपविले. तुझे प्रेम तुझ्यापासून दूर नेणारे दुसरे तिसरे कुणी नाही, तर प्रकाशच होय! त्याला राखीचीच परवा न्हवती, तर तुझी काय असणार? तो तुलाही ठार करेल, जर तू त्याचे नाव फसविले तर!" योगेश म्हणाला.

" काय? माझे प्रेम माझ्यापासून दूर करणारा प्रकाशच होय? मी त्याला सोडणार नाही! तसेही मला शिक्षा तर होणारच, प्रकाशच्या खुणाचीही शिक्षा भोगायला मी तैयार आहे." सचिन रागात म्हणाला.

" होय! प्रकाशनेच तुझे जीवन नष्ट केले. राखीला तुझ्यापासून दुरावून, तू राखीच्या केसचा गुन्हेगार म्हणून तुला कारावासाची शिक्षा देऊन, तो मौज करणार आहे. अमीर लोकांचे धंदेच काय? हे असेच धंदे! तुझ्यासारख्या प्रामाणिक माणसाला फसवून आपले काम काढणे! तुला काय वाटतं? पोलिसांना तुझ्याबद्दल त्या CCTV कॅमेरातुन ठाऊक झाले? इथेच तू फसला आहे. पोलीस त्याच्या हाताखाली आहे. राखीच्या घरचे लोक प्रकाशवर पूर्ण संशय घेत आहेत, प्रेशर मध्ये पोलीसही आहेत. पण प्रकाश जवळ पॉवर आहे. त्यानेच तुला फसविले आहे. तो तुला जेलात टाकून, स्वतः मौज करणार आहे! बिचारा सचिन!!" योगेश हसत म्हणाला.

" काय? तो प्रकाश अश्या रंगाचा आहे? मी त्याला सोडणार नाही. माझ्या राखीला माझ्यापासून दूर केले, आता मी त्याला ह्या जगातून दूर करणार! फक्त मला एक चान्स द्या सर, मी स्वतः सरेंडर करणार, त्याला ठार करून! तसेही तुम्हीही त्याच्याच मागावर आहेत. मला एकदा आपला गुलाम म्हणून एक चान्स द्या. फक्त एक चान्स!" सचिन लालबुंद होऊन म्हणाला.

" दिला! (त्याच्या हातातील हातकडी सोडून, आपली रिव्हॉल्व्हर त्याच्या हातात देऊन) हे घे! करून दाखव त्याला खतम!" योगेश म्हणाला.
बाहेरील ट्रे मध्ये असलेला त्याचा मोबाईल त्याच्या हातात देऊन, त्याला आपल्या मोबाईलवर कॉल करून, योगेशने आपल्या मोबाईलवर कॉल रेकॉर्ड सुरू केले. म्हणजे सचिन आणि प्रकाशसोबत कुठलीही बातचीत झाली तरी ते रेकॉर्ड होईल. जरी सचिनने प्रकाशला ठार केले नाही तर, दोघांत काय बोलणे झाले, कदाचित प्रकाश विरोधातील पुरावे सापडण्याचे चान्स होते.

योगेश, सचिनसोबत खोटं बोलून, फक्त पुरावे मिळविण्याचा मागावर होता. योगेशला ठाऊकच होते की, सचिन प्रकाशपुढे टिकणार नाही, तोच सचिनला ठार करणार, सचिन बद्दल पूर्ण फक्त योगेशला ठाऊक आहे, प्रकाशने सचिनला ठार केले तर, प्रकाश पुन्हा एकदा गुन्हेगार बनेल आणि योगेशने आत्तापर्यंत गोळा केलेले पुरावे कामी लागेल आणि कदाचित आणखीन पुरावे गोळा होईल. तसाही सचिन जेलातच जाणार होता, आता तो मेल्यानंतर त्याचे पुरावेही व्यर्थ जाणार नाही आणि प्रकाशच राखीचा गुन्हेगार म्हणून सिद्ध होऊ शकेल.
रात्रीचे पाहुणे नऊ वाजले होते. योगेश त्याच्या ऑफिसमध्येच होता. सचिन, योगेशची रिव्हॉल्व्हर घेऊन, बाहेर निघाला. सोबतच कारही योगेशचीच घेऊन, प्रकाशच्या घराकडे जायला निघाला. योगेशने आपले ब्युट्यूथचे इअरबडही सचिनला दिले, जेणेकरून योगेश ऑफिसमध्ये बसूनच सचिनला ऑर्डर देत राहील. सचिनने प्रकाशच्या घरचा पत्ता योगेशकडूनच जाणून घेतला होता. तो थेट त्याच पत्त्यावर, म्हणजेच प्रकाशच्या घराकडे जाऊ लागला.
प्रकाश आपले ऑफिसचे काम करून, तो घरी न जाता, जिल्हाधिकारीला मिळालेल्या बंगल्यात गेला होता. त्याच्यासोबत खान असिस्टही होता. प्रकाश एका महत्त्वाच्या वर्चुअल मिटिंगसाठी आणि काही दस्तावेज आणण्यासाठी बंगल्यात गेला होता. आपले काम निपटून, खान असिस्ट सोबतच तो घराकडे परतू लागला होता.
सचिन प्रकाशच्या घरी गेला. पण प्रकाश घरी न्हवताच! सचिन, प्रकाशला ठार करण्यासाठी खूप उत्सुक होता, सोबतच रागाने लालबुंद झाला होता. प्रकाश आपल्या घरी नाही हे बघून, तो आणखीनच रागात आला. त्याला वाटले की, कदाचित प्रकाशला ठाऊक झाले असेल की, तो त्याला मारायला येणार आहे, म्हणूनच तो पळून गेला असावा, असे त्याला वाटू लागले. सचिनने जवळपासच्या माणसांना विचारले की, प्रकाश कोणत्या वेळेस घरी असतो आणि ह्या क्षणी तो कुठे आहे? एकाने त्याला सांगितले की, प्रकाश कदाचित त्याच्या ऑफिस मध्ये असेल. सचिनला जिल्हाधिकारी कार्यालय ठाऊक होते. चालू असलेल्या योगेशसोबतच्या फोनवरून योगेशने सांगितले, प्रकाश नक्कीच त्याच्या ऑफिसमध्येच असेल. तो पुन्हा कार घेऊन जिल्हाधिकारी ऑफिसकडे जायला निघाला. त्याला भानच न्हवते की, तो सध्या काय करत आहे ते, त्याला फक्त त्याचा सूड घ्यायचा आहे. म्हणून तो आपली कार अगदी वेगात नेऊ लागला होता.
हायवे संपला होता, डिव्हायडर नसलेला रोड लागला होता. तरीही सचिनच्या कारची गती काही कमी झालेली न्हवती. सचिनच्या कंबरेत लोड केलेली रिव्हॉल्वर होती. डोळे रागाने अश्रू टिपकुन लालबुंद झालेले होते.
काही वेळातच हायवे लागणार म्हणून, प्रकाश आपल्या कारची गती जरा कमी करूनच चालवीत होता. प्रकाश आपल्या घराकडे येऊ लागला होता, त्याच रोडने, ज्या रोडने पुढून सचिन येत होता. प्रकाश आणि खान असिस्ट बोलत असताना, काही वेळातच पुढून एक वेगाने गाडी येताना दिसली. पुढे टर्निंग असूनसुद्धा त्या गाडीचालकाने वेग कमी केलेली न्हवती, अश्यातच प्रकाश कन्फ्युज झाला. डिव्हायडर नसल्याने आणि प्रकाशच्या कारचे हेडलाईट खूप जास्त तीव्र असल्याने, पुढून येणारी गाडी, ज्यात सचिन होता, टर्निंगवर हँड ब्रेक मारले. स्पीड जास्त असल्याने, हँड ब्रेक मारण्याआधीच गाडी ड्रीफ्ट होऊन, प्रकाशच्या गाडीला आदडली. भला मोठा आवाज झाला. सचिनची गाडी फिरक्या घेत, स्ट्रीट लाईटच्या खांबाला जाऊन आदळली आणि पलटी झाली.
वेग कमी असल्याने आणि हेवी लक्झरी कार असल्याने, प्रकाशच्या कारला पुढच्या बाजूला, इंजिनचा भाग जरा चपका झाला, बाकी प्रकाशला आत काहीही झाले नाही. पण पुढच्या व्यक्तीला चांगलाच मार लागला असावा, असे त्याला वाटले, म्हणून तो आपल्या कार मधून उतरला आणि खान असिस्टसोबत ताबडतोब त्या उलट्या पडलेल्या कारमध्ये फसलेल्या माणसाला बाहेर काढले.
सचिनला चांगलीच दुखापत झाली होती. त्याच्या डोक्यातून रक्त बाहेर पडत होते, हातापायालाही चांगलेच मार लागले होते. सचिन बाहेर येताच, जरा पाणी पिले, नंतर प्रकाश त्याला विचारू लागला की, त्याला डोक्याव्यतिरिक्त आणखी कुठे मार लागला आहे? सचिनला समजले की, त्याच्या कानात असलेले इअरबड खाली पडले आहे, त्याने पुन्हा आपल्या उलट्या पडलेल्या कारमध्ये बाघितले असता, त्याला ते इअरबड दिसले. योगेशसोबतचा फोन कट झाला नसल्याने, योगेशने प्रकाशचा आवाज ओळखला. सचिनने जसे इअरबड लावले, तसाच योगेश त्याला ओरडून म्हणाला की, "हाच तो प्रकाश, आता तुझ्यासोबत बोलला तो!"
सचिन प्रकाशला म्हणाला, "तुझं नाव, प्रकाश काय? राखीचा बॉयफ्रेंड?" ह्यावर प्रकाश म्हणाला, "होय! मी प्रकाश पण मी राखीचा बॉयफ्रेंड नाहीच." जसा प्रकाशने त्याचे बोलणे संपविले, तसाच सचिनने आपल्या कंबरेत खुपसलेली बंदूक हातात घेऊन प्रकाशवर निशाणा लावत, त्याला म्हणाला, "खेळ संपला प्रकाश तुझा! तुझ्यामुळेच माझे आयुष्य नष्ट झाले, माझे प्रेम माझ्यापासून दुरावले, तुझ्यामुळेच मला आता कारागृहात जावं लागतं आहे, तुझ्या गुन्ह्याची शिक्षा मला भोगावी लागत आहे, पण आता नाही आता तुझी शिक्षा तूच भोग!"
प्रकाश शांतपणे म्हणाला, "एक मिनिट! पण मला मारण्याआधी मला सांगशील काय? की तू कोण आहेस? म्हणजे हे ऐकून माझ्या आत्म्याला शांती तरी लाभेल."
सचिन म्हणाला, "मी सचिन! राखीचा पहिला आणि खरा बॉयफ्रेंड! पण तू का माझे आयुष्य पणाला लावले? का माझे जीवन नाश केले? तू फक्त आपला फायदा काढून, तिला सोडून दिलास, पण मी तिच्यावर खरे प्रेम करत होतो ना! ती तुझी तर झाली नाहीच , पण तू तिला माझीही होऊ दिला नाहीस!! पैश्यांच्या एवढा घमंड? मेल्यानंतर कुठे घेऊन जाणार आहेस एवढे पैसे? दुसऱ्याचे आयुष्य नाश करून काय मिळतं? राखीला ठार केले नंतर स्वतःच्या आईला ठार केले स्वतःच्या बहिणीला ठार केले, कुठे फेडशील एवढे पाप?"
प्रकाश विचारात पडला. त्याला समजत न्हवते की, त्याने काय बोलावे. पण जसे सचिनने इअरबड घाईघाईत लावले, त्यावरून प्रकाशला समजले की, नक्कीच कुणासोबत तरी नक्कीच तो फोनवर आहे. प्रकाश म्हणाला, "तुला माझ्याबद्दल एवढं सगळं कुणी सांगितलं? कारण अश्या गोष्टी माझ्याशिवाय फक्त माझ्या दुष्मणाना ठाऊक असायला हवे, पण तू तर माझा दुष्मन नाहीच... होय! ती माझी गर्लफ्रेंड होती, मी तिला धोखा दिला नाही, तर तिने मला धोखा दिलाय. पण तिला मीच ठार केलोय, हे कशावरून तू म्हणत आहेस?"
सचिन म्हणाला, "नाही! राखीला ठार तर मी केले होते, पण तिचा बंदोबस्त तर तुनेच लावला होता ना? ... मी त्या रात्री तिच्या घरी गेलो होतो, मला तिचा खूप राग आला होता, कारण ती तुझ्यासोबत लग्न करणार होती. तिने मला आधीपासून वचन दिले होते की, ती फक्त माझ्यासोबतच लग्न करणार, पण तुझ्यामुळे, तू तिच्यावर आपली जादू केल्याने, तिला पूर्ण आपल्या नियंत्रणात आणल्याने, तेही फक्त पैश्यांच्या जोरावर, ती माझ्यापासून पूर्णता दुरावली. तू राखीसोबत रोज बोलत होतास, हे मला ठाऊक आहे, पण ती तुझ्यासोबत रात्र काढत आहे, हे मला नुकतंच ठाऊक झालंय! मला वाटत होतं की, राखी तुझ्याकडून पैसे लुटून, माझ्यासोबत लग्न करून..."
प्रकाश सचिनचे बोलणे मध्येच तोडून, "माझ्याकडून पैसे लुटून, तुम्ही दोघे लग्न करून, माझ्याच पैशाने ऐयाशी करणार होता? बरोबर ना? म्हणजे खरा पापी तूच ना? राखीवर खरे प्रेम करत असताना सुद्धा, माझ्यातर्फे राखीकडून पैसे मिळून मौज करणार होता ना? स्वतःचे करतुत लपवून, पाप पुण्याच्या गोष्टी तुझ्या तोंडून तरी शोभत नाही. आणि तुझ्या माहितीसाठी सांगतो आहे की, मी राखीला शेवटपर्यंत हात देखील लावला नाही, रात्र तर दुरचीच गोष्ट! लग्न तर मलाही करायचे होते तिच्यासोबत, तिने मला दगा दिली, तिचा बॉयफ्रेंड आहे, हे माझ्यापासून लपविले, असो...! पण तू आत्ताच म्हणाला होता ना? की राखीला मी ठार केले नाही तर, तुने केले आणि माझ्या गुन्ह्याची शिक्षा तू भोगणार आहेस? ते काय होतं?"
योगेश सचिनला फोनवरून काहीही न सांगण्याचा सल्ला देत होता, पण सचिनच्या हातात बंदूक असल्याने, प्रकाश काहीही करणार नाही आणि मरण्याआधी त्यालाही आपले आणि त्याचे सत्य आणि खरे रूप जाणून घ्यावे असे सचिनला वाटत होते. सचिन म्हणाला, "त्या रात्री मी राखीच्या घरी जाऊन, तिच्यासोबत बोललो. ती मला एवढ्या दिवस सोबत असल्याचे पैसे मागत होती. जर दिले नाही तर, पोलिसांत तक्रार करणार अशी धमकी देणार होती. म्हणून तिला तिच्याच घरी ठार केले आणि तिथून पळून आलो. त्यानंतर तू साडे अकरा वाजता तिच्या घरी खिडकीतून प्रवेश केला. पण त्या दिवशी तिच्या घरच्या मेन दाराला जरा ढकलले असता तर, ते दार खुलेच दिसले असते, कारण मीच तिच्या घरून तिच्या खून करून आलो होतो. तू तिच्या खोलीत जाऊन, तिच्या मृत शरीराला ठार करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर खिडकीतून तिला खाली टाकून आपल्या गाडीतून घेऊन गेला. ह्याच गुन्ह्याच्या शिक्षेची गोष्ट मी करत होतो. मला पोलिसांनी पकडले आहे, त्यांना माझ्याविरुद्धतला पुरावा सापडला आहे, मी तिच्या CCTV कॅमेराला फोडताना जरा पुढे आल्याने मी कॅमेरात दिसलो आणि मला कस्टडीत नेण्यात आले. पण ती शिक्षा तर तुला नक्कीच मिळणार. तेही माझ्या हातून. पण तू राखी च्या शवाला कुठे लपवून ठेवला आहेस?"
प्रकाश म्हणाला, "अच्छा तर त्या दिवशी ते दार खुलेच होते? माझी मेहनत वाया गेली मग! सोबतच CCTV ही आधीच फुटलेले होते काय? तिथेही माझा वेळ वाया गेला. राखीचे शव जिथे असायला पाहिजे तिथे नक्कीच असेल. पण तुला पकडण्यात आले, तुला कस्टडीत नेण्यात आले... कस्टडीत CBI ची ना? होय तीच असेल. योगेश माझ्या मागे लागला आहे. ही कार योगेशचीच दिसत आहे, सोबतच ही रिव्हॉल्व्हरही योगेशची आहे, मी पक्के सांगू शकतो की, तू कानात इअरबड टाकून आहे ना? फोनवर नक्कीच योगेश असेल... (ओरडून) काय योगेश बरोबर ना? सचिन! तुला एक गोष्ट सांगू? योगेशने तुझा फायदा उचलला आहे. (खान असिस्टने, हळूच आपल्या गाडीत जाऊन, बंदूक घेतली आणि दुरूनच सचिनच्या हातात असणाऱ्या बंदुकीवर निशाणा लावला आणि गोळी चालविली. सचिनची बंदूक खाली पडली)... अरे खान असिस्ट कायको गोली चलाई बिचारे पर? आधीच तो परेशान आहे बिचारा! (ओरडून) योगेश चिंता करू नको, अजून सचिन जिवंत आहे... अरे सचिन! तू किती भोळा आहेस!! तुझा सर्वात आधी राखीने फायदा उचलला होता आणि आता योगेश उचलू पाहत आहे. योगेशने तुझे कान भरले आहे रे! तुला सांगतो बघ, तो काय करत आहे! त्याने तुझ्याकडून माहिती गोळा केली. तुला माझ्याबद्दलची खोटी माहिती दिली, तुझ्या डोक्यात माझ्याविरोधातले राग भरले, त्याने तुला त्याची गन दिली कारही दिली, मला ठार करण्यासाठी, सोबतच तो इअरबडवर तो कॉल रेकॉर्ड करत असेलच. मी सत्य सांगणार, तो रेकॉर्ड करणार. नंतर तू मला ठार करणार होता. त्यांनतर तो ते रेकॉर्ड केलेले फोन कॉल पुरावे म्हणून कोर्टात हजर करणार, ज्यानंतर जरी तुने मला ठार केले नाही, तरी त्याच्याकडे पुरावे असणार, ज्यात मी कबुली दिलेली असेल की, मीच सर्वांचा खून केलाय. जरी हे सर्व प्लॅन फ्लॉप झाले, तरी त्याचाच फायदा... कारण तूला मी काहीही सांगितले नाही, म्हणजे माझे सत्य तुला संगितले नाही, योगेशने काहीही रेकॉर्ड केले नाही, पण मी तुला मारले, म्हणजे तू आता मेला तर, योगेश पुन्हा माझ्या मागावर लागेल, त्याचा मार्ग पुन्हा सुकर होईल, कारण माझ्या मते, तुझे सत्य फक्त योगेशलाच ठाऊक असेल, जर तू मेला तर ते सत्यही तुझ्यासोबत निघून जाईल, नंतर योगेश माझ्याच केसवर लागून राहील... जर ह्यातून एकही घडले नाही, तरी योगेशला काहीही होणार नाही, कारण तो म्हणेल की, तुनेच योगेश कडून रिव्हॉल्व्हर हिसकून घेतली, तिथून पळ काढला, त्याचीच कार घेऊन, आणि मला ठार केले, म्हणजे योगेश असाही वाचणारच!... (त्याच्या कानातले इअरबड स्वतः लावून) वाह योगेश वाह! प्लॅनिंग तर मस्त होती. तू रेकॉर्डही केले असेल ना सर्व? आताही रेकॉर्डिंग सुरूच असेल, नाही का? जर रेकॉर्डिंग सुरू असेल तर हे ही रोकॉर्ड कर की, आतापर्यंत जे खून झालें ते मीच घडविले, वेगवेगळे प्लॅनिंग करून! तुला काय करायचंय ते कर!! बघूनच घेतो की तू काय करतो ते? जर तू हे रेकॉर्डिग दाखविलास, तर तुझी नोकरी तर जाईलच, पण तुला शिक्षा मिळणार ते वेगळीच, कारण तूच सचिनला पळविन्यास मदत केली, तूच मला ठार करायला सर्व्हिस रिव्हॉल्वर दिली. फसला तू योगेश!"
हे ऐकून, योगेश स्तब्ध झाला. तो म्हणाला, "खूप छान! तुला बघून घेईल!!!"
त्यावर प्रकाश म्हणाला, "होय नक्कीच! पुढच्या वेळेस जास्त चांगली प्लॅनिंग कर, म्हणजे मला ही मज्जा यायला हवी... आणि चिंता करू नको, हे रेकॉर्डिंग माझ्याकडेही असणार आहे, कारण फोनमध्ये कॉल रेकॉर्ड ऑलरेडी होत आहे. आणि तुझ्या नोकरीचीही चिंता करू नको, कारण हा सुद्धा ह्यांनंतर कुणालाच सापडणार नाही.. ओके बाय!"
खान असिस्टने सचिनच्या डोक्यात गोळी झाडली. त्याला पुन्हा कार मध्ये ठेऊन, दुरूनच पेट्रोलच्या टॅंकवर गोळी मारली, स्पार्क ने मोठा विस्फोट झाला. कार जागीच भस्म झाली. मोठ्या विस्फोटामुळे आणि आगीमुळे लोक जमा होऊ लागले. पण त्यांना काहीही ठाऊक झाले नाही की, आग लागली कशी? प्रकाशने त्यांना खोटं सांगितले की, वेगात असलेली गाडी पालटली आणि गाडीने पेट घेतला.
खान असिस्टला जरा भीती वाटू लागली की, प्रकाशने योगेशला फोनवर, सांगून टाकले की, प्रकाशनेच पूर्ण खून केलाय आणि शेवटी फोन कट करण्याआधीही सांगितले की, सचिनचाही खून करणार. खान असिस्टला भीती वाटू लागली की, योगेशने ह्याच रेकॉर्डिंगच्या आधारे प्रकाशला पकडले तर? खान असिस्टने हीच भीती प्रकाशला सांगितली. ह्यावर प्रकाशने त्या फोन मधली रेकॉर्डिंग खान असिस्टला ऐकवली. त्यात प्रकाश फक्त म्हणत आहे कि, सर्व खून त्यानेच केले, पण खून कुणाचे? कुणाला काय ठाऊक? आणि शेवटी सचिनला मारण्याची क्लिपही त्याला एकविली, त्यातही तो थेट कुणाला ठार करणार म्हणून म्हणत नाही आहे, तर सचिन कुणालाच सापडणार नाही असे म्हणत आहे, त्यातही सचिन म्हणून नाव घेतले नाही. आणि जरी योगेशने ती रेकॉर्डिंग रागारागात लोकांपुढे आणली, तरी ती रेकॉर्डिंग फर्जी म्हणूनही आपल्याला सिद्ध करता येऊ शकते, वेगवेगळ्या सॉफ्टवेअर द्वारे. आणि रेकॉर्डिंग दाखविली तरीही उलट योगेशच फसणार, कारण त्यानेच आपली रिव्हॉल्व्हर दिली आहे, असे प्रकाश म्हणाला, तेव्हा योगेश आणि सचिन गप्प होते, म्हणचे हे खरे आहे की, योगेशनेच मुद्दाम सचिनला पाठविले. योगेशची नोकरी पक्की जाऊ शकते जर रेकॉर्डिंग दाखविली तर!
योगेशचा प्लॅन फ्लॉप झाला होता. त्याला चांगलेच ठाऊक होते की, आता ही रेकॉर्डिंग प्रकाशकडेही आहे. प्रकाश तर ही रेकॉर्डिंग कुणालाही दाखविणार नाही, पण जर आपण ही रेकॉर्डिंग अधिकाऱयांना दाखविली तर, उलट आपणच फसू शकतो, कारण प्रकाशने कुणाचा खून केलाय, हे काहीही स्पष्ट केले नाही, उलट आपली नोकरी जाऊन बसेल. ह्या भीतीने, योगेशने ती रेकॉर्डिंग आपल्याजवळच ठेवली आणि दुसऱ्या दिवशी अधिकाऱ्याना सांगितले की, सचिन आपली रिव्हॉल्व्हर आणि कार घेऊन पळाला आणि वाटेतच त्याचा अपघात झाला. ह्याने कमीत कमी योगेशची नोकरी तरी वाचून राहील.
प्रकाश आणि खान असिस्ट घरी परतले. प्रकाशने खान असिस्टला समजावून सांगितले होतेच की, त्याने योगेशला फोनवरून जे काही सांगितले, त्याने प्रकाश आणि खान असिस्ट कुठल्याही संकटात सापडणार नाही. प्रकाशची एवढी खात्री असल्यावर, खान असिस्टचीही भीती जवळपास नाहीशी झाली. घरी दोघांचीही बातचीत सुरू होती. खान असिस्टने मध्येच प्रकाशला विचारले की, त्याने तर आपल्या वडिलांना वचन दिली होते की, तो ह्यापुढे कधीही कुणाचाही खून करणार नाही, पण त्याने हे त्याचे वचन मोडून काढले, ह्यावर तो दुःखी आहे की, त्याला आता फरक पडत नाही, कुणाच्या बोलण्यावरून, हे खान असिस्टला जाणून घ्यायचे होते.
खान असिस्टच्या ह्या प्रश्नावर प्रकाश म्हणाला की, "पहिला खून केला होता, कारण मला खूप राग आला होता, माझ्यावर, माझ्या साधेपणावर, माझ्या साधेपणाचा फायदा उचलण्याऱ्या लोकांवर. मी हे बदलू इच्छित होतो. मला सूड घ्यायचा होता. मला ठाऊक होते की, मी पोलिसांत तक्रार करेल, म्हणजे लीगल एक्शन घेईल तर काहीही होणार न्हवते. उलट माझाच पुढचा वेळ पैसा वाया जात असता, जसा आधी जात होता. मला माझ्या तर्हेने मलाच न्याय द्यायचा होता. मला ठाऊक आहे की, हे गैर आहे, हे खूप चुकीचं आहे, पण त्यांना शिक्षा मिळणंही तेवढंच गरजेचं आहे, तोपर्यंत मला चैन काही पडणार नाही आणि त्यांना शिक्षा मिळणार हे निश्चित न्हवतेच. म्हणून मलाच त्यांना म्हणजे सर्वात आधी राखीला शिक्षा द्यावी लागली. तिला मारल्यानंतर मला खूप दुःख झाले होते. पण माझी एक चिंता मिटली होती, मी माझ्या कामावर फोकस करू शकतो होतो, माझा पुढचा वेळ वाचला होता. पण जसे हे माझ्या सावत्र आईला ठाऊक झाले, तेव्हा मला तिचाही राग आला होता. मलाही ती नको होती, पण नको असल्याचे कुठलेही कारण न्हवते, पण तिला माझ्याबद्दल ठाऊक झाले, तेव्हा असे वाटले कि, हीच ती वेळ स्वतःला बंधनातून मुक्त करण्याची. तिला ठार केले, तेव्हाही मला दुःख झाले, पण आधीच्या दुःखापेक्षा कमी. मग जसा जसा लोकांना ठार करत गेलो, तसं तसे तसे माझे दुःख कमी होत गेले, सोबतच माझ्या अडचणी, अडथडे कमी होऊन आणि आनंदाचे दार खुलत गेले. तेव्हा मला वाटू लागले की, नको असलेले लोक नकोच ह्या जगात, ज्यांचा दुसऱ्या लोकांना नुकसान होतो, ज्याच्यामुळे दुसरे लोक त्रासून जातात, दुसऱ्या लोकांना त्यांच्यामुळे अन्याय सोसावा लागतो, ती लोक नसली तर ही सोसायटी, हा समाज किती सुखाने जगू शकेल, असे मला वाटत गेले. मला समजू लागले की, जर ही वाईट लोक चांगल्या माणसाच्या जीवनातून गेली, तर हा समाजच मुळात चांगला होऊन जाईल. कुठेच दुःख नाही, त्रास नाही, गुन्हे सुद्धा नाही, फक्त ती वाईट माणसं ह्या जगातून गेली पाहिजे, असे मला वाटत आहे. आणि माझ्या मते, जोपर्यंत मी स्वतः सांगत नाही पोलिसांना की, मीच हे सर्व गुन्हे केले आहे, तोपर्यंत मी गुन्हेगार ठरणार नाही, असे मला वाटते. म्हणून मला आता माझ्या वडिलांचे वचन सांभाडण्यापेक्षा, समाज सुधारविणे जास्त गरजेचे वाटू लागले आहे. ते बंगळुरूला आहेत, त्यांना माझ्याबद्दल आधी ठाऊक झाले कारण त्यांनी कॅमेरा लावून ठेववला होता घरात, पण आता असे काहीही होणार नाही, आता त्यांना काहीही ठाऊक होणार नाही, ह्याची आपण दक्षता घेऊ, आणि आपले शहर गुन्हेगारी मुक्त, चांगल्या माणसानंयुक्त बनवू, एक अशी दुनिया, जिथे एकही गुन्हे घडणार नाही, मुळात गुन्हा घडविणारा राहणारच नाही, उरणार फक्त चांगली आणि भोळी माणसं, मी बनविणार फ्रेश न्यू वर्ल्ड, म्हणजेच क्लीन वर्ल्ड, जिथे सर्वत्र आनंदच आनंद असणार, इथे दुःखाला जागा नसणार. मी अश्या सर्व लोकांना ठार करणार, जी ह्या धरणीवर ओझे आहे, ज्याची ह्या समाजाला कुठलीही आवश्यकता नाही, अगदी क्लीन वर्ल्ड! तू आहेस ना खान असिस्ट माझ्यासोबत? असे जग बनवायला? मिळावं माझ्यासोबत हात आणि चल माझ्यासोबत क्लीन वर्ल्डची स्थापना करायला, पूर्ण गुन्हे थांबविण्यासाठी, सर्वात आधी गुन्हे घडवायला जेणेकरून पूर्ण गुन्हे थांबेल, चल गुन्हेगार व्हायला आणि ह्या क्लीन वर्ल्डचा संस्थापक बनायला, राजा बनायला! कारण ह्या जगात वाईट माणसांपेक्षा चांगली माणसं खूप जास्त आहे, त्यांनाही हे क्लीन वर्ल्डच आवडेल, तेच आपल्याला राजा बनविणार! आहे तैयार, माझ्यासोबत, माझ्या संगतीने मैदानात उतरायला? फक्त हो म्हण, तुझा होकारच ह्या नव्या विश्वाची स्थापना करण्यासाठी पुरेशी आहे!!!!"
खान असिस्ट अत्यानंदीत होऊन, "यस बॉस! तुम्ही सर्वात आधी माझे राजे आहेत, मी तुमचा सैनिक कमी गुलाम जास्त!! तुम्ही फक्त एक पुकार ठेवा, तुमच्यासाठी शंभर वेळेस प्राण देण्यासाठी हा गुलाम तैयार आहे!!!"
प्रकाश त्याचा हात आपल्या हातात घेऊन, "चल तर मग आज रात्रभरातच पूर्ण प्लॅनिंग करून घेऊत!"
दोघांनीही रात्रभरात, वेगवेगळे प्लॅन बनविले, दूरदृष्टीचा विचार करून! म्हणजे कुठल्याही परिस्थितीत ते दोघे कुणाच्याही नजरेत पडणार नाही आणि ते आपले काम करत राहील, अशी त्यांची प्लॅनिंग होती. सर्वांनाही असे ठार करायचे होते की, ज्याप्रमाणे दोघांनी मिळून अगदी चतुराईने आत्तापर्यंत खून करत आले आहेत आणि दोघांपैकी एकांवरही खुनाचा गुन्हा दाखल झाला नाही, अथवा खूप जास्त संशयही आला नाही. त्यांनी पुढेही असेच वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी ठार करण्याची योजना आखलेली होती आणि त्याप्रमाणेच दोघेही कामावर लागणार होते. त्यांच्या प्लॅननुसार, एखाद्या माणसाला सिलेक्ट करायचे, त्याने आतापर्यंत केलेल्या गुन्ह्याची यादी काढायची, आणि जर त्याने गुन्हे घडविले असतील, दुसऱ्या साध्या लोकांना त्रास दिला असेल, तर त्याला ठार करायचे सोबतच त्याच्या मेलेल्या शरीराचा चांगला बंदोबस्त करायचा. लोक मरत गेली, त्यानंतर गायब होत गेली, की लोकांच्या कानावर हळूहळू पडत जाणार की, जर आपण गुन्हे केले तर आपणही बेपत्ता होऊ किंवा मारून जाऊ, ह्या भीतीने गुन्हे कमी होतील, एक वेळ अशी येईल की, पूर्ण शहरातील गुन्हे पूर्णता संपून जाईल. असा त्यांच्या प्लॅन होता. पण लोकांच्या मनात भीती भरायचीच कशी? कारण लोकांना कसे ठाऊक होईल की, जी लोक मरत आहेत, ते वाईट लोक होती, किंवा जरी पुढे जाऊन माहीत झाले की ती वाईट माणसं होती, तरी लोकांना हे माहीत व्हायला हवे ना, की वाईट लोकांचा खात्मा करायला, चांगल्या लोकांची रक्षा करून, नवीन विश्व स्थापित करायला येणारा आपणच होय? हे कसे ठाऊक होईल? हा प्रश्न दोघांनाही पडला. कारण जर लोकांना सांगितले की, त्या सर्व लोकांना गायब करून ठार करण्यामागे दुसरा तिसरा कुणी नाही आपणच आहोत, तर लोक आपल्याला गुन्हेगार ठरवतील, आपल्याला जेलात टाकतील, असेही नको व्हायला, म्हणून ते दोघेही ह्याबद्दलची प्लॅनिंग करू लागले.
रात्रभर विचार करूनसुद्धा त्यांना समजत न्हवते की, आपण लोकांपुढे यायचे कसे? गुन्हेगार म्हणून नाही तर राजा म्हणून? खूप विचार करूनसुद्धा समजत न्हवते की, त्यांनी काय करावे, म्हणून वाईट लोकांना ठार करण्याचे प्लॅन जरा पुढे ढकलले.
त्यांचे प्लॅन पुढे गेले असले तरी, त्यांना ऑफिस मध्ये तर जावेच लागणार होते. दुसऱ्या दिवशी वेळेवर प्रकाश आणि खान असिस्ट ऑफिसमध्ये गेलेत आणि आपापली कामे करू लागलीत.
दुपारच्या वेळेत, एक म्हातारी बाई, प्रकाशला भेटायला त्याच्या ऑफिसमध्ये आली. त्या म्हाताऱ्या बाईसोबत तिचा आंधळा नवराही होता. ती म्हातारी बाई विनवणी करू लागली की, तिला एकदातरी प्रकाशसोबत बोलू द्यावे. पण वारंवार प्रकाशचा सेक्युरिटी तिला घरी परतण्याचा सल्ला देत होता. त्या म्हाताऱ्या बाईला एक समस्या होती, पण तो सेक्युरिटी तिला म्हणाला की, समस्या आमदार खासदरकडे जाऊन सांगाव्या, जिल्हाधिकारी कडे येऊन नाही. पण असे म्हणून सुद्धा ती त्या सेक्युरिटीचे ऐकायला तैयार न्हवती. प्रकाशला CCTV कॅमेरामध्ये दृश्य दिसत होते, त्याने त्या सेक्युरिटीला, त्या बाईला आत सोडण्याचा सल्ला दिला. प्रकाशच्या बोलण्यावरून, सेक्युरिटीने त्या म्हाताऱ्या बाईला आणि तिच्या नवऱ्याला आत आणले.
ती म्हातारी बाई, प्रकाशला तिची दुखभरी कहाणी सांगू लागली. कर्जापाई त्या म्हाताऱ्या जोडप्याने एका सावकाराकडे आपले शेत गहाण ठेवले होते. काबाडकष्ट करून, दिवसभर शेतात मनमजुरी करून शेतमाल विकून, आपले कर्ज फेडत होते. असे करत करत ते कर्ज जवळपास संपायलाच येत होते, पण पावसाळ्यात दोघांचीही तब्येत बिघडली असल्याने, त्या महिन्यात शेतमाल झाला नाही, आणि म्हणूनच एका महिन्याचे पैसे ते दोघे सावकाराला देऊ शकले नाहीत. अश्यातच त्या सावकाराने धमकी दिली की, उरलेले पैसे दिले नाहीत तर तो ती शेत विकून टाकीन आणि विकून मिळालेले पैसे तो स्वतःच ठेऊन देईल. पण त्या नंतरच्या महिन्यात, त्या म्हाताऱ्या जोडप्याने कसेबसे करून पैसे जमा केलेत आणि पूर्ण पैसे एकवेळचे देऊन, आपली जमीन आपल्या ताब्यात घेणार होते, पण त्या सावकाराने, ह्या म्हाताऱ्या जोडप्यांना काहीही न सांगता ती जमीन विकून टाकली. ह्याची तक्रार त्या म्हाताऱ्या जोडप्याने पोलिसांत केली, पण तो सावकार सुरुवातीला पोलिसांना सांगू लागला की, त्याने ह्यांची जमीन कधी घेतलीच नाही, पण पोलिसांना माहीत झाले की, ह्याने ती जमीन घेतली होती. पण त्यानंतर तो म्हणू लागला की, ह्या म्हाताऱ्या जोडप्याने त्याचे एकही पैसे दिलेले नाही, म्हणून त्याने ती शेत विकून टाकले. पण वास्तविक पाहता, त्या म्हाताऱ्या जोडप्याने त्यांचे कर्ज फेडले होते, फक्त व्याजेचे पैसे द्यायचे बाकी होते. पण त्याआधीच त्या सावकाराने ती जमीन विकून टाकली. सोबतच त्याने पोलिसांसमोर सिद्ध केले की, ह्या म्हाताऱ्या जोडप्याने त्याचे एकही पैसे दिले नाही. अडाणी असल्याने ह्या म्हाताऱ्या जोडप्यांना काहीही करता आले नाही, आता ते पोलिसांतही तक्रार करू शकत न्हवते, त्यानंतर ते आमदार-खासदारकडे गेलेत, पण तरीही त्यांना कुठलीही मदत मिळाली नाही. आता शेवटचा पर्याय म्हणून, जिल्हाधिकारी म्हणजेच प्रकाशकडे आलीत.
त्या म्हाताऱ्या जोडप्यांचे दुःख ऐकून, त्या सावकाराचा त्याला खूप राग येऊ लागला. अश्यातच त्याला त्याच्या प्लॅनबद्दल आठविले आणि लोकांच्या मनात आपले घर कसे करायचे हे त्याला समजले. आता ह्या केसपासूनच तो सुरुवात करणार होता, त्याच्या क्लीन वर्ल्डच्या प्रवासाची! प्रकाशने त्या सावकाराची माहिती काढायला सांगितली!!
प्रकाशने त्या म्हाताऱ्या जोडप्यांना सांगितले की, तो त्यांचे काम करणार, त्यांची शेती काय? त्यांना त्यांच्या ऐवजी खूप पैसे देणार! पण त्या बदल्यात त्या म्हाताऱ्या जोडप्यांकडून त्याला काम काढून घ्यायचं होतं. मुळात प्रकाशला एक युक्ती सुचली होती, त्याच्या क्लीन वर्ल्डच्या विश्वाला प्रारंभ करण्याची.
प्रकाशने त्या म्हाताऱ्या जोडप्यांना वचन दिले की, ज्याप्रमाणे त्या सावकाराने त्यांच्यावर अन्याय केला, त्याला तशीच शिक्षा मिळेल. सोबतच हेही आश्वासन दिले की, प्रकाश, शेती सोबतच त्या म्हाताऱ्या जोडप्यांना पैसे देऊन त्या बदल्यात, त्या म्हाताऱ्या जोडप्याने त्यांच्या पूर्ण गावात जाऊन बोंबाबोंब करत सांगावे की, एक शूरवीर योद्धा "वीर" नावाचा, त्याने त्या सावकाराला ठार केले आहे. ह्यापुढेही तो खूप लोकांना ठार करणार, जी लोक वाईट आहेत, ज्यांची ह्या जगाला गरज नाही, असे गुन्हेगार लोक, समाजाला लागलेला कीड, असे लोकांना तो वीर नावाचा राजकुमार सर्वाना ठार करणार आणि शुद्ध विश्वाची स्थापना करणार अशी बातमी पूर्ण गावभर पसरवायला सांगितले, जेव्हा तो सावकार मारणार तेव्हा...
प्रकाशने तोपर्यंत पूर्ण प्लॅनिंग करून घेतली होती, त्या सावकाराला ठार करण्याची. पण त्याआधी प्रकाशला त्या सावकाराने आतापर्यंत काय काय असे गुन्हे केले आहेत, आणि किती लोकांना त्याने त्रास दिला आहे , किती लोक त्याच्यापाई मरण पावले आहेत? हे सर्व त्याला जाऊन घायचे होते. प्रकाशच्या बोलण्यावरून खान असिस्ट कामावर लागला. त्याने एका माणसाला त्या सावकाराच्या गावला पाठविले, त्याने आतापर्यंत काय काय केले, हे शोधून काढायला. अगदी एकाच दिवशी त्या सवकाराबद्दल प्रकाश आणि खान असिस्टला समजले. त्या सावकाराने, आत्तापर्यंत खुप लोकांच्या जमिनी हडपल्या आहेत, सोबतच खूप शेतकर्याना जास्त व्याज दराने पैसे उसने दिलेले आहेत, जर त्यांनी पैसे वेळेवर दिले नाहीत, तर तो त्यांची जमीन विकून टाकतो, ह्यामुळेच सावकाराच्या ह्या जाचापायी कित्येक लोकांनी आत्महत्या केलेल्या आहेत. तरीही तो सुधारला नाही असे दिसते आहे आणि पुढेही असेच तो वागणार आहे हे दिसून पडत होते. प्रकाश त्या सावकाराला कायद्याने शिक्षा देऊ शकतोच, पण तरीही त्याला आपल्या तर्हेने शिक्षा द्यायची आहे.
दुसऱ्याच दिवशी, प्लॅननुसार खान असिस्टने त्या सावकाराला फोन करून, काही कामानिमित्त प्रकाशच्या ऑफिसमध्ये बोलावून घेतले, सोबत येताना त्या म्हाताऱ्या जोडप्याच्या शेतीचे कागदपत्रे आणायलाही सांगितले. जिल्हाधिकारीच्या पीएने फोन करून बोलाविले आहे म्हणून तो सावकार पटकन आपली गाडी काढून शहराकडे जाऊ लागला. ऑफिसमधून प्रकाश आणि खान असिस्ट, काही डॉक्युमेंट्स घेऊन, दोघेही गाडीने त्या गावाकडे निघाले. खान असिस्टला त्याच्या गाडीचा नंबर ठाऊकच होता, जशी त्या सावकाराची गाडी दिसली, खान असिस्टने त्याला थांबवायला सांगितले. सावकार खाली उतरला आणि म्हणाला, "अरे सर मी तर तुमच्याच ऑफिस मध्ये येणार होतो, तुम्हीच तर बोलाविले होते ना? आता इकडे कुठे निघालेत तुम्ही? आणि मी ते डॉक्युमेंटही सोबत आणले आहे, तुम्हीच बघा, ह्या डॉक्युमेंटवर त्या म्हाताऱ्या जोडप्याची स्वाक्षरी आहे, तुम्हीच बघा, ह्याचा अर्थ, त्या म्हाताऱ्या जोडप्याने मला ती शेत दिली असा होतो ना?"
खान असिस्ट, "ते आपण पुढचं पुढं बघू, पण सर्वात आधी मला तुमचा मोबाईल द्या!" सावकाराने त्याचा मोबाईल त्याला देऊन, "काय झालं सर? मोबाईल कशाला हवाय माझा?"
खान असिस्टने त्याच्या मोबाईलवरून रिसेन्ट कॉल डिलीट केलेत, जो पहिलाच कॉल खान असिस्टचा होता. त्यानंतर त्या मोबाईलची सिम काढली आणि तो मोबाईल परत त्या सावकाराच्या गाडीत टाकून दिले आणि सावकाराला प्रकाशच्या गाडीत, ते कागदपत्रे घेऊन, बसायला सांगितले. जिल्हाधिकारीचा ऑर्डरचा त्याला मान ठेवावाच लागला. तो प्रकाशच्या कार मध्ये बसला. हळूच खान असिस्ट, सावकाराच्या गाडीच्या ड्रायव्हरजवळ गेला आणि म्हणाला, "तुझी फॅमिली आहे काय? (ड्रायव्हरने उत्तर होय म्हणून दिले), कोण कोण आहे तुझ्या फॅमिली मध्ये? (ह्यावर तो ड्रायव्हर म्हणाला, त्याची आईच त्याच्यासाठी पूर्ण फॅमिली आहे), अच्छा तर तुझी आईच आहे, बाकी कुणीच नाही! तुला किती मिळतं गाडी चालवून? (उत्तर पंधरा हजार प्रति महिना असे आले) , पंधरा हजार! मी तुला पन्नास लाख रुपये देतो, तू हे शहर सोडून, हे राज्य सोडून, खूप दूर पळून जा! तुझ्या आईला घेऊन, तिकडे सेटल हो, पन्नास लाखांत तू पूर्ण जीवन काढू शकतोस, सोबतच इन्व्हेस्ट केलास तर ह्याचेही खूप पैसे होतील, ड्रायव्हरकी करून तू पूर्ण आयुष्यातही एवढे पैसे कमवू शकणार नाहीस, म्हणून माझं ऐक, मी तुला आताच तुझ्या अकाउंटवर पैसे पाठवितो, आणि तू इथून पळून जा, ठीक आहे?" खान असिस्ट म्हणाला...
त्या ड्रायव्हरलाही एवढे पैसे ऐकून लालसा झाली. तो लगेच तैयार झाला. खान असिस्टने त्याच्या अकाउंटवर पन्नास लाख रुपये पाठवून दिले. तो ड्रायव्हर, धन्यवाद म्हणून आणि इथे कधीच परतणार नाही असे वचन देऊन तो सावकाराची गाडी सोडून, तिथून निघून गेला.
खान असिस्ट प्रकाशच्या गाडीत बसला. प्रकाश गाडी चालवू लागला. प्रकाश, गाडी त्याच्याच गावाकडे नेऊ लागला होता. पण मध्येच खान असिस्टने, त्या सावकाराने आतापर्यंत केलेल्या गुन्ह्याची उजळणी करून दिली. सोबतच एका डॉक्युमेंटवर साइन घेतली, जे डॉक्युमेंट त्या म्हाताऱ्या जोडप्याचे होते, आणि खान असिस्टने आणलेल्या दुसऱ्या डॉक्युमेंटवर साइन घेतली, जे त्या सावकाराची पूर्ण प्रॉपर्टीचे कागदपत्रे होती, सावकाराने साइन केलेल्या त्याच्या प्रॉपर्टीच्या कागदपत्रात असे लिहून होते की, तो आपली पूर्ण संपत्ती, गावाच्या कल्याणासाठी लावणार, त्यात त्याचे घरही आहे. जसे त्या सावकाराने त्या कागदपत्रांवर साइन केले, तसाच खान असिस्टने चालत्या गाडीतच सायलेन्सर लावलेल्या बंदुकीने त्याचा खून केला. त्या सावकाराच्या शवला घेऊन, दोघेही त्या म्हाताऱ्या जोडप्याच्या शेतात गेले.
ते दोघेही तिथे न्हवते, अश्यातच, त्या सावकाराला, त्यांच्या शेतात खूप मोठा खड्डा करून त्याला पुरविले. त्यासाठी प्रकाश आणि खान असिस्टने खड्डा करायचे पूर्ण साहित्य गाडीतच आणले होते. त्या सावकाराला पुरविल्यानंतर त्या म्हाताऱ्या जोडप्यांना शेतात बोलाविले. त्यांना त्याचे डॉक्युमेंट परत केले आणि त्यांना सांगितले की, आता तो सावकार ह्या जगात नाही. आता त्यांना त्रास देणारेही कुणीच नाही. त्या डॉक्युमेंट सोबतच त्यांना काही पैसे दिले आणि प्रकाश म्हणाला की, आता त्या म्हाताऱ्या जोडप्याने पूर्ण गावभरात अशी खबर पसरावी की, वीर नावाच्या एका भल्या माणसाने, त्या दृष्ट सावकाराला ठार केले आहे आणि त्या सावकाराची पूर्ण मालमत्ता गावासाठी दान करायला भाग पाडले आहे. म्हणजे गावात, वीर नावाच्या माणसाची चर्चा होईल, दुसऱ्या गुन्हेगार माणसांच्या मनात भीती वाढेल, पण चांगल्या लोकांच्या मनात आनंद पसरायला हवा, असा प्रकाशने विचार केला.
गावात चर्चा रंगू लागली, प्रकाश परत शहरात येऊन, आणखीन अश्याच प्रकारच्या सावकाराची माहिती काढायला, खान असिस्टला सांगितले. आठवडाभरात पूर्ण पुणे जिल्ह्यात, ऐकून सतरा असे सावकार सापडले, जे लोकांचे पैसे, जमीनी बुळवून मालामाल झाले आहेत. दोघांनी मिळून, सर्व सतरा लोकांना ठार करण्याची प्लॅनिंग बनविली, वेगवेगळ्या पद्धतीची, त्यांच्या परिस्थितीला असुरून.
पण सर्वात आधी, प्रकाशने आपला एक चांगला वकील हायर केला, जो उच्च पदावर आहे, ज्याला खूप ज्ञान आहे, त्याचीही विचारधारा प्रकाशसारखीच आहे, अश्या एका वकिलाचा शोध घेण्यास यश प्राप्त झाले. ऍडव्होकेट शुक्ला नावाचा वकील, जराही त्याचे वय खूप असले तरी ज्ञान खूप आहे आणि अनुभवही खूप आहे, सोबतच त्याचीही विचार धारा ही तशीच आहे. तो म्हातारा असल्याने, त्याला मरण्याची भीती मुळीच नाही, पण तोही प्रकाश सारख्याच विचारधारा असणाऱ्या माणसाच्या शोधत होता, म्हणून तो प्रकाश साठी आणि त्याच्या योजनेसाठी तो स्वतःचे प्राण देण्यासही तैयार होता.
वकील पुढे जाऊन प्रकाशचे केस भांडायला आणि प्रकाशला निर्दोष सिद्ध करायला कामी येणार होता, जर चुकून प्रकाश कुठल्याही गुन्ह्यात सापडला तरी. वकीलनंतर, दहा अश्या लोकांना आपल्या टीम मध्ये शामिल करून घेतले, जे पैश्यासाठी काहीही करू शकतात, सोबतच प्रकाशच्या विचारधारेचा आदर करणारे असे सर्व लोक होती, पण त्यांना प्रकाश हँडल करत आहे हे ठाऊक न्हवते, कारण त्यांना हँडल, एक विशिष्ट माणूस करत होता, त्या माणसालाही प्रकाशने ठेवले होते, त्याचे नाव नैत्या आहे. त्या माणसालाही अश्या लोकांचा खूप राग येतो, ज्यांच्यामुळे चांगल्या लोकांचा बळी जातो. त्या पैश्यांसाठी काहीही करणारे ते दहा लोकांना हा नैत्या हँडल करत होता आणि नैत्याला खान असिस्ट!
आता वेळ होती, त्या सतरा वेगवेगळ्या सावकारांना ठार करण्याची, तेही प्लॅननुसार! त्या सतरा सावकारांमध्ये दोन नगरसेवकही होते, खरंतर तेही सावकरच होते, लोकांकडून पैसे काढणारे.
प्लॅननुसार पहिल्या सावकाराला, त्याच्याच घराला रात्री आग लावून ठार केले. त्याच्या घरी त्याच्याशिवाय कुणीच राहत न्हवते, नोकरांना सोडले तर. त्या आगेत नोकर तर वाचून बाहेर आलेत, पण तो सावकार ठार झाला. दुसऱ्या सावकाराच्या बाथ टबमध्ये प्रकाशच्या माणसांनी ऍसिड टाकून ठेवले होते. तो जसा अंघोड करायला त्या बाथटब मध्ये उतरला, तशीच त्याची पूर्ण त्वचा भाजून निघाली. जास्त भाजल्याने त्याचाही मृत्यू झाला. तिसऱ्या सावकाराला, त्याच्याच एका विश्वासू नोकरकडून मारायला भाग पाडले. तो नोकरही त्या सावकरप्रमाणेच होता, लोकांना त्रास देणारा. त्या नोकराच्या घरच्या मंडळींचे अपहरण करून, त्याला त्याच्या बॉसला म्हणजेच त्या सावकाराला ठार करण्यास सांगितले. त्या सावकरपेक्षा आपले परिवार महत्वाचे म्हणून, त्याने त्या सावकाराला ठार केले, पण नंतर त्या नोकरालाही पोलीस उचलून नेली.
त्यानंतरच्या सावकाराला, त्याच्या गोव्याच्या ट्रिपमध्ये असतानाच हॉटेलच्या टेरेस वरून त्याला फेकण्यात आले. खूप वरून पडल्याने त्याचा मृत्यू झाला. पाचव्या सावकाराला, त्याच्या जेवणात विष देऊन ठार करण्यात आले, खरंतर ते विष त्याच्याच इल्लीगल फॅक्टरी मधील, कीटकनाशक होते. सहाव्या सावकाराला, त्याच्याच घरातील स्विमिंग पूल मध्ये बुळवून ठार केले. ज्यांच्या घरात CCTV कॅमेरे लावलेले होते, अश्या आठ सावकारांना शार्प शूटरने ठार केले. उरलेल्या तीन सावकारांना गाडीने ठोकून मुद्दाम अपघात करून ठार करण्यात आले.
एवढ्या सगळ्या लोकांना ठार केले, पण ह्यातील एकही सावकाराला ठार करतानाचे पुरावे सुटले नाहीत, अशी पूर्ण खबरदारी घेण्यात आली. प्रकाशच्या हाताखाली काम करणाऱ्या लोकांना, आणि त्यांच्याही खाली काम करणारे लोक जोडायला सांगितले, अश्याने एक चैन तैयार होत जात होती, आणि आपल्याला कॅट्रोल कोण करत आहे, हे समजत न्हवते, फक्त लोक जुडले जात होती, प्रकाशचे काम सोपे होऊ लागले होते.
प्रकाशने केलेल्या परफेक्ट प्लॅनिंग नुसारच त्या सर्व सतरा सावकारांना ठार केल्यानंतर, आता वेळ होती पूर्ण पुराव्याना नष्ट करायची. तसे बघितले तर, एकही पुरावे सुटले नसावे, पण तरीही प्रकाश रिस्क घेऊ इच्छित न्हवता. लोकांना आणि पोलिसांना जरी हे ठाऊक झाले की, सावकाराचा खूनच झालाय म्हणून, तरी चालेल, पण हे कळता कामा नये की, ते सर्व खून प्रकाशच्याच हाताखाली घडले आहे. जर असे कळले तर त्याच्या नव्या शुद्ध विश्वाचे स्वप्न धुळीस मिटून जाईल आणि कारावास होईल ते वेगळेच, म्हणून प्रकाशने खान असिस्टला पुराव्यांचा मोर्चा सांभाडायला सांगितले. खान असिस्टने, त्याच्या खाली काम करणाऱ्या नैत्याला ऑर्डर दिले की, त्याने एकोनेक पुराव्यांचा चांगल्या प्रकारे बंदोबस्त करावा.
आता पुरावे शोधून सापडणार नाही, पण प्रकाशला जसे पाहिजे होते, तसे होत न्हवते. प्रकाशला वाटत होते की, एवढ्या दृष्ट सावकारांना ठार केले, तर त्या खुनाबद्दल खूप चर्चा होईल आणि खास करून त्या सर्व खून केलेल्या खुनी बद्दलही, पण प्रकाशला हवी तितकी चर्चा घडवून आणता आली नाही, पण जिथे नको पाहिजे होती, तिथे घडू लागली, म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये! पोलिसांना खूप संशय येऊ लागला की, नक्कीच ह्या सर्वमागे घातपात असावा, कारण सतरा लोकांचा खून झालाय, तेही अगदी एक दोन दिवसांतच, आणि महत्वाचे म्हणजे ते सर्व सावकार होते, हे ठाऊक झाल्यानंतर पोलिसांना चांगलाच संशय आला की, हे नक्कीच प्लॅनिंग नुसार मारले गेलेले आहे. पोलीस पुराव्यांच्या शोधत लागले होते. प्रकाशला हेच नको होते.
एवढेच नाही, तर प्रकाश आणखीनच दुःखी होता, कारण ज्या म्हाताऱ्या जोडप्याची प्रकाशने मदत गेली होती, त्या जमीन हडपणार्या सावकाराला सुरुवातीला मारून, त्या म्हाताऱ्या जोडप्याने आपल्याबद्दल म्हणजे वीर बद्दल, तेवढा प्रचार केलेला दिसत नाही आहे, कारण त्या गावात लोकांच्या तोंडातून वीर नावाचा शब्द निघताना दिसत नाही आहे. इथेही प्रकाशचा प्लॅन जरासा फ्लॉप ठरला. पण महत्वाची गोष्ट म्हणजे, लोकांच्या मनात ही भावना आली नाही की, प्रकाश वाईट माणसांना ठार करून, चांगल्या माणसांना जगायला चांगल्या विश्वाची संधी देत आहे, पण उलट त्यांच्या मनात भीती वाढली की, तो खुनी आपल्याला तर ठार करणार नाही ना? असे प्रकाशला वाटू लागले, वास्तविक पाहता, हे चित्र खरेच होते, लोकांच्या मनात त्या खुनाबद्दल जराशी भीती निर्माण झाली होती.
पण ही वेळ प्रकाशाची थांबायची न्हवतीच, तर पुढेही निरंतर चालायचे होते. आता प्रकाश आणि खान असिस्टने प्लॅनिंग बनविली, पुण्यातील सर्व गुंडांना ठार करण्याची आणि खूप महत्वाच्या गुंडांना, ज्यांची विचारशैली आपल्यासोबत जुळत आहे, जे हुशार आणि बलवान आहे, त्याला आपल्या टीममध्ये वाढवत जाण्याची त्याची प्लॅनिंग होती. म्हणजे ह्यानंतर प्रकाशच्या हाताखाली खान असिस्ट, त्याच्या हाताखाली गुंडांना कॅट्रोल करणारा नैत्या, आणि ह्यापुढे जुडणारे नवीन गुंड, ह्या गुंडांच्या हाताखाली काम करतील. इथेही महत्वाची गोष्ट म्हणजे, नवीन गुंडांना जराही ठाऊक होणार नाही की, त्यांना कंट्रोल प्रकाश किंवा खान असिस्ट किंवा नैत्या करत आहे म्हणून, त्यांना वाटणार की, ती दहा गुंडच त्यांना कॅट्रोल करत आहेत. पण प्रकाशच सर्व लोकांना पैसे पुरविण्याचे काम करत होता. आता वेळ होती, सर्व गुंडांना संपवायची, पण महत्वाच्या गुंडांना आपल्या चेन मध्ये जोडायची.
आता प्लॅनिंग सुरू झाली, पूर्ण पुणे जिल्ह्यातील, एकोनेक गुंडांना ठार करण्याची, जी प्रकाशच्या विचारधारेत फिट बसत नाहीत. सर्वात आधी, सर्व गुंडांची माहिती काढण्यात आली, संपूर्ण शहरात, तसेच लहान मोठ्या तालुक्यात आणि गावात मिळून, जवळपास साडे चारशे गुंड निघाले होते. ते सर्व गुंड, वसुली, चोरी लहानमोठे गुन्हे, सुपारी घेणे, आणि शहरात अशांतता पासरविण्याची त्यांची कामं होती. अश्या सर्व गुंडांची यादी काढून, त्यांचा ठावठिकानाचा, म्हणजे सध्याचा पत्ता लावून, त्यांना ठार करण्याची योजना बनविण्यात आली. फक्त अश्या गुंडांना सोडायचे होते, जे प्रकाशच्या विचारधारेत फिट बसणार. अश्या गुंडांची निवळ करणे जास्त कठीण काम न्हवते, कारण प्रकाशच्याच हाताखाली गुंड होती, त्यांची ओळखी होतीच त्यांच्यासोबत. त्यांचीच पत्ता लावला आणि अश्या गुंडांना आपल्या टीम मध्ये शामिल करून घेतले, ज्या गुंडांना क्लीन वर्ल्ड हवा आहे.
प्रकाश सुपेरिअर लेव्हल, खान असिस्ट हायर लेव्हल, नैत्या- अपर मिडल लेव्हल, त्याच्या हाताखाली काम करणारे दहा गुंड मिडल लेव्हल आणि आता नवीन गुंड, जी त्या दहा गुंडांच्या हाताखाली काम करणार, ती अपर लोवर लेव्हल. अश्याप्रकारच्या पायऱ्या बनविण्यात आल्या. म्हणजे अपर लोवर लेव्हलच्याही खाली लोक जुडतच राहील, ते ह्या नवीन गुंडांच्या हाताखाली काम करणार, पण त्यांना हे कधीच ठाऊक होणार नाही की, त्याला कॅट्रोल करणाऱ्या माणसाला कोण कंट्रोल करत आहे ते. पण प्रकाशने सर्वांत पसरविण्यास सांगितले की, त्या सर्वांना वीर नावाच्या वीरयोद्धा जो जगाचा कायापालट करणार आहे, तोच सर्वाना कंट्रोल करत आहे.
साडेचारशे गुंडांपैकी, जवळपास चाळीस गुंड प्रकाशच्या टीममध्ये शामिल झालीत, आणि दहा गुंडांनी आधीच गुंडगिरी सोडली होती, म्हणजे आता त्या उरलेल्या सर्व चारशे गुंडांना संपवायचे होते. ह्या सर्व गुंडांना संपविण्याची, नैत्याच्या खाली काम करणाऱ्या दहा गुंडांना,प्लॅननुसार ठार करण्याची जबाबदारी दिली. प्रकाश आणि खान असिस्टने त्या सर्व गुंडांना ठार करण्याचा प्लॅन बनविला होताच.
नैत्याच्या खाली काम करणाऱ्या दहा गुंडांनी, त्यांच्या खाली काम करणाऱ्या नवीन चाळीस गुंडांना, त्या सर्व चारशे गुंडांना ठार करण्याची योजना समजावून सांगितली, त्यांना लगेच त्या कामावर रुजू केले आणि हे दहा गुंड, ह्या चाळीस गुंडांनी केलेल्या मर्डरचे पुरावे लपविणार होते. म्हणजे ते चाळीस गुंड त्या सर्व गुंडांना ठार करत जाणार आणि त्यांच्या वरील गुंड पुरावे मिटवीत जाणार.
ठार करण्याच्या जागेवर, किंवा जवळपास कुठे CCTV कॅमेरे तर नाही, हे बघून घेणे पहिली अट. जमिनीवर रक्ताचा एकही थेंब सांडू देऊ नये, ही दुसरी अट त्यानंतरची अट म्हणजे त्या जागेवर कुणी बघत नाही आहे, ह्याची पुष्टी करणे, त्यानंतर त्या मेलेल्या बॉडीचा बंदोबस्त अश्या ठिकाणी करणे, की त्याला कुणीही शोधू शकणार नाही, आणि सर्वाना अगदी एकाच दिवशी किंवा एकाच रात्री संपवायचे होते, जेणेकरून पूर्ण जिल्ह्यात, सर्व लोकांना नवीन विश्वाची चाहूल लागेल, अश्याचप्रकारच्या वेगवेगळ्या अटींचे पालन करून प्लॅनचे उद्घाटन करायचे होते.
प्लॅन सुरू झाले. पूर्ण अटींना पार पाळण्याची योग्य ती वेळ, रात्रीची होती. सर्व लोक कामावर लागले. दर अर्ध्या तासाला, खून होऊ लागला, खून करणारा, पुन्हा दुसऱ्याचा खून करायला निघायचा आणि मागून एकजण पुरावे मिटवत जायचा. चाकूने, सायलेन्सर लावलेल्या बंदुकीने, दोरीने गळा दाबून, खाण्यात विष देऊन, अश्या वेगवेगळ्या पद्धतीने खून होऊ लागले, पुरावे मिटू लागलेत.
पूर्ण रात्रभरात, सर्वच गुंडांचा नायनाट झाला. त्या सर्वांचा बंदोबस्तही रात्रीच्या अंधारातच करण्यात आला. काहींना जमिनीच्या खूप खाली पुरविण्यात आले, कुणाला तलावाच्या खाली चिखलात बुजविण्यात आले, कुणाला एकाच वेळेस जमा करून जाळण्यात आले, तर कुणाला कचऱ्याच्या मोठमोठ्या ढिगारात माती लपेटून गाडण्यात आले.
रात्रभरात सर्व गुंडांचा सफया झाला, एकही पुरावे न सुटता. पुरावा जरी सुटला तरी, एक किंवा दोन गुंडांचा सापडेल, पण त्याच्या आधारावरून, प्रकाशपर्यंत पोहोचणे खूप अवघड होते. कारण त्याच्या हाताखाली काम करणारे लोक, त्याच्यासाठी प्राणही देण्यात तैयार होते, असे विश्वासू लोक असताना प्रकाशला घाबरण्याचे काहीही कारण न्हवते. पण योगेश अपवाद होता.
दुसऱ्याच दिवशी, खूप लोक पोलिसांत तक्रार द्यायला आले, त्यांची माणसं घरी परतली नाहीत म्हणून. ते सर्व लोक, त्या गुंडांच्या फॅमिलीतले लोक होते. एकाच वेळेस एवढे लोक गायब झाल्याने, पोलिसही आश्चर्यात पडलेत. त्यांना समजत न्हवते की, एवढ्या लोकांना एकाच रात्री कुणी गायब केले ते? तरीही पोलीस यंत्रणा सज्ज झालीत, त्या सर्व गुंडांना शोधायला.
योगेशच्या कानावर ही बातमी पडली. न्यूज मध्ये फक्त हीच बातमी सुरू होती. चारशे लोक, आणि ती सर्व लोक गुंड, म्हणजे कुणीतरी हे मुद्दाम केलं आहे, हे सर्वांना ठाऊक होते, पण योगेशला संशय पुन्हा प्रकाशवरच येऊ लागला होता.
प्रकाश आपक्या पुढच्या कामाला लागला, आता तो, मोठी खेळी खेळणार होता! पुण्यातील सर्व कारागृहातील लोकांना संपविण्याची!
योगेश खूप सावध खेळी खेळत होता. प्रकाश त्याच्यापेक्षा खूप जास्त हुशार आहे, हे त्याला तेव्हाच कळून चुकले होते. पण तरीही योगेशला स्वतःवर विश्वास होताच की, तो नक्कीच प्रकाशाचा भांडाफोड करणार. पण त्याला, प्रकाशला हे कळू द्यायचे न्हवते की, तो प्रकाशच्या मागवर आहे म्हणून. योगेश प्रकाशच्या आधीच्याच केस वर काम करतच असताना, प्रकाशने आपले पाऊल खूप पुढे केव्हाच टाकले होते.
योगेशला कानावर बातमी पडली होती की, शहरात ह्या काही दिवसांत, खूप मर्डर होत चालले आहेत. ह्या दोन चार दिवसांत एवढे मर्डर झाले आहेत, जेवढे वर्षभरात होणार नाहीत. जरी सर्व गुंड बेपत्ता असले तरी, सर्वाना ठाऊक होते की, ते सर्व गुंड नक्कीच मरण पावले असणार. पण अचानक सर्व गुंड गायब होणे, हे अगदी प्रकाशने केलेल्या आत्तापर्यंतच्या परफेक्ट मर्डर प्रमाणेच योगेशला भासू लागले. अगदी तसेच, जसा प्रकाश लोकांना प्लॅन करून ठार करतो. पण एवढ्या लोकांना एका दिवशी खरच त्यानेच ठार केले असेल काय? ह्यावर योगेशचा प्रश्नचिन्ह उभा होतो आहे. योगेशला आता भीती वाटू लागली आहे की, प्रकाश सोबत खूप लोक जुडले तर नसणार ना? पण असे झाले तर कुणी ना कुणी पुरावा नक्कीच सोडणार, पण प्रकाश नक्कीच अश्याच माणसांना निवडणार, जी खूप एक्स्पर्ट असेल, अश्या कामांत, आणि त्याने नक्कीच आपल्या सुरक्षेची काळजी घेतली असेल, त्याने नक्कीच स्वतःला वाचवायला एखादा भारी प्लॅनिंग केलेली असावी, म्हणजे तो पुढे जाऊन पोलिसांच्या जाळ्यात फसणार नाही. पण प्रकाश हे मर्डर करून काय सिद्ध करू इच्छीतो? हे योगेशला काही समजत न्हवते. कदाचित त्याने एवढे मर्डर केले आणि पोलिसांना एकही पुरावे हाती लागले नाहीत म्हणून, तो आता निडर, निर्भीड झाला तर नसेल, त्याला सत्ता तर स्थापन करायची नसेल? किंवा असेही असे शकते की, प्रकाशने काहीही केलेले नसावे, दुसराच कुणीतरी करत असेल, असेही योगेशला वाटू लागले होते. म्हणजे मुळात तो आपला पूर्ण संशय प्रकाशवर ठेऊ शकत न्हवता. त्याला आता प्रकाशच्या वाट्याला पडायचे न्हवते, फक्त त्याच्या विरोधातील पुरावे शोधायचे होते आणि एवढे पुरावे गोळा करायचे होते की, तो पूर्णतः गुन्हेगार सिद्ध होईल. तो अजूनही मोनाने लपविलेले पुराव्यांच्या शोधात होता. पण अजूनही त्याला, तिने लपविलेले पुरावे सापडलेले न्हवते. योगेश सध्या फक्त ह्याच संशयावरून चालत होता की, नक्कीच प्रकाशच ह्या सर्व खुनामागे असावा. त्याने ही गोष्ट फक्त आपल्या सहकार्याला सांगितली. पण त्यांचा विश्वास योगेशवर आला नाही. CBI पर्यंत ही गुंडांच्या बेपत्ताची केस काही आली न्हवती, कारण त्यांचा मर्डर झालाय, की सर्व गुंडे कुठे गेलेत किंवा लपवून ठेवले आहेत, हे काही ठाऊक नाही म्हणून पोलिसांना कुठलीही एक्शन घेता येणार न्हवती, पण तरीही आधीपासूनच ह्या गुंडांच्या शोधात, CBI ची टीम लागली, कारण जर हे मर्डरच निघाले तर, त्याची पुढची तैयारी म्हणून, हळूहळू पण लपून पुरावे शोधण्याच्या कामाला CBI अधिकारी लागले होते.
प्रकाशचा, सर्व गुंडांना संपविण्याचा प्लॅन नुकताच सफल ठरला होता. शहरातील जवळपास सर्वच गुंडांचा नायनाट झाला होता, फक्त प्रकाशच्या हाताखाली काम करणाऱ्या गुंडांना सोडून. त्यांचा आता काही धोका न्हवता, कारण ते प्रकाशाच्या हाताखालचे बाहुले बनून राहिले आहेत. सद्यस्थितीत नैत्याचे दोन काम होते, एक म्हणजे लपविलेल्या गुंडांच्या एकाही बॉडीला पोलीस शोधता कामा नये ह्याची काळजी घेणे, आणि दुसरे म्हणजे, पोलिसांना एकही पुरावे सापडता कामा नये हे बघणे.
प्रकाशने, त्या सर्व गुंडांना ठार केल्याचे आणि अजूनही पोलिसांना ह्याबाबत न कळल्याचा आनंद साजरा न करता, तो पुढच्या कामाला लागला. त्याने विचार केला की, जर जेलातील कारावास भोगणार्या कैद्यांना ठार केले तर? कारण त्याच्या मते, जेलातील लोकच गुन्हेगार असतात, हे जाहीर झालेले आणि पुराव्यासाहित सापडलेले लोक असतात. हे लोक तसेही जेलातच आहेत, बाहेर पडले तरीही ते काही सुधारणारे नाहीच, उलट चांगल्या लोकांचा त्रास वाढेल ह्यांच्यामुळे, आणि आपल्या नव्या क्लीन वर्ल्डचे स्वप्न हेच सर्वात आधी धुळीस मिटवू शकतात, म्हणून प्रकाशने त्या सर्व जेलातील लोकांना ठार करण्याचा विचार केला. ह्याने गुन्हेगार सर्व ठार होतील आणि चांगल्या लोकांना सुखाने जगता येईल, असे प्रकाशचे मत होते. ह्या विचारला खान असिस्टचा ही पाठिंबा होताच.
जरी हे घाईगडबडीचे दिसत असले तरीही, प्रकाशला लवकरात लवकर त्याचे निर्णय घ्यावे लागणार होते. कारण प्रकाशलाही चांगलेच ठाऊक होते की, पोलीस नक्कीच त्याच्या मागावर लागली असणार, सोबतच योगेशचाही आत्तापर्यंत संशय आपल्यावर आलाच असेल, असे प्रकाशला वाटू लागले. लवकरात लवकर त्याचे काम करण्यामागचे कारण म्हणजे, एकदाचे वाईट लोक संपू लागली, तर चांगल्या लोकांचा विश्वास आपोआप आपल्यावर येईल, हे प्रकाशला चांगलेच ठाऊक होते. एकदाचा लोकांचा विश्वास आपल्यावर आला, तर कुठलीही शक्ती आपल्याला क्लीन वर्ल्डचा राजा बनण्यापासून थांबवू शकणार नाही, असा प्रकाशला विश्वास होता. प्रकाश आपला पुढचा प्लॅन बनविणे सुरू केले.
पुण्यातील येरवडा कारागृह, प्रकाशच्या नजरेतील पहिले युद्ध रणांगण दिसू लागले. पण त्याला येरवडा जेल सोबतच पुण्यातील सर्व लहानमोठे स्टेशन जेल मिळून, सर्व गुन्हेगारी लोकांना ठार करायचे होते. पण एकाच वेळी, असे कसे करता येईल? हाच प्रकाश पुढे प्रश्न होता. पण प्रकाश पुणे जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी, आता तो आपल्या ह्याच पोस्टचा फायदा उचलू पाहत होता.
त्याने पूर्ण प्लॅन बनविला, तो प्लॅन आपल्या सर्व माणसांना सांगून, सर्वाना कामाला लावले. प्लॅन बनविल्याच्या अगदी दुसऱ्याच दिवशी, प्रकाशने आपल्या ऑफिसमध्ये एक खूप महत्त्वाची मिटिंग म्हणून, फक्त जिल्ह्यातील पोलिसांच्या मिटिंगच्या नावाखाली, सर्व पोलिसांना आपल्या घरी बोलावून घेतले. तो त्या मिटिंग मध्ये सर्व पोलिसांना गुन्हेगारांना पकडण्याची रणनीती सांगणार होता. जिल्हाधिकारीचा ऑर्डर असल्याने, SP, DSP सहित, सर्व पोलीस प्रकाशच्या ऑफिस मध्ये हजर झाली. नवीन रणनीती सांगत असल्याने, पुण्यातील खासदारही ह्या मिटिंगला उपस्थित होते. सर्वाना वाटू लागले की, प्रकाश गुन्हेगारी थांबविण्यासाठी चांगल्या टिप्स देईल, पण प्रकाशचा प्लॅन इथूनच सुरू झाला होता.
प्रकाशची सर्व माणसे कामाला लागलीत. सर्वांचा प्लॅन बनला होता. प्लॅननुसार प्रकाशची माणसं, सेफटी किट लावून, येरवडा जेलापुढे आणि काही लोक, छोट्या मोठ्या जेलापुढे हजर झालीत. त्यांच्या हातात मोठमोठी दोन गॅस कॅन होती. एका कॅन मध्ये क्लोरीन गॅस आणि दुसऱ्या कॅन मध्ये कार्बन मोनाक्सीड. अगदी एकाच वेळी, त्या कॅन मधील दोन्ही विषेली वायू, पाईपच्या मदतीने, कारागृहाच्या परिसरात सोडण्यात आली. दोनही गॅस कारागृहात शिरू लागली, गंध जास्त येत नसला तरी, आतील लोकांना श्वास घ्यायला जरा जरा त्रास होऊ लागला होता. अगदी काही सेकंदातच, ह्या ग्यासमुळे, खूप लोकांना त्रास होऊ लागला. जास्त त्रास होऊ लागला म्हणून, आतील पोलीस कर्मचारी, कंपाउंडर बाहेर येऊ लागलेत, पण कैदी, कैद असल्याने, त्यांना बाहेर येता आले नाही. अश्यातच जसे सर्व पोलीस आणि बाकीचे कर्मचारी बाहेर आलीत, तसेच ते ग्यास, प्रकाशच्या लोकांनी जास्त प्रमाणात सोडण्यास सुरुवात केली. वायू खूप जास्त प्रमाणात आत गेल्याने, काहींचा मृत्यू क्लोरीन ग्यासने झाला, काहींचा कार्बन मोनाक्सीडने झाला, पण ह्या दोन्ही गॅसपासून वाचलेले कैदी, दोन्ही गॅसचे रीऍक्शन झालेल्या फोसजेन(phosgene) ने झाला. मुळात सर्व कैदी गुदमरून जेलातच मरण पावले. फक्त पोलीस बाहेर पडल्याने, ते बाहेर बेशुद्ध झालेत, पण ते सर्व जिवंत होते, मेले फक्त कैदी!
अगदी दहा मिनिटांच्या ह्या खेळात, जवळपास पाच हजार लोकांचा मृत्यू झाला, ते सर्व कैदी होते. ही बातमी लगेचच पोलीस अधिकाऱ्यांना मिळाली, जी सर्व प्रकाशच्या ऑफिस मध्ये होती. पण ते सर्व पोलीस कारागृहात पोहोचणार, तोपर्यंत खूप वेळ होऊन गेली होती. प्रकाशचा प्लॅन सक्सेस झाला होता. ह्या प्लॅनने झाले असे की, आता प्रकाशवर कुणीही बोट उचलू शकत न्हवता, कारण तो पोलिसांसोबतच होता, तो हे कृत्य कसे घडवू शकतो, हाच प्रश्न सर्वांच्या मनात येऊन, त्याने आपली बाजू सुरक्षित करून घेतली होती.
प्रकाशने आता आपली खेळी, म्हणजे आपले साम्राज्य वाढविण्यासाठी, आत्तापर्यंत केलेले प्लॅन, गरज वाटल्यास त्यात काही बदल करून, जवळपासच्या जिल्ह्यात, म्हणजे पश्चिमेकडील मुंबई, पूर्वेकडील अहमदनगर, उत्तरेकडील नाशिक आणि दक्षिणेकडील सातारा ह्या सर्व जिल्ह्यातील, सर्व वाईट लोकांना ठार करण्याचा प्लॅन प्रकाशने बनवून दिला. प्रकाशची सर्व माणसे त्याच्या कामाला लागलीत.
अगदी काहीच दिवसांत पुण्यात खूप मर्डर झाले होते, कदाचित पुढेही होणारच होते, मृत्यू सत्र सुरूच होते. जरी मरणारे गुन्हेगार असली, वाईट लोक असली, तरीही त्यांना मारणारा पण पोलिसांच्या दृष्टीने खूप मोठा गुन्हेगार होतो. पोलीस यंत्रणा हादरून गेली होती, एवढे मोठे प्रलय एवढी मोठी आपत्ती बघून. आता पोलिसांना कुठल्याही परिस्थितीत त्या सर्व गुन्हेगारांना पकडायचे होते, ज्यांच्या हात, ह्या सर्व खुनामागे होता. कारण पोलिसांवर खूप दबाव येऊ लागला होता, मिडियाकडून, जनतेकडून, आणि पोलिटिकल लोकांकडून. पोलिसांनी लगेचच CBI टीम सोबत हातमिळवणी केली आणि शोधमोहीम करायला सुरुवात केली.
लोकांच्या मनात खूप भीती वाढली होती, कारण रोज शेकडो लोक मारून पडत होती, त्यांना भीती वाटू लागली होती की, त्यांचा ही ह्यात नंबर लागणार तर नाही ना? प्रकाशला लोकांची ही भीती बघून, खूप वाईट वाटू लागले. प्रकाश हे सर्व चांगल्या लोकांसाठीच तर करत होता, पण तरीही लोकांच्या मनात प्रकाशच्या त्या विचारधारे बद्दलची भीती बघून, त्याला लोकांचा विश्वास जिंकण्यासाठी काहीतरी करावं लागणार होतं!
सर्व पोलीस आणि CBI अधिकारी विचार करू लागले की, एवढे खून एकट्याने केले की एखाद्या टीमने? पण ही वेळ विचार करण्याची न्हवती तर एक्शन घ्यायची होती. CBI अधिकाऱ्याने पोलिसांना सर्वात आधी, त्या गायब झालेल्या गुंडांना लवकरात लवकर शोधण्यास सांगितले आणि सोबतच त्या कारागृहातील गॅस इनसिडेन्स बद्दलही इन्वेस्टीगेशन करायला सांगितले. सर्वांना जाणून घ्यायचे होते आणि लवकरात लवकर त्या खुनीचा पत्ता लावायचा होता, त्यासाठी पूर्ण यंत्रणा काहीही करायला तैयार होती. अश्यातच योगेशने पोलिसांना एक हिंट दिली की, कदाचित हे सर्व आपला जिल्हाधिकारीच घडवत आहे असे सांगितले!
योगेशने आपला संशय सर्वांपुढे मांडला की, ह्यामागे, प्रकाशचाच हात असावा. पण प्रकाश जिल्हाधिकारी आहे, आणि तो मागील मिटिंग मध्ये पोलिसांसोबतच होता, तो पोलिसांसमोर असताना एवढ्या लोकांना ठार कसा करू शकतो? अशी सर्वांची समज. पण योगेशने समजावून सांगितले की, प्रकाशची अशी ट्रिकच आहे, पोलिसांना भोवऱ्यात टाकून, आपले मर्डर करून घेतो आणि कुणालाही ह्याची भनकही लागू देत नाही, सोबतच पुरावेही कुणाला दिसू देत नाही.
योगेशने खूप प्रयत्न केला, सर्वाना समजावून सांगण्याचा, पण कुणीही ऐकायला तैयार न्हवते. कारण एकही पुरावा प्रकाश विरोधातला सापडत न्हवता. पण योगेशने एवढे निश्चितपणे सांगितले आहे म्हणून, सर्व यंत्रणा प्रकाशवर नजर ठेवण्यास कामाला लागली. पण प्रकाशवर नजर ठेवून काहीही होणार न्हवते, त्याऐवजी त्याने केलेल्या खुनाची माहिती काढल्यास, किंवा एखाद्या डेड बॉडीला शोधून त्याद्वारे केलेल्या खुनाच्या मागे लागल्यास, कदाचित खुनी प्रकाश आहे की, कुणी दुसराच ह्यामागे आहे, हे समजू शकणार, असे योगेशचे मत होते. सर्वाना भीती होती की, असे मर्डर पुढेही होतच राहिले तर, खूप अवघड होईल, खुनीला पकडायला, पण पुढचे मर्डरचे सत्र सुरू होण्यापूर्वीच आधी केलेल्या डेड बॉडीला शोधणे खूप अनिवार्य होऊन गेले होते.
इकडे प्रकाशचे मिशन सुरूही झालेच होते. नित्याच्या हाताखालची गुंड, आणि त्या दहा गुंडांच्या हाताखाली असणारे गुंड, पुण्याजवळच्या वेगवेगळ्या जिल्ह्यात गेली. तिथे गेल्यानंतर वेगवेगळ्या गुंडांना आपल्या टीम मध्ये शामिल करून, बिनकामीच्या गुंडांचा खून करून त्यांच्या बॉडीला लपवून दिले. जे गुंड प्रकाशच्या विचारधारेत बसत नाहीत, त्यांचाही खून करण्यात आला. आता शेवटी उरलेले कामाची गुंड, वेगवेगळ्या कामाला लागली. चारही जिल्ह्यातील वाईट लोकांना ठार करण्याची जबाबदारी ह्या गुंडांवर होती. अगदी तीन ते चार दिवसांत, नाशिक, सातारा, अहमदनगर आणि मुंबईतील पूर्ण कैदी, लोकांचे पैसे खाऊन मोठे झालेली जवळपास सारेच लोक, जे क्लीन वर्ल्ड मध्ये फिट बसणार नाहीत, ती सर्व मंडळी, अश्या शेकडो लोकांना ठार करण्यात आले.
ह्या सर्व वेगवेगळ्या जिल्ह्यातील खुणांमुळे, तेथील यंत्रणा हादरून गेली. प्रकाशचे एकोन एक प्लॅन अगदी त्याच्या नियोजनाप्रमाणे होऊ लागले होते. काही प्लॅन रात्री तर काही दिवसा घडवत असल्याने, सर्व कन्फ्युज होऊन गेले होते की, प्लॅन बनला कसा आहे? आणि त्या खुनीला पकडायचे कसे? हाच सर्वांपुढे प्रश्न उपस्थित राहत होता. त्यासोबतच स्थानिक लोकांची भीती वाढत होती.
प्रकाशच्या टीम मध्ये लोक जुळू लागले होते. त्याची खूप मोठी टीम होऊन गेली. सगळे वेगवेगळी कामे, वेगवेगळ्या जिल्ह्यात राहून करू लागली होती. जवळपासच्या सर्व जिल्ह्यातील वाईट लोक तर मरण पावली, पण अजूनही प्रकाशला कमीपणा भासू लागला होती. त्याला हे खूप हळुवार होत चाललंय, असे वाटू लागले होते. त्याला भीती होती की, जर त्याच्या मनाप्रमाणे असणारे विश्व लवकर बनले नाही तर, त्याला त्या विश्वात राज करायला जास्त कालावधी मिळणार नाही, तो लवकरात लवकर तो ते विश्व बनवून स्वतःला राजा म्हणून घोषित करू पाहत होता. त्याला लोकांच्या मनात असणारी भीतीही घालवायची होती. प्रकाशला चांगलेच ठाऊक होते की, आपले राज्य स्थापित करायचे असेल तर, आपला प्रभावही वाढवावा लागेल. त्यासाठी आपले क्षेत्रही वाढवावे लागणार. प्रकाशने ऑर्डर दिले की, हे फक्त जवळपासच्याच जिल्ह्यात मर्डरचे सत्र सुरू न ठेवता, पुन्हा आपले जिल्हे वाढायला हवेत. म्हणजे आणखीन खूप लोकांना ठार करायचा प्लॅन प्रकाशच्या मनात शिजू लागला होता. फक्त त्याला, जसा जसा प्लॅन पुढे वाढत राहिला, तसतसा तो सावध खेळी खेळत राहिला म्हणजे झालं, असं होऊन गेलं होतं.
एका कचऱ्याच्या ढिगाराच्या खाली, सडलेल्या अवस्थेत असलेले, काही प्रेत आढळले. हे सर्व योगेशने केलेल्या कठोर शोधमोहीम मुळे होऊ शकले. त्या सर्व प्रेतांना फॉरेसिक लॅब मध्ये पाठविण्यात आले.
प्रकाशचे प्लॅन वेगवेगळ्या जिल्ह्यात सुरूच होते, सोबतच मृत्यूचे तांडवही सुरूच होते, पण लोकांत भीतीचेही वातावरण खूप जास्त प्रमाणात पसरू लागले होते. काही ठिकाणी लोक प्रदर्शन करत होती, त्या खुनीला लवकरात लवकर पकडण्याची, तर काही लोक त्या खुनीला घाबरून घरातून बाहेर पडत न्हवते. काहींनी तर त्या खुनीला वेगवेगळ्या प्रकारे विनंती केली, हे खुनाचे सत्र थांबवायला. सर्वत्र अशांतता पसरली होती. हे चित्र प्रकाशला बघवत न्हवते. त्याने निश्चय केला की, तो लोकांपुढे येणार आणि त्यांना नव्या विश्वाबद्दल सांगणार.
पण प्रश्न असा होता की, तो लोकांपुढे येणार कसा? आपणच हे घडवत आहोत म्हणून? हे आपण घडवीत आहोत हे माहीत झाल्यानंतर पोलीस तर काय, लोकही आपल्याला सोडणार नाही. अश्यातच त्याला एक युक्ती सुचली, लोकांपुढे येण्याची, तेही लोकांच्या नजरेत न येता... त्याने एक युट्युबवर फर्जी अकाउंट बनविले, "वीर- द किंग ऑफ क्लीन वर्ल्ड" ह्या नावाने. पण ते अकाउंट, एका मेलेल्या माणसाच्या नावाचे होते. त्यात आणखी काही फेरबदल करण्यात आले, काही कोडिंगच्या मदतीने, तर काही इल्लीगल ऍक्टिव्हिटीने, म्हणजे तो ह्या अकाउंटद्वारे पोलिसांच्या नजरेत मुळीच येऊ शकणार नाही. ते व्हिडिओ कोण आणि कुठून टाकत आहे, हे कुणालाही समजणार नाही, अशी कोडिंग करण्यात आली. त्याने त्या अकाउंटवर पहिला व्हिडीओ टाकला, "मीच तो प्रत्येक माणसाच्या खुनी, ज्यांच्यामुळे तुमचं आयुष्य खराब झालंय, तुम्हाला त्यांच्यापासून मुक्ती द्यायला मी आलोय, आणि मी येणार, तुमचे संबोधन करायला, नव्या विश्वाचे क्लीन विश्वाची खबर द्यायला, येणाऱ्या सोमवारी ह्याच युट्युब चॅनल वर! असे फक्त ऑडिओ टाकून देण्यात आले. ऑडिओ टाकायच्या वेळेस, त्या ऑडिओ मध्ये खूप फेरबदल करण्यात आले. जेणेकरून कुणालाही ह्यामागे कोणाचा आवाज आहे, हे कळणार नाही. हे ऑडिओ रूपातील, ब्लॅंक व्हिडीओ युट्युब द्वारे खूप लोकांत पसरले. लोकांना आतुरता होऊ लागली की, तो खुनी काय आणि कोणती गोष्ट सांगणार आहे? ह्या ट्रेलर व्हिडीओ मुळे, पोलीसही आणखीन सज्ज झाली.
योगेशला काही प्रेत सापडले होते, त्यांना फॉरेन्सिक लॅब मध्ये पाठविल्यानंतर, तिथून ठाऊक झाले की, हे त्याच गुंडांपैकी काही गुंड आहेत, जी गायब होती. त्यांच्या बॉडीला चेक केले असता, हे समजले की, एकाला बंदुकीने मारले आहे, दुसऱ्याला चाकूने भोकसून, तर तिसऱ्याच्या गळ्यावर दोरीचे व्रण दिसत होते. असे वेगवेगळ्या पद्धतीने त्या गुंडांना ठार मारण्यात आले, हे समजत होते. सोबतच हेही ठाऊक झाले होते की, ह्या सर्वांचे खून एकाच रात्री झाले आहे, आणि जवळजवळ एकाच वेळेला. ह्यावरून हे समजते की, एवढ्या लोकांना एकाच दिवशी एकाच वेळी ठार करणे, एका माणसाने मुळीच जमायचे नाही, तर हे मर्डर एकाच माणसाने न केले असून, ह्यात एखादी ग्रुपच आहे. म्हणजे आता सरळ प्रकाशवर संशय घेता येणार नाही, हे योगेशला समजले होते. ह्याव्यतिरिक्त त्या सर्व शवापासून एकही पुरावा सापडला नाही, आणि खूप नियोजन करून ठार केल्यासारखे भासत होते. असे मात्र सद्यस्थितीत प्रकाशच करू शकतो, हे योगेशला चांगलेच ठाऊक होते. योगेशने इन्वेस्टीगेशन पुन्हा वाढवायला सांगितले, काही लोक पुन्हा प्रेत शोधतील, तर काही लोक पुरावे शोधतील, तर काही ह्या मागे असलेल्या लोकांचा पत्ता लावणार, असे वेगवेगळी कामे योगेशने दिली, जेणेकरून लवकरात लवकर खऱ्या खुनी पर्यंत पोहोचता येईल.
योगेशला अश्यातच, मार्केट मध्ये गाजणारी एक बातमी मिळाली. बातमीनुसार, एका माणसाने, युट्युबवर एक नवीन चॅनेल बनवून, आणि त्यात एक ट्रेलर व्हिडीओ टाकून असा दावा करत आहे की, त्यानेच हे सर्व घडवून आणले आहे, आणि तो क्लीन वर्ल्ड बद्दल काहीतरी बोलत आहे. त्याच्या बोलण्यावरून जास्त काही स्पष्ट होत नाही आहे, पण त्याने दावा केलाच आहे की, त्यानेच सर्व लोकांचा खून केलाय तर, इन्वेस्टीगेशन तर होणारच. सोबतच त्याने डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिहिले होते की, त्याने पुण्यातील दत्ता भाऊ आणि त्याचे सोबतीना, कशाप्रकारे मारले आहे, ह्याबद्दलही सांगितले आहे. महत्वाचे म्हणजे दत्ता भाऊ, आणि त्याच्या सोबतींना योगेशच्या टीमने नुकतेच पकडले होते, आणि त्या पाचही लोकांचा जसा खून फॉरेन्ससिक लॅबद्वारे ठाऊक झाले, तसेच त्या व्हिडीओच्या डिक्रिप्शन मध्ये लिहिलेले होते, अगदी जसेच्या तसे... म्हणजे दत्ताभाऊला बंदुकीने मारले होते, त्याच्या देवा नावाच्या सोबतीला चाकूने खुपसले होते, आणि बाकी सर्व... जेवढ्या गुंडांच्या प्रेताला योगेशच्या टीम ने शोधले होते, अगदी तेवढ्याच लोकांचा उल्लेख अगदी बरोबर त्या व्हिडीओच्या डिस्क्रिप्शन मध्ये केलेला होता. ह्यावरून योगेशला समजले होते की, नक्कीच त्या खुनीला ठाऊक आहे की, ह्या पाच लोकांची प्रेत आमच्या हाताला लागली आहे, आणि कदाचित आताही त्या खुनीचे लक्ष आमच्यावर असेलच अशी भीती त्याला लागली होती. पण योगेशला ह्यामागे नक्कीच प्रकाशच असेल, अशीच खात्री पटू लागली होती. कारण अशी योजना त्याच्या मते प्रकाशच करू शकतो, असे त्याला वाटू लागले होते. आता त्याचे लक्ष फक्त त्या येणाऱ्या महत्वाच्या व्हिडीओ वर होते. योगेश त्या व्हिडीओच्या मदतीने ह्यामागे कोण आहे, हे समजून घेणार होता. त्याने त्या युट्युब चॅनलबद्दल माहिती काढायला सांगितली होती, जसे की, ते कुठून टाकण्यात आले, ते कोणाच्या नावावरून चॅनेल आहे? पण योगेशला ह्याचे कुठलेही उत्तर मिळाले न्हवते... फक्त त्याला हे ठाऊक होते की, ह्यामागे फक्त एकाचाच हात आहे.
प्रकाशने आपल्या काही गुंडांना, आधीच नजर ठेवायला सांगितली होती, मारून लपविलेल्या गुंडांच्या प्रेतावर. प्रकाशच्या माणसांची नजर असल्याने, त्यांना समजले की, पोलिसांनी कोणकोणत्या गुंडांच्या प्रेताला शोधून काढले आणि ती माहिती प्रकाशला देण्यात आली. प्रकाशने माहिती काढली, त्या सापडलेल्या गुंडांबद्दल आणि तीच माहिती आपल्या व्हिडीओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिहून काढली. म्हणजे आता पोलिसांनाही समजेल की, जे काम ते एवढ्या वर्षात करू शकले नाहीत, ते अगदी काहीच दिवसात, फक्त एकच माणसाने घडवून आणले आणि दुसरे म्हणजे, ते डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिहिलेले वाचून, लोक नक्कीच पोलिसांना प्रश्न करतील की, हे जे लिहिले आहे ते खरे आहे काय? पोलिसांना गुंडांची लाश मिळाल्या आहेत काय? आणि जसे लिहिले आहे, तसेच त्यांना मारले आहे काय? ह्याने लोकांना विश्वास होईल की, ह्या ह्या व्हिडीओ चॅनलचा क्रिएटरच तो खरा वीर आहे, अशी प्रकाशची प्लॅनिंग होती. आणि जसा प्रकाशने विचार केला होता, अगदी तसेच घडले. लोक पोलिसांना खरे काय ते विचारू लागली. पोलिसांना ह्याचे खरे उत्तर द्यावेच लागले.
आता वाट बघायची होती ती, प्रकाशच्या म्हणजे 'वीर ' च्या मुख्य व्हिडीओची. प्रकाशने पूर्ण प्लॅनिंग करून घेतली होती, आणि काळजीही पूर्णपणे घेतली होती की, कुठल्याही परिस्थितीत लोकांना किंवा पोलिसांना आपल्याबद्दल आत्ताच ठाऊक होता काम नये. सर्वात आधी प्रकाशला आपली एक चांगली छबी लोकांपुढे मांडायची होती. प्रकाशच्या विचारधारेला सपोर्ट करणारे लोक खूप निघतील असा विश्वास प्रकाशला होताच. तो लोकांचा हा विश्वास त्या व्हिडीओद्वारे जिंकणार होता.
प्रकाशने त्याचा नवा व्हिडीओ शूट करून घेतला होता. त्याने त्या व्हिडीओतील ऑडिओला खूप एडिट केले होते, जेणेकरून कुणालाही कळू नये की, ह्यामागे आपण आहोत म्हणून, अगदी आधीच्या ट्रेलरच्या व्हिडीओ प्रमाणे! आता त्याला लाईव्ह प्रीमिअर करायचे होते. अगदी निश्चित केलेल्या वेळेवर त्याने तो व्हिडीओ लाईव्ह आणला. त्या व्हिडीओला बघण्यासाठी लाखो लोक वाट बघत होती. त्यांना जाणून घ्यायचे होते की, कोण आहे तो वीर व तो कोणत्या क्लीन वर्ल्ड बद्दल बोलत आहे? आणि महत्वाचे म्हणजे त्याने एवढे खून का केलेत? ह्या सर्व प्रश्नांना लोकांना जाणून घ्यायचे होते. पुण्यातील तर जवळपास सर्वच लोक त्या व्हिडीओही वाट बघत होती, कारण सुरुवात तर पुण्यापासूनच झाली होती. योगेश आणि त्याची टीमही वाट बघू लागली होती, त्या व्हिडीओची.
व्हिडीओ सुरू झाला, "मी 'वीर' तुमचा खरा योद्धा! तुमचा होणारा महाराज!! मी स्वतःलाच महाराज का म्हणून घेत आहे? सांगतो ऐका! मी आधी खूप साधा सरळ मुलगा होतो. माझे संगोपन आणि संस्कारच तसे घडले होते, अगदी साधेपणाचे. कुणालाही त्रास द्यायचा नाही, बिनाकारण खोटं बोलायचे नाही चोरी नाही, वाईट वागायचे नाही, वाईट सवयी पाळायचा नाहीत, असाच होतो मी. पण जसजसा मोठा होत गेलो, मला कळू लागले की, हे साधेपणाचे वागणे ह्या जगात टिकू देणारे नाही. मला समजू लागले की, जी लोक माझ्यासोबत होती, अश्या सर्वानी मला धोखा दिलाय, सर्वच मला सोडून चाललेय, म्हणजे त्यांची कामं झाली होती माझ्याकडून, माझा फायदा उचलून झाला होता, आणि ते मला लाथ मारून सोडून गेलेत. इथूनच सुरुवात झाली नव्या विश्वच्या आयडियाची. आजच्या जगात चांगल्या लोकांना स्थान नाही, हे मला समजू लागले. वाईट लोक ह्या चांगल्या लोकांना जगू देत नाहीत. पण चांगले लोक, वाईट लोकांपेक्षा खूप पटीने जास्त आहेत, मुळात फक्त काहीच वाईट लोक, जे समाजात अशांतता पासरवितात, जे चांगल्या लोकांना त्रास देतात, त्या लोकांना जगण्याचा कुठलाही अधिकार नाही असे मलाही वाटते आणि जे मला ऐकत आहेत, आणि जे चांगले लोक आहे, त्यांनाही असेच वाटते, की वाईट लोक ह्या जगात नसायला पाहिजे. ते नसले की, आपली किती मोठी प्रगती होईल, फक्त चांगले लोक राहतील तर, गुन्हे राहणार नाही, दंगे नाहीत, अशांतता नाही, फक्त राहील चांगले जीवन, चांगला काळ, आणि उन्नती. ह्याला मी नाव दिले आहे, क्लीन वर्ल्ड!
क्लीन वर्ल्डला साधारण समजू नका. हे जेव्हापासून लागू होईल, तेव्हापासून, सर्वांचे आयुष्य सुखकर होईल, कुणालाही कुठलाही त्रास राहणार नाही, जीवनाचे खरे अर्थ समजेल. हे फक्त त्यांनाच आवडणार नाही, जे वाईट लोक ह्या व्हिडीओला बघत आहेत. ते नक्कीच हा व्हिडीओ संपल्यानंतर ह्याचा विरोध करतील. त्या सर्व विरोध करणाऱ्या लोकांवर माझे लक्ष असेल. त्यांची मी हिस्ट्री काढणार, जर ते वाईट लोक आहेत असे आढळले, तर तेही वाचणार नाहीत ह्या नव्या जगात. माझे काम खूप सोपे होईल. अगदी एक महिन्यात मी खूप लोकांना ठार केले आहे. सर्व वाईट सावकारांना, जेलातील कैदींना, गुंडांना, अशांतता पासरविणार्या लोकांना, असे शेकडो लोक माझ्या हातूनच मरण पावले आहेत. आता तुम्ही म्हणाल की, मी गुन्हा करत नाही आहे काय? तर माझे उत्तर राहील, नाही! कारण वाईट लोकांना जगण्याचा कुठलाही अधिकार नाही, असे मला वाटते. हा नियम फक्त माझ्यासाठी आहे, आता तुम्ही लोकांना मारत फिरू नका, मी म्हटलो म्हणून. ते माझ्यावर सोडून द्या! म्हणून मी स्वतःला वीर-योद्धा म्हटलो आहे ना! आणि होणारा महाराज. आता माझीच जबाबदारी आहे की, सर्व किचड, अस्वछता मीच साफ करून, तुम्हाला क्लीन वर्ल्डसह अनुभव पुरवू. जेव्हा आपले क्लीन वर्ल्ड बनेल, तेव्हा कुठलेही गुन्हे घडणार नाहीत, मी त्या गुन्ह्याला घडू देणार नाही. मग लहानश्या चोरीच्याही त्या गुन्हेगाराला मारावे लागेल. असे झाल्यास कुणीही कुठलाही गुन्हा करणारा नाही. तुम्ही, तुमच्या जवान मुली, लहान मुलं, म्हातारे, सर्वच सुरक्षित जीवन जगू शकेल. कारण ज्या प्रदेशात गुन्हे घडत नाहीत, तिथे प्रगतीही खूप वेगाने होते, असे मला वाटते, हे आपण सिद्ध करून दाखवूया..."
प्रकाशने आपल्या गोड गोड वाणी ने लोकांना आपल्या जाळ्यात फसविने सुरू केले. जवळपास अर्धा ते पाऊण तास लोकांशी बोलून, त्यांचा ब्रेन वॉश करण्याचा प्रयत्न केला. व्हिडीओ संपायच्या शेवटी, प्रकाशने लोकांना विनंती केली की, त्यांच्या आसपासच्या वाईट लोकांविषयी व्हिडीओच्या कमेंट मध्ये त्यांचे नाव आणि पत्ता लिहावा, त्या माणसाची हिस्ट्री काढून, त्याची माहिती घेणार आणि तो वाईट निघाला तर त्याला ठार करणार असे वचन दिले. लोकांना हा उपक्रम खूप आवडला. नवीन विश्वाचे स्वप्नही पसंतीस पडू लागले. लोकांनाही सुरक्षित नवे विश्व हवे होते. सर्व लोक स्वतःला, आपण चांगले आहोत, असे समजू लागले. लोकांना ज्या माणसाचा तिरस्कार होता, ज्या माणसांमुळे लोकांना त्रास होत होता, त्यांची नावे त्या व्हिडीओ च्या कमेंट मध्ये लिहू लागलेत. प्रकाश आणि त्याची माणसं, त्या लोकांची हिस्ट्री काढून, त्यांना ठार करू लागलेत.
प्रकाशच्या त्या व्हिडीओला विरोध करणारे खूप कमी लोक उरले होते. पाहिले कारण म्हणजे, लोक स्वतःला चांगले समजून घेत होते, प्रकाश चांगल्या लोकांना ठार करत नाही, आणि दुसरे कारण म्हणजे प्रकाशने व्हिडीओ मध्ये धमकी दिली होती की, जे लोक विरोध करतील त्याच्या कामाला, त्या लोकांची हिस्ट्री काढून, त्या लोकांना ठार करणार, हे ऐकून लोक सावध झालीत. ह्याचा अर्थ जवळपास सर्वाना हे नवीन विश्व हवेच होते आणि प्रकाश म्हणजे वीर ला आपला राजा बनविण्यास तैयार होते. हे नवीन विश्व मान्य फक्त त्यांनाच न्हवते, जे ह्या विचारधारेचा विरोध करत होते. त्याना हे हुकूमशाही सारखे वाटू लागले. त्या लोकांत सरकारी सर्व लोक होती, आणि शिकलेली लोकही होतीच. पण कुणाची हिम्मत न्हवती विरोध करायची, प्रकाशच्या पुढच्या कारवाई च्या भीती मुळे. पण आता पोलिसांवरच जबाबदारी होती, त्या वीर नावाच्या माणसाला शोधण्याची.
प्रकाशच्या त्या पूर्ण व्हिडीओ क्लिपला योगेशने खूप वेळेस ऐकून घेतले. एकोन एक बोललेली गोष्ट योगेशने लिहून घेतले. खूप निरक्षण केल्यानंतर, त्याचा संशय खरा ठरताना दिसला. योगेशने, आपल्या सर्व साथीदारांना हे सिद्ध करून दाखविले की, आता ज्या सर्वांचे खून झाले आहेत, आणि मोना, तिची आई, राखी ह्या सर्वानाही एकाच माणसाने मारले आहे. कारण सर्वाना मारण्याची रीत सारखीच होती आणि व्हिडीओमध्ये त्याने म्हटले होते की, तो आधी खूप साधा होता, त्याचा लोकानि गैरफायदा घेतला, तेव्हापासूनच त्याने मारण्याचे सत्र सुरू केले. योगेशला पूर्ण विश्वास होता की, आत्तापर्यंत जेवढे मर्डर झालेत, ते सर्व एकाच माणसाने केले आहेत, आणि त्यांच्यामते ह्या सर्वांच्या मागे प्रकाशच आहे. योगेशच्या बोलण्यावर जास्त विश्वास बसत न्हवता, पण मर्डर अजूनही होत आहेत आणि खूप होणार आहेत, आता पोलिसांना सूट होती की, त्यांना कुणावरही संशय घेता येईल. योगेशने सर्वाना विनंती केली की, जर आपण प्रकाशवरच लक्ष केंद्रित करून राहिलो, त्याचावरच नजर गाडून ठेवले तर, तोच गुन्हेगार आहे हे नक्कीच सिद्ध होईल अशी अपेक्षा वर्तविली.
योगेशने, प्रकाश विषयातील, आत्तापर्यंत जेवढे पुरावे गोळा केलेले होते, त्यातील काही पुरावे, आपल्या सर्व साथीदारांना दाखविले, जेणेकरून त्यांना प्रकाशवर जराशा संशय यावा, आणि आपण जे बोलत आहोत, ते त्यांना खरे वाटावे, असा त्याचा मानस होता. योगेश, प्रकाशबाबतीत एवढा सतर्क, आधीपासूनच आहे, हे लक्षात घेता, सर्व लोक योगेशने दाखविलेल्या दिशेने जायला तैयार झालेत.
योगेशचा फंडा क्लिअर होता. त्याला कुठल्याही परिस्थितीत, फक्त आणि फक्त प्रकाशवरच नजर ठेवायची होती. ह्या कारणाने, योगेशने सर्वाना आपला प्लॅन समजावून सांगितला. योगेशचा पूर्ण प्लॅन तैयार झाला, आणि त्याचे साथीदारही.
सर्वात आधी योगेशच्या टीमने, प्रकाशच्या घराबाहेर काही लोक साध्या कपड्यात तैनात ठेवली, त्याच्यावर पूर्ण चोवीस तास नजर ठेवायला. त्यानंतर एक ह्याकिंगची टीम बोलाविण्यात आली, जी प्रकाशच्या प्रत्येक उपकरणाला ह्याक करून, प्रकाशवर पूर्णपणे नजर ठेवता येईल, अशी योजना बनविली. जसे प्रकाशने कुणालाही कॉल केले तरी, इथे CBI ऑफिसमध्ये, दोघांत काय बोलणे चालू आहे, हे ऐकता येऊ शकत होते, आणि प्रकाश कुणाला म्यासेज करत आहे? एवढेच काय, तर तो मोबाईलमध्ये करत तरी काय आहे? कुणासोबत त्याचा कॉन्टॅक्ट आहे, त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये कोण कोण आहे, ह्या सर्वांची जाणकारी योगेश घेऊ इच्छित होता. प्रकाशसोबतच त्याचा असिस्टंट, खान असिस्टवरही पूर्ण नजर गाळून होते, योगेशची लोक.
हे झाली प्रकाशबद्दलची सतर्कता, आता महत्वाची म्हणजे, त्या युट्युब चॅनलवर नजर ठेवणे खूप गरजेचं वाटू लागले. कारण त्या व्हिडीओच्या कमेंट मध्ये ज्यांची ज्यांची नावे येत होती, त्यातील जवळपास अर्धी लोक गायब होऊ लागली होती. त्या चॅनेलला प्रकाशने खूप काळजीपूर्वक आणि योजनेने बनविलेले असल्यामुळे, त्या चॅनलला कुठून हँडल करत आहे, हे समजतच न्हवते, पण तरीही योगेशची एक टीम त्या चॅनल वर पूर्ण लक्ष गाडून होती, खास करून, त्या व्हिडीओच्या कमेंट बॉक्सवर. जे कुणी त्या कॅमेन्टबॉक्स मध्ये, ज्या कुणाची नावे लिहीत आहेत ना, त्या लिहीणार्या माणसाला योगेशची टीम त्याच्या इमेल अकाउंट द्वारे पकडत होती, त्यानंतर त्या लिहिलेल्या नावाच्या माणसाची विचारपूस करत होती की, तो माणूस सध्या कुठे आहे, जेणेकरून प्रकाश त्या माणसाला मारण्याआधीच योगेशची टीम त्याला वाचवू शकेल. योगेशची टीम त्या माणसाला आपल्या ऑफिस मध्ये आणून ठेवू लागलीत, म्हणजे, त्या व्हिडीओच्या कमेंट मध्ये असणारे लोक योगेशच्या ऑफिसमध्ये असले तर, प्रकाश मारणार कुणाला? तो इथे ऑफिस मध्ये येऊन तर मारू शकणार नाही, असे करण्याचा प्रयत्न जरी करेल तर सापडण्याची भीती तर होतीच, ही रिस्क प्रकाश घेणार नाही, हे योगेशला ठाऊक होते, आणि त्या कॅमेन्ट मध्ये नाव असणाऱ्या माणसांचे प्राणही वाचणार!
यासोबतच योगेशने पुन्हा एक खूप महत्त्वाची खेळी खेळली. प्रकाशच्या ऑफिस मधील, एका कर्मचाऱ्याला आपल्या कस्टडीत बोलाविले, त्याला काही पैसे देऊन, त्याला धमकावून, आपल्या टीम मध्ये शामिल केले, एक जासुस, म्हणजे गुप्तहेरच्या कामासाठी. तो योगेशला क्षणोक्षणाची खबर देईल की, प्रकाश कुठे आहे, काय करत आहे? कुठे जात आहे? कुणाकुणासोबत बोलत आहे? ह्या सर्वांची माहीती तो देणार होता. म्हणजे आता योगेश, प्रकाशच्या वाहणाऱ्या नदीचा बांध म्हणून उभा होता.
प्रकाशला ह्या योगेशच्या चालची जराही खबर न्हवती. तो आपल्या कामात व्यस्त होता. त्याची माणसंही त्यांच्या कामात व्यस्त होती. खान असिस्ट प्रकाशच्या घरून, वाईट लोकांची फाईल गोळा करत होता, आणि वाईट लोकांबद्दलची माहिती प्रकाशच्याच घरून काढू लागला होता. अशायतच, प्रकाशने ऑफिसमधून खान असिस्टला फोन लावला आणि आजच्या वाईट लोकांच्या लिस्टबद्दल विचारणा करू लागला. त्या दोघांचे बोलणे योगेश ऐकतच होता. खान असिस्ट प्रकाशला म्हणाला, आजचा दिवस तेवढा चांगला नाही, जास्त लोक सापडले नाहीत, फडशा पडायला. प्रकाशने त्याला आपल्या ऑफिस मध्ये बोलावून घेतले. प्रकाशच्या घराबाहेरही योगशची माणस त्या खान असिस्टवर नजर गाडून होती. खान असिस्टचे लक्ष त्यांच्याकडे जाताच, ते आपल्या कामात व्यस्त असल्याचे नाटक करू लागलेत.
खान असिस्ट त्यांच्याकडे लक्ष न देता, कार मध्ये बसून ऑफिस मध्ये गेला. ऑफिसमध्ये जाताच, ऑफिस मधला तो नेमलेला अधिकारी योगेशला क्षणाक्षणाची खबर देत होताच. खान असिस्ट त्याच्या केबिन मध्ये पोहोचला. पोहोचताच खान असिस्ट प्रकाशला म्हणाला की, त्याच्या घरापुढे कुणीतरी त्याच्यावर नजर ठेवल्यासारखे वाटले होते. खान असिस्टचे हे बोल ऐकताच प्रकाश चिंतेत पडला, तेवढाच सतर्क झाला. त्याने आपले लॅपटॉप खोलले, आणि तो आपल्या फाईल बघू लागला, सोबतच आपल्या लोपटॉपवर कोणकोणते सर्व्हर जुडत आहेत, किती पेलोड उचलत आहे आणि बायनरी कोडिंग मध्ये काही फेरबदल तर नाही झाली ना? हे चेक करू लागला. अश्यातच त्याला समजले की, नक्कीच कुणीतरी त्याचे लॅपटॉप हॅक केले असावे, कारण त्याच्या लॅपटॉप वर एक अन्नोन सर्व्हर सोबत फाईल रिडायरिंग होताना दिसत होत्या आणि लॅपटॉपच्या काही पध्द्ती बदललेल्या दिसू लागल्या होत्या. मुळात प्रकाशच हॅकिंग मध्ये एक्स्पर्ट झाला होता, तर त्याला हे तर नक्कीच समजू शकत होते की, त्याचा लॅपटॉप हॅक झालाय की नाही तर!
प्रकाशला कळून चुकले की, त्याच्यावर कुणीतरी नक्कीच नजर गाडून उभे आहे ते. त्याने लगेच खान असिस्टला त्याचा मोबाईल बंद करायला सांगितले, सोबतच त्यानेही आपला मोबाईल बंद केला. त्याने खान असिस्टला सांगितले की, त्यांच्यावर कुणीतरी खरच नजर ठेवून बसला असेल. म्हणून सिक्युरिटी साठी काही काळासाठी मोबाईल बंदच ठेवायला सांगितले. त्याच ऑफिसमधल्या एका खालच्या कर्मचाऱ्याला त्याचा मोबाईल मागितला, एक फोन कॉल करायला. त्याचा मोबाईल घेऊन, प्रकाशने नैत्याला फोन लावला. त्याला विचारले की, त्याचे काम कसे सुरू आहे ते, कारण युट्युबच्या कमेंट मधील लोकांनी लिहिलेल्या वाईट माणसांच्या लोकांना ठार करण्याची जबाबदारी नैत्या आणि त्याच्या खाली काम करणाऱ्या गुंडांची होती. नैत्या त्याच्या ऑफिसमधूनच ते युट्युब अकाउंट चालवीत होता. नैत्याने सांगितले की, त्याने एक लिस्ट बनविली आहे, लोकांना ठार करण्याची, त्या कामासाठीच काही गुंड, त्यांच्या घरी गेली आहेत, त्यांना ठार करायला. प्रकाशने लगेच ते प्लॅन कॅन्सल करायला सांगितले. पण नैत्याने स्पष्ट केले की, आता ते काम थांबू शकणार नाही, कारण जी गुंड त्यांना ठार करायसाठी गेली आहे, त्यांनी सोबत कुठलाही मोबाईल नेलेला नाही, त्यांच्यासोबत कुठलाही कॉन्टॅक्ट सद्यस्थितीत करता येणार नाही, हे स्पष्ट केले. हे ऐकून प्रकाशची चिंता आणखीनच वाढली, कारण कुणीतरी आपल्यावर नजर ठेवून आहे म्हणजे, तो आपल्याला चारही दिशेने घेरण्याची प्लॅनिंग नक्कीच केली असेल. प्रकाशने नैत्याला सांगितले की, ह्यापुढे काही दिवस आपले काम बंद करावे लागणार आहेत, कारण कुणीतरी नजर ठेवून आहे, आणि जर ती गुंड त्यांना मारून परतली नाही, तर त्यांनाही ठार करायचा ऑर्डर प्रकाशने दिला.
नैत्याची ती चार पाच गुंड, लोकांना ठार करण्यासाठी, त्यांच्या घरी गेलीत, जी लिस्ट नैत्याने त्या युट्युब कमेंट बॉक्स मधून काढून दिली होती. पण ती माणसं, योगेशच्या कस्टडीत होती आणि त्यांच्या घरी पोलीस होती. ती गुंड घरी शिरताच, त्यां सर्व गुंडांना पोलिसांद्वारे पकडून योगेश कडे आणण्यात आले. त्या गुंडांना योगेशच्या कस्टडीमध्ये बेदम मारण्यात आले, जेणेकरून ते लोक कुणासाठी काम करत आहेत, हे जाणून घेता येऊ शकेल, पण त्या गुंडांनाही ठाऊक न्हवते की, त्यांचा बॉस कोण आहे ते. त्यांना वाटत होते की, त्यांचा बॉस तर ती गुंड आहेत, जी ह्यांना कॅट्रोल करत आहेत.
नैत्याने आपल्या गुंडांना ऑर्डर दिला, त्या पोलिसांना सापडलेल्या सर्व गुंडांना ठार करण्याचा. त्या गुंडांना ठार करण्याचा प्लॅन सुद्धा नैत्यानेच बनविला. नैत्याने, आपल्याच एका माणसाच्या आकाउंटने आपल्याच दुसऱ्या माणसाचे नाव, त्या व्हिडीओच्या कॅमेन्टमध्ये लिहिले, आणि त्याला अर्जेंट मारावे, असेही लिहिले. कॅमेन्ट मध्ये नवीन नाव आल्याने, योगेश पुन्हा सतर्क झाला. योगेशने काही पोलिसांना, त्या नाव लिहिलेल्या माणसाचा पत्ता शोधण्यास सांगितले आणि, त्या नावाच्या व्यक्तीला सुरक्षेसाठी आपल्या कस्टडीत आणण्यास सांगितले. योगेशच्या बोलण्यावरून, पोलीस त्या माणसाच्या घरी गेली, ज्या माणसाच्या मोबाईल वरून नाव लिहिण्यात आले होते, आणि त्याच्याकडून त्या नावाच्या माणसाचा पत्ता मागितला, आणि त्याच्या घरी गेलेत, आणि त्या नावाच्या माणसाला आपल्यासोबत घेऊन गेलेत. पोलिसांना वाटले की, तो सोबत येत असलेला माणूस साधारण माणूस असेल, पण तो नैत्याचा माणूस होता. तो कस्टडीत येताच, संधी बघून, त्याने आपल्या अंडरव्हीअर मध्ये लपविलेली पिस्तूल काढली, आणि त्या अरेस्ट केलेल्या सर्व गुंडाला मारून टाकले. ह्या स्थितीत, सर्व आपापल्या कामात व्यस्त असल्याने, ह्याचा फायदा घेत, त्याने सर्व लोकांना ठार केले, जसे पोलीस त्याला अरेस्ट करायला आली, एवढ्यातच तो बंदुकीचा धाक दाखवून, तिथून पडून जाण्याचा प्रयत्न करू लागला, तो जवळपास पळून जाण्यास सफल ठरलाच होता, पण एवढ्यात नैत्याने आपला काही माणसाला, त्या CBI ऑफिसपुढे कारने पाठविले, त्याला ठार करायला. तो बंदुकीचा धाक दाखवून पळून सुटलाच होता, आणि त्याला नैत्याने सांगितले होते की, एक त्यांची कार त्याला घ्यायला येणार, पण त्याला काय ठाऊक होते की, नैत्याने वेगळीच प्लॅनिंग केली होती म्हणून. त्या कार मधल्या एका त्याच्याच सोबतीने, त्या पळून सुटलेल्या आपल्याच माणसाला बंदुकीने ठार केले, आणि कार वेगात घेऊन पळून गेले. नैत्याचा प्लॅन सक्सेस झाला होता.
नैत्याने पोलिसांना सापडलेल्या आपल्याच लोकांना ठार कण्यासाठी आपल्या एका माणसाला तिथे पाठविले, आणि त्याने काम केल्याचे निश्चित होताच त्यालाही ठार केले. असे करण्याचे कारण म्हणजे, तो जरी बंदुकीचा धाक दाखवून पळून आला असला तरी, त्याला पोलीस नक्कीच पकडू शकणार होती, जरी पकडली नाही तरी, पोलिसांना त्याचा चेहरा चांगलाच ठाऊक झाला होता. पुढील खबरदारी म्हणून, त्यालाही ठार केले. CBI ऑफिसमध्येच एवढी मोठी घटना घडल्याचे बघून, पूर्ण यंत्रणा पुन्हा एकदा हादरून गेली होती. ह्या घटनेनंतर, योगेशने पुन्हा खूप जास्त प्रमाणात सतर्कता घ्यायला सांगितली, सोबतच ह्यापुढे एकही खून होतां कामा नये, ह्यासाठी त्या व्हिडीओवर आणि प्रकाशच्या गतीविधीवर खूप जास्त लक्ष्य देण्यास सांगितले. योगेशला ठाऊक झाले की, प्रकाशला आपण त्याच्यावर लक्ष देत असल्याची चाहूल लागली आहे म्हणून, त्याने फोन व लॅपटॉप बंद केले आहे म्हणून.
प्रकाशला चांगलेच ठाऊक होते की, त्याच्यावर नजर ठेवणारा दुसरा तिसरा कुणीच नाही, तर योगेशच असावा. कारण प्रकाशला स्वतःवर खूप विश्वास होता की, त्याने केलेल्या प्लॅन मध्ये तो कुठेच चुकु शकत नाही, चूक फक्त योगेशच काढू शकतो. आता प्रकाशला आपले काम काही दिवसांसाठी थांबवावे लागणार होते, योगेशचा ह्या मोठ्या खेळीमुळे. काही काळ शांत राहणेच महत्वाचे होऊन गेले होते. पण प्रकाशला लोकांच्या प्रतिक्रिया जाणवू लागला होत्या. लोकांना हे नवीन विश्वाचे स्वप्न आवडू लागले होते. सर्वत्र वादविवाद होऊ लागले होते की, हे नवीन विश्व चांगले की, आधीचे विश्व चांगले? लोक नवीन विश्वच चांगले असल्याची बाजू मांडू लागली होती. जे आधीचे विश्व चांगले म्हणत होती, त्यांचे मन परिवर्तन करण्याचे काम, ही नवीन विश्वाला आणि प्रकाशला म्हणजे वीरला पुढचे भविष्य मानणारी लोकच करून देत होती. आणि ह्या नवीन विश्वात अश्या खूप चांगल्या गोष्टी लोकांना दिसत होत्या की, ज्याने जीवन खूप सोईस्कर आणि चांगले होईल.
टीव्ही चॅनल वर, न्यूज मध्ये पेपर मध्ये डिबेट होऊ लागले, ह्या बद्दल. सर्वाना नवीन विश्वच चांगले वाटू लागले होते. जे ह्याचा विरोध करत होती, त्यांची नावे, त्या व्हिडीओच्या कॅमेन्टमध्ये लिहीत होती. स्वतःचे प्राण त्या वीर पासून वाचविण्यासाठी, लोक विरोधही खूप कमी करत होती.
हा मुद्दा एवढा चिघडला होता की, आता तो पोलिटिकल मॅटर बनला होता. आणि येणाऱ्या महाराष्ट्रच्या विधानसभा इलेक्शन साठी, पुणे जिल्ह्याच्या खासदार पदसाठी दोन पार्टी आटापिटा करत होती. महत्वाचा मुद्दा म्हणजे, मुख्य व महत्वाच्या पार्टी, आघाडीवर होत्या, त्यांचे लीडर प्रकाशच्या सोबत, व दुसरा लीडर प्रकाशच्या विरुद्ध होते. जो सध्याचा खासदार आहे, तो प्रकाशच्या विचारधारेला पाठिंबा देणारा होता, तर दुसऱ्या पार्टीचा उमेदवार प्रकाशच्या विचारधारेला विरोध करणारा. दोन्ही पार्टी आपापल्या प्रचारात जीव ओतून टाकत होती. दोघांनाही हे येणारे इलेक्शन जिंकायचेच होते. खुप लोकांचा विश्वास होता की,सध्या असलेला खासदारच पुन्हा एकदा निवडून येईल, जो प्रकाशच्या विचारधारेला सपोर्ट करत होता. प्रकाशला ठाऊक होते की, जर खासदार हा बनला, तर प्रकाशचे काम खूप सोपे होऊन जाईल. योगेशला काहीही करता येणार नाही. त्या खासदार सोबत मिटिंग घेऊन, त्यांना पुन्हा नव्या विश्वाबद्दल स्तुती केली तर, ते आपल्याला नक्कीच प्रोटेक्शन देतील, असा प्रकाशला विश्वास होता.
योगेशलाही भीती होती की, चालू खासदारच पुन्हा एकदा खासदार बनला तर, प्रकाशची फाईल क्लोज करून, तो जे करत आहे, त्यालाच आत्मसात करून घ्यावे लागेल. कारण पोलिटिकल प्रेशर पासून कुणीही वाचू शकणार नाही, हे योगेशला ठाऊकच होते.
योगेश असाच विचार करत असताना, प्रकाशच्या त्या व्हिडीओचे कॅमेन्ट वाचत असतानाच एक खूप महत्त्वाची गोष्ट आठविली. ती म्हणजे, मोनाने लपविलेला, तिने गोळा केलेल्या पुराव्याबद्दल. योगेशला चांगलेच ठाऊक होते की, मोनाचाही एक युट्युब चॅनेल होता, त्यात ती व्लॉगचे व्हिडीओ आणि मौज करतानाचे व्हिडीओ पोस्ट करत होती, आणि योगेशला तिच्या युट्युब चॅनलचा पासवर्डही ठाऊक होता. आणि मोनाने लपविलेला पुराव्याबद्दल सांगताना खास म्हटले होते की, 'योगेशला ठाऊक आहे की, तो पुरावा कुठे लपविला असेल!' आणि योगेशला मोनाचा युट्युब पासवर्ड ठाऊक होताच, कदाचित तिला हेच सांगायचे असेल. तो तिचे युट्युब चॅनल उघडू लागला.
योगेशला समजले की, मोनाने तिचे शेवटचे व्हिडीओ, नक्कीच तिच्या युट्युब चॅनलवर अपलोड केलेले असावे. योगेशला तिच्या त्या अकाउंटचा पासवर्ड ठाऊकच असल्याने, त्याने पटकन तिचे अकाउंट ओपन केले. तिचे अकाउंट ओपन होताच, त्याने 'माय चॅनलवर' क्लिक केले. मोना ज्या दिवशी गायब झाली होती, त्याच रात्री, मोनाने एक व्हिडिओ अपलोड केलेले योगेशला दिसले. ते व्हिडीओ प्रायव्हेट केलेले होते. त्याला समजले की, नक्कीच हेच ते व्हिडीओ असावे, मोना ज्या व्हिडीओबद्दल बोलत होती. त्याने लगेच तो व्हिडीओ चालू केले.
मोनाने तो व्हिडिओ तिच्या मोबाईलनेच शूट केला होता. मोनाने व्हिडिओच्या सुरुवातीलाच म्हणाली, "आशा करते की, हा व्हिडीओ तूच बघत असशील योगेश! केव्हा बघत आहेस, हे तर ठाऊक नाही, पण जर अजूनही प्रकाशला कारावास झाला नसेल तर हा व्हिडीओ त्याला जेलात नक्कीच टाकू शकेल. तुला ठाऊकच आहे की, मला लीप रिडींग, म्हणजे ओठांकडे बघून, पुढचा माणूस काय बोलत आहे, हे मला समजू शकते, त्याचा प्रत्यक्ष आवाज न ऐकता. मी तुला एक व्हिडिओ क्लिप दाखविते. (मोनाने, प्रकाश आणि तिच्या आईसोबत झालेल्या संभाषणाची CCTV व्हिडीओ क्लिप चालू केली. व्हिडिओमध्ये तिची आई ओठ हलवीत होती, आणि मोना तिच्या ओठाप्रमाणे बोलत होती, म्हणजे ती काय बोलत असावी, हे सांगत होती. त्यावरून हे समजत होते की, प्रकाशने कुणाचा तरी खून केलाय.) (व्हिडीओ संपल्यानंतर)... हे बघ योगेश, ह्यावरून सिद्ध होते की, प्रकाशने कुणाचातरी खून केलाय, पण पूर्णपणे सिद्ध होत नाही, पण माझ्याकडे असे एक पुरावे आहे, ज्याद्वारे हे पूर्णपणे सिद्ध होईल की, प्रकाशने किती भयानक प्लॅनिंग केली होती, राखी आणि माझ्या आईला ठार करायला..."
मोनाने प्रकाशचा कंम्प्युटर चालू केला. ज्याचे ओपनिंग पासवर्ड I HATE RAKHI असे होते. मोनाला सुरुवातीला वाटत न्हवते की, प्रकाशला कॉम्पुटर बद्दल काही ठाऊक असेलही म्हणून, पण योगायोगाने शोधाशोध करत असताना कम्प्युटर वर बसने, आणि हे पासवर्ड अगदी बरोबर निघणे, आणि कॉम्पुटर ओपन होणे, हे तिच्यासाठी सुदैवाची गोष्ट ठरली. ओपन होताच, तिला दिसले होते की, प्रकाशने, त्याच्या कॉम्पुटर मध्ये खूप साऱ्या फाईल्स बनवून ठेवल्या होत्या. ज्या व्हिडीओच्या आणि एडिटिंग केलेल्या CCTV कॅमेराच्या रेकॉर्डस् होत्या. त्या एक एक मोना आपल्या व्हिडीओ मध्ये दाखवू लागली, जे योगेश आता बघत आहे. प्रकाशने कशाप्रकारे, कॅमेराची छेडछाड केली, व्हिडीओला कसे एडिट केले, एवढेच काय, जेव्हा त्या रात्री त्याच्या आईच्या खोलीत शिरला होता, तिला ठार करायला, त्या व्हिडीओला कसे एडिट केले, त्याला कसे क्रॉप केले, आणि आत जाण्यापूर्वी तिची आई जिवंत दिसत होती, मग दार बंद झाले, पण दार खुलले असता, ती बेडवर पडलेली दिसत होती. ह्यासोबतच, राखीच्या घराबाहेरील कॅमेरासोबतही छेडखणी करतानाचे काही व्हिडीओ होते. त्या कॉम्पुटर मध्ये वर्ल्ड डॉक्यूमेन्ट मध्ये, प्रकाशने आपला कच्चा आढावा लिहिलेला होता, की तो कशाप्रकारे काम करत आहे, आणि कसा पुढे करायला पाहिजे. एवढेच काय, त्याच्या कॉम्पुटर मध्ये गैर असलेले हॅकिंग सॉफ्टवेअरही होते. हे सर्व मोनाने त्या व्हिडीओमध्ये दाखविले आणि योगेशला म्हणाली, हे सर्व पुरावे पुरेसे आहेत असे मला वाटते, कारण एव्हढ्यावरून हे तर नक्कीच समजते की, प्रकाश आता साधा सुद्धा मुलगा राहिलेला नाही आणि पुढे काय काय करणार आहे, हे फक्त त्यालाच ठाऊक आहे. जर अजूनही त्याला कारावास झालेला नसेल तर त्याला पटकन जेलात टाक योगेश, तू नक्कीच त्याला शिक्षा देऊ शकतोस! आणि ह्या व्हिडीओ द्वारे हेही सांगू इच्छिते की, जर ह्यानंतर माझा ही मृत्यू झाला, किंवा मी ह्यानंतर गायब झाली, तर ह्याचा पूर्ण संशय आणि करता-धरता प्रकाशच असणार. मला वाटत नाही की अशी वेळ येणार की, प्रकाश मला ठार करेल म्हणून, कारण त्या आधीच मी तुझ्याजवळ पूर्ण पुरावे, म्हणजे त्याच्या तोंडून पूर्ण सत्य उघड केलेले पुरावे घेऊन तुझ्याजवळच येत आहे, पण चुकून मी परतली नाही, तर हे सर्व प्रकाशनेच केले असावे असे समज! ओके बाय सी यु सून, इफ पोसीबील!!"
योगेशच्या डोळ्यात पाणी होते, आणि मनात प्रकाश बद्दलचा राग. तो आता हे पूर्ण पुरावे पोलिसांत दाखवून, प्रकाशला नक्कीच कारागृहात टाकू शकत होता, पण त्याने असे केले नाही, कारण प्रकाशने फक्त राखीच, मोना आणि मोनाची आईलाच ठार केले नाही, तर त्यानेच आतापर्यंत गायब झालेल्या लोकांना आणि आताही सुरू असलेल्या मृत्यू सत्राला प्रकाशच जबाबदार आहे, हेही सिद्ध करायचा त्याचा प्लॅन होता आणि त्याला सर्वात मोठा गुन्हेगार करार देऊन, त्याला लगेच फाशीची शिक्षा देऊ इच्छित होता. योगेशने ते मोनाचे पुरावे आपल्याजवळ ठेवले. योगेशला आता फक्त असा एखादी पुरावा हवा होता, ज्यात हे समजू शकेल की, प्रकाशच हे सर्व घडवीत आहे, मग ते पुरावे फक्त एकाच सोर्स मधून आले तरी चालेल.
निवडणूक अगदी तोंडावर आलेली होती. सर्वत्र त्याच्याच गोष्टी आणि त्याच्याच चर्चा सुरू होत्या. सध्यास्थितीचा खासदारच पुन्हा एकदा निवडून येईल, असा लोकांच्या तर्क होता. असे झाले तर प्रकाशचे फायदेच फायदे होईल. पण अगदी मतनोंदनीचाच दिवशी, लोकांत हा भ्रम कुठून आला कुणास ठाऊक की, जर आधीचाच खासदार पुन्हा एकदा निवडून आले, तर पूर्ण जिल्हा जणू हुकूमशाही सारखीच अवस्था बनून जाईल, कारण हा खासदार प्रकाशच्या म्हणजे, वीरचे खूप समर्थन करतो. आणि तसेही सध्या वीर चे काम झालेच आहे, जवळपास सर्वच वाईट लोकांना त्याने ठार केले आहे, आता त्याची काही काळासाठी गरज नाही, असेही लोकांना वाटू लागले. लोकांच्या मनात भीती होती की, जर वीरला डोक्यावर चढवून घेतले तर तो आपल्याला गुलामही बनवू शकतो. हे लोकशाही असलेल्या देशासाठी मारक आहे, जरी वीरचा उद्देश चांगला असला तरीही. ह्या विचारधारा मुळे, लोकांचा कल, त्या दुसऱ्याच पार्टीच्या उमेदवाराकडे जाऊ लागले. ऐन वेळेवर लोकांच्या विचारात परिवर्तन आल्याने, खूप लोक, ह्या नव्या उमेदवाराला मत देऊ लागलीत, जो प्रकाशच्या विचारधाराचा तिरस्कार करत होता.
मतदान उरकले. काहीच दिवसांत, मतमोजणी झाली. निकाल सर्वाना अचंबित करण्यासारखे आले. नवीन उमेदवार जिंकून आला होता. म्हणजे आता प्रकाशची वाट लागणार हे निश्चित झाले.
ह्या मागे पूर्ण हात, योगेशचा होता. त्याने व त्याच्या टीमने लोकांच्या कानात भरले होते की, आधीच्या खासदारात असे काहीही उरले नाही, त्याने कुठलेही काम केले नाहीत, आता पुढेही वीर सोबत मिळून हुकूमशाही गाजविणार! ही गोष्ट खूप लोकांत पसरल्याने आणि तो नवा उमेदवाराने हीच गोष्ट वारंवार आपल्या प्रचारात सांगितले होते, म्हणून लोकांनाही हे पटू लागले होते. ह्या सर्वांचा परिणाम निवडणूक मध्ये झाला, ऐन वेळेवर!
प्रकाशला आणि त्याच्या टीमला खूप मोठा धक्का बसला. सोबतच त्यांचे काम, जणू ठप्प पडण्याच्या मार्गावरच आले होते. आता नवीन खासदार शपथ ग्रहण करणार, नवा खासदार, प्रकाशच्या विरुद्ध आहे, म्हणजे प्रकाशला आता ते क्लीन वर्ल्डचे स्वप्न थांबवावेच लागणार होते. प्रकाशने आपल्या सर्व लोकांना ऑर्डर दिला की, आता काही महिन्यांसाठी तरी, आपले हे काम थांबवावे लागेल. म्हणजे आता प्रकाशचे काम थांबले होते, पण उमंग नावाच्या नवीन खासदाराचे काम सुरू झाले होते.
योगेशने नवीन खासदार म्हणजेच उमंगची भेट घेतली होती, सोबतच आभार प्रकटही केला होता. योगेशने त्याच्यासोबत मिळून, हे स्पष्ट केले की, ह्यापुढे वीर नावाच्या माणसाचा प्रभाव,खूप वेगात कमी करायचा प्रयत्न सर्वात आधी करावा लागेल. सोबतच लोकांच्या मनात, वीर नावाच्या खुनीबद्दलची सद्भावना पूर्णता कमी करायला हवी. लोकांना समजावून सांगावे लागले की, तो फक्त एक खुनी आहे बाकी काही नाही, आणि तो ज्या क्लीन वर्ल्डचे स्वप्न रंगवीत आहे, ते सत्यात उतरणे कधीच जमणार नाही, कारण समाजात एक ना एक वाईट माणूस असतोच, त्यामुळे, सर्वाना ठार करून, जग चालू शकणार नाही, असे आपले मत नवीन खासदारापुढे मांडले. उमंगला, ह्यामागे आपला जिल्हाधिकारीच असू शकतो, असा आपला संशय त्याच्यापुढे मांडलाच नाही. फक्त त्याला थांबवायची आणि त्याला पकडायची गोष्ट केली, सोबतच ह्याला कश्याप्रकारे थांबविता येईल, ह्याचा एक प्लॅन बनविला.
प्रकाशचे मिशन थांबलेच होते, पण योगेश आणि उमंगचे प्लॅन सुरू झाले होते. दोघांनी मिळून खूप भयंकर प्लॅन बनविला होता. सत्तेत येताच, उमंगने, पूर्ण ठिकाणी, ठिकठिकाणी, जागोजागी, पोलीस सुरक्षा सोबतच CCTV कॅमेरा, ड्रोन्स आणि छोटमोठे गुप्तहेर, लावून ठेवले होते, म्हणजे प्रकाशला ह्यापुढे कुठलेही खून करता येणार नाही. योगेशने तसेही प्रकाशवर नजर ठेवायसाठी आपली माणसं आधीपासूनच ठेवली होती, पुन्हा त्याच्यावर नजर गाडून ठेवण्यासाठी आणखीन काही माणसं लावून ठेवली होती. म्हणजे प्रकाशचे आता एकही पाऊल टाकणे म्हणजे, योगेश आणि उमंगच्या नजरेत पडणे, असेच होऊन गेले होते.
प्रकाशला समजत न्हवते की, आता त्याने काय करावे? कारण त्याला ह्याबद्दलची पूर्ण माहिती मिळालेली होती. म्हणून, तो कुठलेली पाऊल उचलत न्हवता. पण तो आतून खूप कासावीस होऊ लागला होता. त्याने काही सप्ताहापासून, एकही मर्डर केलेले न्हवते. त्यामुळे तो कुणालातरी ठार करायला, वेड्यासारखे वागू लागला, कारण त्याने लोकांत जेवढे मोठे नाव कमवीले होते, त्या नावाला,एवढ्या सहजासहजी गमावून बसवायचे न्हवतेच. लोकांच्या डोक्यात आपले घर करण्यासाठी, नेहमीच मर्डर करावे लागणार, असे त्याचे मत होते. जर असेच सुरू राहील तर, पुढील पाच वर्षे प्रकाशला काहीही करता येणार न्हवते, कारण खासदाराचा कार्यकाळ पाच वर्षांचा असतो आणि पाच वर्ष पर्यंत वाट बघणे, प्रकाशला जमायचे न्हवतेच. प्रकाशला वाटू लागले की, नव्या खासदाराला ठार करावे, पण असे जमणार नाही, हे त्याला चांगलेच ठाऊक होते, कारण उमंग वाईट माणूस न्हवता, तो खूप निष्ठावान आणि समाज कल्याणी माणूस आहे आणि अश्या माणसाला ठार केले आणि लोकांना ठाऊक झाले तर आपल्याविषयी म्हणजेच वीर विषयी लोकांच्या मनात राग येईल, हे प्रकाशला नको होते. आणि लोकांना चांगलेच ठाऊक आहे की, वीरच्या विरोधातील माणूस जिंकून आलाय, म्हणजे नव्या खासदाराला काही झाले तरी त्याचा संशय वीर वरच येईल.
महाराष्ट्रातील खासदार सर्वच निवडल्या गेले होते, पण अजूनही मुख्यमंत्रीची निवळ झाली न्हवती. कारण तीन पार्टी मध्ये, जवळजवळ समान मत प्राप्त झाल्याने, पक्ष विजयीसाठी, गाठबांधन शिवाय दुसरा कुठलाही पर्याय न्हवता. पण तीनही पार्टीचे अध्यक्ष एकमेकांचे वैरी होते. गाठबांधन जुळत न्हवते. जर लवकरात लवकर गाठबांधनी झाली नाही तर, महाराष्ट्राची सत्ता, केंद्रात जाईल.
खरतंर आधीच्याच मुख्यमंत्रीला पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपद हवे आहे, पण त्यासाठी गाठबांधणी करणे गरजेचे आहे, मुख्यमंत्री पद मी सांभाडणार आणि उपमुख्यामंत्री तुमच्या पार्टीचा, असे जुन्या मुख्यमंत्रीची अट होती, पण हे विरुद्ध पार्टीला जराही मान्य न्हवते. म्हणून अजूनही मुख्यमंत्री कोण बनणार, हे गुलदस्त्यात होते.
प्रकाशला आधीचाच मुख्यमंत्री हवा होता. कारण प्रकाश सोबत एक दोन वेळेस त्यांची भेट झाली होती. जर आधीचाच मुख्यमंत्री पुन्हा एकदा सत्तेत आला तर, प्रकाशचा खूप फायदा होता. कारण त्यांच्यासोबतच चांगले संबंधचा फायदा, प्रकाशला त्याचे प्लॅन पुन्हा एकदा सुरू करण्याची एक नवीन आशा होती. कारण मुख्यमंत्री पुढे, योगेशच काय? नव खासदारही काही करू शकणार नाही, हे प्रकाशला ठाऊक होते. मुख्यमंत्रीला आपल्या पक्षात करून, सद्यस्थितीत योगेश आणि नवीन खासदार उमंग ने जे काही आपल्याला पकडायला केले आहे, ते सर्व बंद करून, पुन्हा आपले लोकांना मारायचे प्लॅन सुरू करण्यास प्रकाश उत्सुक होता. प्रकाश कडे आता हीच एक शेवटची आशा दिसत होती. तो प्रार्थना करत होता की, आधीचाच मुख्यमंत्री पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणून निवडून यावे.
पण इथेही प्रकाशने नशीब नेहमीप्रमाणे साथ दिले नाही. मुख्यमंत्री दुसऱ्याच पक्षाचा आला, त्या दुसऱ्या पक्षाने तिसऱ्या पक्षाशी गाठबांधन केली आणि अर्ध्या अर्ध्या कालावधी साठी मुख्यमंत्रीचा कार्यकाळ संभाडण्याचे निश्चित केले. प्रकाशचे स्वप्न धुळीस मिटले.
नवीन मुख्यमंत्री साठी, समाजकल्याण करणारा, एक साधारण माणूस म्हणून, राजाराम नावाचा मुख्यमंत्री, पहिल्या अडीच वर्षासाठी बनला. खरंतर राजारामची मुलगीच आपल्या वडिलांना इथपर्यंत पोहोचविण्यास मदत केली होती. जरी तिचे वडील मुख्यमंत्री बनले असले तरी, पूर्ण हाथभार तीच लावणार होती. तिचे नाव होते, 'ज्योती'. ती आपल्या वडिलांच्या शपथविधी साठी आली होती.
प्रकाश आपल्या टीव्हीवरच शपथविधी चा कार्यक्रम बघत होता. एवढ्यातच राजाराम म्हणजेच नवीन मुख्यमंत्रीची मुलगी त्यांच्या जवळ दिसली, तिला बघताच तो आश्चर्याने साप चावल्याल्याप्रमाणे, तोंड मोठे करून, त्याची बोलती बंद झाली. त्याला घाम फुटू लागला. खान असिस्ट ने विचारले की, काय झाले? ह्यावर प्रकाश म्हणाला, "ही तर राखी होय! जिला सर्वात आधी ठार केले होते! पण ही जिवंत कशी?"
प्रकाश पूर्णत: हरलाच होता. त्याच्या मताने चालणारा खासदारही निवडून आलेले न्हवता आणि त्याच्या ओळखीचा आणि कामाचा मुख्यमंत्रीही राहिलेला न्हवता. नवीन खासदार आणि मुख्यमंत्री आल्याने, प्रकाशचे काम पूर्णतः बंद पडण्याच्या मागावर आले होते. आता त्याच्यावरच पूर्ण संकट येणार आहे, हे त्याला कळून चुकले होते. पण अश्यातच मुख्यमंत्रीची शपथविधीचा कार्यक्रम सुरू असताना, नवीन मुख्यमंत्रीच्या बाजूला एक मुलगी दिसत होती. प्रकाशला ती हुबेहूब राखी सारखी बसत होती. पण राखी तर जिवंत नाही, प्रकाशने तिला ठार केले, पण प्रकाशच्या आधी सचिननेही तिला ठार केले होते, एवढे असताना सुद्धा राखी जिवंत कशी? हाच प्रश्न प्रकाशला पडू लागला होता. प्रकाशच्या बाजूला असलेला खान असिस्ट प्रकाशची समजूत काढू लागला की, ही ती नसणारच, कदाचित तिच्यासारखी दिसणारी एखादी मुलगी असेल. पण प्रकाशला हे मान्यच न्हवते की, ती दुसरी असू शकते, कारण ती फक्त हुबेहूबच दिसतच न्हवती, पण तिचे हावभाव, उभी राहण्याची पद्धत, चेहऱ्याचे एक्सप्रेशन, एवढेच काय, प्रकाशने राखीला खूप वेळेस जवळून बघितले आहे, आणि तिच्या मानेवर काळ्या रंगाची एक तीळ होती, तशीच आणि त्याच जागेवर असणारी तीळ तिच्याही मानेवर दिसत आहे, एवढे योगायोग कसे होऊ शकते हे त्याला समजत न्हवते. टिव्हीवरून तिला बघून काहीही होणार नाही, हे त्याला चांगलेच ठाऊक होते, त्याला तिच्याबद्दल माहिती काढायची होती. प्राथमिक माहितीवरून त्याला हे समजले की, ती मुलगी त्या नव्या मुख्यमंत्रीची मुलगी आहे, असे लोकांकडून ऐकू आले.
प्रकाशला ठाऊकच होते की, जर ती खरच राखी असेल तर, ती स्वतःची राखी म्हणून कधीच ओळख सांगणार नाही. पण ती सत्यात आहे तरी कोण? ह्याचा शोध घेण्यासाठी, प्रकाश मुंबईला, पुढच्या महिन्यातच, नव्या मुख्यमंत्रीला भेटायला म्हणून गेला. मुख्यमंत्री बनून एक महिना लोटला असल्याने, शुभेच्छा देण्याचा पूर्ण कार्यक्रम संपला होता. आता मुख्यमंत्री कामाला लागले होते. प्रकाशने खान असिस्टला सांगितले की, त्याने त्या मुलीवर नजर ठेवावी आणि सोबतच शर्टच्या बटन वर असलेला कॅमेराही सुरू करावा, जेणेकरून तिने प्रकाशला बघताच कुठलेही रिऍक्शन दिले तर, तिला ह्या पुराव्यावरून प्रश्न विचारता येऊ शकते.
योगेशची माणसंही प्रकाशवर नजर ठेवून असल्याने, त्यांनीही योगेशला खबर दिली की, प्रकाश मुंबईला नव्या मुख्यमंत्रीला भेटायला गेला आहे, शुभेच्छा द्यायला. योगेशकडे पुरावे होतेच मोनाचे, सोबतच त्याने आतापर्यंत जमा केलेले, तो आपल्याजवळ असलेले पूर्ण पुराव्यांना आपल्या ऑफिस मध्ये सर्वांसमोर प्रस्तुत करणारच होता, कारण त्याला प्रकाशने टाकलेले कुठलेही पुढचे पाऊल दिसत न्हवते. सोबतच एकदाचा प्रकाशला कस्टडीत आणले आणि त्याला ह्याच पुराव्यावरून जबर मारहाण केली, तर तो नक्कीच खरे सत्य सांगून देईल, तसेही त्याचे मिशन थांबलेच आहे. असे योगेशला वाटू लागले होते. पण तरीही त्याला एक संशय होता की, प्रकाश मुंबईला गेला म्हणजे, नक्कीच त्याच्या डोक्यात कुठलेतरी प्लॅन सुरू असेल. कदाचित तो मुख्यमंत्रीला आपल्या प्लॅनचा हिस्सा बनवायला गेला असेल, असेही वाटू लागले, पण त्याने आपल्या माणसांना, त्याच्या जाण्याचे कारण शोधून काढायला सांगितले.
प्रकाश मुख्यमंत्रीच्या केबिन मध्ये गेला. त्यांना पुष्पगुच्छ देऊन, त्यांचे अभिनंदन केले. एवढ्यातच ती मुलगीही आली. प्रकाशला बघताच तिचे जास्त नाही, फक्त थोडेसे एक्सप्रेशन बदलले, पण अगदी काहीच क्षणात ती नॉर्मलही झाली. म्हणजे खान असिस्टला तिचे रिऍक्शन कॅपचर करता आले नाही. ती आपले काम करून निघून गेली. प्रकाशचे हे काम तर झाले नाही, पण तो दुसरे काम सुद्धा घेऊन आला होता. तो मुख्यमंत्रीला त्यांचा काही वेळ मागू लागला, जेणेकरून त्यांना आपल्या प्लॅन मध्ये शामिल करून घेता येईल आणि त्यांना नव्या विश्वाबद्दल आणि वीर बद्दल सांगून आपल्या विचारधारेत मन वळविण्याचा त्याचा मानस होता. पण मुख्यमंत्री म्हणू लागले की, त्यांची आता लगेचच एक महत्वाची सभा आहे, त्यांना तिथे जावं लागणार होतं. म्हणजे प्रकाशचे आता दोन्ही काम झाले नाही. पण त्याला दोनही काम कुठल्याही परिस्थितीत करायचेच होते.
योगेश आपले पुरावे सादर करणार, एवढ्यातच त्याला त्याच्या माणसाकडून ठाऊक झाले की, प्रकाश मुंबईला कुठल्या महत्वाच्या कामासाठी गेला आहे ते. त्यालाही समजले की, ती मुलगी अगदी जशीच्या तशी राखी सारखी दिसत आहे. त्याने ते व्हिडीओ फुटेज बघितले, त्यालाही विश्वाब बसला नाही ह्या गोष्टीवर. पण जर ती खरच राखी निघाली तर, पुन्हा एकदा प्रकाश पूर्णता जिंकेल, कारण जर राखी मेलीच नाही तर त्याच्यावर केस कुठली होईल? जर आपण म्हटलो की, मोना आणि तिच्या आईला प्रकाशनेच ठार केले, तर तो उलट म्हणू शकतो की, हे फसविण्याचा प्रयत्न होत आहे, कुणीतरी मुद्दाम हे करून घेत आहे, असे प्रकाश म्हणू शकतो. योगेशला हे मुळीच नको होते.
सभेत मुख्यमंत्री भाषणात व्यस्थ होते, तर इकडे प्रकाश राखीच्या मागे उभा होता. काही वेळात भाषण संपले, सर्व त्या सभेतून निघू लागले. अश्यातच गर्दीमध्ये प्रकाशने त्या मुलीच्या मागून, राखी म्हणून हाक दिली, तिने पटकन मागे वळून बघितले, प्रकाशने तिच्याकडे बघून हस्यस्मित दिले आणि हात हलविले. पण तिने तशीच पुन्हा पुढे बघितले. प्रकाशला पूर्णता संशय आला की, इथे काहीतरी गडबड नक्कीच आहे, तिचे राखी सोबत कुठले ना कुठले संबंध नक्कीच असेल म्हणून ती लगेचच मागे वळून बघितले. प्रकाशने तिला हाक मारायच्या आधी, दुसऱ्या मुलींचेही नाव घेतले होते, पण ती मागे वळून बघितले नाही, पण राखी जसे नाव घेतले, तशीच ती मागे वळून बघितली.
प्रकाश आता निव्वळ तिचाच पिच्छा करू लागला. तिला घुरून, टक लावून बघत होता. तिने ही बाब आपल्या वडिलांना म्हणजे मुख्यमंत्रीला सांगितली. दोन दिवस झाले प्रकाश अजूनही इथेच आहे, तेही तो आता आपल्या मुलीचा पिच्छा करत आहे, हे माहीत झाल्यानंतर त्यांनी प्रकाशला आपल्या कबिन मध्ये बोलाविले. प्रकाशला विचारणा करू लागले की, त्याला काय हवंय? प्रकाशने आपला पहिला मुद्दा उचलला, आपल्या नव्या विश्वाबद्दलचा. तो त्यांना पटवून सांगू लागला की, तो वीर नावाचा माणूस खूप चांगले काम करत आहे, त्याची विचारधाराच्या मार्गावर त्यांनीही चालावे असे तो त्याना विनंती करू लागला. पण मुख्यमंत्रीने अक्षरशः प्रकाशला ह्याबद्दल नकार दिला. उलट त्या वीर नावाच्या खुनीला लवकरात लवकर पकडणार अशी धमकीच दिली.
आता प्रकाशला त्यांच्याकडून कुठलीही अपेक्षा उरली न्हवती, त्यांच्या धमकीनंतर, प्रकाशने त्यांच्या मुलीबद्दल विचारले, ती खरंच त्यांची मुलगी आहे की, ही फसवेगिरी आहे? आपल्या मुलीबद्दल असे बोलल्याचे बघून, त्याला त्यांनी केबिन मधून हलकून लावले. प्रकाश बाहेर आला, पण तो तिथून पूर्ण सत्य काढल्याशिवाय तर जाणार न्हवताच. प्रकाशने काही काळ मुंबईलाच राहण्याचा प्लॅन बनविला. त्यासाठी त्याने एक हॉटेलमध्ये रूम बुक केली. प्रकाशने आपल्या हॉटेल मध्ये येऊन, खान असिस्टसोबत मिळून एक प्लॅन बनविला, त्या मुलीला किडण्याप करायचा. खान असिस्टने, मुंबईला असलेल्या त्यांच्याच माणसांना प्लॅन समजावून सांगितला आणि ती माणसं कामाला लागलीत.
ती मुलगी आपल्या फुलझाडांना पाणी देत असतानाच, तिच्यावर नजर ठेवून असलेल्या, खान असिस्टच्या लोकांनी, तिचे तोंड दाबून, तिला आपल्या कार मध्ये बसवून प्रकाशने नेमलेल्या एका निर्जन खोलीत आणले. आसपासच्या परिसरात, कुणीही न्हवते, प्रकाश आणि खान असिस्ट ला सोडून.

ज्योती, "मला इथे कशाला आणले आहे? तू माझ्या मागे कशाला लागला आहेस? तुला ठाऊक नाही की मी मुख्यमंत्रीची मुलगी आहे ते? जर माझ्या पप्पांना ठाऊक झाले तर, ते तुला ह्या जगातून गायब करू शकतात, कुणालाही ठावठिकान लागणार नाही तुझा!"

प्रकाश, "तुझे बोलणेही अगदी राखी सारखेच, तुझ्यात आणि तिच्यात कुठलेही फरक नाही. मी कसा सहमत होऊ की तू राखी नाही म्हणून? तू जिवंत कशी काय? तुला सर्वात आधी सचिनने ठार केले, त्यांनतर मी माझ्या हाताने, बंदुकीने तुला ठार केले, एवढेच नाही तुला अश्या ठिकाणी लपविले, जिथून मी स्वतः तुला मारणाराच काढू शकणार नाही. मग तू अजूनही जिवंत कशी?"

ज्योती, "तुला भीती नाही वाटत? तू माझ्यापुढे पूर्ण सत्य सांगितले आहे म्हणून? मी इथून गेल्यानंतर हेच सत्य माझ्या वडिलांना सांगितले, तर, तुला फाशीचीही शिक्षा होऊ शकते!"

प्रकाश, "तुला वाटतं, मी तुला इथून जाऊ देणार? चुकतीयेस तू! तुलाही संपविणार, पुन्हा एकदा!"

ज्योती, "पण तू माझ्या बहिणीला का ठार केलेस? काय वाटोळं केलं होतं तिने तुझं? तुझ्यावर प्रेमच तर करत होती ना? त्याची एवढी मोठी शिक्षा?"

प्रकाश, "काय? ती तुझी बहीण होती? म्हणजे तू?... आपली भेट या आधी कधीच झालेली नाही?"

ज्योती, "मी तुला ह्यातलं काहीही सांगणार नाही आहे, समजलं ना? ती माझी बहिण होती, एवढं ही तुला ठाऊक झालं ना? बस्स आहे, आणि मी तुझ्या पोकळ धमक्यांना घाबरणारी नाहीये मी, समजलं ना?"

प्रकाश, "पण एवढी समांतर कशी गं तुमच्या दोघांत, जरी दोघेही जुडवा बहिणी असल्या तरीही, अगदी स्वभावही तसाच? असो! तुला वाटतंय की मी नुसतं धमक्या देत आहे? तुला ठाऊक आहे, मी आत्तापर्यंत किती खून केले असेल ते? मलाही तो आकडा ठाऊक नाही, पण काय वाटतं खान असिस्ट? तीसेक हजार लोकांना तर ठार केलेच असेल ना आपण?"

खान असिस्ट, "हा बॉस! जवळपास इतने ही होंगे!!"

प्रकाश, "त्यातुन तुला ठार केल्यानंतर आम्हाला कुठलाही फरक पडणार नाही!"

ज्योती(आश्चर्यचकित होऊन), "काय? एवढे खून? पण कशाला?"

प्रकाश, "तुझ्या बहिणीमुळे! तुझ्या बहिणीमुळेच मला खुनाची भूक लागली आहे. आता मी हे थांबवू शकत नाही, किंवा कुणीही मला थांबवू शकणार नाही. तर सांग आता तुझे सत्य, असे म्हणतात, मरताना, आपले सगळे सत्य लोकांना सांगून द्यावे म्हणून, नाहीतर ओझं घेऊन जगाचा निरोप घेतला तर, आत्मा भटकत राहील. म्हणून तुझे आणि तुझ्या बहिणीचे पूर्ण सत्य सांगून टाक, तेवढाच वेळ तुला पुन्हा जगायला मिळेल."

ज्योती, "आमचे सत्य कुणालाही ठाऊक नाही, मी तुला सांगू शकत नाही, पण जर तू मला जिवंत सोडत असशील तर मी तुला माझे पूर्ण सत्य सांगण्यास तैयार आहे, मी तुला वचन देते की, मी तुझे सत्य कुणालाही सांगणार नाही, डील मंजूर आहे? जर मंजूर नसेल तर मला आत्ताच ठार करून घे, मी तुला ते सत्य मुळीच सांगणार नाहीये, माझा फायदा नसला तर! आणि त्या सत्यात, तुझाही काहीसा वाटा आहे, म्हणेज आमच्या त्या प्रवासात तुझा ही महत्वाचा रोल आहे, जर तुला जाणून घ्यायचे नसेल तर, मला ठार कर आत्ताच!"

प्रकाश, "ठीक आहे, मला मजूर आहे! (तिचे बांधलेले हात सोडून) घे सोडलं! सांग सर्व सत्य आणि हो इथून पसार!"

ज्योती, "सर्वात आधी तू तुझे सत्य मला सांग, आतापर्यंत तू काय केले, म्हणजे राखीला ठार करण्यापासून ते आतापर्यंत! चिंता करू नको मी कुणालाही सांगणार नाही!"

प्रकाशने आपले पूर्ण सत्य तिला सांगून टाकले.

ज्योती(रडत) "तू मला एकदा तरी भेटायला का आलास नाही रे? फक्त एकदा माझ्यासोबत भेटून, माझ्याशी चर्चा करून, ह्यामागे काय कारण आहे, हे तर जाणून घ्यायचे होते ना? तू सरळ मला ठार करण्याचा प्लॅन बनविला? किती प्रेम करत होते तुझ्यावर मी? पण तू मलाच ठार करणार होतास?"

प्रकाश, "एक मिनिट! मी राखी वर प्रेम करत होतो की तुझ्यावर? म्हणजे दोघेही एकसारखेच दिसता ना? म्हणून विचारलं!"

ज्योती, "मी ज्योती नाही, राखी आहे! जिला तू ठार केले आहेस, ती ज्योती होती! थांब मी तुला पूर्ण प्रकार सांगते! (अश्रू पुसून, लांब श्वास घेऊन)
आम्हा दोघांचा एकाच वेळेस जन्म झाला होता. जुडवा होतो ना आम्ही! जेव्हा जन्म झाला होता, तेव्हा आमचे आईवडील, गोव्याला आलेले होते, वडिलांच्या कामासाठी, पण आईच्या जिद्देपायी तिलाही गर्भावस्थेच्या दरम्यान गोव्याला आणले होते. ज्या ठिकाणी आमचा जन्म झाला, त्या दवाखान्यात, आजचे मुख्यमंत्री आणि त्यांची बायको, तेही होते. त्यांना मुलं झालेलं होतं, खूप वर्षानंतर. पण त्या मुलाचा जन्म होताच, त्याचा मृत्यू झाला होता. आमच्या वडिलांना कुठल्याही परिस्थितीत होणारा मूल, मुलगाच हवा होता. जर मुलगी झाली, तर तिला तो जिवंत ठेवेल की नाही, कुणालाही ठाऊक न्हवते. हे डॉक्टरचा चांगलेच ठाऊक होते. दोन जुळे मुलं, तेही दोन्ही मुलीच, मग तर आमचे वडील दोघांनाही सोडणार नाही, हे डॉक्टरांना चांगलेच समजले. तिकडे मुख्यमंत्रीला खबर लागली की, त्यांचे मूल मृतक जन्मले आहे, त्यांच्या बायकोला हे ठाऊक न्हवते, ती बेशुद्ध होती तेव्हा. जर आपल्या बायकोला ठाऊक झाले तर, ती हे दुःख सहन करू शकणार नाही, हे त्याना कळून चुकले होते. ते डॉक्टरांना त्या मुलाला जिवंत करण्याची खूप विनंती करू लागले. अश्यातच डॉक्टरांना एक युक्ती सुचली. त्यांनी मुख्यमंत्री कडे, एक ऑफर घेऊन आलेत. त्यांनी सांगितले की, दोन जुळ्या मुली जन्मल्या आहेत, त्यांच्यापैकी एकाला तुम्हाला दिले तर चालेल काय? तसेही त्या मुलीचे वडील दोन्ही मुलीला आपलं करणार, असे जराही वाटत नाही आहे आणि त्या दोघांनाही ठाऊक नाही आहे की, त्यांना जुळ्या मुलीच झालेल्या आहेत ते. ह्यावर मुख्यमंत्री खूप आनंदी झालेत. त्यांनी डॉक्टरांच्या ह्या हेराफेरीला होकार दिला. त्यांनी वचन दिले की, आम्ही त्या मुलीला अगदी आपल्याच मुलासारखे जगविणार. आणि मुख्यमंत्रीच्या बायकोला ठाऊकही नाही की, ती मुलगी त्यांची आहे, ती तर आपल्याच मुलाप्रमाणे तिला वागविणार, असा विश्वास मुख्यमंत्रीने डॉक्टरांना दिला. त्यावरून डॉक्टरनी आमच्यापैकी एकाला त्यांना दिले आणि एकाला आमच्या वडिलांकडे सोपविले. एकच मुलगी झाल्याने वडिलांना आनंद तर झाला नाही, पण जास्त दुःखही झाले नाही, त्यांना खात्री होती की, पुढे नक्कीच मुलगा होईल, ह्याची. दोन्ही परिवार आनंदी होते.
मुख्यमंत्री कडे गेलेली, ज्योती होय आणि खऱ्या आईवडिलांकडे राहणारी मी राखी. हे आम्हा दोघं बहिणींनाही ठाऊक न्हवते. माझे संगोपन, खूप साधे आणि सोपे झाले. कारण आईवडीलांची आधीची स्थिती तेवढी चांगली न्हवती. तेच ज्योतीचे आईवडील खूप गर्भश्रीमंत, वरून एकुलती एक मुलगी, तेही खूप वर्षानंतर लाभलेली. त्यांनी तिला एवढी सूट दिली, एवढे स्वतंत्र दिले होते, ज्याचा वाईट परिणाम तिच्यावर झाला. ती खूप जास्त लोफर बनली होती, अगदी तुझी बहीण मोना प्रमाणे. मोनाला भाऊ म्हणून तू तरी होतास, पण तिला कुणीही नाही, अगदी स्वतंत्र. तिचे आईवडील पूर्णपणे आपापल्या कामात व्यस्त, दोघेही पैसे फक्त ज्योती साठीच कमवीत होते. मग काय ज्योती कडे पैश्यांची काही एक कमी नाही.
काही वर्षांपूर्वी, कदाचित सातवी आठवित असताना, मी गोव्याला गेले होते, माझ्या मैत्रिणींसोबत, शाळेची ट्रिप होती, तेही फक्त मुलींची. गोव्याला गेल्यानंतर, मी एका हॉटेल मध्ये गेले, कुणालाही न सांगता, सर्वाना वाटू लागले मी कुठेतरी हरवली असणार, अश्यातच माझ्या मैत्रिणींना एका ठिकाणी ज्योती दिसते, तिला राखी, म्हणजे मी समजून माझ्या मैत्रिणी शिव्या घालायला लागतात. तेवढ्यातच माझीही एन्ट्री होते. दोघेही अगदी सारखे दोघांनाही एकमेकांना बघून आश्चर्य! ती ज्योती सहसा कुणासोबतही चांगल्या तर्हेने न बोलणारी, मला बघताच तिचे पूर्ण हावभाव बदललेले. आम्ही गप्पा करू लागलोत अश्यातच आम्हाला समजले की, आमचा जन्म एकाच दिवशी एकाच हॉस्पिटल मध्ये झाला होता. तेव्हा तिथेच आम्हाला वाटू लागले की, आम्ही जुळवा बहिणी असावे. तिने तिच्या वडिलांना म्हणजे मुख्यमंत्रीला विचारले, त्यांनी खरे काय ते तिला सांगितले. अश्या तर्हेने आमची मैत्री झाली.
मी आपल्या पुण्याला परतले. ज्योतीसोबतचा माझा कॉन्टॅक्ट वाढत चालला होता, मी तुझ्यापेक्षा जास्त तिच्यासोबत बोलत होते. खूप वर्षानंतर बहिणी मिळाल्याने आम्हाला खूप आनंद होऊ लागला होता. कधीकाळी ती मला भेटायला येऊ लागली होती. आमची ही गोष्ट मला, तिला आणि तिच्या वडिलांना म्हणजेच मुख्यमंत्रीलाच ठाऊक होती, बाकी कुणालाही नाही. मुळात आम्ही एकमेकांना वचन दिले होते की, ही गोष्ट कुणालाही सांगणार नाही म्हणून.
पण आमच्या दोघींचाही आठवा वर्ग नुकताच संपलेला होता. तिला तेवढ्या कमी वयातच नशेची लत लागली होती. तिने आपली एक गॅंग बनविली होती. एवढ्या कमी वयात पार्टी करणे, मुलामुलींसोबत फिरणे, तिचे रोजचेच होऊ लागले होते. अश्यातच ती एका मुलासोबत बेट लावली होती, आणि ती बेट हरली. त्या हरण्याच्या बदल्यात, तो तिच्याकडून शारीरिक सुखाची मागणी करू लागला. तिने त्याला नकार दिले नाही, कारण तिलाही हे नवीन करून बघायला आवडत होते. त्यांच्या मित्रांनी त्यांचा MMS बनविला. तो MMS ज्योतीच्या वाडीलांपर्यंत पोहोचला आणि तेव्हापासून तिच्यावर लक्ष देणे सुरू झाले. तिला नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न तिचे आईवडील करू लागलेत. पण तिने लपून पुन्हा एकदा त्याच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले, अश्यातच ती पहिल्यांदा एवढ्या कमी वयात गर्भवती राहिली. ही गोष्ट खूप लोकांना ठाऊक झाली, लोकांत, तिच्या आईवडिलांची बदनामी होऊ लागली. त्यानंतर तिचे अबोर्शन करण्यात आले, सोबतच तिच्या वडिलांनी घरातच तिला बंदिस्त करून ठेवल्यासारखे केले.
ज्योतीची ही शरीराची भूक, अधिकच वाढली होती. आता तिला कुणीही काहीही बोलले तरी, तिच्यावर कुठलाही परिणाम होणार न्हवता. मी पण तिला खूप वेळेस समजविण्याचा प्रयत्न केला. पण तिच्यावर कुठलाही परिणाम होणार न्हवता. तिला आधीचेच स्वतंत्र हवे होते. पण तिचे वडील ते आता कधीच मिळवून देणारा न्हवते. ह्यातच तिने तिच्या वडिलांना विनंती केली की, ती माझ्यासोबत माझ्या घरी राहील म्हणून... तेही माझ्या आईवडिलांपासून लपून. तिच्याही वडिलांना वाटले की, दोन्ही बहिणी एकत्र राहिलेत तर, कदाचित तिच्यात काहीतरी सुधारणा होईल, मी तिला चांगले सांभाडणार, तिला शिस्त लावणार. पण ती माझ्या घरी राहायला येताच, माझ्या मागे खुप वर्षापासून, म्हणजे सहावी सातवी पासून मागे लागून असणाऱ्या सचिनला, तिनेच प्रपोज केले. सचिनला वाटले की, ती ज्योती, मीच म्हणजे राखी होय, त्यानेही तिला होकार दिला.
काही वर्षानंतर माझे प्रेम तुझ्यावर जुळले, ज्योतीचे प्रेम सचिनवर होते. सचिन तिच्यावर खरे प्रेम करत होता, मलाही वाटू लागले की, ती पण त्याच्यावर खरे प्रेम करत असणार, पण तिला त्याच्याकडून वेळोवेळी शारीरिक सुख हवे होते. ती सचिनच्या मुलाची गर्भवती राहणार होती, तेव्हाही तिने अबोर्शन केले. त्यानंतर मयांकने मला प्रपोज केले होते, मी त्याला नकार दिला, हे ज्योतीला ठाऊक होताच, तिने रात्री मयांकच्या घरी जाऊन, त्याच्यासोबत रात्र काढली, त्याला काही पैसे मागून. कारण तिला पैसेही हवे होते, तिचे शोक पाणी पूर्ण करायला. ह्यातली एकही गोष्ट मला ठाऊक न्हवती. ती माझ्यापुढे साधेपणाचा ढोंग करू लागली. ती पार्ट टाइम जॉबही करू लागली होती. ती मला असे दाखविण्याचा प्रयत्न करू लागली की, ती माझ्या घरी खूप आनंदी आहे.
तिच्या आईला, म्हणजेच मुख्यमंत्रीच्या बायकोला ह्याबद्दल काहीही ठाऊक नसल्याने, तिला चिंता लागून होती की, तिची मुलगी एवढ्या दिवसापासून कुठे आहे, दिवस कुठे वर्ष होऊन चालले होते ती मुंबईला आलेली न्हवती. तिचे वडील म्हणजे मुख्यमंत्री तिच्या आईची म्हणजेच त्यांच्या बायकोची समजूत काढत होते की, ती खूप चांगल्या ठिकाणी आहे, जिथे तीला चांगले संस्कार मिळतील.
ज्योतीने मला विश्वासात आणले की, ती इथे खूप आनंदी आहे, तिच्या वडिलांच्या घरापेक्षा. तिने माझ्यापुढे एक प्रस्ताव ठेवला की, मी माझे हे घर काही वर्षांसाठी सोडून, तिच्या घरी म्हणजेच मुख्यमंत्रीच्या घरी ज्योती म्हणून राहावे आणि ती माझ्या घरी राखी म्हणून वावरणार. मला हे मुळीच मुळीच मंजूर न्हवते. मला माझे घर सोडून, माझी माणसं सोडून, आईवडिलांना सोडून, आणि स्पेशली तुला सोडून कुठेही जायचे न्हवते. पण ती मला खूप आग्रह करू लागली, पुढे जाऊन तर जणू मला ती ब्लॅकमेलच करू लागली. पण तरीही माझा स्पष्ट नकार होता. ह्याचा तिला खूप राग आला. नंतर ती माझ्याकडून काम काढून घेऊ लागली होती. ती कधी तुला भेटायला यायची आणि मला सचिनला भेटायला पाठवायची , कधी तुझ्याजवळ शारीरिक सुखाची मागणी करायची किंवा दुसऱ्याच कोणत्या पैसे वाल्या माणसासोबत रात्र काढायची आणि ह्या सर्वात नाव फसायचे माझे! कारण ती माझ्याच नावाने वावरत होती ना. तिने धमकी दिली की, जर मी तिच्या वडिलांकडे गेली नाही तर, ती माझे नाव पुन्हा बदनाम करेल. तिच्या ह्या धमकीला घाबरून, मला तिच्या घरी जावेच लागले. तिने माझ्याकडून हेही वाचन घेतले की, मी तिच्या वडिलांना म्हणजे मुख्यमंत्रीला मुळीच ठाऊक होऊ देऊ नये की, मी राखी आहे. त्यांना माहीत होऊ देऊ नये की, ज्योती माझ्याच घरी म्हणजे पुण्यालाच आहे. मग काय? तिचे मौजेचे दिवस सुरू झालेत.
मी तिला घाबरून, तिच्या घरी तिच्या नावाने वावरू लागली आणि ती माझ्या घरी माझ्या नावाने. ती माझ्या घरी राहून, तीचे शोक पूर्ण करू लागली आणि बदनाम होऊ लागले माझे नाव. त्यानंतर तिने खूप लोकांसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला असावा. पण पुढे जाऊन, ती गायब झाल्याची बातमी माझ्या कानावर पडली, मला तिची चिंता होऊ लागली. काही काळानंतर समजले की, तिचा खून झालाय, तिचा खून सचिनने केलाय, जो तिच्यावर, म्हणजे वास्तविक पाहता माझ्यावर खरे प्रेम करत होता. तेव्हा मला खूप दुःख झाले, असे वाटू लागले की, हे सर्व माझ्यामुळे झाले, तेव्हा मी, तुला आणि आईवडिलांना सावरायला परत येणार होते, पण त्याआधी मी ही पूर्ण गोष्ट तिच्या वडिलांना म्हणजे मुख्यमंत्रीला सांगितली, त्यांना तेव्हा कळले की, मी ज्योती नाही तर राखी आहे. त्यांनी मला थांबविले असे करण्यापासून. त्यांनी मला समजावून सांगितले की, तिथे गेल्यानंतर ज्योतीने केलेले माझे खराब नाव आणि त्यामुळे माझी इमेज आणि त्याचे परिणाम काय होऊ शकते, हे त्यांनी समजावून सांगितले आणि हेही सांगितले की, ह्यापुढे मी त्यांच्या मुलीचीच जागा नेहमीसाठी घ्यावी. हेच सर्वांसाठी चांगले राहील. म्हणून मी आज ज्योतीच्या नावाने जगत आहे.
पण तू असा करशील, असे जराही वाटले नाही. तू सरळ ठार करायला आलास मला? एकदा फोन तर करायचा होतास ना? माझ्यासोबत स्पष्ट बोलला असता, तर तुला पूर्ण हकीकत सांगून टाकले असते. सरळ खून? आणि मलाही वाटत न्हवते की, माझ्यामुळे एवढ्या घटना घडणार म्हणून. माझ्यामुळे तू तर सीरिअल किलर बनलास? मला अजूनही विश्वास वाटत नाही आहे, तूच तो वीर?"

प्रकाश(रडत तिला आलिंगन देऊन), "मला तुझा खरंच खूप राग आला होता. मी तुझ्यावर खूप प्रेम करत होतो, अगदी जीवापाड! मी त्यावेळेस खूप वेगळ्या विश्वात हरविलेलो होतो, मला काय चांगले काय वाईट काहीही समजत न्हवते. मला माफ कर! मी आता खूप बदललोय! आता मी आधीचा प्रकाश उरलो नाही, सॉरी राखी!"

ज्योती, "प्लिज मला ह्यापुढे कधीच राखी म्हणू नकोस! माझे नाव आता ज्योती आहे, राखी नाही. नाव ज्योती असले तरी प्रेम तेवढेच करते, जेवढे राखी नाव असताना करत होते. तू बदललास नाही, तुझे फक्त विचार बदलले, तू तुझ्या परिस्थितीवरून तुझा स्वभाव बदलविला, तुझ्यावर झालेल्या अन्यायावरून तू तुझे ध्येय बदलविले, पण तू नाही बदलला आहे, माझ्यासाठी तू आत्ताही जुनाच प्रकाश आहे, पण वेगळ्या विचारधारा असलेला प्रकाश, आय स्टील लव्ह यु प्रकाश!"

दोघांनीही चुंबन घेतले.

प्रकाश, "मी आता ह्या परिस्थितीतून बाहेर येऊ शकणार नाही, कधीच नाही! खरंतर तुही ह्या परिस्थितीतून मला बाहेर काढू शकणार नाहीस, मला आता वाईट लोकांचे खून करण्याची सवय म्हण, वा गोडी म्हण, पण आता हे माझे काम सोडू शकणार नाही, जरी माझा जीव गेला तरी बेहत्तर!"


ज्योती, "मी तुला कुठे म्हणत आहे की, तू हे काम सोडून द्यावे म्हणून? मला तर तुझे हेच काम खूप आवडते, माझीही तुझ्यासारखीच विचारधारा आहे, तुला ठाऊक नाही काय? जेव्हा जेव्हा काहीही वाईट घडायचे, तेव्हा मला किती राग यायचा, तुला ठाऊक नाही काय? आताही मी तशीच आहे, मी जेव्हापासून वीर नावाच्या रहस्यमयी माणसाबद्दल ऐकले, तेव्हापासून मला तो माणूस खूप आवडू लागला होता कारण आम्हा दोघांचेही विचार अगदी सारखे आहेत. पण तो वीर तूच म्हणजे, मला माझे नवे प्रेम मिळाल्यासारखे झाले!"

प्रकाश, "काय? तू माझा सपोर्ट करणार आहेस? तुला माझे हे काम पसंत पडले आहे?"

ज्योती, "अरे हो! मला आता तुझ्या टीम मध्ये शामिल करून घे, मला तुझ्या टीम मध्ये घेतल्याचे खूप फायदे होतील तुला, कारण जरी मुख्यामंत्री माझे नवीन वडील असले तरी मी त्यांची मुलगी आहे, ते माझ्यावर खऱ्या ज्योती पेक्षाही खूप जास्त प्रेम करतात, माझ्यासाठी ते काहीही करू शकतात आणि ते माझे म्हणणे केव्हाही ऐकतील. तुला मुख्यमंत्रीचा पूर्ण सपोर्ट मिळेल, चिंता करू नको आणि तुझे कामही थांबवू नको, इंफ्याक्त मी पण तुझा हातभार लावणार!"

प्रकाश, "खरंच? तू माझ्या सोबत आहेस? आणि माझ्यासोबत काम करण्यास उत्सुक आहेस? पण तुझ्या वडिलांची काय? ते खरंच आपला साथ देतील?"

ज्योती, "अरे...! तुला विश्वसच नाही? चल माझ्यासोबत पप्पांकडे..."

खान असिस्ट, "नाही बॉस, ये फसानेकी साजिश हो सकती है!"

प्रकाश, "पण मला हिच्यावर, माझ्यापेक्षा ही जास्त विश्वास आहे... चल राखी... सॉरी ज्योती!"

दोघेही मुख्यमंत्री, म्हणजेच तिच्या वाडीलांकडे गेलेत, त्यांना पूर्ण प्रकार सांगितला. तिचे वडील, ह्या विचारधारेला सपोर्ट करणारे न्हवतेच, पण त्यांची लाडकी मुलगी, जीचे खरे प्रेम प्रकाशवर आहे, आणि दोघांचेही विचार अगदी सारखे आहेत, म्हणून त्यांनी प्रकाश आणि ज्योतीला परवानगी दिली, काहीही करायची. तसेही त्याना मुख्यमंत्री बनविण्यामागे ज्योतीचाच हात होता. तिनेच, त्यांना मुख्यमंत्री बनविण्यासाठी पूर्ण मदत केली आता त्यांचे कर्तव्य आहे तिला ह्या पदाला कसेही संभाडण्याची परवानगी देणे. आता प्रकाश ज्योती आणि खान असिस्ट एकत्र झालेत. ज्योती जरी मुख्यमंत्री नसली तरी, तिच्याच हातात पूर्ण कारभार होता. आता तिघेही मिळून, आपापल्या कामाला सुरुवात केली.
प्रकाश पुण्याला येऊन, आपला प्लॅन पुढे नेऊ लागला, ह्यावेळी त्याला अडवायला तो नवा खासदारही येऊ शकत न्हवता, कारण ज्योतीने, त्या नव्या खासदाराला नोटीस पाठविली की, त्याने फक्त वीर नावाच्या माणसाच्या मागे न लागता, दुसरेही कामं करावीत. CBI अधिकाऱ्यांनाही फक्त एकाच माणसावर फोकस करणे सोडून द्यायला सांगितले. सोबतच CBI मधील योगेश नावाच्या अधिकाऱ्याला लवकरात लवकर अटक करण्याचे आदेश दिले, कारण तो फक्त आपला सूड घेण्यासाठी, फक्त आणि फक्त जिल्हाधिकारीच्या मागे लागला आहे. त्याच्यावरही कस्टडीत झालेल्या खुनाचा गुन्हा दाखल केला. सोबतच आपल्या पदाचा गैरवापर करण्याचाही गुन्हा दाखल करण्यात आला.
प्रकाशने आपली फोज महाराष्ट्रातील एकोनेक जिल्ह्यात वाढवून घेतली. प्रत्येक जिल्ह्यातील वाईट लोकांना प्रकाश ठार करू लागला होता. आता त्याच्या मार्गावर कुणीही न्हवते. ज्योती गुप्तरीत्या लोकांच्या मनात, हे बसवू लागली की, वीर नावाचा माणूस खूप भला आहे, त्याचे स्वप्न, सर्वांच्या हिताचे आहे, सर्वाना लाभ देणारे आहे. हळू हळू लोक, पुन्हा एकदा प्रकाशच्या विचारधारेकडे वळू लागलीत. प्रकाशचे आता स्वप्न होते, सर्व वाईट लोकांना ठार करून, लोकसंख्याही कमी करणे. प्रकाश आणि ज्योतीचे म्हणजेच 'प्रकाशज्योत' चे काम कुठल्याही अडथडीविना चालू लागले.
योगेशला समजले की, ही लढाई आपण पूर्णपणे हरलो आहोत. कोर्टात चाललेली केस हरल्यानंतर आपल्याला कारावासही होऊ शकतो, हे त्याला कळून चुकले. त्याचे प्रकाशला गुन्हेगार ठरविण्याचे स्वप्न धुळीस मिटताना दिसू लागले होते. योगेशने प्रकाशला फोन केला.

योगेश, "तू जिकलास प्रकाश, अभिनंदन! तू तुझ्या स्वप्नांना सत्यात उत्तरावीत आहेस, मी हरलेला, मरणाच्या दारावर आलेला एका सिहासारखी माझी दशा झाली आहे. मला तुझ्यासोबत मनसोक्त बोलायचे आहे, कारावास होण्यापूर्वी... चिंता करू नकोस, मी ह्यावेळी कुठलेही चलाखी किंवा हुशारी करणार नाही, फक्त मला तुझासोबतच्या जुन्या मैत्रीची आठवण काढून त्या क्षणाला नजरेत उतरवायचे आहे, आपण भेटू शकतो? अगदी साधेपणाने, शेवट वेळेस?"

प्रकाश, "धन्यवाद! हार पत्करल्याबद्दल आणि अभिनंदन दिल्याबद्दल. मला ठाऊक आहे, एकदाचा तू हार पत्करलास मग तू कुठलीही हुशारी करत नाहीस, मला ठाऊक आहे, जेव्हा तू माझ्या घरी यायचा व्हिडीओ गेम खेळायला, तेव्हा गेम मध्ये नक्कीच तू चिटिंग करायचा आपल्या चाली चालायच्या, पण हरल्यानंतर तू सर्व मान्य करायच्या. आपल्यात चाललेला हा सुद्धा एक गेमच होता. असो... आपली भेट नक्कीच होईल, शेवटची, ह्याच रविवारी तुझ्याच घरी!"
रविवारी, ठरलेल्या वेळेवर, प्रकाश एकटाच कुणालाही न सांगता, कुणालाही सोबत न आणता, योगेशच्या घरी गेला. योगेशचे फ्लॅट, बिल्डिंगच्या सर्वात वर टेरेसवर स्थित होते. प्रकाश लिफ्टनेच वर गेला. त्याचे दार उघडेच होते, प्रकाश आत येऊन दार बंद केले आणि योगेशला हाक मारू लागला. योगेशचा त्याला बारीक आवाज आला, तो त्याला छतावर बोलावीत होता. प्रकाश छतावर आला, जे बिल्डिंगचे सर्वात वरचे पॉईंट होते. वर योगेश एकटाच होता, काटावर बसून, पाय खाली लोंबविलेले, आणि बाजूला दारूच्या बॉटल आणि हातात दारूने अर्ध भरलेले ग्लास होते. प्रकाश त्याच्या बाजूला जाऊन बसला. प्रकाशला योगेशचा मोबाईल, दारूच्या बॉटलच्या बाजूला ठेवलेला दिसला, त्याचे लक्ष त्या मोबाईलकडेच होते. योगेशला ठाऊक होताच की, प्रकाश आपल्या मोबाईलकडे बघत आहे, त्याने लगेच आपला मोबाईल खाली फेकून दिला. एवढ्या वरून पडल्याने नक्कीच त्याचे तुकडे उडाले असेल, त्याचे अवशेषही वरून दिसत न्हवते.

योगेश, "घाबरू नकोस! माझ्याकडे मोबाइल शिवाय काहीही न्हवतं, आता तो मोबाईलही नाही. जर विश्वास वाटत नसेल तर, तपासणी करून घे माझी."

प्रकाश, "नाही, गरज नाही वाटत! पण तू माझी तपासणी नाही करणार? मी काही सोबत आणले असेल तर? तुला ठार करण्यासाठी?"

योगेश, "मी कधीही न पिणारा, पहिल्यांदा पित आहे, ह्याचे कारण तू मुळीच नाही, पण माझे भाग्य आहे. मी माझ्या भाग्यपूढे काहीही करू शकलो नाही, आता मी स्वतःला वाचविण्यासाठी माझ्या भाग्याविरुद्ध लढू? तू बंदूक आणली असेल, चाकू आणला असेल किंवा काहीही आणले असेल, पण मला घाबरण्याची काहीही गरज नाही, कारण मी एक हरलेला आणि थकलेला वाघ आहे, ज्याचे पुढे काहीही भविष्य नाही!"

प्रकाश, "तू खूप प्यायला आहेस, झोक गेला, तर खाली पडशील, आपण आत जाऊन निवांत बोलूयात काय?"

योगेश, "मी मरायला घाबरत नाही, आणि कदाचित तू ही घाबरत नसावा, म्हणूनच तू आजपर्यंत एवढे निर्णय घेऊ शकला आहेस, बरोबर ना? पण जर तुला तुझ्या प्राणाची चिंता होत असेल तर, चिंता करू नको, तुला मी इथून ढकलणार नाही, एवढा तरी विश्वास ठेव माझ्यावर!"

प्रकाश, "असो, ठीक आहे, तुझी इच्छा, तुला इथेच बोलायचे आहे तर इथेच बोल! बोल, माझी आठवण कशी काढली?"

योगेश, "तुझ्यासाठी एक एक्सट्र्रा ग्लास आणला आहे, घे माझ्यासोबत एक कश!"

प्रकाश, "नको, मी स्वत:लाच वचन दिले आहे की, कधीही दारूला हात लावणार नाही. मी आज जे काही आहे, ते फक्त आणि फक्त एका चुकीमुळे, ती चूक म्हणजे दारू! आता मला पुन्हा कुठलीही चूक करायची नाहीये!"

योगेश, "अच्छा मोनाच्या आईला, म्हणजे तुझ्या सावत्र आईला दारूच्या नशेतच सांगून टाकले होते, म्हणूनच ना? ते सोड, मला तुझा पूर्ण प्रवास सांग ना! म्हणजे, आज इथपर्यंत, मला हरविण्यापर्यंतचा तुझा प्रवास काय होता? आणि पुढे काय करणार आहेस?... चिंता करू नकोस, मला आता तसाही कारावास होणारच आहे, मी माझी इच्छा असली तरी तुझं काहीही वाटोळं करू शकणार नाही, माझी तू चिंता करू नको, पण मला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल, एक साधा सरळ मुलगा, असा कसा होऊ शकतो?"

प्रकाश, "तसं नाही रे! म्हणजे तुझ्यावर तेवढा आहे विश्वास. पण काय करशील माझ्याबद्दल जाणून घेऊन?"

योगेश, "असा विचार कर, आपण दोघे अजूनही मित्र आहोत, अगदी जसे आधी होतो, एकमेकांना सर्व गोष्टी सांगणारे, अगदी तसेच."

प्रकाश, "हा शब्द तुझ्या तोंडून शोभत नाही, कारण तूच माझ्यापासून लपविले होते की, तू माझ्या घरी फक्त मोना सोबत राहायला येत होता."

योगेश, "तुझ्यापासून ती फक्त एकच गोष्ट लपविली, तेही ती म्हणाली म्हणून, त्याव्यतिरिक कोणतीही गोष्ट तुझ्यापासून लपविले नाही."

प्रकाश(हसून), "खरंच? मग तू मला अजूनही का सांगितला नाहीस की, तू माझ्याशी मैत्री तोडून, मला एकटं सोडून का गेला होतास, तेही अचानक? तेही अश्या वेळेस, जेव्हा मला कुणाची तरी गरज होती, मनातले दुःख कमी करायला?"

योगेश, "माझ्या वडिलांना वाटायचे की, मी त्यांच्याहूनही खूप महान बनावे, त्यांचे नाव उंचीवर न्ह्यावे, पण त्यांना ठाऊक झालं होतं की, मी तुझ्या घरी येऊन निव्वळ गेम खेळत बसत होतो, सोबतच त्यांना चाहूल लागली होती की, माझं आणि मोनाच लफडं चालू झालेलं. त्यांना ठाऊक होती की, मोना कशी मुलगी आहे ती. म्हणूनच त्यांनी माझ्यापुढे प्रस्थाव ठेवला की, मी ह्यापुढे कधीही तुमच्या घरच्यांसोबत कुठलेही संबंध ठेऊ नये, अथवा मला वडिलांना सोडावे लागणार. म्हणून मी तुला काहीही न सांगता, तुला पूर्णपणे सोडून दूर गेलो आणि माझ्या कामावर फोकस करू लागलो."

प्रकाश, "पण एक वेळ तरी माझ्याशी बोलायचा होतास ना? असो, त्या गेलेल्या गोष्टी! मी मग त्यानंतरचा पूर्ण प्रवास सांगतो, आशा करतो की, तू माझ्या गोष्टी रेकॉर्ड करत नसाव्यात!"

योगेश, "आता माझ्यात नाहीये ती ताकद वा चपळता, जी काही दिवसां आधी होती..."

प्रकाश ने योगेशला आतापर्यंतचा पूर्ण प्रवास सांगितला...

योगेश, "बापरे!! तू एवढा भयंकर मनुष्य बनला आहेस? फक्त 'मी' पणा जपायला? तू जरी, वाईट लोकांना ठार करण्याच्या उद्देशाने, खून केलेले असले, तरी ते फक्त तुझ्यातील 'मी' पणाच वाढवायला होय, कारण तुला ह्या राज्यावर, ह्या देशावर राज्य करायचे आहे, येथील महाराज बनायचे आहे, म्हणून तू हे एवढे खून केले आहेस, तुझ्या मते, तू फक्त वाईट लोकांना ठार केले आहेस, हे फक्त सायको मर्डररची निशाणी आहे, बाकी काहीही नाही. होय वेडा खुनी! तुला कितीही समजावून सांगण्याचा प्रयत्न केला तरी ते तुला आता काही समजायचे नाही, पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुझे हे स्वप्न कधीच पूर्ण होऊ शकणार नाही, कारण तुझे हे स्वप्न सत्यात उतरण्यासारखे नाहीच! मला खंत वाटत आहे की, मी तुझ्यासोबत हरलो, जर तुझी ही गोष्ट मी सर्वांसमोर आणू शकलो असतो तर आज माझ्यावर जी परिस्थिती आली आहे, ती परिस्थिती, पुढे भारतातील लोकांवर येण्यापासून वाचवू शकलो असतो. तुझे हे सत्य लोकांपुढे एक-ना-एक दिवस नक्कीच लोकांपुढे येणार, तेव्हा तुला कळेल, हे क्लीन वर्ल्डचे विश्व फक्त स्वप्नातच रंगू शकते."

प्रकाश, "पण तुला असे का वाटते की, हे क्लीन वर्ल्डचे विश्व कधीच साध्य होऊ शकत नाही, पण सत्यात हे विश्व साध्य होत आहे, फक्त काही दिवसांनी गोष्ट, मग मीच राजा होईल!"

योगेश, "जर असे खरंच झाले तर, माझे चांगले नशीब, मी ह्या जगात ते दृश्य बघायला नसेल! पण मी एक गोष्ट सांगू इच्छितो की, प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात, तसेच खऱ्या विश्वात लोकांच्याही दोन बाजू असतात, चांगले आणि वाईट अगदी नाण्यांप्रमाणे. दोन्ही पैकी एक ही नसले तर सारं बिघडतं. जेव्हा हे सारं बिघडेल, तेव्हा लोकांना माझी आठवण नक्की येईल, लोक माझा विचार नक्की करणार, असे म्हणून की, फक्त एकच होता, जो 'वीर' नावाच्या माणसाचा आधीपासून विरोध करत येत होता, अशी माझी आठवण नक्कीच काढणार."

प्रकाश, "हे आपापल्या दृष्टीनुसार असतं, पण माझ्या दृष्टीवरून फक्त चांगलेच लोक ह्या धरणीवर राहायला हवेत. मग बघ ते जग किती सुंदर आणि सुखकर असेल."

योगेश, "जर आज तू माझ्यासोबत दारू प्यायला असतास ना, तर मी कसेही करून, तुझे सत्य रेकॉर्ड करून लोकांपुढे आणले असते, पण आता काहीही शक्य नाही, तुला मी हरवू तर शकणार नाही, पण तुझ्या पूर्ण प्लॅनला थांबवायला मला माझ्या प्राणाची आहुती द्यावीच लागेल. ह्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही, मी मारण्याआधी, तुला माझा मित्र म्हणून, एक शेवटचे सांगू इच्छितो की, हे सगळं थांबाव, ह्याने काहीही सिद्ध होणार नाही."

प्रकाश, "मी हे थांबवायला, क्लीन वर्ल्डची सुरुवात केलेली नाही..."

ह्यानंतर अचानकच योगेशने त्या बिल्डिंग वरून उडी मारली... खाली जाताजाता एक वाक्य ओरडून म्हणाला, "stop and send!" आणि तसाच तो खाली पडला, वरून प्रकाशला योगेश खाली पडलेल्या अवस्थेत दिसला.

प्रकाशला समजत न्हवते की, योगेशने मरता मरता, "स्टॉप अँड सेंड" असे का म्हटले असावे? फक्त स्टॉप म्हणजे थांबा म्हटले असते तर, समजत होते की, तो मला संबोधून म्हणत असावा, मला आपले प्लॅन थांबवायला, पण सेंड म्हणजे पाठवा कशाला आणि कुणाला म्हणत आहे? हे प्रकाशला कळाले न्हवते. प्रकाश त्याच विचारात बुडाला होता. त्या विचारला, काही काळासाठी बाजूला ठेऊन, तो त्या जागेतून पटकन बाहेर आला, त्याच्याच खोलीतून होऊन, लिफ्टने खाली आला, योगेश पडलेल्या ठिकाणावर गर्दी होऊ लागली होती, पण तो पटकन आपल्या कारने आपल्या घराकडे परतला. प्रकाशला वाटले न्हवते की, असे काही घडू शकेल, पण तरीही त्याने आपल्या तर्हेने काहीशी तयारी करून ठेवली होती, त्याने पूर्ण सुनिश्चित केले की, तो त्याच्या घरी आल्याचे कुठलीही पुरावे सोडले नाही आहे ते.
प्रकाश घरी तर आला, पण त्याला झोप काही लागली नाही. त्याला योगेशचे ते शेवटचे वाक्याच आठवू लागले आणि तेच त्याला खूप सतावू लागले. त्याने ही गोष्ट खान असिस्ट आणि ज्योतीला ही सांगितली, पण दोघांनीही त्याला जास्त टेन्शन न घेण्याचा सल्ला दिला.
पुढे प्रकाशचे आपल्या महत्वाच्या कामात म्हणजे क्लीन वर्ल्डच्या कामात लक्ष लागत न्हवते, त्याचे पूर्ण लक्ष योगेशच्या त्या शेवटच्या वाक्यावर लागून होते. म्हणूनच त्याचे क्लीन वर्ल्डचे काम खान असिस्ट आणि ज्योती सांभाळत होते. प्रकाश, योगेशने त्या दिवशी त्याच्यात जे संभाषण घडले त्यांत, त्याला काय काय म्हटले होते आणि योगेशने पुन्हा काय सांगितले होते, हे सर्व आठवू लागला होता. अश्यातच त्याला हे आठविले होते की, जेव्हा तो आपल्याला थांबविण्याचा प्रयत्न करत होता, जेव्हा तो शेवटचे बोलत होता, त्या वेळेस, त्याने म्हटले होते की, माझे सत्य बाहेर आणण्यासाठी त्याला मरावेच लागेल! असे योगेशने का म्हटले असावे? हेही त्याला समजत न्हवते. प्रकाशला वाटू लागले की, योगेशने मरता मरता त्याची एखादी शेवटची खेळी तर खेळली नसेल ना? पण त्याची कोणती खेळी असेल? जी हरल्यानंतर सुद्धा जिंकण्याची संधी मिळणार असेल?
प्रकाश रात्रंदिवस आता त्याच गोष्टीवर विचार करू लागला होता. तसेही त्याचे काम खान असिस्ट आणि ज्योती सांभाळत असल्याने त्याला कुठलीही अडचण होत न्हवती, योगेशच्या प्लॅनबद्दल जाणून घ्यायला. तो त्याच बद्दल शोधाशोध करू लागला. अश्यातच, त्याला मोनाच्याच्या व्हिडीओ बद्दल आठविले, जिथे तिने आपल्याबद्दलचे कुठलीतरी माहिती आणि पुरावे लपविले असल्याचे बोलत होती. तो आता त्याच व्हिडीओच्या शोधात लागला. खूप दिवसानंतर, खूप विचार केल्यानंतर त्यालाही असे जाणवू लागले की, कदाचित तिने तो व्हिडीओ तिच्या युट्युब चॅनेलवर टाकले असावे. त्याने आपल्या मोबाईलवरून तिच्या चॅनेलचे नाव सर्च केले. पण त्यात ते व्हिडीओ काही सापडले नाही, ज्याचा तो शोध घेत होता. पण अश्यातच त्याला समजले की, कदाचित तिने ते व्हिडीओ प्रायव्हेट केले असावे. प्रकाशने तिच्या इमेल आयडीने ह्याकिंगचा वापर करून तिचे अकाउंट खोलले. त्यात ते व्हिडीओ सापडले. पण त्याला ते व्हिडीओ एक वेळ पूर्ण बघितल्याचे दिसले होते, पण मोनाचा मृत्यू अगदी त्याच रात्री आणि कदाचित तो व्हिडीओ शूट केल्यानंतर काहीच वेळाने झाला होता, तिला तर व्हिडीओ बघायला वेळ मिळाला नाही आणि जर व्हिडीओ तिने बघितले नाही आणि व्हिडीओ प्रायव्हेट आहे, मग ह्याचा अर्थ असा लागतो की, हा व्हिडीओ नक्कीच योगेशने बघितले असावे. त्या गोष्टीला बाजूला सावरून, त्याने तो व्हिडीओ पूर्ण बघितला. त्यात त्याला कळले की, तिने आपल्याबद्दल काय काय माहीत करून घेतले होते ते. पण प्रकाशला हे माहीतच झाले होते की, नक्कीच योगेशने ते व्हिडीओ आपल्या आधी बघितले आहे, पण तरीही त्याने आपल्यावर कुठलीही एक्शन घेतली का नाही? तो आता आणखीनच विचारात बुडू लागला होता.
ज्योतीला प्रकाशची ही चिंता बघू गेली नाही. तो तसाही पुण्यात राहून, ह्या कामाव्यायातीरिक्त कुठलेही काम करत नाही आहे, ह्याचे समजताच, तिने प्रकाशला मुंबईला आपल्याजवळ बोलावून घेतले. कदाचित दोघेही एकत्र राहिल्यास, प्रकाशाची काहीशी चिंता कमी होईल. तिचे ऐकून प्रकाश मुंबईला राहायला आला. पण जाताना हे सुनिश्चित केले की, योगेशच्या खुनाचे इन्वेस्टीगेशन सुरू झाले आहे की नाही त्याचे. त्याला समजले की, योगेशच्या मृत्यूचे इन्वेस्टीगेशन खूप वेगाने सुरू झाले असल्याचे. सोबतच त्याला समजले की, कुणीतरी त्याच्या जागी, नवा CBI ऑफिसर आलेला आहे, ज्याची रिटायरमेंट होऊन असताना सुद्धा, पुन्हा एकदा इन्वेस्टीगेशन डिपार्टमेंट मध्ये प्रवेश घेतला आहे.
प्रकाश मुंबईला आला, पण खान असिस्ट पुण्यालाच होता. त्याने तिथूनच आपले व प्रकाशचे काम संभाडण्याचा निर्णय घेतला होता. प्रकाश मुंबईला ज्योतीसोबत राहू लागला, लिव्ह इन रिलेशनशिप प्रमाणे. खूप दिवस प्रकाश त्याच गोष्टीचा विचार करत होता, पण ज्योती, त्याचे खरे प्रेम खूप काळानंतर मिळाल्याने, आणि पहिल्यांदा तिच्यासोबत राहायला मिळत असल्याने तो काहीसा आनंदी होता, ज्योतीही, तो आपल्यासोबत असल्याने खूप आनंदी होती.
प्रकाश असाच झोपून उठल्यावर, त्याच्या डोक्यात विचार येऊ लागला की, योगेशच्या वडिलांना योगेशला काय बनवायचे होते? त्यांच्या पेक्षाही चांगला? ज्यामुळे योगेशने त्यांचे ऐकून आपली मैत्री तोडली? अश्यातच प्रकाशला हा प्रश्न पडू लागला की, योगेशचे वडील मुळात कोणते काम करत होते? तो ह्या प्रश्नाचे उत्तर आठवू लागला. त्याला आठविले की, त्याचे वडील तर पोलीस होते! पण काही वेळानंतर त्याला चांगले आठविले की, त्याचे वडील पुलीस न्हवते तर तेही CBI ऑफिसर होते. हे आठवीताच, प्रकाश दणाणून जागा झाला. तो त्याच्या पूर्ण प्रश्नांना जवळून बघू लागला. त्या प्रश्नांचे उत्तर अगदी जसेच्या तसे जुळू लागले होते.
योगेशच्या वडिलांना, योगेशला आपल्यापेक्षाही चांगला CBI ऑफिसर बनवायचे होते. पण मुळात योगेशचे वडीलच खुप प्रसिद्ध होते, त्यांच्या कामासाठी. आता नव्याने इन्वेस्टीगेशन करणारे कदाचित त्याचे वडीलच असावे, जे नुकतेच रिटायर झाले होते. योगेशने मोनाचे व्हिडीओ नक्कीच त्यांना पाठविले असावे, सोबतच आपल्या विरोधातील आत्तापर्यंत गोळा केलेले पूर्ण पुरावेही त्याने आपल्या वडीलांपर्यंत पोहोचविले असावे. आणि कदाचित असेही असू शकते की, योगेशने शेवटी म्हटले होते की, त्याच्या जाण्यानेच आपले सत्य जगापुढे येणार, ह्याचा अर्थ, कदाचित त्याने आपले पूर्ण सत्य फक्त जाणूनच घेतले नाही तर कुठेतरी रेकॉर्ड केले असावे, आणि त्याच रेकॉर्डला त्याने शेवटी मरता मरता स्टॉप आणि सेंड म्हटले असावे, हे कदाचित त्याच्या वडिलांना सेंड झालेले असावे. त्याच्या म्हणण्याचा दुसरा अर्थ असाही होऊ शकतो की, आपल्या मारण्यानेच आपले सत्य बाहेर येऊ शकते, म्हणजे त्याने त्याच्या आत्महत्या केल्याची मृत्युपत्र नक्कीच लिहिले असेल, मरण्याच्या खूप आधी, ज्यात पूर्ण दोष आपल्यावर टाकला असेल. जर हे खरं राहिले तर, तो मरता मरता आपल्याला पूर्णपणे फसवून गेला, असे प्रकाशला वाटू लागले.
प्रकाशने लगेच, खान असिस्टला फोन लावला. त्याला, योगेशच्या इन्वेस्टीगेशनच्या सध्याच्या स्थितीबद्दल विचारणा करू लागला. प्रकाशने खान असिस्टला आधीच सांगून ठेवले होते की, ह्या इन्वेस्टीगेशन वर जास्त फोकस करून ठेवावे. खान असिस्टने प्रकाशला सांगितले की, इन्वेस्टीगेशन डिपार्टमेंट मध्ये नवीन आलेला माणूस, त्याच्या, म्हणजेच प्रकाशच्या खूप विरोधात आहे, योगेश होता, त्याच्यापेक्षाही जास्त विरोधात. त्या नव्या ऑफिसरने तर असे वेगवेगळे पुरावे शोधलेत, जे प्रकाशला ह्या केस मध्ये चांगल्या प्रकारे फसवू शकतो, सोबतच त्याला योगेशने लिहिलेले शेवटचे मृत्यू पत्रही सापडले आहे, त्याने सरळ प्रकाशचे नाव स्पष्टपणे लिहिलेले आहे, आणि सोबतच हेही लिहिले की, आतापर्यंत जे काही घडले, त्यात प्रकाशचाच पूर्ण हात आहे. तो नवीन ऑफिसर आता प्रकाशला कश्याप्रकारे बेड्या ठोकविता येईल, ह्याच विचारावर कार्य आहे. सोबतच खान असिस्टने असे सांगितले की, एका गुप्त माहितीनुसार, तो नवीन ऑफिसर, प्रकाशच्या विचारधारे बद्दल लोकांत भीती पसरविण्याचे कामही सुरू केले आहे.
प्रकाशला ज्याची भीती होती तेच घडू लागले. त्याने फक्त विचार केला होता की, योगेशने मृत्युपत्रावर आपले नाव नक्कीच लिहिले असावे आणि तसेच घडले. ते नवीन ऑफिसर नक्कीच योगेशचे वडीलच असावे असे त्याला समजू लागले. त्याने खान असिस्टला, कँफॉर्म करण्यासाठी, त्या नवीन ऑफिसरचा फोटो पाठवायला सांगितला, फोटो मिळताच प्रकाशला समजले की, ते योगेशचे वडीलच होय! आणि ते आतापर्यंतचे भारतातील सर्वात चांगले इन्वेस्टीगेटर मानले जातात. प्रकाशला आता पश्चाताप होऊ लागला की, त्याने योगेशला मरू द्यायला नको होते. जर आज योगेश जिवंत असता तर, योगेश आपले जास्त काही वाकडं करू शकत न्हवता. पण आता त्याच्या वडिलांना कसे सांभाळायचे? हाच प्रकाशला प्रश्न पडू लागला; अश्यातच त्याला एक फोन आला, तो वेगळ्याच नंबर वरून, पण फोन उचलल्यानंतर ज्योतीचा आवाज येऊ लागला.
ज्योती खूप घाबरलेल्या आवाजात बोलत होती. ती प्रकाशला सांगत होती की, तिचे कुणीतरी अपहरण केले आहे. अपहरणकर्ते तिला ठार करणार आहेत, ती त्याला लवकर बोलवू लागली, ती त्याच ठिकाणी होती, ज्या ठिकाणी प्रकाशने काही दिवसांआधी ज्योतीला आणले होते, आणि जिथे दोघांचेही सत्य एकमेकापुढे आले होते. ती पटकन प्रकाशला त्या ठिकाणी बोलावून सोडवायची विनंती करू लागली. आणि तसाच फोन कट झाला. प्रकाशने लगेच खान असिस्टला फोन लावला, त्याला काही गुंडांना आपल्यासोबत येण्यासाठी बंदोबस्त करायला सांगितले, आणि प्रकाश काही गुंडांसोबत, म्हणजेच त्याच्याच माणसासोबत त्या ठिकाणी गेला. प्रकाशकडेही एक बंदूक होतीच. तो एक एक लोकांना मारत मारत आत जाऊ लागला. आत जाताच, ज्योती बंदिस्त अवस्थेत दिसली. तिला दोरीने बांधलेले होते आणि तिच्या आजूबाजूला पाच ते दहा लोक होती. त्या बाजूच्या लोकांना ठार करण्याचे ऑर्डर, प्रकाश आपल्या माणसांना देऊ लागला, जे त्याच्या मागे होती, पण प्रकाशचा एकही माणसाने त्याचे ऐकले नाही, प्रकाश मागे वळून बघता, मागे कुणीही दिसले नाही, पण खाली, त्याचे सर्व माणसे पडलेल्या अवस्थेत दिसले. म्हणजे आता त्याचा एकही माणूस उरलेला न्हवता, फक्त प्रकाशच एकटा जिवंत होता आणि त्याच्या हातात असलेली, अर्ध्या गोळ्या संपलेली बंदूक. तो बंदुकीचा धाक दाखवत, ज्योतीच्या जवळ आला, आणि तिचा दोर सोडला.
त्या सर्व अपहरणकर्त्या पैकी त्यांचा बॉस पुढे आला आणि म्हणू लागला, "तुझेच नाव आहे ना प्रकाश? तुझीच वाट बघत होतो आम्ही! तुलाच ठार करण्याचा ऑर्डर आम्हाला मिळाला आहे. तुझ्या हातात असलेली बंदूक आमच्यापैकी जास्त लोकांना ठार करणार नाही, पण आमच्या एवढ्या लोकांच्या बंदुकीतील फक्त दोनच गोळ्या पुरेश्या आहेत, तुम्हा दोघांना संपविण्यासाठी, म्हणून बंदूक खाली कर."

प्रकाश, "पण मला का ठार करू पाहता तुम्ही? मी काय बिघडविले तुमचे?"

तो अपहरणकर्ता, "ऑर्डर मिळाले, आणि त्या ऑर्डर ची सुपारी मी घेतली आता तुला ठार व्हावेत लागेल. आणि मी नुकतंच ऐकलं आहे की, तो वीर नावाचा माणूस तूच होय! खरं आहे काय? तूच एवढ्या लोकांना ठार केलास?"

प्रकाश, "कुणी सांगितलं तुम्हाला?"

तो अपहरणकर्ता, "हीच बातमी सर्वत्र पसरू लागली आहे, मार्केट मध्ये! ते असो, मग सांग तुझी शेवटची इच्छा काय आहे?"

खान असिस्टला त्या जागेबद्दल माहीत झाल्यानंतर, प्रकाशच्या काळजीपोटी त्याने आणखी काही आपल्या माणसांना त्या ठिकाणी परिस्थिती सांभाळायला पाठविले. ती माणसं त्या ठिकाणी पोहोचली आणि सर्वत्र गोळ्यांचा वर्षाव होऊ लागला. सर्व लोक आपापले प्राण वाचविण्यासाठी पळापळ करून आपली पोजुशन घेऊ लागले, पण त्या मेन अपहरणकर्ताने बंदुकीचा ताव देऊन, निशाणा प्रकाशवर लावला. ज्योतीचेही त्याच्या इराद्यावर लक्ष गेले. तो अपहरणकर्ता आपल्या बंदुकीची गोळी सोडण्याआधीच ज्योती प्रकाशच्या पुढे आली आणि प्रकाशला लागणारी गोळी तिला लागली आणि तशीच ती खाली कोसळली.
ती खाली पडताच, ते सर्व अपहरणकर्ते तिथून पळ काढू लागले. प्रकाशला समजत न्हवते की, आता तर चांगला चान्स आहे आपल्याला मारायचा पण ते पळ काढत आहेत, पण असे ते अपहरणकर्ते का करत आहेत, हे समजत न्हवते. तो, डोळे बंद करण्याच्या अवस्थेत भिडलेल्या ज्योतीला उचलून तिला म्हणाला, "डोळे बंद करू नको आणि हार पत्करू नको, तुला काहीही होणार नाही!" पण ह्यावर ज्योती म्हणाली, "नाही प्रकाश, इथून दवाखाने खूप दूरवर आहेत! माझे वाचणे खूप अवघड आहे. आपला प्रवास फक्त इथपर्यंतच होता. पण मला खूप आनंद होत आहे की, आपले खरे प्रेम मिळाल्याचे. तुझ्यासोबतचे हे शेवटचे काही दिवस, जेव्हापासून तू इथे आला आहेस, जरी तू चिंतेत घालविला असलास, तरीही खूप चांगले दिवस होते, कमीतकमी माझ्या जीवनातले तरी. मी ह्याच दिवसांना अनुभवू इच्छित होती, माझी इच्छा पूर्ण झाली आता तुझी वेळ आहे, तुझी म्हणजेच आपली इच्छा पूर्ण करण्याची, आपल्या क्लीन वर्ल्डच्या स्वप्नाला साकार करण्याची. आय ओन्ली लव्ह यु, प्रकाश फॉरेव्हर लव्ह यु!" असे म्हणून तिने प्राण सोडले.
प्रकाशला ती गेल्याचे खूप दुःख होऊ लागले. तो मोठमोठ्याने रडू लागला. खूप वेळ रडून झाल्यानंतर, त्याने स्वतःला सावरत, तिच्या प्रेताला घेऊन जाऊ लागला, तिचे अत्यंसंस्कार करायला. पण एवढ्यातच त्याला एक फोन आला. तो फोन होता, योगेशच्या वडिलांचा. ते फोन वर म्हणाले, "ओळ्खलास मला? मी योगेशचे वडील! तू माझ्या मुलाला ठार केलास! मी तुला सोडणार नाही! तुला काय वाटलं? तू माझ्या तावडीतून वाचला, असे तुला वाटले असेल, पण मी मुद्दाम तुला न ठार करता तुझ्या प्रेयसीला ठार केले, म्हणजे हा सर्व प्लॅन होता, तुझ्या डोळ्यांपुढे तुझ्या प्रेयसीला ठार करण्याचा. म्हणजे तुला जाणीव करून द्यायची होती, जेव्हा आपली प्रिय व्यक्ती आपल्यापासून नेहमीसाठी दुरावते, तेव्हा त्याला कसे वाटते, ह्याची जाणीव करून देत होतो. तुला ह्याची जाणीव न्हवती ना, म्हणून जाणीव करून दिली. मला ह्यापेक्षाही खूप जास्त दुःख झाले, जेव्हा माझा स्वतःचा मुलगा योगेश मला सोडून गेला. तुला आत्ताच ठार न करण्याचे दुसरे आणि महत्वाचे कारण म्हणजे, अजून पूर्ण लोकांना तुझ्या काळ्या सत्याबाबत सर्वांना ठाऊक नाही. फक्त काहीच दिवसांत पूर्ण लोकांना ठाऊक होईल. मग मी स्वतः तुला ठार करेल माझ्या हाताने, तेही पूर्ण जगासमोर!"
प्रकाश काही बोलणार एवढ्यातच फोन कट झाला. आणि पुढच्या वेळेस फोन बंद दिसले. प्रकाश पहिल्यांदाच एवढा घाबरलेला होता. त्याने पटकन खान असिस्टला फोन लावला, पण ह्या वेळेस खान असिस्टचाही फोन बंद आढळला. प्रकाशला आता खूप चिंता होऊ लागली. प्रकाश ज्योतीच्या घरी आला. ज्योतीचा खून झाल्याने, ह्याचा प्रभाव, जास्त लोकांवर झाला नाही, फक्त तिच्या आईवडीलांना सोडले तर. कारण ती मुख्यमंत्री न्हवतीच, जरी मुख्यमंत्रीचा म्हणजेच तिच्या वडिलांचा पूर्ण कारोभार ज्योतीच सांभाळत असली तरी. लोकांना हे ठाऊक न्हवते की, तिच्या वडिलांचा पूर्ण कारोभार तीच सांभाळत असते म्हणून, कुणालाही तिच्या जाण्याने फरक पडला नाही. पण प्रकाशचा मात्र एक हात तुटल्यागत परिस्थिती झाली होती. तो तिच्यावर एवढा निर्भर झाला होता की, तो जवळजवळ तिच्याच सहकार्याने आपले पूर्ण मिशन पूर्ण करू पाहत होता. पण आता महत्वाची गोष्ट म्हणजे, त्याचा दुसरा हात, म्हणजे खान असिस्टही त्याचा फोन उचलत नाही आहे, ह्याने त्याच्या चिंतेत आणखीन भर पडली.
काही वेळातच वेगळ्याच नंबर ने खान असिस्टने प्रकाशला फोन केला.
खान असिस्ट, "बॉस मै बोल रहा हूं। इकडची परिस्थिती पूर्णपणे बिघडली आहे बॉस! वो नये CBI ऑफिसर ने जीना हराम कर रखा है! त्याच्या मुलाने म्हणजेच योगेशने गोळा केलेले सर्व पुरावे, नये ऑफिसरने मोठमोठ्या अधिकाऱ्यांपुढे प्रस्तुत केले. इतना ही नही, त्याने ते पूर्ण पुरावे सोशल मीडिया वर एका व्हिडीओच्या मदतीने आपल्याविरुद्ध ते पुरावे सादर करून, आपण व्हिलन असल्याचे लोकांत भ्रम पैदा कर दिया है! यही वजह है की, पोलीसने आपल्या घरावर रेड टाकली. तिथे आपली काम करणाऱ्या काही माणसांना पोलीस पकडून घेऊन गेलीत. अच्छा हुआ वहा नैत्या नही था! पण आता आपल्या पूर्ण प्लॅन बद्दल जवळजवळ सर्वांना ठाऊक झाले आहे, आणि लोकांना हेही कळले आहे की, तुम्हीच वीर आहात! आणि पोलीस तुमचा पिच्छा करत आहेत, पोलीस तुम्हाला शोधत आहेत, त्यांच्या हाती लागू नका! हो सके तो अंडरग्राऊंड हो जाइये आप! जैसे अभि हम हो चुके है! मैने नैत्या को ऑर्डर दिया है की, आपल्या बिनकामच्या सर्व माणसांना ठार करायला, जो गुंडे लोग है! नैत्या ने उन सभी को खतम कर दिया है... अब हमारा बचना बोहोत मुश्किल लग रहा है बॉस!"

प्रकाश, "काय? तू त्या म्हाताऱ्याला घाबरलास? आणि लोकांचं काय? ती तर आपल्याकडूनच आहेत ना! त्यांनाही आपले नवीन विश्व मान्य आहे. ते आपल्याकडूनच पुन्हा होतील आणि आपणच वीर आहोत, हे लोकांना आज नाही तर उद्या ठाऊक होणारच होते. थोडे लवकर ठाऊक झाले, तर काय झाले? राहिली गोष्ट पोलिसांची, मी ज्योतीच्या वडिलांची मदत घेऊन, सर्व पोलिसांना मला न पकडण्याचा ऑर्डर पास करेल. पण तू एक गोष्ट सांग, तू माझ्यासाठी काहीही करायला तैयार आहेस ना?"

खान असिस्ट, "मैने पहले ही कहा था ना, मी तुमच्यासाठी माझी जान ही द्यायला तैयार आहे. तुम्ही फक्त ऑर्डर द्या! पण बॉस, हे वाटतंय तितक सोपं नाही आहे, लोक आपल्या विरोधात उभे आहेत, ते पुन्हा एकदा पालटले आहेत, आपल्या विचारधारेपासून भटकले आहेत. लोकांना ज्या दिशेने वाकविण्याचा प्रयत्न केला, त्या दिशेने लोकं वागत आहेत. कही कही पर तो, आपके खिलाफ रॅली निकल रही है! लोकांना जेव्हा माहीत झाले की, तुम्ही जग बद्दलविणारे नाही, तर आधी एक खुनी होता, ज्याने खूप लोकांना ठार केले, तेही आपल्या स्वार्थापायी, तबसे लोग आपके खिलाफ भडक गये है! आपको मोस्ट वॉन्टेड मर्डरर का खिताब लोगोनेही दिया है! ऊन लोगो पर आप विश्वास मत रखीये!"

प्रकाश, "तुझं बरोबर आहे, लोकांना जशी दिशा दाखविली, तसे ते पुढे जातात, अगदी शेळ्यापप्रमाणे! लोक आज त्याच्या बाजूने आहेत, उद्या आपल्या बाजूनेही व्हायला वेळ लागणार नाही. पण तुला माझं एक काम लगेच करायचे आहे, तेही आजच आणि कुठल्याही परिस्थितीत! ते काम म्हणजे त्या योगेशच्या वडिलांना ठार करण्याचं! तू त्याला कसाही ठार कर, फक्त तो ठार झाला पाहिजे, पुढचं मी सांभाळून घेईल!! तुला मंजूर आहे?"

खान असिस्ट, "मुझे अभी अभी पता चला है की, तो आता पुण्याला नाही आहे! तो इथून गेलाय! कदाचित तो मुंबईलाच, म्हणजे त्याला तुझा पत्ता सापडला असेल! तो तुमच्याकडेच आला असेल, इसलीये कह रहा हू बॉस, आता तरी अंडरग्राऊंड व्हा!"
प्रकाश(घाबरून), "काय? तो मुंबईला आलाय? तो नक्कीच मला अटक करायला किंवा ठार करायला आला असेल! मला सांग, मी आता काय करू? कुठे लपू मी?"

खान असिस्टने, प्रकाशला एका गुंडाच्या घरी, म्हणजेच त्याच्याच हाताखाली काम करणाऱ्याच्या घरी, लपविलेली अंडरग्राऊंड खोली होती, त्याला तिथेच जायला सांगितले. प्रकाश, खान असिस्टचे ऐकून त्या ठिकाणी गेला. प्रकाशने पूर्ण रात्र त्याच लहानश्या खोलीत काढली. प्रकाशला हे मंजूर न्हवते, तो विचार करू लागला की, तो राजा बनणार आहे, ह्या पूर्ण चांगल्या लोकांचा... त्याची अशी दशा त्याला जराही मान्य न्हवती. तो घाबरून त्याच ठिकाणी लपून राहणार, हे त्याला शोभेल असे न्हवतेच. त्याला आता खूप राग येऊ लागला होता. त्याने एक साधारण प्लॅन बनविला, स्वतःला सुरक्षित करण्याचा.
प्रकाशने लगेच, मुख्यमंत्रीला फोन लावला आणि आपल्याविरुद्ध चाललेली इन्वेस्टीगेशन लगेच बंद करायला सांगितले. हे तसे कठीणच होते, पण ज्योतीच्या वडिलांनी म्हणजेच मुख्यमंत्रीने त्याचे म्हणणे ऐकले. त्यांनी CBI ला ऑर्डर दिला, प्रकाशला न शोधण्याचा. इकडे प्रकाशने त्यानंतर खान असिस्टला फोन लावला, आपला पूर्ण प्लॅन त्याला समजावून सांगितला आणि त्याला नैत्याला मुंबईला पाठवायला सांगितले. खान असिस्टच्या म्हणण्यावरून नैत्या, आपल्या पूर्ण टीमला घेऊन, मुंबईला आला. प्रकाशने नैत्याला ऑर्डर दिला की, अश्या प्रत्येक माणसाला ठार करावे, जो आपल्या रस्त्यात अडथडे किंवा आपल्याला फसविण्याचा प्रयत्न करू पाहत आहे, मग तो पोलीस असला वा CBI अधिकारी असला तरी चालेल, पण तो ठार झाला पाहिजे. आणि महत्वाचे म्हणजे उद्याच्या सायंकाळपर्यंत योगेशच्या वडिलांना ठार करण्याचाही ऑर्डर नैत्याला दिला.
मुख्यमंत्रीच्या म्हणण्यावरून, CBI ला, प्रकाशला पकडण्याचे काम थांबवावे लागले, पण जास्त काळासाठी नाही, कारण योगेशच्या वडिलांनी, तो ऑर्डर येताच, लगेचच हाय कोर्टात ह्याबद्दल अपील केली की, मुख्यमंत्री प्रकाशला म्हणजेच एका खुनीला वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत, आपल्या पोस्टचा दुरुपयोग करून. हाय कोर्टाचा निकाल येतपर्यंत, योगेशच्या वडिलांनी पोलिसांची आणि मिल्ट्रीची मदत घेऊन, प्रकाशच्या खाली काम करणाऱ्या एकेक गुंडांना पकडू लागले. काही गुंडांनी दोन चार पोलिसांनाही ठार केले, कारण प्रकाशचेच ते ऑर्डर होते, जे मध्ये येईल त्याला ठार करायचे, पण ह्याचा फायदा योगेशच्या वडिलांना झाला. त्यांनी लोकांत आणि कोर्टात असे सिद्ध केले की, ज्या पोलिसांचा खून गुंडांनी केला, त्या गुंडांना प्रकाशनेच पाठविले आहे, त्यानेच ऑर्डर दिले आहे, ह्यावरून हे सिद्ध होते की, तो स्वतःला वाचविण्यासाठी कुणालाही ठार करायला मागे पुढे बघणार नाही, मग तो पोलीस असो, सैनिक असो, सरकारी अधिकारी असो, वा CBI अधिकारी असो! ह्याव्यतिरिक्त हेही आरोप लावले की, प्रकाशने आपल्याला मारायलाही नक्कीच एखादी प्लॅन बनविला असेल. कोर्टात हे सिद्ध झाले असल्याने, प्रकाशला मोस्ट वॉन्टेड क्रिमिनल म्हणून घोषित केले. सोबतच योगेशच्या वडिलांना कोर्टाने कारवाई करायला सूट दिली आणि लवकरात लवकर प्रकाशला पकडण्याचे आदेश दिले.
प्रकाशला ह्याबाबत ठाऊक होताच, तो आणखीनच घाबरून गेला आणि खूप दुःखी झाला, कोर्टाच्या निर्णयावर. त्याला ह्याहूनही जास्त दुःख ह्याचे होत होते की, लोक कोर्टाच्या ह्या निर्णयावर आनंदी होत आहेत आणि लोकांनाही असे वाटत होते की, पोलिसांनी आपल्याला पकडावे. प्रकाशने शांत होऊन, नैत्यासोबत मिळून, एक महत्वाचा प्लॅन बनविला. पुण्याला असलेल्या खान असिस्टला, लोकांना संबोधून आपला एक व्हिडिओ रेकॉर्ड करून, त्याला पाठविला. खान असिस्टने प्रकाशच्या म्हणण्यावरून त्याच्या युट्युब चॅनेल वर अपलोड केले. त्या व्हिडीओ मध्ये स्वतः प्रकाश लोकांपुढे येऊन, लोकांचे संबोधन करत होता, कारण तसेही लोकांना ठाऊकच झाले आहे की, आपणच 'वीर' होय!
प्रकाशने व्हिडीओ मध्ये लोकांना पटवून सांगितले की, त्याचा फक्त वाईट लोकांनाच ठार करण्याचा हेतू आहे, जेणेकरून सर्व चांगली लोक सुखाने जगू शकेल. हेही पटवून सांगितले की, त्याला पोलिसांना मुळीच ठार करायचे न्हवते, पण ते पोलीस क्लीन वर्ल्डच्या कामाच्या मध्ये येत होते. सोबतच हेही आश्वासन दिले की, एकदाचे क्लीन वर्ल्डचे स्वप्न सत्यात आले की, आणि आपण एक महाराजा बनलो की, वाईट काळ पूर्णपणे नष्ट करणार आणि हे जीवन सत्याच्या आणि चांगल्या मार्गाने चालेल. ह्यासोबतच प्रकाशने खूप मुद्दे लोकांपुढे मांडले आणि लोकांना आपल्या बाजूने वळविण्याचा पूर्ण प्रयत्न केला.
ह्या व्हिडीओचा संमिश्र प्रतिसाद आला. काही लोक प्रकाशचे समर्थनही करू लागले, त्यांना वाटू लागले की, ह्याच्यासारखा माणूस पुढे कधीच जन्म घेऊ शकणार नाही, जो चांगल्या लोकांबद्दलच फक्त विचार करेल. पण खूप लोक ह्याच्या विरुद्धच होते, अजूनही.
योगेशच्या वडिलांनी तो व्हिडीओ कुठून अपलोड झालाय, ह्याचा पत्ता लावणे सुरू केले. पण त्यांना समजले की, ते व्हिडीओ पुण्यातूनच अपलोड झाले असावे. ह्यानंतर योगेशच्या वडिलांनी स्वतः व्हिडीओद्वारे लोकांना म्यासेज दिला की, लोकांनी प्रकाशचे समर्थन करू नये, तो फक्त एक खुनी आहे आणि अश्या खुनी लोकांना शिक्षा मिळणे गरजेचे आहे.
आपल्या व्हिडीओचा प्रति व्हिडिओ काढल्यामुळे, प्रकाशला आणखीनच राग येऊ लागला, त्याने आता आपले शेवटचे प्लॅन बनविले, त्या प्लॅननुसार प्रकाश स्वतः आपल्या लोकांना घेऊन, योगेशच्या वडिलांसोबत पूर्ण CBI टीमला ठार करण्याचा प्लॅन बनविला. एकदाचे योगेशचे वडील आणि त्यांच्या खाली काम करणारे काही अधिकारी ठार झाले की, प्रकाशचे पूर्ण अडथडे संपेल आणि पुन्हा एकदा लोकांच्या पुढे येऊन लोकांना नव्या विश्वाची संकल्पना पटवून देऊन पुन्हा एकदा, पण ह्या वेळी पूर्ण लोकांना आपल्या बाजूने करण्याचा प्रकाशचा पूर्ण प्लॅन होता. पण आता त्याच्यासाठी सर्वात महत्वाचे म्हणजे योगेशच्या वडिलांना ठार करणे बनले आहे.
प्रकाशने ह्यासाठी, नैत्याच्या पूर्ण गुंडांना शस्त्राने लैस करून दिले. त्यांना पूर्ण एडवांस शस्त्र दिले. अगदी दोन चार दिवसांत आपल्या पूर्ण लोकांना ट्रेन करून, आपल्या मिशनवर न्यायचे होते. प्रकाशने पूर्ण CBI टीमचा पत्ता काढला. योगेशच्या वडीलांसह, त्यांची पूर्ण टोळी मुंबईच्या बांद्रा मध्ये एक चौकात, आपल्या इन्वेस्टीगेशन मध्ये व्यस्त होती. रात्रीचे आठ वाजले होते. रस्त्यावर लोकांची गर्दी कमीच होती.
प्रकाश नैत्या आणि तीस चाळीस शस्त्रांनी लैस माणसांना घेऊन, सरळ योगेशच्या वडिलांसोबतच पोलीस आणि काही सैन्यावर हल्ला चढविला. पण त्याआधी प्रकाशच्या एका शार्प शूटरने दुरूनच योगेशच्या वडिलांवर बंदुकीची गोळी सोडली, पण योगेशच्या वडिलांनी अगदी वेळेवर त्या जागेतून मागे सरकल्याने, अगदी थोडक्यात बचावले, योगेशच्या वडिलांना समजलेच की, आपल्यावर गोळी सोडण्यात आलेली आहे, पण त्यानंतर प्रकाशच्या टीमने लगेचच हल्ला चढविला. एकाएकी हल्ला आणि ह्या हल्ल्याची जराही चाहूल न लागल्याने, इन्वेस्टीगेशन टीमला स्वतःला सावरायला जास्त वेळ मिळाला नाही, काही पोलीस तर आपल्या बंदुकीला काढण्याआधीच ठार झालेत. पण वेळेवर सर्वच सतर्क झाले, आणि आपापल्या बाजूला असलेल्या सुरक्षित जागेवर लपु लागले. प्रकाशच्या टीमची अंधाधून गोळीबार सुरूच होता. आपापल्या जागी लपलेल्या इन्वेस्टीगेशन टीमने आपापल्या बंदूक लोड करून घेतल्या. प्रकाशच्या टीमच्या जश्या गोळ्या संपल्या आणि त्याची माणसे जसे रिलोड करू लागलीत, तसेच इन्वेस्टीगेशन टीमने आपला गोळीबार सुरू केला. एडवांस बंदुकी आणि अश्या परिस्थितीचा सराव आणि अनुभव असल्याने, सोबतच टीम मध्ये सैनिकही असल्याने ह्या सर्वांचा फायदा योगेशच्या वडिलांच्या टीमला झाला. प्रकाशच्या एकोन-एक माणसांना ठार करण्याची क्षमता असणाऱ्या टीम ने, नैत्या सकट प्रकाशच्या सर्वच गुंडांना ठार केले. सर्व मृत्युमुखी पडले, प्रकाश आपल्या जागी लपलेला होता. योगेशच्या वडिलांना चांगलेच ठाऊक होते की, प्रकाश नक्कीच कुठेतरी लपलेला असेल, कारण त्यांनी प्रकाशलाही बघितले होते, त्या सर्वांमध्ये, पण आता तो खाली पडलेला दिसत नाही आहे.

योगेशचे वडील(ओरडून), "आता काहीही फायदा उरला नाही, स्वतःला लपवून, म्हणून लवकर समोर ये आमच्या, प्रकाश!"

प्रकाश लपलेल्या जागेवरून विचार करू लागला की आता त्याचे वाचणे खूप मुश्किल आहे, पण आपल्यासोबत योगेशचे वडीलही ठार व्हायला पाहिजे, म्हणून, तो आपली बंदूक घेऊन, निशाणा लावून, उभा होतो, तो गोळी चालविणार, एवढ्यातच एक सैनिक बरोबर आपला नेम लावून, त्याच्या हातातल्या बंदुकीवर नेम लावतो आणि पटकन त्यावर गोळी मारतो. मोठ्या झटक्याने प्रकाशच्या हातून बंदूक सुटते आणि खाली पडते. प्रकाश आपले दोन्ही हात वर करतो. दोन सैनिक त्याला पकडायला येतात आणि प्रत्येकी एक सैनिक त्याचा एक हात पकडून, योगेशच्या वाडीलांपुढे आणतात.

योगेशचे वडील, "तुला सर्वच सोप्प वाटतं काय?म्हणजे तुला वाटतं की तुझ्यापेक्षा कुणीही हुशार नाही? तू आधीच स्वतःलाच राजा घोषित करून घेतला आहेस, जे तुझ्याशिवाय कुणीही तुला राजा म्हणून ओळखत नाही वा संबोधत नाही, पण हा तुझा सो-कॉल्ड राजाचा सफर इथेच संपला आहे प्रकाश!"

प्रकाश, "योगेशने मरण्याआधी, माझा सफर माझ्याच तोंडून निघतानाचे ऑडिओ रेकॉर्डिंग रेकॉर्ड केले आणि तुम्हाला पाठविले, होय ना? सोबतच मृत्यू पूर्वी एक चिट्ठी ज्यात माझे सत्य आणि त्याच्या मरण्याचे कारण मलाच ठरविले होते ना? आणि सोबतच त्याने आतापर्यंत गोळा केलेले संपूर्ण पुरावे तुम्हाला दिले होते ना? तुम्हाला वाटत असेल, मला तुम्ही पकडले आहेत, पण नाही, हे तुमच्या मुलाने केले, पण मला वाटते, माझ्या पूर्ण प्रवासाचे कारण आणि मला नष्ट करण्याचे काम दारूनेच केले आहे. त्या रात्री दारू प्यायलो नसतो तर माझ्या आईला ठार करायची ती वेळच आली नसती, हे झाले माझ्या प्रवासाच्या सुरू होण्याचे कारण, आणि जर योगेशने त्या रात्री दारू प्यायली नसती तर, त्याला मी माझे सत्य मुळीच सांगणार न्हवतो, मला वाटले, तो दारू पिऊन आहे, त्याला काहीही करता येणार नाही, पण त्याचा पूर्ण प्लॅन तैयार होता, तेच मला नष्ट करण्याचा प्लॅन बनला!"

योगेशचे वडील, "योगेश नेहमी तुझ्या घरी येत होता, रोज रोज येऊ लागला होता, व्हिडीओ गेम खेळत होता, मुव्ही बघत होता, सोबतच माझ्या कानावर पडले की, तो तुझ्या बहिणीसोबत लफडं करून बसला होता. मुळात तो बिघडू लागला होता, त्याचे लक्ष अभ्यासात मुळीच लागत न्हवते. मला माझ्या मुलाला माझ्यासारखे बनवायचे होते, पण माझ्या फिल्ड मध्ये माझ्यापेक्षाही मोठा! पण त्याआधी त्याला अभ्यास करावा लागणार होता. तुझी आणि त्याची मैत्री तुटणार नाही, हे मला चांगलेच ठाऊक होते, पण तुझ्यासोबतची मैत्री तुटली नाही तर, तो पुढे जीवनात काहीही करू शकणार नाही, हेही मला चांगलेच ठाऊक होते. त्याच्याकडून एक दिवस वचन घेतले, जर त्याने तुझी सांगत सोडली नाही, तर त्याला मला सोडावे लागेल. आणि ह्या जगात त्याला माझ्याशिवाय दुसरं कुणीच न्हवते, त्याची आई सुद्धा नाही. माझ्या म्हणण्यावरून त्याला, तुला सोडावे लागले आणि अभ्यासात लक्ष घालावे लागले. तो पुढे जाऊन अभ्यासातच मग्न होऊ लागला. तो तुला विसरू शकला, पण तुझ्या बहिणीला नाही, मला तेही मान्य न्हवते, आम्ही दोघे एकमेकांशी बोलत न्हवतो, मुळात मीच त्याच्यासोबत जास्त बोलत न्हवतो, जेणेकरून त्याने तुझ्या बहिणीसोबत राहणे सोडून द्यावे, पण काय करणार त्याचे प्रेम जुडले होते, तुझ्या बहिणीवर आणि ती मला मुळीच पसंत न्हवती. जर तिच्याशी ह्याचे लग्न झाले तर, त्याचे आयुष्य नक्कीच नष्ट होईल, असे मला वाटत होते. त्याने माझे स्वप्न पूर्ण केले, तो माझ्यासारखाच CBI अधिकारी बनला, पण माझ्यापेक्षा कर्तृत्ववान त्याला बनवायचे होते. तो CBI ऑफिसर बनल्यानंतर मला म्हणाला की, त्याला आता मोनामध्ये, म्हणजेच तुझ्या बहिणीच्या कुठलाही इंटरेस्ट राहिलेला नाही. तो तिला विसरून दुसऱ्याशी लग्न करून आनंदी राहील, अगदी माझ्या मता प्रमाणे होऊ लागले होते, मी आनंदी झालो, पण काही दिवसांनी त्याचे मन बदलले, तो पुन्हा मोनाच्या प्रेमाच्या जाळ्यात गुंतू लागला, पैश्यापोटी! पुढे जाऊन तर तो मोनासोबतच लिव्ह इन प्रमाणे राहू लागला. त्यांनंतर तो फक्त आणि फक्त तुझ्याच केस वर फोकस करू लागला. मला हे मुळीच मान्य न्हवते. कारण तो वेगवेगळे केस हँडल केले नाही तर, तो स्वतःला चांगला अधिकारी म्हणून सिद्ध कसे करेल, हे मला समजत न्हवते. त्याला लाख समजावून तो माझे ऐकत न्हवता, म्हणून मी रागात माझ्यासोबतचे संबंध संपवून टाकले. हे त्याला मुळीच नको होते, तो मला समजावून सांगू लागला की, प्रकाश वर फोकस करणे किती गरजेचे आहे. तो मला पटवून सांगू लागला की, प्रकाश एक खुनी बनला आहे, तो सर्वांचे खून करत निघाला आहे, त्याला अडविणे खूप गरजेचे आहे, पण मला त्याच्या बोलण्यावर जराही विश्वास बसत न्हवता. कारण मी तुला चांगल्या प्रकारे ओळखत होतो, जेवढे मला ठाऊक होते की, तू खूप साधा भोळा मुलगा आहेस, छोटी मोठी चूकही न करणारा, मग खुनासारखा एवढा मोठा गुन्हा कसा करेल? योगेशबद्दलचा माझा राग पुन्हा वाढू लागला. मी योगेशसोबत जराही बोलत न्हवतो, मला त्याचा चेहराही बघायचा न्हवता, पण मरण्याच्या काही दिवसांपूर्वी माझ्याजवळ आला आणि त्याच्यावर विश्वास ठेवायला सांगितले, मी तरीही त्याचे एकलो नाही, त्याने त्याचा प्लॅन समजावून सांगितला, प्लॅननुसार तो तुला त्याच्या घरी बोलवेन, तुझ्या तोंडून कुठल्याही परिस्थितीतुन तुझे सत्य काढेल आणि ती रेकॉर्डिंग मला पाठविणार. त्यासाठी त्याने दूरवर ड्रोन लावले होते, त्या ड्रोनवर माईक लावलेले होते, त्यात ते रेकॉर्ड होऊ लागले होते. आणि मरण्याआधी त्याने ते रेकॉर्डिंग मला पाठविले. त्याने मला हे सांगितले नाही की, तो ह्यासाठी स्वतःला संपविणार आहे म्हणून! त्याच्या मते त्याची केस मला लढायची होती. पण जर त्याने स्वतःला संपविले नसते तर, मला अजूनही त्याच्यावर विश्वास बसला नसता, तो आज ह्या जगात नाही, ह्याचे दोष मी माझ्यावर घेतो, हे माझ्यामुळेच झाले, मला माझ्या मुलावर विश्वास ठेवायला हवे होते, आधीच! पण त्याच्या जाण्यामुळेच, त्या रागाद्वारेच मी तुझ्या रस्त्याची भिंत म्हणून उभा राहू शकलो!"

प्रकाश, "हे बघा! ह्यात कुणाचीही चूक नाही!! हे सर्व परिस्थिती मुळे झालेले आहे, आपापल्या परिस्थितीमुळे! पण मला प्लिज सोडा! मी स्वतःसाठी जगत नाही आहे, मी स्वतःचा फायदा मुळीच बघत नाही आहे, मी हे सर्व समाजासाठी, आपल्या चांगल्या लोकांसाठी, त्यांच्या सुरक्षिते साठी आणि चांगला समाज घडविण्यासाठी असे करत आहे. ह्यामुळेच तुम्ही बघू शकता, गुन्हे पूर्ण कमी झाले आहे, हे फक्त लोकांना पसरलेल्या माझ्या भीतीमुळे! जर गुन्ह्याची शिक्षा मृत्यू असेल तर, कुणीही गुन्हा करणार नाही, आणि गुन्ह्याचा शिकार चांगला माणूस होणार नाही, उलट वाईट माणूस चांगला बनेल! ह्याने माझा काय फायदा? मी फक्त एक सर्वांचा योद्धा म्हणून काम करत आहे, सर्वाना आरसा दाखविण्याचे! प्लिज मला जाऊ द्या! सर्वच नीट होईल... आणि मी वचन देतो, कुठल्याही चांगल्या माणसाचा ह्यापुढे बळी जाणार नाही ह्याचे! पण मला जाऊ द्या हो!"

योगेशचे वडील, "तुला वाटतं तू खूप चांगले काम करत आहेस? तुला वाटतं तू एक योद्धा आहेस? ह्यामुळे बाकी काही नाही, पण समाजात विषमताच पसरेल, लोकांचे स्वतंत्र नसल्यासारखे वाटेल, तू योद्धा बनला म्हणजे लोक तुला राजाचा दर्जा देतील, मग आपले राज्य हुकूमशाहीच्या मार्गाने जाईल, लोकशाही पूर्णपणे उध्वस्त होईल. असे राज्य जास्त काळ टिकणार नाही. पण महत्वाचे गोष्ट म्हणजे, तू उठलाही योद्धा नाहीस, तू फक्त एक सायको सीरिअल किलर आहेस! वेडा खुनी!! हेच तुझे सत्य आहे, तुला फक्त लोकांना ठार करण्याची भूक आहे, जर असे नसते, तर तू पोलिसांवर, सैनिकांवर किंवा माझ्यावर कधीच हल्ला चढविला नसता, त्या दिवशी आपल्या गुंडांद्वारे पोलिसांना मारला नसताच! तू पोलिसांवरही हात उचललास, त्यांना मारलास ह्यावरून हे सिद्ध होते की, तू चांगल्या लोकांनाही ठार करू शकतोस, जर तुझ्या विचारात ते बसले नाहीत तर! ह्याचा अर्थ तू फक्त आणि फक्त सायको सीरिअल किलर आहे, बाकी काही नाही! आणि तुझी शिक्षा फक्त मृत्यूच आहे!"

प्रकाश(रडत), "नाही! मी ह्यापुढे कोणत्याही चांगल्या माणसांना ठार करणार नाही! मी..."

प्रकाश पुढे काही बोलणार, पण एवढ्यातच खान असिस्ट पाच हेलिकॉप्टर घेऊन, त्या ठिकाणी आला. हेलिकॉप्टर मधून गुंड उतरून, सर्वांवर हल्ला चढवू लागलीत. सर्व पोलीस आणि सैन्य पळापळ करू लागलीत, आपापली पोजिशन घेण्यासाठी. पण जसे सर्व सैनिकांनी आणि पोलिसांनी आपापली पोजिशन घेतली, तसेच त्या सर्वांवर गोळीबार करणे सुरू केले. खान असिस्टचे गुंडांनी आपल्याला बुलेटप्रूफ जॅकेट आणि शिल्ड सोबत आणल्याने ह्याचा फायदा होऊ लागला. पण तरीही खान असिस्टची गुंड मरु लागलीत. योगेशचे वडिलांनीही लपून नेम लावून काही लोकांना ठार केले, पण मध्येच ते थांबले आणि पुन्हा लपलेत. अगदी पाच मिनिटांच्या गोळीबारीत दोन्ही बाजूचे खूप लोक ठार झालेत. पण पोलीस आणि सैनिकांच्या गोळ्या संपल्यात... ह्याचाच फायदा घेऊन, प्रकाशने तिथून पळ काढला, तो धावत खान असिस्टने फेकलेल्या दोरीकडे जाऊन , त्या दोरीला पकडायला निघाला. सैन्याच्या आणि पोलिसांच्या पूर्ण गोळ्या संपल्या होत्या, पण योगेशच्या वडिलांच्या बंदुकीत चार गोळ्या पुन्हा शिल्लक होत्या, त्यांनी मुद्दाम काही गोळ्या ठेवल्या होत्या. ते लपलेल्या जागेतून बाहेर आले, आणि मागून प्रकाशवर निशाणा लावला आणि पटपट त्याच्या पाठीवर चारही गोळ्या, वेगवेगळ्या ठिकाणी मारल्यात. पण तरीही प्रकाश आपली हिम्मत दाखवत हेलिकॉप्टर मध्ये बसला. एवढ्यातच सैनिकांची दुसरी तुकडी तिथे हजर झाली, ते गोळीबार करणारच, पण एवढ्यातच योगेशच्या वडिलांनी त्या सैनिकांना थांबविले, त्यांना पुन्हा गोळीबार न करण्याचे ऑर्डर दिले.
खान असिस्ट आणि प्रकाशचे हेलिकॉप्टर तिथून दूर निघाले.

प्रकाश, "खान असिस्ट, मला वाचव! मला मारायचे नाही आहे... मला दवाखान्यात घेऊन चल!"

खान असिस्ट, "चिंता मत किजीए बॉस! आपको कुछ भी नाही होगा! मी आहे ना, मी तुम्हाला काहीही होऊ देणार नाही, बस आप हिम्मत मत हारिये!"

प्रकाश, "आपण जिंकलोय खान असिस्ट! आपण जिकलोय! आपले स्वप्न नक्कीच साकार होणार आहे, तेही लवकरच!"

खान असिस्ट, "हां बॉस! आपली मेहनत आता रंगून येत आहे, हम जीत चुके है!"

अश्यातच खान असिस्टला एक फोन आला. आणि फोन वर बोलूनच त्याचा चेहरा पूर्णता उतरला. त्याने हेलिकॉप्टर पायलटला, पहाडकडे घेऊन जाण्यास सांगितले.

प्रकाश, "काय झालं खान असिस्ट? तुझा चेहरा का उतरला? कुणाचा फोन होता? आणि आपण इकडे कुठे चाललोय?"

खान असिस्ट काहीही बोलला नाही, पण जंगलाआधी, एका खुल्या ठिकाणी हेलिकॉप्टर लॅन्ड करायला सांगितले.

प्रकाश, "इथे येणार आहेत काय डॉक्टर? मला इथे का आणले?"

खान असिस्ट, "सॉरी बॉस! पर हम हार चुके है! आपल्याला कोर्टाने दहशतवाद म्हणून घोषित केले आहे, अपने पर पाच पाच करोड का इनाम भी रखा हुआ है! हर जगह पोलीस और सैनिक है! आपण ह्या जागेतून कुठेच जाऊ शकणार नाही, कारण पोलिसांना आपण कुठेही आढळलो तर ते आपल्याला शूट करतील! आपल्याला दहशतवादी घोषित केल्याने लोकही रस्त्यावर उतरली आहेत, त्यांनाही आता आपले मृत शरीरच बघायचे आहे! आपले वाचणे अशक्य आहे बॉस! हम हार चुके है!"

प्रकाश, "नाही! आपण ह्यातूनही काहीतरी मार्ग... नाही,.. नाही निघणार मार्ग! आपण ज्या लोकांसाठी चांगले करू इच्छित होतो, आज तेच लोक आपले वाईट बघू इच्छित आहेत. माझी खूप मोठी चूक झाली, सर्व लोकांचा कल्याणाचा विचार केलो! जर मला ठाऊक असते की, तेच लोक मला दहशतवाद म्हणून घोषित करणार, मी हे पाऊल मुळीच टाकले नसते. मी स्वार्थी नाही आहे... मी एक फक्त एक शुभचिंतक आहे! मला मारायचे नाही आहे खान असिस्ट!! "

प्रकाशने आपले डोळे मिटले आणि आपले आधीचे क्षण आठवू लागला, जेव्हा तो साधा भोळा आणि प्रेमळ मुलगा होता. जो कुणालाही त्रास देत न्हवता, सर्वांचा चांगला विचार करत होता. त्याला राखी सोबतचेही आधीचे क्षण आठवू लागले...
खान असिस्टने, प्रकाशच्या डोळ्यातून पाणी निघताना बघताच, आपली बंदूक काढली आणि प्रकाशच्या डोक्यावर एक गोळी मारली आणि दुसरी गोळी आपल्या डोक्यावर बंदूक लावून मारली...
अश्याप्रकारे प्रकाशज्योत(प्राणज्योत) मावळली!

तिकडे योगेशच्या वडिलांनी, प्रकाशच्या वडिलांना फोन लावला आणि त्यांचे धन्यवाद केले, कारण त्यांनी त्या दिवशीचे हिडन CCTV फुटेज योगेशच्या वडिलांना दिले आणि त्यांनीच प्रकाश सारख्या सायको खुनीला ठार करण्यासाठी सांगितले होते.

काहीही झाले तरी प्रकाशचे स्वप्न सत्यात उतरले! त्याचे स्वप्न होते की, त्याच्या राज्यातील सर्व वाईट लोक ठार होऊन, फक्त चांगल्या लोकांचा समाज राहावा, जेणेकरून सर्व चांगली माणसे सुखाने जगू शकेल. वाईट माणसांना प्रकाश आणि त्याच्या टीमने ठार केले शेवटी उरला फक्त प्रकाश, तोही सर्व लोकांना ठार केल्याने वाईट ठरला होता, तोही आता नाही!


(पूर्ण कथा पूर्णपणे काल्पनिक! वास्तविक जीवनाशी कुठलाही संबंध नाही, नाही ह्या कथेचा नाही येथील पात्राचा!)

इथपर्यंत जुळून राहिलेल्या सर्व लोकांचे आभार! जेवढ्यानीही ही कथा वाचली, सर्वांना कशी वाटली, हे नक्कीच सांगा! कॅमेन्ट मध्ये काहीतरी लिहा, कथेबद्दल, धन्यवाद!!

उत्कर्ष दुर्योधन लिखित...