Friendship - also a form - 3 in Marathi Fiction Stories by vaishnavi books and stories PDF | मैत्री - एक रुप असेही - 3

Featured Books
Categories
Share

मैत्री - एक रुप असेही - 3

कॉलेज सुटल्यानंतर विहान घरी येतो. फ्रेश होऊन हॉल मध्ये येतो. आज्जी आई अजून आली नाही का?
(विहानची आई एक NGO चालवत होती. )
नाही अरे अजून नाही आली ती येईल इतक्यात.मग कसा गेला आजचा दिवस? अग आज्जी खूप छान गेला आजचा दिवस😊 ,खुप छान कॉलेज आहे. आणि माझा। एक मित्र पण झाला बघ रोहन नाव आहे त्याच. आणि ........, आणि काय? पुढे बोल ,अग आज्जी मी क्लास शोधताना एका मुलीला माझा धक्का लागला आणि ती खाली पडली .मग? मग काय मी तिला सॉरी बोललो, माझा चुकून धक्का लागला होता तीला माझ लक्ष नव्हत.
जाउदे रे तु मुद्दाम नाही ना केल काही मग जाउदे.
काय गप्पा चालल्या आहेत मला पण सांगा? विहानची आई आत मध्ये येत म्हणाली.
आज्जी: सुमती काही नाही कॉलेज कस आहे विचारत होते.
सुमतीःमग विहान कस वाटल कॉलेज ? शिकवायला सुरुवात केली असेल ना?
विहानःखुप छान आहे कॉलेज, एकदम फ्रेश वातावरण आहे. आणि माझा एक मित्र पण झाला आहे. हो शिकवायला सुरुवात झाली आहे. रोहन मला मदत करणार आहे स्टडी मध्ये.
रेवा, अवनी, नेहा पण घरी पोहचतात. आणि बाय बोलून निघतात. रेवाचा हात थोडासा दुखत असतो. हात धरून ती घरात येते.
काय ग रेवा हात पकडून का तशी उभी आहेस? काही लागले का तुला ?
हो अग सकाळी पडले मी कॉलेज मध्ये.
काय ग नीट बघुन चालता येत नाही का तुला, अशी कशी ग वेंधळी तु.
अग आई मी निटच चालत होते, 😏बर जाउदे मला भुक लागली आहे खायला दे काही तरी मी आलेच फ्रेश होऊन.
आई नेहा आणि रेवा कडे जाऊन आले. काय ग अवनी दिवस भर तर तुम्ही सोबत असताना मग रात्री टेरेस वर जाऊन काय करता?
अग आई आलेना पाच मिनिटांत, तुझी पाच मिनिटे म्हणजे तास भर तु काय येत नाही.
काय ग अवनी आज पण आईने थांबले काय तुला? नेहा अवनीला म्हणाली.अग तिच सोड आज तर आई मला येऊच देत नव्हती म्हणाली हात दुखतोय तर झोप म्हणून.
अवनीः काय ग रेवा हात अजून दुखतोय तुजा ?
रेवाः नाही अग आता नाही दुखत.
नेहा: काय ग रेवा तु तर खूप झापल असेल ना त्याला? बिचारा, एक तर तुझी चुकी नव्हती .
रेवाः काही बिचारा नव्हता तो, त्याने मुद्दाम केल असनार बघ, सॉरी सॉरी बोलत होता, तरी मी जास्त काही नाही बोलले त्याला परत माझ्या वाटेच जाऊदे त्याने मग सांगते त्याला.
नेहा : हम्म मला माहीत होते तु शांत कशी बसणार,तुझा राग चांगलाच माहिती आहे मला,आणी तो कशाला आतातुज्या वाटे जाईल तो तर तुज सकाळच रूप बघून च पळून जाईल.😂
रेवा : अच्छा म्हणजे तुला म्हणायचय का मी खुप रागीट आणि खडूस आहे तर? 😈😈
नेहा : हम्म ,हो
तुज्या तर अस म्हणत रेवा नेहाच्या मागे पळाली, त्यांची ही टॉम अँड जेरीची भांडण बघून अवनी पोट धरून हसत होती.😂😂😂 शेवटी ती मध्ये पडली, तुमच भांडुण झालेअसेल तर जायच का आपण? मग तिघींनी एकमेकींना good night विश करून निघतात.
रोजचा दिवस जरी सोबत घालवला असला तरीही त्या रोज रात्री टेरेस वर भेटायच्या गप्पा मारायच्या, मस्ती करायच्या आणि मग घरी जायच्या.
ईकडे विहान रात्री झोपताना विचार करत होता. उद्या तिला परत एकदा सॉरी बोलतो. एकाच क्लास मध्ये आहोत आणि माझ्या मुळे बहुतेक तिच्या हाताला पण लागलेय दिसतय.
दुसर्‍या दिवशी विहान लवकरच कॉलेजलला येतो. आणि रेवा ला शोधत असतो पण ती अजून आली नसते. तेवढ्यात रोहन तिथे येतो, काय रे आज लवकर आल तु? हम्म एक काम होत, आणि तो रोहन ला कालचा प्रकार सांगतो.

आता बघु रेवा काय म्हणतेय विहानला तो पर्यंत stay tune gay's आजचा भाग कसा वाटला नक्की सांगा नाहीतर मला कस कळनार तुम्हाला story आवडतेय की नाही?

Stay safe stay home ❤
Vaishnavi 🍁