Bhutkal - 1 in Marathi Biography by Hari alhat books and stories PDF | भूतकाळ - 1

Featured Books
  • પિતા

    માઁ આપણને જન્મ આપે છે,આપણુ જતન કરે છે,પરિવાર નું ધ્યાન રાખે...

  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

  • હાસ્યના લાભ

    હાસ્યના લાભ- રાકેશ ઠક્કર હાસ્યના લાભ જ લાભ છે. તેનાથી ક્યારે...

  • સંઘર્ષ જિંદગીનો

                સંઘર્ષ જિંદગીનો        પાત્ર અજય, અમિત, અર્ચના,...

  • સોલમેટસ - 3

    આરવ રુશીના હાથમાં અદિતિની ડાયરી જુએ છે અને એને એની અદિતિ સાથ...

Categories
Share

भूतकाळ - 1

सन १९५५ मुंबई मधील एक उपनगर चेंबूर ज्याला चेंबुरची खाडी म्हणायचे . मुंबई वरून ठाणे या ठिकाणी यायचे असेन तर हायवे वरून सरळ मार्गाने यावे लागत होते हायवे शेजारी किमान दहा घरांची वस्ती वस्ती मध्ये राहत असलेले सर्व परिवार हे गरिबीत जीवन जगत होते त्याचे कारण एकच होते ते म्हणजे व्यसन झोपडपट्टीत राहात असलेल्या सर्व पुरुष यांना स्प्रिट ( घरात लावण्याच्या रंगा मध्ये मिश्रण करण्या साठी आणि रंगाने भरलेले हाथ धुण्यासाठी वापर होत असलेले एक द्रव्य ) ह्या पासून बनत असलेली खोपडी . स्प्रीट ला हे नाव देण्यात आले होते ती बनविण्यासाठी एका लाकडी काडीला कापूस किंवा सुती कपडा गुंडाळायचा आणि एका डालड्या चा डब्बा ज्याला टिपरी म्हणायचे त्यात पाणी आणि स्प्रीट टाकून लाकडी काडीने गोल हलवत राहायचे काही वेळाने पाणी आणि स्प्रिट मधून गुळा सारखा चिकट पदार्थ काडीला असलेल्या कापडाला गोळा होत होता त्या नंतर सुद्धा टीप्रितल्या पाण्याला कपड्याने छाणून दारू सारखे पित होते .. असे त्यांचे व्यसन त्या मुळे त्या सर्वांना टी बी . दमा . आंधळेपणा. किंवा हाथ पाय थर थर कापणे या सारखे आजार होते . तर काही पुरुषांना गांजा पिने आवडायचे. अश्या लोकांची ती वस्ती व्यसनं असल्या मुळे त्यांना काम धंधा करता येत नव्हता म्हणून त्यांच्या महिला ह्या लहान मुलांना दोन घास अन्नाचे मिळावे या साठी कागद. पत्रा ( भंगार ) गोळा करून मुलांना खाऊ घालत होत्या आणि आपल्या नवऱ्याला सुद्धा व्यसन साठी पैसे देत होत्या. एखादया दिवसी कागद पत्रा गोळा करून पैसे कमी मिळाले तर संध्याकाळी नवऱ्याचा मार खावा लागत होता नाहीतर मुलांना उपाशी ठेवावे लागत होते.. बापाच्या अश्या व्यसनं मुळे मुलांना शाळा म्हणजे कशाला म्हणतात हे सुद्धा कळत नव्हतं. मुलांच्या व मुलींच्या अंगावर नीट नेटके कपडे नसायचे तर केस विस्कटलेले असायचे वस्तीच्या उजवी कडे थोड्या अंतरावर तांदळाची शेती असायची त्या ठिकाणी कोकणी समाजाची काही घरे होती बहुतेक ते गावं आहे असे वाटायचे . त्यांचा राहणीमान सुद्धा स्वच्छ होता. वस्तीच्या डावी कडे किमान ३० घरे होती त्या ठिकाणी मद्रासी समाजाची लोकं ज्यांना अण्णा बोलत होते ते राहत होते त्यांचा व्यवसाय म्हणजे हार फुल गजरा इडली डोसा वडा सांभर चिक्की शेंगदाणे चने विकून पैसा कमविणे. तर काही अण्णा लोकं सिनेमाची पोस्टर्स बनवत असत. तर काही धारावी वरून टायर ट्यूब मध्ये दारू आणून विकत होते त्यांच्या कडे पैसा असल्या मुळे गरीब लोक त्यांना घाबरत असे कोकणी. कोळी मात्र घाबरत नव्हते . एक अण्णा गावी गेला तर येताना दहा लोकांना घेऊन येत होता त्यांची लोकसंख्या वाढत होती. तर मुंबई पूर्वी सायन पर्यंत होती त्या नंतर उपनगरे होती. हे आण्णा लोकं मुंबई मध्ये खूप गुन्हेगारी करायचे तेव्हा त्यांना मुंबई मधून तडीपार केले तर पोलीस त्यांना सायन किंवा माहीम च्या पुढे आणून सोडायची म्हणून सगळे मुंबई व्ही टी ते सायन धारावी चे तडीपार चेंबूर ची खाडी येथे राहत होते. त्या काळी मुंबई मध्ये खूप दंगली होत होत्या तरी सुद्धा बाहेरची लोकं मुंबई कडे रोजगार करण्यासाठी धाव घेत होते. मुंबई मध्ये राहण्या साठी घर मिळत नव्हते म्हणून धारावी ची खाडी किंवा चेंबूर हे अण्णा लोकांना योग्य वाटतं होते तर गुजराती आणि मारवाडी यांना घाटकोपर तसेच मुस्लिम लोकांना बांद्रा येथील बेहराम पाडा किंवा भारत नगर मध्ये घरे बांधता येत होती. त्याचे कारण म्हणजे चेंबूर ही उद्योग नगरी होती. मोठ मोठ्या कंपन्या चेंबूर मधेच होत्या आणि आताही आहेत. तर त्या काळी चेंबूर मध्ये शंभर टक्के चित्रपट पूर्ण होत होते. रोजगार ही चांगला मिळत होता.Rk.बसंत.आशा इसेल . गोल्फ क्लब. अशी नावाजलेल्या स्टुडिओ . तसेच सेंट अँथनी चर्च.m s खन्ना बंगलो. डायमंड गार्डन.ट्रॉम्बे.या सारखे अनेक ठिकाणं होती ज्या मुळे रोजगार खूप होता हेच कारण ज्या मुळे चेंबूर ची लोकं संख्या वाढत होती . एवढा रोजगार असताना सुद्धा मराठी मातृ भाषिक व्यसन मधेच दंग होते........................................................ शेष पुढील भागात