The mother has to rent in Marathi Moral Stories by Hari alhat books and stories PDF | आई भाड्याने देणे आहे

Featured Books
  • BTS Femily Forever - 9

    Next Ep,,,,  Suga उसके करीब गया तो काजल पीछे हट गई। Suga को...

  • तेरे मेरे दरमियान - 40

    जानवी हैरान थी के सुबह इतना कुछ होने के बाद भी आदित्य एक दम...

  • Salmon Demon - 5

    सुबह का उजाला गांव पर धीमे और थके हुए तरीके से उतरा. हवा में...

  • छठा कमरा

    नीहा को शहर में नई नौकरी मिल गई थी। कंपनी ने उसे एक सुंदर-सा...

  • एक खाली पन्ने की कहानी

    कहते हैं दुनिया की हर चीज कोई ना कोई कहानी होती है कुछ ऊंची...

Categories
Share

आई भाड्याने देणे आहे

* आई भाड्याने देणे आहे !*

सुनिता न्युज पेपर च्या ऑफिस मधे जाहीरात विभागात काम करीत होती.नेहमीप्रमाने आज देखिल ती आलेल्या जाहीरातीची व्यवस्थीत मांडणी करून ती प्रिंटीग ला पाठवण्यात बिझी होती.. अचानक तिच्या टेबलजवळ साठ वर्षाच्या वयस्कर बाई येऊन उभ्या राहील्या.सुनिताचे लक्ष गेले तिने बसायला चेअर दिली.त्या थकल्या सारख्या व हताश दिसत होत्या त्याना धाप पण लागली होती. तिने लगेच त्यांना पाणी दिले .थोड थांबुन त्या बोलल्या मला जाहीरात द्यायची आहे..सुनिताने विचारले कशासंदर्भात आहे.तुम्ही सांगा मी पहिल्यांदा कच्च लिहून घेते.व मग आपण फेअर करुया.त्या थोड्यावेळ घुटमळल्या..मग कसातरी आवंढा गिळत त्या म्हणाल्या ..आई भाड्याने देणे आहे ! सुनिताचा हात थबकला तिचा आपल्या कानावर विश्वासच बसत नव्हता.. काकु तुम्ही हे काय वेड्यासारख म्हणताय..आई कधी कुणी भाड्यानी देत का ? काकु मात्र पुढे बोलत होत्या.सुशिक्षित,प्रेमळ,मुलांचा सांभाळ करेल, अपेक्षा दोन वेळचे जेवण,आणि राहायला छत..बस्स आणखी काही नको असे म्हणत काकुंनी डोळ्याला पदर लावला पुढचे बोलणे शक्य होत नव्हते आणि अश्रुंचे ओघळ मात्र गालावरुन वाहणे थांबायचे नाव घेत नव्हते.
सुनिता लगेच चेअर वरून उठली काकुच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला व म्हणाली,काकु चला आपण बाहेर बसुन बोलुया ..काकुला घेऊन ती बाहेर आली त्यांचा हात हातात घेऊन ती म्हणाली ..मला सविस्तर सांगा ईतका जगावेगळा निर्णय का घेतला तुम्ही ?..
आता काकु एक ऊसासा टाकुन बोलु लागल्या ..माझे नाव अनुराधा जोशी .मी सोळा वर्षाची असतांनाच माझे लग्न झाले.घरात मोठे असल्यामुळे सर्व जबाबदारी माझ्या ह्यांच्यावर होती.ह्यांची अर्धांगिनी म्हणुन मी पण ती आनंदाने स्विकारली. तीन भाऊ,दोन बहीणी सर्वांचे शिक्षण ,लग्न केले.मात्र लग्न होताच सर्वांनी आपआपले बि-हाड वेगळे थाटले .खुप वाईट वाटले पण हे म्हणाले अग आपले दोन मुल , मुलगी आहेत ना ते कधीच आपल्याला अंतर देणार नाहीत . तिघांचे ही लग्न झाले सुना,जावाई आले .खुप आंनदी होतो आम्ही .हार्ट अटॅक चे निमित्य झाले आणि हे सुध्दा सोडून गेले.मी स्वतःला समजाविले मी एकटी कुठे आहे .मुल ,सुना ,जावाई ,नातवंड माझ्या भोवती तर गोकुळ आहे ..पण काळाच्या ओघात दोन्ही मुलं वेगवेगळी राहायला लागली .तरी सुध्दा मी समाधानी होते.कधी या मुलाकडे तर कधी त्या .मी माझे शेवटचे दिवस अगदी आनंदात काढणार ह्या विचाराने खुष होते..पण अचानक एक दिवशी घरात मुलाची व सुनेची कुजबुज सुरू दिसली मी आडोशाला ऊभी राहीली अन् कानावर पडले ..आईला कुणाकडे ठेवायचे.माझा मुलगा समजावित होता अग राहु दे तिला आपल्याकडे आपल्या मुलांचा सांभाळ करेल.सुन लगेच म्हणाली नको त्या करीता आया ठेवते मीे.उगाच त्यांची दुखणी-खुपनी करणे मला जमणार नाही.त्या पेक्षा त्यांना वृद्धाश्रमात पाठवा.हे ऐकुन धक्का बसला व पायाखालची जमीनच सरकली.मुलीला फोन केला .तिच्या अडचणीच्या काळात खंबीरपणे तिच्या पाठिशी उभे राहीले होते मी ...वाटले तिला तरी माझी कदर असेल .पण ती बोलली अग मला माझ्या नव-याने सासु सास-यांनी घराबाहेर काढले तेव्हा तुझ्या मुलांनी नव्हते ठेवुन घेतले मला ...तु पण नेहमी माझ्या मुलापेक्षा दादांच्या मुलांकडे जास्त ओढ दाखवायची ..आता कुठे मला चांगली नौकरी लागली सुखाचे चार दिवस आले तर तुझ ओझ मला नाही झेपणार कारण मुलाला मी शाळेत पाठविते व निश्चिंत होऊन ऑफिसला जाते तुला ठेवले तर ऊगीच काळजीत दिवस जाईल माझा..अग जगु दे मनासारख आता तरी.. नाही तुला कसे ठेऊ..तु बघ परत प्रयत्न करुन दादाकडे ......दुस-या मुलाने तर चक्क घर लहान आहे त्यामुळे मी राहिली तर त्यांना privacy मिळणार नाही...असे बोलुन दाखविलेे..हे सर्व ऐकलेे..आणि आजपर्यत केलेल्या त्यागाचा,निस्वार्थपणाने ऊधळलेल्या प्रेमाचा पराभव झाला असे वाटले..खुप रडले आणि ठरविले आता ईथे एक क्षण देखील राहायचे नाही ..... कुणाला तरी माझी गरज असेल ..एका आईची ..म्हणुन मी ईथे आले..एव्हाना सुनिताचे डोके तर पार सुन्न झाले होते..एका आईवर अशी वेळ यावी ..तिन-तिन धडधाकटी कमावती मुलं असुन देखील एका आईवर अशी वेळ यावी ..ती जवळ जाऊन.काकुच्या मांडीवर हळुच डोक ठेऊन म्हणाली, काकु भाड्याने राहायची तुला गरज नाही..मला मात्र तुझी गरज आहे .खरच मला आई हवी आहे.तु माझी आई होशील. मुलगी म्हणुन मलाच भाड्याने घे ना .असे म्हणत सुनिता काकुंना घेवुन फ्लॅटकडे निघाली चेह-यावर एक वेगळेच समाधान घेवुन !