Aaiche majhya jivnatil astitva kuthe harvle - 7 in Marathi Fiction Stories by Rajashree Nemade books and stories PDF | आईचे माझ्या जीवनातील अस्तित्व कुठे हरवले? - 7

Featured Books
  • Fatty to Transfer Thin in Time Travel - 13

    Hello guys God bless you  Let's start it...कार्तिक ने रश...

  • Chai ki Pyali - 1

    Part: 1अर्णव शर्मा, एक आम सा सीधा सादा लड़का, एक ऑफिस मे काम...

  • हालात का सहारा

    भूमिका कहते हैं कि इंसान अपनी किस्मत खुद बनाता है, लेकिन अगर...

  • Dastane - ishq - 4

    उन सबको देखकर लड़के ने पूछा की क्या वो सब अब तैयार है तो उन...

  • हर कदम एक नई जंग है - 1

    टाइटल: हर कदम एक नई जंग है अर्थ: यह टाइटल जीवन की उन कठिनाइय...

Categories
Share

आईचे माझ्या जीवनातील अस्तित्व कुठे हरवले? - 7

भाग ७
तु आज माझ्यापासून दूर आहे,पण मला कायम असे वाटते की,तु नेहमीच माझ्या सोबत आहे.तु शरिराने माझ्या सोबत नाहिस,पण मला कायम तुु कुठल्या ना कुठल्या रुपात तु माझ्याजवळ असल्याचा भास होतो.आई आणि तिच्या मुुुलांंचे नातेे इतके घट्ट असते की,आपल्या मुुुलांंकडुुन कितीही चुुुका झाल्या असतील तरी,ती आई कुठेही असली तरी,जन्नत मध्ये असली तरी तिथुुुन आपली काळजी घेत असते,असे मला वाटते.आज माझी आई माझ्यापासून दुर गेली असली तरी ती जिथे असली तरी तिथुुुन माझी काळजी घेत असते,असे मला वाटते.जेव्हा जेेव्हा मला मदत करण्यासाठी लोक मिळतात, तेव्हा तेव्हा मला त्यांच्यामध्ये माझ्या आईचे रुप दिसते.ती माझ्याजवळ नाही,पण माझ्या हृृदयात कायम ती आहे.तिची जागा माझ्या आयुष्यात कोणीच घेऊ शकणार नाही.हा पण हे मात्र आहेे की,आई तु दुर गेल्यापासून मला कोणीच आपलेसे वाटत नाही.आजपर्यंत मनात एवढे साठवुन ठेवलेलेे मी कोणासमोरच व्यक्त करु शकत नाही.आजपर्यंत मनात एवढे दाबुन ठेवलेले मी आता कोणासमोर उलगडणार?आता मला सोबत असे कोणीच उरले नव्हते.पण जगणे मात्र भाग होते.
आजीच्या घरी असतानाही तुला बरे करण्यासाठी आम्ही खूप काही केले.वेगवेगळे उपाय शोधण्यासाठी आम्ही झटपटत होतो.माझा अंधश्रद्धेवर विश्वास नसताना सुद्धा बुवाबाजी वगैरे असे उपाय तुझ्यावर तुला बरे करण्यासाठी केले.कारण माझी आजी,काका मावशी हे पारंपारिक पद्धतीचे विचार करणारे होते.त्यांनी त्यांच्या पद्धतीने सूद्धा तिला बरे करण्याचे प्रयत्न केले होते.याची माहिती माझ्या वडिलांना नव्हती.हे जर त्यांना सांगितले असते तर त्यांनी खूप सुनावले असते.एक दिवस माझ्या आईची तब्येत खुप बिघडली होती.काही सूचेनासे झाले होते.तेव्हा आम्ही सर्व गाडी करुन एका दर्गेत गेलो.तेव्हा कुठे ती तिथे डोके टेकविताच शांत झाली.मी तिथे माझ्या आईसारखी परिस्थिती असलेल्या अशा अनेक जणांना बघितले.सर्वजण तिथे अगदी शांत बसले होते.आम्ही पुर्ण दिवस तिथेच होतो.त्या दर्गेतुन परत घरी आल्यावर पुन्हा आईची अवस्था तशीच झाली होती.ती परत तशीच वागु लागली होती.पण आम्ही किती काळ त्या दर्गेतच बसुन राहणार?
एक दिवस माझे बाबा माझ्या आईला नाशिकवरुन भेटायला आले असता,तिने त्यांना मारण्यासाठी एक मोठा दगडच घेतला.ती आम्हा सर्वांना विसरुनच गेली होती.तिला हे सर्व करायचे नव्हते.पण तिची परिस्थिती तिला हे सर्व करण्यास भाग पाडत होते.तिचे असे हे वागणे आम्हाला सहन होत नव्हते.आमचा संयम तुटत होता,कारण ती जसे जसे म्हणत होती आम्ही तसे तसे करत गेलो.एकदा माझ्या ताईला विद्यापीठात परीक्षा द्यायला जायचे होते,पण माझ्या आईने तिला घरात बसं,असे म्हणून तिला जाऊ दिले नाही.आजीचा संयम तुटु लागला आणि तिने माझ्या आजीचा हातचा खुप मार खाल्ला.तेव्हा कुठे ताई परिक्षेला गेली.अशा अनेक कारणांमुळे माझ्या बाबांनीही माझ्या आईला मारले होते.पाणी डोक्यावरून जात होते.मी तेव्हा सहावीत होते,हे सर्व माझ्या डोळ्यांसमोर घडत होते.पण मी लहान असल्यामुळे मी तिच्यासाठी काहीच करु शकत नव्हते.जसे मोठे वागत होते,त्यांच्याच पाऊलावर पाऊल टाकुन मी चालत होते.पण हे सर्व बघितल्यामुळे मनात एक धाक बसून गेला होता.दिवसांमागे दिवस जात होते,पण माझी आधीसारखी आई मला मिळाली नव्हती.बाबांनी आईला आणि आम्हाला नाशिकला घेऊन जाण्याचा निर्णय घेतला.तिथे भाड्याने घर घेऊन आम्ही राहू लागलो.आम्ही सर्व आईला बरे करण्याचे प्रयत्न करत होतो.बाबांनीही अनेक इस्पितळात प्रयत्न केले.आयुर्वेदिक उपचारांचा आधार घेतला.आईला थोड्या काळासाठी बरेही वाटले,ती मध्ये मध्ये समजुतदारपणाने वागुही लागली होती.आईच्या उपचारासाठी पैशांची गरज होती.बाबांनी जे काही होते,ते विकुन पैसा गोळा केला.त्यात आईनेही बाबांना मदत करायला सुरुवात केली होती.आमच्यासमोर परत एकदा गरिबीला सामोरे जाण्याचे आव्हाहन उभे राहिले होते.आईनेही तिच्याकडुन जेवढे होईल,तितके प्रयत्न केले.आमचे गावाला आधी दुकान होते,बाबा तेच चालवायचे.बाबांनी कधीही नोकरी केली नव्हती,पण नाशिकला येऊन त्यांना नोकरी करावी लागली.आईलाही सवय नव्हती,तरीसुद्धा तिनेही पिशव्या शिवण्यापासुन तर द्रोण बनवण्यापर्यंतची अशी छोटे-मोठे काम करुन हातभार लावला.
खरंच महान होती माझी आई.