Mitranche Anathashram - 9 in Marathi Drama by Durgesh Borse books and stories PDF | मित्रांचे अनाथाश्रम - भाग ९

Featured Books
  • નિતુ - પ્રકરણ 64

    નિતુ : ૬૪(નવીન)નિતુ મનોમન સહજ ખુશ હતી, કારણ કે તેનો એક ડર ઓછ...

  • સંઘર્ષ - પ્રકરણ 20

    સિંહાસન સિરીઝ સિદ્ધાર્થ છાયા Disclaimer: સિંહાસન સિરીઝની તમા...

  • પિતા

    માઁ આપણને જન્મ આપે છે,આપણુ જતન કરે છે,પરિવાર નું ધ્યાન રાખે...

  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

  • હાસ્યના લાભ

    હાસ્યના લાભ- રાકેશ ઠક્કર હાસ્યના લાભ જ લાભ છે. તેનાથી ક્યારે...

Categories
Share

मित्रांचे अनाथाश्रम - भाग ९


मी, "संजय बद्दल काय सांगत होता ..."
विवेक त्या दिवशी काय घडलं त्या बद्दल सांगायला लागला.
आश्रमात आम्ही चौघे म्हणजे मी, संजय, आम्या आणि सुरेश काका गप्पा मारत बसलो होतो. मला संजय चे बाबा गेल्याच समजलं होत. पण मी बाहेर गावी होतो. आल्या आल्या मी संजयला भेटायचं ठरवलं म्हणून दुसऱ्या दिवशी आम्ही आश्रमात जमलो. घरी जाणार होतो पण संजय नाही बोलला, त्यांच्या घरी प्रॉपर्टी वरून वाद सुरू होते त्याविषयी बोलायचं म्हणुन आम्ही बाहेर भेटायचं तर आश्रमात भेटलो. तो वाद काही मला प्रॉपर्टी पाहिजे असा नव्हता, तो वाद मला प्रॉपर्टी नको आहे यावरून होता. त्याच्या बाबांनी त्यांची निम्मी काकांच्या दोघं मुलांच्या नावावर तर, निम्मी छोट्या आई आणि रजनीच्या नावावर केली. मला आश्चर्य वाटत होत, कारण संजयच्या बाबाचं संजय वर खुप प्रेम होत तरीही त्यांनी संजय वर का अन्याय केला असेल. त्याच विषयावर तेव्हा बोलण सुरू होत.
आम्ही सर्व संजयच्या हक्कासाठी बोलत होतो. संजय शांत होता. मला माहिती होते त्याला एक पैसा नको होता. तो शांत असण्याच कारण खुप वेगळं होत. संजयच्या मोठ्या काकाच लग्न आधी झालं पण त्यांना मुलं उशीरा झाले असा फक्त गैरसमज होता कारण संजयचे बाबा आणि त्याच्या आईचा प्रेम विवाह होता म्हणून काकांचं उशीरा लग्न झालं. आईला मोठा आजार होता म्हणून तिला बाळ होणार नव्हतं. आई खुप जास्त खचल्या होत्या आणि त्यातून सावरण्यासाठी म्हणून तिच्या जवळ बाळ असणं आवश्यक होत. त्याचमुळे सरोगसीचा उपयोग करून संजयचा जन्म झाला. आता संजयची आई आनंदात होती, पण पुढे तिची तब्येत जास्तच बिघडली आणि शेवटी त्या गेल्या. मोठ्या काकांचं लग्न झालं, काकू संजयची खुप काळजी घेत होत्या. पण त्यांना दिवस गेले. संजयला कोण सांभाळणार हा प्रश्न होता. संजयच्या बाबाचं जास्त वय नव्हतं म्हणून त्यांचं दुसरं लग्न करायचं असा निर्णय घेतला. खुप विचार केल्यानंतर ज्या आई ने संजयला जन दिला त्याच आई बरोबर त्यांचं लग्न केलं होत. गरिबीमुळे छोट्या आईला ते करावं लागलं. पण लग्न न झाल्यामुळे गरोदर कशी झाली या प्रश्नाचे उत्तर तिच्याकडे नव्हते म्हणून तिचे लग्न झालेच नाही आणि घरच्यांनी सुध्दा तिला बाहेर काढून दिले.
मी संजयला विचारले, "ही तर आनंदाची गोष्ट आहे की तुला तुझ्या खऱ्या आईच प्रेम मिळत आहे, भांडणं कुठे आहे मग ?"
संजय, "काकू आणि आई दोघेही सर्व प्रॉपर्टी माझ्या नावावर करायला म्हणत आहेत. पूर्ण व्यवहार मीच बघावा हे त्यांचं मत आहे."
मी, "माझ्याकडे एक पर्याय आहे, ते सर्व लहान आहेत. तु त्यांची प्रॉपर्टी त्यांच्या नावावर राहू दे फक्त व्यवहार तु बघ."
संजय, "हो, कुणी व्यवहार बघायला पण नाही सध्या, ते समजदार झाली की मी त्यांना त्यांची काम वाटून देईल"
मी, "त्यानंतर तु काय करणार पण"
संजय, "बघू तेव्हाच तेव्हा"
मी, "तुझ्या आईला माहिती आहे का? तुला सर्व हकीकत समजली ते"
संजय, "नाही, संजयला पण नको, बाबा सांगत होते की काही गोष्टी माहिती असून पण समोरच्याला समजु नाही द्यायच्या ते का, त्याच उत्तर आज मला मिळालं."
आम्ही बोलत होतो तेव्हाच संजयला फोन आता की छोटी आई आणि काकू सर्व प्रॉपर्टी संजयच्या नावावर करणार आहेत म्हणून त्या दिवशी आम्ही घाईत गेलो. तिकडे त्यांना काढलेला पर्याय सुचवला. त्यांना तो आवडला नाही पण संजय च्या प्रेमापोटी तो मान्य केला.

विवेक ने सांगितलेली त्या दिवशीची गोष्ट ऐकून मला स्वतःवर खुप राग आला. कुठलाही विचार न करता मी त्याच्यावर राग धरून बसलो होतो.
मी विवेकला, "सॉरी यार, मी चुकलो"
विवेक, "चलता है यार"
आम्ही दोघं आश्रम जवळ येऊन पोहचलो, बाहेरच सुरेशकाका भेटले. त्यांना विवेक ने विचारलं, "आम्या कुठे आहे ?"
काका, "आता नमाजपठण सुरू आहे मुलाचं"
विवेक, "ठीक आहे मग आम्ही बाहेर बसतो"
आम्ही दोघंही पायरीवर बसलो.
मी, "आम्या नमाजपठण करतो"
विवेक, "आश्रमातील सर्व मुलं करतात, प्रत्येक धर्माचं पूजा पठण होत या आश्रमात"
मी, "पण का ?"
विवेक, "अनाथांना कुठे त्यांचा धर्म कळतो म्हणून मनाला शांती आणि शरीराला चांगल्या सवयी लागव्या म्हणून .."
तितक्यात संजय तिथे पोहचला, तोपर्यंत आम्या सुध्दा बाहेर आला होता.
संजय, "आज संध्याला प्रपोज करायचा"
विवेक, "मग कर ना"
संजय, "मी करेल रे पण तु ?"
विवेक, "माझं काय ?"
संजय, "तुला तर संध्या आवडते ना ? लहान असल्यापासून"
विवेक, "काहीही काय बोलतो, मी कधी बोललो ते"
संजय, "त्या दिवशी आई आणि काकू डबा घेऊन आल्या तेव्हा आईने पुरणपोळ्या केल्या होत्या. विवेकला त्या खुप आवडतात मग मी तुम्हाला तेच सांगायला आलो होतो, तेव्हा ऐकलं. काय समीर बरोबर ना ?"
मी, "हो ना, स अक्षर त्याच्यासाठी वाईट आहे जरा, संध्या त्याला आवडत होती पण प्रेम नाही ते आणि कॉलेजला होता तेव्हा स्वाती नावाची एक मुलगी आवडत होती त्याला."
संजय, "आता ही स्वाती कोण ?"
मी, "इंजिनिअरिंगला होता तेव्हा त्याच्या सोबत होती, त्यानंतर इकडे आला तरी मुली काही कमी झाल्या नाही. प्रत्येक सहा महिन्याला नवीन मुलगी असते."
आम्या, "सेमीस्टर पॅटर्न"
विवेक रागात, "गप रे, मला खर प्रेम नाही झालं म्हणून मुली बदलतो"
संजय, "कधी होणार ते ?"
विवेक, "मला काय माहिती ते"
मी, "होईल, नक्की होईल, कधी कधी प्रेम होण्यासाठी खुप जास्त वेळ नाही लागत, फक्त बोलता आले पाहिजे."
विवेक दोन्ही हात जोडून, "ठीक आहे गुरुजी, प्रेमात पडलो की लगेच प्रपोज करेल मी."
आम्या, "समोरून मुलीने प्रपोज केला तर नाही म्हणू नको पण"
संजय, "असू शकते एखादी वेडी स्वतः या वेड्याला विचारणारी"
विवेक, "म्हणजे मी वेडा आहे ?"
सर्व एका सुरात, "हो..."
मी विवेक कडे पाहून, "कधी विचारणार संध्याला ?"
संजय, "आज संध्याकाळी इथेच, आश्रमात"
आम्या, "नक्की ना, थांब मी बाबांना कल्पना देऊन येतो"
आम्या आत गेला,
विवेक, "पण तुला त्या आधी तिचा भुतकाळ माहिती असणं गरजेचं आहे."
संजय, "मला माहिती आहे ते"
विवेक माझ्याकडे पाहून, "तु सांगितले ?"
संजय, "नाही रे, हा नाही बोलला"
मी, "मग कुणी सांगितले ?"

क्रमशः