Jodi Tujhi majhi - 47 in Marathi Fiction Stories by Pradnya Narkhede books and stories PDF | जोडी तुझी माझी - भाग 47

Featured Books
  • નારદ પુરાણ - ભાગ 61

    સનત્કુમાર બોલ્યા, “પ્રણવ (ૐ), હૃદય (નમ: ) વિષ્ણુ શબ્દ તથા સુ...

  • લગ્ન ને હું!

    'મમ્મી હું કોઈની સાથે પણ લગ્ન કરવાના મૂડમાં નથી, મેં નક્...

  • સોલમેટસ - 10

    આરવને પોલીસ સ્ટેશન જવા માટે ફોન આવે છે. બધા વિચારો ખંખેરી અન...

  • It's a Boy

    સખત રડવાનાં અવાજ સાથે આંખ ખુલી.અરે! આ તો મારો જ રડવા નો અવાજ...

  • ફરે તે ફરફરે - 66

    ફરે તે ફરફરે - ૬૬   માનિટ્યુ સ્પ્રીગ આમતો અલમોસામાં જ ગ...

Categories
Share

जोडी तुझी माझी - भाग 47

आज संगीता चा कार्यक्रम असतो इतक्या दिवसाच्या प्रॅक्टिस नंतरही गौरवीच्या मनात थोडाफार दुःख आणि वागण्यात awkwardness असतोच.. दोन तीन परफॉर्मन्स नंतर गौरवी आणि विवेकचा नंबर असतो आणि रुपाली आणि संदीपचा परफॉर्मन्स सर्वात शेवटी असतो.. जस जसे वेळ जात असतो गौरवी चा नर्वसनेस वाढतच असतो.. विवेक तिला धीर देत असतो पण तो स्वतः पण तर नर्वसच असतो.. गौरवी आज सिंड्रेल्ला गाऊन मध्ये खूप गोड दिसत असते विवेकला तिला बघायचा मोह आवरत नाही.. डोळ्याच्या एका कोपऱ्यातून तो सारखा सारख तिला बघत असतो..


आता गौरवी आणि विवेकचा डान्स... सगळे मनात आतुरता आणि थोडी भीती घेऊन दोघांचाही डान्स बघायला सज्ज झाले असतात आणि गौरवी आणि विवेक पण एक लांब आणि मोकळा श्वास घेऊन स्टेज वर चढतात..


गाणं सुरू होत .... हळूहळू गाण्याच्या बोलावर दोघेही थिरकायला लागतात..


Baby, Come, stand by my side

Come n be my guide in life

O i will be what you want me to be

I will give all my love in whole of my life


नर्व्हस पणा आणि awkwardness जाऊन अगदी एकमेकांत बेधुंद होऊन खूप छान ट्युनिंग ने ते दोघेही डान्स करायला लागतात.


सोनियो ओ सोनियो

तुम्हें देखता हूँ तो सोचता हूँ बस यही

तुम जो मेरा साथ दो

सारे गम भुला के

जी लूं मुस्कुराके ज़िन्दगी

तू दे दे मेरा साथ

थाम ले हाथ

चाहे जो भी हो बात

तू बस दे दे मेरा साथ

तू दे दे मेरा साथ थाम ले हाथ

चाहे जो भी हो बात

तू बस दे दे मेरा साथ


आज गौरावीला डान्स करताना मागच काहीच आठवत नाही, तीला त्याच्या हातांत सुरक्षित वाटत असते.. अगदी त्याच्या डोळ्यांत ती मग्न झालेली असते आणि तोही तिच्या डोळ्यांत विरुन गेला असतो.. आजूबाजूच्या जगाला विसरून ते अगदी मुक्त नाचत असतात..


I get this feeling now

I cannot wait no longer

I know your love will keep me happy

Will keep me stronger

I get this feeling now

I cannot live without you

I know your love's the only one so true


राहों में तनहा हूँ साथ ले चल यूँ

संग तेरे सफ़र पूरा करूँ

राहों में तनहा हूँ साथ ले चल यूँ

संग तेरे सफ़र पूरा करूँ


क्या कहूँ ऐ ज़िन्दगी,

तू है मेरी सांस

रहना तू पास हर घडी

तू दे दे मेरा साथ थाम ले हाथ

चाहे जो भी हो बात

तू बस दे दे मेरा साथ

तू बस दे दे मेरा साथ


तुझको जो पाया तो,

है ये लगता क्यूँ

बाहों में बस तेरी महफूज़ हूँ

तुझको जो पाया तो,

है ये लगता क्यूँ

बाहों में बस तेरी महफूज़ हूँ

तुम बनो साया मेरा

ज़िन्दगी में आओ,

ज़िन्दगी बिताओ, बस यही

तू दे दे मेरा साथ थाम ले हाथ

चाहे जो भी हो बात

तू बस दे दे मेरा साथ

तू बस दे दे मेरा साथ....


जसजसा गाणं सुरू असत विवेक आपल्या मनीचेच भाव गौरावीला सांगत असतो आणि गौरवी सुद्धा आज ते समजून घेत असते.. तिच्याही मनीचे भाव आज त्या गाण्याने बोलून दाखवले असतात.. आणि डान्सच्या शेवटी ते एकमेकांच्या मिठीत असतात.. दोघेही आज खूप खुश असतात.. ही मिठी अशीच राहावी असाच त्यांना वाटत असतं.. गाणं संपलं असत तरी अजूनही ते तसेच .. सगळे जण टाळ्या वाजवतात आणि तेव्हा ते दोघेही भानावर येतात.. सगळ्याना झुकून नमस्कार करून धन्यवाद म्हणत खाली उतरतात..


रुपाली लगेच पळतच त्यांच्याकडे येते आणि त्या दोघांनाही अभिनंदन करते.. मागून संदीपही येतो..


संदीप - काय मग?? जमली म्हणायची का ही "जोडी तुझी माझी"??


गौरवीच्या चेहऱ्यावर हलकीशी लाली चढलेली असते.. आणि विवेकच्या चेहऱ्यावर समाधान...

संगीताचा कार्यक्रम पुढे जात असतो.. शेवटी रुपाली आणि संदीपचा डान्स होऊन मग सगळ्याचा dj डान्स होतो आणि कार्यक्रम संपतो.. रात्र जास्त झालीय म्हणून विवेक गौरावीला घरी सोडू का विचारतो.. गौरवीचे आणि त्याचे आई वडीलही आले आहेत हे तो विसरूनच जातो... गौरवीच त्याला आठवण करून देते आणि आई बाबा आहेत सोबत तू नको काळजी करू. एवढं बोलून एक गोड स्मित करत निघून जाते..

आज विवेक गौरवीच्याच विचारात हरवलेला असतो.. आज तीच ते परिसारखं रूप आणि विवेकसोबतच तिचा डान्स त्यात तिच्या मनातले भाव बोलणारे तिचे डोळे.. या सगळ्यांमध्ये विवेक आज नव्याने तिला अनुभवत असतो.. तिच्याबद्दल च प्रेम त्याच्या मनात आणखी उसळ्या घेत असतं...

दुसऱ्या दिवशी हळदीचा कार्यक्रम असतो.. विवेकला आता धीर धरवत नाही.. गौरवीच्या मनात काय चाललंय हे जाणून घ्यायची त्याला खूप घाई झाली असते.. पण कसं ? याचाच तो विचार करत असतो तेव्हा त्याला एक आयडिया येते..

हळद लावायला गौरावीला आज संदीपकडे जायचं असतं.. ती पहिल्यांदाच त्याच्याकडे जाणार होती.. पत्ता होता पण थोडा किचकटच होता.. उशीर नको व्हायला म्हणून तिने लवकरच आवरलं आणि निघायला जाणार तोच विवेकची गाडी आली.. त्याला बघून ती घरातच थांबली....

विवेक घरात आला.. बाबांनी त्याच स्वागत केलं.. गौरवी पुढेच उभी होती.. साडीमध्ये अप्सरा दिसत होती त्याची नजरच तिच्यावरून सरकत नव्हती.. पण बाबा जवळ असल्यामुळे कसतरी स्वतःला सावरत तो बोलू लागला..

विवेक - गौरवी तुला आज संदीप कडे जायचंय ना?

गौरवी - हो त्याची विनंती होती की त्याला कुणी वहिनी नाही तर मी त्याला हळद लावावी.. मी निघतच होते आता.. तू कस काय आला इकडे?? तुला नाही जायचं का हळदीच्या कार्यक्रमाला??

विवेक - जायचंय ना.. ते मी तुला घ्यायला आलोय, मला वाटलं तू कधी गेली नाही आहे त्याच्याकडे तर तुला पत्ता माहिती नसेल म्हणून... अ.. अ.. बाबा मी घेऊन जाऊ का गौरावीला?? परत पण आणून सोडतो ..

बाबा - ती तयार असेल तर घेऊन जा माझा काय प्रश्न आहे मधात?? ते तुमचं तुम्ही बघा..

आणि बाबा तिथून निघून जातात.. आई किचन मध्ये काम करत असते.. समोर हे दोघेच एकेकांना बघत उभे असतात.. विवेक ही हलक्या पिवळसर रंगाच्या शर्ट मध्ये खूप हँडसम आणि स्मार्ट दिसत असतो..

विवेक - येशील ना माझ्याबरोबर??

गौरवी - हो चालेल .. चलायचं?? अ.. एक मिनिट.. तू काही खाल्लय??

विवेक - थोडा नाश्ता केला होता सकाळी... तू म्हणशील तर रस्त्यात कुठे थांबून परत नाश्ता करूयात...

गौरवी - चालेल चल.. आई बाबा येते मी.. कदाचित आज थोडा उशीर होईल..

दोघेही निघालेत...

विवेक - आज उशीर होईल असं का सांगितलं??

गौरवी - होऊ शकतो ना म्हणून...

विवेक - कार्यक्रम तर दुपारीच संपून जाईल.. मग उशीर?? ( विवेकला गौरवीच्या मनातलं काढायचं होतं)

गौरवी - विवेक तू विसरला का?? रुपाली पण माझी मैत्रीण आहे आणि संदीपला हळद लागली की नंतर रुपलीला लागेल मग मला तिथे पण जावं लागेल ना..

विवेक - ओहह अच्छा अस का.. ठीक आहे मला काही वेगळाच वाटलं!! बर जाऊ दे ते, मी तुला रुपालीकडे सोडून निघून जाईल हा.. मी नाही येणार तिकडे..

गौरवी - का??

विवेक - अग तिने मला बोलवलेलं नाहीय आणि मी अस बिन बुलये मेहमान सारख जाणं बरं नाही वाटत..

गौरवी - कमाल आहे म्हणजे मी तुझ्या मित्राची वहिनी बनून येऊ शकते तर तु माझ्या मैत्रीणीचे जीजू बनून नाही का येऊ शकत?? आणि मला बोलवलं आहे तिने.. आता तुला वेगळं सांगेल का??

विवेक - अग पण त्याने बोलावलंय ना तुला..

गौरवी - ठीक आहे उगाच आले तुझ्यासोबत.. मला माझी गाडी घ्यायला पुरलं असत मग तर.. ठीक आहे मी टॅक्सी करून घेईल..

विवेक - अग टॅक्सी ची काय गरज आहे तुझं झालं की सांग मी येतो तुला घ्यायला..

गौरवी - नको तु ड्राईवर नाही माझा तुला कॉल करून बोलवायला.. असू दे..

विवेक - चिढु नको ना ग माझी राणी.. मला आवडेल तुला घ्यायला यायला आणि मग नंतर तुझ्यासाठी एक surprise पण आहे.. म्हणून नाही येणार मी.. ऐक ना माझं प्लीज..

गौरवी - surprise कसलं ?? काय प्लॅन केला आहे का??

विवेक - हो पण आता नको विचारू प्लीज..

गौरवी - हम्म मला शंका आलीच होती.. म्हणून तर मी घरी उशीर होईल सांगितलं..😊

विवेक - अच्छा म्हणजे तुला आधीच माहिती होतं,

गौरवी - नाही पण अस मनातून कुठेतरी वाटत होतं की आज तू नक्की काहीतरी प्लॅन करशील..

विवेक - माझी राणी.. स्मार्ट आहेस हं..

गौरवी - काय म्हंटलास??

विवेक - राणी!!!☺ आवडलं का??

तो रोखून तिच्याकडे बघत होता.. तिच्या चेहऱ्यावरचे भाव जाणून घ्यायचं प्रयत्न करत होता.. ती ही..

गौरवी - तुझं काहीतरीच असत आपलं..

म्हणत लाजली आणि नजर खाली झुकवली.. तो तिच्याच कडे बघत होता.. तिने त्याच्या कडे बघितलं आणि हलकेच त्याला खांद्यावर चापट मारत पुढे बघ ना.. तो तरीही तिच्याकडे बघत होता.. तिनेच आपला चेहरा ओळजाळीत लपवला आणि पालटून खिडकीतून बाहेर बघू लागली..तिच्या गालावर लाजेची लाली चढली होती आणि त्याच्या मनात प्रेमाच्या लहरी उसळत होत्या.. पण स्वतःला सावरत ते दोघे संदीपच्या घरी पोचले..


क्रमशः