Lahan Pn Dega Deva - 1 in Marathi Fiction Stories by Adv Pooja Kondhalkar books and stories PDF | लहान पण देगा देवा - 1

Featured Books
Categories
Share

लहान पण देगा देवा - 1

भाग १ '

Hello Guys !!!!! ,एक नवीन स्टोरी आणि नवीन सुरवात.

जर कोणाला विचारलं कि तुला तुझ्या आयुष्यातील कोणते क्षण परत जगायचे इच्छा आहे, तर आपण सगळे आपलं लहान पण परत मागू, आणि त्यावेळीस जे आपण करू शकलो नाही ते सर्व करू.

कारण बालपण एक अशी journey आहे जी प्रत्येकाला हवी हवीशी वाटते.

आपल्या संपूर्ण आयुष्यात आपण दोनदा बालपण जगतो आणि अनुभवतो सुद्धा. फक्त त्याला आत्मसात करण्याची किंवा त्यावर अभिप्राय देण्याची पद्धत मात्र वेगवेगळी असते.

आता तुम्हाला सगळ्यांना प्रश्न असेल बालपण तेही दोनदा कस शक्य आहे ?

सांगते एक बालपण जे म्हणजे आपण सगळे जगतो, त्यातले काही क्षण माहित हि नसतात, तर काही धूसर आणि काही कायम लक्षात राहतील असे.

आणि एक बालपण असं असत कि त्यातले सगळे क्षण आपण जगतो अनुभवतो, शिकतो आणि शिकवतो पण, ते म्हणजे म्हतारपण.

माझं हे म्हणणं एकूण तोढे हसायला आले असेल पण हे खरं आहे. जर प्रश्न असेल तर एकदा आपल्या घरातील आपल्या आजी आणि आजोबां सोबत संपूर्ण दिवस घालवा. तुम्हाला त्याच्यात एक लहान बाळ दिसेल. आणि ते बाळ जितकं लहान तितकच कणखर आणि सक्षम दिसेल.

आज मी ज्या स्टोरी ला सुरवात करणार आहे ती देखील एका अश्याच लहान बाळाची ज्याचा जीव आपल्या मुलांमध्ये, नातवांमध्ये संसारा मध्ये अडकला आहे. पण त्या बाळाला काय हवं आहे त्याच्या इच्छा काय आहेत हे ऐकण्यासाठी मात्र आपल्या कडे वेळ नाही.

घडाळ्याच्या काट्या प्रमाणे आपण धावतो आहे , पण हा विचार एकदा पण करत नाही कि तोच घड्याळाचा काटा त्यांच्या साठी पण थांबणाऱ्यातला नाही. समाजसेवा आणि मार्केट स्टेटस साठी जी चॅरिटी करतो, त्यापेक्षा काही क्षण त्यांच्या सोबत घालावा. नाहीतर आपली मुलं आपल्याला च ऐकवणार कि तुम्ही कुठे तुमच्या आई वडिलांना वेळ दिला जो आम्ही तुम्हाला देऊ. त्या मुलांना ह्या खऱ्या जगाची ओळख करून द्या.

Corona मुळे काही नाही तर हे नक्की चांगलं झालं आहे कि आपण आपल्या नात्यांच्या जवळ आलो.

चला तर एका अश्या च आजोबांना आपण भेटू या.

अगं एकल का ? गणपती जवळ आले आहेत सगळे येतील घरी सुट्टी साठी, लाडू चिवडा बनव आणि चकल्या तर पहिल्या बनव माझ्या मैनेला खूप आवडतात.

अहो तिला मीनाक्षी म्हणा हो, तिच्या मुलाना नाही आ0वडत असं काही तिला बोलावलेलं.

हो ग लक्षात ठेवेल.

आणि तुम्ही काळजी नका करू सगळं बनलं आहे बरं का !! आता फक्त मुलांनी आणि बाप्पानी लवकर यावं.

झोक्या वर बसून एक स्मित हास्य देत. मी राघव दीक्षित, वय ६८, संपूर्ण आयुष्य कष्ट केल्यानंतर आज माझ्या बायको सोबत घालवलेल्या काही क्षणांची उजळणी तर येणाऱ्या सुंदर क्षणाची रेखाटने करतो आहे. उजळणी मध्ये जर माझ्या सोबत खंबीर उभी कोण असेल तर ती म्हणजे माझी अर्थांगिनी रमा दीक्षित, आणि त्या नंतर माझी तीन मुलं मोठा कुणाल मुलगी मीनाक्षी आणि बारका नीरज दिघे हि हुशार. त्याना योग्य ते शिक्षण दिले आणि आज सगळे आपापल्या संसारात सुंदर रमले आहेत. सुट्टी साठी नेहमी येतात पण फोन केल्या वर. मला तर सवय झाली कारण फोन मीच करतो आणि उत्तर हि मीच ऐकतो, पण हे सर्व रमा ला समजावणं मला कठीण जात.तिला फक्त एकच तिची सर्व लेकरं जवळ हवी.

उरलेलं आयुष्य सर्वां सोबत हसत जगावं, पण तिला वाटून काय फायदा, ज्यांना हे समजायला पाहिजे ते स्वतःच्या आयुष्यात मस्त. देव जाणे काय लिहिलं आहे आमच्या म्हतारपणात ??????

बघू या या दोन लहान मुलांना हे अनोखे बालपण जगण्या साठी काय धडपड करावी लागणार आहे.