Neela - 7 - last part in Marathi Classic Stories by Harshad Molishree books and stories PDF | नीला... भाग ७ - last part

Featured Books
  • నిరుపమ - 10

    నిరుపమ (కొన్నిరహస్యాలు ఎప్పటికీ రహస్యాలుగానే ఉండిపోతే మంచిది...

  • మనసిచ్చి చూడు - 9

                         మనసిచ్చి చూడు - 09 సమీరా ఉలిక్కిపడి చూస...

  • అరె ఏమైందీ? - 23

    అరె ఏమైందీ? హాట్ హాట్ రొమాంటిక్ థ్రిల్లర్ కొట్ర శివ రామ కృష్...

  • నిరుపమ - 9

    నిరుపమ (కొన్నిరహస్యాలు ఎప్పటికీ రహస్యాలుగానే ఉండిపోతే మంచిది...

  • మనసిచ్చి చూడు - 8

                     మనసిచ్చి చూడు - 08మీరు టెన్షన్ పడాల్సిన అవస...

Categories
Share

नीला... भाग ७ - last part

अध्याय ७... नवीन सुरवात

शिरीष घरात एकटा बसला होता.... तेव्हाच नीला आली

"शिरीष काय विचार करतोय".... नीला

"काय नाही, शेवटी ती वेळ आली".... शिरीष

"इतक्या लवकर नाही शिरीष, मी इतक्यात तुला सोडून कुठे जाणार नाही".... नीला

"नीला पण"... शिरीष काय बोलेल त्या आधीच नीला ने शिरीष चा हाथ पकडला आणि बोलली... "काही बोलू नकोस बस चल माझ्यासोबत"....

नीला शिरीषला त्याच्या गावी घेऊन आली... जिथं श्रावणी त्याची वाट पाहत होती, शिरीष ने तर ठरवलं होतं की परत कधी गावी येणार नाही, पण श्रावणी चा विश्वास पण ठार होता....

श्रावणी घराच्या बाहेरच बागेत झोक्यावर बसली होती आणि अचानक समोर गाडी येऊन थांबली, शिरीष ने नीला च्या समोर बघितलं... नीला हळूच बोलली.... " जा " !

शिरीष गाडीतून उतरला... शिरिषला पाहताच श्रावणी धावत त्याच्या जवळ गेली आणि शिरीष च्या समोर जाऊन थांबली, शिरीष ने श्रावणी ला बघितलं... बोलायला खूप काय होतं दोघांडे पण दोघेही शांत बस एक मेकांना बघत होते....

"कसा आहेस"....श्रावणी हळूच बोलली

"ठीक".... शिरीष

"बस ठीक".... श्रावणी

"परत जाणार आहेस का".... ??? श्रावणी, बेचेन मन शेवटी कूट पर्यंत साथ देणार, श्रावणी ने तो प्रश विचारलाच... कारण शिरीष आला त्याची खुशी असून तो जाणार परत ह्याची भीती श्रावणी च्या मनात होती...

"हो.... जावं तर लागणार ना, पण ह्या वेळीस एकटा नाही जाणार मी"... शिरीष

"मग".... श्रावणी लांब श्वास घेत म्हणाली

"तू येशील का सोबत माझ्या... लग्न करशील का" ??? शिरीष

हे ऐकताच श्रावणी इतकी खुश झाली की तिचा आनंद अगदी गगनात मावे ना... शिरीष ने श्रावणीला मिठीत घेतलं आणि त्यांना एकत्र बघून नीला खूप खुश झाली....

इथं श्रावणीला शिरीष भेटला.... पण तिथं वैभव अगदी हैरान झाला होता, नीला आणि शिरीषचा काय संबंध आहे, नीला कोण आहे हे माहिती करण्यात त्यांनी खूप धावपळ केली आणि शेवटी त्याला ती माहिती मिळाली ज्याची तो इतक्या वेळ पासून शोध लावत होता...

१ महिना नंतर... वाराणासी काशी

शिरीष आणि नीला एका हॉटेल मध्ये बसले होते, तेव्हाच तिथं वैभव आला, वैभवला येताना बघून नीला ने पटकन शिरीष चा हाथ धरला... शिरीष ने डोळे बंद केले आणि मनातच बोलला.... "नाही नीला, आज नाही" !

वैभव येऊन त्यांच्या समोर बसला.... "काय shock full, shock हा, मला अचानक इथं बघून शॉक लागला, अरे लागलाच पाहिजे"...

"Shock का लागेल सर मी जे केलं तुमच्या हिशोबाने गुनाह माझ्या हिशोबाने कोणाची मुक्ती,तसंही पृथ्वी वर वजन खूप आहे आणि अश्या लोकांचा तर जास्तच".... शिरीष

"मग तू काय ठेका घेतला आहे का.... देवा कडून काय contract घेतलाय का वजन कमी करण्याचा, आला मोठा"... वैभव

वैभव अगदी रागात बोलला.... शिरीष एक टक वैभव कडे बघत होता, तेव्हाच शिरीष बोलला...

"घेऊन जावा, मला पकडून".... शिरीष

"घेऊन जाऊ पकडून.... कसं,सांग ना रे कसं, कोण आहे नीला, काय आहे काय ही नीला... च्या मायला डोक्याची वाट लावून ठेवली आहे"....

"तुझ्या गावी गेलो होतो, तुला भेटण्यासाठी... तिथून कळलं की तुझं आणि ते श्रावणीचं लग्न झालं आणि तिच्या सोबत तू इथं आला आहेस"....

शिरीष काहीच बोलला नाही, शांत बसून बस वैभवचं ऐकत होता...

"पण त्या आधी मी तिथं गेलो होतो रूम नंबर १३०३.... हा गेलो होतो आणि एकदा नाही खूप वेळा गेलो आणि एक दिवस मला तिथं नीला भेटली आणि सोबतच त्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर पण.... नीला, त्यांनी नीला वर बलात्कार करून तिला".... शिरीष ने वैभवचं बोलणं मधीच कापलं आणि एकदमच बोलला....

"मारून टाकलं, त्यांनी मारून टाकलं तिला"... शिरीष च्या बोलण्यातून त्याच दुःख स्पष्ट झलकत होतं....

"सुरज विशाल आणि समीर, जेव्हा सुरज च्या प्रेमाला नीला ने नाकारलं तर, घमंड मध्ये चूर आणि बापाच्या पैश्याच्या जोरात वाया गेलेले ते तिघं... तिघांनी मिळून प्लॅन केला आणि एक दिवस रात्री निलाच्या घरात घुसन तिच्यावर बलात्कार केला.... पण जिवंत होती ती तेव्हा, सुरज ने जातांना त्या watchman ला पैसे दिले आणि बोलला जे बघितलं ते विसरून जा.... आणि तो watchman तो तर त्यांच्या पेक्षा ही नीच निघाला, तो वरती रूम मध्ये आला,नीला रडत होती... तिला वाटलं की तो मदत करेल पण त्याने ही वस्तुस्थितीचा फायदा उचलला आणि परत तिच्यावर"...

"ती ओरडत होती काका पण त्याने त्याचा तोंड दाबला आणि इतकं जोरात की तिचा जीव निघून गेला"....

"नीला ला मृत पाहून तो घाबरला त्यांनी दाराला बाहेरून कुलूप लावला आणि पळून गेला, दुसऱ्या दिवशी दिनेश (watchman) सुरज च्या कॉलेज जवळ गेला जिथं त्याला सुरज भेटला, दिनेश कडून सुरजला कळलं की नीला मेली... सुरज, विशाल आणि समीर हे ऐकून घाबरले... सुरज ला काही सुचत नव्हतं की काय करावं म्हणून तो त्याच्या बाबा कडे गेला.... ( राज नगर ) मुलाने इतकं मोठा गुनाह केला ते ऐकून पण राज नागरला त्याचं काहीच नाही वाटलं"....

तो बोलला....
"जे काय झालं विसरून जा... मी बघतो, पुढे अशी चुकी होता कामानाही".... राज नागर

"आणि मग रुपयांच्या जोर चालला.... नीला च्या body ला त्याच रात्री ठिकण्यात लावलं अर्थातच.... rape, murder... इतका मोठा अपराध दाबला गेला आणि लोकं अफवा म्हणून सगळं विसरले"....

शिरीष बोलतच होता तेव्हाच तिथं श्रावणी आली.... "शिरीष चल जाऊया, अरे हे कोण आहेत".....????

शिरीष काय बोलेल त्या आधी, वैभव बोलला.... "वहिनी मी मित्र आहे शिरीष चा, काय आहे की मी पण इथं देव दर्शनाला आलो होतो, खरं आहे, इथं येऊन आपली भेट आपल्या अंतरमन सोबत होते"....

"हा.... खरच" ! श्रावणी

"चला वहिनी येतो मग"....वैभव

"अरे दर्शन तर".... श्रावणी

"नाही, माझे झाले.... तुम्ही करा, चल शिरीष भेटू"..... वैभव ने शिरीष सोबत हाथ मिळवला आणि तो तिथून निघून गेला....

संध्याकाळचा वेळ होता देवदर्शन नंतर शिरीष आणि श्रावणी दोघे गंगा नदीच्या किनाऱ्यावर थांबले होते, तेव्हाच शिरीषला नदीत समोर एक नाव दिसली, ज्यात शिरीष चे आई बाबा बसले होते, शिरीष कडे पाहून ते प्रेमाने हसत होते, शिरीष त्यांना बघून अत्यंत खुश झाल.... आई बाबांनी लांबूनच शिरीष आणि श्रावणीला आशिर्वाद दिला,तेव्हाच इथं निलाने शिरीष चा पकडला आणि बोलली....

"शेवटी ती वेळ आली".... नीला

शिरीष काय बोलले त्या आधीच नीला बोलली....."तुझ्या मनातला regret आता काढून टाक, आई बाबांचा आशीर्वाद घे आणि खुश रहा"....

"Thank uhhh so much"..... शिरीष, निला प्रेमाने शिरीष ला पाहता पाहता पुढे चालत गेली आणि अद्रीश्य झाली....

"शिरीष काय झालं कोणाला thank uh बोलतोय"....??? श्रावणी

"तुला.... thank uh so much श्रावणी".... शिरीष ने श्रावणीला मिठीत घेतलं एकी कडे सूर्यास्त झालं आणि इथं नवीन नात्याची सुरवात.......

------------------------------------------------------- THE END --------------------------------------------------------------------------------

२०१९ मध्ये भारतात ४ लाख बलात्कार चे प्रकरण घडले, त्यात ४ वर्षीय मुलीचं नावही आहे आणि हे अत्यंत लज्जाजनक वस्तू आहे आपल्या साठी... त्यासाठी आपण ही खात्री घेतली पाहिजे की कुठे कुठल्या निलावर सोबत असं घडलं नाही पाहिजे आणि तेच एका मुलाला शिरीष सारखं पाऊल उचलण्याचा वेळ ही नाही आला पाहिजे....

वैभव ने हत्या करून गुनाह केला... पण जर नीला च्या ड्रीष्य ने बघितलं तर न्याय.....

वैभव ने तेच न्याय समजून शिरीष ला जाऊ दिलं......

आपण जे करतो त्याची सजा आपल्याला आताच भोगावी लागते.... कारण स्वर्ग पण हेच आहे आणि नरक पण.... प्रेमाने पाहिलं तर पृथ्वी वरच स्वर्ग आहे आणि जर मनात विकृतीकरण असेल तर नरक पण हेच आहे...

__ हर्षद मोलिश्री

दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा !