kadambari Jivalaga Part 49 in Marathi Fiction Stories by Arun V Deshpande books and stories PDF | कादंबरी- जिवलगा ...भाग -४९ वा

Featured Books
  • રેડ સુરત - 6

    વનિતા વિશ્રામ   “રાજકોટનો મેળો” એવા ટાઇટલ સાથે મોટું હોર્ડીં...

  • નારદ પુરાણ - ભાગ 61

    સનત્કુમાર બોલ્યા, “પ્રણવ (ૐ), હૃદય (નમ: ) વિષ્ણુ શબ્દ તથા સુ...

  • લગ્ન ને હું!

    'મમ્મી હું કોઈની સાથે પણ લગ્ન કરવાના મૂડમાં નથી, મેં નક્...

  • સોલમેટસ - 10

    આરવને પોલીસ સ્ટેશન જવા માટે ફોન આવે છે. બધા વિચારો ખંખેરી અન...

  • It's a Boy

    સખત રડવાનાં અવાજ સાથે આંખ ખુલી.અરે! આ તો મારો જ રડવા નો અવાજ...

Categories
Share

कादंबरी- जिवलगा ...भाग -४९ वा

कादंबरी जिवलगा

भाग – ४९ वा

---------------------------------------------

१.

---------------

शैलेश आणि वीरू हे पुन्हा आपल्या आयुष्यात येतील ..याची कल्पना सोनियाने कधी केली नव्हती.

त्यांच्या एकत्र येण्याची शक्यता अजिबात नव्हती . त्यामुळे परस्परसंमतीने वेगळे होण्याच्या दृष्टीने सगळी

कारवाई सुरु होती ..आणि लवकरच त्यांचा डायव्होर्स अर्ज मंजूर होण्यापर्यंतची कार्यवाही पूर्ण झाली होती ,

आणि आता हे अचानक ..

अपघाताच्या निमिताने नियतीने पुन्हा जवळ आणून ठेवले होते , जिच्यासाठी शैलेश आपल्याला सोडून देण्याची भाषा करीत होता

..तिनेच ऐनवेळी ..आधाराच्या वेळी ..शैलेशची साथ सोडली ..,

खरी जाणीव ,खरे प्रेम .म्हणजे नेमके काय ? .हे तिला उमजले असेल का ?

म्हणूनच काही सबंध नाही..तशी एक त्रयस्थ माणसाने वागावे तसे वागली ती ..

केवळ माणुसकी म्हणून .अपघातात सापडेल्या शैलेशला हॉस्पिटलमध्ये आणून टाकीत .

ती त्याच्या आयुष्यातून निघून गेली ..कायमची .

आता तरी आपल्या शैलेशचे डोळे उघडतील .का ?

वीरू तर बोलून चालून लहान..अबोध लेकरू आहे , त्याला जन्मदात्या आईची ओढ आहे ..

हे जरी शैलेशला कळाले तर ..इथून पुढे तो नक्कीच बदलेल .

या सगळ्या विचारातून बाहेर पडल्यावर , मन स्थिर झाल्यवर सोनियाला जाणवले ..

अरे बाप रे .. आता रूमवर नेहा एकटीच आहे.घरातले सगळे पाहण्यासाठी ,

आपण इथे अडकून पडलो ,त्यात अनिता रोहन सोबत असणार परवापर्यंत .

आणि नेहा सांगून गेलीय ..बाहेरचे काही मागवू नकोस ..मी सकाळी चहा आणि खाण्याचे घेऊन येते आहे .

नेहाची आठवण होऊन ..सोनियाच्या मनात विचार येऊ लागले -.

खरेच फार वेगळी मुलगी आहे ही ..प्रत्येक स्थितीत वागताना सगळ्या गोष्टीवर किती कंट्रोल असतो तिचा ,

कमाल आहे या पोरीची.

सोनियाने मधुरिमादीदीला फोन लावला ..इकडचे अपडेट दिले तिला , ते ऐकून ..दीदी म्हणाली ..

सोनिया ..तू नेहाचा विचार नको करू ..फक्त शैलेश आणि –वीरू – आणि हॉस्पिटलचे बघ.

मी इकडचे मेनेज करते ..काळजी घे ..

आणि हो ..तू आणि शैलेश एकत्र येत आहेत ..ही सगळ्यात आनंदाची गोष्ट आहे..

अनिता आणि रोहन ..ही जोडी लवकरच सेटल होते आहेत ..

म्हणजे ..अब बारी नेहाची आणि हेमुची ..त्यांच्यासाठी काही तरी झटपट करावे लागणार आहे मला ..

सोनियाने बाय करीत फोन कट केला ..

शैलेश आणि वीरुला झोप लागली होती ..

वीरूच्या जवळ बसून ..सोनियाचाही डोळा लागला ..

**********

२.

नेहाच्या गावी, घरी ..सध्या अगदी आनंदाचे वातवरण होते ..देसाईसाहेबांच्या मुलीला ..भारतीला पाहून

निघताना ..आजोबांनी सगळ्यांच्यावतीने ..सांगून टाकले होते ...

भारती आमच्या परिवारात सुनबाई म्हणून येणार हे नक्की ..

पण...त्यासाठी ..आमच्या कन्येचे ..नेहाचे सुद्धा आम्हाला जमवायचे आहे.

..बस हे जमले की ..दोन्ही कार्य एकाच वेळी .होतील.

हे सगळे आठवून नेहाच्या आईने ..नेहाला फोन लावला ..

रोजच्या वेळेला तिकडे नेहा वाट पाहते .आणि आज तर ती जास्त उत्सुक असणार ..कारण ..ती पहिल्यांदा तिच्या होणार्या वाहिनीला .फोटोत .पाहणार होती ...

कालच्या भेटीत अलका वहिनीनी खूप फोटो काढले होते ,

त्यात एकट्या भारतीचे ..जास्त फोटो होते ..सुंदर ..भारती ..फोटोत जास्तच सुरेख दिसते आहे ..

असे घरी आल्यावर तिचे फोटो पाहतांना सगळ्यांनी अलकाला बोलून दाखवले .

त्यातलेच काही खास निवडक फोटो ..आज कॉल करायच्या अगोदर नेहाला पाठवले होते ..आणि मग लगेच कॉल केला तेव्हा आईने अगोदर विचारले ..

कशी आहे ग नेहा ..तुझी वाहिनी ? ..भारती ..

नेहाने आनंदाच्या स्वरात म्हणाली –

आई ,खूप छान आहे माझी वाहिनी ,

मला भारती खूप आवडली ..हे भूषणदादूला सांग ..

आणि अलकावहिनींना स्पेशल थांक्यू .सांगशील , .इतकी छान मुलगी ..तिची मैत्रीण-भारती ..

हिला माझी वाहिनी म्हणून आपल्या घरात आणते आहेस .

नेहाची आई म्हणाली .. आता पुढचे ऐक ..जे तुझ्यासाठी आहे ..

आजोबा ,तुझे बाबा आणि भूषणदादू या तिघांनी भारतीच्या बाबांना स्पष्टपणे सांगितले आहे ..

की ..आम्ही आमच्या मुलीच्या लग्नासाठी प्रयत्न करणार आहोत ..,तेव्हा ..तुम्हाला थोडी वाट

पहावी लागणार आहे .. कारण आमची इच्छा आहे की

आमच्या घरी एकाचवेळी दोन कार्य संपन्न व्हावीत ..आधी सुनबाई घरात येईल ..मग घरातल्या

लेकीची पाठवणी ...

आणि नेहा आणखी एक महत्वाचे .

.त्यासाठी तू नोकरी सोडून देऊन ..इकडे यायचे आहे ..त्यासाठी भूषणदादूला तिकडे कधी

पाठवायचे आहे ..हे लवकरच ठरेल..

नेहा ..तुझी मावशी ..इतक्यात परदेशातून येत नाहीये , ती मधुरिमा तिकडेच गेली आहे ..

मग ..कुणा अनोळखी मुलींच्या सोबत भाड्याच्या घरात राहून नोकरी करण्याचा तुझा विचार ,आता

यापुढे कुणालाही पटणारा नाहीये , आवडणारा नाहीये ..अगदी मी सुद्धा सगळ्यांशी सहमत आहे.

तेव्हा ..तू आता तुझ्या मनाची तयारी करावी हे उत्तम.

*********

आज आईने एक छान आणि आनंदाची बातमी दिली ..पण त्याही पेक्षा ..इथून गावाकडे येण्या बद्दल

पुन्हा पुन्हा सपष्ट शब्दात सांगून टाकले आहे.. आणि..आपल्याला माहिती आहे ..आपल्या

घरात आजोबा आणि बाबांनी जे ठरवले ..त्याप्रमाणे होणार म्हणजे ..होणार ..!

हेमुला हे सर्व सांगावे लागणार ..तो सांगेल त्याच्या आई-बाबांना , पण..आपण कसे आणि कधी सांगायचे ?

या हेमूबद्दल ..आपल्या सोबत काम करणारा एक कलीग ..एक बॉस. इतकीच माहिती आहे त्याच्याबद्दल ,

आता हेमू सोबत बोलून निर्णय घेणे भाग आहे ..नाही तर ..

हेमू सारखा ..जिवलगाला घालवून बसू आपण... !

आता उद्याचे ऑफिस कसे करणार आहोत आपण..

अनिता सुट्टीवर , सोनिया हॉस्पिटल सोडून येऊ शकत नाहीये ..आणि तिच्या मामांचा सत्कार कार्यक्रम

उद्या दुपारी आहे . यांच्या सोबत आता आपल्याला जावे लागणार असे दिसते आहे .

सकाळी सोनियाला विचारून ठरवू या ..असे नेहाने निर्णय घेतला ..तेव्हा कुठे तिला बरे वाटले.

सोनियाच्या मामा –मामींना एकट्या नेहावर आलेला कामाचा लोड पाहून खूप संकोच वाटू लागला ..

मामी म्हणाल्या ..

नेहा ..पोरी ..कामाचा सगळा बोझा तुझ्या एकटीवर पडलाय आणि तू तर मला कशालाच हात

लावू देत नाहीस ,

दोन दिवस झाले ..बसल्या जागी आम्हाला सगळ आणून देते आहेस....कमाल आहे बाई ..तुझ्यात इतका

उत्साह कसा काय आहे ?

नेहा म्हणाली –

मामी – आमच्या घरी पूर्वापार चालत आलेले शिकवण आहे.ही .

.माझ्या आजीने ..तिच्या सुनेला ..म्हणजे माझ्या आईला शिकवले ..मी आईकडून शिकले ..आणि तसेच वागते आहे..

की ..आपण जे काम करू, ते मनापसून ,आणि हसतमुखाने करीत राहायचे ..अशाने कामाचा शीण येत

नाही ..उलट मनाला समाधान मिळते.

नेहाचे शब्द ऐकून ..मामा म्हणाले ..

नेहा – याला म्हणतात ..स्वानुभवाचे बोल ..जो प्रत्यक्ष काम करून दाखवत असतो त्यालाच हे सांगता

येते , बाकी काही कामच न करणारा असे सांगू लागला सांगू लागला ..तर .ऐकणार्याला .त्याच्यातील फोलपणा कळू लागतो.

तुझ्या वागण्यातून –बोलण्यातून ..तुझ्या घरातील –परिवारातील चांगल्या वातावरणाची कल्पना येते.

बरे ते जाऊ ..दे..

उद्या दुपारी आमचा सत्कार कार्यक्रम आहे.. त्यासाठी तू रजा घेऊन पूर्ण दिवस आमच्याबरोबर थांबण्याची

गरज नाही ..

त्यात तुला सोनिया.रोहन आणि –मुलासाठी संध्याकाळचा डबा घेऊन जायचा आहे..

तू ऑफिस कर ,संध्याकाळी सोनियाकडे जाऊन ये ..

मग आमच्या ट्रेनच्या आधी एक तास स्टेशनला जाण्यासठी टैक्सी करून दे ..आम्ही आमचे जातो ,

तू आता आमची काळजी करण्याची जबाबदारी वाढवून घेऊ नको ..ऐक आमचे .

मोठ्या माणसाना काय बोलायचे .. काही न बोलता ..नेहा म्हणाली ..

ठीक आहे..तुम्ही म्हणाल तसे करू या.

**********

३.

सकाळी ऑफिसला जाण्या आधी ..नेहाने घाई घाईने ..हॉस्पिटलमध्ये तिघांना पुरेल इतका डबा

भरला , मामा –मामी जेवण करून मग..कार्यक्रमाला जाणार असे ठरले ..त्यामुळे ..

नेहाने स्वतःसाठी डबा भरला ..आणि ती आधी हॉस्पिटलमध्ये डबा देणार मग तसीच ऑफिसला जाणार

त्यामुळे ..आता थेट संध्याकाळीच भेट होणार ..

तेव्हा सांभाळून जा कार्यक्रमाला आणि सांभाळून या.

असे म्हणून नेहा बाहेर पडली.

हेमुचे आई-बाबा आराम करीत पडले ..

बाबा म्हणाले – हेमूच्या आई –

सोनिया –अनिता आणि ही नवी मुलगी नेहा ..तिघींनी आपली खूप काळजी घेतली ..

मधुरिमाच्या शब्द्वार ..या तिघींनी आपला पाहुणचार अगदी मनापसून केलाय.

असा विचार करीत बसलेले असतांना ..बाबांचा फोन वाजला ..

पलीकडून मधुरिमा बोलत होती ..

तिचा आवाज ऐकून ते म्हणाले .. तुझ्याबद्दलच विचार करीत होतो ..

बाकी ..इथे आम्ही सोनियाचे मामा-मामी म्हणून आलो खरे ..पण.. आमचा खरा पाहुणचार

केला तो ..सोनियाच्या रूममेट म्हणून राहणाऱ्या नव्या पोरीने ..नेहाने ..

मधुरिमा मनातल्या मनात हसली ..आणि म्हणाली ..

आता ..मी जे सांगते ती ऐका ..

तुम्ही सोनियाचे मामा –मामी आहेत ..हे मी सांगितले म्हणून तुम्ही सर्वांनी ऐकले ..

अगदी ..हेमू सुद्धा माझ्या शब्दाप्रमाणे वागतो आहे ..

तुम्हाला ..सत्कारसाठी बोलावणे हा माझ्या प्लैनचा एक भाग आहे..

आणि तुम्ही इथे पाहुणे आलात ,राहिलात , पाहुणचार घेतलात ..एक प्रकारे तुम्ही एक

परीक्षा घेतलीय असे समजा ..

हेमूच्या आई स्पीकरवरून हे बोलणे ऐकत होत्या ..त्या म्हणाल्या ..

ए दीदी ..कोड्यात बोलू नको बरे ..स्पष्टपणे ,मोकळेपणाने सांग सगळ ..

तुमचा पाहुणचार करणारी , तुमची काळजी घेणारी ..जिच्या सह्व्सात तुम्ही दोन-तीन दिवस

राहिले आहात ..

ती नेहा .. तुम्हाला तुमची होणारी सुनबाई ..म्हणून कशी वाटेल ..सांगा बरे ?

गेले काही महिने ..ही नेहा तुमच्या हेमूच्या सोबत काम करते आहे ..तुमचा हेमू तिचा बॉस आहे.

मी ज्या मावशीकडे राहते ना ..ती या नेहाची सख्खी मोठी मावशी आहे. नेहापण मावशीकडे राहते

आता तिची मावशी आणि मी दोघी ही परदेशात आलेलो आहोत.

या नेहाला पाहिल्यापासून , तिच्या सोबत राहिल्यापासून ..मी तिला आपल्या हेमुसाठी निवडले ,आणि मग

हेमूच्या ऑफिसमध्ये जोब दिला ..तिथेच सोनिया –अनिता सोबत तिने काम केले .म्हणन ती आता त्यांची

रुममेट झाली . मग, मी नेहाची बदली हेमूच्या सेक्शनला केली ..आणि काही महिन्यांनी ..या दोघांनी

आपपल्या प्रेमाची कबुली माझ्याजवळ दिली .

आता बोला ..

तुमची हेमुला परवानगी आहे की नाही ..नेहाशी लग्न करण्यासाठी ?

माधुरीमाने एकदाचा हा गौप्यस्फोट करून टाकला ..

तिचे सांगणे ऐकल्यावर हेमुचे आई –बाबा म्हणाले ..

मधुरिमा ..कमाल केलीस बरे का .. दोन दिवस आम्ही नेहाच्या सोबत राहून पाहिले ,

आणि मनात कितीदा येऊन गेले ..की ही नेहा आपल्या हेमू साठी अगदी योग्य आहे ,आणि आपल्या

घराला सांभाळून घेणारी आहे.

पण वाटायचे ..हे असे वाटून काय उपयोग ?

हिच्याबद्दल ,हिच्या घराबद्दल काहीच माहिती नाही , शिवाय तिच्या घरच्यांना आमच्या बद्दल

काहीच माहिती नाही ..जाऊ द्या ..आपल्या नशिबात नाहीये इतकी गुणी पोरगी..

मधुरिमा म्हणाली ..

आता तर माहिती झाले ना ..आता हे कसे जुळवून आणायचे ..ते पण .सांगते ..

तुम्हाला मी संध्याकाळी नेहाच्या घरचे सगळे डीटेल्स देते ..मग तुम्ही ठरवा कसे करायचे .

आणि हो ..तुम्ही हेमुचे आई-बाबा आहात ..हे अजून नाही कळू द्यायचे या नेहाला .

मी संगे पर्यंत सस्पेन्स असू द्या .

हेमुला पण काहीच बोलायचे नाहीये ..जरा टेन्शन वाढवू या या दोघांच्या मनावरचे .

चला ..रात्री ट्रेन मध्ये बोलते ..

बाय ..!

मधुरिमाने सांगितलेले ऐकून हेमूच्या आईला आनंद आवरता येत नव्हता ..

कमाल केली बाई ..या माधुरीमाने ..किती विचार केलाय तिने हा सगळा प्लेन करतांना .

हेमुचे बाबा म्हणाले ..

आपण कार्यक्रमाहून आलो की ..मग.. या नेहाकडून तिच्या घरच्यांची माहिती तर घेऊ या ,

म्हणजे कल्पना येईल ..आणि त्या प्रमाणे काही करता आले तर आपणच पुढाकार घेऊन करू ,

नेहासारखी मुलगी आली सुनबाई होऊन घरात येणे ..खरेच खूप छान होईल ..

*********

४.

नेहा ऑफिस मध्ये पोंचली ,काम सुरु झाले आणि तिचा फोन वाजला ..नवीन नंबर दिसला ,

तिने कॉल घेत विचारले ..कोण बोलते आहे..

पलीकडून ..तिच्या अलकावहिनींचा आवाज आला ..

नेहा ..मी बोलते आहे..पण हा नंबर मात्र तुझ्या होणार्यावाहिनी साहेबांचा -–भारतीचा आहे ..

घे ..बोल तिच्यासाही .

हेल्लो ..भारती ..वाहिनी ..असेच म्हणू ना ? नेहाने विचारले ..

भारती म्हणाली ..शुअर ..वाहिनी म्हंटलेले आवडेल ..

फक्त .अहो ,वगेरे नको..ए वाहिनी असे म्हण.

नेहा म्हणाली ..ए वाहिनी , आपण दुपारी लंच मध्ये बोलू या ना निवांत ..

आता मला मिटिंग आहे ..फोन ऑफ असेल ..,मीच करेन कॉल.

भारती म्हणाली ..ठीक आहे नेहा , तू दुपारी आठवणीने कोल कर . मी वाट पाहीन

बाय ..चालू दे तुझी ड्युटी ..

नेहा मिटिंग हॉलमध्ये आली ..तिने हेमुला दोन दिवसाचे अपडेट दिले ..

ते ऐकून हेमू म्हाणाला ..

किती छान योगायोग आहे बघ.. एका पाठोपाठ ..अनिता आणि सोनिया त्यांच्या लाईफ मध्ये

सेटल होत आहेत . नाही तर ..दोघी सतत परेशान असायच्या . आता खुश असतील दोघी.

नेहा म्हणाली ..हो ते तर आहेच.

आपल्यासाठी फिफटी –फिफ्टी बातमी आहे ..थोडी ख़ुशी –थोडा गम ..

हेमू म्हाणाला ..

ए बाई .उगीच टेन्शन नको वाढवू ..काय ते स्पष्ट आणि समजेल असे सांग

हेमू .

.माझ्या भूषणदादूचे लग्न ठरते आहे ..कालच त्याने मुलगी पसंत केली आहे.

आणि आमच्या आजोबांनी, बाबांनी मुलीच्या वडिलांना एक कंडीशन टाकली आहे..

ती म्हणजे ..मुलाच्या बहिणेचे ..म्हणजे ..माझे लग्न आधी ..मग .भावाचे.

हेमू ..आता आपण दोघांनी आपापल्या घरी सांगायला हवे आहे ..जास्त वेळ घालवणे नको .

हेमू म्हणाला ..हो ते तर करावे लागणार , तू पण मनाची तयारी कर..

या मंथ एन्डला मी पुन्हा गावाकडे जातो आणि आई-बाबांना सांगतो ..

तुम्ही ज्या मुलीच्या हातचा पाहुणचार घेतलाय, तीच तुमची होणारी सुनबाई आहे,

आम्हाला तुमची परवानगी द्या .

हे ऐकून नेहा म्हणाली –

भूषणदादू मला नेण्य साठी इथे येण्या अगोदर मला एकदा गावी जाऊन ..स्वतः आपल्या बद्दल

सांगावे लागणार आहे.. मला वाटते ,

आपण दोघे ही एकाच वेळी .आपापल्या गावी जाऊन ..घरच्यांना सांगू या आपल्या बद्दल.

हेमू आणि नेहा,दोघांचे यावर एकमत झाले .

********

५.

दुपारचा सत्कार समारंभ आटोपून , आई-बाबा घरी येऊन आराम करीत होते.

गावी परत जाण्याची त्यांची तयारी कधीच झाली होती . नेहाच्या ऑफिसमधून येण्याची ते वाट

पाहत होते..

मधुरिमा कडून ..हेमू आणि नेहाच्या बद्दल ऐकल्यापासून ..या दोघांची तिच्याकडे पाहण्याची नजरच

बदलून गेली होती . ही इतकी छान ,गुणी आणि गोड मुलगी .आपली सुनबाई होणार .याचा दोघांना

खूप आनंद होत होता.

पण..आपण कोण आहोत हे नेहाला सानायचे नाहीये ..मधुरिमाने पुन्हा पुन्हा बजावून सांगितले होते.

नेहा घरी आली ..आधी तिने चहा टाकला ..

चाह घेतांना तिने सत्कार साम्राम्भा बद्दल विचारले , गौरव चिन्ह , सन्मानपत्र पाहिले .

नेहाच्या स्वभावातील आपलेपणा आणि प्रेम पाहून ..हेमूच्या आई-बाबांचे मन आतून सारखे भरून येत होते .

पण हे सगळे नेहाला जाणवू द्यायचे नाही..ही गोष्ट त्यांना खूप कठीण वाटत होती.

गावाला निघायच्या आधी ..हेमूच्या बाबांनी ..

नेहाच्या घरच्या बद्दल माहिती करून घेतली .

नाव ,फोन नंबर आपल्या फोन मध्ये सेव्ह करून घेतला .

वेळेच्या एक तास अगोदर ते स्टेशनला निघाले . ते निघाले तेव्हा ..ती हेमूच्या आई-बाबांच्या पाया पडली,

हेमुची आई म्हणाली—आमचे आशीर्वाद आहेत तुला ..

सगळ्या गोष्टी ..तुझ्या इच्छेप्रमाणे होवो.

आधी ठरल्या प्रमाणे ..हेमू स्टेशन बाहेर येऊन उभा होता . त्याने आई-बाबांना गाडीत नेऊन स्लीपर कोच

मध्ये बसवले . का कुणास ठाऊक आज आपले आई-बाबा आपल्याकडे वेगळ्याच नजरेने ,

रोखून पाहत आहेत असे हेमुला सारखे वाटत होते ..पण..तो काही बोलला नाही.

गाडी निघातंना म्हणाला ..आई –बाबा ,मी येतो पंधरा दिवसांनी..बोलू निवांत .

आई-बाबांनी हसून ..हो ..हो ,ये बरे ,आम्ही वाट पाहतो. असे म्हटले , हे सुद्धा हेमुला नवीनच वाटले.

बाय करून हेमू स्टेशन बाहेर पडला ..गाडीने वेग पकडला होता..

खालच्या आपापल्या बर्थवर हेमुचे आई-बाबा बसले होते.

बाबा म्हणाले – आता मी काय ठरवले आहे ते ऐका ..

आपण उद्या गावी पोंचलो की. सगळ्यात अगोदर ..मी नेहाच्या घरी फोन करणार आहे..

कारण ..नेहाच्या घरची माणसे ..हे घर आपल्यासाठी मुळीच परके नाहीये ..

कारण.. माझे मोठे चुलते ..आणि नेहाचे आजोबा ..हैदराबादला सोबतच शिकले ..एकाच रूमध्ये राहिलेले

आणि वकील झालेले खूप क्लोज फ्रेंड . आता या गोष्टी खूप खूप जुन्या झाल्या तरी ..

आत्ता आत्ता पर्यंत ..म्हणजे दहा वर्षा झाली ..आम्ही सगळे फोन संपर्कात असायचो ..

मी आणि नेहाचे बाबा ..आम्ही पण वकील झालोत ..पण वेगवेगळ्या ठिकाणाहून ..

बघ किती योगायोग आहे..दुनिया गोल आहे “ असेच म्हयचे .

हे ऐकून हेमुची आई म्हणाली ..

अहो फोनवर सांगा –आणि विचारा त्यांना ..आम्ही दोघे या रविवारी डायरेक्ट तुम्हाला भेटायलाच येत आहोत.

कशासाठी हे मात्र सांगू नका .

बाबा म्हणाले ..यस असेच करू या ,

********

बाकी पुढच्या भागात ..

भाग -५० वा लवकरच येतो आहे .

--------------------------------------------------------------------------------------------------

कादंबरी – जिवलगा

ले- अरुण वि.देशपांडे –पुणे.

९८५०१७७३४२

------------------------------------------------------------------------------------------------------