TO GET HER - 2 in Marathi Love Stories by Rushikesh Mathapati books and stories PDF | तिला सावरताना भाग - २

Featured Books
  • My Wife is Student ? - 25

    वो दोनो जैसे ही अंडर जाते हैं.. वैसे ही हैरान हो जाते है ......

  • एग्जाम ड्यूटी - 3

    दूसरे दिन की परीक्षा: जिम्मेदारी और लापरवाही का द्वंद्वपरीक्...

  • आई कैन सी यू - 52

    अब तक कहानी में हम ने देखा के लूसी को बड़ी मुश्किल से बचाया...

  • All We Imagine As Light - Film Review

                           फिल्म रिव्यु  All We Imagine As Light...

  • दर्द दिलों के - 12

    तो हमने अभी तक देखा धनंजय और शेर सिंह अपने रुतबे को बचाने के...

Categories
Share

तिला सावरताना भाग - २

१ वाजत आलेले होते. पूजा , रचना , रवी आणि अर्णव कॉन्फरन्स रूममध्ये मीटिंगसाठी जमले . ऋचा आजारी असल्याने ती आज आलेली नव्हते . अर्णव प्रोजेक्ट हेड असल्याकारणाने त्यालाच मीटिंग हेड करावी लागणार होती. मीटिंगची सुरुवात अर्थातच अर्णव करू लागला .

अर्णव - " वेलकम टू ऑल फॉर थिस मीटिंग . सर्वातप्रथम आपल्याला मिळालेला पोर्जेक्ट आपल्या कंपनीला खूप पुढे घेऊन जाऊ शकतो . तर हा प्रोजेक्ट आपल्याला लवकरात लवकर आणि उत्तमरित्या पार पाडायचं आहे. चुकीला माफी नाही."

रवी - " काय फिल्मी डायलॉग मारतो रे? 😌... मुद्यावर ये ना?"

रचना -" गप रे रव्या ... अर्णव पुढे बोल."

अर्णव - " ओके... तर आपल्याला लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आपल्याला नवीन सॉफ्टवेअरवर काम करायला पाहिजे. तर प्लॅन असा आहे की रचना आणि पूजा तुम्ही डाटा गोळा करा आणि त्यानंतर मी आणि रवी त्या प्रोजेक्ट वर काम करू . इस इट ओके?"

रवी - " पण ऋचाच काय?"

अर्णव - " ऋचा प्रोजेक्टची रिपोर्ट तयार करून देईल ? "

रचना -" हा ओके."

पूजा - " एक मिनिट .. रचना आणि मी फक्त डाटा का गोळा करावे ? . मी पण पॉर्जेक्ट करू शकते ना .😡. आणि तुम्हीही डाटा गोळा सगळे करू शकता . मग आम्ही लेडीज च का गोळा करायचा ?"

पूजाला राग आलेला पाहून अर्णव शांत करू पाहत होता.

अर्णव -" अग तस नाही..."

ती ऐकूनच घेत नव्हती. ती पुढे बोलतच होती.

पूजा -" का तुम्ही आम्हा लेडीज ना कमी लेखत आहात ?... का सगळे क्रेडिट फक्त तुम्हीच घेणार आहेत काय?... असच असत समाजात कोणी एक मुलगी वर येतं असेल तर काही मुलांना सहन होत नाही .... इक्वलिटी कुठे अस्तित्वातच नाही.. आणि तुम्हा मुलांना तर फक्त मुलगी चुली भांडी करणारे , सगळे सहन करून गप्प बसणारे , आणि फक्त मुलबाळ सांभाळणारे वाटतं असणार ना?"

अर्णव हातवारे करून तिला थांबवण्याचा प्रयत्न करू लागला होता. पण ती मात्र बुलेट ट्रेन सारखी बोलत होते.

पूजा -" आता बघा , मला गप्प बसू पाहत आहेत. रात्री कोणी एका ठिकाणी जाव म्हणल की कोणी एकटा येतो आणि रेपचा प्रयत्न करतो . या जगात मुलींना जगायचं मुश्किल झालेलं आहे . तुम्ही मूल मात्र लग्नात हुंडा मागता आणि त्यांच्या आईवडिलांचा जगणं मुश्किल करून ठेवता . जर एका मुलीवर बलात्कार झाला असेल तर कारण सांगता की ' मुली कमी कपडे घालतात ,मग बलात्कार तर होणारच ना..चूक तर मुलीचीच आहे ..'😠... आता इथ ऑफिस मध्ये पण तसच होत आहे . समान संधी एका मुलीला लाभतच नाही ... असा किती वेळ चालणार ?"

कॉन्फरन्स रूम मध्ये आता वातावरण गरम झालं होत . रवी आणि रचना फक्त पूजा कडे बघत होते . तीच बोलणं ऐकुन अर्णवचा पारा चढला.

अर्णव -" इनफ इस इनफ .... मी फक्त एवढ्यासाठी सांगत होतो की हे सॉफ्टवेअर फक्त मला आणि रविलाच ऑपरेट करता येत.... आणि तुम्हाला शिकवायला कमीत कमी ३ महिने लागतील आणि तेवढा आपल्याकडं टाइम नाहीयेे...... आणि कुठला मुद्दा कुठे घेऊन गेलीस ... आणि काय??... हो समान संधीचे वाक्य तर तुम्ही म्हणुच नका..😠... एका बस मध्ये महिलांचं सीट वर तुम्ही बसता कारण ते तुमचा हक्क आहे आणि पुरुषांच्या सीटवर पण बसता?? ... का हे आमचं हक्क नाही का?.. इथ कुठ जात तुमची इक्वॉल्टी??? ... मुलींना पिक्चर बघायचं असत तर तिकीट काढताना मात्र मुलांना पाठवता ... इथ कुठ जात तुमची इक्वलिटी ?..😠.. मान्य आहे की हुंडा घेणारे मुले एकदम निच असतात पण हे कितपत योग्य आहे की तुम्ही मुली मुलाचं पगार बघून लग्न करता . ते हुंडा नाही होईल काय?.... आता दिल्लीच उदाहरण बघा ना .आता मुलींना किंवा महिलांना फुकट मेट्रोमध्ये प्रवास करायला मिळेल , म्हणजे एक गरीब मजूर पैसे देऊन जायचं आणि एक श्रीमंत मुलगी फुकट फिरायच ... इथ कुठ गेलं तुमची इक्वलीटी ?? ...😠...आणि कारण काय म्हणाव की मुलींच्या सेक्युरिटी साठी हे नियम आहेत... मान्य आहे की बलात्कार करणारे सैतान असतात ... मी तर म्हणतो त्यांना रस्त्यावर मारा... पण कित्येक मुली बलात्काराच्या नावाखाली मुलांना ब्लॅकमेल करतात माहिती का?... आणि आम्हाला शिकवतात इक्वालिटी... शी....😠😡"
आता अर्णवला राग खूप आलेला होता. रागेत तो खूप काही बोलून गेलेला होता. इतक्यात जसिका आली .

जसिका - " हे इट्स लंच टाईम."

सगळ्यांना शांत पाहून ती पुढे म्हणाली

जसिका -" काय झालं इथ?...😐"

अर्णव रागाच्या भरात फाईल जोरात आदळून बाहेर गेला . सगळे अजून कॉन्फरन्स रूममध्येच होते. पूजा तर अर्णवच बोलणं ऐकून विचारात पडली होती . रचना आणि रवी तर चिडीचूप झाले होते . अर्णव तरतरीत ऑफिसच्या कॅन्टीनमध्ये गेला . जिथे ते सगळे रोज टिफीन खात असत . अर्णव रागाने अजुन बाहेर पडला नव्हता.स्वतःशीच बडबड करत होता." काय समजते ही स्वतःला ... "
इतक्यात मागून आवाज आला " पूजा शर्मा समजते... ."
ती माझ्यापुढे कोक ( पेप्सी) च कॅन देत म्हणाली .

अर्णव - " मला नकोय ...😠"

रागात अर्णव तिला नाही म्हणाला.

पूजा - " बघ ... नाहीतर मी कुणाला सहजा कोक ऑफर करत नाही ..."

नाईलाजाने तो कोकचा कॅन घेतला

अर्णव - " धन्यवाद ..."

पूजा - " ओह... मराठीत आभार मानत आहात ."

अर्णव - " हो ...😤"

तो अजुनही रागातच बोलत होता. थोड्यावेळाने त्या दोघात एक वेगळीच शांतता पसरली.

पूजा -" सॉरी... मी जास्तच बोलून गेले.😑"

अर्णव -" ओह...😏😏 तुम्हाला सॉरी पण बोलता येत तर ?"

पूजा -" हो येत तर...😅... मी जरा जास्तच बोलत असते ना?"

अर्णव -" ह्म... आणि मी पण सॉरी ... एवढ बोलायचं नव्हतं मला.... 😑"

पूजा -" सो.... आय एम पूजा ...( ती हाथ पुढं करत म्हणाली).... फ्रेंड्स????"

अर्णव - " 😁... आय नॉ यू पूजा .... ( मी पण हॅण्ड शेक करत म्हणालो ) .... अँड आय एम अर्णव ...😁"

मग त्यांच्यात काही क्षणासाठी नजराला नजर भिडली गेली . मग काही क्षणासाठी ते दोघं जग विसरून गेले होते.
तेवढ्यात ....

रवी -" अरे ... कॅन आय जॉईन यू बोथ? ...😂😂"

ते दोघे दचकलेच आणि त्याचे दोघांचे हात अजून तसेच हॅण्ड शेक करत होते . ते बघून अर्णव लगेच हात काढून घेतला. तेवढ्यात जसिका आणि रचना त्यांचे टिफीन घेऊन आले .

जस्मिन -" मैत्री झाली वाटतं दोघात..😊"

रवी -" मैत्री नाही अजून खूप काही 😂😁"

रचना -" गप रे तू ...😤...( रवीला मारत रचना म्हणाली )

रवी - " मस्करी केली ग... मारती कशाला?"

अर्णव - " सॉरी गाईज ... मीटिंग फुकटात गेला...."

पूजा -" मी काय सॉरी नाही बोलणार ....म्हणजे सॉरी बोलून फॉर्मलिटी कशाला आता.. कामाला लागू की ?.."

रचना -" यू आर राइट पू...."

रवी अचानक हसू लागला.

जसिका -" काय झालं रवी ?..."

रवी -" ती हिला पू (💩) म्हणाली..😂😂😂"

रचना -" तुझ खूप झालं ह आता...."

ती आणि रवी आता मारपीट करत होते. मारपीट म्हणण्यापेक्षा ती त्याला मारायलाच उठली होती.
सगळे हसत होते. पण ती ( पूजा ) मात्र नाही.

अर्णव -" हे ... खूप झालं आता चला टिफीन खाऊयात ... खूप काम आहे अजून..."

पूजा - " तुम्ही चालू करा .... आय एम ओके ... तुझ्याकडं लाईटर आहे का?...( ती मला विचारत होती .)"

अर्णव -" का तू टिफीन नाही आणत?... आणि एवढं सिगरेट पित जाऊ नकोस . "

पूजा -" नसेल तर नाही म्हणून सांग ना ... कशाला भाषण देता रे ... तुला भाषण द्यायला खूप आवडत वाटतं?.... ऑफिसमध्ये पण आणि इथेपण... "

अर्णव -" मित्र म्हणालीस ना ... म्हणून म्हणालो मित्र मानत असेल तर ये आणि टिफीन खा बघू ... नाही तर अजून मोठा भाषण द्यावं लागेल मला 😂😁"

जसिका -" हा डिअर... कम ऑन ... लेट्स टेक थीस...अँड सिगरेट पित जाऊ नकोस.( जसिका तिला टिफीन ऑफर करत होती .)

अर्णव -" हा ... ये बघू"

पूजा -" ओके ... "

ते सगळे टिफीन खाऊ लागले. लंच टाईम संपला .सगळे कामाला लागले . मात्र पूजा मात्र थोड्यावेळाने आली .

अर्णव -" तू सिगरेट पिऊन आली ना?"

पूजा -" येस ."

अर्णव -" आय नॉ दॅट....आम्ही सांगितल्यावर थोडी तू थांबवणार आहेस हे सगळं...."

पूजा -" यू नॉ दॅट ना.... सॉरी...😅"

परत सगळे कामात व्यस्त झाले . कधी ५:३० वाजले कळलेच नाही.

रवी -" अर्णव ... काही काम आहे का ?... म्हणजे मी जातो नाहीतर थांबेन तुझ्यासाठी..."

अर्णव -" नाही ... तू जा .... आणि हा उद्या लवकर पाहिजेल तू इथे ... कुठलाही कारण नको मला .."

रवी -" हो बॉस.... येतो लवकरच...बाय अर्णव आणि पू 😂"

पूजा -" 😤... बाय बाय..."

पूजा रागातच त्याला बाय केली.

रचना -" अर्णव .... मी पण जाते रे... माझं तर निम्म काम झालंय... काही काम आल तर फोन कर.... "

अर्णव -" हो ... बाय..."

रचना -" बाय अर्णव ... बाय पूजा..."

पूजा -" बाय ... टेक केअर ..."

६:१५ वाजत आले होते.

अर्णव -" चला एकदाच संपलं आजच काम ..."

तो सगळं टेबल आवरून निघू लागला . खाली येताच मागून आवाज आला " अर्णव ..."
मागे वळून बघितलं तर पूजा होती .

अर्णव -" अरे ... तू गेली नाही का अजून?"

पूजा -" नाही गेले.... मला वाटल कोणी पोरगी तुला काही करेल म्हणून थांबले..😂😂😂"

अर्णव -" काहीपण काय?... तू गाडी नाही आणत?"

पूजा -" मला नाही आवडत गाडी चालवायला ..."

अर्णव -" का?"

पूजा -" असच..."

अर्णव -" चल मग सोबत जाऊ चालत ..."

पूजा -" खरंच ?"

अर्णव -" हो..."
ते दोघे बाहेर आले. ती पर्समधून परत सिगरेट काढली .

अर्णव -" बस कर ना आता... किती पित असतीस सिगरेट ?"

पूजा -" आय एम चैन स्मोकर.... "

अर्णव -" एक दिवस बिना सिगरेटच राहून दाखव बघू ..."

पूजा -" अशक्य..."

अर्णव -" प्रयत्न करायला काय हरकत आहे?"

पूजा -" पण का करायचं?"

अर्णव -" बर एक काम करू ... आपला प्रोजेक्ट जर उत्तम झालं तर तू एक दिवस बिना सिगरेट पिता राहायचसं
... बोल मंजूर ?"

पूजा -" आणि नाही उत्तम झालं तर तू मला बिअर पियू घालायचं 🍺"

अर्णव -" तू बिअर पण पितीस?"

तो चकित होऊन विचारला.

पूजा -" हो मग नाय तर काय?"

अर्णव -" ओके .... ठीक आहे.."

आम्ही बाहेर आलो . तसा अंधार होत आला होता .

पूजा -" ऐक ना?."

अर्णव -" बोल..."

पूजा -" आज काम आहे का काय?"

अर्णव -" नाही ग... का?"

पूजा -" आज मला कंपनी पाहिजे होती ..."

अर्णव -" कशासाठी?"

पूजा -" खूप दिवस झाले रे ... एकटीच बसत असते मी चौपाटीवर ... आज तू पण जॉईन हो ना ?"

अर्णव -" होईन पण... मला काहीही होणार नाही ना?😂😂😂"

पूजा -" नाही नाही...😁"

चौपाटीवर पोहचताच मन कसं प्रसन्न वाटतं . सगळे कसं मस्त वाटत होत . म्हातारे लोक ,लहान मुले, कपल्स तिथे फिरत होते . सगळे आपापल्या कामाचे ताण विसरायला इथे येतात. कोणी भेळच आस्वाद घेत असतात , तर कोणाचं तर समुद्राच्या पाणीमध्ये खेळच चालत असत . ते दोघे मात्र समुद्राकडे तोंड करून बसले होते .

पूजा -" मस्त वाटत ना?"

अर्णव -" हो.."

ती परत सिगरेट काढून पीयू लागली .

अर्णव -" डोन्ट स्मोक... "

तो तिच्या तोंडातून सिगरेट काढून फेकला.

पूजा -" आय नॉ यार...."😑

अर्णव -" तुला एक विचारू?"

पूजा -" ह्म्म.."

अर्णव -" तुला ही सवय कधी पासून लागली?"

पूजा -" सांगीन रे परत कधी तरी आता मला मस्त एन्जॉय करू देत हे निसर्ग ...."

तेवढ्यात पाऊस आला. सगळे लोक पळू लागले . कुठ निवारा मिळेल तिथं थांबू लागले . तो देखील पळू लागला. तिथे असलेल्या ऊसाची गाडीजवळ येऊन थांबला. पण ती मात्र हलली नाही. ती मनोसक्त भिजत होती. तिचे ते ओले केस खूपच छान वाटत होते . ती जरी मॉडर्न ,सिगरेट आणि ड्रिंक करणारी असली तरी तिचं मन खूप छान होत. तिचे गुलाबी ओठ , आणि त्या डोळ्यावरचे काजळ तर अर्णवचं लक्ष खेचून घेत होत .

पूजा मात्र त्यालाच बोलवत होती . तो मात्र नकार दर्शवत होतो पण ती पळत आली आणि त्याला पाऊसात घेऊन गेली . ते दोघेही आता भिजू लागले. त्याच लक्ष तिच्यावरून हटत ना... काहीतरी नक्कीच घडत होत...💕💕
**********************************************
क्रमशः
ऋषिकेश मठपती

धूम्रपान शरीराला हानिकारक असत . ही कथा आवडल्यास कमेंट करा .... शेअर करा ....
पुढचा भाग लवकरच ....