sant kanhopatra in Marathi Spiritual Stories by Archana Rahul Mate Patil books and stories PDF | संत कान्होपात्रा

Featured Books
Categories
Share

संत कान्होपात्रा

🌹ओम हरये नमः🌹

ही कथा आहे पंढरपूर पासून साप कोसावर असलेल्या मंगळवेढ्याच्या एका धनाढ्य
श्यामा नायकिन ची मुलीची....,🌹 भक्त कान्होपात्रा ची 🌹

ज्याप्रमाणे उकिर्ड्यात एखादं प्राजक्ताच झाड फुलांनी बहरलेलं असतं त्याच प्रमाणे कान्होपात्रा ही एका हीन कुळात जन्म घेऊनही विठ्ठलाची परमभक्त होती..❣️

कान्होपात्रा ही अतिसुंदर पुष्पराज कमळाप्रमाणे नाजूक होती..त्यास भरीस भर म्हणून तिचा कंठ कोकिळा प्रमाणे सुमधुर होता.. श्यामा गणीकेने कान्होपात्रा ला नृत्य व गायन कलेत निपून बनवण्यासाठी एका गायन आचाऱ्याला तिला शिष्य बनवून घेण्यासाठी विनंती केली🌝

विठ्ठलाच्या परम कृपेमुळे तिला साधना शिकवणारी गुरुजी हे वारकरी संप्रदायाचे विठ्ठलाचे परम भक्त होते त्यामुळे त्यांनी कान्होपात्रेला लहानपणापासूनच नृत्य व गायन शिकवता शिकवता संतांचे अभंग शिकवले ....❣️

कान्होपात्रा आपल्या सुमधुर गळ्यातून, अंतकरणातून गुरुजींना शिकवलेले अभंग म्हणून दाखवत असे ..गुरुजी तिला नेहमी म्हणायचे विठ्ठलाची असीम कृपा म्हणूनच तुझ्या गळ्यातून हे अभंग ऐकायला अतिशय गोड वाटतात.....❣️.
पण बाळा तुझा जन्म तर या गणिकेच्या कुळात झाला आहे पण आपला देह हा नाशिवंत आहे आपला जन्म हा पुन्हा होणे नाही तेव्हा तू याच जन्मी याच देही तुझा उद्धार करून घे ..💞..

विठ्ठलाला आपले दैवत मानून तू तुझे सर्वस्व त्याला अर्पण कर भावभक्तीने त्याचे नामस्मरण कर तेव्हा कान्होपात्रा हात जोडून म्हणाली गुरुजी यानंतर जर मी काही गायन केले तर ते फक्त माझ्या विठ्ठला साठीच माझ्या पांडुरंगा शिवाय मी ही माझी कला कोणासमोरही म्हणून दाखवणार नाही...शेंडी तुटो वा पारंबी तुटो या म्हणीप्रमाणे मी माझे दिलेले वचन कधीच मोडणार नाही मी माझ्या विठ्ठलाशी एकनिष्ठ राहील❣️
.
.. तिला मेनका उर्वशी अप्सरा समान रूप व सौंदर्य होते तीमेनका जणू पृथ्वीवरच अवतरली आहे असा उल्लेख तिचा लोककथेत आढळतो.. तिच्या सम सौंदर्य ,शालीनता अवघ्या पृथ्वीतलावर दुसरी नव्हती...हळूहळू कान्होपात्रा ही चंद्र कलेप्रमाणे वाढू लागली त्याच प्रमाणे तिचे सौंदर्य ही संपूर्ण गावात चर्चेचे विषय बनले होते..💖

कान्होपात्रेला अनेक गावातील सावकारांची मागण्या येऊ लागल्या. तिने प्रत्येक वेळेस नकारच दिला..तिच्या नकारामुळे आता तिचा आणि गावातील सावकारांनी छळ चालू केला..🤦
🌹. कान्होपात्रा मात्र या सगळ्यांपासून दूर विठ्ठल भक्तीत रममाण झाली होती..🌹
आता श्यामा गणीकेला वाटायचं की आपला हा व्यवसाय आपल्या मुलीने पुढे चालवावा ,यासाठी ती तिची मनधरणी करत म्हणायची.... विठ्ठलाच्या भक्तीचे वेड तू तुझ्या डोक्यातून काढून टाक ...आपल्यासारख्या हिन कुळातील जन्मलेल्या स्त्रियांना कोठेही जागा नाही म्हणून तू आपल्या व्यवसायावर लक्ष केंद्रित कर त्यावर कान्होपात्रा म्हणायची.. मी बालपणापासून पाहते तू कधीच इतस यांसारखी मंदिरात गेली नाही बाया भजन-कीर्तन करायच्या... माझे मनही आता पूर्णपणे विठ्ठल आत गुंतली आहे पांडुरंगाच्या भक्तीरसात मी आता पूर्णपणे सामावली आहे... आईची ती वृत्ती पाहून कान्होपात्रा म्हणाली हा जन्म नाही विठ्ठल नामस्मरण करून जन्माचे सार्थक आहे तू मला माझ्या भक्तिमार्गातून बाजूला करू नकोस....😇.

आता मात्र श्यामा गणीकेला कान्होपात्रेचा अधिकच राग येऊ लागला.. कान्होपात्रेला खूप मारलं,... त्यावेळी कान्होपात्रेला खूप वाईट वाटलं की आपल्या जन्मदात्या आईनेच आपल्याला अशी शिकवण द्यावी का ???ती पांडुरंगाला म्हणू लागली की देवा तुझ्या भक्तीचा अखंड झरा माझ्या मनात वाहू दे... इतर कुठलाही विचार माझ्या मनात येऊ देऊ नकोस.... मला भक्तिभावाने तुला प्राप्त करायचे आहेस..🌝

400 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे त्याकाळात आपल्या राज्यावर महाराष्ट्रावर आदिलशाहीचे राज्य होतं.. बिदरचा बादशहा.🙄
आदिलशाहीत तख्त..... गादी विजापूरची ......
रियासत मुसलमानांची. .... ज्याच्या मनगटात जोर तोच शिरजोर.. आदिलशहा बद्दल असा सांगतात की तो अत्यंत क्रूर असा राजा होता.. विषयांत व मगरूर होता.. यथा राजा तथा प्रजा... असेच त्याचे सैन्य होते..गावात देखील राजाचे ठाणेदार होते... गावातील लोकांनी कान्होपात्रेला अद्दल घडवण्यासाठी त्या ठाणेदाराच्या मनात कान्होपात्रा विषयी विष भरले..🙄

ठाणेदाराला कान्होपात्रेने बोलावणे धाडले किंबहुना तिला खेचतच आणल्या गेले.. पण बराच वेळ जाऊनही कान्होपात्रांनी ना आपले नृत्य सादर केले ना गायन... ते एकही शब्द बोलली नाही ...तेव्हा ठाणेदाराला खूप राग आला कान्होपात्रा तेव्हाच उठून गेली..एका वर्षाची एवढीशी पोर पण माझ्यासारख्या एवढ्या मोठ्या ठाणेदाराचा अपमान करते म्हणून तो अतिशय संतप्त होता...

कान्होपात्रा जर माझी झाली नाही तर मी तिला इथून देखील हाकलून लावणार ..असे म्हणून कान्होपात्रा विषयी सूडभावना ठेवूनच ठाणेदाराने बिदरच्या बादशाहाला दहा पाणी पत्र लिहिले...
पत्राच्या प्रत्येक पानावर कान्होपात्रेची अतिशय सुंदर सौंदर्य वर्णन केले होते..
त्याने कान्होपात्रा वर फक्त एका राजाचा अधिकार आहे असे सांगितले. ती आपल्याला नाही म्हणू शकेल पण बिदरचा बादशहा ला नाही म्हणू शकणार नाही राजाला नाही म्हणे म्हणजेच मृत्यूला कवटाळण... भूतळी जाईची, कळी, गोड मंजुळी,सुंदरशी कळी लाजवी रतीला अशी सकल गुण संपन्न ती फक्त राजाच्या हातात शोभून दिसेल असे अनेक सुंदर वर्णन त्यांनी केले होते 🌹

तिकडे कान्होपात्रेला श्यामा गणिकेणे घरी आल्यावर खूप मारलं.. तिला एका अंधार्‍या खोलीत डांबून ठेवलं आणि म्हणाली की आज पासून तू याच खोलीत राहणार ...तुझा बाहेरच्या जगात मला काहीच उपयोग नाही असे म्हणून तिने घराला मोठं कुलूप लावलं..कान्होपात्रा तरीही शांतचित्ताने देवाचे नामस्मरण करत होती.. त्याही अवस्थेत ती देवाचे आभार मानून मनात म्हणत होती की पांडुरंगा इतरवेळी मला कोणीही तुझे ध्यान करत असताना तुझे जप करत असताना व्यत्यय आणत होते..... पण आज मात्र या अंधार्या खोलीत मी तुझं शांतचित्ताने ध्यान करू शकणार आहे देवा विठ्ठला हे तुझीच कृपा की तू मला एकांत देऊन ही संधी प्राप्त करून दिली आहेस...😊

जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी असा अखंड चालू केला.. देवाच्या नामस्मरणात एवढी गुंतून गेली की तिला वेळेचे भानही नव्हते.... त्याच वेळेला झालं काय आषाढी एकादशी जवळ येऊन ठेपली होती..मंगळवेढ्यात सगळी साधुसंत मंडळी वारकरी विठ्ठलाच्या भक्तीच्या ओढीने पंढरपुराकडे पायी जाण्यास निघाली होती.. वारकरी टाळ मृदुंग चिपळ्या तर काही सांगता यांच्या पालख्या घेऊन पंढरपुराकडे निघाली होती.. पताका घेऊन निघालेली मंडळी जय जय राम कृष्ण हरी असा अखंड जप करत चाललेली...🤗
कान्होपात्रेला कीर्तनात चा आवाज ऐकू येऊ लागला, म्हणून तिने खिडकीतून डोकावून पाहिले तर तिला अनेक संतांची मांदियाळी जाताना दिसली..ती म्हणाली इतक्या वर्षांनी हे संत पंढरपूरला जातात पण त्यांचा दर्शनाचा योग कधीच आला नाही ...आज मात्र पांडुरंगा नेच जसे मला बोलावणे धाडले आहे म्हणून ही सगळी वारकरी मंडळी या रस्त्याने जात आहे.. कधीच या रस्त्याने न जाणारी मंडळी ही आज या रस्त्याने जात आहे कदाचित माझ्यासाठी माझ्या पांडुरंगाने बोलावणे धाडले असेल... का???? पांडुरंगाचा विचार मनात येताच पांडुरंगाच्या भेटीच्या ओढीने तिने खिडकीतूनच धाडकन बाहेर उडी मारली...🤦
भगवंताच्या कृपेने तिला साध खरचटले देखील नाही..😊 आणि ती धावत पळतच वारकऱ्यांच्या समूहाकडे निघाली.. तुम्ही सगळ्या संतांना नमस्कार केला किती जन्माचे पुण्य केले असेल मी म्हणून मला आज तुम्हा संतांचे दर्शन झाले आहे.. तुमच्यासोबत गाठभेट ही माझ्या भगवांता घडून आणली आहे मला तुमच्यासोबत पंढरपुराला येऊन देता का??? मला माझ्या विठ्ठलाला पाहायचे आहे.. अशि ती संतांच्या पायी विनवणी करू लागली..

💞माझी विनवणी हेच चरणी
मला भेटवा चक्रपाणी 💞

संत म्हणाले बाळा तू तर एका गणिती ची मुलगी अगं तुझा मार्ग वेगळा आमचा मार्ग वेगळा तुझा मार्ग हा अगदी आरामाचा पण आमचा मात्र काट्याकुट्याचा... धनिक श्रीमंत लोक ही तुझी देव-देवता आमच्या गरीबाचा मात्र तो विटेवरी चा पांडुरंग...🙃तू रोज पंचपक्वान्नांचा जेवण करतेस आम्ही मात्र चटणी भाकरीचा नैवेद्य देवाला अर्पण करतो... कशाला तू आमच्या नादी लागते.. ती म्हणाली नाही हो ,माझ्या स्वरूपाकडे पाहू नका माझा अंतकरण सुद्धा पवित्र आणि शुद्ध आहे.. माझ्या मनी त्या पांडुरंगाविषयी भक्तिभाव आहे तेव्हा कृपा करा आणि मला त्या पांडुरंगा कडे घेऊन चला...👏👏
असे म्हणून तिने आपल्या अंगावरचे दागिने भरजरी वस्त्र फेकून दिले..
वारकरी म्हणाली अगं आम्ही तुला घेऊन जाणारे कोण???? साक्षात परब्रह्म ची इच्छा असेल तोच तुला नेणार आहे तेव्हा तू आमच्या सोबत येऊ शकतेस.. काही हरकत नाही.. चल मग आताच निघूया..
कान्होपात्रा संतांच्या पायी लागली आणि संतांची वीणा हातात घेऊन पंढरपुराकडे जाण्यास निघाली..❣️
विठ्ठल विठ्ठल करत ते पंढरपुरात जाऊन पोहोचले.. चंद्रभागा बघितल्या बरोबरच सर्व संतांनी सांगितले कीकान्हो तो कितीतरी जन्माचे पुण्य केले आहेस म्हणून तुझे पंढरपुरास पाय लागले आहे.. हे जे समोर आहे ना ते पाप नाशक विमोचणी चंद्रभागा आहे..इथून समोर जे मंदिर दिसतय ना !!!ते राऊळ माय बाप विठ्ठलाचे आहे. ,,,,🌝
असे म्हटल्या बरोबरच तिचे अष्टसात्विक भाव जुळून आले आणि तिने साष्टांग दंडवत प्रणाम केला.. तिने चंद्रभागेत स्नान करून पुंडलिकाचे दर्शन घेतले..👏

नामदेव पायरीचे दर्शन घेऊन ती धावतच रावळात आली.. मंदिरात आल्याबरोबर तिने समोरासमोर पांडुरंग बघितला..🥰
💞अनंत लावण्याची शोभा
तो हा विटेवरी उभा ..💞
मंदिरात असलेल्या सोळा खांबाजवळ उभे राहून ती पांडुरंगाला आपादमस्तक न्याहाळत होती..😍. तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य मिश्रीत व विस्मयकारक भाव होते ...प्रेमाने ते आपले देहभान विसरून पांडुरंगाचे दर्शन करत होती.. ..पांडुरंगाचं साजिरी गोजिरी अनुपम असे रूप पाहून तिने पांडुरंगाच्या पायाला कडकडून मिठी मारली.🥰
आज ती स्वतःला धन्य मानत होती... आपल्या जीवनाचे सार्थक झाले असे म्हणून आपल्या गुरुजींनी शिकवलेले अभंग वेड्यासारखी गात होते गायनात नृत्य करत होती.....

असे म्हणतात की एकदा पंढरपूरला आलेली कान्होपात्रा पुन्हा कधीच मंगळवेढ्याला गेली नाही..🙃

दिवसामागून दिवस जात होते.🙃.

ठाणेदाराची पत्र बिदरच्या बादशाला मिळाले होते ...असे म्हणतात की तो दुपारच्या बारा वाजेला ते पत्र वाचायला बसला होता तर त्यांनी रात्रीपर्यंत ते वारंवार वाचले... एवढी सुंदर वर्णन अशी सुंदर देवाची रचना या पृथ्वीवर पण आहे असा त्याचा विश्वासच बसत नव्हता... म्हणून त्यांनी ताबडतोब कानोपात्रा बघण्यासाठी फर्मान काढले..
चलो पंढरपूर ...असे तो सगळ्यांना म्हणू लागला कारण त्यात लिहिलं होतं की कान्होपात्रा सध्या पंढरपुरात आहे..🙄
रात्रीच्या बारालाच तो बिदर हून प्रवासाला निघाला... त्याला कान्होपात्रेला भेटण्याची एवढी उत्सुकता होती की त्याने प्रवासात कुठेही मुक्काम केला नाही ..💁

कान्हा कान्हा कान्हा अब मुझे मिलेगी कांहू असं म्हणत म्हणत असतो वेड्या प्रमाणे चालत होता...🤷पाच दिवसाचा सततचा प्रवास करून सहाव्या दिवशी बादशहा पंढरपुरात सकाळी सकाळी दाखल झाला..🙁
नित्यनियमाप्रमाणे कान्होपात्रा चंद्रभागेमध्ये स्नान करण्यास गेली होती.. ती काठावरती यायला आणि कडून राज्याची बग्गी जायला एकच वेळ झाली.. बग्गी मधून राजांनी कान्होपात्रेचा सौंदर्य न्याहाळलं आणि पत्रात लिहिल्याप्रमाणे हीच ती सौंदर्यवती असे म्हणून तो खूष झाला... नाचत तो म्हणू लागला.. दिल जाने मेरी कान्हो.. ..हो मुझे मिली. ...😲.
सैनिकांनी कानूपात्रेला पकडून आणलं.. कान्होपात्रा खूप घाबरली आणि त्यांचे पाय पकडून म्हणू लागली.. हे राजन तुम्ही काय म्हणता मी तुमच्या लेकरासारखी आहे.... राजाची प्रजा ही त्याची लेकरे च असतात... जर एक राज्यात असे करायला लागला तर सामान्यांनी न्यायासाठी कुणाकडे जावं.???. पंढरपूर सारख्या पवित्र ठिकाणी तू अशी विषयआंध वृत्ती ठेवू नकोस.!!..
राजा म्हणी मला ते काही माहित नाही मला फक्त तु हवी आहेस आणि मी तुला नेनारच..🙄

कान्होपात्रेला आता समजून चुकले की बिदरचा बादशहा काही झाले तरी मला इथून घेऊन जाणारच ....त्याच्या तावडीतून आता काही सुटका नाही.. जशी पांडुरंगाची इच्छा त्याच्या इच्छेशिवाय झाडाचे पानही हलत नाही...
.हे राजा माझी एक शेवटची इच्छा पूर्ण कराल का मला फक्त एकदा विठ्ठलाचे दर्शन घेऊ द्या त्यानंतर तुम्ही मला जेथे न्यायचे आहे तेथे घेऊन जा फक्त एकदा शेवटचे मला माझ्या पांडुरंगाचे दर्शन घेऊ द्या... एवढीच विनंती...🤗

बादशहा म्हणाला बस इतनी सी बात ठीक है .. जाओ फिर लेकिन जल्दी वापस आना.....🌝.

जा असे म्हणतात कान्होपात्रेची जशी एखाद्या सिंहाच्या तावडीतून त्याची सुटका होती तशीच अवस्था झाली.. कान्होपात्रा जीव मुठीत घेऊन सैरावैरा मंदिराकडे धावत सुटली... विठ्ठल विठ्ठल पांडुरंगा पांडुरंगा असे म्हणत धावत धावत मंदिराच्या गाभार्‍यात आली आणि पांडुरंगाचे घट्ट पाय धरले आणि म्हणू लागली पांडुरंगा तू माझी अजून किती परीक्षा घेणार आहेस?????
अरे हीन कुळात जन्म घेणार हे काय माझ्या हातात होतं,??? सांग ना.. वनी हीन कुळात जरी जन्मले असले तरी माझं अंतःकरण शुद्ध आहे ..माझे मन पवित्र आहे.. माझा भाव शुद्ध आहे माझी भक्ती तुझ्यावर निस्सीम आहे..
🌹अभी चेत्सूदुराचारो भजते मामनण्यभाक...
साधूरेव स मनतव्य सम्यग व्यवसितो ही:स:🌹 या तुझ्या ब्रीद वाक्य प्रमाणेतुझा भक्त जो कोणी अनन्यभावाने तुला शरण आला आहे तो भले कितीही दुराचारी व पापी असल्या तरीही भावभक्तीने तुला शरण आले असेल त्याला तू पतकरतोस....
कान्होपात्रा अंतकरणातून भगवंताला आळवू लागली..👏

पतित पावना तू म्हणसी नारायणा..❣️
अंतकरणातून भगवंताला म्हणू लागली ज्या मंगळवेढ्यात तून चोखोबा सारख्या भक्ताला ही तू तुझा भक्त बनवलेस त्याच मंगळवेढ्याची आहे मी.. मला दुसरं-तिसरं काही नकोय मला फक्त तुझं एकदा सगुणरुपात विराट दर्शन दे.. ज्याप्रमाणे तु संत जनाबाई व भक्त द्रौपदीची लाज राखली त्याप्रमाणे आज मी तुला बोलावते आहे... काही झालं तरी तुला आज मला दर्शन द्यावेच लागणार अन्यथा मी तुझ्यापायी माझे मस्तक आपटीन आणि इथेच जीव देईन.. असे म्हणून ती आपले डोके भगवंताच्या चरणी आपटू लागली.. रक्तबंबाळ झाली.. मोठमोठ्याने भगवंताचे नाव घेऊन ती रडू लागली.. तिला अंधारी आली तिची प्राण जाण्याची वेळ झाली तिने भगवंताला आपले सर्वस्व अर्पण केले.. इथून बाहेर गेली तर बिदरचा बादशहा आपले सर्वस्व घेऊन जाईन अनायासे पांडुरंगाच्या कृपेने मला पांडुरंगा मध्ये समाविष्ट व्हायचे आहे आणि ती देवाला आळवू लागली..

❣️नको देवराया अंत असा पाहू
प्राण हा सर्वथा जाऊ पाहे..❣️
आणि..............
तिचे करुणामय वेदनेने व्याकूळ बोल ऐकून भगवंताला हि रहावले गेले नाही. तिच्या अंतकरणातून आलेल्या आवाजाने भगवंत ही त्याच क्षणी सगुण रूपात प्रगट होऊन तिला दर्शन दिले.🥰
. तिच्या पाठीवरून हात फिरवून देव म्हणू लागला अगं हो बाळा कानू तुका घाबरत आहेस आता मी आलोय ना तुला आता कोणाशी घाबरायचं काहीच कारण नाही...
. सगुण रूपात भगवान प्रगट झाल्याबरोबर तिला इतका आनंद झाला
. किती म्हणू लागली पांडुरंगा तू खरच मला प्राप्त झालास माझे आता तुझ्या चरणी अजून एक मागणे आहे माझी भक्ती खरच तुला मान्य असेल तर मला दुसरं काही नको मला तुझ्या हृदयात जागा दे भगवंता... या अविचारी जगात माझी आता कोणीच नाही मला तुझ्याशिवाय कुणीही नको....🤗

भगवंतांनी तिची मागणी ऐकल्यावर दोन्ही हातांनी उचलून अलगद तिला आपल्या हृदयाशी कवटाळले..🤗. आणि काय आश्चर्य गार पाण्यात बर्फ उघडावा किंवा दुधामध्ये साखर जशी एकरूप व्हावी तशीच कान्होपात्रा ही भगवंताच्या हृदयात विलीन झाली.... एकरुप झाली अदृश्य झाली... मंदिरातल्या पुजाऱ्यांनी व तेथे आलेल्या संतांनी बघितले की पाहता-पाहता कान्होपात्रा गाभाऱ्यातून अदृश्य झाली. अशाप्रकारे कान्होपात्रा ही विठ्ठलमय झाली

🌹. धन्य तो पांडुरंग आणि धन्य त्याची भक्त...🌹
आजही ज्या ठिकाणी कानोपात्रा अदृश्य झाली तेथे एक झाड आहे..तेथे अबीर बुक्का गुलाल आणि तुळशी मंजुळा चा हार एकादशीला आपोआप येतो किंवा भगवंत तेथे येऊन गेल्याची साक्ष आपल्याला मिळते... पंढरपुरात गेल्यावर तिचे दर्शन झाल्याशिवाय विठ्ठल रुक्मिणी च्या दर्शनाला जाताच येत नाही...❣️❣️

क्रमशः
(टिपः ही कथा मी माझ्या आजीकडून ऐकलेली आहे.. ज्यावेळेस तेथे पंढरपुराला तुकाराम महाराजांचे पारायण होते त्यावेळेस सात दिवस आम्ही पंढरपूरात होतो ..त्यावेळेस आजूबाजूचा संपूर्ण परिसर व त्याची माहिती त्यांनी मला सांगितली होती तीच मी आज कथारूपाने तुमच्यासमोर मांडली आहे.... असे अनेक दृष्टांत मी यापुढेही लिहिणार आहे तरी आवडल्यास मला सगळ्यांनी कमेंट नक्की द्या 😇😇
. तरी काही चूक असल्यास हक्काने कळवा तुमच्या-आमच्या मधील मधील 💞 archu,💞)