kadambari jeevlagaa Part 33 in Marathi Fiction Stories by Arun V Deshpande books and stories PDF | कादंबरी- जिवलगा ...भाग - ३३ वा

Featured Books
  • My Wife is Student ? - 25

    वो दोनो जैसे ही अंडर जाते हैं.. वैसे ही हैरान हो जाते है ......

  • एग्जाम ड्यूटी - 3

    दूसरे दिन की परीक्षा: जिम्मेदारी और लापरवाही का द्वंद्वपरीक्...

  • आई कैन सी यू - 52

    अब तक कहानी में हम ने देखा के लूसी को बड़ी मुश्किल से बचाया...

  • All We Imagine As Light - Film Review

                           फिल्म रिव्यु  All We Imagine As Light...

  • दर्द दिलों के - 12

    तो हमने अभी तक देखा धनंजय और शेर सिंह अपने रुतबे को बचाने के...

Categories
Share

कादंबरी- जिवलगा ...भाग - ३३ वा

कादंबरी – जीवलगा

भाग- ३३ वा

----------------------------------------------------------

नेहा निघाली ..जातांना तिला वाटत होते ..

ती एक सुंदर परी झाली आहे..आनंदाचे पंख लावून निघालेली अधीर परी ..

तिच्या ..जिवलगाच्या ..पहिल्या भेटीला ..अगदी आनंदी - हवेत तरंगत निघाली ..

मनातून तिला देवाचे आभार मानायचे होते ..

देवा ..हे स्वप्न प्रत्यक्षात खरे होऊ दे ..

माझा जिवलग ..माझा होऊ दे ..

त्याने बोलावे नि मी ऐकावे ..

त्यच्या सगळ्या शब्दांना ,, माझा फक्त ..हो आणि हो

..हो चा .. गोड होकार ..असणार आहे.

लिफ्ट मध्ये जातांना ..नेहाच्या कानात हेमू पांडेचे शब्द

नाजूक घंटी सारखे किणकिणत आहेत असे वाटत होते ..

किती वेगळे वाटावे असे हे शब्द ..

ओ माय god....!

ती जणू तेच शब्द मनात पुन्हा पुन्हा पुटपुटत होती ..

नेहा -

मी ऑफिसच्या बाजूला कॅफे मध्ये आहे..

तुझी वाट पाहतो आहे ..

विथ कॉफी आज .तुझ्याशी बोलायचे आहे..

येतेस ना ..डियर नेहा ...!

या जादूच्या शब्दांवर नेहाचा विश्वासच बसत नव्हता ..

ऑफिसच्या बाहेर पडले की ..अगदी बाजूला हा छानसा कॅफे होता ..

पण..बघा ना..

तितके अन्तर जातांना सुद्धा ..ते खूप दूर आहे असे नेहाला वाटत होते..

“दिल पर नही है काबू

तेरे लिये हो गया अब

मेरा दिल बेकाबू ..

अशी शेरो शायरी आठवत होती नेहाला ..

ती कॅफे मध्ये आली .. मंद प्रकाशातल्या कोपर्यात .

.तिला तिचा जिवलग हेमू पांडे दिसला ..

चेहऱ्यावरची अधीरता , मनातली धडधड मोठ्या मुश्किलीने कंट्रोल करीत ..

ती त्या टेबलाजवळ आली ..

एक छोटसा टेबल ..फक्त दोघांसाठीचा ..समोरासमोर बसण्याचा ..अगदी बिन-अंतराचा ..

हे पाहून -का कुणास ठाऊक ..नेहाला मनात खुदकन हसू आले ..!

हेमू पांडे देखील तिच्या येणाची आगदी अधिरतेने वाट पाहत असावा ..

तिच्याशी फोनवर बोलतांना ..त्याने ठरवले होते ..

आज तिला बोलवयचे ..

तिच्या मनात असेल तर ..येईल ..

नाही तर नाही .. पण, आज जे होईल ते होईल ..

आणि मनातले सारे सांगायचे ..

आणि तिच्या मनातले सुद्धा विचारून घ्यायचे ..

होऊन होऊन काय होईल ..आपल्याला नाही म्हणेल ..!

त्याधी तिच्या समोर तिच्याशी बोलायला तर मिळणार आहे ना !

कारण पहिल्यांदा ..

तिच्या सोबत .असतांना ..मी तिचा बॉस नसेन .

एक मित्र ..आणि मनातून तिच्याविषयी प्रेम वाटणारा . तिचा प्रियकर ....

कल्पनेने हेमू मनातून फुलून आला होता..

त्याच्या फोनला तिने दिलेला .

हो ,आलेच हं.. !

हा प्रतिसाद ऐकून ..हेमुला आनंदाच्या भरात नाचावे वाटत होते ..

नेहाच्या आवाजातले –हे गोड शब्द ऐकण्यासाठीच तर तो आतुरलेला होता ..

पण ..हेमू आणि नेहात ..

बॉस-हेमकांत पांडे स्पीड -ब्रेकर सारखा सारखा आडवा येत होता ..

एक मात्र छान झाले आज ..

नेहा आपल्या केबिन मध्ये बसलेली असतांना ..मामांचा फोन आला ..

आणि आपल्या परिवारातली मोठी माणसे ..पोरगा कधी लग्न करतो ? या धास्तीनी

मागे लागलीत .त्यात ..आपण ..

मामला .. दिलेले उत्तर ..

हो, मामा ,तुम्ही करून ठेवा पसंत मुलगी ..

मी येतो तिकडे ..!

हे ऐकून ..नेहा परेशान झाली असेल तर ..बेस्टच ..!

कदाचित ..त्यामुळे तर..बाईसाहेब ..म्हणून गेल्या वाटते ..

..आलेच हं...!

हेमुला हे आठवले ..आणि तो मनोमन खुश झाला .

आपल्या समोर नेहा येऊन बसली आहे ..हे त्याला स्वप्नवत वाटत होते ..

तो तिच्याकडे पाहत होता ..

गोड हसर्या नजरेने त्याच्याकडे पहात ..तिने विचारले ..

सर , विशेष काय काम आहे ? मला इकडे बोलावून घेतले ..

नेहा ..मी फोनवर ..तुला ..नेहा डियर ..म्हटले ..लक्षात नाहीये का हे शब्द ?

इथे ..मी मित्र आहे तुझा ..फक्त ..

हेमू , ए हेमू .

.असे बोलणार असशील तरच बसू इथे ..

नाही तर ..हा मी चाललो ..

खूप काम पडलाय मला ऑफिस मध्ये , खाली मान घालून करीत बसीन ..

त्याची फायरिंग थांबवत नेहा म्हणाली ..

अरे ..बाप रे ..इतका राग , वैताग .चिडचिड ..!

कुल कुल ...बाबा ! कुल ..!

नेहाने तिच्या नाजूक हात पुढे करीत म्हटले ..

हेमू ..आजसे ,अभी से अपनी दोस्ती .एकदम पक्की...!

फुलासारखा नाजूक हात ..लांबसडक नाजूक बोटे .. नेहाचा हात हेमूने हातात घेतला ..

तिचा झालेला हा पाहिला जादुभरा स्पर्श ..त्याच्या शरीराला गोड गुदगुल्या करीत आहे असे वाटत होते..

तिचा नाजूक हात हलकेच दाबीत तो म्हणाला ..

नेहा .. दोस्ती नाहीये फक्त ..त्याही पलीकडचे नाते आहे आपले , जे माझ्या मनात

कधी पासूनचे आहे ..

अधिक उशीर झाला तर आजची हे सोनेरी संधी पण जाईल माझ्या हातून ..

म्हणून ..तुला आज बोलावले ..

नेहा ..आय लव्ह यु ...

सो मच सो मच ..सो मच ..लव्ह यु ...

माझ्या प्रेमाचा तू स्वीकार करावास , तू खूप आवडतेस मला .

हेमूच्या हातात असलेला हात ..

नेहाने सोडवून न घेता तो तसाच ठेवत ..

त्याच्याकडे पाहिले ..

तिच्या टपोर्या डोळ्यातल्या नजरेत ..

हेमुला तिच्या मनातले प्रेम दिसले ..ते जाणवले ..

तो म्हणाला ..नेहा ,तुझ्या डोळ्यात मी वाचले , काही न बोलता तू सांगितले ..

तरी पण ..तुझ्या शब्दातून मला ऐकायचे आहे..

सांग नेहा ..

नेहा फक्त लाजून पाहत होती .

तिला बोलायचे होते ..सांगायचे पण होते ..

पण..तिच्या मनात इतकी धडधड सुरु झालेली होती की .

या आनंदाच्या भरात तिला जणू शब्दच फुटेनासे झाले होते..

हेमू पांडेचे दोन्ही हात .स्वताच्या हातात घेत ती म्हणाली ..

नेहा – लव्हज ..यु ...हेमू ...!

यस ..हेमू --आय लव्ह यु ..टू...!

काय करू इतके दिवस धीरच होत नव्हता..आणि आज शब्द सुचत नव्हते .. !

किती सोपी गोष्ट ..पण माझ्या लाजर्या मनाने किती अवघड करून ठेवली होती .

हेमू म्हणाला ..

नेहा - आता या क्षणापासून .. तू आणि मी ..एकमेकांसाठीचे साथीदार झालो आहोत .

तुझ्या शिवाय मी नाही .आणि माझ्याविणा तू नसावीस ....!

मी आज पहिल्याच भेटीत तुला प्रपोज करतोय ..

नेहा – कायमची माझी होशील का ?

तुझ्याशीच लग्न व्हावे ही माझी इच्छा आहे,

तू आज माझ्या प्रेमाचा स्वीकार केला आहेस ..आणि या विनंतीचा तू आजच अंतिम निर्णय

सांगावस असे मी मुळीच म्हणणार नाहीये.

फक्त तुझा निर्णय .लवकर सांग ,.मग तो काही असो ..मला मान्य असेल ,

तू आज माझ्या मामांचा आलेला फोन ऐकला आहेस .. ते सगळे थांबवले पाहिजे मला .

तू अगदी झटपट लग्न करावे लागेल , घरच्यांना माहिती नाही ..

मग,कसे ?

असा विचार अजिबात नको करू ..

तशी घाई नाहीये .. चांगले सहा महिने, वाटल्यास एक वर्षाचा वेळ घेऊ अजून .

काही प्रोब्लेम नाहीये मला .आपण एकमेकांना जाणून घेऊ ,समजून घेऊ ..

खूप प्रेम करू , एन्जोय करू ..मगच लग्न करू या .!

आणि हो ..त्या आधी तुझ्या आणि माझ्या घरच्यांची परवानगी पण घायची आहे..

सर्वांच्या सहमतीने ..आणि अगदी आनंदाने ..आपले लग्न झाले पाहिजे ..कारण..

दोन्ही परीवार्साठी तो एक आनंदाचा आणि सोन्यासारखा क्षण असेल.

कुणी ही नाराज असता कामा नये..

हेमू एक मिनिटही न थांबता सारखा ..बोलतच आहे ..हे पाहून ..

नेहाने ..हातात पाण्याचा ग्लास घेत त्याच्या समोर करीत म्हटले ..

काय हे ..! वाघ मागे लागल्यासारखा काय ? थांबायचे नाव नाही..

मला सगळे समजले आणि नीट कळाले आहे ..!

हेमू ..तू म्हणशील तसेच होईल ..

नेहाला ..तुझी जिवलग प्रेयसी ,साथी होणे तर आवडलेच आहे..

तुझे लग्नाचे प्रपोजल सध्या तरी पेंडिंग ठेवू या ..

खूप घाईने निर्णय नको घेऊ या .

एक सांगते ..माझ्या राजा ..मी तुझी राणी होण्यास आनंदाने तयार आहे.

लग्न होईपर्यंतच्या काळात ..आपण एकमेक्न्च्या प्रेमाचा ,सहवासाचा आनंद घेत राहू ..

चालेल ना .रे हेमू ..?

हेमू काही न बोलता फक्त तिच्याकडे पाहत राहिला ..

नेहा – एक जोराचा चिमटा काढ बरे माझ्या हाताला ..!

हे एव्हड सगळ ..तुला बोलता येत ?

मला खरेच वाटत नाहीये अजून .

प्लीज ..त्यानी हात पुढे केला .

हेमूच्या हातावर आपले ओठ टेकवत ..नेहा म्हणाली ..

अरे, मी माणूसच आहे, दगड नाही.. या भावना ..बोलून दाखवणे जमले नाही.

म्हणून ..तुझ्याविषयी वाटणारी भावना ..प्रेम नाही असे थोडेच आहे ..हेमू ..!

नेह्च्या ओठाच्या गुलाब पाकळ्या ..त्यातली थरथर ..तो मृदुमुलायम स्पर्श ...!

हेमू निशब्द होऊन गेलेला होता ..

वरकरणी रुक्ष आहे असे वाटणारी ..ही नेहा ..अशी हळव्या मनाची ,

रोमेंटिक भावना असणारी आहे ! खरेच वाटत नाही.

माणसाचे वरवरचे रूप..आणि त्याचे अंतरंग ..काहीच मेळ नसतो ..जणू याचीच अनुभूती

हेमू पांडेला नेहाच्या या प्रेमाच्या प्रतिसादावरून येत होती ..

नेहा ..आजचा हा दिवस ..

तुझी भेट . कधीच विसरणार नाही मी ..

तू माझ्या आयुष्यात येणार आहेस ..बस..मन भरून पावलो मी.

अशीच सोबत कर, आधार दे तुझ्या प्रेमाचा ..

नेहा म्हणाली .. हेमू ..

तू सुद्धा मला असेच आयुष्यभर तुझ्या प्रेमात बांधून ठेवावेस.

भावनांचा आवेग थोडा कमी झाला .

.आनंदाचा भर ओसरून गेलाय ..हे जाणवून

नेहा म्हणाली ..

हेमू..आपले लग्न होई पर्यंत ..ऑफिसमध्ये ,कामाच्या वेळात .आपण फक्त सहकारी असणार आहोत ,

तिथे आपल्या या भावना व्यक्त करतांना कंट्रोल करायचा , त्याचे प्रदर्शन नको .

ऑफिसच्या बाहेर ..मग काही बंधन नाही ..

मी तुझीच ..तुझ्यासाठीच असेल तुझी प्रिय नेहा .

तिचे ऐकून घेत ..हेमू म्हणाला ..

नेहा ..असेच होईल ..मी काळजी घेऊनच वागेल .

आता आपल्याला एक करावे लागेल..

उद्या मी ..तुम्हाला..म्हणजे अनिता –सोनियादीदी आणि तू अशा तिघींना ..रात्री हॉटेलमध्ये पार्टी

देईन , आणि तुम्ही तिघींनी यायचे ..

आणि मग ..त्या दोघींना ..मी आपल्या प्रेमाच्या गोष्टीचे सरप्राईज गिफ्ट देणार आहे..

म्हणजे ..आपल्या भेटीला ..त्यांचा ग्रीन सिग्नल ..मिळेल ,आणि मुळात त्यांच्यासाठी .

आज .तू मला दिलेला होकार ..त्यांच्यासाठी ही गोष्ट खूप आनंदाची आहे

हे ऐकून नेहा म्हणाली ..

त्यांना काय ..हेच हवे होते ..इतके दिवस मी फक्त ऐकून घायची ..तर किती चिडत होत्या माझ्यावर ,

जणू काही..मी त्यांच्या हेमुवर अन्याय करीत होते ..!

आता काय बाबा..

तू खुश ..त्या दोघी खुश ..!

आणि तुला नाही झाली का ग ख़ुशी ? आमचा आनंद पाहून..?

नेहा हसून म्हणाली -

गंमत केली रे राजा तुझी ..!

मी तर खूप म्हणजे खूप खुश ..आहे.

फक्त आता घरी गेल्यवर ..ते उद्या रात्रीच्या पार्टी पर्यंत ..मी काही झालच नाहीये ..

असे दाखवत राहायचे ..कठीणच आहे ..!

तरी ..कंट्रोल करीन मी ..तू नको काळजी करू .

आता निघू या ..त्या दोघी म्हणतील ..कुठे गेलीय ही नेहा ..उशीर नको .

एकमेकांचा हात हातात हातात घेत ,,हेमू आणि नेहा बाहेर पडले ..

बाहेर मस्त चांदणे पडलेले होते ..गार वारा ..मन प्रसन्न होऊन गेले ..!

हेमूने नेहाला ..घरासमोर सोडले ..तो पुढे निघाला ..

नेहा आनंदाने भरल्या मनाने ..घरात शिरली . सोनिया –अनिता आलेल्या होत्या ..

नेहाचा चेहेरा ..नेहमीसारखा ..निर्विकार आणि कोरडा दिसला ..

नेहा मात्र मनातल्या मनात हसून म्हणत होती ..दिल को देखो ..चेहेरा न देखो...

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------

बाकी पुढच्या भागात ..

भाग – ३४ वा लवकरच येतो आहे.

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------

कादंबरी – जीवलगा

ले- अरुण वि. देशपांडे –पुणे.

9850177342

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------