Neela - 3 in Marathi Classic Stories by Harshad Molishree books and stories PDF | नीला... भाग ३

Featured Books
  • રૂપિયા management

    પુરુષ ની પાસે રૂપિયા હોય તો સ્ત્રી નગ્ન થઈ જાય અને પુરુષ પાસ...

  • આપણા ધર્મગ્રંથો - ભાગ 1

    વાંચક મિત્રો સહજ સાહિત્ય ટીમ ધાર્મિક બાબતો વિશે માહિતી લઈ અવ...

  • સેક્સ: it's Normal! (Book Summary)

                                જાણીતા સેકસોલોજિસ્ટ ડોક્ટર મહેન્...

  • મેક - અપ

    ( સત્ય ઘટના પર આધારિત )                                    ...

  • સોલમેટસ - 11

    આરવ અને રુશીને પોલીસસ્ટેશન આવવા માટે ફોન આવે છે. આરવ જયારે ક...

Categories
Share

नीला... भाग ३

अध्याय ३... भूतकाळ चे रहस्य

दुसऱ्या दिवशी सकाळी समीरचं शव भेटलं.... समीरच्या घरच्यांसाठीच नव्हे पण पूर्ण मुबई साठी हे shocking होतं, फक्त २ दिवसात मुंबईचे दोन मोठे buisnessman च्या मुलांनी आत्महत्या केली होती.... नेमकं ही हत्या आहे की आत्महत्या हा एक मोठा प्रश्न चीन वैभव समोर उभा झाला होता...

मीडिया मध्ये ही बातमी पसरली होती "अजून एक आत्महत्या की.... मर्डर" ???

वैभव ने कारवाई सुरू केली.... पण त्याच्या हातात काय लागलं नाही, परत तेच झाला शेवटचा नंबर एक असा व्यक्ती च्या नावावर होता ज्याची मृत्यू आधीच झाली आहे...

वैभवला आता खात्री झाली की हे सगळं कोणी तरी पूर्ण प्लानिंग सोबत करत आहे.... पण कोण,आणि का....???

वैभव ने विजयला सांगितलं की सुरज आणि समीर ची पूर्ण history काढा... कॉलेज time पासून आता पर्यंत एकूण एक गोष्ट बाहेर खोदून काढा.....

शिरीषला मुंबईला येऊन ४ ते ५ दिवस झाले होते.... तेव्हाच त्याची भेट नीला सोबत झाली, नीला एकदम जगा वेगळी होती, शांत शांत असायची, पण तेच शिरीष च्या रुपात तिला एक मित्र भेटलं आणि शिरीषला एक मैत्रीण...

एक दिवस शिरीष आणि नीला.... बेडरूम मध्ये बसले होते, संध्याकाळ ची वेळ होती, नीलाचा रूप अस चमकून उठला होता जणू चांद रात्रीत तारे....

शिरीष तिला बघता बघता बोलला.... "मन.. माणसाला नाचावतो हवं तसं, कधी अस तर कधी तसं, माणसाचा मन कधी बदलणार सांगता येत नाही, कधी कोणासमोर भरून येणार सांगता येत नाही"....

"तुझा मनात काय आहे"...???? नीला

शिरीष ने नीला समोर बघितलं... मग डोळे बंद करून लांब स्वाश घेतला आणि बोलला.... "खूप खुश होतो मी त्या दिवशी, पहिला जॉब आणि मला अमेरिकाला जाण्याचा चान्स भेटला, आई नको म्हणत होती पण तरी मी गेलो, जाताना जेव्हा मी आई बाबांना बघितलं तेव्हा जर कळलं असत की मी त्यांना शेवटचं बघतोय तर कधी गेलो नसतो"....

"मला जाऊन १ महिना झाला... बघता बघता ३ महिने झाले, मी तिथं enjoy करत होतो, नेहमी आई बाबांना फोन वर एकच सांगितलं की मी... लवकरच येतोय आणि ते बिचारे हे ऐकूनच मनाला मनवुन घेत असे... पण त्यांना कुठे माहीत होतं की त्यांच्या लाडक्याची इच्छा नाहीये परत यायची"....

"आई ने नवस ठेवला होता की मी सही सलामत लवकरात लवकर इथं यावा आणि त्यासाठी आई बाबा... वाराणसी, काशीला गेले होते, चार धामच्या यात्राला.... आणि आईची इच्छा पूर्ण पण झाली गंगा नदीची परिक्रमा करत होते आई बाबा नावेत बसून, जेव्हा मी बाबांना फोन करून सांगितलं की मी परत येतोय... हे ऐकूनच त्यांचा आनंद इतका वाढला की अगदी गगनात मावेना.... तेव्हाच अचानक नाव पलटली आणि आई बाबा पाण्यात पडले, भरपूर शोधल पण त्यांची body सुद्धा भेटली नाही".....

( शिरीष बोलता बोलता रडायला लागला.... )

"आई बाबाना शेवटचं बघू पण नाही शकलो, त्यांच्या देहाला अग्नी सुद्धा".... शिरीषला अस रडताना पाहून नीला ने त्याला जवळ घेऊन शांत केलं

"शिरीष जे झाला ते झाला, त्यात तू आता काय नाही करू शकत... तुझ्या हातात नाहीये शिरीष, पुढे अजून आयुष्य आहे, तुझे आई बाबा जिवंत असले असते तर त्यांनी पण तुला हेच सांगितलं असतं की सगळं विसरून एक नवीन शुरवात कर"... नीला

"मी चार वर्षाची होती जेव्हा आई बाबा गेले, त्यानंतर आजी ने मला संभाळलं... आणि मग एक दिवस ती पण मला सोडून गेली, मला माहित नव्हतं की माझं आयुष्य पुढे कसं असेल, पण आता जे आहे तुझ्या समोर आहे".... नीला

"एवढं सगळं झाल्यानंतर पण तू एवढी शांत, तुला कधी काय वाटलं नाही"....???? शिरीष

"शिरीष आपण ज्या आभासी जगात जगतोय त्यात फक्त तेवढच होऊ शकत जेवढी आपण हिम्मत करू, पण जर कल्पनाशक्ती च्या हिशोबाने जगलो तर तेही करू शकतो जे शक्य नाही".... नीला

"म्हणजे"....??? शिरीष

"माणसाला सगळ्यात जास्त दुःख तेव्हा होतो जेव्हा त्याच्या कल्पनांचा महल... खंड होतो आणि जेव्हा तो महल खंड होतो तेव्हा ह्याच आभासी जगाला तो त्याच्या कल्पनाशक्ती च्या हिशोबाने बघतो आणि मग तेच करतो जे त्याची कल्पना आहे"... नीला

"नीला कधी कधी मला कळतच नाही की तू काय बोलते"..... शिरीष

"अच्छा".... नीला ने शिरीष समोर बघितलं आणि बोलली

"शिरीष माझी एक लांबची मैत्रीण आहे, चांगलं नाही झालं तिच्या सोबत... तिची मदत करशील का"....???? नीला

शिरीष ने नीला समोर पाहिलं... एका क्षणासाठी, शिरीष नीला समोर बघत राहायला... तेच नीला पण एक टक शिरीषला बघत होती.....

"सर एक लिंक भेटली आहे पण.... काय confirm नाही, ही बस्स एक अफवा आहे, खरं काय ते सांगता येत नाही"... विजय

"आणि काय आहे ती अफवा".... ????? वैभव

"सर मला अशी एक अफवा कळली आहे की... सुरज नगर, समीर रूपनी आणि विशाल मेहता... कॉलेज च्या time ला यांनी एका मुलीवर बलात्कार केलं होतं पण सर मी सगी कडे विचारपुसकेली, मला ह्या गोष्टीचा काय proof भेटला नाही पोलीस record मध्ये पण कुठेच याचा काय वर्णन नाहीये".... विजय

"ती मुलगी कोण आहे"..... ???? वैभव

"सर माहीत नाही, कोणालाच माहीत नाही, पण सर हे पण confirm नाहीये की हे खरं आहे की नाही".... विजय

"जर ही फक्त अफवा आहे तर ठीक आहे पण सध्या हीच एक लिंक आहे आणि जर ह्या अफवा च्या नजरेने बघितलं तर... त्या किलरचा पुढचा target ' विशाल मेहता ' असणार.... विजय विशाल मेहता आता कुठे आहे लवकर माहिती काढ आणि त्याला inform कर की त्याच्या जीवाला धक्का आहे".... वैभव

"हो सर".... विजय

विजय ने थोडा वेळ घेतला आणि विशाल बद्दल सगळी माहिती काढली.....

"सर विजय आता मुंबई नाशिक महामार्गावर आहे, तो मुंबईला येतोय"... विजय

"विजय त्याला फोन कर आणि सांग जिथं आहे तिथंच रहा... त्याच्या जीवाला धक्का आहे, जवळच्या पोलीस स्टेशनला खबर कर आणि विशाल च्या location वर पोहचायला सांग".... वैभव

विजय ने विशालला inform केलं.... विशाल ने पण विजयच ऐकलं आणि सांगितल्या प्रमाणे तो महामार्गावर गाडी एका बाजूला लावून थांबला....

इथून वैभव आणि विजय फोर्स घेऊन निघाले....

विशाल रस्त्याच्या एका बाजूला थांबला होता, तेव्हाच मागून एक गाडी वेगाने आली आणि पुढे जाऊन थांबली.... गाडीतून शिरीष उतरला आणि दुसऱ्या बाजूने नीला...

विशालला नीट दिसलं नाही... त्याने तिथूनच हाक मारली "कोण आहे"...????

शिरीष हळू हळू चालत विशालच्या समोर आला आणि नीला त्याच्या मागून, शिरीषला पाहताच विशाल इतकं घाबरला की त्याच्या कपाळावर घाम फुटला....

शिरीष काय बोलेन त्या आधीच विशाल गुढग्यानवर खाली बसला.... आणि भीतीमुळे त्याच्या स्वाश थांबला, विशालची जागेवर मृत्यू झाली....

"शिरीष कमाल आहे यार.... गुन्हा करताना यांना इतकी भीती वाटली नाही जितकी भीती आता वाटतेय"... नीला

"तू बोलली होतीस ना की भीती वाटली पाहीजे... तीच भीती आहे ही".... शिरीष

"३.... आऊट झाले पण २ अजून आहेत, त्यांचं काय करायचं".... नीला

"तू बोल.... काय करायचं ते" ????? शिरीष

---------------------------------------------------------------- To Be Continued ----------------------------------------------------------