dark night -2 in Marathi Thriller by Avinash Lashkare books and stories PDF | मंतरलेली काळरात्र (भाग-२)

Featured Books
  • એઠો ગોળ

    એઠો ગોળ धेनुं धीराः सूनृतां वाचमाहुः, यथा धेनु सहस्त्रेषु वत...

  • પહેલી નજર નો પ્રેમ!!

    સવાર નો સમય! જે.કે. માર્ટસવાર નો સમય હોવા થી માર્ટ માં ગણતરી...

  • એક મર્ડર

    'ઓગણીસ તારીખે તારી અને આકાશની વચ્ચે રાણકી વાવમાં ઝઘડો થય...

  • વિશ્વનાં ખતરનાક આદમખોર

     આમ તો વિશ્વમાં સૌથી ખતરનાક પ્રાણી જો કોઇ હોય તો તે માનવી જ...

  • રડવું

             *“રડવુ પડે તો એક ઈશ્વર પાસે રડજો...             ”*જ...

Categories
Share

मंतरलेली काळरात्र (भाग-२)

(मंतरलेली काळरात्र भाग-२)
ही कहाणी आता आता आपण जशीच्या तशी पणजोबाच्या तोंडून ऐकणार आहोत , ज्या रात्री ही घटना घडली ती होती एक मंतरलेली काळरात्र.....

...बाळाला जो पर्यंत माझा आणि तिच्या आईचा चेहरा दिसत नाही तो पर्यंत ते रडत असते .
हे मला ठाऊक होते ,म्हणूनच ह्या भयाण रात्री मला माझ्या मनाविरुद्ध गावात जाणे भाग होते , मी एका रिकाम्या गोणीची(पोते) कोपरी केली आणि ती माझ्या डोक्या पासून मागच्या बाजूने कमरेपर्यंत आली जेणे करून मला पावसात मी कमीत कमी भिजवे म्हणून मी ही युक्ती केलती.

तसेच एका हातात रिकामे रॉकेल आणण्यासाठी पत्र्याचा डब्बा घेतला.
मी जसा छपराला बाहेरून कडी लावून निघालो तसे मला समोर फक्त आणि फक्त एक गडद काळाकुट्ट अंधार दिसत होता आणि घरातून माझ्या मुलाचा रडण्याचा आवाज माझ्या कानावर येत होता.

माझं दररोज काही कामानिमित्त गावात जाणे होत असे, हा रस्ता पूर्ण पणे कच्चा रस्ता होता . फक्त बैलगाडी येण्या जाण्या मुळे हा रस्ता निर्माण झाला होता.
मला तसा हा रस्ता पाठ होता पण ह्या काळरात्री हा रस्ता मला आज माझ्या साठी नवीनच होता मी आकाशात चमकणाऱ्या विजेच्या प्रकाशात अंदाजे मार्ग काढत पुढे -पुढे जात
होतो.
मनात अनेक विचार येत होते घरापासून गावातले अंतर दोन मैल होते, मी समोर दिसेल तसे झप-झप पाऊले उचलत चाललो होतो आज पावसाचा रुद्र रूप मी प्रथमच इतक्या रात्री अनुभवत होतो, आज नेहमी पेक्षा विजा जरा जास्तच चमकत होत्या हे माझ्या साठी चांगले होते त्यामुळे मी पुढचा रास्ता पाहू शकत होतो.

गाव आणि आमचा मळा ह्यामधील अंतरात एक कुरण
(जंगल) होते त्यांनतर एक विरान जागा आणि त्यांनतर गाव मला आता एका रात्री हे सर्व पार करायचे होते आणि पुन्हा घरी परतायचे होते.

मी अंधाराला कापत पावसाला मागे सारत आणि वाऱ्याशी टक्कर देत वेगाने चाललो होतो, मला समोर एकदम दोन डोळे चमकणारे दिसले..!!
तसा मी जाग्यावर थांम्बलो .ती डोळे आता माझ्याकडे येत होती ,मनात खूप विचार शंका कुशंका आल्या पण मी मागे हटणार नव्हतो आज जरी माझा जीव गेला तरी मी पुढेच जाणार होतो. माझे हातपाय आता लट-लट कापत होती विजेच्या प्रकाशात मला आता फक्त डोळे नाही तर पूर्ण पणे एका बकरीचे पिल्लू दिसले आणि माझ्या जीवात जीव आला मी विचारात पडलो इतक्या रात्री हे पिलू इथे कसे पण मी समजून घेतले बहुधा हे पिल्लू चुकून राहिले असेल चरताना आता मी स्वतःच माझ्या मनाला प्रश्न करत असे आणि मीच त्या प्रश्नाचे उत्तरही शोधत असे, कारण मी एकटाच होतो ह्या विरान रस्त्याने बकरीचे पिल्लू तसे बारीकच होते.

मला वाटले ह्याला सोबत घेऊन जावे पण मला पुन्हा ह्याच रस्त्याने यायचे होते म्हणून विचार केला की, ह्याला इथेच ठेवून पुन्हा माघारी जाताना घेऊन जाऊ हा विचार करून मी त्याला तिथेच एका झुडपात ठेवले मी त्याला प्रथम जेव्हा स्पर्श केला तेव्हा जणू असे वाटले की मी एखाद्या मनुष्यालाच स्पर्श..* करत आहे.

मला त्या क्षणाला वाटले पावसात भिजल्यामुळे असे जाणवले असेल , मी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केले.
मी पुढे निघालो मागून मला कोणीतरी बोलवत आहे असा अवाज आला इतक्या मोठ्या पावसातही मला तो आवाज स्पष्ट ऐकू येत होता, म्हणून मी आजू बाजूला काही दिसते का पाहिले, पण समोर जसा काळोख होता तसाच काळोख आजू बाजूलाही होता माझा भ्रम झाला असे समजून मी पाय उचलत निघालो तर आता असा आवाज असा आलाकी जणू कोणी माझ्या माघे उभा आहे ,आणि कानात येऊन बोलले अरे थांम्ब की जरा....!

अक्षरशः माझ्या पूर्ण शरीरावर काटे आले आणि माझी आता हिम्मत होत नव्हती मागे वळून बघण्याची मी जागीच थांम्बलो होतो, मला माझ्या बायकोचा आणि बाळाचा चेहरा आठवला आणि त्यांच्यासाठी मी आज काहीही करू शकत होतो , मी घाबरत- घाबरत मागे पाहिले...! मी अचंबित झालो माझ्या मागे ते बकरीचे पिल्लुच होते आणि आता त्याचे डोळे थोडे मोठे होते ,
व लगेच क्षणार्धात पुन्हा निरखून पाहू लागलो तर पिल्लू ज्या जागी मी ठेवले होते त्या जागी दिसले.

काय चालले आहे मला काही उमजेना ,मी एकटा प्रवास करतोय इतक्या रात्री म्हणून माझ्या मनातील भीती पोटी हे मला जाणवत असेल याची मला खात्री झाली .
आज मी मलाच समजावून सांगत होतो पुन्हा पुढे जाता जाता मागे वळून पहात होतो .
ते पिल्लू आहे त्या जागीच होते कारण त्याचे डोळे आहे त्या जागी दिसत होते.

आता मात्र मग मी निश्वास टाकला भर - भर अंधार तुडवत चाललो होतो मनात आता कसलाच विचार करत नव्हतो, आणि अचानक माझ्या कानावर गुर-गुर नारा आवाज स्पष्ट ऐकू येऊ लागला तसा मी सावध झालो माझी पूर्ण खात्री झाली की ,आता हा भ्रम नसून खरोखर हकीगत आहे, मला आता काही कळायच्या आत माझ्याकडे कोणी तरी पळत येत आहे याची चाहूल लागली परंतू कोण..? हा प्रश्न आजून अधांतरीच होता कारण लांम्बचे काही दिसत नव्हते आता पावलांचे आवाज स्पष्ट कानावर येऊ लागले मला कल्पना आली की ,आता आपल्यावर नक्कीच कुठल्या तरी हिंस्र प्राण्यांचा हल्ला होणार आहे विजेच्या प्रखर प्रकाशात मला माझ्याकडे पळत येणाऱ्या कोल्ह्याचा कळप दिसला आणि समोर एक भले मोठे चिंचेच झाड दिसले मी तसाच त्या झाडाकडे जिवाच्या आकंताणे पळत सुटलो मागे कोल्हे मध्ये मी आणि समोर झाड मी पळत आता अगदी झाडाच्या जवळ पोहचणार तेवढ्यात माझ्या पाठीवर दोन कोल्ह्यानी उडी घेतली त्याचवेळेस मी माझ्या अंगावरती घेतलेली कोपरी तशीच मागे सोडून दिली त्यामुळे ती कोल्हे कोपरीसह पडले, व मी माझ्या आयुष्यात झाडावर इतका भर-भर चढलो की ,जे आजपर्यंत कधी नसेल चढलो .

सात ते आठ कोल्हे खाली उभी होती आणि माझ्याकडे पाहून गुरकत होती ,पण मी अजूनही हरलेला नव्हतो. कारण माझ्या डोळ्या समोर "माझ्या बायकोचा आणि मुलाचा चेहरा स्पष्ट दिसत होता" .पाऊस आज थांम्बण्याच्या विचारात नव्हता मी चिंचेच्या झाडावर असल्यामुळें मला स्पष्ट पावसाचा झाडावर पडलेल्या थेंबाचा आवाज येत होता .

त्यात मला आजून एक अनोळखी आवाज कानावर आला.
मला अंधारात काहीच दिसत नव्हते जेव्हा वीज चमकेलं तेव्हा मी स्पष्ट पाहू शकत होतो, वीज चमकली की खाली पहायचो कोल्हे आजूनही माझी खाली वाट पहात होती, मला आता कोणी तरी माझ्या समोर येऊन बसले आहे याची जाणीव झाली .

मला आता काय करावे सुचेना मी पूर्ण भयभीत झालो, होतो जीव मुठीत धरून बसलो आता वीज चमकूच नये आणि मला समोर कोण आहे हे कळू नये असे वाटत होते,माझ्या कानावर आता बांगड्याचा आवाज आला नंतर पायातील पैंजणीचा आवाज आला आता मात्र माझा पूर्ण थरकाप उडाला होता.

मी पावसाने ओलाचिंब झालोय की घामानं काही कळेना .
पण मी आता पूर्ण ओलाचिंब होऊन बसलो होतो.
आकाशात ह्या वेळेस खूप मोठी वीज चमकली आणि मला समोर एक हडळ बसलेली दिसली.

मी खूप दचकलो असे मी फक्त गोष्टींमध्ये ऐकले होते माझ्या अश्या गोष्टीवर विश्वास नसे पण आज समोर होते तीच ती हडळ क्षणात माझा इतक्या पावसात घसाच कोरडा पडला , तिची नजर माझ्याकडेच होती जणू ती मला अंधारात ही स्पष्ट पहात बसली होती तिचे कपाळ पूर्ण पाने कुंकवाने माखलेला केस विस्कटलेले आणि काही चेहऱ्यावर आलेले होते. हिरवी साडी हातात लाल बांगड्या डोळे पूर्ण पणे काजलांनी भरलेले.

समोर असणारी हडळ क्षणार्धात गायब झाली.खूप बरं वाटले होते ,परंतु हा आनंद जास्त काळ नाही टिकला कारण मला जाणवले आता ती हडळ माझ्या डोक्यावर असणाऱ्या फांदीवरून मला पहात आहे , मी आता मनातल्या मनात " हनुमान चाळीसा " म्हणायला, सुरुवात केली तेवढ्या तिने माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि अलगद फिरवत,

उलटी झाडाला लटकून तिने तिचा चेहरा माझ्यासमोर वासकन..!! आणला , मी आत्तापर्यंत पूर्णपणे धीट होतो पण तिच्या अश्या येण्यानं माझ्या हृदयाचे पाणी- पाणी झाले . ती आता माझ्याकडे खुनी नजरेने पहात होती मी तिची नजर ओळखली होती.

घरी माझी बायको आणि मुलगा छपरच्या दाराकडे पहात मी कधी येईल आणि घरात प्रकाश करेल असे वाटत असेल,पण इथे आता ह्या क्षणाला कदाचित माझाच प्रकाश मालवू शकतो हे ही खरे होते.
तिने विचारले तू इतक्या रात्री इकडे कशाला आलास..?

मला काय बोलावे काय सुचेना मनात पूर्ण शक्ती एकवटून मी आता इथून पळ काढण्याचा निर्णय घेतला मला आता कळून चुकले होते की, आता ही "हडळ" माझा नक्की प्राण घेणार आहे . त्याच क्षणी मी भुर्रकन पक्ष्याने जसे उडून आकाशात भरारी घ्यावी , तसा मी ताडकन उडी मारली मला त्या वेळेस ही शक्ती माझ्या शरीरात कुठून आली याची काहीच कल्पना नाही जसा मी खाली जमिनीवर आलो तेथेच दबा धरून बसलेली कोल्हे माझा पाठलाग करू लागली.

मी पूर्ण जीव एकवटून आज धावत होतो, काळ्याकुट्ट अंधारात धावत होतो ,आणि धावतच होतो कुठे कसा चाललो हे कळत नव्हते कारण आता फक्त मला ह्या प्राण्यांपासून सुटका करून घ्याची होती.
असाच धावत असताना माझ्या पायाला ठेच लागली आणि मी काही कळायच्या आत खाली पडलो जसा मी खाली पडलो तसा माझ्या हाताला एक मोठे भक्कम लाकूड हाती लागले.

मला मागोवा लागला की, माझ्या आता आसपासच ही कोल्हे आहेत मग मी अंधाराचा फायदा घेत ज्या दिशेने मला गुरगुरण्याचा आवाज येत असे त्या दिशेला मी ते लाकूड फिरवत असे असे करता करता अंदाजे चार पाच कोल्ह्याला ती काठी जबर बसली आणि ती विव्हळत बाजूला झाली वीज चमकली का मी त्या क्षणाला निरीक्षण करून त्या कळपावर हल्ला चढवत असे मी त्यांना माझ्या जवळ येऊ दिलेच नाही ,पण मला एकदम तीन कोल्ह्यानी धरले माझ्या छातीला एकाने आणि पाठीला दोन जनांनी त्यांनी आता माझा चांगलाच चावा घेतला होता .

मी माझ्या दोन्ही हाताने हातातील काठी वर करून जोरात छातीवर असणाऱ्याला मारली पण त्याने खूप घट्ट पकडले होते ,मला त्यामूळे मलाच जास्त त्रास झाला.
पण मी पुन्हा तोच प्रयत्न पण या पेक्षा जरा जास्त ताकतीने केला आणि छातीवरचे कोल्हा खाली पडताच पळून गेला आता माझ्या पाठीवर असणारे कोल्ह्यानी माझा चांगलाच लचका तोडला होता.

मी आता आहे तसाच मागे पडलो त्यामुळे दोन्ही कोल्हे माझ्या खाली दबली गेली, त्यांनी मला सोडताच क्षणी मी पूर्ण ताकत एकवटून त्यांच्या दिशेने काठी फिरवली ते बेसावध असताना अंधारातच त्याच्या दोघांच्या तोंडावर जोराचा फटका बसला तशी विव्हळत बाजूला झाली आणि आता ती हळूहळू सर्व कळप निघून गेला, परंतु मी आता पूर्ण रक्तभंभाळ झालो होतो.

मला आता थोडं असवस्थ वाटू लागले होते, ह्या निर्जन स्थळी असता जास्त वेळ थांम्बने योग्य नव्हते,
मी तसाच हळू हळू पाऊले उचलत गावाच्या दिशेने निघालो....
पुढील भागात
भाग-३ मध्ये.