Chinu - 1 in Marathi Thriller by Sangita Mahajan books and stories PDF | चिनू - 1

Featured Books
  • એઠો ગોળ

    એઠો ગોળ धेनुं धीराः सूनृतां वाचमाहुः, यथा धेनु सहस्त्रेषु वत...

  • પહેલી નજર નો પ્રેમ!!

    સવાર નો સમય! જે.કે. માર્ટસવાર નો સમય હોવા થી માર્ટ માં ગણતરી...

  • એક મર્ડર

    'ઓગણીસ તારીખે તારી અને આકાશની વચ્ચે રાણકી વાવમાં ઝઘડો થય...

  • વિશ્વનાં ખતરનાક આદમખોર

     આમ તો વિશ્વમાં સૌથી ખતરનાક પ્રાણી જો કોઇ હોય તો તે માનવી જ...

  • રડવું

             *“રડવુ પડે તો એક ઈશ્વર પાસે રડજો...             ”*જ...

Categories
Share

चिनू - 1

चिनू

Sangita Mahajan

(1)

"चिनू उठ आता," आई हाक मारत होती आणि चिनू आपली लाडात येत कूस बदलत तशीच झोपत होती.शेवटी आई तिथे आली आणि चिनुला उचलून घेत एक गोड पापा घेतला, चिनुची झोप काही जात नव्हती. ती लाडात येऊन आईला अजून बिलगत होती. "उठा उठा डोळे उघडा बघू" आई. एवढ्यात रकमा तिथे आली आणि चिनुला आवरायला घेऊन गेली. रकमा त्यांची मोलकरीण. बऱ्याच वर्षांपासून ती त्यांच्याकडे आहे. एकटी आहे बिचारी, नवरा दारुडा होता, काही काम करायचा नाही आणि रोज मारहाण पण करायचा. रकमा बिचारी खूप वैतागली होती. सारखं दारू पिण्यामुळे लवकरच तो देवाघरी गेला. तिला मूल-बाळ पण काही नव्हतं. मीनाने तिला खूप समजावलं होतं दुसरं लग्न कर म्हणून, पण तिची अजिबात इच्छा नव्हती म्हणून तिने लग्न केलं नाही, त्यामुळं ती यांच्याकडेच राहते. घरची सगळी कामं करते, चिनुला सांभाळते. बागकामाची पण तिला आवड आहे. रोज एकदा तरी ती बागेत जाऊन यायची, झाडांना नेहमी पाणी घालायची, त्यांची खूप चांगल्या प्रकारे देखरेख करायची. रकमा यांच्या कुटुंबाचा एक भाग आहे. तिला या घरातल्या सगळ्यांच्या सवयी अगदी चांगल्या माहित झाल्या होत्या त्याप्रमाणे ती प्रत्येक गोष्ट व्यवस्थित करायची. सगळ्याची बरोबर तिला आता सवय झाली होती. तिला आपलं असं दुसरं कोणीच नव्हतं फक्त तिची लांबची एक मावशी आहे, कधी कधी तिला भेटायला फक्त रकमा जात असते अधून-मधून. रकमा चिनुची खूप काळजी घेते. चीनूलाही तिची खूप सवय झाले. रक्माशिवाय तिचं पानंच हालत नाही. चिनुची आणि रक्माची चांगलीच गट्टी जमली होती. "चिनू जागी हो, डोळे नीट उघड बघू, आपण आवरून घेऊ पटापट, बघ आज आईने तुझ्या आवडीचा नाश्ता बनवला आहे, हे ऐकून चिनुने एकदम डोळे उघडले आणि विचारले, "काय बनवलंय आज?" "आज ना मस्त शिरा बनवलाय." रकमा. हे ऐकून तर चिनू पटकन खाली उतरली आणि पटापट आवरू लागली. थोड्याच वेळात आईने आवाज दिला. चिनू गेली पळत पळत जेवणाच्या टेबलकडे. तिथे तिचे बाबा पण बसले होते. "काय मॅडम आज एकदम खुश दिसताय." ते तिला म्हणाले. "असणारच आज तिच्या आवडीचा शिरा बनवलाय ना मी." आई. "मग काय आज मज्जा आहे एका माणसाची." बाबा. "लवकर दे ना मला शिरा, आणि खूप खूप दे." चिनू. सगळ्यांनी बसून नाश्ता केला. चिनुचे बाबा नाश्ता करून त्यांच्या कामावर गेले. आई तिच्या कामात गुंतली आणि रकमा चिनुला घेऊन शाळेत गेली. चिनुला शाळेत जाताना आणि येताना रोज रक्माच लागायची.

चिनू त्यांच्या आई बाबांची लाडाची लेक. असेल ७-८ वर्षांची. दिसायला खूप गोड आणि सगळ्यांच्यात पटकन मिसळणारी. त्यांचे आई बाबा म्हणजे सौ मीना मुजुमदार आणि विश्वास मुजुमदार. मूल होऊ दे म्हणून दोघांनी खूप डॉक्टर केले होते, उपास-तापास केले, देव-दर्शन पण खूप झाले होते. बऱ्याच वर्षांनी मग चिनुचा जन्म झाला. मीनाला खूप आनंद झाला. तिचा समज आहे वैष्णोदेवीच्या दर्शनामुळेच चिनू झाली. म्हणून तर तिचं नाव पण वैष्णवी असं ठेवलं होतं. मुजुमदार कुटुंब अतिशय श्रीमंत आणि गावात सगळीकडे नावाजलेलं. अख्या गावात मानानं जगणारं कुटुंब. गावात त्यांचा मोठा वाडा आहे, शेत-जमीन आहे, शेतीसाठी लागणारी सगळी आधुनिक प्रकारची अवजारं आणि एक ट्रॅक्टर पण आहे. विश्वास शेतीच्या सगळ्या कामाकडे खूप आवर्जून लक्ष्य द्यायचा. तो गावच्या सगळ्या समस्या सोडवायला पण पुढे असायचा. गावच्या लोकांचा खूप विश्वास पण होता त्याच्यावर. गावच्या मंदिराचा पण खूप उद्धार केला होता त्याने. या सगळ्यामध्ये मीनाची साथ पण मिळायचीच. गावात काही कार्यक्रम असतील तर हे दोघं पण आवर्जून सहभागी व्हायचे. पुढच्या सात पिढीला पुरेल इतका पैसा-अडका, जमीन-जुमला आणि बरीच मालमत्ता त्यांच्या पाठीला होती. वडिलोपार्जित हि संपत्ती त्यांच्या त्यांच्या अपत्याला मिळत आली होती. वैष्णवी त्यांची एकुलती एक मुलगी, खूप खूप लाडात वाढलेली. तिला सगळे लाडाने चिनू म्हणत. अगदी लहानांपासून ते मोठयांपर्यंत ती सगळ्यांची लाडकी. शाळेत सुद्धा ती सर्वांना आवडायची. कोणाला काही मदत पाहिजे असल्यास ती लगेच पुढं व्हायची. हे संस्कार तर तिला मीना आणि विश्वासमुळंच मिळाले होते. चिनुला डान्स खूप आवडायचा, डान्सचे classes पण तिच्यासाठी लावले होते. कुठे डान्स स्पर्धा असतील तर ती आवर्जून भाग घ्यायची. सगळ्यांना तिचं खूप कौतुक वाटायचं, कारण इतक्या लहान वयात ती इतक्या चांगल्या प्रकारे डान्स करायची. हा एका गोष्टीचा मात्र तिला कंटाळा यायचा सकाळी लवकर उठण्याचा.

विश्वास आपलं काम संपवून घरी आला. आज तो खूप थकला होता. रात्रीची जेवणं उरकल्यावर तो आपल्या रूम मध्ये गेला आणि बेड वर आडवा झाला. थोड्या वेळाने मीना आली. दोघांच्या इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. दिवसभरात काय झालं ते दोघं एकमेकांना सांगायचे. बोलत बोलत मीनाला कधी झोप लागली कळलंच नाही. दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. एकमेकांना खूप समजून पण घ्यायचे. दोघे एकमेकांसोबत खूप सुखी होते. मीना आज सकाळी लवकर उठली कारण आज सगळे वैष्णोदेवीच्या दर्शना साठी चालले होते. चिनू झाल्यापासून ते दरवर्षी वैष्णोदेवीच्या दर्शनाला जातात. चिनू तर खूपच खुश होती. आज ती न उठवताच उठून स्वतः तयार पण झाली. थोड्याच वेळात सगळे निघाले पण. चिनू तर सगळ्यांच्या आधी गाडीत जाऊन बसली. गणपती बाप्पाचं नाव घेऊन सगळ्यांचा प्रवास सुरु झाला. चिनू बाहेरचं दृश्य बघण्यात व्यस्त झाली. आठ तासांचा प्रवास झाल्यावर सगळे मंदिरा जवळ पोचले. छान दर्शन झालं. पूजा-अर्चा झाली. विश्वासने १०००० रुपये दान म्हणून दिले. नंतर सगळे मिळून जवळच एका बागेत बसून जेवले. जाता जाता थोडी फार खरेदी पण झाली आणि परतीचा प्रवास सुरु झाला. मीना आज खूपच सुंदर दिसत होती. विश्वासची तर नजर हटत नव्हती तिच्यावरून. निम्मा रस्ता संपला असेल आणि काही कळायच्या आत काळाचा कहर झाला, गाडीचा कंट्रोल सुटला आणि गाडी एका मोठ्या झाडाला जोरात धडकली. मीना आणि विश्वास लांब दरीत फेकले गेले. चिनू तर बेशुद्ध झाली, रकमाची वाचाच बंद झाली. ड्राइवर तर जागीच ठार झाला होता. आजूबाजूचे सारे लोक जमले. त्यातल्याच एकाने पोलिसांना फोन केला. १० मिनिटातच पोलीस तिथे पोचले, रकमा आणि चिनुला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, त्यांच्यासोबत एक पोलीस देखील थांबला. डॉक्टरनी दोघींना तपासले, "काळजीचं काही कारण नाही त्यांना फक्त शॉक लागला आहे थोड्या वेळाने आराम वाटेल त्यांना." डॉक्टर म्हणाले. त्या दोघींना घरी नेण्यात आलं, त्यांच्याजवळ शेजारच्या काही बायका थांबल्या. इकडे घटना स्थळावर शोध मोहीम सुरु झाली, पोलीस आणि काही जवान खाली दरीत उतरून मीना आणि विश्वासला शोधू लागले. पाच तासाच्या प्रयत्नाने दोघांना वर काढले, ऍम्ब्युलन्स आधीच बोलवून ठेवली होती. त्यांना लागलीच दवाखान्यात नेले. पण डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले. त्यांचा प्रवास आता कायमचा संपला होता. मीना आणि विश्वासचे सारे नातेवाईक आले. काही जण चिनू जवळ थांबले आणि काही जण मीना आणि विश्वासच्या डेड बॉडी जवळ थांबले. चिनू शुद्धीवर आली होती पण खूप रडत होती, रकमा पण थोडी सावरली होती पण खूप दुखी होती. सगळ्या formalities पूर्ण झाल्यावर डॉक्टरनी डेड bodies ताब्यात दिल्या. सगळा गाव शोक करत होता. चिनुकडे बघून तर सगळ्यांनाच वाईट वाटत होते. शेवटी सगळे विधी पूर्ण झाले, बरेच नातेवाईक परत गेले काही अजून थांबले होते, चिमुकल्या चिनूला सोडून जायची हिम्मत कोणाला होत नव्हती. काही जवळचे नातेवाईक दशक्रिया होईपर्यंत थांबले. दशक्रिया विधी पण संपन्न झाला. आता सगळे चिनुबद्दल विचार करू लागले. आता प्रश्न होता चिनुला कोण सांभाळणार याचा. शेवटी सगळ्यांच्या संगनमताने ठरले कि चिनूचा सांभाळ त्यांचे काका काकू उल्हास आणि रागिणी करतील. ते दोघेही यासाठी आनंदाने तयार झाले. ते इथेच राहायला आले. त्यांचा मुलगा अमेरिकेला असल्यामुळे तेही दोघेच असत, त्यामुळे त्यांनाहि चिनूचा लळा लागला होता. दिवसामागून दिवस सरत गेले आणि हळूहळू स्तिती पूर्ववत होऊ लागली. चिनू पण आता रमली.

*******