Shodh Chandrashekharcha - 13 in Marathi Moral Stories by suresh kulkarni books and stories PDF | शोध चंद्रशेखरचा! - 13

Featured Books
Categories
Share

शोध चंद्रशेखरचा! - 13

शोध चंद्रशेखरचा!

१३---

"मॅडम, विकीको क्यू लोकप मे बंद किया?" राहीमचाचाच्या आवाजात गहिवर होता.

"चाचा, इसने एक आदमी को किडन्याप किया है! और हमें ओ आदमी चाहिये! तेरा विकी बोलता है, उसे कुछ याद नाही! " इन्स्पेक्टर इरावती त्या म्हाताऱ्याला समजावून सांगत होती.

"ना. विकी बदमाश हो सकता है, पर झूट नाही बोलता. उसे भूलनेकी आदत है! इलाज भी कर रहा है! बिन मा बाप का बचपण गुजारा है! दुनियाने खूब ठोकरे मारी है उसे! रोटी,और पैसे कि दुनियाने इसे, लालची बना दिया है! बाकी दिलसे थोडा रुखा है, पण बुरा नाही है! उसे छोड दो मॅडमजी! मेरे लिये ओ औलादसे कम नाही. बुढापेकी लाठी है, ओ मेरे!" चाचा हात जोडून लाचारीने म्हणत होता.

"देखो चाचा, ओ हमे सब जानकारी दे दे. हम असे बरी कर देंगे!"

"कानून आपका है! जैसे भी हो उसे जल्द से जल्द घर भेज दो!" म्हाताऱ्याने दोन्ही हात जोडून कपाळाला लावत शेवटची विनंती इरावतीला केली आणि पोलीस स्टेशन बाहेर पडला.

"शकील, चाचाला घरापर्यंत सोडून ये." इरावती म्हणाली. शकील स्टेशन बाहेर पडला.

विकीला धरून आणल्या पासून 'मला काहीच आठवत नाही!' हे एकच पालुपद त्याने लावले होते.

'त्या घरी का गेला होतास?'

'चंद्रशेखर कोठे आहे?'

'तो जिवंत आहे का मेलाय?'

'तुला चंद्रशेखर कोठे आणि कसा सापडला?'

'तू कस्तुरीला फोन केला होतास का?'

या आणि अश्या सगळ्या प्रश्नांना त्याचे एकाच उत्तर होते.

'मला काहीच माहित नाही! मला काही आठवत नाही!'

बरे तो हे इतक्या मनापासून सांगत होता कि, ऐकणाऱ्याला तो खोटे बोलत नाही, याची खात्री पटावी. इरावतीने आजवर अनेक गुन्हेगार पहिले होते. पण इतका अप्रतिम अभिनय ती प्रथमच पहात होती.

तिने या वेळेस विकीला सेल बाहेर काढले आणि आपल्या समोरच्या खुर्चीत बसवले.

"चहा घेणार?" तिने विकीला विचारले.

"हो, अन भूक पण लागली आहे!" विकी हलक्या आवाजात म्हणाला. निरागसता त्याच्या शब्दा शब्दात भरली होती.

इरावतीने चहा आणि सामोसे, विकी साठी मागवले.

तेव्हड्यात फिंगरप्रिंट, घेण्यासाठी लॅबचा माणूस आला होता. विकीने विना तक्रार प्रिंट्स दिल्या. चहा आणि दोन सामोसे खाऊन, तो खाली मान घालून खुर्चीत बसून राहिला.

"विकी, तुझा मोबाईल कोठे आहे?" इरावतीने सावकाश मृदू आवाजात विचारले.

"मला, तो बराच वेळा पासून सापडला नाही. कुठे तरी हरवलाय!"

"तूच तो मुद्दाम भिवंडी जवळच्या खाडीत फेकून दिलासा! बरोबर!" इरावतीने आवाज चढवून विचारले.

"खरच, मला आठवत नाही!" विकीने, पुन्हा एकदा हरदासाची कथा मूळ पदावर आणून सोडली! इरावती वैतागली. खरच याचा फोन हरवला असेल तर? एक विचार तिच्या मनात चमकून गेला. पण असे होत नसत. मोबाईल जीवापाड जपला जातो. हा सराईत आणि पटाईत खोटारडा आहे! त्याला आता थिर्ड डिग्री द्यावी लागणार! त्या शिवाय हा बोलणार नाही!

"शिंदेकाका!" इरावतीने आवाज दिला. शिंदेकाका हजर झाले.

"मॅडम!"

"याला घाला टायर मध्ये! मग बोलेल पोपटासारखा! घ्या तुमच्या ताब्यात!" इरावतीचा रुद्रावतार पाहून विकीची बोबडी वळली. साल या विसरण्याचा भानगडीमुळे, इतके मोठे संकट कधीच आले नव्हते. आपल्याला खरच काही आठवत नाही, यावर हि महामाया विश्वास का ठेवत नाही? हिला कोण सांगेल कि आपण खरे तेच सांगतोय!

"मॅडम, एक रिक्वेस्ट होती, एक फोन करायचा होता!" भीत भीत विकी म्हणाला.

"कोणाला? वकिलाला?"

"न --नाही, डॉक्टरांना!"

"डॉक्टरांना? इथं त्यांचा काय समंध?"

"मला लक्षात रहात नाही, म्हणून मी ----डॉक्टरकडे गेलो होतो!"

"काय? तूझ्या असल्या फडतूस गोष्टीवर मी विश्वास ठेवीन, असे वाटते तुला?"

"मॅडम. एक मिनिट." शिंदेकाकानी हस्तक्षेप केला. ते दंडुक्याच्या जोरावर गुन्हा कबूल करून घेण्याच्या विरोधात होते. इरावतीला त्यांनी एका कोपऱ्यात बोलावून घेतले.

"मॅडम, करू द्या त्याला फोन. विस्मरणाचा आजार अस्तित्वात आहे. तो म्हणतो ते खरे असेल तर, थर्ड डिग्रीचाहि उपयोग होणार नाही! आणि नसेल तर तेही डॉक्टरांकडून कळेल. आणि असलातरी डॉक्टरांच्या मदतीने सत्य वदवून घेता येईल!" शिंदेकाका म्हणत होते, त्यात खरेच पॉईंट होता. मानोस्पचारतज्ञ हिप्नोटाईझ करून, मनातील काही गोष्टी माहित करून घेऊ शकतात. इरावती विकीच्या खुर्चीकडे परतली.

"ठीक विकी, कर फोन!" इरावती, टेबल वरील लँडलाईन कडे बोट करत म्हणाली.

विकीने खिशे चापचायला सुरवात केली. खिशातून पाकीट काढून त्याची सगळी कप्पे हुडकले. खिशातले कागद, नोटा पाहून झाल्या. विकीचा चेहरा उतरला. तो डॉक्टरांचा नंबर कोठेच मिळेना.

"काय झालं!"

"मॅडम, डॉक्टरांनचा नंबर कुठं तरी लिहून ठेवलाय. आता आठवत नाही!"

"विक्या! हरामखोरी बंद कर! तू अन तुझा तो डॉक्टर दोघेही खोटे आहेत!" तिने विकीच्या थोबाडात ठेवून दिली.

"नाही मॅडम! दोघेही खरे आहेत!" इरावतीच्या केबिनच्या दारात, ओव्हर साईझचा कोट घातलेला एक काळ, पण तेजस्वी डोळ्याचा माणूस उभा होता. इरावतीने प्रश्नार्थक मुद्रेने त्याच्या कडे पहिले.

"मी डॉ.रेड्डी! मी सायकिइट्रिस आहे." डॉ.रेड्डी कॅबिन मध्ये येत म्हणाले. इरावतील चटकन आठवले, मागे एका डॉक्टर्स मिटला, काही कारणाने प्रोटेक्शन द्यावे लागले होते, तेव्हा तिने डॉ रेड्डीला तेथे पहिले होते.

"या सर, या. बरे झाले तुम्ही आलात ते. पण तुम्हास कोण बोलावले?"

" रहिमचे, माझे जुने संबंध आहेत. आम्ही वर्गमित्र होतो. त्यांनीच मला फोन केला. या अनाथ विकीला त्यांनीच संभाळलंय!"

"खरच विकीला 'विस्मरणाच्या' आजार आहे?"

"आहे! आणि हा आजार विकीच्या बाबतीत गंभीर होत चाललंय. त्याच काय कि विकीचे बालपण अनेक दुःखद घटनांतून गेलेले आहे, त्या काळ्या आठवणी त्याला विसरायच्या आहेत. त्यातूनच याचा विस्मरणाच्या वृत्तीने जन्म घेतला आहे! तसा तो विषय मोठा आहे. विकी पुरतेच बोलू."

"विकीच्या मोबाईल वरून, किडन्याप केलेल्या माणसाच्या सुटकेसाठी खंडणी मागणारा कॉल आल्याचे सिद्ध झालंय! आणि विकीला काही आठवत नाही! याला ती आठवण केव्हा येणार? येथे तुम्ही पोलिसांची काय मदत करू शकता ते सांगा!"

"त्याला कधी आठवेल हे नाही सांगता येणार. त्या घटने संबंधी काहीतरी त्याच्या समोर आले तर थोडी मदत होईल! मी त्याला मेस्मराइज करून पहातो काही हाती येतंय का?"

"ओके डॉक्टर, पण एक रिक्वेस्ट, अशी काही गोष्ट या पूर्वी आमच्या डीमार्टमेन्टमध्ये झालेली नाही. आणि या केस संदर्भात जे काही तुमच्या कानी किवा नजरेस पडेल ते तुमच्या पर्यंतच ठेवा."

"हो, मला या गोष्टीचे गांभीर्य कळते!" डॉ रेड्डी म्हणाले.

तेव्हड्यात इरावतीचा मोबाईल वाजला. नंबरवर तिने नजर टाकली. तिचा एक विश्वासू खबऱ्या होता.

"हॅलो, बोल बाबू."

"मॅडम. बक्षी आपल्या एरियात फिरतोय!"

"काय?" इरावती डॉ.रेड्डी आहेत हे विसरून ओरडलीच.

"हो!"

"कुठे दिसला?"

"गॅलॅक्सी कॉम्प्लेक्स जवळ!" बाबूने फोन कट केला.

म्हणजे चंद्रशेखरच्या ऑफिसची बिल्डिंग! हा बक्षी येथे काय करतोय? एस, चंद्रशेखरचे दुबई कनेक्शन आहे! सुलतानच्या बोलण्यात आहे होते! जसा बक्षी येथे काय करतोय हा प्रश्न आहे, तसाच चंद्रशेखर दुबईत कशाला गेला होता? हाहि प्रश्न महत्वाचा झालाय! टेररिस्ट- बक्षी- चंद्रशेखर काही संबंध आहे का?

"मॅडम, कुठे हरवलात?" डॉ.रेड्डीच्या आवाजाने ती भानावर आली.

"अ, काय?"

"विकीला हिप्नोटाईज करायचे ना?" विकीला ऐकू जाणार नाही या बेताने डॉ.रेड्डी म्हणाले.

"हा करा. पण शेजारची रूम आहे तेथे. ऑफिसमध्ये कोणीही येऊ शकते. त्यांच्या समोर तमाशा नको."

"ठीक! मला एक बेड किंवा इझी चेयर लागेल, विकी साठी आणि एक खुर्ची किंवा स्टूल असला तरी चालेल माझ्या साठी."

"शिंदेकाका डॉक्टरांची सोय करून द्या. मी येताच एक दोन फोन करून."

शिंदेकाका, डॉक्टर आणि विकी आतल्या खोलीत गेल्यावर, इरावतीने मोबाईल उचलला.

"चैत्राली, मी इन्स्पे. इरावती बोलतीयय!"

"बोला!" थंडगार आवाजात चैत्राली म्हणाली. तिच्या आवाजाच्या टोन वरून ती इरावतीशी बोलण्यास उच्छुक दिसत नव्हती.

"चंद्रशेखर अपघाता पूर्वी काहि दिवस दुबईला गेला होता का?"

"मला त्या बद्दल माहित नाही!"

"तो वारंवार दुबईस जात होता याची माझ्याकडे माहिती आहे!" इरावतीने दडपून दिले.

"चंद्रशेखरने कोठे जावे, हा त्यांचा प्रश्न आहे! मी त्यात कधीच लक्ष घालत नाही!"

"तुमच्या कंपनीचे कोणी कस्टमर्स दुबईला आहेत?, त्यांना तो भेटायला जात असेल?"

"माझ्या कंपनीत एकही दुबईचा कस्टमर नाही! चंद्रशेखर त्यांच्या खाजगी सहलीसाठी जात असतील!"

हि बया पक्की आतल्या गाठीची आहे! ताकास तूर लागू देत नाही.

इरावतीने दुसरा नंबर फिरवला.

"हॅलो, कस्तुरी, इन्स्पेक्टर इरावती हेअर!"

"काय? सापडला का चंद्रशेखर?" कस्तुरीने तिरकस आवाजात इरावतीलाच प्रश्न केला.

"नाही. अजून पण लवकरच सापडतील. आमचे प्रयत्न चालू आहेत. आणि त्या साठीच फोन केला होता. चंद्रशेखर दुबईला नेहमी जात अशी, माहिती मिळाली आहे. खरे आहे का ?"

"हो! बरेचदा त्याची दुबईवारी व्हायची. अपघाताच्या आदल्या दिवशी तो दुबईहूनच परतला होता!"

"का, जात असत ते दुबईला?"

"आमच्या कंपनीला एक नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळाले होते. त्या संदर्भात तो जायचा."

" ते दुबईला जातात हे तुम्हाला कोण सांगितले?"

"कोण म्हणजे? चंद्रशेखरनेच!"

" ओके. थँक्स."

चैत्राली खोटं बोलत होती का? पण नाही? कारण तिच्या कंपनीचा एकही कस्टमर दुबईत नव्हता, हे सत्य होते, कारण कागदोपत्री याचा शोध लागू शकत होता! चैत्राली अशी धडधडीत चूक करणार नाही. मग एकाच शक्यता होती. चंद्रशेखर कस्तुरीला खोटे सांगून दुबईस जात असावा! हीच शक्यता ज्यास्त होती.

तेव्हड्यात शिंदे काका इरावतील बोलावू आले.

"मॅडम, डॉक्टर बोलावत आहेत!"

इरावती आतल्या खोलीकडे जाण्यासाठी वळली, टेबलवर काहीतरी चमकले. ती विकीने टेबलवर ठेवलेल्या, पाकिटावरची एम्बॉसिंग केलेली अक्षरे होती. इरावतीने ते लेदरच्या पाकीट हातात घेतले आणि ती हिरव्या रंगातील चमकणारी अक्षरे वाचली. 'अफगान लेदर्स, दुबई'! दुबई!? इरा नखशिकांत थरारली!

******