Vedepana in Marathi Short Stories by Kuntal Chaudhari books and stories PDF | वेडेपणा

Featured Books
Categories
Share

वेडेपणा

वेडेपणा

हल्लीच्या दुनियेत मला वाटतं प्रत्येकाला गाव हा शब्द प्रचलित असेल. याचे कारण असे की बहुतांश लोक हल्ली नोकरीच्या निम्मिताने त्यांचे मूळ जन्मस्थान सोडून शहरात वसले आहेत. त्यामुळे कधी ना कधी प्रत्येक जण जन्मस्थानी जातच असेल.

खरंच गाव म्हणलं की डोळ्यांसमोर येते ती नवी दुनिया ! आपले जुने घर, चावडी,गावातील मोठे देऊळ, ग्रामपंचायत, मोठमोठी झाडे, हिरवेगार असे शेत, गुरे आणि गावातून जाणारा छोटासा रस्ता, आणखी बरंच काही !आणि गावाला जायला म्हणावं तर संपूर्ण मन शहारून येते . तसे माझे गाव खान्देशात वसले आहे त्यामुळे उन्हाळ्यात आंबे फणस आणि हिवाळ्यात शेकोटीची मजा तर काही औरच आहे. गणपती ,दिवाळी, शिमगा इत्यादी सणांना तर पूर्ण गावच बहरलेलं असतं.

असच एक सावरखेड गाव बघूया आता तिथे काय घडलय . या गावात ५ मित्र राहत होते . नुकतीच १२ वी ची परीक्षा देऊन सध्या त्यांचे मस्त सुट्टीचे दिवस जात होते.

विक्रम तर खाऊन झोपायचा आणि झोपून खायचा त्याला एवढेच काय ते सुचायचे. अभ्य्सात उत्तम होता पण एकच खंत होती त्याला, ते आई वडील नसण्याची, पण नशीबाने जिवलग मित्र दिले होते, त्यातच तो खुश होता .

नवीन सदान् कदा भुतांच्या गोष्टीत रमलेला असायचा. याच्या मागच कारण हे की त्याचे वडील त्या गावाचे मानलेले पंडित होते. भूत बाधा, अन्य गोष्टी त्या बाबतीत प्रसिद्ध होते. लहानपण त्याच हे पाहण्यात गेल तर त्यात रुची वाढणं स्वाभाविकच. आजोबा ,पणजोबा आणि वडील यांनी प्रत्येक वेळी डोळ्यांसमोर उघड झालेल्या घटनांची नोंद केली . तर त्याचाकडे याचा पुरेल असा पुरवठा होता.

दिगंबर, याच्या नावा वर नाही गेले तरच बरे. गावात जर काही झाले तर पहिली शंका याच्यावरच. धोंडा, नालायक, पडतील तेवढ्या शिव्या त्याला कमीच.

बाकी २ भाऊ होते पण कधीच त्यांचे एकमेकांशी पटायचे नाही. ते असत ना तुझं माझं जमेना पण तुझ्यावाचुन करमेना. गावाचे सरपंच म्हणजेच अण्णासाहेब हे यांचे वडील. निल आणि कंठ म्हणजे अण्णासाहेब यांचे निल कंठ. प्रेमाने यांना साहेबांनो असे हाक मारत. हे एकमेकांना विक्या, नव्या, दिग्या, निळ्या, कच्च्या (कंठ ) असं बोलवत. ह्या लोकांमध्ये कधी भांडण झाले नाही पण आज रस्ता भरकटला होता . तिचे नाव छवी होते. सुंदर, गोरा रंग, चाल तर जणू अशी जशी मांजर चाल काढते .

छवी साधी मुलगी होती, पण तिची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्या मुले १२ वी च्या पुढे तिला शिकता येणार नव्हते . तिचे बाबा तर तिच्या निकालाची वाटच बघत होते की कधी निकाल लागतोय आणि कधी ते तिच्या लग्नाचा विचार हा पुढे नेतील. पण छवी ला आई नसल्या मुले त्यांनी असा विचार केला कि ते गावातच तिला देतील. अशक्य होत ते कारण गावात तर छवी ला कोणीही आवडायचं नाही. देवास ठाऊक कसं ती करणार होती. तिला शहरात जायचे होते. त्या साठी तिच्या डोक्यात काही न काही विचार चालत असे.

सुटटीत सगळे जण कंटाळले होते. काय करायचे काय नाही हे रोजच विचार करायचे. कधी आंबे तोडून काढायचे, कधी कैर्या, कधी मंदिरात जाऊन लपा छुपी खेळायची, कधी नदीवर जाऊन मासे बघायचे , तर कधी छवी च्या घरी डोळे टाकून बसायचे. अगदी सगळंच करून झालं होते. आता काहीतरी वेगळ करूया असा विचार सगळ्यांचा डोक्यात गजबजत होता.

गावात लग्न होत त्यात हे सगळे होते. अगदी म्हणायचं असेल तर ३ गोष्टी साठी ते म्हणजे जेवण, मस्ती, छवी. कितीही म्हटलं तरी गावात लाडके होते. प्रत्येकाच्या तोंडी हे ५ नाव रोज असणार म्हणजे असणारंच. कारण मस्ती होती, पण जीव ही तेवढाच लावायचे. सगळे म्हणायचे कि हे ५ लोक एकमेकांची ताकद होत. सगळं मस्त चालू होत जो पर्यंत त्यांच्या वेडेपणाचा कळस झाला नाही .

लग्नात त्यांनी खूप धमाल मस्ती केली, खूप खेळले, खूप गाणी गायली, सगळं मस्त चालू होतं. लग्न झाल सगळे आपल्या घरी जायला निघाले, पण या ५ची चे मन भरले नव्हते. दारूमध्ये धूत होऊन छवी ला बघण्यासाठी निघाले . छवी ही घरी जायला निघाली होती. ती तिच्या मैत्रीणी बरोबर होती. एका शेतातून तिच्या घरचा रस्ता होऊन निघायचा.

ते ५ लोक सुद्धा तिच्या मागे मागे , हळू हळू पाठलाग करत होते . छवी च्या काहीच लक्षात आले नाही. ती चालत होती , पण अचानक ती गायब झाली . सगळे तिला शोधू लागले पण यांना ती काही सापडली नाही. मग हे ही तिथून निघून गेले. आप-आपल्या घरी जात होते तेव्हा तिथे एक विहीर त्यांना दिसली. लोक म्हणायचे कि ह्या विहिरीत खूप वर्षा आधी एक माणसाला ढकलून मारून टाकल होत. कारण तर कोण सांगत नाही पण असं म्हणतात कि ह्या विहीरीत जर कोणी आपली इच्छा सांगितली तर ती पूर्ण होते. ही एक अंधश्रद्धा आहे हे खरं, पण तरी त्या रात्री त्या ५ही जाणांनी त्या विहिरीत आपली इच्छा सांगितली. नशेत एवढे धुंद होते की जोरजोरात ओरडून तिथून निघून गेले.

त्यांची इच्छा एकच होती, छवी. पण छवी ची काही तरी दुसरीच इच्छछा होती. छवीला शहरात जायची ओढ लागली होती . दुसऱ्या दिवशी त्या ५ लोक्कांना काही नीट तर आठवले नाही. भेटून ते गप्पा मारायला लागले .

दिगंबर म्हणाला "अरे यार काल ती अचानक गेली तर गेली कुठे? काही समजत नाही आहे. तिच्या घरी जायचा रस्ता तर तोच होता "

त्या वर विक्रम म्हणाला " हो ना यार , पण सोडना काय करायचंय तसे ही आपण जास्तच प्यायलो होतो. बरं नस्त वाटलं ते ".

''ए विक्या तू गप्प बस समजल, तुला तसं ही मुलींची भित्ती वाटते " असं नव्या म्हणाला .

निळ ,कंठ हे काही बोलत नव्हते पण त्यांच्या डोक्यात खूप काही चालत होत. "अरे तुम्ही दोघं गप्प का आहेत रे? आधीच बोर होतंय " अस दिग्या म्हणाला .

आम्ही काही तरी विचार करतोय पण सांगू की नको काही समजत नाही अस ते म्हणाले . विक्रम ने विचारलं, “अरे सांग तरी मग?” कंठ म्हणाला “आमच्या डोक्यात एक प्लॅन आहे. आपण एक गेम खेळूया म्हणजे त्याने आपला वेळ ही जाईल आणि मजा ही येईल ".

कोणाला माहित होत की फक्त एका गेम मुळे ५ जीव जाणार आहेत. याची सुरुवात झाली होती . गेम होता वेडेपणा, ज्यात जो कोणी जे डेर देईल ते जो करेल त्याला छवी ला पटवून देण्यात बाकीचे मदत करतील. ऐकायला सोप्पं होतं पण झालं काहीतरी वेगळच, जे त्यांच्या कल्पनेतही आल नसेल . गेम मध्ये चिठ्या टाकायच्या होत्या. ५ डेर. कोणीही ते उचलेल आणि दुसऱ्याला माहीतही नसेल की कोणाला काय डेर मिळाल आहे आणि कोणी काय दिलय.

या वेडेपणात छवी ही ओढली गेली होती . २ ऱ्यादिवशी नव्या चा खून झाला. कोणीतरी त्याला विष देऊन मारून टाकले होते . बाकीचे चौध खूप घाबरून गेले होते. सरपंच म्हणाले कि, “पोलीस पाटील कडे जर हे प्रकरण गेल तर त्यांची आणि त्यांच्या गावाची बदनामी होईल. म्हणूनच आम्ही स्वता यात लक्ष घालू.” त्या गावात एकच पोलीस पाटील होता आणि तो काही कामानिमित्त शहरात गेला होता. त्याच्या आईला सुद्धा घेऊन गेला होता. नवीन पर्यंत ठीक होत. पण नंतर जे काही झालं त्यामुळे का कसं कोणी, हे प्रश्न उभे राहिले .

दुसऱ्या दिवशी डिगंबर चा देह नदीत सापडला. मात्र या वेळी पोलीस पाटील ला कळवल्या शिवाय काहीही मार्ग नव्हता . शिंदे साहेब आले. ते म्हणाले, “गावात अचानक २ खून झालेत आणि कोणी सांगितलेही नाही?” ते संतापले होते . नवीन च्या वेळी ही जर त्यांना सांगितलं असतं तर कदाचित काही संकेत, काही चिन्ह सापडली असती . ते थेट त्या तिघांकडे गेले. नक्की काही झालं होत का, काही वाद कोणाशी, हे प्रश्न विचारले . पण ३घांची ही हालत बेक्कार होती . का होतंय हे त्यांना काहीच समजत नव्हते. विक्रम तर कापत होता. त्याला असे वाटले कि कोणी त्याला हि काही केले तर?

विक्रम थरथरू कापत होता, त्याला तर आई वडील ही नव्हते म्हणून शिंदे स्वतः त्याच्या कडे थांबले. त्यांना अस वाटलं कि जर खुनी इथे आला तर त्याला पकडायला ही सोप्पं पडेल. पण झालं काहीतरी विचित्रच. त्या रात्री शिंदे यांनी मस्त भाकरी आणि पिठलं याचा बेत केला होता. विक्रमशी गप्पा ही मारता येईल असं त्यांना वाटलं. जेवण नीट आटपलं.

आता ते दोघंही निवांत बसले. विक्रम च मन चलबिचल होत होतं . अखेर त्यांनी हिम्मतीचा घास घेतला आणि सांगितलंच. तो म्हणाला " साहेब , मला काहीतरी सांगायचं आहे." शिंदे म्हणाले ''हो हो सांग बाळा. घाबरू नकोस" विक्रम म्हणाला "साहेब त्या रात्री आम्ही ५ही जावांनी एक गेम खेळायचं ठरवलं होतं. डेर चा गेम. आम्ही चिठयांमध्ये आम्हाला काय डेर द्यायचं आहे ते लिहिले आणि मग प्रत्येकानी एक एक उच्चली. कोणीही चीटिंग नको करायला म्हणून आम्ही ते सगळ्यात आधी दुसऱ्या दिवशी सकाळी एकमेकांसमोर उघडणार होतो. अजून मी ही उघडली नाही आहे ".

त्यावर शिंदे यांनी विचारलं “त्यांच्याकडे ज्या चिठया होत्या त्या कुठे असतील??". विक्रम म्हणाला, “साहेब , दिग्याने कुठे ठेवली असेल मला नाही महित , हा !!!! पण निळ्या ला माहित असेल त्यांचे घर जवळ होते , तर त्यांच तेवढं जमायचं ". “ठीक आहे.. तू झोप आता " शिंदे म्हणाले. “बरं” बोलून विक्रम झोपायला गेला. शिंदे ला तर काय झोप लागेना. त्याच्या डोक्यात असा विचार आला कि उद्या जाऊन शोध घेण्यापेक्षा आता घेतलेला बरा . त्याने तावडेला बोलावून घेतलं विक्रम बरोबर राहायला.

तो निघून गेला तेव्हा त्याने काहीतरी बघितला. छवी कोणाबरोबर तरी शेतात गेली होती आणि त्यांचं बोलणं सुरु होत.... "मी नाही राहू शकत तुझ्या शिवाय. मला ही घेऊन चल शहरात ". शिंदे ला समजल प्रेम प्रकरण आहे तर वेळ ना घालवता तो निघाला.

नदी किनारी काही सापडतंय का हे नीट बघायला तोच नदीपाशी गेला. तिथे ही त्याला काही सापडले नाही . त्याचं डोकं खराब होत होतं. नक्की कोणाला काय मिळाले असेल यांना मारून , कोणाशी यांचे वैर ही नाही मग का ???. फक्त प्रश्न, उत्तर काहीच नाही . तिथे अचानक घरी जात असताना लोक जमले होते. परत एक धक्कादायक घटना समोर आली होती. निळ्या चा मृत्यू झाला होता. आता तर शिंदे च अजूनच डोकं खराब होऊ लागलं होतं . ३ जण आता पर्यंत गेले होते. निळ्या चा मृत्यू तर गळाला फास लावल्याने झाला होता .

शिंदेनी चौकशी सुरु केली. सरपंच्यांकडे पहारा असायचा तरी कसं? सगळं गुंता गुंतीच होत होतं. तेव्हा त्यांना सरपंच यांच्या घरच्या रस्त्या वर एक पैंजण दिसल. ते त्यांनी घेतल आणि घरी गेले. सकाळी विक्रमला निळ्याची बातमी समजली आणि आता तर तो रडून रडून हैराण झाला होता.

शिंदे नी ते पैंजण विक्रम ला दाखवल. तेव्हा त्याला धक्का च बसला. तो म्हणाला "हे तर छवी च आहे.” शिंद्यांनी विचारल “छवी? ही कोण ??” तेव्हा विक्रम म्हणाला "आम्ही जो गेम खेळणार होतो त्यातून जो जिंकणार होता त्याला आम्ही छवी पटवून देणार होतो". हे ऐकून शिंदे यांनी छवी ला भेटायचे ठरवले .

दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजता ते छवी च्या घरी निघून गेले . तिथे छवी कपडे धूत होती . त्यांनी विचारल “इथे छवी राहते का?” तेव्हा तिचे वडील बाहेर आले. “साहेब , तुम्ही या या बाहेर नका उभे राहू. छवी जा चहा टाक " असे छवी चे वडील म्हणाले . त्यांची परीस्तीती शिंदे ला समजली. त्यांचे कपडे ही फाटके होते आणि मातीने भरलेले होते.

शिंदे म्हणाले " काय करता मग तुम्ही ??", साहेब मी कुंभार हाय , गरीबाच्या घरी कस येणं केलं तुम्ही?” “अहो त्यात काय , कामानिमित्त आलेलो” शिंदे म्हणाले. “कसल काम साहेब?” “अरे काही नाही. तुमची मुलगी त्या मुलांच्या शाळेत होती म्हणून विचारपूस करायला आलेलो.” “होय .. होय साहेब .. छवी अंग ये लवकर” तेवढयात ती आली. हातात चहा होता. म्हणाली “घ्या साहेब”. बेटा ... हे बघ हे तुझं आहे का ???” शिंद्यांनी विचारल. तिला घाम फुटला .. तिच्या तोंडातून काही शब्द फुटेच ना. “हे नाय नाय हे माझं नाय” छवीच्या वडीलांच लक्ष तिच्या पायाकडे गेलं. तिच्या एकाच पायात पैंजण होतं. ते म्हणाले “अग पोरी .. नीट आठव. ते काय तुझ्या पायात एकच हाय.” “हो हो आठवलं बाबा माझं च आहे ते” शिंदे ला समजलं काही तरी गडबड आहे. ते म्हणाले “घे मग. काही नाही रस्त्यात सापडली . विचारपूस केली तर तुझं नाव आलं तर घेऊन आलो”

त्यावर शिंदे काही नाही म्हणाले त्यांनी छवी वर लक्ष ठेवण्याचं ठरवलं . छवी संध्याकाली परत शेताकडे निघाली. तिथे मानस तिची वाट बघत होता. लहानपणा पासूनच त्यांच प्रेम होत. तो सुटटीत गावी यायचं. तो कधीच शहराकडे राहायला निघून गेलेला

त्याचे वडील गव्हर्नमेंट सेर्व्हन्ट होते म्हणून त्यांची बदली होत असे . शिंदे च पूर्ण लक्ष होत छवी कडे म्हणून त्यांना तिच आणि मानस च प्रेम प्रकरण समजलं . त्या रात्री त्या शेतात हीच होती जी शिंदेंना दिसलेली , जिथे दिगंबर चा खून झाला तिथे ती काय करत होती? शेताच्या कडेलाच ती नदी असते म्हणून शिंदेंना सौंशय येऊ लागलेला.

नवीन ला ही जे खाऊन त्याच्या शरीरात विष गेलं ते कुठेना कुठे छवी शी जुडत होतं. त्याने शिरा खाल्ला होता जे छवी ने बनवला नव्हता पण तिच्याकडून दिला गेला होता. लग्नानंतरचा सत्यनारायणाचा प्रसाद तिने वाटला होता .

आता पर्यंत शिंदेंना समजलं होत की छवी ला मानस बरोबर लग्न करायचं होतं आणि शहरात जायचं होतं . तिला गावात राहायचं नव्हतं पण त्याचा आणि खूनेचा काय संबंध याचा विचार करत असतानाच तावडे आले आणि म्हणाले, “गावात विचारपूस करून त्याला एक माहिती मिळाली आहे की छवी चे वडील गरीब असल्यामुले त्यांच्याकडे लग्नाच्या खर्चाला सुद्धा पैसे नव्हते, म्हणून त्यांना छवी ला गावातच द्याची होती. हेच नाही तर त्यांचे गावात भांडण ही होत असे. त्यांना दारूच व्यसन होतं म्हणून त्यांना छवी ला ही गावात ठेवायचं होतं. एकदा का तीच लग्न झालं की मग त्यांना रोजचे मोजके पैसे ती देईल .

त्यामूळे छवी ची मनस्तीती खराब असायची. आई नाही, वडील असे. तिची मानसिक स्थिती बहुदा नीट नसे . आता तर शिंदे चा सौंशय अजून वाढत होता.

शिंदे नी छवी ला अर्रेस्ट केलं. ती रडत होती. “मी हे नाही केलंय” म्हणत होती. तिने सगळं सांगितलं आणि मग शिंदे जिप घेऊन निघाले , छवी ला ही सोबत घेतलं . विक्रम वर हल्ला होणार होता, हे शिंद लगेच समजलं होतं. विक्रम घरी नव्हता. शिंदेनी खूप शोधलं . शेवटी ते त्या विहीरीपाशी गेले. तिथे विक्रम आणि कंठ दोघंही होते. तावडे ला दुसऱ्या बाजूने पाठवलं आणि छवी ला त्यांच्याकडे. छवी घाबरत घाबरत पुढे गेली. तेव्हा विक्रम म्हणाला, “अरे छवी तू आलीस! ये ये, काय म्हणाले मग साहेब?” “काही नाही असच” ती म्हणाली .

“छवी तुला माहित आहे गावात तुला सगळे पागल समजतात म्हणून तू कोणाला काहीपण सांग कोणीही तुझं नाही ऐकणार” “म्हणजे ??” छवीने विचारले. आणि कंठ ने विक्रम ला जोरात विहिरीत धक्का दिला आणि ओरडून म्हणाला, “मी जिंकलो! जिंकलो मी!” शिंदे बाहेर आले. त्यांनी विक्रम ला वाचवला .

कंठ म्हणजे कच्या त्याला सगळे कच्चा लिंबू समजायचे. पण त्याने याचा अर्थ वेगळाच घेतला . गेम जिंकण्यासाठी दिगंबर ने डेर मध्ये मुद्दाम ४ खून सांगितले होते, दिग्या नेहमी त्याची उडवायचा. पण हे त्यानी सत्यात उतरवलं . दिगंबर खूपच मस्तीखोर होता सगळ्यांची खेचायचा पण कंठ ची खेचायला त्याला वेगळीच मज्जा यायची. हे झालंच. शिवाय भावांमध्ये ही मारामारी चालूच असते म्हणून निल ही त्याला कंठ ची उडवण्यात साथ द्यायचा.

कंठ नेच दिगंबर आणि निल चा खून केला होता . पण नवीन ला त्याने नव्हत मारलं. नवीन ला मानस ने मारला होत. हे शिंदेंना आधीच समजून गेलं होतं. जेव्हा ते छवी च्या घरी गेले होते तेव्हा. तेव्हाच त्यांनी नीट छवीला निरखल होत. छवी कोणाचा खून करेल हे अशक्य होतं. कारण त्या दिवशी तर छवी प्रसाद वाटायला तिथे थांबलीच नव्हती. तिला घरी यावं लागलं. विक्रम होता तेव्हा छवी होती, पण नंतर मानस होता. खूप दिवसाने आला होता म्हणून गावातल्या लोकांनी त्याला आग्रह केला आणि त्या संधीचा पूर्ण फायदा करून घेतला . नवीन ला त्याने मारलं .

शिंदेंना हे समजलं जेव्हा ते अण्णासाहेबाच्या बंगल्यावर गेले होते. तेव्हा तिथे एका माणसाने सांगितलं कि इथे फक्त कंठ चा मित्रच आला होता म्हणजे मानस . ते पैंजण पण मानस नेच ठेवलं होतं छवी ला अडकवण्यासाठी . कंठ आणि मानस घनिष्ठ मित्र होते. लहानपणी एका वेडेपणामुळे मानस ला स्कूल मधून १ का वर्षासाठी बाहेर काढून टाकलं होता ज्या मुले त्याच्या कुटुंबाला पण टोमणे , नको ते लोकांचे बोलणे सहन कराव लागत होत . कसे बसे पैसे गोळा करून ते शहराकडे निघून गेले . मानस ही तिथे खूप छान अभ्यास करून प्रथम यायचा. तेवढाच आनंद त्याच्या आई वडीलांना. नंतर गावातल्यांनी त्यांना बोलणं सोडलं हे समजून की तो सुधारला आहे.

खरं तर तो सुधारलेलाच होता. त्याने जे केलंच नाही त्यासाठीची शिक्षा त्याने भोगली होती . कोणाचा वेडेपणा कोणाला कुठे नेईल याच पूर्णपणे उदहारण म्हणजे त्या दिवशी केलेला नको तो वेडेपणाचा डाव . नवीन , दिगंबर , निल , विक्रम एकाच वर्गात होते आणि कंठ मानस बरोबर होता .

मानस अगदी साधा भोळा अभ्यासू मुलगा होता. मुलींकडे तर बघणं दूरच होत त्याच लक्ष पुस्तकातून निघेल तेव्हातर . त्या दिवशी ही त्यांची पैज लागली होती. पण या वेळी ही पैज महागात पडणार होती . नवीन ने दिगंबर, विक्रम आणि निल ला सांगितलं कि “या वेळी मी तुम्हला चैलेंज देतो. आधी जो कोणी मुलगा येईल त्याला शिक्षा भेटेल अस काही करून दाखवा. पण हे आपण केल आहे हे आपल्याला सोडून कोणालाही कळता कामा नये .”

त्या दिवशी तिथून मानस आला. ५ वी च्या वर्गात जायला निघाला होता. तेव्हाच छवी ला तिच्या मैत्रिणीनं येऊन म्हणाली, “छवी हे बघ.” तेव्हा दिगंबर ने मस्तीत अतीच केलं होत . रक्ताने एका कागदावर लिहिल होतं, “तू माझी आहेस .. छवी ह्या मानस ची .. जर तू हो नाही बोलीस तर मी स्वतःला मारून टाकेल .. आणि तुला ही नाही सोडणार .... तुला माझ्या बरोबर घेऊन जाईल ..... छवी घाबरली आणि तिने सर्वांसमोर मानस ला कानात मारली .” मानस ची परीक्षा ही रद्द केलीच पण त्याला काढून टाकला आणि ते १ वर्ष त्यांनी वेड्यासारख काढल .

ह्या विचारात काढले कि त्याच्या बरोबर हे कोणी आणि का केलं . दिगंबर ला विक्रम ला किंवा निल ला ही कलपना नव्हती कि एवढं काही होईल . निल ने भावनेत हे सगळं कंठ ला सांगून दिल . प्रश्न हा होता कि कंठ ने स्वतःच्या भावाला का मारलं . तर अण्णासाहेबांनी नेहमी कंठ ला कमी लेखलं आणि निल ला जास्त. निल ने काही केलं तरी त्याला एका शब्दात बोलणार नाही पण कंठ ह्याला नेहमी ऐकावं लागत असे . कंठ ला ही एक संधी हवी होती. लहानपणापासून त्याला निल कचऱ्या म्हणायचा. घरातच नाही तर बाहेर ही त्याची खिल्ली उडवायचा .

कंठ ला खूप राग येत असे. पण हा राग त्याने आपलया आत दाबून ठेवला होता . मानस ने त्याला सांगितलं कि तू ही त्यांच्याशी मैत्री कर आणि आता आपण जास्त भेटायचं नाही. कधीतरी भेटू. कस कुठे ते मी सांगेन . आणि मानस ने माफी मागून छवी ला पटवलं. या छवी ला खर तर तो आवडायला लागला होता. आणि ती त्याच्यावर मनापासून प्रेम करायला लागली होती . तिला अस वाटत होत की मानस ने खूप हिम्मत दाखवून तिला त्याचे भावना व्यक्त करून दाखवले होते. ज्याची शिक्षा त्याला मिळाली होती .

मानस ने ही आता त्याचा डाव खेळायचा चालू केला होता . कंठ आणि मानस , त्या दिवशी ही कंठ नेच डेर च्या गेम ची कल्पना सुचवली होती . आणि ह्या गोष्टीत ते सगळे अडकले होते. कंठ चा जिवलग एकुलता एक मित्र मानस होता . पण शिंदेंना जेव्हा मानसवर शंका आली तेव्हा त्त्यांनीं त्यांच्या शाळेत जाऊन विचारपूस केली. तेव्हा त्यांना समजलं की मानस च शहराकडे जायचं कारण काय होत. बदली कारण कधीच नव्हत , कारण तर मानस ला शाळेतून काढलं हे होत .

मानस चा बदला घेण्याचा वेडेपणा, कंठ चा रागाचा वेडेपणा , त्या ४ मित्रांचा मैत्रीत असलेला वेडेपणा , आणि छवी चा प्रेमाचा वेडेपणा महागात पडला . वेडेपणा हा नेहमी महागतच पडतो . ही छोटी कथा फक्त वेडेपणात मग्न होऊन नको ते करणाऱ्या मित्रांची . थोडा वेडेपणा हवा यार ...... पण अती कधीच नको . कोणाला त्रास होईल असा वेडेपणा कधीच करू नये कारण त्याचा अंतः मृत्यू होऊ शकतो .

~कुंतल चौधरी