Prem bhavnecha mrudu rang bharnara virus - 1 in Marathi Biography by Subhash Mandale books and stories PDF | प्रेम भावनेचा मृदू रंग भरणारा व्हायरस - 1

Featured Books
  • પિતા

    માઁ આપણને જન્મ આપે છે,આપણુ જતન કરે છે,પરિવાર નું ધ્યાન રાખે...

  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

  • હાસ્યના લાભ

    હાસ્યના લાભ- રાકેશ ઠક્કર હાસ્યના લાભ જ લાભ છે. તેનાથી ક્યારે...

  • સંઘર્ષ જિંદગીનો

                સંઘર્ષ જિંદગીનો        પાત્ર અજય, અમિત, અર્ચના,...

  • સોલમેટસ - 3

    આરવ રુશીના હાથમાં અદિતિની ડાયરી જુએ છે અને એને એની અદિતિ સાથ...

Categories
Share

प्रेम भावनेचा मृदू रंग भरणारा व्हायरस - 1

प्रेमभावनेचा मृदू रंग भरणारा व्हायरस
१.
प्रथम गणपती बाप्पाला नमस्कार करणे आणि मगच अॉफीसमध्ये पाऊल टाकणे.त्यासाठी खासकरून स्वागत कक्षातूनच जायचे. अॉफीसमध्ये जाऊन कंप्युटर चालू करायचे आणि थेट प्रोडक्शन लाइनवर जाऊन कामगारांची मिटींग घ्यायची. मिटींगमध्ये अदल्या दिवशीचा लेखाजोखा मांडायचा. त्यातील चुका टाळून कामात सुधारणा करून दिलेलं टार्गेट पूर्ण करण्यासाठी काय करता येईल हे सांगायचं आणि एखाद्या दिवशी त्यांनी दिलेले टार्गेट पूर्ण केलेच, तर दिलेल्या टार्गेटच्या पुढे आणखी प्रोडक्शन कसं वाढवता येईल, यासाठी मार्गदर्शन (?) करायचं. मी दिलेल्या मार्गदर्शनावर आजपर्यंत कधी कुणाच्या डोक्यात कसलाच प्रश्र्न किंवा विरोध निर्माण झाला नाही. त्यामुळे मी स्वतःवरच खूष होऊन अॉफीसमध्ये येऊन बसायचो. त्यानंतर संध्याकाळी रिपोर्ट जमा करून घ्यायचा आणि इतर कामे आटोपून घरी निघायचे. हा माझा रोजचा ठरलेला दिनक्रम.
तारीख होती १९ मार्च २०२०, त्यादिवशी सकाळी सकाळी अॉफीसमध्ये एक कामगार हातात कागद घेऊन आला. मी ओळखले की हा सुट्टीचाच अर्ज आहे. त्याचा अर्ज फेटाळण्यासाठी मी लांबूनच सांगितले," नंतर ये, मी जरा कामात आहे." पण तो गेला नाही तिथेच बाजूला सरकून उभा राहिला. खूप वेळ झाला तरी तो गेला नाही. तो मला भेटल्याशिवाय जाणारच नाही हे मी ओळखले. मी त्याला हाताने खूणऊन जवळ बोलावले आणि विचारले," हा ! कशासाठी सुट्टी पाहिजे? "
तो- "आईला गावी न्हेऊन सोडायचं आहे."
मी- " किती दिवसाची सुट्टी हवी आहे?"
तो-" इथलं वातावरण निवळेपर्यंत गावाकडेच राहणार आहे."
मी- " मग सुट्टीचा अर्ज कशासाठी? तुला ठाऊक आहे, की तीन दिवसांपेक्षा जास्त दिवस सुट्टी कुणालाच दिली जात नाही आणि कुणी जादा सुट्टी घेतलीच तर त्याला पुन्हा कामावर घेतले जात नाही."
तो- " मी रात्री बातम्यात बघितलंय, या व्हायरसचा धोका म्हाताऱ्या माणसांना आणि लहान मुलांना जास्त आहे..."
मी-" माझं ऐक, हा व्हायरस जास्त दिवस टिकत नसतो. सुट्टी मारून गावी जाऊ नकोस आणि विठ्ठल महाले तुझं नाव ना ? , अरे कसला रे तु विठ्ठल! पंढरपूरात युगानुयुगे कमरेवर हात ठेवून तो विठ्ठल तिथे ऊन वारा पाऊस सोसून ऊभा आहे आणि येवढ्याशा व्हायरसला घाबरून पळून निघालायस !.भरपूर जणांनी विनापरवानगी सुट्टी मारून गाव गाठलंय, त्यामुळे तु आत्ता जाऊ नकोस, फार तर पुढच्या महिन्यात तुला नक्की सुट्टी देतो,"
तो- " मी आजच आईला घेऊन गावी निघालोय."
मी- " सुट्टी न घेताच ? "
तो- " माझ्या आईचं वय झालंय, ती थकलेय आहे आणि दम्याचा त्रास असल्यामुळं असल्या वातावरणात तिला वरचेवर इथं दवाखान्यात घेऊन जाणं शक्य होणार नाही. तिच्या जीवाला धोका होईल अशी रिस्क मी घेऊ शकत नाही."
मी- " आईला गावीच ठेऊन यायचं ना मग !"
तो- " मी गावाकडं खाजगी दवाखान्यात कंपाऊंडरचं काम करत होतो, त्यामुळं आईचं आजारपण बघत बघत पोटापाण्याचा प्रश्न मिटत होता, पण आईचा आजार पुर्णपणे बरा होण्यासाठी मिळणारे पैसे कमी पडत होते. पुण्यात गावाकडं मिळणाऱ्या पैशांपेक्षा जास्त पैसे मिळतील. एखादं काम करून पैसे कमवायचे आणि त्या पैशातून घरखर्च आणि आईच्या आजारपणाचा खर्च भागवता येईल या उद्देशाने मी आईला घेऊन गावाकडून पुण्यात आलोय."
मी- " मला माहीत आहे. जास्त दिवस सुट्टी मिळावी, म्हणून हि सारी तुमची नाटकं आहेत. आम्ही देखील माणसंच आहोत ना! आम्ही कामावर येतोयच ना! आम्हाला काय झालंय का ? तुझ्या लाइनवरची मनिषा चौधरी ! तिला अंगात ताप, सर्दी असूनही एकही खडा न करता रोज कामावर येतेय आणि तु गड्यासारखा गडी असून असल्या किरकोळ व्हायरसला घाबरतोयस ?"
" सर, हा किरकोळ व्हायरस नाही.", विठ्ठलच्या पाठोपाठ संतोष नाईक आला होता तो पुढे होऊन बोलला, " दहा दिवसांपूर्वी म्हणजे ९ तारखेला पुण्यात व्हायरसचा १ पेशंट होता. १४ तारखेला आमच्या इथं पिंपरी-चिंचवडला ५ जण पेशंट सापडलेत. अवघ्या आठ दहा दिवसांत म्हणजे कालपर्यंत रुग्णांची संख्या ४५ झाली आहे. सर, या व्हायरसचा खूप फास्ट प्रसार होतोय आणि हा डेंजर व्हायरस आहे."
त्याने सांगितलेल्या अचूक आकडेवारीवरून तो पुर्ण तयारीनिशी आला होता, असे जाणवले.

क्रमशः