Aghatit - 6 in Marathi Fiction Stories by Vrishali Gotkhindikar books and stories PDF | अघटीत - भाग ६

Featured Books
  • નારદ પુરાણ - ભાગ 61

    સનત્કુમાર બોલ્યા, “પ્રણવ (ૐ), હૃદય (નમ: ) વિષ્ણુ શબ્દ તથા સુ...

  • લગ્ન ને હું!

    'મમ્મી હું કોઈની સાથે પણ લગ્ન કરવાના મૂડમાં નથી, મેં નક્...

  • સોલમેટસ - 10

    આરવને પોલીસ સ્ટેશન જવા માટે ફોન આવે છે. બધા વિચારો ખંખેરી અન...

  • It's a Boy

    સખત રડવાનાં અવાજ સાથે આંખ ખુલી.અરે! આ તો મારો જ રડવા નો અવાજ...

  • ફરે તે ફરફરે - 66

    ફરે તે ફરફરે - ૬૬   માનિટ્યુ સ્પ્રીગ આમતો અલમોસામાં જ ગ...

Categories
Share

अघटीत - भाग ६

अघटीत भाग ६

खरेतर पद्मनाभच्या आईला क्षिप्रा मधला फरक स्पष्ट दिसत होता .
पोरगी वेळी अवेळी घरी येत असते, अभ्यास करताना कधीच दिसत नसे आणि सतत मोबाईलवर असे हे जाणवत होते .
तिच्या मैत्रिणी पण जरा अति आगावू आहेत .
कसले कसले कपडे घालते ही पोरगी आणि विचारले की उत्तर ही नीट देत नाही हे ही त्यांना समजले होते .यापूर्वी त्यांची आणि क्षिप्राची चांगली गट्टी असायची.
मनातले सगळे ती आई बाबाच्या आधी आजीला सांगत असे .
दोघी एकत्र जेवत एकत्र झोपत ..
एकमेकीत छान छान गमती शेअर करीत
पण आजकाल ती गंमत ही संपली होती.
तिचा वेळेत घरी यायचा पत्ता नसे त्यामुळे जेवण एकत्र बंदच झाले होते
शिवाय या घरात आल्यापासुन तिला तिची स्वतंत्र खोली होती ती तिकडेच झोपत असे .
हल्ली तर सकाळी बाहेर पडली की संध्याकाळी उगवत असे .
तिच्या वागण्याला आजकाल काही धरबंध राहिला नव्हता .
तिची लक्षण ठीक वाटत नव्हती
एकदा हे सारे पद्मनाभच्या कानावर घालायला हवे पण त्याला तर वेळचा नसतो ..
आणि ही वरदा तर आजकाल सारखी बाहेर असते
त्या मैत्रिणी आणि सारख्या त्या पार्ट्या ..
इतर वेळेस सासु सुनेची चांगली गट्टी होती ..पण आजकाल तिचे घरातले दुर्लक्ष पाहून त्यांना तिचा राग येऊ लागला होता .
जेवण झाल्यावर क्षिप्रा आपल्या खोलीत गेली
झोपण्यापूर्वी ब्रश करताना ती आरशा समोर उभी राहिली
ब्रश हातात घेताना तिने स्वताच्या ओठाकडे पाहिले ..खरेच रसदार आणि गुलाबी दिसत होते .
आणि मग तिला गौतमने अचानक घेतलेलं चुंबन आठवले .
एका चुंबनात त्याच्या जाडजूड ओठांनी तिच्या ओठांचा चुरगळा केला होता .
फार फार छान वाटल होते तेव्हा .आणि जेव्हा जवळ ओढले होते त्याने तेव्हा त्याच्या बाहूंची पकड किती मजबूत होती ..त्यवेळी तिचे वक्ष पण त्याच्या छातीवर दाबले गेले होते .. तेव्हा सगळ्या शरीरात एक शिरशिरी उठली होती
आणि त्याच्या अंगाला येणारा उंची सेंटचा वास पण मादक होता .
तिने नुकत्याच अंगातून काढुन टाकलेल्या शर्टचा वास घेतला ..
खरेच त्याला त्या सेंटचा वास येत होता ..
आरशात स्वताकडे पाहताना तिने स्वताच्या छातीवरून परत हात फिरवला आणि गौतमच्या स्पर्शाची अनुभूती घेतली ..
त्याने परत भेटायचं आमंत्रण दिलेय ..
काय असेल त्याच्या मनात ..आणि काय होईल त्या भेटीत ..
हे सारे झेपेल का आपल्याला?...तो तर खुप श्रीमंत घरातला आहे .
गावात त्याचे दोन तीन मोठे बंगले आहेत म्हणे ..
वडिलांचा परदेशात मोठा इम्पोर्ट एक्स्पोर्टचा बिझिनेस आहे
आणि आईची पण मोठी मोठी स्पा आहेत म्हणे अनेक ठिकाणी
हे सगळे शिवानी कडून तिला समजले होते ..
शिवानी पण त्याच्या प्रेमात होती पण तो तिला भाव देत नव्हता ..असे ती म्हणली होती
अजूनही शिवानीने त्याला पटवायचा प्रयत्न सोडला नव्हताच .
तिला गौतम सोबत ग्रुप मध्ये झालेल्या भेटी आठवल्या
तसे तर दोन तीन महिनेच झाले होते तिला ग्रुप मध्ये सामील होऊन ..
आता तिला आठवू लागले पहील्या पासून तो तिच्या मागे मागे असायचा .
तिच्या शेजारी बसणे..ती जे ओर्डेर करेल तेच मागवणे ..कधीतरी तिच्या बाटलीतल जुस पिणे
पण तेव्हा तिने ते नोटीस नव्हते केले ..
आज सुद्धा सिगारेट चा ठसका लागल्यावर तोच आधी जवळ आला होता आणि पाठीवर हात फिरवला होता
इतर सर्वजण तर तिची नुसती हुर्रे करीत होते
तिला वाटले खरेच कशी बरे लक्षात नाही आली आपल्या त्याची जवळीक ..
आज मात्र त्याला तिच्या सोबत यायची संधी मिळाली होती
विचार करता करता क्षिप्रा मनातून त्याच्यात गुंतत चालली होती.
आज ती खुप खुष होती ..
आयुष्यातल्या दोन थ्रिल्लिंग गोष्टी तिच्या बाबतीत घडल्या होत्या
एक म्हणजे सिगारेट आणि दुसरे पुरुष स्पर्श .. !!
आज झोप येणे कठीण होते पण तरीही तिचा डोळा लागला ..
स्वप्नात सुद्धा ती गौतमच्या बाहुपाशातच होती .

क्रमशः