Nava adhyaay - 7 in Marathi Fiction Stories by Dhanashree yashwant pisal books and stories PDF | नवा अध्याय - 7

Featured Books
  • નારદ પુરાણ - ભાગ 61

    સનત્કુમાર બોલ્યા, “પ્રણવ (ૐ), હૃદય (નમ: ) વિષ્ણુ શબ્દ તથા સુ...

  • લગ્ન ને હું!

    'મમ્મી હું કોઈની સાથે પણ લગ્ન કરવાના મૂડમાં નથી, મેં નક્...

  • સોલમેટસ - 10

    આરવને પોલીસ સ્ટેશન જવા માટે ફોન આવે છે. બધા વિચારો ખંખેરી અન...

  • It's a Boy

    સખત રડવાનાં અવાજ સાથે આંખ ખુલી.અરે! આ તો મારો જ રડવા નો અવાજ...

  • ફરે તે ફરફરે - 66

    ફરે તે ફરફરે - ૬૬   માનિટ્યુ સ્પ્રીગ આમતો અલમોસામાં જ ગ...

Categories
Share

नवा अध्याय - 7

पुढे अतुल बोलू लागला . मी आई लहानपनापासून बघतोय ग , ती सगळ्यांसाठी किती करते .बाबाच आणि तीच लग्न झाल , तेव्हा बाबाकडे नोकरी सुध्दा नव्हती . त्यावेळी बाबा ड्राइवर म्हणून नोकरी करत , घरात खाणारी अनेक माणसे आत्या , काका ह्याच शिक्षण , आजी आजोबाच दुखणे . अश्या तुटपुंज्या गोष्टीवर तिने संसार सुरू केला . बाबा खूप हुशार होते .त्याना शिक्षणाची फार आवड होती . पण पैशाअभावी त्याना फार काही शिकता नाही आले . पण आमची आई मात्र जिद्दी तिने बाबांना शिक्षण घ्यायला भाग पडले . बाबा सकाळी ड्राइवरचे काम करत आणि रात्री रात्रशाळेत जाऊन पुढच शिक्षण घेत .
आमच्या आईच शिक्षण पुरेस झाल नव्हते.त्यामुळे ईतर कोठेही काम तिला मिळणच शक्य नव्हत . पण तिने हार न मानता डबे चालू केल. त्यात आत्या , काकाच शिक्षण.आत्या च लग्न , बाबाच शिक्षण .घरात काय हव नको ते पाहणे .
मग दादा झाला . आणि घरात सुखाचे दिवस आले . बाबाना एक चांगल्या पगाराची नोकरी मिळाली . एक सुंदर घर घेतल . मग मी झालो . घरात आनंदी आनंद झाला .मग बाबाना आई च डब्बे करन शुल्क वाटू लागल . मग काय बाबांना वरचे वरचे हूद्दे मिळू लागले . मग बाबांचे बसने उठणे मोठ्या लोकांसोबत झाले . आईच्या अडाणी पणाची त्याना लाज वाटू लागली . पुढे आजी आजोबा ही वारले . आणि आह्मी मुल ही मोठी झालो . आई मात्र एकटी पडली .
आपल्याला काहीच जमत नाही , हा तिचा समज होऊ लागला .मग हळू हळू तिने घराच्या निर्णयात भाग घेणे सुध्दा सोडून दिले . खरतर आह्मीच तिला तस करायला भाग पडल . थोड्या दिवसानी दादाच लग्न झाल . वाहिनी शिकलेली आणि नोकरी करणारी मिळाली म्हणून आनंद ही झाला . पण घरात आल्यावर तीच लक्ष नोकरी बरोबर घरात ही असेल अस अह्माला वाटल पण तस नाही नोकरी बरोबर तीच लक्ष पार्ट्या असू लागल .
रात्री रात्री ती बाहेर राहू लागली . ह्या मुळे दादाच्यात आणि तिच्यात वाद होऊ लागले . त्या दोघन मधले वाद टाळण्यासाठी आई ने घराची आणि मुलाची जबाबदारी स्वतःवर घेतली . आणि अह्म्च सर्वानच बघून तीही आई शी वाटल तस बोलू लागली . पण आमच्या पैकी तिला कोनी ही काहीही बोलत नव्हते .पण ह्या घरात तू आलीस .आणि आईच्या वागण्यात ही बदल जाणवू लागला .ती आनंदी दिसू लागली . तिच्या मधे एक वेगळाच आत्मविश्वास जाणवू लागला . आईला तू घरकामात आणि मुल सांभाळ करण्यात मदत करू लागली .त्यामुळे आईला ही थोडा वेळ मिळू लागला . आणि तिचे डबा चाल्व्नायाचे काम ही चालू झाले .
काल रात्री वाहिनी पार्ट्यावरून उशिरा आली .दादा तिची वाट बघत होता . आईही तेथे आली . तिने वाहिनीला बडबड केली .आणि मी उद्या पासून मुले सांभाळनार नाही अस सांगितलय . तसेच दादांच्या आणि तिच्या जेवणाची सोय तिने करावी अस ही सांगितलय .
आई च ते रूप पाहून तर दादा आणि वाहिनी दोघे ही घाबरले . पण आईच ते रौद्र रूप पाहून दोघांची ही हिंमत नाही झाली .तिला काय बोलण्याची .
बाबरे ......एवढ सगळ झाल ..मला तर माहीतच नव्हते . ईतका वेळ शांततेत ऐकत बसलेली मीना आता बोलती झाली . ' ' अरे घरचे आईशी जसे वागत होते .ते मला बिलकुल पसंद नव्हते ' ' . त्या चुकीच्या वागत होत्या .ह्या वयात ही त्या घरातील सगळ एकटीने करत होत्या . नातवंडे सांभाळत होत्या .आणि त्या बदल्यात त्याना ही वागणूक मिळत होती .