Pithori Amavasya in Marathi Mythological Stories by Vrishali Gotkhindikar books and stories PDF | पिठोरी अमावास्या

Featured Books
Categories
Share

पिठोरी अमावास्या

पिठोरी अमावस्या!

श्रावण अमावास्येला पिठोरी अमावास्या म्हणतात.
ज्यांची मुले जगत नाहीत, अशा स्त्रिया पिठोरीचे व्रत करतात.
हे व्रत पूजाप्रधान असून, चौसष्ट योगिनी या त्याच्या देवता आहेत.
हे व्रत करताना
श्रावण अमावास्येच्या दिवशी दिवसभर उपोषण करावे.
सायंकाळी स्नान करून आठ कलश स्थापावे.
त्यावर पूर्णपात्रे ठेवून त्यांत ब्राह्मी, माहेश्वरी, इ. शक्तींच्या मूर्ती स्थापाव्या.
तांदुळाच्या राशीवर चौसष्ट सुपार्या मांडून त्यावर चौसष्ट योगिनीचे आवाहन करावे.
त्यांची षोडशोपचारे पूजा करावी.
नंतर व्रतासाठी केलेले पक्वान्न डोक्यावर घेऊन ‘कोणी अतिथी आहे काय? असा प्रश्न विचारावा. मुलांनी ‘मी आहे’ असे म्हणून ते पक्वान्न मागच्या बाजूने काढून घ्यावे.

पूर्वी पूजेच्या मूर्ती पिठाच्या करीत. अलिकडे त्यांची छापील चित्रे मिळतात.
या व्रतात नैवेद्यासाठी पिठाचेच सर्व पदार्थ करतात. त्यावरून या तिथीला पिठोरी अमावास्या असे नाव पडले असावे.

पूर्वी घराघरात ‘पिठोरी’ची पूजा होत असे. पिठोरी अमावस्येचंच दुसरं नाव मातृ दिन.
वंशवृद्धीसाठी ही पूजा केली जाते.

बेदाणे घातलेली भाताची खीर हा ‘पिठोरी’चा खास नैवेद्य.
या सणामागची पौराणिक कथा अशी आहे की विदेहा नावाच्या स्त्रीला दर श्रावण अमावास्येला मुले होत व ती लगेच मृत्युमुखी पडत.
तुझी मुले जगत नाहीत तु इथे राहू नकोस
असे म्हणून पतीने तिला घराबाहेर हाकलून दिले.
तेव्हा तिने देवाची कठोर तपश्चर्या केली.
या तपश्चर्येनंतर चौसष्ट देवतांनी तिला दर्शन दिले.
व तिला दीर्घायुषी मुले होतील असा आशीर्वाद दिला .
पुढे ती पुन्हा घरी आली.
विदेहावर प्रसन्न झालेल्या देवतांच्या कृपेमुळे तिला दीर्घायुषी असे आठ पुत्र झाले.
अशा प्रकारे संतति रक्षणासाठी चौसष्ट देवतांच्या पूजनाबरोबरच स्त्रीला स्वत…च्या सामर्थ्याची व मर्यादाशीलतेची जाणीव पिठेरी अमावास्या करून देते.म्हणून ही अमावास्या महत्वाची आहे.

या दिवशी मुलाबाळांच्या वंशवृद्धीकरिता पूजा करतात.या दिवशी सवाष्ण जेवावयास घालतात.
पुरणावरणाचा महानैवेद्य दाखवतात.
माता,जननी,मातृभूमी आणि मातृभूमीतून धान्य उगवून देणाऱ्या बैलाचीही पूजा होते.
या दिवशी बैलांना विश्रांती दिली जाते .
त्यांना ऊन पाण्याने आंघोळ घालतत.
त्यांची शिंगे रंगवून त्यांना बाशिंगे बांधली जातात .
नव्या रेशमी झुली चढवल्या जातात .
पुरणावरणाचा स्वयंपाक करून आधी त्याचे तोंड गोड करतत .
असाही बैलपोळ्याचा थाट उडवून देतात. बैलाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अनेक गावात शेतकरी बैलपोळा साजरा करतात.

तरी अशी ही पिठोरी अमावस्या. मातृदिन,पोळा आणि बाल गोपाळांच्या पूजेची कहाणी
या व्रतात नैवेद्यासाठी पिठाचेच सर्व पदार्थ करावे. बेदाणे घातलेली भाताची खीर हा 'पिठोरी'चा खास नैवेद्य.पूजा करुन झाल्यावर पु्रणाची आरती करतात, खिरीच्या वाटीवर पुरी झाकतात नंतर पूजा करणारी स्त्री ते आपल्या खांद्यावरुन मागे नेत विचारते, "आतीत कोण?" ( अतिथी कोण?) तेव्हा घरातील मुले आपले नाव सांगुन तो नैवेद्य हातातुन घेतात. अशा प्रकारे पूजा पूर्ण करतात.

स्त्रीला सौभाग्य व तिच्या मुलांना दीर्घायुष्य, आरोग्य देणारी ही अमावस्या आहे.

ज्याप्रमाणे आपली आई आपल्याला घडवते, जगात उभं राहण्यासाठी सक्षम करते. या चौसष्ट कला ज्यांमुळे उपजिवीका होते त्यांची पूजा आपली आई करते. तेपण आपल्याच दीर्घायुष्य व आरोग्यासाठी.
पिठोरी अमावस्या व्रताचं महत्त्व आणि त्याबद्दल माहिती सर्वात आधी देवी पार्वती यांनी सांगितले होती. त्यांनी स्वर्गलोकाचे देव राजा इंद्र यांच्या पत्नीला याबद्दल माहिती दिली होती. देवी पार्वतीने सांगितले होते की हे व्रत केल्याने मुलांच्या जीवनात सुख-समृद्धी राहते. त्यांना शौर्य प्राप्त होतं.

या दिवशी सप्तमातृका पूजा देखील केली जाते. शिव आणि शक्ती यांच्याद्वारे उत्पन्न सात दिव्य माता ज्यांची नावे ब्राह्मणी, वैष्णवी, महेश्वरी, कुमारी, वाराही, इंद्राणी, चामुंडी अशी आहेत त्यांची पूजा केली जाते.
नंतर शिवाद्वारे शक्ती योगेश्वरी उत्पन्न झाली. या देवीला आठवे स्थान प्राप्त झाले. म्हणून पिठोरी अमावास्येला चौसष्ठ योगिनी आणि सप्तमातृकेची पूजा केली जाते.

पिठोरी अमावस्या व्रत केल्याने मुलं स्वस्थ, बुद्धिमान आणि शौर्यवान बनतात असा विश्वास आहे .
समाप्त