Makar sankrant - 2 in Marathi Mythological Stories by Vrishali Gotkhindikar books and stories PDF | मकर संक्रांत भाग २

Featured Books
Categories
Share

मकर संक्रांत भाग २

मकर संक्रांत भाग २

संक्रांतीच्या दिवशी दान व महत्व:-

या दिवशी दान देण्याला विशेष महत्त्व आहे.

मकर संक्रांतीच्या दिवशी जी माणसं दान देतात त्या-त्या वस्तू सूर्य त्यांना प्रत्येक जन्मात देत असतो.

आधुनिक कालात दान देण्याच्या गोष्टींच्या यादीमध्ये विद्यादान, श्रमदान, रक्तदान, वस्त्रदान, अन्नदान, नेत्रदान याही गोष्टींचा समावेश व्हावयास हवा. यादिवशी घरातील आणि गावच्या मंदिरातील देवाला तिळ-तांदुळ वाहतात.

आपली संस्कृती ही कृषी संस्कृती आहे. या दिवसांमध्ये शेतांत आणि मळ्यांमध्ये आलेल्या धान्याचे वाण एकमेकांना स्त्रिया देतात.
हरभरे, ऊस, बोरे, गव्हाची ओंबी, तीळ अशा गोष्टी सुगडात भरून त्या देवाला अर्पण करतात.सुगडात गहू, उसाचे तुकडे, हळकुंडे, कापूर, बोरं, दव्य इत्यादी वस्तू घालून ते दान देण्याची प्रथा आहे.

पंढरपुरच्या रूक्मिणीला देखील सवाष्ण स्त्रिया आजच्यादिवशी हे वाण देण्याकरता गर्दी करतांना दिसुन येतात.

या दिवशी यात्रेकरू आणि पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे महत्वाचे आहे, तसेच तीळ, गुळ, खिचडी, फळे यांचे दान देणे महत्वाचे आहे .

असे मानले जाते की या दिवशी दान केलेल्या देणगीमुळे सूर्य देव आनंदित झाला आहे. या सर्व समजुती व्यतिरिक्त मकरसंक्रित उत्सवही उत्साही आहे. या दिवशी पतंग उडवण्याला देखील विशेष महत्त्व आहे आणि लोक मोठमोठ्या आनंदाने व आनंदाने पतंग काढतात. या दिवशी अनेक ठिकाणी पतंग उडवण्याचे कार्यक्रम आयोजित केले जातात.

मकरसंक्रांतीच्याच दिवशी गंगा नदीचे आगमन पृथ्वीवर झाले होते अशी आख्यायिका आहे.

महाभारतामध्ये पुरु वंशाचे संरक्षक भीष्म पितामह हे बाणांच्या शय्येवर (शरपंजरी ) उत्तरायणाची वाट पहात पडून होते. त्यांना इच्छामरणाचे वरदान होते.

उत्तरायण सुरू झाल्यावरच आपल्या देहाचा स्वेच्छेने त्याग केला होता.

दक्षिणायनमध्ये जर आपल्या देहाचा आपण त्याग केला तर आपल्याला गती मिळणार नाही अशी भीष्मांची आस्था होती. त्यामुळेच त्यांनी उत्तरायण हा काळ निवडला होता.

उत्तरायणाचे सहा महिने हे शुभ असतात असे भगवद्-गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी देखील म्हटले आहे.

मकर संक्रांतीला ज्याप्रमाणे अध्यात्मिक महत्त्व आहे त्याचप्रमाणे शास्त्रीय महत्त्वही आहे. या दिवसात आधी रात्र मोठी असते आणि दिवस लहान असतो.

मकर संक्रांतीच्या दिवशी रात्र आणि दिवस समान असतात. या नंतर रात्री लहान दिवस मोठा होत जातो. मकर संक्रांत हा पौष महिन्यातील महत्त्वाचा सण, दरवर्षी प्रमाणे जानेवारी महिन्यात दिनांक 14 ला भोगी, १५ ला मकर संक्रांति, 16ला किंक्रांत हे मंगलमय सण येतात .

जानेवारी महिना चालू झाला की नवीन वर्षाची सुरवात होते. नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत आहे.
तामिळनाडू मध्ये हा पोंगल म्हणून ओळखला जातो, महाराष्ट्रात मकर संक्रांत म्हणून, पंजाबमध्ये लोहरी म्हणून प्रसिद्ध आहे.
गुजरात मध्ये मकर संक्रांतीला पतंग उडवण्याची पारंपारिक पद्धत आहे.
सूर्याच्या मकर संक्रमणावर आधारलेला भारतातला एक सण.
वर्षभरात बारा राशीतुन सूर्याची चार संक्रमणे होत असली तरी हिंदुच्या दृष्टीने मकरसंक्रमणाला म्हणजे संक्रांतीला अधिक महत्त्व आहे. या दिवशी सुर्य मकर राशीत प्रवेश करतो या संक्रमणापासुन सूर्याला उत्तरायणाला प्रारंभ होतो आणि उत्तर गोलार्धात राहणाऱ्या हिंदुस्थानवासीयांना उत्तरायणामध्ये अधिक प्रकाश व उष्णता याचा लाभ होतो.
मकर संक्रांत भारताच्या विविध राज्यात विविध नावाने आणि विविध पद्धतीने साजरी केली जाते जसे

मकरसंक्रात – महाराष्ट्र

पोंगल – तामिलनाडु

उत्तरायण -गुजरात व राजस्थान

लोहढी – पंजाब

माघमेला – ओडिसा

भोगाली बिहु – आसाम संक्रांती

संक्रांति -कर्नाटक, केरळ, आंध्रप्रदेश, बिहार

अशी विविध नावं या सणाला आहेत.

प्रत्येक धर्म आपापल्या प्रथांप्रमाणे हा दिवस साजरा करत असले तरी देखील आनंद, उत्साह, जल्लोष हा सगळीकडे असतोच असतो.
कोणताही सण आपल्याला आनंद, उत्साह, नवचैतन्य, देण्याकरताच येत असतो.

रोजच्या दैनंदिन आयुष्यातल्या घडामोडींपासुन चार क्षण निवांत काढुन आपण देखील सणाचा अंगिकारतो व त्यात रममाण होतो.

या वेळेस सर्व आप्तेष्टांच्या भेटीगाठी होतात आणि या सण उत्सवापासुन मिळालेली उर्जा पुढे कित्येक दिवस आपल्याला रोजच्या दिनक्रमात जगण्याकरता उपयोगाला येते! आणि म्हणुन आपण प्रत्येक सण उत्साहाने जगावयास हवा.

क्रमशः