Mitra my friend - 6 in Marathi Love Stories by Vinit Rajaram Dhanawade books and stories PDF | मित्र my friend - भाग ६

Featured Books
Categories
Share

मित्र my friend - भाग ६

संदीपचं घर आणि कपड्यांचे दुकान शेजारी -शेजारी होते.

" तू मघाशी फोन लावला तर कोणी उचलला ? " प्रियाने विचारलं.

" कोणीतरी सँडी बोलत होता.. मी लगेच ठेवून दिला फोन.. ",

"अरे.. बाळा... सँडी म्हणजे संदीप... तुला माहीत नाही का.. "

प्रिया जोरात हसली. आता यात काय हसायचं एवढं... विवेकने दुरूनच बघितलं.. दुकान मोठ्ठ होतं ,शिवाय आजूबाजूला खूप सुधारणा झाली होती. ४ वर्षात खूप काही बदललं इथे.. विवेक आजूबाजूला बघत चालला होता.. इतक्यात त्याला " Wow !!! " अशी मोठयाने किंकाळी ऐकू आली. दचकला विवेक. समोर संदीप उभा... त्याच्या बाजूला प्रिया... नक्की कोणाला बघून ओरडला हा... असा विचार करत त्याच्या समोर आला विवेक..

" look at this... that is that what is about you !! " असं 'इंग्रजी' म्हणता येईल ,अश्या भाषेत संदीप ,विवेक कडे पाहत म्हणाला.

" काय ?????? काय बोललास परत बोल.. ",

" हा.. ते नको बोलूस... मी एकदाच इंग्लिश मध्ये बोलतो.. समाजलाव काय ? " ,संदीप मिस्कील आवाजात म्हणाला.

" तुला तरी कळते का... काय बोलतोस ते..." विवेक रागात बोलला.

" हे... काय भांडत आहात.. एवढ्या वर्षांनी भेटत आहेत... धड नीट स्वागत तरी करा एकमेकांचे... " प्रियाला वेड लागलं आहे बहुदा... मी आलो कि संदीप आला... तो स्वागत करणार माझं.. पागल आहेत दोघे पण ...

" माझं स्वागत वगैरे राहू दे. मला काही नको... ते जाऊ दे.. तू कशी आहेस ... गेल्या वर्षभरात आलीच नाहीस इथे... आणि हे साहेब कधी आले मुंबईहुन.... " विवेककडे पाहत संदीप प्रियाशी संवाद करत होता.

" सगळं सांगते... पहिलं जरा पाणी दे... खूप तहान लागली आहे... ",

" तहान लागली.... आता कसली तहान लागते... तहान आमच्यावेळेला लागायची. "

संदिप बोलला ,तसे प्रिया आणि संदीप दोघेही हसू लागले. आणि दुकानात शिरले. झालं याचं सुरु... आमच्यावेळेला... आमच्यावेळेला... जसा काय म्हातारा झाला हा... म्हणून येत नव्हतो... किती बडबड करतो, मनात बोलत विवेक दुकानात शिरला. प्रिया आधीच दुकानात फतकल मारून बसली होती. दुकान बऱ्यापैकी मोठ्ठ होतं. विवेक त्या आधी कधीच संदीपच्या दुकानात आला नव्हता.

"या साहेब.. बसा... " दुकान न्याहाळत असताना, विवेकला बसायला सांगितले. विवेक बसला.

" चहा घेणार ना... लगेच सांगतो... ये पोऱ्या... दोन चाय घेऊन ये पटकन... " संदीपने ऑर्डर दिली.

" पाणी दे फक्त... चहा नको... " विवेक बोलला.

" अरे विकत आणणार नाही... बाजूलाच घर आहे माझं.. तिथून आणायला सांगितलं... बाकी, काय काम काढलं इकडे... " प्रियाकडे मोर्चा वळवला.

" हो.. हो, केशव आलेला का इथे... ",

" केशव ? ... का गं .. ",

"आलेला का ते सांग... " विवेक मधेच बोलला.

" हो ... आलेला... बहुदा २ महिन्यापूर्वी... घाईत होता जरा... का पण.. त्यानंतर तो आलेलाच नाही... " प्रिया घाबरून गेली. संदीपने ओळखलं. " त्याच्या घरी जाऊन येना मग... ",

" जाऊन आलो तिथून... घराला टाळे... शेजारी कोणाला माहित नाही... " विवेकने एका दमात बोलून टाकलं.

" तो तुला शेवटचं भेटला तेव्हा काही बोलला का... " विवेकचा पुढचा प्रश्न... संदीप काही बोलणार इतक्यात, एक मुलगा पाणी घेऊन आला. पाण्याचा एक घोट घेतोच... तर माघून चहा आला... चहा घेऊन येणारी मुलगी बघून विवेकला जोराचा ठसका लागला. ती दुसरी -तिसरी कोणी नसून , विवेकची लहान बहीण होती. विवेकला बघून तीही चाट पडली. " दादा !! " ,"अनघा !! " दोघे एकमेकांना बघून चकित झाले.

" पहिला तो चहा घ्या... नंतर काय ते dialogue बोला... समाजलाव काय !! " संदीपचे ते बोलणे ऐकून दोघे रागाने त्याच्याकडे बघू लागले.

" दादा ... तू कधी आलास इथे.. सांगितलं पण नाहीस येतो आहेस ते... " अनघा आनंदात बोलली.

" ते मरु दे... तू काय करतेस इथे... " विवेक..

" जॉबला आहे मी इथे... तुला फोनवर तर बोलली होती ना... ",

" काय !! ...चहा वाटायचा जॉब आहे का... " विवेक रागामध्ये बोलला.

" excuse me... she have.. accountant...... in the shop is the " संदीप "इंग्लिश "मध्ये बोलला. विवेकच्या चेहऱ्यावर मोठ्ठ प्रश्नचिन्ह..

" मग याच्या घरी चहा पण करतेस का.. ? ",

" थांब दादा... बस खाली... मी पाणी पियाला गेले होते.. यांच्या घरी... तर चहा घेऊन यायला सांगितलं होता या मुलाला... पाहुणे, ओळखीचा असेल म्हणून संदीपच्या आई येत होत्या, मीच बोलले ... मी घेऊन जाते चहा... म्हणून .. "

विवेक कधीपासून संदीपकडे संशयाने बघत होता. काय चाललंय नक्की... अनघा तर बोलली नाही कधी...कि संदीप कडे जॉबला आहे ते... कशासाठी आलो गावात... आणि काय भलतंच दिसते आहे... अचानक त्याला केशवची आठवण झाली... केशव बद्दल काही विचारणार , तर बहिणीची माया पुन्हा जागृत झाली.

" चल... ना दादा.. घरी जाऊया... आईला किती आनंद होईल... ",

" नको... मी एका वेगळ्या कामासाठी आलो... ते झालं कि लगेच निघणार... ",

" अरे.. असा काय करतोस... ४ वर्षांनी आलास... आणि न भेटताच परत चाललास... ते काही नाही... तुला यावंच लागेल... " अनघा लाडात म्हणाली.

" अगं... कामं आहेत मुंबईला... थांबून चालणार नाही.. " विवेक...

" आता कसली कामं... कामं आमच्यावेळेला असायची... " संदीप मधेच बोलला.

" जा ना.. जाऊन ये विवेक... आपल्याला खूप काम आहेत इथे पण.. " प्रियाने विवेकला डोळा मारला. विवेकने एकदा प्रियाकडे पाहिलं. अनघाकडे बघितलं. मग संदीपकडे...

" प्रिया जरा बाहेर ये... बोलायचं आहे.. " विवेक दुकानातून बाहेर आला... मागोमाग प्रिया..

" काय रे .... ",

" हे बघ प्रिया... आपण कोणत्या कामासाठी आलो आहोत हे तुला माहीतच आहे.... संदीपला काय विचारायचे आहे ते विचारून घे... केशव इथे नाही हे स्पष्ट झाले आहे... आणि मी जर आता घरी गेलो तर तिथून लवकर सुटका होणार नाही माझी.. ",

" मग पुढे काय ? " ,

" पुढे ? ... पुढे काय म्हणजे... मी तुला आधीच सांगितलं होतं.. साताऱ्याला सोडलं कि मी परत मुंबईला येणार म्हणून... आज रात्रीचं निघणार मी... जमलं तर संध्याकाळी सुद्धा निघीन.. ",

" ये ... हॅलो.. केशव जोपर्यंत सापडत नाही, तोपर्यंत तुला माझ्या सोबत राहावं लागेल.. ",

" काय जबरदस्ती आहे हि.. ",

" हो... आहेच जबरदस्ती... तू तुझा घरी जाऊन ये... मी थांबते इथे... " विवेक काय बोलणारं यावर.. चुपचाप त्याच्या बहिणीसोबत घरी निघाला.

=========== क्रमश : ================