Naa kavle kadhi - 2 - 28 in Marathi Fiction Stories by Neha Dhole books and stories PDF | ना कळले कधी Season 2 - Part 28

Featured Books
  • નારદ પુરાણ - ભાગ 61

    સનત્કુમાર બોલ્યા, “પ્રણવ (ૐ), હૃદય (નમ: ) વિષ્ણુ શબ્દ તથા સુ...

  • લગ્ન ને હું!

    'મમ્મી હું કોઈની સાથે પણ લગ્ન કરવાના મૂડમાં નથી, મેં નક્...

  • સોલમેટસ - 10

    આરવને પોલીસ સ્ટેશન જવા માટે ફોન આવે છે. બધા વિચારો ખંખેરી અન...

  • It's a Boy

    સખત રડવાનાં અવાજ સાથે આંખ ખુલી.અરે! આ તો મારો જ રડવા નો અવાજ...

  • ફરે તે ફરફરે - 66

    ફરે તે ફરફરે - ૬૬   માનિટ્યુ સ્પ્રીગ આમતો અલમોસામાં જ ગ...

Categories
Share

ना कळले कधी Season 2 - Part 28

सकाळी ऑफिस मध्ये मिटींग चालू होती आणि सिद्धांत जसे जसे एकेका टीम मेंबर चे नाव घेत होता तस तस आर्यच टेन्शन वाढत होत. शेवटी त्याने एक पॉज घेतला आणि म्हणाला.
'so team, ज्यांची मी आता नावे announce केली ती उद्या आपल्याला निघायचं आहे अँड हा प्रोजेक्ट आपल्या साठी खुप महत्वाचा आहे. आणि जे इथे आहेत त्यांना मी कॉल वरून instruct करत राहील.'
आणि त्याने मीटिंग संपवली.त्याने एकदाही आर्या कडे पाहिलं नाही. आर्या ला तर सिद्धांत चा खूप राग येत होता आणि एकीकडून आनंद ही होत होता. कारण ह्याच प्रोजेक्ट नंतर सिद्धांत च पुन्हा प्रमोशन होत. पण आता announce झालेल्या नावांमध्ये तीच नाव नव्हतं. तिचा चेहरा पडला होता.
"आर्या थांब"सिद्धांत च्या आवाजाने ती तिथेच थांबली.

'काय झालं'? ohhh sorry congratulations Siddhnat sir!!

हे बघ आर्या अस sarcastic बोलू नको मी मुद्दामून नाही केलं अस काही.

मी काही बोलले its ok ती म्हणाली.

हे बघ आर्या, तू काही बोलली नसली तरी तुझा चेहरा सांगतोय की तूला वाईट वाटतय i can understand!

you don't siddhant, तुला नाही कळणार मी खरच खूप मेहनत घेतली होती ह्या प्रोजेक्ट साठी.आणि मला आज कळतंय की जी टीम बेंगलोर ला जातीये त्यात मी नाहीच आहे.काय वाटत असेल मला.

i know, आर्या की तू खुप मेहनत घेतली होती. तुला वाटत का की मी तुझं नाव recommend नसेल केलं पण लिस्ट फायनल मी नाही केली. ज्यांनी केली त्यांची 2 yrs experience ही basic requirement होती. आणि मग मी नाही काही बोलू शकलो. आणि हेच सत्य आहे.आणि तो थांबला.

ठीक आहे! ती म्हणाली.

आर्या हे बघ तू अशी उदास नको होऊ बर अस चालतच असत इथे मला पण वाईट वाटतय पण ठीक आहे पुढे अजून बऱ्याच संधी येणार आहेत. तू नवीन आहेस ही स्टेज एन्जॉय कर ! आणि काय ग तुला माझं प्रमोशन होणार ह्याच आनंद नाही होत आहे?

होतोय ना ! पण......

पण काय????.....

तू दहा दिवसांसाठी चाललाय...... ती आणखीन उदास होऊन म्हणाली.

अरे हो, तू तर आनंदी व्हायला पाहिजे दहा दिवस मी तुला दिसणार ही नाही ना ऑफिस मध्ये, ना घरी, मस्त मजा आहे बाबा तुझी तर......तो तिला चिडवत म्हणाला.

सिद्धांत i m serious ! आणि तुला हे सुचतंय.कशी राहू मी?? ती रागात येऊन म्हणाली.

का भीती वाटते का तुला एकटीला?

नाही रे जाऊदे तुला नाही कळणार......

ओहहह, if I am not wrong तुला प्रश्न पडला असेल ना की मी भांडण कुणासोबत करणार? तो मुद्दामून तिला चिडवत होता.

सिद्धांत.... काहीही काय! मी भांडते का तुझ्याशी.

look who is talking तो हसून म्हणाला.नेहमीच काहीतरी कारण हवं असत तुला! म्हणून तर तुला प्रश्न पडलाय दहा दिवसांचा! don't worry आर्या आयुष इथेच आहे तुझे दिवस वाया नाही जाणार. तू भांडु शकते त्याच्या सोबत.

Thank you Siddhant for your suggestion! झालं तुझं जाऊ मी ती थोडं रागानेच म्हणाली. आणि ती त्याच पुढचं काहीही न ऐकता निघालाही.

आर्या थांब..... तो म्हणाला पण तो पर्यंत ती निघालीही होती.

कठीण आहे आर्या च ! तिलाच काय मलाही प्रश्न पडलाय की माझे ही दहा दिवस कसे जातील. पण तिला कुठे कळाल ! खरच कठीण झालय आता! आणि तो त्याच्या कामाला लागला.

सिद्धांत ने घरी आल्या आल्या पॅकिंग करायला सुरुवात केली.

किती घाई झाली आहे ना तुला जाण्याची?आर्या ने त्याला विचारल.

आर्या अस काय करतीये, उद्या सकाळीच निघायचं आहे मग कुठे वेळ आहे.

ठीक आहे काही मदत लागली तर सांग. आर्या त्याला म्हणाली.

काय करु आर्याच, अजूनही मूड ऑफ च आहे तिचा कस समजावून सांगू तिला?

तो सगळं आवरून खाली गेला आर्या पुस्तक घेऊन बसली होती. तिचा मूड अजूनही ऑफ च होता.

आर्या ऐक ना!

बोल काय म्हणतोय,

मी नाही जाणार बेंगलोर ला.

का काय झालं? वेडा झाला का तु?

नाही, मी खरच म्हणतोय.

अरे पण का? तुला काही त्रास होतोय का? बरं नाही वाटत आहे का?काय झालं असं अचानक.

मला काहीही नाही झालं i am all right. पण तू ठीक नाही आहे मग मी नाही जाणार.

सिद्धांत मला काहीच नाही झालं, मी ठीक आहे.

हो मी सकाळ पासून बघतोय तुझा चेहरा.मग मी कसा जाणार सांग.

सिद्धांत, अरे ......ते .... ती पुढे काहीच बोलू शकली नाही.

काय झालं आर्या......???

काही नाही..... पण तू जाणार तू जर माझ्यामुळे गेला नाही न तर बघ ह......

तुझा मूड जर असाच राहणार असेल तर मी नाही जाणार and it's final! आणि आर्या मला काही फार चांगलं वाटतय का अस तुला एकटीला सोडून जायला पण काय करणार आणि तू जर ह्या मध्ये खुश नसेल तर मी नाही जाणार.

सिद्धांत मला फक्त पुढचे दहा दिवस कसे जातील ह्याचाच प्रश्न पडला,मी नाही राहू शकत रे तुझ्याशिवाय. पण तू जर माझ्या साठी ईथे थांबला तर मला ते ही नाही आवडणार. आपलं प्रेम कस आहे माहिती आहे का सिद्धांत बांधून ठेवत नाही आणि सोडूनही जावं वाटत नाही.तू जा मी राहील. ती हसून म्हणाली.

खरच ?

हो खरच, जा तू.

तो ही आर्याचा चेहरा पाहून आनंदी झाला.

आर्याला लगेच झोप लागली. सिद्धांत अजूनही काही राहील का ह्याचाच विचार करत होता. मग त्याच्या लक्षात आलं की त्याला प्रवासामध्ये वाचण्यासाठी काही बुक्स घ्यायचे होते. तो स्टडी रूम मध्ये आला तिथे आर्याची लायब्ररी होती. कुठलं पुस्तक घेऊ. तो विचार करत होता. त्याने टेबल वरचेच 2-3 पुस्तके उचलली. आर्या वाचत असणार हे जाऊ दे तिच्या लागेल तितके आहेत घेईल दुसरं वाचायला अस म्हणून त्याने ते बुक्स त्याच्या बॅग मध्ये टाकले. आणि तो ही झोपी गेला.
सकाळी सकाळी सिद्धांत उठला त्याला लवकर निघायचं होत आर्यालाही त्याची चाहूल लागली आणि तिला जाग आली.

आवरलं??? तिने विचारल

हो निघायच आहे आता. कॅबच बुक करतो आहे.

सिद्धांत कॅब नको बुक करू मी येते, तुला सोडायला.

नको ग तू कशाला येतेस तू कर आराम मी जातो.

सिद्धांत प्लीज नाही नको ना म्हणू!

तिचा चेहरा पाहून त्याला ही नाही म्हणावं वाटलं नाही. आणि तो तिला चल म्हणाला.

बघ नीट ड्राईव्ह करशील ना ! येताना नीट ये, त्याच्या तिला जाताना सूचना देणं चालूच होत.

हो रे येते मला गाडी चालवता अस काय करतोय मी काही first time drive करतीये का?

नाही ग, पण एरवी मी सोबत असतो न! तो म्हणाला.

आर्याचा चेहरा पुन्हा पडला.

तिचा ती चेहरा पाहून तो तिला म्हणाला,आर्या काल काय म्हणाली विसरली का?

नाही रे! आहे लक्षात ती हसून म्हणाली.

ते एअरपोर्ट वर पोहचले. दोघांनाही आता एकमेकांना सोडून जावं वाटत नव्हतं.आर्याने त्याला घट्ट मिठी मारली.

सिद्धांत येशील ना लवकर!

हो आधी जाऊ तर दे!

त्याची announcement झाली. आर्या आता निघायला हवं तू पण जा तो तिला समजावत म्हणाला.

जायचंच का? ती म्हणाली.

हो तू जा आधी अजून थोडा वेळ थांबलीस तर कठीण होईल माझ्यासाठी. तो तिला म्हणाला.

bye take care miss youuu!! अस म्हणून तिने त्याचा निरोप घेतला.

ती दिसेनाशी होईपर्यंत ती बघतच राहिला. आणि मग तो ही पुढच्या प्रवासाला निघाला.
क्रमशः
©Neha R Dhole