Naa kavle kadhi - 2 - 18 in Marathi Fiction Stories by Neha Dhole books and stories PDF | ना कळले कधी Season 2 - Part 18

Featured Books
  • નારદ પુરાણ - ભાગ 61

    સનત્કુમાર બોલ્યા, “પ્રણવ (ૐ), હૃદય (નમ: ) વિષ્ણુ શબ્દ તથા સુ...

  • લગ્ન ને હું!

    'મમ્મી હું કોઈની સાથે પણ લગ્ન કરવાના મૂડમાં નથી, મેં નક્...

  • સોલમેટસ - 10

    આરવને પોલીસ સ્ટેશન જવા માટે ફોન આવે છે. બધા વિચારો ખંખેરી અન...

  • It's a Boy

    સખત રડવાનાં અવાજ સાથે આંખ ખુલી.અરે! આ તો મારો જ રડવા નો અવાજ...

  • ફરે તે ફરફરે - 66

    ફરે તે ફરફરે - ૬૬   માનિટ્યુ સ્પ્રીગ આમતો અલમોસામાં જ ગ...

Categories
Share

ना कळले कधी Season 2 - Part 18

आर्या उठ हा लवकर, माझ आवरल्यावर मी निघून जाणार आहे ऑफिस ला मग तू बघ तुझ तो तिला म्हणाला. काय यार सकाळी सकाळी काय किरकिर लावली ह्याने सकाळी उठल्या पासून धमक्या च देतो मला. ती झोपेतच म्हणाली. मी अजून इथेच आहे ऐकू येतय बर मला विचार करून बोल.तो म्हणाला. ती ताडकन उठून बसली, आता डोळ्यावरची झोपच उडाली तिच्या, काय होतंय माझं अस जे नसत बोलायचं तेच नेमक ह्याच्या समोर निघून जात. अश्यानी हा मला नक्की एक दिवस घराच्या बाहेर हाकलून देणार! बर झालं हा काही react नाही करत आहे नाहीतर माझ काही खर नव्हतं पण सिद्धांत च काहीही सांगता येत नाही त्याचा मूड केव्हा बिघडेल आणि केव्हा तो चिडेल. नाही ह्या नंतर नाही, मी आता काही बोलणार च नाही चांगल ही नाही आणि वाईटही नाही हा म्हणजे प्रश्नच मिटला. हो आजपासून फक्त जितक्याला तितकंच बोलायच. 'अग आर्या, काय झाल सकाळी सकाळी एवढा कुठला सिरीयस विचार करत आहेस?'नाही काही नाही. कॉफी घेणार? त्याने विचारले. 'नाही नको मला चहा लागतो' ती म्हणाली. येतो का तुला करता ? त्याने खोचक पणे विचारले. तू टोमणा मारतोय ना मला? आर्या म्हणाली. नाही ग मी काळजीपोटी विचारल म्हणजे नसेल येत तर मी करून देतो बाकी काही नाही, तो म्हणाला. हा खरच काळजीने विचारतोय की ? पण आर्या विचारच करत होती. तेवढा चहा येतो मला बनवता, ती म्हणाली. तुला फक्त तेवढाच येतो अस म्हणायच आहे का? सिद्धांत म्हणाला. तिने रागाने त्याच्या कडे पाहिल. त्याला तिचा चेहरा पाहून हसायला येत होत. 'का सकाळी सकाळी माझ्या मागे लागलाय हा', 'स्वःत ला सगळं येत म्हणजे दुसऱ्यांना अस बोलायच का?' 'ह्याच्या कडून कूकिंग शिकायची तेव्हा तर किती बोलेल हा! पण चांगला पण आहे किती काळजी करतो माझी त्याने आपणहुन चहाच विचारल. तसा तितका वाईट पण नाही आहे पण जाऊ दे मी तर बोलणारच नाही जास्त आपलं ठरलंय आणि ती तीच आवरायला लागली.
आर्या किती साधी आहे तिला खरच नाही कळत की आपली कोणी घेतय! किती पटकन विश्वास ठेवते ती! बिचारी!!! नाही मी पण काय बिचारी म्हणतोय काल विनाकारण भांडली माझ्याशी, माझी काहीही चूक नव्हती. स्वतःच घाबरली आणि स्वतःच भांडली. जो भी हो फार cute आहे पण. तिच्या ह्या साध्या स्वभावातच ती जिंकून घेते समोरच्याला. आज आर्याला प्रेझेन्टेशन द्यायचं आहे काय माहिती तिच्या लक्षात पण आहे की नाही. नसेलच लक्षात असत तर तिने काही तयारी केलेली दिसली असती पण हिने तर घरी साधा लॅपटॉप उघडला देखील नाही.मला वाटतय वेळेवर मलाच द्यावं लागणार. पण अस कस चालणार कामाच्या बाबतीत जर आर्या अशी वागली तर पुढे कशी जाणार ना? तिला बोलायला हवं. पण आता नको आधी बघु तिची तयारी कुठपर्यंत आहे.पण आजचा चान्स तिने घालवायला नको.
ऑफिस मध्ये आल्या आल्या ती तिची डायरी घेऊन सिध्दांत कडे गेली. तिने सगळे डाउट्स त्याच्या कडून क्लिअर करून घेतले. आर्या, आजची मीटिंग खूप महत्त्वाची आहे, आणि client ही मोठे आहेत i don't want any single mistake! बघ जमत असेल तर सांग नाहीतर मी करेल! अँड व्हॉट अबाऊट दि प्रेझेन्टेशन?'. रेडी आहे, ती म्हणाली. 'good, i just want to go through it'. 'ok you can check.'तिने लगेचच ओपन करून दिल. त्याने बरेचशे प्रश्न विचारले.तिने सगळया प्रश्नांची उत्तरे दिली. गुड जॉब आर्या, आता फक्त नीट प्रेसेन्ट कर ! be confident, all the best ! आता डायरेक्ट मीटिंग मधेच भेटू. thank you, म्हणून ती निघाली. 'मी तर माझ्या कडून सगळं सांगितलं पण आता आर्याने वेळेवर काही गडबड करायला नको म्हणजे झालं'. 'फर्स्ट प्रेझेन्टेशन आहे, तिलाही टेन्शन असणारच. ठीक आहे काही झालच तर मी आहेच तिथे'. आणि त्याने ही आपलं काम सुरू केलं.इतक्यात तिथे विक्रांत आला. 'सिद्धांत, मी काय ऐकतोय आजच प्रेझेन्टेशन आर्या देणार आहे?' 'हो बरोबर ऐकलं तू'. अरे पण का? तुला माहिती आहे ना हे clients कशे आहेत,आणि आर्या नवीन आहे अरे कस जमेल तिला? तू थोडा जास्तच विश्वास दाखवतोय अस नाही वाटत आहे का तुला?विक्रांत म्हणाला. हे बघ विक्रांत, she will manage don't worry! मला माणस कळतात अरे मी उगाचच कुणालाही देईल का? माझी टीम इतकी मोठी आणि आणि त्यात इतके seniors असताना मी आर्याला जबाबदारी दिली म्हणजे तिच्यात काहीतरी special नक्कीच असणार! सिद्धांत म्हणाला. त्याच बोलणं ऐकूण विक्रांत शांतच बसला. सिध्दांत ने त्याला तर उत्तर दिले पण तोही मनातून अस्वस्थ च होता. मीटिंग ची वेळ झाली तो कॉन्फरन्स मध्ये गेला.
व्हाईट शर्ट आणि ब्लॅक फॉर्मल पॅन्ट, त्यावरपोनी टेल आणि त्यावर हलकासा मेकअप, soft pink लिपस्टिक त्यातही त्याच लक्ष तिच्या कॉलर जवळ दिसणारा बटरफ्लाय चा टॅटू कडे गेलं आणि तिच्या चेहऱ्यावर दिसणारा एक वेगळाच कॉन्फिडन्स! सिद्धांत तर शॉक च झाला,सकाळ पासून मी आर्याला नोटीस च केलं नाही कसली भारी दिसतीये. आणि हाच कॉन्फिडन्स तर मला बघायचा होता. तिने प्रेझेन्टेशन द्यायला सुरवात केली. आणि सिद्धांत बघतच राहिला त्याचा विश्वास च बसत नव्हता आपण काल आपल्याशी भांडणारी हिच होती? ज्या आर्याला साधे साधे जोक्स पण कळत नाही ती इतक छान प्रेसेन्ट करतीये.सगळ्यांच्या प्रश्नांना तिने कॉन्फिडेंटली उत्तरे दिली.. आज तर तो एक नाविनच आर्या पाहत होता त्याने आधी कधीही न पाहिलेली आर्या! प्रेझेन्टेशन संपल सगळ्यांनी तिचं अभिनंदन केलं. तू बरोबर बोलत होता सिद्धांत तुला खरच लोकांची पारख आहे विक्रांत म्हणाला. सिद्धांतच कुणाच्याही बोलण्याकडे काहीही लक्ष नव्हतं त्याला फक्त आर्याला भेटायचं होत, आणि तो तिच्या जवळ गेला. congrats Aarya, you have done it! सिद्धांत म्हणाला. त्याच्या डोळ्यांमध्ये तिच्याबद्दलचा अभिमान आणि आनंद त्याला स्पष्ट दिसत होता.
क्रमशः
©Neha R Dhole