Nishabd - 2 in Marathi Fiction Stories by Siddharth books and stories PDF | निशब्द - भाग 2

Featured Books
  • ભીતરમન - 59

    મુક્તારના જીવનમાં મારે લીધે આવેલ બદલાવ વિશે જાણીને હું ખુબ ખ...

  • ભાગવત રહસ્ય - 121

    ભાગવત રહસ્ય-૧૨૧   ધર્મ -પ્રકરણ પછી હવે -અર્થ -પ્રકરણ ચાલુ થા...

  • કૃતજ્ઞતા

      આ એ દિવસોની વાત છે જ્યારે માનવતા હજી જીવતી હતી. એક ગામમાં...

  • નિતુ - પ્રકરણ 53

    નિતુ : ૫૩ (ધ ગેમ ઇજ ઓન)નિતુને કૃતિ સાથે વાત કરવાની જરૂર લાગી...

  • સંઘર્ષ - પ્રકરણ 13

    સિંહાસન સિરીઝ સિદ્ધાર્થ છાયા Disclaimer: સિંહાસન સિરીઝની તમા...

Categories
Share

निशब्द - भाग 2

जवळपास सहा महिन्याचा कालावधी उलटून गेला होता मी परीक्षेच्या आधीच काम सोडल आणि जोमाने अभ्यासाला लागलो .. जसजसे परीक्षेचे दिवस जवळ येत होते तसतशी भीती अधिकच जाणवत होती ..शेवटी परीक्षा येऊन ठेपली ..सकाळी साडेनऊ चा पेपर होता.. ती नेहमीसारखीच अगदी वेळेवर आली होती .. मी तिला विश करायला जावं आणि तिला विश करणाऱ्यांची गर्दी जमली ..मी शेवटी नाखूष होऊन एका कोपऱ्यात उभा राहिलो ..गर्दी हटली पण माझी तिच्याकडे जाण्याची हिम्मत झाली नाही पण तिला कदाचित ते कळलं असावं आणि तिने स्वतः येऊन मला विश केल...त्यामुळे मी देखील तिला विश केलं .. ती गेली तेव्हा आनंद गगनात मावेना ..आता प्रत्येक पेपरला मी सर्वात आधी तिला विश करायचो आणि तिने मला विश केलं की माझा पेपर नक्की चांगला जाणार अशी माझी समजूत होत गेली ..शेवटी पेपर संपले आणि आम्ही एका महिन्याच्या सुट्टी साठी आपल्या घरी आलो ...
एक महिना उलटून गेला आणि सर्वांची कॉलेजला येण्याची धडपड सुरु झाली ..तसं पाहता कॉलेज एका महिन्याने सुरू होणार होतं पण मुलं नियमित न येणे वगैरे कारणामुळे वर्ग पंधरा दिवसानंतर सुरू झाले .. मला तर श्रेयसीशी भेटण्याची ओढच लागली होती ..शेवटी दीड महिना उलटून गेला पण आमची भेट मात्र अधिकच लांबणीवर जात होती .. असाच एक दिवस आला.. माझा पहिला क्लास साडेसातला असायचा पण आज बस लेट झाल्यामुळे मला क्लासला यायला आठ वाजले होते.. सरांना परवानगी मागायची भीती वाटत होती पण हिम्मत केली आणि आता येऊ का असा प्रश्न विचारला .. सर्वजण माझ्याकडे असं बघत होते की मी खूप मोठा गुन्हा केला आहे.. सरांच्या डोळ्यावरून तर असं जाणवत होतं की आता आपण हलाल होणार आहोत .. शेवटी सरांनी आतमध्ये येण्याची परवानगी दिली आणि आत मध्ये गेलो.आतमध्ये गेल्या नंतर कळालं की आज आमचा फर्स्ट सेम चा रिझल्ट लागला होता आणि जवळपास सर्वच विद्यार्थ्यांचे रिझल्ट विचारून झाले होते कुणाला 70% होते तर कोणाला 75% आमच्या शुभम सरांचा नंबर आला त्यांना 78 % पडले होते ..श्रेयसी शुभमच्या अगदीच मागे बसली होती ..तिला सरानी विचारलं तेव्हा कळालं की 82%.. हे ऐकताच संपूर्ण क्लास टाळ्यानी गजबजला ..सर्वच तिच्याकडे कुतूहलाने पाहत होते .. सरांनी देखील तिला स्पेशल विष केलं पण समोरच्याच क्षणी सर गंभीर होत म्हणाले , " कि बेटा तुला पुन्हा थोड हार्डवर्क करावे लागेल कारण तू एवढं करूनही केवळ दुसरा क्रमांक मिळवला आहेस ," ती आता नाराज झाली होती तरी तिने स्वतःला सावरलं आणि सरांना विचारलं की , " सर मगटॉपर कोण आहे ? "
तेव्हा सर म्हणाले की अग मला माहीत आहे त्याचं नाव तोंडातच आहे पण ओठांवर येत नाही आणि स्पेशली तो मुलगा याच वर्गातला आहे ..आता सर्वांच्या नजरा इकडे तिकडे वळू लागल्या पण त्यांना हवं ते नाव मिळालं नाही त्यामुळे सर्व शांत होते .. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेवढी श्रेयसी शॉक होती त्यापेक्षा ही मुलं जास्त शॉक होती.. हाही क्षण गेला आणि शेवटी सुई थांबली ती कोपऱ्यावर म्हणजेच माझ्यावर ..
सरांनी आपल्या नेहमीच्या स्टाइल मध्ये आवाज दिला " ए हिरो " तुझं काय झालं आणि सिरियस असलेला क्लास जोरजोराने हसू लागला.. मी मान खाली घातली आणि म्हणालो की सर मी अजून रिझल्ट बघितला नाही तेव्हा आता सरांना माझ्यावर असणारा राग काढण्याची पूर्णतः संधी मिळाली .. ती त्यांनी दोन्ही हाताने स्वीकारली आणि पुढच्याच क्षणी मला समोर बोलावण्यात आलं .. सरांकडून काही स्तुतीपर शब्द बोलल्या गेले आणि थ्री इडीयट्स मधल्या हरमन जोशी ची आठवण झाली.. त्याच्याच शब्दात आपला बलात्कार होणार हे निश्चित होत शेवटी सरांनी माझा निकाल सर्वांसमोर पाहू असं घोषित केलं तेव्हा मी परिस्थित निवळण्यासाठी सर मला नंबर आठवत नाही असा बहाणा केला पण आमचे शुभम महाशय कुठे ऐकणार होते .. मी त्याच्याच मागे बसलो होतो त्यामुळे त्यांनी लगेच नंबर सांगितला ..शुभमला तिथेच दोन माराव्या असं वाटून गेलं पण कंट्रोल उदय कंट्रोल म्हणत स्वतःला सावरून घेतलं ..सरांनी रोल नंबर साइटवर टाकावा तेवढ्यातच कॉलेजचा चा चपराशी आला आणि विश्वास ला ऑफिसमध्ये बोलावलं आहे अशी आरोळी दिली आणि मी क्षणातच पसार झालो ..त्या क्षणी विश्वास हे माझंच नाव आहे हे कुणाच्याच लक्षात आलं नाही मी पाच मिनिटांनी परत आलो तेव्हा हातात एक गिफ्ट होतं ..ते गिफ्ट म्हणजे मी काही दिवसाआधी निबंध स्पर्धा दिली होती त्याचं प्रथम क्रमांकाचे बक्षीस होतं .. क्लास मध्ये आलो आणि आनंद दुःखात परिवर्तित झाला .. सरांच्या हातात माझा रिझल्ट होता मला भीती मूळातच रिझल्टची नव्हती फक्त ते सर्वांसमोर सांगणं नको होतं .... तरीही मी सर्वांसमोर सज्ज झालो पुढच्याच क्षणी असं जाणवलं की सरांचा धारदार आवाज आता मृदू झाला होता ..तेव्हा त्यांचा प्रश्न आला तू तोच विश्वास आहेस का ज्याने कॉलेज कडून युनिव्हर्सिटी चे बक्षीस जिंकले आहेत .... माझ्या तोंडून काही शब्द फुटत नव्हते त्यामुळे फक्त हो एवढंच म्हणालो ..आता सर्वांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलू लागले होते .. सर्वच माझ्याकडे नजर रोखून पाहत होते मला काही क्षणांसाठी पहिल्या दिवसाची पुन्हा एकदा आठवण झाली .. सरांना देखील सॉरी फिल झालं पण ते म्हणन कदाचित त्यांना जमलं नाही..हा क्षण देखील काहीतरी सांगत होता ..वर्गात पिन ड्रॉप सायलेन्स अशी परिस्थिती होती ..आता प्रत्येक सेकंद तासासारखा वाटू लागला सरांचे समोरचे शब्द आजही माझ्या आठवणीत आहेत.. ते म्हणाले श्रेयसी तुला जाणून घ्यायचं होतं न की कलासचा टॉपर कोण आहे तर तो दुसरा तिसरा कुणी नसून विश्वासच आहे.. हे वाक्य ऐकलं आणि डोळ्यातून अश्रू बाहेर आले पण ते कुणाला दिसले नाहीत ..आज कितीतरी दिवसांनी अपयशाकडून कडून यशाची वाट मिळाली होती ..पुढे काही घडणार तेवढ्यातच क्लास संपल्याची बेल झाली आणि सर मला अभिनंदन करून निघून गेले ..
आजचा दिवस हा खरंच माझ्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट होता .. ज्या मुलांनी माझ्याकडे कधी बघितलं देखील नव्हतं आता ते स्वतःहून शुभेच्छा देत होते ..हे सगळं घडत असताना मात्र श्रेयसीकडे बघून थोडी भीती वाटू लागली कारण आज माझ्यामुळे तिचं टॉपर येण्याच स्वप्न तुटलं होतं आणि ही खंत मला त्याक्षणी नक्कीच जाणवत होती .. आज मी तिच्यापासून दूर पडण्याचा विचार करत होतो.. शेवटी सर्व क्लास संपता-संपता ती आली आणि मला म्हणाली येवढ्या आनंदाच्या क्षणी तु का रडत होतास..आयुष्यातला एवढा सुंदर क्षण खरच असेल का जी गोष्ट कुणालाच जाणवली नाही तिने अचूक हेरली होती .. मी मात्र नेहमीसारखाच शांत होतो पण मला राहावलं नाही त्यामुळे तिला म्हणालो की सॉरी माझ्यामुळे तुझं टॉपर येण्याचं स्वप्न आज तुटल .. त्यावेळी तिच उत्तर ऐकण्यासारखं होतं ती म्हणाली , " जिंकणे महत्त्वाचं नाही प्रयत्न करणं महत्त्वाचं असतं , रिझल्ट जो पण येईल त्याला स्वीकारायचं आणि पुन्हा नव्याने प्रयत्न सुरू करायचे ." एवढं बोलून ती निघून गेली त्यावेळी जाणवलं की काही माणसं श्रेष्ठ त्यांच्या विचारांमुळे असतात .. आता तर तिच्यावरच प्रेम आणखीनच वाढलं होतं..

क्रमशः ..