Majha sinh gela - 2 in Marathi Adventure Stories by Ishwar Trimbak Agam books and stories PDF | माझा सिंह गेला - भाग-२

Featured Books
  • સંઘર્ષ - પ્રકરણ 20

    સિંહાસન સિરીઝ સિદ્ધાર્થ છાયા Disclaimer: સિંહાસન સિરીઝની તમા...

  • પિતા

    માઁ આપણને જન્મ આપે છે,આપણુ જતન કરે છે,પરિવાર નું ધ્યાન રાખે...

  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

  • હાસ્યના લાભ

    હાસ્યના લાભ- રાકેશ ઠક્કર હાસ્યના લાભ જ લાભ છે. તેનાથી ક્યારે...

  • સંઘર્ષ જિંદગીનો

                સંઘર્ષ જિંદગીનો        પાત્ર અજય, અમિત, અર્ચના,...

Categories
Share

माझा सिंह गेला - भाग-२

भाग २ - वाघ

(इतिहासातील सत्य घटनांना कल्पनेची जोड देऊन कथेमध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही चुका किंवा आक्षेपार्ह आढळल्यास आपल्या प्रतिक्रियांमध्ये सांगावे आणि मोठ्या मनाने माफ करावे हि विनंती.)

भल्या पहाटे शिवबा अन त्याच्या मावळ्यांनी गावाला निरोप दिला अन पुण्याकडे परतीचा प्रवास चालू झाला. हवेतला गारवा अंगाला झोबत होता. शिवबाने अंगावर शाल घट्ट बांधून घेतली होती. घोड्यांच्या टापांचा आवाज अन त्यामुळे मागे उडणारी धूळ हवेत मिसळून जात होती. हळू हळू सूर्य नारायणाचे दर्शन होऊ लागले होते. अंगावर सूर्याची सोनेरी कोवळी किरणे पडू लागली होती. पक्षांचा किलबिलाट आता ऐकू यायला लागला होता. मधूनच एखादा हरणांचा कळप हुंदडताना दिसे. तर मधेच मोरांचा "म्याऊऊउ........ म्याऊऊऊउ ....." आवाज कानावर पडे. समोरच काही माणसं हातात काठ्या घेऊन धावत जाताना नजरेस पडत होती. मागून येणाऱ्या घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकून मागे बघताच ती चार पाच माणसं बाजूला झाली अन कमरेत वाकून अन मान लवून त्यांनी शिवबाच्या येणाऱ्या मावळ्यांना वंदन केले. शिवबाने घोडा थांबवत तानाजीला पुढे पाठवून विचारपूस करायला सांगितली. तानाजीने शिवबाला येऊन सांगितले कि, समोरच्या गावात एका नरभक्षक वाघाने धुमाकूळ घातला आहे. दहा बारा शेळ्या मेंढ्यांचा अन दोन तीन गाया बैलांचा फडशा पडला होता. शिवाय दोन तीन माणसांना पण जखमी केलं होतं. आत्ताच एका लहान पोरावर झडप घालून त्येला जंगलात ओढत नेताना लोकांनी पाहिलं. जास्त लोक येताना पाहून त्याने त्या लहान पोराला तिथेच टाकून पळ काढला. त्यालाच बघायला हे लोक पळत निघाले होते.

त्यांना घेऊन शिवबाचं अश्वदल गावात दाखल झालं. एका झोपडी समोर बायांचा रडण्याचा अन ओरडण्याचा आवाज येत होता. माणसं कोंडाळं करून तिथं उभी होती. शिवबाचं पथक तिथे येताच लोकांनी वंदन करायला सुरुवात केली. शिवबाराजे घोड्यावरून उतार झाले अन चालत जाऊन त्या जखमी झालेल्या मुलाची अवस्था अन त्या बाईचा आक्रोश पाहून गहिवरून आले. शिवबाचं पथक गावातल्या शंभू महादेवाच्या मंदिरापाशी थांबले.

"तान्या, येश्या"

दोघेही सर्र्र्रदिशी पुढे आले. "जी राजं.."

"बोला... काय विचार आहे?", शिवबा म्हणाला.

तानाजीने सपकन म्यानातून तलवार बाहेर काढली अन म्हणाला, "इचार कसला राजं आता. तुम्ही फकस्त सांगा, आत्ता त्या वाघाला जित्ता आणतो तुमच्या म्होरं.."

"आम्ही करणार त्या वाघाची शिकार..!", शिवबाराजे म्हणाले.

येसाजी, "आम्ही हाय कि राजं हितं. तुम्ही कशाला? तुम्ही फकस्त हुकूम सोडा."

"चला, आपण सगळेच जाऊया मग."

लगेच कोंडाजी म्हणाला, "चालतंय कि... चला. आज त्येचा मुडदाच पाडू."

वाघाची शिकार करायची योजना नक्की झाली. बहिर्जी अन त्याच्या दोन तीन चलाख साथीदारांनी गावातल्या माहितगार तरुणांना घेऊन वाघ कुठे आहे हे नेमकं शोधून काढलं होतं. अन लागलीच येऊन शिवबाच्या कानावर घातलं. शिवाय जंगलाची खडानखडा माहिती असणारे काही लोकही शिवबाने बरोबर घेतले होते. त्यांच्या माहितीनेच सगळी योजना आखून कोण कोण कुठे कुठे थांबेल अन वाघावर हल्ला कुठून करायचं नक्की झालं होतं.

एखाद्या मेंढराचा किंवा शेळीचा वाघासाठी सावज म्हणून वापर करावा लागणार होता. पण शिवबाला तेही जीवावर आलं होतं. कारण त्या मुक्या जीवाशी खेळून वाघाला मारणे त्याच्या बुद्धीला पटत नव्हते.

वाघ ज्या वाटेने येणार होता त्या वाटेवरच एका झुडपामध्ये बहिर्जीने शेळीला बांधून ठेवलं होतं अन तो मागच्या झाडामागे लपून बसला होता. त्याच्या कमरेला एक दोर बांधून त्याचं दुसरं टोक कोंडाजी अन बाळाजी झाडावर धरून बसले होते. जर वाघाने बहिर्जीवर हल्ला केलाच तर कोंडाजी त्याला झाडावर ओढून घेणार होता. झुडपाच्या विरुद्ध बाजूला एका मोठ्या झाडाच्या खोडाच्या आडोशाला समोर झाडाच्या फांद्या अन पाने लावुन केलेल्या जाळीच्या पाठीमागे शिवबा हातात तिर कमान घेऊन उभा होता. कमरेला तलवार अन जवळच भालाही ठेवलेला होता. त्याच्या मागे तानाजी भाला घेऊन तर अजून चौघे जण हातात तिरकमान घेऊन सावध होते. शिवाय अजून दहा बारा मावळे हातात तलवारी भाले घेऊन उभे होते. वाघ येताच एकाच वेळी त्याच्यावर बाणांचा वर्षाव होणार होता.

येसाजीसोबत दोघेजण झुडपापासून वाघ येण्याच्या वाटेवरच्या जवळच्या झाडावर दबा धरून बसले होते. हातात भाले घेऊन सगळे सज्ज होते. येसाजीच्या इशाऱ्यावर कोंडाजी दोरीला हिसका देणार होता अन बहिर्जीला हिसका लागताच तो जोरजोरात शेळीचा आवाज करणार होता. सगळे जण ठरल्या प्रमाणे आपापल्या जागेवर दबा धरून बसले होते.

जंगलात निस्तब्ध शांतता पसरली होती. फक्त पक्षांचा मधूनच आवाज होई. सूर्यही हळू हळू वर येऊ लागला होता. अचानक एकदम समोरच्या डोंगरवजा टेकडीवरून गावातील काही जिगरबाज तरुणांनी हातात भांडी अन ढोल घेऊन जोर जोरात बडवायला सुरुवात केली. वाघ ज्या ठिकाणी बसला होता तिथून काही अंतरावरून ते हळू हळू पुढे पुढे येऊ लागले. तसं वाघ त्यांच्या विरुद्ध दिशेने शिकारीच्या ठिकाणाकडे पळत येऊ लागला. येसाजीने ते धूड आपल्याच दिशेला येताना पाहून काही आवाज काढून ढोल अन भांड्यांचा आवाज बंद करण्याचा इशारा केला. समोरच्या गवतातून, झुडपांतून खसखस आवाज होऊ लागला. आता ढोलांचा अन भांड्यांचा आवाजही बंद झाला होता. अचानक ते धूड दुसऱ्या दिशेला वळताना पाहून झाडावर बसलेल्या येसाजी ने पटकन कोंडाजीला इशारा केला. दुसऱ्या क्षणी त्याने जोरात दोरीला हिसका दिला. त्या सरशी बहिर्जीने शेळीचा मोठमोठ्याने आवाज करायला सुरुवात केली. अचानक ते तांबडं पिवळं चट्टेरी अन काळ्या पट्ट्यांच धूड थांबलं अन जिथून शेळीचा आवाज येत होता त्या झुडपाच्या दिशेने झेपावू लागलं. बहिर्जी पटकन झाडाच्या खोडामागे जाऊन लपून बसला. हाती तलवार घेतली. प्रसंग आलाच तर कोंडाजी त्याला वर उचलून घेणार होता. वाघाला झुडपांत बांधलेली शेळी दिसू लागली होती. आता फक्त पंधरा वीस पावलांच अंतर शिल्लक होतं. वाघ हल्ल्याच्या पवित्र्यात त्याची दमदार पावले टाकत अन गुरगुरत सावकाश शेळी असलेल्या झुडपाजवळ येऊ लागला होता. दोन चार माणसांना सहज लोळवेल एवढं मोठं ते धुडं होतं. चालीबरोबर त्याची सोनेरी कातडी उन्हात झळाळून निघत होती. झुडपाच्या पाठीमागे असलेल्या झाडाच्या मागे लपून बसलेल्या बहिर्जीच्या छातीत धडधड वाढू लागली होती. शेळी सुद्धा आता जोर जोरात में में करू लागली होती.

शिवबाने फांद्यांपासून बनवलेल्या जाळीतून ते धूड निरखून घेतलं. अन बाणाचा अचूक नेम धरला. त्या पाठोपाठ सावध पवित्र घेऊन बाकिच्यांनीही आपापले बाण ताणले.

क्रमशः

========

जय जिजाऊ

जय शिवराय

जय शंभूराजे

========