Love After Breakup - Part - 5 in Marathi Fiction Stories by Vishal Patil Vishu books and stories PDF | ब्रेकअप नंतरच प्रेम - Part - 5

Featured Books
  • લગ્ન ને હું!

    'મમ્મી હું કોઈની સાથે પણ લગ્ન કરવાના મૂડમાં નથી, મેં નક્...

  • સોલમેટસ - 10

    આરવને પોલીસ સ્ટેશન જવા માટે ફોન આવે છે. બધા વિચારો ખંખેરી અન...

  • It's a Boy

    સખત રડવાનાં અવાજ સાથે આંખ ખુલી.અરે! આ તો મારો જ રડવા નો અવાજ...

  • ફરે તે ફરફરે - 66

    ફરે તે ફરફરે - ૬૬   માનિટ્યુ સ્પ્રીગ આમતો અલમોસામાં જ ગ...

  • ભાગવત રહસ્ય - 177

    ભાગવત રહસ્ય-૧૭૭   તે પછી સાતમા મન્વંતરમાં શ્રાદ્ધદેવ નામે મન...

Categories
Share

ब्रेकअप नंतरच प्रेम - Part - 5

क्रमशः

तुझा तो गुलाबी स्पर्श

होऊनी स्वार वाऱ्यावर

आजही मला बिलगून जातो..

तुझ्या प्रेम वर्षावात

त्या गुलाबी आठवणींचा पाऊस

आजही मला चिंब भिजवून जातो..

हताश झालेला आर्यन त्या दिवशी पुन्हा एकदा ते महाबळेश्वरचे पिकनिकमध्ये तेव्हा ज्या हॉटेलमध्ये राहिलेले असतात तेथे जातो आणि त्या हॉटेलमध्ये त्यांनी ज्या रूममध्ये गुलाबी थंडीत ती गुलाबी रात्र व्यथित केलेली असते त्याच रूममध्ये जाऊन राहतो. दोन दिवस तो त्या सर्व ठिकाणी जाऊन येतो जिथे जिथे ते दोघे तेव्हा एकमेकांचा हात हातात घट्ट धरून फिरलेले असतात. त्या ठिकाणी गेलेवर त्याचे मनाचे एका कोपऱ्यात खूप दिवसांपासून कोंडलेल्या त्या सगळ्या आठवणी जागे होतात आणि त्या रात्री तो हॉटेलचे त्याच रूममध्ये त्याच बेडवर त्या गुलाबी आठवणींना उजाळा देत असतो. दोन दिवसांच्या महाबळेश्वरच्या मुक्कामा नंतर तिसरे दिवशी आर्यन दिल्लीला त्याचे घरी जायला निघतो. जाताना आर्यन स्वतःचे मनाशी एक संकल्प करतो की, आपण आपल्या त्या डिसेंबर मधील ट्रिपचे ते तीन दिवस म्हणजेच २५, २६ आणि २७ डिसेंबर इथून पुढे दर वर्षी महाबळेश्वर मधील याच हॉटेलमध्ये आणि याच रूममध्ये व्यथित करायचे. दिल्लीला गेलेवर आर्यन स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाचे तयारीला लागतो. कारण प्रीतीने त्याला एकदा तिचे प्रशासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न बोलून दाखवलेलं असते आणि तिचे तेच स्वप्न आपले देखील स्वप्न समजून तो जोमाने स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला लागतो.

प्रेमाची हि कळी खुलताना

मला साथ तुझी हवी होती..

कळीला रोज बहरताना

सावली तुझ्या प्रेमाची हवी होती..

खुलणाऱ्या या कळीला

पहिली हाक तुझी हवी होती..

आपली मुलगी प्रीती लग्ना आधीच प्रेग्नेंट राहिल्यामुळे प्रीतीचे आई बाबा त्यांचे साताऱ्यातील ते घर सोडून दुसरीकडे रहायला जातात. प्रीतीला आता सातवा महिना चालू असतो त्यामुळे तिला घरातून कोठेच बाहेर पडता येत नसते. तिला तिचे कॉलेजचे शेवटचे वर्षाचे परीक्षेचा निकाल तर त्याच दिवशी माहिती झालेला असतो आणि आता या अवस्थेत तिला पुण्याला निकाल घेण्यासाठी कॉलेजवर जाणे देखील शक्य नसते. प्रीतीला तिचे प्रेग्नन्सीचे दिवसात आर्यनची खूप आठवण येत असते. प्रीती आर्यनला खूप मिस करत असते ती रोज त्याने तिला दिलेल्या भेटवस्तू काढून पहात बसत असे. त्याच्या भेटीची ती आतुरतेने वाट पहात असते पण खूप प्रयत्न करून देखील तिचा आर्यनशी काहीच संपर्क होत नसतो. त्या प्रेग्नन्सीचे दिवसातही प्रीती आर्यनला आठवड्यातून किमान एक-दोन पत्रे तरी लिहीत होती, पण ती पत्रे पोस्ट करण्यासाठी तिच्याकडे आर्यनचे घरचा पत्ता नसलेने ती सर्व पत्रे तशीच एका बॉक्समध्ये ती साठवून ठेवत असे. आर्यनचे आठवणीतच प्रीतीचे प्रेग्नन्सीचे दिवस निघून जातात आणि अखेर ती एका गोंडस गोड मुलीला जन्म देते.

प्रीती आपल्या मुलीचे नाव "प्रतिक्षा" ठेवण्याचे निश्चीत करते. प्रतिक्षाची या नव्या विश्वात येण्याची प्रतीक्षा तर संपलेली असते मात्र प्रीतीची आर्यनला भेटण्याची प्रतीक्षा अजूनही संपलेली नसते. आपल्या मुलीचे जन्मावेळी आर्यन इथे आपल्या सोबत असायला हवा होता असं तिला सारखं सारखं वाटत होते. प्रतिक्षाचे जन्माचे वेळीच प्रीती तिचे मुलीचे म्हणजेच प्रतिक्षाचे वडिलांचे नाव आर्यनचेच लावते आणि हॉस्पिटल मधून डिसचार्ज घेऊन घरी परतताना प्रीती आर्यनच्या नावाचे मंगळसूत्र गळ्यात घालूनच घरी जाते. प्रीतीचे आयुष्यात प्रतिक्षाचे आगमन झालेमुळे थोडा आनंद आलेला असतो तिचे एकटेपण थोडे-फार कमी झालेले असते. प्रतिक्षाचे पालन-पोषण करण्यात तिचे मन हळूहळू रमून जाते. प्रीतीला तिचे बाळा सोबत खूप दिवसांनी असे हसत खेळत असलेले पाहून प्रीतीचे आई बाबांनाही बरे वाटते. काही दिवसांनी मग पुन्हा ते त्यांचे जुन्या घरी म्हणजेच साताऱ्याला परतात. प्रीती आणि तिचे आई बाबांना मग तेथील शेजारी व परिचित लोकांचे नाहक प्रश्न टाळण्यासाठी तिचं लग्न झाले आहे आणि तिचे पती बाहेर गावी जॉब करतात व ती बाळंतपणासाठी माहेरी आले असे खोटे सांगावे लागते. कारण याशिवाय त्यांचेकडे दुसरा काहीच पर्याय नसतो लोकांचे उलट सुलट प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी.

आठवणींचा ठेवा हा

मनामध्ये साठवू किती..

साठवलेल्या आठवणीतच

पुन्हा पुन्हा जगू किती..

एक वर्षाने पुन्हा तीच तारीख जवळ येते २५ डिसेंबर ठरल्या प्रमाणे आर्यन पुन्हा महाबळेश्वरच्या त्या हॉटेल मधील पिकनिकमध्ये ते दोघे एकत्र राहिलेले असतात त्या रूम नं ५०२ चे बुकिंग करतो. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास आणि जीवनातील इतर ताणतणाव सोडून ते तीन दिवस तो फक्त आणि फक्त प्रीतीचे आठवणीत घालवत असतो. महाबळेश्वरला आलेवर पुन्हा तो प्रीतीच्या गोड गुलाबी आठवणीत स्वतःला हरवून जातो. प्रीतीला केव्हातरी त्यांचे प्रेमाची आठवण होईल आणि ती या ठिकाणी त्यांनी एकत्र घालवलेल्या त्यांचे जुन्या आठवणी ताज्या करण्यासाठी येईल या आशेनेच आर्यनने त्या हॉटेलमध्ये दर वर्षी त्या दिवसात येण्याचा संकल्प केलेला असतो. पण एक वर्षा नंतरही ती त्या ठिकाणी नाहीच येत आणि आर्यन तिचे आठवणीत ते तीन दिवस व्यथित करून पुन्हा दिल्लीला आपल्या घरी परततो. घरी परतलेवर पुन्हा जोमाने आपल्या स्पर्धा परीक्षेचे अभ्यासाला लागतो आणि तो एक दोन स्पर्धा परीक्षा देखील देतो.

स्वप्ने सारी मनात कोंडलेली

ओलांडुनी आता बंध सारे

पुन्हा नव्याने घेऊनी भरारी

नव तरंग उधळीत आहेत..

नव तरंग उधळीत आहेत..

इकडे प्रीती आपल्या मुलीला प्रतिक्षाला सांभाळण्यात व्यस्त होऊन जाते आणि पाहता पाहता प्रतिक्षा एक वर्षाची होत येते. प्रीती देखील ती एक वर्षाची होण्याची वाट पहात असते. कारण प्रतिक्षाला सांभाळण्याचे जबाबदारीतून तिला थोडा मोकळा वेळ मिळू लागला की तीला आपल्या कॉलेजचे शेवटचे वर्षाची परीक्षा पुन्हा द्यायची असते आणि तशी इच्छा तिने तिचे आई-बाबांना देखील बोलून दाखवलेली असते. प्रीती तिचे मुलीला सांभाळत सांभाळत जस जसा वेळ मिळत जाईल तस तशी ती हळूहळू मग कॉलेजचे शेवटचे वर्षातील तिचे राहिलेल्या त्या एका विषयाचे अभ्यासाचे तयारीलाही लागते. कारण त्यानंतर तिला तिचे अपूर्ण राहिलेले बाबांसारखं प्रशासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न देखील पूर्ण करायचे असते. कॉलेजची परीक्षा देऊन झाली की लगेचच स्पर्धा परीक्षेचे अभ्यासाला सुरवात करण्याचे तिनं स्वतःचे मनाशी ठरवलेलं असते.

आर्यनने प्रीतीचे जे स्वप्न आपलं मानलेलं असते ते स्वप्न सत्यात उतरवण्यास अखेर आर्यनला यश येते आणि त्याने दिलेल्या एका स्पर्धा परीक्षेतून त्याची प्रशाकीय सेवेत अधिकारी वर्ग एक पदासाठी निवड होते. प्रशासकीय सेवेत अधिकारी होण्याचे त्याचे ते स्वप्न पूर्ण झालेने आर्यन आणि त्याचे घरचे खूप खुश होतात. त्याला त्याच्या जॉबचे पहिले पोस्टिंग हे मुंबईत मिळते त्यामुळे त्याला पुन्हा मुंबईला जावं लागते. आर्यनला त्याला हवा तसा प्रशासकीय सेवेतील जॉब मिळालेवर लगेचच काही महिन्यात त्याचे आई-बाबा त्याचे लग्नासाठी त्याचे मागे लागतात, पण तो काही ना काही कारण सांगून त्यांचा तो विषय टाळत असे. पण आर्यनला त्यांचा तो विषय जास्त काळ टाळता येणार नव्हता. कारण त्याचे बाबांच्या रिटायरमेन्टलाही आता काहीच महिने बाकी राहिले होते. रिटायरमेन्टनंतर ते कायमचेच पुन्हा मुंबईला वास्तव्यास येणार होते आणि एकदा का ते मुंबईत आले की आर्यन त्यांचा तो लग्नाचा विषय जास्त काळ टाळू शकणार नव्हता हे त्याला देखील माहित होते. आर्यन प्रीती विषयी देखील आई बाबांना लगेच सांगू शकत नव्हता कारण त्याला तिचे विषयी अजून काहीच माहिते नसते. ती त्याचेवर अजूनही प्रेम करते की तिचे लग्न झाले असेल किंवा नाही याबद्दल त्याला अजून काहीच समजलेलं नसते.

प्रतिक्षाचे पहिल्या वाढदिवसा दिवशी प्रीतीचे आई-बाबा एक-दोन दिवस बाहेर कोठे तरी बाहेर फिरायला जायचे प्लॅनींग करत असतात. कारण बरेच दिवस झाले ते एकत्र असे कोठे बाहेर गेलेलेच नसतात आणि प्रीतीलाही जवळ जवळ मागील एक वर्ष तिचे बाळाचे प्रतिक्षाचे जबाबदारीमुळे बाहेर पडताच आलेले नसते.

क्रमशः भाग ६

- विशाल पाटील, "Vishu.." कोल्हापूर