Anahut - 1 in Marathi Adventure Stories by Nick books and stories PDF | अनाहूत - १

The Author
Featured Books
  • સંઘર્ષ - પ્રકરણ 20

    સિંહાસન સિરીઝ સિદ્ધાર્થ છાયા Disclaimer: સિંહાસન સિરીઝની તમા...

  • પિતા

    માઁ આપણને જન્મ આપે છે,આપણુ જતન કરે છે,પરિવાર નું ધ્યાન રાખે...

  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

  • હાસ્યના લાભ

    હાસ્યના લાભ- રાકેશ ઠક્કર હાસ્યના લાભ જ લાભ છે. તેનાથી ક્યારે...

  • સંઘર્ષ જિંદગીનો

                સંઘર્ષ જિંદગીનો        પાત્ર અજય, અમિત, અર્ચના,...

Categories
Share

अनाहूत - १

रोहन तुझी बॅग आवरलीस का? ,रोहनची आई त्याला ओरडून विचारात होती.
रोहन हा बारा तेरा वर्षांचा हुशार चुणचुणीत मुलगा,तसे तर त्याला त्याच्या मामाच्या गावाला जायला खुप आवडायचे.पण यावेळी त्याचे सर्व मित्र अलिबागला फिरायला जाणार असल्यामुळे तो बळेबळेच कदाचित नाईलाजाने आईसोबत मामाकडे निघाला.
सकाळी बरोबर सहा वाजता रेल्वेने रोहन आणि त्याची आई कोकणाकडे निघाली. मस्त निळाशार समुद्र हेलकावणारा वारा झेलत तो खिडकी कडे तोंड करून बाहेरील निसर्गाचा आनंद घेत निघाला.वाटेत त्याला हिरवीगार आमराई दिसताच कोकन आल्याची चाहूल त्याला लागलीच होती.
रोहनचा मामा त्याला घ्यायला आलेलाच होता.मस्त पैकी बैलगाडी मध्ये बसून तो आपल्या आजोबाच्या जुन्या प्रशस्त वाड्याकडे पोहचला.वाड्यावर पोहचताच विवेक ला पाहून त्याला खूप आनंद झाला. विवेक हा त्याचा मामेभाऊ हुशार आणि उचपत्या.आल्या आल्या दोघेही नेहमी प्रमाणे आमराई कडे निघाले.वाटेतच त्यांना एक जुना वाडा दिसला. रोहन आणि विवेक ला तिकडे जाण्यात सक्त मनाई होती.त्यावाड्या मध्ये काय असेल याचा विचार करत करतच दोघे पुढे निघाले.

रोहन :- अरे या वाड्यात असे काय आहे रे जे आपल्याला नेहमी इकडे येण्यास मनाई करतात?

विवेक :- काय माहित मी कधीहि चुकून विचारले तर मलाच ओरडतात. तू ते सोड चल कैऱ्या खाऊयात.

मस्तपैकी दोघेही कैऱ्या खाऊन परत आपल्या घराकडे निघाले.परंतु घरापाशी बरयापैकी गोंधळ दिसत होता. दोघेही काय असेल हे पाहण्यासाठी पळतच तिकडे गेले.पोलिसांच्या गाड्या पाहुन दोघेही आश्चर्यात पडले.साधी गाडी नाही येणाऱ्या या कोंकणात पोलीस??तेवढ्यात एक ओळखीचा आवाज कानी पडला.

रोहन विवेक इकडे काय करताय? लवकर घरात जा,रोहनच्या आजोबांचा आदेश आला.दोघेही नाईलाजाने घराकडे निघाले.

रोहन:- काय असेल रे तिकडे?

विवेक:-काय माहित चल घरी भूक लागलीये?

जेवून दोघेही उंबऱ्यात बसले होते.तेव्हा त्यांना काही तरी कुरबुर ऐकू आली.

मी तुम्हाला सांगत होते,तो वाडा घेणाऱ्या कुलकर्णींना सपष्ट सांगा म्हणून गेला ना त्यांच्या मुलाचा जीव?त्या शापित वाड्यात अजून किती जीव जाणार काय माहित?

शापित.....? या शब्दनेच दोघांचे डोके चक्रावले.

कसेबसे आई आणी बाकीच्यांना चुकवून रोहन आणि विवेक आजीकडे जाऊन पोहचले.

आजी त्या शापित वाड्याबद्दल काय सांगत होतीस आजोबांना आणि तिकडे आज खून झाला त्याचा याच्याशी काय संबंध? विवेक अधीरतेने आजीला म्हणाला.

तुम्हाला काय करायचंय याविषयी जा गप जाऊन झोपा?आजीने ओरडून सांगितले.पण दोघेही काय हटायला तयार होईनात शेवटी आजी म्हणाली, हे बघा मला काय त्याविषयी माहित नाही त्याविषयी पण मी तुम्हाला एक गोष्ट मात्र सांगणार आहे पण ते रात्री आता तुम्ही निघा बघू.

रात्र झाली आज नेहमीपेक्षा काळोख जास्तच वाटत होता.दोघेही आजीच्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत होते आजीने आपली टिपिकल गोष्टी प्रमाणे सुरवात केली.

खूप पूर्वी संपूर्ण भारतवर्षांमध्ये राजा वीरभद्र याचा राज्य होत.राजा तसा खूप पराक्रमी आणि हुशार, परम लोका मध्ये त्याचाच राज्य होत म्हणे.त्याच्याकडे ईश्वरी शक्ती असलेली छडी होती.कठोर तपश्चर्या करून त्याने ती मिळवली होती त्याकाळी जादू करणे हे आश्चर्य नसून एक विद्या होती.त्यामध्ये तोह सर्वोत्कृष्ट होता.

हि शक्ती किव्वा छडी तीन विभागात विभागात विभागली होती हे तीन तुकडे मिळूनच या शक्ती चा वापर करता येत असे

पहिली शक्ती एका पर्वत रांगेत दडली होती जिचं साम्राज्य रक्षण लोहनकडे होत.लोहन लोकांमध्ये खूप जास्त शारीरिक ताकद होती त्यांना चुकवून पर्वतांमध्ये शक्ती शोधणं खूप अवघड होत.

दुसरी शक्ती जी समुद्रात होती ज्ययाच रक्षण जयेय करायचे अतिशय कपटी हुशार अशे ते लोक होते.त्यांच्या कडे विविध आकार रूप घेण्याची क्षमता होती.

तिसरी आणि अत्यंत म्हत्वची म्हजेच अनाहूत त्याच्याविषयी कोणालाच शिवाय राजा आणि तिथले महान आचार्य यांनाच माहित होत असे म्हणतात.

या तिन्ही पासून बनवलेल्या ऊर्जा छडी ने राजा वीरभद्र राज्यावर राज्य करत होता. पण म्हणतात ना राज्य कधी युद्ध याशिवाय राहू शकत नाही. राजाकडे कडे आलेल्या असीम शक्तीने तोह बाकी लोहन आणि जयेय लोकांना तुच्छतेने वागवत होता.याचाच फायदा सोयाशने घेतला.सोयाश विचित्र होता तरी पण हुशार आनि विरभद्रचा जुना मित्र होता.दोघांनीहि आचर्याकडे जादूविद्येचे शिक्षण घेतले होते. परंतु त्याच्या मधील अवगुणामुळे त्याचा आचार्यांनी युवराज म्हणून घोषित करण्यास नकार दिला होता.याचाच राग येऊन त्याने लोहन आणि जयेय लोककांना घेऊन नंतर राज्यावर आक्रमण केले.

परंतु शक्तीसमोर टिकणे अशक्य होते.या भयंकर युद्ध झाल्यामुळे राजाने शक्तीचे विभाजन करन्याचे ठरवले. या युद्धामुळे सोयाश कायमचा शक्ती मध्ये कैद झाला होता.राजाने शक्ती चे विभाजन करून तीन ठिकाणी लपवले. ते तीन ठिकाणे कधी कोणालाच सापडणार नाहीत याची दक्षता त्याने घेतली. लोकांनी अनादी काळ त्याचा शोध घेतला परंतु त्याचा शोध आजही कोण लावू शकेले नाही.आजही काही लोक हिमालयात सोयशची पूजन करतात आणि त्याला सोडवण्यासाठी शक्ती शोध घेत आहे.परंतु कोणत्याही वाईट विचाराने ते मिळवण्याचा प्रयत्न केल्यास त्याचा आत्मा शरीरा पासून दूर होतो.

आजी त्यावाड्या मध्ये यासाठीच तर खुन झाला नसेल ना कारण बाबा म्हणत होते त्या माणसाला कोणत्याही हत्याराने मारले नाही त्याचा मृत्यू कसा झाला हे कोणालाच माहित नाही,रोहनने विचारले.

काहींहि विचार करू नका झोप गपचूप,आणि त्या वाड्याकडे फिरकू नका परत. आजीने खडसावून सांगितले. तिलाही माहित होते की मुलांना खर सांगितल्याशिवाय पर्याय नाही.ते गोष्टीच्या माध्यमातून का असेना.

(क्रमश:)