कड़क उन्हाळा गावी असणारे माझे मित्र गण्या,राहुल्या,निख्या..उनाड च ही सर्व,आमच्या एका उनाड प्रसंगाची ही एक कथा..
कड़क उन्हाळा सुट्टी चे दिवस ते बालपणी चे..!पोहने, पखाण्या खेळने, नटुन थटुन केसांची चंपी करून लग्नाच्या वराती मधे नाचने,घरातील भंगार जमा करून टरबूज,आइसकांडी घेऊन पुर्ण गावानि खात फिरत होतो,कोणत्या ही गोष्टीची परवा न करता.
उन्हाळा म्हंटल की हीच मज्जा असायची,म्हणून प्रत्येक उन्हाळा हा गावी घालवायचो, शाळेकड़चि मित्र वेगळी आणि गावाकड़चि सुद्धा त्या मुळे ऋतु प्रमाणे राहनिमान खेळने बदलावे लागे,पण आवडता ऋतु म्हणजे उन्हाळाच,गावी कसे ही रहिलो तरी शहरी पाहुणे म्हणून ओळख असायची,गाँव माझ असून देखील मि पाहुना..?
असेच एकदा उन्हाळ्यात गावी गेलो, दिवस रात्र उनाड पणा करण्यात,अंबे खाने,पोहने,दिवस भर खळने,आमचे खेळ अजब असायचे,पखण्या,क्रिकेट,कोई ई.
रात्रि मात्र पंचायत पडायची उन्ह लागुन डोक फिरयाच त्या मुळे रडत ही बसायचो..नंगू पंगु होवुन पाण्याच्या टोपल्या त बसून रहायचो,किंवा ठंड पाणी तांब्या मधे घेऊन आजी बोंबी वर ठेवायची.
तेव्हा कळाले हे आपल्या शरीराच केंद्र बिंदु,
हे दोन च इलाज होते उन्हाळी वर.
अस च एक दिवस भर उन्हात आम्ही २ भावंड, माझे मित्र गण्या,राहुल्या,निख्या,रत्न आमची ५-६ मुलांची टोळी,निर्णय घेतला की आज ठोकऱ्या अंब्याचे आंबे तोडायचे आणि खायचे.
ठोकऱ्या अंबा म्हणजे आमच्या शेतातील अंबा,
ज्याचा आकार ठोकऱ्या म्हणून त्यांच नाव ठोकऱ्या.
"ठोकऱ्या म्हणजे मोठा"
त्या साठी अंबराई गाठायची किरण दादा आणि वैभव दादा ही भावंड आमच्या सोबत किरण दादा मोठा त्या मुळे त्याची चालती,गण्या काळा कुट्ट होता म्हणून उन्हाचा परिणाम त्याच्या चेहऱ्यावर होत नसे म्हणून च की काय तो नेहमी उत्साही असायचा आणि रत्न याची तर बात च निराळी होती,असभ्य,शिव्या देत राहन,सायकल घेऊन फिरत राहन ,हिवळ्यात टहाळ चोरुन आणने,दरोज तो घरी भांडन घेऊन येत असे म्हणून च की काय त्यांच नाव रत्न खत्री पड़ल होत थोडक्यात मसल्ति तो,
कधी काय करेल याचा नेम नाय.
आमची माकडांची फौज तयार आणि आम्ही निघालो वाटेत च गावातील प्रतिष्टित लोकनि पाहिले.
म्हणून आम्हा भावंडा ना थोड़ी भीती.
अंबराई गावा पासून खुप लांब,त्या मुळे लाही लाही झाली होती,त्यात राहुल्या सर्वात लहान म्हणून तो लवकर च कंटाळला अक्षरशः एवढा की त्याला रडू यायला लागल.
म्हणून एका विहारी जवळ आम्ही मुकाम ठोकला, पाणी पिलाया नंतर सुद्धा राहुल्या रडत च होता म्हणून आम्ही त्याची समजूत घालत होतो,रत्न विहरीतिल पाणी दूषित करण्यात व्यस्त मातीचे मोठे मोठे ढेकुळ उचलून पाण्यात टाकून पाणी खराब करण्यात त्याला मज्जा येत होती.
त्याच्या वर रागवले तरी सुद्धा त्याचा मसल्ति पणा चालूच.तो सुधरन्यातला नाही म्हणून शेवटी चुप बसलो.
खुप वेळा नंतर पुन्हा आम्ही अंबराई च्या दिशेने निघलो थोड्या च वेळात ठोकऱ्या अंब्याच्या झाडाच्या त्या विशाल फंदया दिसू लागल्या की सर्व जण धावत सुटली.
संपूर्ण झाड़ हे अंब्यानी गजबजलेल होत,कल्पना ही करता येणार नाही एवढे अंबे,त्या झाड़ा जवळ गेल्या नंतर अंब्याच्या सड़ा च टाकला जणु,मातिचे कण सुद्धा तृप्त झाले असतील त्या सुगंधा ने..
त्या झाडाची सावली, वेगाने वहणारा वारा सुद्धा गारवा देत होता,तो सुसाट भेभान वारा आणि त्या मुळे त्या अंबयाच्या झाडाचे ते बोलके चित्र "वाह क्या बात".
प्रत्येक अंबा जणु बोलत होता,त्या अंब्याच्या झाड़ा वर जे अंबे होते तेच मोहित करतं होते,पण वाईट त्या अंब्याच वाटत होत जी अंबे खाली पडली होती,काही च्या नशीबा मुळे पक्ष्यानि त्यांचा स्वाद घेतला होता.परंतु काही अंबे कोमजलेली होती रडत होती मि कोणा साठि झाले मला कोण चाखनार,
जर मि अशीच कोमजले तर माझ्या जन्मा चा हेतु च साध्य च होणार नाही.
कदाचित कोमजलेली अंबे अशी च स्वतःशीच बड़बड़ करतं होती,मला थोड़ वाइट च वाटल म्हणून मि खाली पडलेली अंबे उचलत होतो.
भावंड आणि सगळे मित्र खाली निजुन शांत अंग टाकून पडून होती..
मि ५-६ अंबे खिशात घेऊन हातात १-२ अंबे घेत स्वाद घेत होतो.
"तोच किरण दादा म्हंटला अरे अरे एखादा अंबा पाड की मूर्ख खालचे कशाला खतोस ..?"
तोच दगड झाड़ा ला मारल्याचा आवाज आला,
रत्न खत्री ने मारला तोच मधमाशा ची लाट माझ्या अंगा वर..
मि जाग्या वर च उभा,
दादा ओरडला अरे पळ...
मि पळत सुटलो..
निजलेले सर्व जन धावत पळत सुटली,ओरडायला लागली.
किरण दादा रत्नया ला शिव्या देत पळत सुटला पण रत्न मात्र एकटा च आमच्या विरुद्ध दिशेने पळत होता..
माशा माझा चावा घेत होती,खुप ओरडत होतो,किरण दादा,राहुल्या, वैभव दादा, गण्या, निख्या सगळी धूम पळत होती.मि पळता पळता जमीनी वर धपकन पडलो,
आता राहवले नाही किरण दादा किरण दादा करतं किंचाळत होतो,पण दादा दिसेनासा झाला पुर्ण थवा माझ्या मागे च होता काही माशा चावा घेत होत्या,
मि शेवटी हिम्मत करून उठालो आणि धूम पळत सुटलो काही अंतरावर गेल्या वर जणवल की माशा नाहीश्या झाल्या परंतु माझे पाय धावत सुटले भीति पोटी..
शेवटी सगळे दिसले,ते समोर होते खुप समोर..
तेवढ्यात च एक अनोळखी व्यक्ति आला त्यानी ओळखले कदाचित आणि गाड़ी वर बसून मि पहिले घरी गेलो रसत्यानी मि खुप रडत होतो ते काका माझी समजूत काढत होते दादा आणि सगळे मित्र मागे राहिले होते,
घरी गेल्या नंतर आई तांडव करायला लागली,गण्या ची आई, राहुल्या ची आई, सर्व आया माया रडत होत्या,जणु खुप मोठा डोंगर कोसळला,सगळे विचारना करतं होते बाकी चे मूल कुठ आहेत,?
मि रडत रडत सगळ सांगितले तेवढ्यात सगळे आले पण रत्न मात्र कुठ राहिला हे त्याला च ठाऊक,काही वेळात च एकाच गाडीत बसून आम्हला दवाखान्या च्या पायऱ्या चढाव्या लागल्या.
अंगातून गरम वफ़ा येत होत्या,त्यात इंजेक्शन ची भीती, त्या मुळे राहुल्या नि आणि मि दवाखाना अगदी डोक्या वर घेतला.
माझ नाक हे पहिले च चपट आणि गुलगुलित होत ते मात्र आता टरबूजा सारख झाल होत, गण्या चे ओंठ हे काकड़ी सारखे,वैभव दादा चे कान हे हत्ती सारखे विशाल झाले होते,कोणाच्या ओठांला तर नाका ला किंवा हाता पायला मधुमाश्या नि डंक मारला होता,
मात्र या सर्व प्रसंगा ला जो कारणीभूत होता तो रत्न त्याचा चावा आमच्या तुलनेत कमी च घेतला होता मश्यानी..
३-४ दिवसा नंतर आजोबानी अंब्याची पेटी आणून दिली आणि बजावले की पुन्हा तिकडे ज्याच् नाही
मधमाश्या चा डंक हा खुप विषारी असतो हा समज आलाय म्हणून च की काय पुन्हा त्या ठिकाणी जाण्याची भीती वाटते,
आता मोठे झालोय आम्ही सगळे,व्यक्तिगत सगळ्याच आयुष्य सुरेख चालू आहे,आता प्रत्येक उन्हाळा हा थोड़ा विचित्र असतो,त्रास दायक असतो.
सगळ च बदलय पण आज ही रत्न मात्र जशा च तसा,आता तो उन्हाळा ही नाही राहिला आणि ते बालपण सुद्धा.
तरी आज ही आजोबा अंब्या ची पेटी पाठवतात आणि ते अंबे बघून या क्षणाची आठवण आल्या शिवाय राहत नाही आणि हसू सुद्धा आवरत नाही..
#ठोकऱ्या अंबा
#अंब्याचि_हौस
#एक भीति दायक तेवढी च मजेदार आठवण