Naa Kavle kadhi - 1 - 8 in Marathi Fiction Stories by Neha Dhole books and stories PDF | ना कळले कधी - Season 1 - Part - 8

Featured Books
  • अधुरी खिताब - 29

    ️ एपिसोड 29 — “रूह का अगला अध्याय”(कहानी: अधूरी किताब)---1....

  • नेहरू फाइल्स - भूल-59

    [ 5. आंतरिक सुरक्षा ] भूल-59 असम में समस्याओं को बढ़ाना पूर्व...

  • 99 का धर्म — 1 का भ्रम

    ९९ का धर्म — १ का भ्रमविज्ञान और वेदांत का संगम — 𝓐𝓰𝓎𝓪𝓣 𝓐𝓰𝓎...

  • Whispers In The Dark - 2

    शहर में दिन का उजाला था, लेकिन अजीब-सी खामोशी फैली हुई थी। अ...

  • Last Benchers - 3

    कुछ साल बीत चुके थे। राहुल अब अपने ऑफिस के काम में व्यस्त था...

Categories
Share

ना कळले कधी - Season 1 - Part - 8

बराच वेळ झाला आर्या आलीच नाही. शेवटी सिद्धांतने hr डिपार्टमेंट ला कॉल केला आणि आर्यची आजची सुट्टी आहे का  विचारलं. पण त्यांनाही तिने काही inform नव्हतं केलेलं. किती irresponsible आहे ही मुलगी.जबाबदारी नावाची थोडीही गोष्ट नाही. शेवटी न राहवून त्यानेच आर्यला कॉल केला. 'hello आर्या where are u??,कीती वाजलेत बघितलं का?' सिद्धांत, मी आर्या नाही तिची आई बोलत आहे, ओह extremely sorry मला वाटलं आर्याच आहे. 'by the way आर्या कुठे आहे? मला थोडं काम होत तिच्याशी'. 'अरे मला करायचं होतं ऑफिस मध्ये इंफॉर्म पण कोणाला करावं हेच कळत नव्हतं,बर झालं तूच केला कॉल आज आर्यला खूप ताप आहे तर ती नाही येऊ शकणार'. आर्याची आई म्हणाली. काय? सिद्धांत म्हणाला,'काल तर ठीक होती आज अचानक कसकाय झालं?' 'ते काय आहे न आर्यला लहानपणापासूनच थंडी सहन होत नाही थोडा गारठा वाढला की होतो तिला असा त्रास,होईल ती एक दोन दिवसांत ठीक'. 'okk काळजी घ्या तिची मी सांगतो ऑफिस मध्ये.' अस म्हणून सिद्धांत ने फोन ठेवून दिला. आता मात्र त्याला काहीच सुचत नव्हत. माझ्याच मुळे तिची ही condition झाली.मीच जबाबदार आहे ह्याला, काल मीac full केलाच नसता तर....  पण आता पश्चाताप करून काय उपयोग? पण आता विचार करून पण  काय उपयोग जे व्हायचे ते होऊन गेले. आता काय करू? आर्यला सॉरी म्हणू का? कारण तिची ही तिची ही situation  माझ्या मुळेच आहे पण तिला कॉल करूनही काही उपयोग नाही ती नाही उचलणार फोन. message ड्रॉप करू का पण तिच्यापर्यंत नाही पोहचणार. ते काही नाही मी तिला भेटूनच येतो. हा हेच योग्य राहील मी भेटूनच येणार!
         सिद्धांत ऑफिस मधुन थोडा लवकरच निघाला आणि तो थेट आर्या च्याच घरी गेला.
त्याने door bell वाजवली, आर्यच्या भावाने दार उघडले तो आर्या पेक्षा 2 वर्षांनीच लहान होता. कोण हवंय??? आर्या, आहे का?मी सिद्धांत. घरात ये ना दीदी ची तब्येत ठीक नाही आहे, ती आराम करतीये आतमध्ये. तुला आधी नाही पहिलं तू  तिचा कॉलेज friend का ??? किती प्रश्न विचारतो हा!नाही मी तिचा बॉस आहे. ओहह so sorry sir, मला वाटलं तुम्ही दिदीचे फ्रेंडच आहात. अरे its okk कॉल मी सिद्धांत, मी भेटू शकतो तिला? हो का नाही ती रूम मध्ये आहे चला ना. सिद्धांत त्याच्या सोबत रूम मध्ये गेला. तुम्ही बोला मी आलोच, अस म्हणून तो निघून गेला. आर्या ला शांत झोप लागली होती . तिचा इतका उतरलेला चेहरा चेहरा पाहून सिद्धांत ला खूप वाईट वाटलं. बिचारी माझ्यामुळेच झालं हे सगळं! तो तिच्या बाजूला बसला आणि हळूच त्याने आवाज दिला 'आर्या', तिने डोळे उघडले तिला विश्वासच बसला नाही, सिद्धांत सर, तुम्ही इथे ! तिला खरं तर ह्या क्षणी ही भीतीच वाटली अरे यार आज मी ऑफीस मध्ये inform पण नाही केलं . म्हणून तर हा इथे नाही ना आला ??? आर्या, तू विचारकरतेस तस काहीही नाही आहे. तू inform नाही केलं म्हणून मी काही तुला रागवायला नाही आलो इथे, relax. ह्याला कस काय कळतं मी काय विचार करते ते?? आर्या अगं तुझा चेहरा सगळं बोलतो. sorry सर, but मला नाही करता आलं inform, बस, आर्या मी काही बोललो का तुला? ते सोड कशी आहे तुझी तब्येत? बर वाटतंय का आता? 'हो थोडंस मला थोडं बरं वाटलं की मी लगेच जॉईन होईन',आर्या म्हणाली. 'काहीही गरज नाही, जोपर्यंत पूर्ण बरी होनार नाही तोपर्यंत यायची काहीही गरज नाही आधी नीट आराम कर.'सिद्धांत म्हणाला.आर्याला विश्वासच बसत नव्हता की हे सिद्धांतच बोलतोय कारण आज च त्याच वागणं पूर्ण वेगळं होत. हा नक्की तोच आहे ना जो आपल्याला काल इतका ओरडला, अक्षरशः राडवणारा. आणि आजचा हा, किती वेगळा आहे? पण हा सिद्धांत तिला कुठे तरी आवडत होता. इतक्यात सिद्धांतने तिचा हात हातात घेतला आणि म्हणाला 'सॉरी आर्या' आर्याला कळलंच नाही हे काय होतंय. 'sorry for what?' आर्या ने विचारलं. nothing, अस म्हणून तो आर्या चा हात सोडताना त्याला जाणवलं की, आर्या , तुला अजूनही चांगलच temperature आहे . डॉक्टर कडे जायचं का? नाही मी सकाळीच जाऊन आलीये घेतली आता medicine वाटेल बरं थोड्यावेळात. 'नक्की ना?',सिद्धांत म्हणाला. हो नक्की! आर्या म्हणली. इतक्यात तिथे आयुष  म्हणजे आर्याचा भाऊ कॉफी घेऊन आला. here is your कॉफी, sorry थोडा उशीरच झाला, आई घरी नाही ना म्हणून थोडा वेळच लागला, घ्याना, दीदी तू पण घे , 'नको रे माझी अजिबात ईच्छा नाही आहे, मी घेईन नंतर'. 'हे बघा सिद्धांत सर ही माझं काही ऐकणार नाही तर तुम्हीच सांगा',कारण बॉस च्या ऑर्डर ला तर कोणी नाही म्हणूच शकत नाही.बरोबर ना! आता तिघेही जण खळखळून हसले . आर्या ने सिद्धांत कडे पाहिलं आज मी ह्याला पहिल्यांदाच हसताना पाहतीये किती छान दिसतो हा हसताना. सिद्धांत ने एक कप हातात घेतला आणि आर्या च्या हातात दिला. आणि आर्या ने घेतला कारण तिला ही माहिती होत ती सिद्धांत ला नाही म्हणू शकणार नाही.