एकांकिका :
मातृमय महंमंगल प्रेरणास्तोत्र मूळ लेखक साने गुरूजी यांच्या ‘श्यामची आई’ पुस्तकातून लहान षालेय विद्याथ्र्यांपर्यंत, पालकांपर्यंत श्यामची आई तथा साने गुरूजी कळावे त्यातून स्वतः बालके घडावित नव्हे तर स्वविकासातून समाज घडावा हया उद्देषातून साकार केलेली एक अंकी बालनाट्य कलाकृती:
‘श्यामची आई’
मूळ लेखक - साने गुरूजी यांच्या पुस्तकावरुन-
नाटयरूपांतर लेखक
संजय वि. येरणे
पात्रपरिचय :
मुख्य पात्र सहा
एकूण पात्र अकरा
एकूण प्रवेश सोळा
वेळेनुरूप प्रवेश कमी जास्त करता येतात.
श्याम: साने गुरूजी
आई: श्यामची आई
भाऊ: श्यामचे वडील
पुरूषोत्तम: श्यामचा लहान भाऊ
वामनराव: सावकाराचा दिवाणजी
गजरी: शेजारील स्त्री
श्यामचे मित्र: बाबी, बन्या, बापू, बंड्या, भाष्कर
मनोगत:
‘श्यामची आई’ मूळ साने गुरूजी लिखीत पुस्तकातील मातृमय महंमंगल प्रेरणास्तोत्र आहे. मी या ग्रंथाला वयाच्या चौथ्या वर्गापासूनच अनेकदा वाचलं आहे. सिनेमा व अनेक नाटकंही या प्रेरणास्तोत्रावर पुढील काळात आलीत. मात्र मी एक शिक्षक या नात्याने साने गुरूजींच साहित्य वाचतांना त्यांच्या जीवनदर्शनाकडे बघू लागलो होतो आणि यातूनच साकार झाले ते हे एक अंकी नाट्यपुष्प...
खरेच साने गुरूजी विद्याथ्र्यांपर्यंत पोहचवावे याकरिता माझे शाळेतील विद्याथ्र्यांकरिता मी हे नाटक रचले. पर्यायाने साने गुरूजी यांच्या चरित्राला कुठलाही धक्का लागू न देता हा करूणामय प्रवास मी साकार केला. यातून बर्याच विद्यार्थीना मी साने गुरूजी सांगू शकलो. खरे तर बालकांच्या मनावर संस्कार करण्याइतपत दुसरं कुठलं साधन मला अजूनही मिळालेलं नाही. पुढील काळात साने गुरूजीच्या साधना, व विद्यार्थी गृह प्रकाशन या संस्थेशीही मी पत्रव्यवहार केला. सदर पुस्तक प्रकाशन व्हावे या करिता ते आपण वाचावे व मला मार्गदर्शन करावे असेही नोंदले पण मला काहीही सहकार्य मिळाले नाही. बरेच दिवस मी ही एकांकिका घेवून अन्य प्रकाशकांकडेही गेलो. पण शून्यत्व.
आज जर का असे पुस्तक शाळा-शाळात बालवाचनालयच्या माध्यमातून पोहचले तर फार बरे होईल असेही वाटते... पण त्यालाही मर्यादा आहेत.
सदर एकांकिका ही स्नेहसंमेलन निमित्याने शाळेत बसविता येईल. बालकांच्या भूमिकेतून ती साकार करता येईल. असा विश्वास वाटतो आहे. खरे तर साने गुरूजीचे हे पुस्तक वाचतांना, नाट्यरूपी बघतांना श्यामचे घडणे, परिस्थितीचे चटके त्यात आईची, भाऊची मदत हे सारं काही विलोभनिय नाही तर करूणामय प्रवास आहे. यातून जगण्यास बळ येतं. मी तरी अनेकदा श्यामला समजून घेतांना रडलो आहे कारण अनेकदा मीही माझ्या जीवनात असे करूणामय प्रसंग भोगले आहेत. मला श्याम स्वतःत दिसतो आहे. पण पुढील काळात श्यामकडे बघतांना साने गुरूजीचं हळवं मन बघतो... त्यांनी पुढील काळात आत्महत्या केली. त्याचं अफाट साहित्य.. समाजासाठी केलेली सेवा आणि असा सेवाव्रती अचानक संपणे मनाला खूप दुःख देवून जाते. साने गुरूजी वाचतांना त्यांचं साहित्य बघतांना एक लक्षात येईल ती, माणसाला माणूस म्हणून घडण्याची प्रेरणा ही त्यांच्याकडूनच मिळणारी... आदर्शाचं एक प्रतिबिंब सगळयानांच मिळणारं.. खूप काही लिहावं वाटतंय.. पण तुर्तास साने गुरूजींच्या आदर्शमय जीवनाची वाट व त्यांच्या चरित्रातून बालकांना संस्कारमयी जीवन मिळावे याकरिता मी त्यांच्या मूळ पुस्तकातून घेतलेला हा साभार रूपी नाटयप्रवास एका अंकात उलगडतांना मनाला आनंद होतो आहे. शिक्षक म्हणून साने गुरूजींना आदर्श मानतांना त्यांच्या ऋणातून मुक्त होण्याचा हा अल्पसा प्रयत्न आहे. काही चुकले ते माझे पण यातून काही चांगलं मिळालं तर ते सारं काही साने गुरूजीचं स्वप्नकार्य होतं असंच समजावे.
आपलाच
संजय वि. येरणे
नागभीड जि. चंद्रपूर
9404121098
प्रवेश 1:
श्याम: (स्वगत) गड्यांनो, माझ्या आईचे हे देणे, माझ्याजवळ जे काही चांगलं आहे ते सारं काही माझ्या आईचं. आई माझा गुरू, आई माझं कल्पतरू, खरेच सांगतोय मी, तिनं मला काय दिलं नाही ? प्रेमळपणे जगावयास, प्रेमळपणे बोलावयास तिनेच मला शिकविले, मनुष्यावरच नव्हे तर गाईगुरांवर, फुलपाखरांवर, झाडामाडावर आणि या सगळया निसर्गावर तिनेच मला प्रेम करायला शिकविले. माझ्या आईनेच माझ्या जीवनात अत्तर ओतलं. तीच सुगंध देणारी, रंग देणारी थोर माऊली, सारं काही माझी आई ! आई ! या श्यामची आई !
(श्यामचे घर, अंगणात तुळस, उजव्या कोपर्यात देव्हारा, आई खाटेवर आजारी पडलेली. पात्र - श्याम पंचा घालून, आई.)
श्याम: (पूजा करीत) दिव्या दिव्या दीपत्कार, कानी कुंडल मोती हार ! दिवा देखून नमस्कार ! तिळाचे तेल कापसाची वात, दिवा तेवे मध्यापरांत, दिवा तेवे देवापाशी, माझा नमस्कार सर्व देवापाशी !
आई: श्याम ये श्याम....
श्याम: काय ग आई ? काय होते ग तुला ? बरं नाही का ? पाय चेपून देवू काय ग तुझे, बरं वाटेल थोडं तुला...
आई: पाय नको रे चेपायला. मेले रोज चेपायचे तरी किती ? तू सुद्धा कंटाळला असशील रे ! पण मी तरी काय करू ?
श्याम: (गहिवरून) आई असं नको ग बोलूस.
आई: श्याम तू दिवसभर काम करीत थकतोस, पण उदयापासून तुला आणखी एक काम तीन दिवस मी करायला सांगणार आहे. करशील ना रे श्याम !
श्याम: आई, मी कधी तरी नाही म्हटले आहे काय ग ?
आई: नाही रे श्याम, तू कधीसुद्धा नाही म्हणाला नाहीस. तरीपण... (कण्हत) हे बघ, उदयापासून वटसावित्रीचे व्रत सुरू होईल. मला वडाला एकशे आठ प्रदक्षिणा नाही रे घालणं होणार. मला भोवळ यायची. मी अशी हिवतापाने आजारी. कशी तरी तुझा हात धरून जाईन. पूजा करीन. तीन प्रदक्षिणा घालीन. पण बाकीच्या प्रदक्षिणा तू घालशील ना रे बाळा...!
श्याम: आई, पण माझ्या प्रदक्षिणा कशा ग चालतील ?
आई: चालतील हो बाळ, देवाला डोळे आहेत. देव काही मेला नाही. त्याला सारे कळते. तू म्हणजे मीच नाही का ? अरे तू माझ्या पोटचा गोळा, माझेच तू रूप. तू प्रदक्षिणा घालशील त्या माझ्याच होतील.
श्याम: पण... मला बायका हसतील, मी नाही येणार... वडावर प्रदक्षिणा घालायला. शाळेत जाणारी माझे मित्र ‘अहा रे बायको !’ म्हणून माझी फजिती करतील. मला लाज वाटते. मी नाही जाणार जा... शिवाय शाळा बुडेल. मास्तरही रागावतील...
आई: श्याम आईचे काम करायला कसली रे लाज, देवाचे काम करायला लाजू नये, पाप करावयास माणसाने लाजावे. श्याम त्यादिवशी चुलीमागे खोबर्याचा तुकडा तू घेवून खाल्लास. मी बघितले पण बोलले नाही. जावू दे परंतु त्यावेळेस तुला लाज वाटली नाही आणि आता देवाचे काम करायला कसली रे लाज वाटते आहे ?
श्याम: आई, असं नको ग बोलूस.
आई: मग तो भक्तीविजय, पांडवप्रताप कशाला तरी वाचतोस. श्रीकृष्ण घोडे हाकी, धर्मावरची उष्टी काढी, काम करायला प्रदक्षिणा घालावयास तुला लाज वाटते नाही का ? नसशील जाणार तर मी जाईन हो एकटी. येवून जावून काय होईल. भोवळ येवून मरेन, सुटेन एकदाची.. देवाजवळ तरी जाईन (रडत) श्याम तुमच्या साठीच तर जगते रे मी...
श्याम: आई, रडू नकोस ग ! आई, येणार हो मी. कोणी हसो, काही म्हणो, पंुडलिक आई बापाची सेवा करून मोठा झाला. तुझे काम करून देवाचा लाडका होवू दे ! तुला माझा राग आला होय !
आई: नाही रे बाळ, आईला मुलाचा कधी राग तरी येतो काय रे? आणि तुझ्यावर मी कशी बरे रागावेन...
(आई श्यामला जवळ घेते.)
(अंधार)
प्रवेश 2:
पात्र - आई, गजरी, श्याम, बाबी, बापू, बन्या.
आई: (गजरी आत येते.) काय ग गजरे, आज मथुरी कांडायला नाही आली वाटतं ?
गजरी: मथुरा तापानं निजली आहे. त्यामुळेच तिने चंद्रिला पाठविलं आहे. तिला बरे वाटले म्हणजे येईल हो ती....
आई: बराच आलं का गं तिला ताप. तिच्याकडे बरं लक्ष दे हं ! बिचारी. (गजरी आत जाते.) श्याम... ये... श्याम... आज फुले आणायला नाही का रे जाणार ? मागच्या रविवार सारखा उशिरा गेलास तर एक सुद्धा नाही हो मिळणार. मग रडत बसशिल माळेला... नाही तर नाही, पण धुपारतीला चार फुले तरी आणून ठेव.
(श्याम आत जातो.)
श्याम: मी तर केव्हाच फुले आणली ग ! तू माळ करतेस काय ?
आई: आण तर.... मी येथे तुळशिजवळच बसते म्हणजे घरात देठे पडायला नकोत.
(श्याम कळी असलेले ओले फुलं देतो.)
श्याम: हे घे ग आई, आज की नाही मी भरपूर फुलं आणली.
आई: हे रे काय ? पाणी ठिबकते आहे. सर्व कळयाच तोडून आणल्या वाटते. म्हणूनच नीट फुलली नाहीत. अरे ! झाडावर फुलांना नीट फुलू तरी दयायचे की नाही. एवढा काय अधाशासारखा गेलास. उतावळा होवून...
(बन्या, बापू, बाबी सारी मुले येतात.)
बाबी: श्यामची आई, तुमच्या श्यामने सारी फुले तोडून आणली हो !
बापू: का रे श्याम, केव्हा चोरट्यासारखा जावून घेवून आलास सारी फुले ?
श्याम: अॅ हॅ... म्हणे चोरट्यासारखा... मी नेहमी नाही येत तुमच्याकडे फुले नेण्यासाठी.
बन्या: पण नेहमी आपण सारीजन बरोबरच असतो ना !
श्याम: मागच्या रविवारी मला उशीर झाला तेव्हा एकतरी फूल ठेवलेस का माझ्यासाठी ?
बाबी: पण मी माझ्या परडीतले देत नव्हते का तुला ? तूच तर फणकाÚयाने निघून गेलास. बरे ! पाहून घेईन म्हणून. असा सूड घ्यायचा होता वाटते तुला.
आई: अरे, हे रे काय ? बन्या, बापू ! ही घ्या तुम्हांला फुले आणि आमचा श्याम पुन्हा नाही हो करणार असे. नाही वागणार ना असे श्याम ?
श्याम: (हिरमुसत) नाही ग मी नाही तोडणार मुकी फुले.
बन्या: श्याम येत जारे संध्याकाळी फुले वेचायला. नाहीतर राग धरावयाचास तू. का आत्ताच येतोस लक्ष्मीबाई ताक दे, डेरं फुटलं मडकं दे, खेळ खेळायला.
आई: आता उशीर झाला रे मुलांनो, उदया खेळा हो बन्या बापू. (श्यामचे मित्र निघून जातात.) श्याम दुसर्याच्या घरची फुले त्यांना विचारून आणावी. अशी मुकी फुले तोडू नये. फुलांना झाडावर नीट फुलू दयावं. बाहेरच्या पाण्यात कळया किती वेळ टाकल्या तरी त्या फुलत नाहीत. आईच्या दूधावर बाळ पोसते तसे बाहेरच्या दूधावर पोसत नाही. देवाला एक फूल मिळालं तरी पुरे ! परंतु नीट फुलले असावे.
श्याम: आता मी नाही ग तोडणार अशी मुकी फुले आणि नाही करणार मित्रांचा राग, फजिती...
(अंधार)
प्रवेश: 3
श्याम: आई ग मी आंघोळ करतोय.
आई: थाम्ब, मी चोळून देते अंग.
(आई अंग चोळते, उरलेले पाणी श्याम घेतो, आई घरातून येते.)
श्याम: आई ! आई ! अंग पुस माझे, सारे पाणी संपले. थंडी वाजते आहे. लवकर पुस ना ग अंग...
आई: (आई अंग पुसत) श्याम आता देवासाठी फुले काढ हं !
श्याम: आई माझे तळवे ओले आहेत. त्यांना माती लागेल. माझे तळवे पुसना ग... !
आई: तळवे ओले आहेत म्हणून काय झाले ? कशाने पुसू ते ?
श्याम: तुझे पदर खाली पसर. त्यावर मी पाय पुसून घेईन व उडी मारीन मला नाही आवडत ओल्या पायाला माती लागलेली. पसर तुझे पदर. पसर ना ग.
आई: हट्टी आहेस रे श्याम अगदी, एकेक खुळ कुठून शिकून येतोस कुणास ठाऊक ? हं ठेव पाय !
(श्याम उडी मारून जातो. तो शुभंकरोती गात असतो. तेव्हाच.. )
आई: श्याम पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस तसाच मनाला घाण लागू नये म्हणून जप हो ! देवाला सांग शुद्ध बुद्धी दे म्हणून...
(श्याम आईजवळ रडत येतो व तिला बिलगतो.)
आई: शुभंकरोती कल्याणम्....
(अंधार)
प्रवेश 4
आई: श्याम गंगू अप्पा कडून जेवून आलास ना !
श्याम: होय ग.
आई: काय होतं रे जेवायला ? भाज्या कसल्या केल्या होत्या ?
श्याम: सारं काही होतं अगदी पोटभर जेवण केलं मी.
आई: पण पंक्तीत श्लोक म्हटलास की नाही ?
श्याम: श्लोक म्हटला ग.
आई: कोणता श्लोक म्हटलास रे ! आवडला काय लोकांना ?
श्याम: नेत्री दोन हिरे, प्रकाश अत्यंत ते साजरे... हा श्लोक म्हटला. म्हणून दाखवू काय ग ?
आई: बरं पुरेसा आहे. राहू दे !
(बन्या, बापू, बंड्या मुले येतात.)
सर्व: यशोदाकाकू तुमच्या श्यामने आज श्लोक नाही म्हटला हो...!
बन्या: सारे याला म्हण म्हणायचे परंतु याने म्हटलाच नाही. श्यामनेच मला शिकविलेला श्लोक मी म्हटला. मला की नाही शाबासकी मिळाली.
बंड्या: मला सुद्धा नरसू अण्णांनी शाबासकी दिली.
आई: (श्याम खाली बघत असतो.) श्याम माझ्याशी खोटं बोललास. श्लोक म्हटले म्हणून मला खोटं सांगितलेस...
बापू: श्याम केव्हा रे म्हटलास श्लोक ?
बंड्या: अरे ! त्याने मनात म्हटला असेल. आपल्याला कसे ऐकू येईल.
(सर्व हसतात.)
बन्या: पण देवाने तर ऐकलं असेल. चला रे... (सर्व जातात.)
आई: श्याम तू श्लोक म्हटला नाहीस ही एक चूक, खोटे बोललास ही दुसरी भयंकर चूक, देवाच्या पाया पड आणि म्हण, आता पुन्हा खोटे बोलणार नाही म्हणून, (श्याम उभाच असतो.) जा देवाच्या पाया पड. नाही तर घरी येवू देत त्यांना, मग मार बसेल. बोलणी खावी लागतील तुला. नाही ऐकत ना ! बरं मी आता नाही बोलणार कधीच तुझ्याशी.
(आई कोपÚयात जाते वडील येतात. श्याम हिरमुसून बसलेला.)
भाऊ: अरे श्याम हे काय ? का बरे ? अरे कोणता श्लोक म्हटलास तिथे ?
आई: श्यामने तिथे श्लोक म्हटलाच नाही मला येवून उगीच खोटे सांगितले. मी देवाच्या पाया पड व पुन्हा खोटे बोलणार नाही असे म्हण, म्हटले तर तो ऐकतच नाही. बघा ना !
भाऊ: होय काय रे ! उठतोस की नाही ? भिंतीजवळ उभा रहा. श्लोक म्हटलास काय ?
श्याम: (घाबरत) नाही म्हटलं.
भाऊ: मग खोटे का सांगितलं ?
श्याम: आता नाही पुन्हा खोटे बोलणार.
भाऊ: आणि ती देवाच्या पाय पड म्हणून सांगत होेती तर ऐकले नाहीस. आई वडिलांचे ऐकावे हे माहीत नाही वाटते. माजलास होय तू ...
(श्याम रडत आईच्या पायावर डोके ठेवतो.)
श्याम: आई चुकलो ग मी. मला माफ कर.
आई: देवाच्या पाया पड. पुन्हा असे खोटे बोलण्याची बुद्धी देवू नकोस अशी त्याला प्रार्थना कर.
(श्याम देवाजवळ उभा राहून देवाला लोटांगण घालतो.)
भाऊ: ये इकडे. (पाठीवर हात ठेवत) जा आता... आज शाळा असेल ना !
श्याम: आज सुट्टी आहे.
भाऊ: मग जरा नीज हवं तर...
(अंधार)
प्रवेश 5
आई: शेवटी व्हायचे तेच झाले. तुमच्या भावांनी घराबाहेर हुसकावून दिले.
भाऊ: अग भाऊबंदकी या भारत वर्षात आहे. भावाभावात प्रेम नाही. तिथे स्वतंत्रता कशी नांदेल ?
आई: पण आता मला माझ्या माहेरी राहावत नाही. मी जगावे असे जर तुम्हाला वाटत असेल तर स्वतंत्र घर बांधा. येथे खाणे-पिणे म्हणजे जीवावर येते बघा.
भाऊ: अग आपण आपलंच अन्न खातो ना ! फक्त येथे राहतो आहोत. घर बांधणे म्हणजे काय थट्टा आहे, तुम्हा बायकांना सांगायला काय ? पुरूषांच्या अडचणी तुम्हाला काय माहीत ?
आई: तुम्हा पुरूषांना स्वाभिमानच नाही मुळी.
भाऊ: आम्हाला स्वाभिमानच नाही. आम्ही माणसेच नाहीत जणू. दरिद्री माणसाचा सारी दुनिया अपमाण करते. मग बायको का नाही करणार. कर तुही अपमान कर. वाट्टेल ते बोल...
आई: (रडत) तुमचा अपमान करायचा माझा हेतू नाही हो ! उगाच काही तरी मनाला लावून घेवू नका. पण मला खरेच इथे राहावेसे वाटत नाही.
भाऊ: मलाही असे राहावे वाटत असेल काय ? परंतु आपली परिस्थिती माहीत आहे ना तुला. कर्ज आहे, त्यांचे व्याजही देता येत नाही. मग घर कशाने बांधायचे. कसे तरी गुरांच्या गोठ्या सारखे नाही ना घर बांधायचे. त्यात राहणे म्हणजे...
आई: गुरांचा गोठाही चालेल. परंतु तो आपला असला पाहिजे. अगदी गवताची झोपडी बांधा. तेथे राहण्यात मला अपमान वाटणार नाही. परंतु माहेरच्या माणसाकडे येवून राहण्यात मला अपमान वाटते हो. इथे माझ्या भावांच्या बायकाही अपमान करतील याचा नेम नाही. खरंच ऐका माझं. हवं तर हîा घ्या पाटल्या, हîा नाही पुरल्या तर ही नथही विका पण....
भाऊ: तुला इतके दुःख होत असेल हे नव्हते मला माहीत. असू दे आपण लवकरच लहानसे घर बांधू.
आई: काही झाले तरी घर स्वतंत्र आहे त्या घराची मी मालकीन... तिथून मला कोण ऊठ म्हणणार...?
(अंधार)
प्रवेश 6
(भाष्कर, बन्या, बापू मित्र श्यामला पोहायला न्यायला येतात.)
बन्या: श्याम ये श्याम... येणार ना आज पोहायला. हîा पहा सुकडी आणल्या आहेत.
आई: हो येणार आहे परंतु आहे कुठे तो...? मला वाटले की तुमच्याकडेच आलेला आहे. श्याम ये श्याम... कोठे बाहेर गेला की काय ?
बन्या: तिकडे आमच्याकडे तर नाही आला... कुठे लपून तर नाही ना बसला ? आम्ही वर पाहू का ?
आई: बघा बरे ! वर असेल तर... त्याला उंदिर घुशीसारखी लपण्याची सवय आहे.
सर्व मुले: सर्व चला रे तिकडे बघू.
आई: वरती जरा जपून हो !
भाष्कर: अरे तो बघा, त्या कनगीच्या पाठीमागे दडला आहे श्याम.
सर्व: (आत) श्याम चल ना रे, असा लपून बसतोस काय ?
आई: आहे ना तो.. घेवून जा त्याला.
सर्व: तो काही येत नाही हलतही नाही. रडतोय.
आई: बघू दे ! कसा येत नाही. कुठं आहे कार्टा ?
(आई त्याला फरकटत ओढते, दुसÚया हाताने मारते.)
तुम्ही हात धरा व ओढा. मी पाठीमागून हाकलते व झोडपते. बघू कसा येत नाही तो..
श्याम: नको ग मारू आई... आई... मेले ग..!
आई: काही मरत नाहीस. ऊठ, लाज नाही वाटत इथे लपून बसतांना ? मुलेही आली बघ तुझी फजिती बघायला.
श्याम: आई ग ! नको मारू .. आता जातो मी...
आई: निघ तर... पुन्हा पळालास तर बघ, घरात घेणार नाही...
(अंधार)
प्रवेश 7
श्याम: आई, आई, हे घे ग पैसे... (आईकडे पैसे देते.)
आई: कुठले रे पैसे ?
श्याम: शेवंती वाड्.निश्चयाचे मिळाले. घे ना ! पैसे मी काही चोरून आणले नाही.
आई: श्याम, आपण गरीब असलो तरी गृहस्थ आहोत. आपण भिक्षुक नाही. भिक्षुकीचा धंदा आपला नाही. आपण दक्षिणा घ्यायची नसते. दुसÚयाला दîायची असते.
श्याम: आपल्या गावातील पांडुभटजी किती श्रीमंत आहेत. त्यांनी तरी दक्षिणा घ्यावी काय ? हे कसले भटजी ?
आई: तो त्यांचा दोष आहे. पूर्वी भटजींना दक्षिणा जास्त मिळाली की ते गरिबांना देत. पण आता नाही वागत याप्रमाणे, अरे, आपण गृहस्थ असल्याने आपल्याला दक्षिणा घेण्याचा अधिकार नाही. श्याम, तू पुन्हा असा हात पुढे करू नकोस. ते दे पैसे, त्या बाळू गडीला देवू.
(बन्या येतो.)
बन्या: श्यामची आई, श्यामने आपण होवून पाण्यात उडी मारली हो ! श्याम लवकरच शिकेल चांगले पोहायला.
आई: अरे पाण्यात पडल्याशिवाय, नाकातोंडात पाणी गेल्याशिवाय भीती जात नाही. (बन्या जातो.) श्याम आता दहîाची कडी केली आहे. तुला आवडते म्हणून...चल खावून घे... !
श्याम: मला नको जा ! सकाळी मार-मार मारलीस आणि आता दही देतेस. हे बघ माझ्या अंगावर अजून वळ आहेत..
आई: (रडवेली) श्याम, तू भित्रा आहेस असे का तुला जगाने म्हणावे ? माझ्या श्यामला कुणी नाव ठेवू नयेत म्हणून मारले रे तुला... तुमची मुले भीत्री आहेत असे कोणी म्हटले तर तुला आवडेल ? तुझ्या आईचा अपमान तुला सहन होईल ? रागावू नकोस श्याम. चांगला धीट हो..!
(अंधार)
प्रवेश 8
भाष्कर: श्याम... ये श्याम, माझे की नाही आता दहाच श्लोक पाठांतरण व्हायचे राहिले. पाच, सहा दिवसांनी तर मला सगळी रामरक्षा पाठ होईल. तुला रे कोठपावेतो येते ?
श्याम: (संतापून) भाश्या, पुन्हा येशिल तर बघ असे हिणवायला. तुमच्याजवळ पुस्तक आहे म्हणून काय ? माझ्याजवळ पुस्तक असते तर.... तुझ्याआधी पाठ केली असती मी. मोठा आला आहे पाठ करणारा. जा आपल्या घरी नाहीतर.. (आई येते.)
आई: काय झाले रे भाष्कर ?
भाष्कर: श्यामची आई, मी नुसते माझी रामरक्षा पाचसहा दिवसात पाठ होईल असे म्हटले तर श्याम एकदम चिडून माझ्या अंगावर आला. म्हणे तुला मारीन नाही तर चालता हो म्हणतो...!
आई: हो, का ? श्याम, असे आपल्या शेजाÚयांना म्हणावे काय ? तूच चारदा त्याच्याकडे जाशील.
श्याम: तो मुद्दाम मला हिणवतो. तुला कोठे येते रामरक्षा असे म्हटले की नाही विचार याला ? जसा अगदी साळसूद. स्वतःचे काही सांगित नाही, खोटारडा कुठला ?
आई: मला रामरक्षा येते, तुला येत नाही, यात काय रे त्याने चिडविले. आपला कमीपणा दाखविला म्हणून रागवावे कशाला ? तो कमीपणा दूर करावा. तू सुद्धा रामरक्षा शिकावीस असे त्याला वाटते म्हणून तो तुला चिडवितो. रामविजय, पांडवप्रताप पुन्हा-पुन्हा वाचतोस पण रामरक्षा पाठ का करीत नाहीस ?
श्याम: भाऊ शिकवित नाहीत. मजजवळ पुस्तक नाही.
आई: भाष्करचे पुस्तक आहे ना ! ते त्याला नको असेल तेव्हा घेत जा.. नाही तर त्याच्या पुस्तकावरून उतरवून घे व पाठ कर. यात बिघडले कोठे ? हो की नाही रे भाष्कर ?
भाष्कर: होय ग काकू. (भाष्कर, आई जातात.)
(अंधार)
(श्याम रामरक्षा पाठ करतांना भाऊ प्रवेशतात.)
भाऊ: काय श्याम ? परवाचे स्तोत्र पाठ झाले काय रे सारे ?
श्याम: हो सारे झाले. तुम्ही माझी रामरक्षा म्हणून घेता का ?
भाऊ: पण तू कधी शिकलास आणि कोणी शिकविली ?
श्याम: भाष्करच्या पुस्तकावरून मी उतरवून घेतली व पाठ केली ?
भाऊ: बघू दे तुझी वही ? शाब्बास, अक्षर नीट आहेत. परंतु जरा लांबट काढावे असे बुटके काढू नये ? (आई येते.)
श्याम: बघ आई, कशी आहे माझी वही ?
आई: अरे, आपण चांगले केलेले आईला दाखवावे. नाही तर कोणाला ? वाईटाबद्दल मी रागावेन पण चांगले केल्याबद्दल कौतुकच करेन. आता झाली की नाही रामरक्षा पाठ. पुस्तक नाही म्हणून रडत बसला असतास तर झाली असती का पाठ ? अरे आपल्याला हात, पाय डोळे सारे आहेत. स्वतःच्या पायावर उभे राहावे. ज्याला बुद्धी आहे, मनात निश्चय आहे, त्याला सारे काही कळते. असाच कष्ट करून मोठा हो. परावलंबी कधी होवू नकोस परंतु एक लक्षात ठेव. दुसÚयापेक्षा आपल्याला जास्त येते या गर्वाने कुणाला हिणवू नकोस. दुसÚयालाही आपल्या जवळचे दîावे, आपल्यासारखे करावे.
भाऊ: लक्षात ठेवायचे हं ! आईचे म्हणणे..
श्याम: आई ! (भाऊ, आई श्यामला कवेत घेतात.)
(अंधार)
प्रवेश 9
(आई, धाकटा भाऊ पुरूषोत्तम असतांना.)
पुरूषोत्तम: अण्णा आला... अण्णा आला...
(बाहेरून आत ओरडत येतो, श्यामची पिशवी बघतो.)
आई: श्याम, उशिरा का निघलास ? जरा लवकर निघावे की नाही ?
श्याम: आई माझ्याच्याने चालवतच नव्हते ग, गळून गेल्यासारखे वाटे.
आई: मग कशाला बरे पायी आलास ? पुढे संक्रातीला यायचे होते.
श्याम: आई, मी तुला पाहण्यासाठी आलो. तू माझ्याकडे प्रेमाने पाहिलेस की शक्ती येते. ही शक्ती घेवून मी पुन्हा दापोलीच्या शाळेत जाईन.
आई: जा... पाणी घे, हातपाय धू. मी स्वयंपाक करते हं लवकर, तुला भूक लागली असेल ना ! (आई स्वयंपाक करतांना, श्याम आईजवळ बसते. तेवढ्यात भाऊ येतो. पुरूषोत्तम खेळत असतो.)
भाऊ: काय रे संध्या वगैरे झाली का तुझी ?
श्याम: नाही केली, करतो आता.
भाऊ: मग तेथे का बसला आहेस. चल ऊठ आता.
आई: आताच तो आलाय. गळून गेल्यासारखे वाटते म्हणून बसला थोडासा.. श्याम जा संध्या कर बाळ.
(श्याम देवाची प्रार्थना करतो.)
भाऊ: आणि हे केवढे डोके वाढविलेस ? हजाम मिळत नाही वाटते. नुसता कावळा झाला आहे. मागेच तुला दापोलीला सांगितले. तुला का आता शिंगे फुटायला लागली हो ! सकाळी त्या गोंध्या माल्याला बोलाव आणि डोकं तासटून घे. (श्याम रडतो व आईजवळ जातो.) काय झाले रडायला ? कोणी का मारले तुला ? सोंगे आणता येतात सारी.
आई: पण करील ना उदîा तो. तेथे पैसे दयावे लागतात. जवळ नसतील. नसेल केले. जा श्याम आरती कर मी पान वाढते.
(भाऊ आत जातो.)
श्याम: आई, मी आपला निघून जातो. मी येथे राहात नाही. मी आलो तर भाऊ किती रागे भरले बघ ना !
आई: असे नको रे श्याम, हे चांगले का ? अरे ते बोलले असतील तरी त्यांच्या मनात काय असते. आजकाल आपल्या वाईट स्थितीमुळे त्यांचे मन निराश असते. त्यांनी आजपर्यंत तुम्हाला वाढविले तर दोन शब्द बोलण्याचा त्यांना अधिकार नाही का ? इतकी वर्षे त्यांनी अपमान सोसले. खस्ता खाल्ल्या, तुमच्या विद्येसाठी कर्ज काढून स्वतः फाटका धोतर नेसून ते पैसे देतात. ते हîा दोन शब्दामुळे विसरावेस ? जुन्या माणसांना बरे वाटत नाही. लहान आहात तसेच तुला समंजसपणा यावा म्हणून बोलतात. मोठे झाल्यावर कोण बोलणार रे तुला ? आई, वडिलास बरे वाटावे म्हणून हजामत करण्यासाठी तयार नसावे ? आई बापाच्या धर्म भावना दुखावल्या जावू नयेत म्हणून इतकेही करू नयेे ?
श्याम: आई केसात कसला आहे ग धर्म ?
आई: श्याम, धर्म प्रत्येक गोष्टीतच आहे. काय खावे, काय प्यावे यातही धर्मच आहे. केस तरी तू का ठेवतोस, मोहच तो. मोह सोडणे म्हणजेच धर्म.
(भाऊ येतो.)
भाऊ: श्यामला आवडतात म्हणून पातोळे कर हं ! मी आंघोळ करून देवळात जातो. आज आवर्तने करणार आहे. श्यामसाठी दर पंधरा दिवसांनी गणपतीला एकदशमी करत असतो.
(वडील जायला निघताच श्याम एकटक बघत असतो.)
आई: श्याम, ते नेहमी म्हणतात, असतील बाळ तर फेडतील काळ. काळ आला तर त्यांना हाकलून सुख दयावं. किती प्रेम आहे रे तुमच्यावर...!
श्याम: आई चुकलो ग मी... (आई त्याला कवेत घेते.)
(अंधार)
प्रवेश 10
भाऊ: ( टाॅवेल हातात घेत.) माझे धोतर कुठं आहे ग ? दिसत नाही ते.
आई: त्याची दोन अंगपुसनी केली. किती फाटले होते ते.
भाऊ: अगं मग मी नेसू काय आज ? आणखी महिनाभर चालले असते ते.
आई: त्याचा अंत तरी किती पाहायचा. ते धोतर धुतांना मला रोज लाज वाटत होती.
भाऊ: अग, मला नेसायला सुद्धा वाटत होती परंतु करणार तरी काय ? लाज वाटली म्हणून वरून काही पैसे पडत नाही.
आई: हे धोतर नेसा आज.
भाऊ: हे कोठले आहे ? कोणी आणले ?
आई: अमृतशेठ कडून मी मागविले.
भाऊ: अगं पण तो उधार देत नव्हता. तुम्हाला उधार देवूून फसलो असेही म्हणाला. तू घेवून आलीस की मोहनला बोलावून गळ घातलीस ?
आई: मी ते विकत आणले. श्यामने जावून आणले.
भाऊ: श्यामने, आणि पैसे कुठले.?
आई: मी दिले
भाऊ: पण तुझ्याजवळ कुठून आले ?
आई: पुण्याहून अप्पाने त्या कृष्णाबरोबर पाठविले.
भाऊ: केव्हा आला ग कृष्णा ?
आई: झाले दोन दिवस.
भाऊ: पण तुझे ते लुगडे फाटले आहे त्याला ते झाले असते. तुझ्या भावाने पाठविलेली ओवाळणी त्यावर तुझा हक्क आहे.
आई: इतके वर्षे संसार केला. सुखदुःखे पाहली तरी पण आपण का निराळे आहोत. माझे सारे तुमचेच आहे. तुम्ही नेसले तरी मीच नेसल्यासारखे आहे. त्यातच माझा आनंद. घ्या त्याला मी कुंकवाचे बोट लावले आहे.
भाऊ: मला नवीन धोतर पण तुला...? मला वाईट नाही वाटणार काय ? अग तुला आनंद होते आहे पण मला तरी दुःखच होते आहे.
आई: असे मनाला उगीच लावून घेवू नका. तुम्हाला बाहेर चार चैघात जावयाचे असते. मला कुठे जायचे आहे बाहेर. आज दिवाळी, साÚयांनी हसायचे. आनंदी राहायचे. आम्हाला आनंद देण्यासाठी तरी आनंदित व्हा !
भाऊ: तुझ्यासारखी जन्माची सोबतीण असल्यावर मी का आनंदी होणार नाही. मी दरिद्री नसून श्रीमंत आहे. मग मी का हसणार नाही. मी का सुखी होणार नाही. दे ते धोतर...
(अंधार)
प्रवेश 11
भाऊ: श्याम ये श्याम...
श्याम: काय ग ?
भाऊ: तुझा कोणी इथे मित्र आला होता काय रे ?
श्याम: नाही बोवा, मीच आज बाहेर खेळायला गेलो होतो परंतु कुणीच आले नव्हते.
भाऊ: पाहुणे बळवंतरावाच्या खिशातील पाच रूपयाची नोट नाहिशी झाली. तू तर नाही घेतलीस ? घेतली असशील तर सांग ?
(आई पदराला हात पुसित येते.) अगदी खरेच ना ! नाही घेतलेस तू. कंपासपेटी किंवा कशाला घेतले असशील ? कंपासपेटी करिता पैसे मागत होतास ना तू !
आई: श्याम नाही हो घ्यायचा. तो रागावला, रूसला तरी कोणाच्या वस्तूला हात लावायचा नाही. अहो तेवढा गुण चांगला आहे त्याच्यात आणि काही केले तरी कबूल करतो. मागे एकदा वडी घेतली होती पण विचारताच कबूल केले. श्याम रडू नकोस रे, तू घेतले असे का मी म्हटले ? तू नाही घ्यायचास. मला माहीत आहे उगीच.
श्याम: (रडत) आई, तुझ्या श्यामनेच ती घेतली. ही घे ती नोट...आई ....
आई: श्याम पुन्हा असे हो नको करू. हाच पहिला व शेवटचा हात लावलास हो तू. चूक कबूल केले चांगलेच झाले. पण श्याम तू का रे घेतले होतेस पैसे.
श्याम: आई मोठा होण्यासाठी. पुस्तके वाचून मोठा होण्यासाठी.
आई: अरे, पण पहिलीच्या पुस्तकात चोरी कधी करू नये असे शिकला नाहिस ? मग आणखी दुसरी पुस्तके कशाला ?
श्याम: आई !! (श्याम जोराने रडतो, वडील बघत असतात.)
(अंधार)
प्रवेश 12
(हातात पिशवी घेवून श्याम भिजत येतो.)
श्याम: आई !!
पुरूषोत्तम: अण्णा आला... अण्णा आला...
आई: इतक्या पावसात कशाला रे आलास ? सारा भिजलास ना !
भाऊ: सोंडधरच्या पाÚहाला पाणी नव्हते काय रे ?
श्याम: हो, परंतु आलो कसातरी ?
भाऊ: त्यादिवशी एक बाई वाहून गेली हो त्यातून.
आई: गणपतीची कृपा. बरे ते कपडे काढ. कढत पाण्याने आंघोळ कर.
(धाकटा भाऊ लहानसे गाठोेडे सोडून पाहू लागतो.)
पुरूषोत्तम: अण्णा हा लहानसा सदरा कोणाचा ? हा नवीन कोट कोणाला रे ?
श्याम: मग सांगेन, घरात जा घेवून.
पुरूषोत्तम: आई ! हा बघा कोट, हा काही अण्णाच्या अंगाचा नाही. मला आणलाय हो आई.
(आई श्यामला पुसायला धोतर देते.)
आई: श्याम कोणाचा रे कोट ?
भाऊ: मोरू जोशाकडे दîायचा असेल. कापातल्या मुळîाने पाठविला असेल.
श्याम: नाही, हा मी पुरूषोत्तम साठी शिवून आणला आहे.
भाऊ: पैसे रे कोठले ? कोणाचे कर्ज काढलेस की फी चे दवडलेस ?
आई: कोणाच्या पैशाला हात तर नाही ना लावलास ?
श्याम: आई, त्या दिवशी तू सांगितलेस हाच पहिला व शेवटचा हात लावलेला. ते मी विसरेन काय ? मी कर्जही काढले नाही, चोरलेही नाही. फिचेही खर्च केले नाही.
भाऊ: मग उधार का शिवून आणलास ?
श्याम: भाऊ, तुम्ही मला खाऊला आणा, दोन आणे देत असत ते मी जमविले, त्यातून हा कोट शिवला. पुरूषोत्तम बघ तुला होतो काय ?
पुरूषोत्तम: अण्णा, हा बघा छान होतो. आत खिसाही आहे. माझी पेन्सिल हरवणार नाही. बघ आई ...
आई: श्याम तू वयाने मोठा नाहीस, पैशाने मोठा नाहीस परंतु मनाने आजच मोठा झालास. हेच प्रेम बाळांनो पुढेही ठेवा.
पुरूषोत्तम: आई याला कुंकू लाव ना !
आई: बाळ, आत घडी करून ठेव. उदîा कुंकू लावून देवाला नमन करून अंगात घाल आणि गणपती आणायला जा हो !
पुरूषोत्तम: गणपती बाप्पा मोरया...
(वडील श्यामला न बोलता डोक्यावरून हात फिरवतात. पुरूषोत्तमही कवेत येतो.) (अंधार)
प्रवेश 13
(भाऊ असतांना सावकाराचा नोकर येतो.)
वामनराव: तुम्ही आज यायला सांगितले तरी आले नाहीत म्हणून मीच आलो आहे तुमच्याकडे. मग काय भाऊराव व्याजाचे पैसे काढा. आजचा वायदा केला होता तुम्ही. पंच्याहत्तर रूपये तुम्ही दिलेच पाहिजे.
भाऊ: हे बघा वामनराव, दहा मन भात विकलं, काही नाचण्या विकल्या, इकडून-तिकडून भर घालून पंचेवीस रू. जमविले. आज इतकेच घेवून जा. मालकाची समजूत घाला. हळूहळू सारा फडशा पाडू. जरा मुले मोठी होवू देत वामनराव. शेणातले किडे का शेणातच राहतात हो ! तेही बाहेर पडतातच.
वामनराव: ते मी काही ऐकणार नाही. पैसे घेतल्याशिवाय हलणारही नाही. तुम्हाला नवीन घर बांधायला, मुलांना इंग्रजी शाळेत शिकवायला पैसे आहेत फक्त सावकाराचे देण्यासाठी नाहीत. सावकाराची वसूली आली नाही तर आम्हाला पगार कोठून मिळणार, अहो, आम्हाला मालकासमोर उभं रहायला शरम वाटते तुमच्यामुळे.
भाऊ: वामनराव ! काय सांगू तुम्हाला. घर ते काय ? उभारला हा गुरांचा गोठा. परंतु लहानसे घर बांधणीसाठी तिच्या पाटल्या विकाव्या लागल्यात.
वामनराव: घर बांधण्यासाठी पाटल्या विकल्यात, सावकाराचे देणे देण्यासाठी बायको विका. (आई त्वेषाने बाहेर येते.)
आई: या ओटीवरून चालते व्हा ! बायको विका असे सांगायला लाज नाही वाटत ? तुमच्या जिभेला काही हाड आहे की नाही ? तुम्हाला बायको आहे की नाही ? त्या सावकाराला सांगा घरादाराचा लिलाव करा, दवंडी पिटा, जप्ती आणा परंतु पोराबारांसमोर असे अभद्र बोलू नका हो ! (रडत खाली बसते.)
वामनराव: ठीक आहे तर, आम्ही त्याचीच वाट पाहात होतो. या महिन्यात जप्ती नाही आणली तर नावाचा वामण नव्हे मी. भाऊराव ऐका बाई-माणसाने असा आमचा अपमान करावा ? दîा ते पंचेवीस रूपये,
भाऊ: तू घरात जा... जातेस की नाही ?
(वामन पैसे घेवून रागात निघून जातो.)
तुम्हा बायकांना कवडीची अक्कल नसते. मघापासून किती जपून मी वागत होतो. पण उदîाचे मरण तुम्ही आजच ओढवून घ्याल. रागाने का कोणते काम होत असते. आमची कशी ओढाताण होते, तुम्हाला काय माहीत ?
आई: पदोपदी अपमान करून घेण्यापेक्षा आज मेलेले काय वाईट ? आणू दîा जप्ती, मोलमजूरी करू...झाडाचा पाला खावून जगू पण... (रडते.)
पुरूषोत्तम: आई ! तू रडू नकोस ग. तू सांगशील ते काम करू. आई रडू नकोस ग आई.
(दोघेही एकमेकांना आधार देत असतात.) (अंधार)
प्रवेश 14
श्याम: आई, दापोलीच्या शाळेत शिकणे अशक्य झाले ग. भाऊ फी देत नाहीत. शाळेत नादारी मिळत नाही. मी तरी काय करू ? वर्गात नादारीसाठी उभा राहिलो तर मास्तर म्हणतात अरे गरीब आहेस का तू, बस खाली ! आई, आपण एकदा श्रीमंत होतो हे लोकांना माहीत आहे परंतु आज घरी खायला नाही हे त्यांना माहीत नाही. वर्गात मुले हसतात ग.
आई: श्याम, तू आता शाळा सोडून दिली पाहिजेत.
श्याम: आई, आता इंग्रजी पाचवा वर्ग पास झालो. एवढ्यात शाळा सोडून काय करू. मला काय कमविता येणार.
आई: तुला रेल्वेत लावू असे हे म्हणाले होते. ते तरी काय करतील. तुला फी दîावी लागते. घरी कुरकुर करतात. मिळाली तर घरनोकरी बघू ...
श्याम: आई, एव्हानापासून का नोकरी करू... माझे स्वप्न, मी खूप शिकेन, कवी होईन, ग्रंथकार होईन, आई साÚया स्वप्नावर पाणी ओतायचे काय ग ?
आई: श्याम, गरिबाच्या स्वप्नांना धुळीतच मिळावे लागते. पुष्कळशा संुदर कळîांना किडीच खावून टाकते.
श्याम: आई, तुझ्या मुलाचे मातेरे व्हावे असे तुला का वाटते ?
आई: माझ्या मुलाने मोठे व्हावे, परंतु पित्याला दुःख देवून मोठे होवू नये. स्वतःच्या पायावर उभे राहून मोठे होता येत असेल तर त्याने व्हावे.
श्याम: आई मी काय करू ? मला मार्ग दाखव ?
आई: आई-बाप सोडून ध्रुव रानात गेला तसच तू घर सोडून जा... ध्रुवाने देवासाठी तपश्चर्या केली, तू विद्येसाठी कर. स्वतःच्या पायावर उभे रहा. उपासतापास काढ. मोठा हो, कोठेही असलास तरी मनाने मी तुझ्याजवळ आहेच.
श्याम: खरेच जावू काय ? आई, त्या औंध संस्थानात फी कमी आहे. मी तिकडे जावू काय ? माधुकरी मागून जेवन करीन. त्या लांबच्या गावात कोण मला हसणार. काम करून शिकेन. आई जावू न ग ?
आई: जा.. बाळा जा... माधुकरी मागणे पाप नाही. आळशी मनुष्याने भीक मागणे पाप आहे. जा कसाही रहा. चोरी करू नकोस. जीभ गोड तर सारे जग गोड जा... बाळ जा... ध्रुवाप्रमाणे जा...
(श्याम गाठेाडे घेवून जातो. आई बघतच राहते.)
(अंधार)
प्रवेश 15
(स्वगत ): ऐका हो ऐका, आज भाऊराव साने यांच्या घराची जप्ती होणार आहे हो !
(पुरूषोत्तम शाळेतून दप्तर घेवून येतो. आई खाटेेवर आजारी निजलेली.)
पुरूषोत्तम: आई ! सारे मुले मला शाळेत चिडवितात. का ग असे ? तुझ्या घराची जप्ती होणार, शेणाचे दिवे लागणार. आई आपणास येथून बाहेर काढणार काय ग ? आई काय ग झाले तुला ?
आई: बाळ देवाचीच मर्जी. मी तरी काय सांगू ? ज्याला भीत होते ते शेवटी झालेच. आता जगणे-मरणे सारखेच आहे.
(आई रडायला लागली. पुरूषोत्तम रडू लागतो. आईस चक्कर येते. खाटेवर झोपते.)
बाळ पाणी घे रे !
पुरूषोत्तम: आई, पाय चेपू काय ग ?
आई: जा बाळ, जरा बाहेर खेळ, शाळेत जावू नकोस. मला बरे वाटेल तेव्हा शाळेत जा. इथे कोण आहे दुसरे...
भाऊ: माझ्यामुळे तुझे हे असे हाल. तुला नीट खायला प्यायलाही मला देता आले नाही. मी अभागी आहे ग, काय करू मी ? आता काय करू ... (आई जवळ बसत)
आई: तुम्हीच हातपाय गाळलेत तर पुरूषोत्तमाने काय करावे ? पुरूषांनी धीर सोडू नये. तुम्ही मनाला लावून घेवू नका ? सारी सुखे भोगली. वैभवात लोळले. मला काही कमी नव्हते हो ! आलेले चार कठीण दिवस तेही जातील. मी पाहिले नाही ते मुलांचे वैभव तुम्ही तरी बघाल...
भाऊ: तू सुद्धा बरी होशील. सखू येणार आहे, ती करेल तुला बरी.
आई: कशाला खोटी आशा, आतून झाड पोखरले आहे सारे. ते पडणारच. सुवासिनी म्हणून जाईन तुमच्या मांडीवर. तुमच्या जवळ मरण यावे याहून भाग्य कोणते ? पाणी... थोडे पाणी दîा. तुमच्या हाताने. तुमच्या हातचे पाणी म्हणजे पावनगंगा. अमृताहुनही गोड, बसा आज माझ्याजवळ. (बेशुद्ध अवस्थेत) आली ? माझी वाट मोकळी झाली. ती मथी सारखी म्याॅव म्याॅव करते. तिला भात घातला का रे ? नाहीतर पोट दुखत असेल तिचं. मुकी बिचारी...
पुरूषोत्तम: आई ! श्याम... अण्णा येणार ग आई !! (रडत)
आई: (बेशुद्ध) त्या लिंबाला पाणी घाला रे. सुकून जाईल नाही तर... ती पहा दवंडी देताहेत. तो पहा त्या खुंटीवर श्याम बसला आहे. खाली ना रे ! ये श्याम... मला भेट. आईजवळ हट्ट नाही करायचा हं ! दवंडी देतात काय दîा म्हणावं...
भाऊ: हो ग मी तुझ्याजवळच आहे. असे बोलू नकोस. शांत हो... बरी होशील. तू.. मी वैदîाला बोलावतो...
पुरूषोत्तम: (रडत ) आई असं नको करूस ग !
आई: श्याम, मला भेटायला का रे आलास. तुझा अभ्यास सोडून. ये असा रूसू नकोस. मी दळायला लावले म्हणून रूसलास होय. आता नाही हो दळायला लावणार. आज चतुर्थी ना ! जा थोडी सोजी खावून घे... बाळा चांगला रहा. हट्ट नको धरूस हं ! दादा, अण्णा आहे तुला सांभाळायला... राम...
(भाऊ पुरूषोत्तम रडू लागतो.)
(अंधार)
(श्याम गाठेाडे घेवून येतो, भाऊ बसलेला.)
श्याम: (रडत) भाऊ !
भाऊ: श्याम, उशीर झाला रे बाळा तुला. तुझी आई तुला सोडून गेली रे ! श्यामची आई... गेली रे...!
पुरूषोत्तम: अण्णा... अण्णा..!
(दोघेेही एकमेकास मिठी मारतात. अस्थिकलश घेवून येतात श्यामच्या हातात देतात. वडील श्यामच्या खांदयावर हात ठेवून तिघेही रडत एक एक पाऊल पुढे टाकतात.)
गीत: आई कुणा म्हणू मी... आईस हाक मारी... स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी...
000 पूर्णविराम 000