Pathlag - 12 in Marathi Fiction Stories by Aniket Samudra books and stories PDF | पाठलाग – (भाग-१२)

Featured Books
  • जंगल - भाग 12

                                   ( 12)                       ...

  • इश्क दा मारा - 26

    MLA साहब की बाते सुन कर गीतिका के घर वालों को बहुत ही गुस्सा...

  • दरिंदा - भाग - 13

    अल्पा अपने भाई मौलिक को बुलाने का सुनकर डर रही थी। तब विनोद...

  • आखेट महल - 8

    आठ घण्टा भर बीतते-बीतते फिर गौरांबर की जेब में पच्चीस रुपये...

  • द्वारावती - 75

    75                                    “मैं मेरी पुस्तकें अभी...

Categories
Share

पाठलाग – (भाग-१२)

“काय??? थॉमसचा खुन???.. मी कश्याला करु थॉमसचा खुन??”, दिपक पुन्हा ओरडत म्हणाला..

स्टेफनीने त्याच्या तोंडावर हात ठेवला..

“हळु बोल म्हणलेले कळत नाहीये का तुला?..” स्टेफनीने इकडे तिकडे पाहीले. बाहेर अजुन सामसुमच होती.

“चल माझ्या बरोबर..”, दिपकचा हात ओढत ती त्याला म्हणाली.

दिपक बधीरावस्थेत तिच्यामागोमाग थॉमसच्या रुम मध्ये गेला.

स्टेफनीने पुन्हा एकवार कोणी नाहीये याची खात्री करुन घेतली आणि दिपकला घेउन ती खोलीत गेली.
खोलीत मिट्ट काळोख होता. स्टेफनीने दार लावुन घेतले आणि मग खोलीतला दिवा लावला.

थॉमसचा उघडाबंब अवाढव्य देह त्याच्या बेडवर अस्ताव्यस्त पडला होता. त्याच्या छातीमध्ये पार आतपर्यंत खुपसलेला एक भला मोठ्ठा सुरा तसाच रुतलेला होता.

भुत बघीतल्यासारखा दिपक त्या दृश्याकडे पहात राहीला.

“मुर्ख आहेस तु.. आता ह्याची विल्हेवाट कशी लावायची. इतकी काय घाई झाली होती तुला?”, स्टेफनी म्हणाली.

“मुर्ख तु आहेस. मी कश्याला मारु थॉमसला. उलट त्याने मला इथे लपुन रहायला जागा दिली. मला पोलिसांपासुन संरक्षण दिले. मी कश्याला माझ्याच पायावर कुर्‍हाड मारुन घेऊ?”, दिपक

“कश्याला म्हणजे.. पैश्यासाठी.. तुला पैश्याचा मोह सुटला होता.. तुला माझ्याबरोबर दुसर्‍या देश्यात पळुन जायची घाई झाली होती म्हणुन..”, स्टेफनी..

“मग हिच कारणं तुझ्यासाठी सुध्दा लागु पडतात स्टेफनी..”, चिडुन दिपक म्हणाला..”कश्यावरुन तुच हा खुन नाही केलास???”

“खुन करायचाच असता तर मी ७-८ वर्ष कश्याला थांबले असते.. केंव्हाच त्याला मारुन पळाले असते.. आणि हे बघ..” थॉमसच्या छातीकडे बोट दाखवत स्टेफनी म्हणाली..”हा सुरा बघ किती आतपर्यंत घुसला आहे. तुला वाटतं इतकी ताकद माझ्यामध्ये आहे? नक्कीच हा खुन करणारा कोणीतरी ताकदवान असणार…”

“म्हणुन मी?.. बिनडोक आहेस.. मी हा खुन केलेला नाहीये. आधीच एका खुनापासुन वाचण्यासाठी मी ठिकठिकाणी लपतोय.. त्यात अजुन एक खुन डोक्यावर घ्यायला मी काय च्युx आहे का??”, दिपक

“हा खुन तु नाही केलास, मी सुध्दा नाही केला.. मग केला कोणी???”, स्टेफनी
“हे बघ.. तो विचार करायची ही वेळ योग्य नाही.. आधी थॉमसला इथुन हलवायला हवे…”,

दिपक थॉमसच्या बॉडी शेजारी जाऊन उभा राहीला.. छातीतुन ओघळणारे रक्त पोटावरुन बेडशिटवर येऊन साकळले होते.

“साधारण ३-४ तासांपुर्वी हा खुन झाला असावा…हे रक्त बघ.. बर्‍यापैकी वाळलं आहे..”, दिपक
“च्चं.. ते जाऊ देत.. आधी ह्याचं काय करायचे ते सांग..”, वैतागुन स्टेफनी म्हणाली.

“तिन-चार दिवस थॉमस नाही दिसला तर लोकं नक्की विचारतील.. थॉमस कुठेतरी बाहेर गावी गेला आहे आणि किमान महीनाभर तरी परतणार नाही अस्ंच काहीसं सांगावं लागेल…”, दिपक म्हणाला..

“अरे पण एक महीना खुप वेळ आहे.. आणि तो पर्यंत हॉटेलचे भागवायचे कसे? सामान आणायला, लोकांचे पगार, इतर किरकोळ खर्च.. पैसे लागणारच की. आणि बॅंकांचा सगळा व्यवहार फक्त थॉमसच्या सहीनेच होतो.. पैसा आणायचा कुठुन?”, स्टेफनी..

“हे बघ.. ते बघु नंतर सध्या तरी मला हा एकच पर्याय सुचतो आहे.. तुला दुसरे काही सुचत असेल तर सांग..”, दिपक

स्टेफनीला दुसरे काहीच सुचत नव्हते..

“अरे पण महीनाभर? असं कुठलं काम असेल ज्यासाठी थॉमसला महीनाभर जावं लागेल?… आणि ड्र्ग्स? त्याचं काय ड्र्ग्स नाही मिळाले तर ही लोकं सैरभैर होतील.. उगाच काहीतरी नाटकं व्हायची…”, स्टेफनी

“दुसरा पर्याय नाही स्टेफनी.. सांगायचं काही तरी कारण…”, विचार करत दिपक म्हणाला.. “सांगायचं की कुठे तरी एक हॉटेल विकायचे आहे त्याचा व्यवहार करायला गेला आहे… मे बी.. कुठे तरी नॉर्थ साईडला.. सो त्याला यायला वेळ लागेल. एक महीना भरपुर वेळ आहे.. सगळं स्थिरस्थावर व्हायला. आपल्याला तो पर्यंत पुढे काय ह्याचं उत्तर शोधता येईल..” दिपक

“गुड आयडीया.. पण ह्याचं”
“तु म्हणाली होतीस तुमच्याकडे एक छोटी लॉंच आहे म्हणुन..”
“हो आहे…”
“मग ह्याला जलसमाधीच द्यावी लागेल.. कारण रस्त्यावर कुठेही टाकुन हा सापडला तर प्रकरण नव्याने उगवेल.. समुद्राच्या तळाशी पडलेला थॉमस कुणाला सापडणार नाही..”

“ठिक आहे.. चल तर मग..”, स्टेफनी आपले विस्कटलेले केस बांधत म्हणाली.
“आत्ता? वेडी आहेस का? बाहेर बघ.. पहाट व्हायला आली आहे.. लॉंच काही खोलीच्या दारापर्यंत येणार नाहीये.. सपोर्ट स्टाफची गडबड चालु आहे. आपल्याला नक्की कोण तरी पाहील..”, दिपक

“मग????”
“मला विचार करायला थोडा वेळ हवाय.. मी करतो काही तरी प्लॅन..”, दिपक
“अरे पण तेवढ्यात कोणी आतमध्ये आलं तर??”
“नाही येणार… तु जो पर्यंत काही प्लॅन ठरत नाही तो पर्यंत इथेच थांब.. आणि बाहेर फोन करुन सांग की तुझी तब्येत ठिक नाहीये… सो कोणी तुला डिस्टर्ब करु नये..”

“काय? नाही मी इथे.. इथे एकटी नाही थांबणार..” स्टेफनी थॉमसच्या प्रेताकडे पहात म्हणाली..
“एकटी कुठे आहेस तु स्टेफनी.. थॉमस आहे ना बरोबर.. हे बघ वेळ फार थोडा आहे.. डोन्ट वरी.. तु दार बंद करुन घे.. मी पटकन काही तरी ठरवतो..”

स्टेफनीला बोलायचा चान्सच न देता दिपक खोलीबाहेर पडलासुध्दा..

स्टेफनीने खोलीचे दार लावुन घेतले. तिची माघारी वळुन थॉमसच्या प्रेताकडे बघायची हिम्मतच होत नव्हती. ती तेथेच खोलीच्या दाराशी गुडघ्यात मान घालुन बसली.


दिपक आपल्या खोलीत परतला. झालेल्या घटनांवर त्याचा अजुनही विश्वास बसत नव्हता. ‘थॉमसचा खुन कोणी केला असेल??’ एकच प्रश्न त्याच्या डोक्यात राहुन राहुन येत होता.

स्टेफनीने स्वतःहुन हा खुन केला असेल असे त्याला वाटत नव्हते. ज्या प्रकारे आणि ज्या ताकदीने तो सुरा थॉमसच्या छातीत घुसला होता त्यावरुन स्टेफनीसारखी नाजुक स्त्री हे काम करु शकेल असे त्याला वाटत नव्हते.

कदाचीत स्टेफनीने दुसर्‍या कुणाच्यातरी मदतीने हे केले असण्याचीच शक्यता अधीक होती.

अर्थात हा विचार नंतरही करता येण्यासारखा होता. सर्वात प्रथम थॉमसच्या प्रेताची विल्हेवाट कशी लावायची ह्याचा विचार करणे अधीक महत्वाचे होते.

विचार करुन करुन दिपकचे डोकं फुटायची वेळ आली होती. अनेक पर्याय त्याने तपासुन पाहीले परंतु कुठलाच पर्याय त्याला पसंद पडत नव्हता. त्यात थॉमस म्हणजे अगडबंब देह, तो सहजासहजी न्हेणं मुश्कीलीच होतं.

घड्याळात दहा वाजुन गेले तसं दिपक खोलीच्या बाहेर पडला. स्टेफनी त्या बंद खोलीत थॉमसच्या प्रेताबरोबर कसा वेळ घालवत असेल असा एक विचार त्याच्या डोक्यात येऊन गेला.

दिपक लॉऊंजमध्ये आला. सहजच म्हणुन त्याने एका वेटरला विचारले.. “स्टेफनी मॅडम कुठे आहेत? थोडं काम होतं माझं..”

तो वेटर म्हणाला.. “मॅडमची तब्येत बरी नाहीये.. त्या खोलीतच झोपुन आहेत.. कुणी डिस्टर्ब करु नये म्हणुन सांगीतले आहे…”

दिपकने मान डोलावली आणि तो बाहेर आला.

स्टेफनीला एकटं खोलीत सोडुन ४ तास होऊन गेले होते. तिची परीस्थीती दिपकला समजत होती म्हणुन एक तिला धावती भेट देऊन यायचं ठरवले आणि तो तिच्या खोलीकडे गेला. दारावर एकदा वाजवताच स्टेफनीने दार उघडले. दारात दिपकला बघताच तिने त्याला घट्ट मिठी मारली.

बावचळलेल्या दिपकने तिला आत ढकलुन दार लावुन घेतले.

“काय करते आहेस तु स्टेफनी…??”
“प्लिज.. मला इथुन बाहेर काढ दिपक.. वेड लागेल मला इथे..”
“हो.. हो.. माहीती आहे मला.. पण काही योग्य मार्ग तर सापडला पाहीजे..” दिपक तिला समजवत म्हणाला..

“आय डोन्ट केअर… चल पळुन जाऊ इथुन.. राहु देत ही बॉडी इथेच.. जो पर्यंत कळेल तो पर्यंत आपण इथुन खुप लांब निघुन गेलो असु..”, इंपेशंट होत स्टेफनी म्हणाली..

“डोन्ट अ‍ॅक्ट स्ट्युपीड.. आपण लगेच पकडले जाऊ….”.. दिपक थॉमसच्या डेड बॉडी जवळ जात म्हणाला. त्याने थॉमसचा हात दाबुन बघीतला आणि म्हणाला..” तसंही आपल्याला जास्त वेळ घालवुन चालणार नाहीये.. बॉडी कडक व्हायला लागली आहे.. आधीच ह्याला हलवणं कठीण. बॉडी कडक आणि जड झाली तर अजुन प्रॉब्लेम्स वाढतील…”

स्टेफनी अजुनही दरवाज्याकडेच तोंड करुन उभी होती. दिपक तिच्या जवळ गेला..

“हे बघ.. मला अजुन एक तास दे.. त्याच्या आत नक्कीच काही ना काहीतरी मार्ग काढेन..” असं म्हणुन तो खोलीतुन बाहेर पडला. स्टेफनीने दार लावले आहे ह्याची त्याने एकदा खात्री केली आणि तो बाहेर बागेत आला.

दिपकचा धीर आता सुटत चालला होता. स्टेफनी म्हणत होती तसं सकाळीच बॉडी हलवली असती तर बरं झालं असतं असं त्याला वाटायला लागले होते. रिस्क होती.. पण उलटणार्‍या वेळेबरोबर रिस्क अधीकच वाढत चालली होती. बॉडी कुजायला लागली आणि त्याचा दुर्गंध बाहेर आला तर पंचाईतच होणार होती.

दिपक आपल्याच विचारात मग्न होता इतक्यात मागुन एक हाक ऐकु आली.. “एस्क्युज मी…”

दिपक मागे वळला आणि समोर उभ्या असलेल्या त्या व्यक्तीला पाहुन त्याच्या पायाखालची जमीनच सरकली…

“तु???”.. दिपक त्या व्यक्तीकडे पहात म्हणाला…..

[क्रमशः]