Fulacha Prayog.. - 10 in Marathi Short Stories by Sane Guruji books and stories PDF | फुलाचा प्रयोग - 10

Featured Books
  • THE UNTOLD CHAPTER - 1

    समय का चक्र: अध्याय 1कुछ प्रेम कहानियाँ खत्म नहीं होतीं. वे...

  • Dream House

    रीतिका आज बहुत खुश है क्योंकि उसका सपना जो पूरा हो गया। उसने...

  • इश्क या जुनून - 9

                        ,,,स्कूल एडमिशन,,,                      ...

  • प्यार की एक नई शुरुआत - 2

    लडकी बेड पर बैठी हुई उस लडके को ऊपर से नीचे तक गौर से देखती...

  • Mafia King - 10

    हॉल का नज़ारा एकदम अलग था। धूप खिड़की से छनकर आ रही थी और फर्श...

Categories
Share

फुलाचा प्रयोग - 10

फुलाचा प्रयोग

पांडुरंग सदाशिव साने

१०. सर्वज्ञ माधव

सर्वज्ञ माधव

तो गाव फार मोठा नव्हता. फार लहानही नव्हता. समुद्रकाठी होता तो; परंतु गावाची हवा बिघडली होती. जिकडे तिकडे दलदली झाल्या होत्या. त्यामुळे बेसुमार डास झाले होते. गावात हिवतापाच्या साथीचा कहर होता. घरोघर अंथरूणे पसरलेली होती. माणसांचे सापळे झाले होते; परंतु कोण नष्ट करणार हया दलदली? श्रीमंत लोक शहरांत राहू लागले. त्यांना हया लोकांची करुणा येईना. लोकांचे जीवन सुखी करणे म्हणजे धर्म असे कोणाला वाटेना. एका श्रीमंताने त्या गावात आणखी एक मोठे मंदिर बांधायचे ठरविले. लाख दोन लाख रुपये खर्च होणार होते. त्या श्रीमंताला एक विचारी तरुण म्हणाला, ‘मंदिर कशाला आणखी बांधता? मंदिरातील देव दूर राहातो व शेवटी ती विलासमंदिरे होतात. आपल्या गावात आरोग्य नाही. गटारे बांधायला हवीत. दलदली बुजवायला हव्यात. त्यासाठी करा ना हे दोन लाख रुपये खर्च. लोक निरोगी होतील. हे शरीर म्हणजे आत्मारामाचे मंदिरच. ही देवाची मंदिरे आज रोगांनी खिळखिळी झाली आहेत. ती चांगली होतील. हा खरा धर्म आहे.’ परंतु तो श्रीमंत त्या तरूणावर एकदम ओरडला, ‘मंदिरापेक्षा का गटारे थोर? नास्तिक आहात तुम्ही. निघा येथून.’

‘एक दिवस उजाडेल व माझा विचार जगाला पटेल,’ असे म्हणत तो निघून गेला.

असे ते रोगपिडीत गाव होते. त्या गावात एक भला मोठा वाडा होता. त्या वाडयात एके काळी शंभर माणसे वावरत होती; परंतु आज तेथे दोनच टकल्या होत्या. एक मालकाची व दुसरी भय्याची. त्या वाडयाची नीट झाडलोटसुध्दा करणे कठीण होते. मालक नेहमी दिवाणखान्यात बसलेला असे. तो फारसा कधी बाहेर पडत नसे. दिवाणखान्यात खिडक्या नेहमी बंद असत. दारे बंद असत. दिवसाही तेथे दिवे असत. त्या मालकाचे नाव माधव.

माधव मोठा विचित्र मनुष्य होता. त्याचे वय पंचवीस - तीस असेल. लोक त्याला सर्वज्ञ माधव असे म्हणत. लोक त्याला भीत. त्याला आदरीत. कधी साठीसहामासी जर तो बाहेर पडला, तर त्याच्या पाया पडण्यासाठी झुंडीच्या झुंडी जमत. तो मग वैतागाने पळत सुटे. लोकांना शिव्या देई. माधवाने लग्न वगैरे केले नाही. विद्येशी त्याने लग्न लावले होते. सर्व प्रकारचे ज्ञान आपल्याला हवे असे त्याला वाटे. सर्व शास्त्रांचा त्याने अभ्यास केला होता. त्याच्या दिवाणखान्यात सर्व ज्ञान-विज्ञानाची पुस्तके आहेत. तेथे पृथ्वीचा नकाशा आहे. तार्‍यांचेही नकाशे आहेत. तेथे प्रयोगालयातील उपकरणे आहेत. तेथे सारे आहे.

माधवाने तत्तवज्ञानाचा अभ्यास केला होता, कायद्यांचा अभ्यास केला होता, त्याने सृष्टिशास्त्र व रसायनशास्त्र हयांचा अभ्यास केला होता. भूगर्भशास्त्र, वनस्पतिशास्त्र, ज्योतिषशास्त्र सर्वाच अभ्यास केला होता. भूगोल व खगोल दोन्हींचा त्याने अभ्यास केला होता. एवढेच नव्हे, तर भूतविद्या, प्रेतविद्या, पिशाच्चविद्या हयांचाही त्याचा गाढ व्यासंग होता. मंत्रतंत्रात तो प्रवीण होता. आयुर्वेद व आधुनिक औषधिविज्ञान हयातही तो पारंगत होता. त्याला अमुक एक माहीत नाही, अमुक एक येत नाही असे नव्हते. वाङमय, कला, शास्त्रे सर्वात त्याची बुध्दी चाले.

माधव रात्रंदिवस वाचीत बसे. रात्रंदिवस अनंत ज्ञानाची उपासना. बाहेर लक्ष जाईल म्हणून तो खिडक्या, दारे उघडीत नसे. त्याच्या अंगाला वारा कधी लागला नाही, सूर्यकिरणांनी स्पर्श केला नाही. किती तरी दिवसांत त्याने फुले पाहिली नाहीत, पाखरे पाहिली नाहीत; तारे पाहिले नाहीत, नद्या पाहिल्या नाहीत. पुस्तकातील फुले, फुलपाखरे तो पाही. नकाशात तो तारे पाही, नकाशात नद्या पाही. सारे ब्रह्मांड त्या दिवाणखान्यातील पुस्तकात व नकाशात होते.