लहानपण देगा देवा । मुंगी साखरेचा रवा ॥
तुकाराम महाराजांचा हा अभंग सगळ्यांनाच माहित आहे.पण अर्धसत्य हेही आहे कि हा अभंग एवढाच माहिती आहे.आज बालकदिन. सगळी मोठी मंडळी आपल्या बालपणाच्या आठवणींमध्ये काही वेळासाठी का होईना
रममाण झाली,लहानपणीचे फोटो स्टेट्स ला ठेवल्या गेले, वेगवेगळे विनोद,सगळ्यांना ते दिवस पुन्हा जगावेसे वाटले, पण सध्या जी लहान पिढी आहे त्यांच्याबद्दल बोलायचं झालं तर हि पिढी 90 च्या दशकातल्या पिढीपेक्षा कितीतरी पुढे आहे.
सध्याच्या बदलत्या वातावरणात या पिढीत निगरसता कमी आणि स्पर्धा जास्त आहे. अर्थातच स्पर्धा विकासासाठी गरजेची आहे,पण आजची परिस्थिती म्हणजे 2 दिवसाच्या बाळाचं करिअर ठरवणारे पालकही आहेत.90च्या पिढीसोबत तुलना करायची झाली तर तेव्हा एवढे शोध नव्हते. अगदी मोजक्या घरी टीव्ही असायचा, त्यात शक्तिमान आणि सोनपरी अश्या मालिकांमध्ये लहान मुलांचं विश्व समावलं होत. अगदी आजीने सांगितलेल्या राजा राणी, राक्षस यांच्यावरही त्यांचा विश्वास होता."लवकर झोप नाही तर राक्षस येऊन घेऊन जाईल" एवढं म्हटल तरी तेव्हा मुले गप्प डोळे मिटून झोपायची, आणि आता राजा राणी ,शक्तिमान अस सांगितले तर हि आताची मुले लगेच "काय overacting आहे अस म्हणतात." हि मुले practical विचार करणारी आहे. त्यांना उपलब्ध असलेल्या साधनांचा ते पूर्ण वापर करतात आणि त्यामुळे आजची लहान पिढी हि advance आहे.
पण जसं नाण्याच्या दोन बाजू असतात तसच प्रत्येक गोष्टीला सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही बाजू असतात. सगळ्याच वेळी सगळ्या व्यक्ती सकारात्मकच असतील अस नाही. आजच्या नवनवीन व्हिडिओ गेम्स मुळे, action चित्रपट यामुळें लहान मुलांमध्ये हिंसक वृत्ती वाढत आहे.
आईवडिलांना कामाच्या व्यापातून वेळ मिळत नाही त्यामुळे मुले टीव्ही, इंटरनेट यावर च वेळ घालवतात, मैदानी खेळ खेळत नाही, त्यामुळे शरीर सुदृढ नाही, फास्टफूड मुळे प्रकृती ढासळत आहे.
लहान वयात सगळ्यात जास्त प्रश्न पडतात, 90 च्या दशकातही पडायचे आणि आताही पडतात. पण 90 च्या दशकात पडलेले प्रश्न आईवडील, शिक्षक नातेवाईक किंवा मित्रांना विचारले जायचे, प्रश्न चांगला असेल तर उत्तर मिळायचं, आणि जर प्रश्न लहान वयाच्या मुलांसाठीचा नसेल तर श्रीमुखात बसायची. पण त्या माऱ्यामुळे पुन्हा त्याबाबद्दल विचार करायची किंवा विचारायची हिम्मत होत नव्हती. आणि त्यामुळेच बालपण टिकून होत,
आज अस नाहीय, अगदी 10 12 वर्षेच्या मुलाला मुलगा मुलगी ,यातलं अंतर हे सगळं माहित आहे, तसं हे काही चुकीचं हि नाही, पण त्यांना पडणारी प्रश्न ते इंटरनेटवर , सोशिअल मीडिया वर अस वेगवेगळ्या ठिकाणी शोधतात, कधीकधी चांगल्या गोष्टी सुद्धा अतिशय हिंसक वा अश्लीलपणे दाखवलं जात, त्यामुळे त्याचा विपरीत परिणाम लहान मुलांवर होतो, परिणामी हि मुले स्वतःला समंजस समजयला लागतात, लहान वयात निरागसता जाऊन वेगळ्याच गोष्टीची उत्सुकता लागते. मोठ्यांचे अनुकरण केल्या जातं आणि बरंच काही.
आजच्या अश्या परिस्थिती ला हि मुलंच कारणीभूत नाहीत , तर त्यांचे आईवडील हि आहेत, त्यांची बदलती जीवनशैली आहे. मुलांना पुरेसा वेळ न देणे हे त्यामागचं मुख्य कारण. घरात जस वातावरण असतं तसच तिथलं मूल घडत असत. मुलांवर संस्कार करण्यासाठी ते संस्कार आधी स्वतःमध्ये असणं गरजेचं आहे.
बालपणात आपण समोरचा व्यक्ती काय करतोय हे पाहून त्याचे शब्द ऐकून तसा वागण्याचा प्रयत्न करतो मग ते चुकीचे आहे कि बरोबर हे आपल्याला त्या वयात समजत नाही... पण आपण जसजसे वयाने मोठे होतो तेव्हा चूक काय किंवा बरोबर काय याची जाणीव होऊ लागते... तरीही समोरची व्यक्ती चांगली किंवा वाईट छाप आपल्यावर सोडून जात असतेच... आणि हीच शिकण्याची प्रक्रिया शेवटच्या क्षणापर्यंत जपता आली पाहिजे... लहान राहूनच शिकले तर त्याचा परिणाम जास्त आणि योग्य दिसतो. म्हणून हि गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला हवी कि आपलं अनुकरण करणारे आपलीच मुले आहेत. आपलं चुकीचं पाऊल कदाचित त्यांचं भविष्य बिघडवू शकतं. लहान मुलांसोबत लहान बनून जगायला हवं,नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती देतांना त्याच्या फायद्याचा न तोट्याचा दोन्ही विचार करायला हवा.
मीपणा म्हणजे अस्त. केवळ स्वतःच गुणगान गाईलं तर तो अहंकार बनतो, म्हणून लहान रहा आणि जीवनाचा भरपूर आनंद लुटा.
आपले बालपण परत मिळू शकत नाही पण आपल्यातल्या त्या निरागस लहान मुलाला जपण्यासाठी आणि पाय कायम जमिनीवर ठेवण्यासाठी संत तुकारामांचा हा पूर्ण अभंग ..
लहानपण देगा देवा । मुंगी साखरेचा रवा ॥१॥
ऐरावत रत्न थोर । त्यासी अंकुशाचा मार ॥२॥
महापूरे झाडे जाती । तेथे लव्हाळ वाचती ॥३॥
जया अंगी मोठेपण । तया यातना कठीण ॥४॥
तुका म्हणे बरवे जाण । व्हावे लहानाहून लहान ॥५।।