Prerak Vichar - 5 in Marathi Motivational Stories by Arun V Deshpande books and stories PDF | प्रेरक- विचार . भाग - ५ वा

Featured Books
  • अपराध ही अपराध - भाग 24

    अध्याय 24   धना के ‘अपार्टमेंट’ के अंदर ड्र...

  • स्वयंवधू - 31

    विनाशकारी जन्मदिन भाग 4दाहिने हाथ ज़ंजीर ने वो काली तरल महाश...

  • प्रेम और युद्ध - 5

    अध्याय 5: आर्या और अर्जुन की यात्रा में एक नए मोड़ की शुरुआत...

  • Krick और Nakchadi - 2

    " कहानी मे अब क्रिक और नकचडी की दोस्ती प्रेम मे बदल गई थी। क...

  • Devil I Hate You - 21

    जिसे सून मिहींर,,,,,,,,रूही को ऊपर से नीचे देखते हुए,,,,,अपन...

Categories
Share

प्रेरक- विचार . भाग - ५ वा

मित्र हो - नमस्कार ,

प्रेरक -विचार भाग -५ वा आपल्या अभिप्रायासाठी देतांना खूप आनंद होतो आहे. हे लेखन वाचून कसे वाटले ?,

आपले अभिप्राय जरूर कळवणे.

१.

लेख -

शाळेत जाणऱ्या मुलांचा डबा .

---------------------------------------------------

रोजच्या दैनंदिन वेळापत्रकाच्या ताब्यात राहून आपण सारेजण अतिशय कंटाळून गेलेलो असतो ,घर ते कार्यालय आणि परत कार्यालय ते घर " या येण्याजाण्याच्या रस्त्यावरून कधी काळी आरामात आणि रमत-गमत जाता येत होते " असे म्हणायची वेळ फक्त मोठ्या शहरातील लोकांच्यावर आहे असे मुळीच नाही , लहान मोठ्या शहरातील, गावातील स्थिती फारशी वेगळी नाही " तिथल्या मानाने आता तिथेही "गर्दी आणि गोंधळ " आहेच आहे . जुन्या खाणखुणा नाहीशा होऊन ,त्या ऐवजी अनेक नव्या गोष्टी येणे "हे टाळता येण्याची गोष्ट नाही .कारण कालानुरूप बदल होतच असतात ..आणि बदल हा हवाच असतो ..कारण यातच उद्याच्या बदलत्या युगाची चाहूल लागत असते .

आधुनिक सुख-सोयी "नेहमीच उपयुक्त असतात ..त्यांच्या येण्यामुळे सवयीच्या झालेल्या अनेक जुन्या झालेल्या सुख-सोयी कालबाह्य झाल्या म्हणून त्या निरोपयोगी होत नाहीत ,पण,नव्या कार्य पद्धतीत त्यांचे असणे अनेक दृष्टीने अडचणीचे ठरणारे असते " अशावेळी "जुन्याच्या प्रेमात असणारी मंडळी- नव्याच स्वागत मोठ्या अनिच्छेने करीत असते ", खरे तर "होणारा बदल आवश्यक आहे" हे त्यांना मनातून मान्यच असते " पण वरकरणी विरोध दर्शवित रहातात हे मात्र खरे..

कोणते ही बदल "सुचवले जातात -त्यावेळी आपोआपच दोन गट तयार असतात ..बाजूने बोलणारे आणि विरोधात बोलणारे " हे दोघे आपल्या मतांचे कितीही समर्थन करू देत ..सार्वजनिक आणि बहुजन हितार्थ .."नव्या गोष्टी , नवे उपाय " नव्या पद्धती " अशा अनेक स्वरूपात "बदल होतच असतो ",

यात आणखी एक गंमत आहे .."बदल हवाच असतो ..म्हणून "बदल होत असतो " असे म्हणणे अधिक सयुक्तिक ठरावे.

आपण आपल्या वैयक्तिक-आयुष्यातील गोष्टींची उदाहरणे घेऊन पाहू या .म्हणजे यावर अधिक प्रकाश पडू शकेल.

हे खालील दृश्य आठवून पहा -

तेच काय ग आई ..!

जरा बदलून दे ना .छान काही तरी ..!

२. मोठ्या माणसांना डबे देतांना याच सुचना ऐकाव्या लागतात

३. सकाळ-संध्यकाळ एकच एक स्वयंपाक नाही चालत आमच्या घरी कुणाला ,

दोन्ही वेळा ताजा आणि दर वेळी बदलून लागतात भाज्या ..ही तक्रार आस्ते आणि त्याला कौतुकाची किनार पण असते .मोठा गम्मतशीर मामला असतो हा .

४. महिन्यातून एकदा तरी .घरी जेवण न बनवता .बाहेर मस्त कुठे तरी जाऊन हॉटेलिंग करणे " म्हणजे सर्वंना आवडणारा बदल असतो ज्यामुळे रुची-पालट " साधला जातो .

५. कधी कधी आपला एखादा मित्र , कुणी परिचित ..भेटो आणि भरभरून बोलू लागतो -

काय सांगावं राव -सध्या आपल्या सर्वांचाच -रुटीन इतका बोरिंग झालय की .यातून बाहेर पडण्यासाठी ..बदल हवाच .म्हणून आम्ही तर दोन-तीन महिन्याला मस्त निसर्ग-रम्य ठिकाणी जाऊन येतो ..किती सुखद बदल अस्तोम्हणून सांगू ,

तुला सांगतो मित्र -तू पण असेच ठरव आणि ठरवून कर कारण , हा असा बदल "म्हणजे आजच्या काळाची गरज आहे "

आता मला सांगा- मित्राचे हे तळमळीचे सांगणे .आणि त्यातीली भावना .दुर्लक्ष करण्याइतकी किरकोळ आहे का ?

घराची जबाबदारी समर्थपणे सांभाळणार्या गृहिणीची कार्यतत्परता .हे तिच्या "योग्य वेळी योग्य ते बदल करण्याच्या कार्यशैलीत "दिसून येत असते

घराची सजावट , फर्निचरची मांडणी , खिडक्या -आणि घरातील पडदे , त्यांची रंग-संगती , किचन आणि त्यातील सोयी ,या सगळ्या गोष्टी .वेळोवेळी आवश्यकते प्रमाणे .कमी-जास्त केल्या जातात , त्यांच्या जागा बदलतात , हे काम सोपे नाहीये , उलट चिकाटीचे आणि परिश्रमपूर्वक करण्याचे काम असते.,ज्या वेळी हे काम केले जाते, त्यानंतर पहाणार्याला .आपल्याच घरचे बदललेले स्वरूप थक्क करून टाकणारे असते. "जादूची कांडी " फिरवावी ,तसे होऊन जाते .असा हा बदल हवाच असतो .मोठा सुखद .

चालू असलेल्या गोष्टी न बदलता तशाच चालू राहिल्या तर .त्यात एक साचलेपणा येतो ..आणि साचलेपण म्हणजे त्यातली स्थिरता " ,अशा शैलीला माणूस फार काल सहन करू शकत नाही ..कारण गतिशीलता .हा आपल्या कृतीशील जीवनशैलीचा एक भाग असतो , त्यामुळे "एकच एक गोष्ट ..परत परत तशीच पुन्हा ? कित्दा ?,मग यातूनच ,

आलेले साचलेपण , मरगळ झटकून टाकण्यासाठी .नवे बदल ..येणे हे क्रमप्राप्त असते ,म्हणूनच " संभाव्य -बदल होणार " हा सूचक संदेश देखील खूप परिणामकारक असतो.

चाकोरीबद्ध -जगणे कुणालाच आवडत नसते , तेच तेच वातवरण .त्यात काही बदल नाही .असे जर कार्यालयीन वातावरण असेल तर .अशा ठिकाणी कार्यरत कर्मचारी यांत्रिकपणे येतात आणि जातात ..असे वातवरण मुळीच उपयुक्त नसते " हे आता सर्वमान्य झाले आहे .अर्थातच .कार्यालयीन वातवरण नित्य-नूतन ",बदलते असावे .या दृष्टीकोनातून .नित्य-नवे बदल सुचवले जातात आणि त्याची त्वरित अंमलबजावणी देखील केली जाते ".याचे कारण काय ? याचे उत्तर पुन्हा तेच.. "बदल हवाच असतो "..म्हणून बदल केला जातो.."

कोणते ही क्षेत्र असू द्या . सर्व ठिकाणी .बदल अपेक्षित असतो, आणि तो ठरवून केला जात असतो .कधी सर्व संमतीने , कधी विरोध असतांना , कधी हे निर्णय अप्रिय असतात -तरी ते घ्यावे लागतात .कारण या बदलाने प्रतिकूलता जाऊन अनुकूल परिस्थती येणार असते .म्हणून बदल हवाच असतो.

पिढी दर पिढी .हे चक्र चालूच रहाणे आहे .आपण ही आपल्या मनाच्या ठायी लवचिकता ठेवयला शिकले पाहिजे , नव्या गोष्टींच्या स्वागतासाठी मनाची तयारी केली पाहिजे, प्रसंगी ती दाखवली सुद्धा पाहिजे .कारण यामुळे ..होणारे बदल .संघर्ष न होता केले जातील हे नक्की.

----------------------

लेख-२

आपले बोलणे

-------------------------

आपले बोलणे नेहमीच महत्वाचे असते , याचे बरे-वाईट परिणाम होत असतात , त्याचे परिणाम वाईट झाले की निमुटपणे ते आपल्याला स्वतहाला भोगावे लागतात . आपल्यातल्या .."मी " .यावर जर आपले नियंत्रण नसले तर केवळ बोलण्याने किती परिणाम होतात हे आपण सर्वांनी अनुभवलेले ,पाहिलेले आणि ऐकलेले असते.

"बोलणे आणि ऐकणे "यांचा अतिशय जवळचा संबंध आहे .. बहुतेक वेळा ."कुणी सांगितलेले , कुणाकडून कळालेले ". कधी कधी तर ,निव्वळ अफवा ऐकून बोललेले सुद्धा .आपण खातरजमा न करता विचार न करता मत देतो ..ते व्यक्त करतो .जे वाटले ते बोलून टाकतो ..अर्थातच स्वतःला "गोत्यात आणून टाकतो .

म्हणूनच एखादी गोष्ट कोण सांगतोय..बोलतोय याला अतिशय महत्व दिले जाते ..कारण बोलणाऱ्याच्या शब्दावर विस्वास ठेवायचा की नाही ? हे कोण बोलतो आहे यावर अवलंबून आहे.

बोलणे .हे जसे दोन वक्ती मध्ये असते, तसेच ते सामूहिक स्वरूपाचे असते ..दोन्ही प्रकारात ..बोलण्याचे परिणाम होतच असतात .किंबहुना .."बोलणाऱ्याच्या बोलण्याचे अनुकूल व प्रतिकूल ..असे दोन्ही ही परिणाम इथे अपेक्षित असतात , म्हणूनच ..सर्वांना रुचेल, पचेल आणि पटेल .असे बोलणारी व्यक्ती .आपल्या बोलण्याने प्रभाव पाडून ..कित्येकदा ..विरोधात गेलेली परिस्थिती पुन्हा फेवर" मध्ये आणू शकते .

आपल्या मनाचे आणि विचारांचे संतुलन ढळू न देता ..आपल्या बोलण्यावर ठाम असणारे " नक्कीच कौतुकास्पद वाटावेत अशी माणसे असतात . ही माणसे कुणाला खुश करण्यासाठी किंवा कुणाला वाईट वाटेल म्हणून कसे बोलायचे ? असा विचार करण्याच्या भानगडीत पडत नाहीत ..कारण त्यांच्या बोलण्याने-सांगण्याने ..एखादी जनहिताची गोष्ट पूर्ण व्हावे असा प्रयत्न असतो .

काही माणसे स्वतहाचे मत सांगतांना .असे बोलत असतात की त्यांचे बोलणे ऐकल्यावर महाशय .- नम्र -जाणकार कमी ." आणि ते "उद्धट फटकळच जास्त " वाटू लागतात , त्यांच्या बोलण्यातून अचूक व माहितीपूर्ण असे काही आलेले नसते , या उलट .काही न करता .मी यंव केले असते त्यंव केले असते .अशी स्वतःची टिमकी वाजवून -काम करणार्यांबद्दल कौतुकाने बोलण्या ऐवजी तुच्छतेने बोलत बसणार त्यामुळे तर ..असे बोलणे अहं- चा दर्प "जाणवणारे असते.व या बोलण्याला काहीच किंमत देत नाहीत.

इतकेच कशाला .आपल्या पारिवारिक - कौटुंबिक जीवनातील काही उदाहरणे घेऊ या ..म्हणजे ..माणसं आणि त्यांचे बोलणे " दोन्ही बद्दल अधिक जाणवू लागेल. बोलण्याच्या प्रकारची ,शैलीची इतके प्रकार आहेत की. बस रे बस.. आपणच म्हणू .व्यक्ती तितके बोलण्याचे प्रकार आहेत की आजूबाजूला .

उदा- निर्मल -स्वच्छ हेतूने प्रांजल बोलणे , सहज आणि आडपडदा न ठेवता मोकळे बोलणे , ओठावर एक आणि मनात दुसरे असे कावेबाज बोलणे ", स्वार्थी हेतूने .-कामापुरते गोड गोड- मधाळ बोलणे,लेकी बोले सुने लागे " ,अशा पद्धतीने कार्यभाग साधण्य साठीचे बोलणे , कुजके आणि मनाला दुखावणारे मुद्दाम घालून पाडून बोलणे , चार-चौघात एखादयाची मानहानी व्हावी या हेतूने मस्करीचे बोलणे . टिंगल-टवाळी करून एखदयाला अपमानकारक वागणूक देणारे बोलणे हे तर इतके कॉमन आहे की ..त्याचे कुणाला काहीच वाटत नाहीये " अशी परिस्थती आहे.

जुन्या काळातील दिवस लक्षात असणार्या आजच्या मोठ्या माणसांना आजही अशी माणसे कायमची लक्षात असतील , एकमेकांना पाण्यात पहाणे , कुणाचे सुख न पहावणे ", मीच तो काय मोठा ", मीच एक लायक .बाकिंच्याची काय लायकी हो ? , असे वाक्य आणि उद्गार ..बोलण्यातून सहज येत असे. आता हे वाचून असेहे वाटू लागेल की. खरचं - धड बोलणारी माणसे नव्हती की काय ? नव्हती असे नाही ..पण.. त्यावेळी खूप नसायची आणि आता तरी कुठे फारशी आहेत का ?

बहुतेक वेळा तर समोरचा मूर्ख आहे, त्याला अक्कल नाही , त्याची काय लायकी ?मी ओळखून आहे " अशा थाटात माणसे समोरच्याला गृहीत धरून त्याला वाटेल तसे बोलत असतात . आपण किती ही म्हणू- जीभ गोड तर सगळे गोड " पण वास्तवात असे नाहीये म्हणून तर ..आपल्या बोलण्यावर संस्कार झाले पाहिजेत " असा भावर्थ असणारे सुविचार आणि वाक्य -प्रचार आपल्याला शिकवावे लागतात ..हे किती वाईट आहे

जिभेवर ताबा असावा .., या जिभेचा आपल्या चवीशी आणि खाण्याशी जितका संबंध आहे ,तितकाच आपल्या बोलण्याशी आहे .. गोड खाणाऱ्या जिभेला - गोड बोलण्याची का अलर्जी असते ? हे एक न उमजणारे कोडेच आहे.

तीळ-गुळ घेऊन क्षणापुरते गोड हसले के कोटा संपला .पुन्हा जिभेचा पट्टा सुरु .

आपण कितीक जनाब्द्द्ल आपले मत एका शब्दात सांगून मोकळे होत असतो .. माणूस तसा चांगला आहे ..पण, बोलू लागला की खैर नाही , सगळं घालवून बसतो बघा केवळ बोलण्यापायी " ,असे अनुभव येऊन ही आपल्यात बदल व्हावा असे माणसांना कधीच वाटत नाही.. त्याचे समर्थन असे केले जाते ..आता या वयात काय अपेक्षा करायची याच्या कडून चांगल्या बोलण्याची ? लोक चांगले म्हणून निभावलं याचं .

पती-पत्नी , नवरा-बायको - स्त्री-पुरुष .. यांच्यातील बोलणे , त्यांचे संवाद , आणि ते एकमेकांशी कसे बोलत असतात आठवून पाहावे त्यात .किती दुरावे , किती असमंजसपणा , किती कोरडेपणा ,बापरे.. तरी यालाच सह-जीवन "म्हणायचे असते . ..ज्यात सहजपणा नाही त्याला काय म्हणावे ...सांगा बारा आता

मित्रांनो तुम्ही आम्ही मग ते ..माणूस आणि व्यक्ती म्हणून असो की -.मग ती स्त्री असो वा पुरुष , तरुण असो वा -तरुणी, मुलगा-असो वा मुलगी , मोठी पिढी असो की नवी पिढी .. शब्द आणि परस्पर बोलणे हे मना मनाला सांधणारे सेतू असावे " अशी साधी अपेक्षा सुद्धा कधी पूर्ण होईल का ? असे विचारावे वाटते.

तरी पण निराश होण्या पेक्षा सगळे काही छान होईल अशी अशा करणेच योग्य.

------------------------------------------------------------------------------------------------------------------

प्रेरक- विचार - भाग -५ वा

ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.

९८५०१७७३४२

----------------------------------------------------------------------