प्रेमपत्र
Vrishali Gotkhindikar
प्रिय ..
आज खरोखर तुझ्यासाठी प्रिय लिहिताना अक्षरशः अंगावर रोमांच उभे राहिलेत ग !!!आणि हो ती संधी तु मला दिल्या बद्दल तुझ्या ऋणात राहणेच मी पसंत करेन.मला आठवतो आहे आज सुद्धा तो कॉलेजचा पहिला दिवस ..आम्ही सर्व असेच टाईमपास करीत गप्पा करीत होतो आणि मेन गेट मधून तुझे आगमन झाले गुलाबी रंगाच्या चुडीदार मध्ये तु अगदी “गजब “दिसत होतीस.तशाच रंगाची ओढणी पण तु घेतली होतीस आणि एका खांद्या वरून पुढे घेतलेल्या वेणीशी चाळा करीत इकडे तिकडे पाहत तु आत येत होतीस.गोलाकार उभ्या असलेल्या आमच्या ग्रुप पैकी बहुतेक सर्वांची गेट कडे पाठअसल्याने बाकी कुणाचे तुझ्या कडे लक्ष गेले नाही. मी मात्र समोरच्या बाजूस असल्याने तुला लगेच” नोटीस” केले होते बहुधा तु कुणाला तरी शोधीत होतीस तशी गेली तीन वर्षे आम्ही या कॉलेज मध्ये होतो हे तर आमचे शेवटचे वर्ष होते..पण तुला कधी पाहिल्याचे पण मला आठवेना आमच्या ग्रुप मध्ये मुले आणि मुली पण होत्या पण त्यातल्या कुणा सोबत तु कधी दिसली नव्हतीस मला.असे काहीसे विचार मनात असतानाच तु कॉलेज च्या दिशेने निघून गेलीस मला मात्र त्या दिवशी झोप नाही आली.असेच तुझे विचार मनात ठाण मांडून बसले होते नंतर दोन दिवस काहीतरी कारणाने मी कॉलेज ला गेलो नाही तरीही मनात विचार होताच तुझा !दोन दिवसांनी कॉलेज ला गेल्यावर मी सर्वप्रथम तुझा कानोसा घेतला आणि चक्क आमच्या ग्रुप मध्ये तु माझ्यासमोर उभी दिसलीस मला मी काही बोलायच्या आतच मला आपल्या ग्रुप मधील एका मैत्रिणीने तुझी ओळख करून दिली “निशी..मिट अवर न्यू फ्रेंड” सुनिधी “मी तुझ्याकडे पाहून हसलो आणि तुझा हात हलकेच माझ्या हातात आला हस्तांदोलन करण्या साठी..तुझा कोमल गुलाबी तळवा माझ्या हाताला हलकेच स्पर्श करून गेला तुझे माझ्याकडे तसे खास लक्ष नव्हते..सर्वांशी काहीतरी बोलण्यात तु मग्न होतीस मी मात्र आज तुला बारकाईने बघितले साडेपाच फुटावर उंची, अत्यंत कमनीय बांधा,रंग सावळा,डोळे बारीक पण राखाडी रंगाचे, नाक चाफे कळीगुलाबी दळदार ओठ,डोळ्यात हलकी काजळ रेष, ओठावर हलकी लिपस्टिकभव्य कपाळावर चार पाच चुकार बटा खेळत होत्या तुझे मोठे केस आज तु पोनी मध्ये बांधले होतेस लो कट गुलाबी टोप,निळी जीन्स आणि गळया भोवती फुला फुला चा स्टोलआजचा तुझा ड्रेस अगदी नव्या जमान्यातला होता.बोलताना तुझ्या कानात असलेले लांब कानातले हेलकावे खात होते बोलता बोलता एका हाताने तु अवखळ बटा ना आवरत होतीस ….आणि मग ग्रुप मधून तुझी माहिती मिळालीतु परगावची होतीस.नुकतीच या गावात आल्याने या वर्षी तु आमच्या कॉलेज मध्ये दाखल झाली होतीस.म्हणूनच या पूर्वी कधीच मला दिसली नव्हतीस.आता आपल्या मैत्रीचा “सिलसिला” हळू हळू सुरु झाला..प्रथम ग्रुपमध्ये तुझे माझ्याकडे विशेष असे लक्ष नव्हते तुझा स्वभाव फार मन मोकळा नव्हता,कदाचित या गावी नवीन आल्यामुळे असेल पण तु थोडी रिझर्व वागत होतीस.पण हळूहळू वर्गातील माझी हुशारी किंवा ग्रुप मध्ये सर्वांनी मला दिलेला मान पाहून तु पण माझ्याकडे आकृष्ट होऊ लागलीस.मग आपल्या थोड्या जास्त गप्पा होऊ लागल्या.तु खुप आकर्षक होतीस पण कोणालाही योग्य अंतरावर ठेवणे तु प्रयत्नपूर्वक आत्मसात केले होतेस.जवळच्या मित्रा पेक्षा मैत्रिणीकडे तुझा कल अधिक होता. त्यानंतर तु अचानक वायरल फिवर मुळे आजारी पडलीस आणि दुखणे विकोपाला जाऊन तुला महिना दीड महिना घरीच काढावा लागला या काळात तु कॉलेजला न आल्या मुळे तुझा खुप अभ्यास बुडाला,तशात सेमिस्टर अगदी तोंडावर होती.मग सर्वांनी तुला माझ्या नोटस फॉलो करायला सांगितले तु बरी झाल्यावर रोज मी तुझ्या घरी येऊन तुझ्या अभ्यासाकडे जातीने लक्ष पुरवत होतो तुझ्या घरचे लोक पण माझे खुप कौतुक करीत त्या वेळी...परीक्षेत तुला सेकंड क्लास मिळाला,खरे तर तु ही हुशार होतीस पण आजारपणा मुळेनिदान कोणता विषय राहिला तरी नाही याचे तुला समाधान होते.त्याचे श्रेय तु फक्त मलाच देत होतीस !यानंतर आपण मनाने आणखीच जवळ आलो.आपल्याला एकमेकांच्या स्वभावाचा अंदाज आला आपल्या मनात विश्वास निर्माण झाला.आणि मग आपण सर्वकाही एकमेकात शेअर करू लागलो.ग्रुप अथवा कॉलेज व्यक्तिरिक्त स्वतंत्र भेटू लागलो.हॉटेलच्या खाण्याची तुला फार आवड नव्हती,पण आईस्क्रीम तुला खुप आवडायचे.कोणताही मौसम असो तुझी आईस्क्रीम ची तयारी असे. त्यामुळे आठवड्यातून एक दोन वेळा आपली आईस्क्रीम पार्लर ला भेट असायचीच ग्रुप मध्ये सर्वांच्या लक्षात आपली ही “जवळीक “आली होती पण आत्तापर्यंत तरी आपल्या दोघात तसे काहीच नव्हते त्यामुळे कुणी काही आपली चेष्टा केली तरी आपण हसण्या वर नेत असु. माझ्या मनात खुप वेळा येत असे तुझ्यावरचे माझे प्रेम बोलून दाखवावे आणि तुझा पण अंदाज घ्यावा.पण कुठल्या ही कारणामुळे मला तुझा सहवास गमवायचा नव्हता त्यामुळे मी शांत होतो. आणि एका रविवारी आपल्या सगळ्या ग्रुपने पिकनिकला जायचे ठरवले.फायनल परीक्षा येण्या पूर्वी दोन दिवस जवळचे एक हिल स्टेशन फिरून यायचे असे ठरले.ग्रुप मधील मुलींच्या पालकाना मुलांच्या विषयी चांगली माहिती होती त्यामुळे कुणाच्या घरून तशी आडकाठी नाही झाली.प्रश्न फक्त तु येशील का नाही हाच होता.पण तुझ्या “जवळच्या “मैत्रिणीने तो सोडवला व तुझ्या घरच्या लोकांची परवानगी मिळवली.तुम्ही चार मुली आणि आम्ही आठ मुले असे निघालो.एक रिसोर्ट बुक केले होते तेथे आपण पोचलो.गेल्या दिवशी खुप धुमधमाल केली गाणी, गप्पा, डान्स...रात्री उशीर पर्यंत चालु होते. दुसर्या दिवशी जंगल फिरायला जायचे होते.सर्व जण जय्यत तयारीनिशी निघाले.तु आज खुप मस्त दिसत होतीस.काळी फोर्मल जीन्स आणि त्यावर पिवळा कुडता घातला होतास.तुझे रेशमी केस एका पिनेत घालून वर बांधले होतेस “हलका “मेकअप होता आणि अंगात पांढरे जाकीट आणि पांढरे बुट..मी डोळ्यानीच तुझ्या “रूपा ‘ ला सलामी दिली !तु पण ओठातल्या ओठात हसुन ती स्वीकारलीस!जंगल खुप मस्त होते.सकाळची वेळ त्यामुळे सूर्याची किरणे झाडातून डोकावत होती.आता आपले छोटे छोटे ग्रुप पडले आणि आपण इकडे तिकडे विस्कळीत झालो.शेवटी सर्वांनी एका ठिकाणी भेटायचे असे ठरले..आपण पण दोघे एका वळणावरून आत शिरलो.जंगली फुलांचा “मादक ‘वास सगळी कडे दाटून राहिला होता.सगळी कडे हिरवेगार होते,कुठे कुठे पक्षी पण बोलत होते.हवा पण छान गार अशी होती.एका मोठ्या झाडा खाली आपण आलो आणि तु म्हणालीस “ए आपण थांबूया आता खुप दमले मी “तुझा चेहेरा लाल चुटूक झाला होता..गाल पण जणु मेकअप केल्या सारखे गुलाबी झाले होते.खुप चालल्या मुले कपाळ घामेजले होते.मग आपण तिथे थांबलो.झाडाखाली छान सावली आणि हिरवळ होती कसल्याशा लाल फुलांनी झाड डवरल होते.मी स्याक खाली ठेवली आणि जवळच्या दगडावर बसून बुट काढले.तु पण बुट आणि अंगातले जाकीट काढून खाली ठेवलेस आणि खाली पाय लांब करून बसलीस.मी अजून उभाच होतो सॉक्स बुटात ठेवत होतो आणि तुझ्याकडे लक्ष गेले तुझ्या अंगातला पिवळा कुडता स्लीवलेस होता त्यामुळे तुझे गोलाकार गुबगुबीत दंड आकर्षक दिसत होते.तुझ्या लो कट गळ्यातून तुझे गोल गोरे वक्ष अर्धवट दिसत होते.त्याचा उभार पुढून जाणवत होता..माझे अंग गरम होऊ लागले.मी नजर बाजूला केली.“ए बस ना आणि पाण्याची बाटली काढ आधी..मला काहीतरी खायचे पण आहे,खुप भूक लागली आहे रे..”मी खाली बसलो तुझ्या जवळच.. आणि पाण्याची बाटली तुझ्या हातात दिली.तु वर बाटली धरून पाणी प्यायला लागलीस..आणि गडबडी मुळे तुझ्या कुडत्यावर ते सांडू लागले.ओल्या कुडत्या मुळे तु आणखीन मस्त दिसू लागलीस आता तुझ्या वरची नजर बाजूला करणे माझ्यासाठी कठीण होऊ लागले.मी स्याक मधून बिस्किटे आणि चिवडा, लाडू असे खायचे पदार्थ काढले.आता आपण दोघे पण खाऊ लागलो आणि खाता खाता गप्पा चालु होत्याच.खाऊन झाल्यावर तु परत पाय लांब केलेस आणि केसाची पिन काढून टाकलीस.तुझ्या रेशमी केस खांद्यावरून तुझ्या अंगावर पसरले .केस मोकळे केल्यावर तु लावलेल्या शाम्पू चा सुगंध आला.अचानक तु माझ्या मांडीवर झोपून डोळे बंद केलेस..“ए झोपते मी थोडा वेळ....चालेल ना..?मी म्हणालो” आता झोपली आहेस की परवानगी कशाला हवी ?तु खळाळून हसलीस..तुझे बारीक दात मोहक दिसत होते.तुझे रेशमी केस आता माझ्या पण मांडीवर पसरले माझ्या मांडीवर झोपलेली तु मला चेतवत होतीस..तशात झाडावरून लाल लाल फुले वार्याने तुझ्या अंगावर पडू लागली एक फुल अलगद तुझ्या ओठावर पडले..मी खाली वाकलो आणि माझ्या ओठांनी ते फुल बाजूला केले मला मोह आवरेना..आणि हलकेच तुझ्या ओठावर मी ओठ ठेवले.तुझ्या गुलाबी,रसदार ओठांनी एक एक पाकळी अलगद मी माझ्या ओठात पकडली आणि अगदी मनमुराद तुझे ओठ चुंबू लागलो.तो रस पिताना माझे भान हरपले..!!तुही मला साथ देऊ लागलीस आणि माझ्या गळ्यात हात टाकून माझ्या जवळ आलीस दोघांचे ओठ एकमेकात गुंतल्यावर एकमेकांच्या जीभा शोधू लागले आणि आपण डीप किसिंग सुरु केले..मी तुला आणखी जवळ घेऊन तुझ्या रेशमी केसाना हातांनी स्पर्श करू लागलो तु माझ्या पाठी भोवती हात टाकून आणखी जवळ आलीस मी एका हाताने तुझे दंड कुरवाळू लागलो..आणि तुझे वक्ष आता माझ्या छातीला टोचू लागले..त्याना हातात घ्यायला मी अधीर झालो..मला पहायचं होते त्याना मी हलकेच तुझ्या कानात म्हणालो..“सुनिधी मला दाखव ना ग हे तुझ “वैभव “..“अं....असे म्हणुन तु मला आणखी बिलागलीस मग एका हाताने तुझ्या चेहेर्या वर आलेले केस बाजूला करून परत जोरात तुझे ओठ चावले..“मला लाज वाटते जा....“ मी जाईन ग पण हे बघायला तुझी परवानगी हवीय मला..‘ फक्त पाहिले तर बास का....? तु विचारलेस नंतर काय करायचं पाहू आधी दाखव तरी..मग मी हलकेच तुझ्या कुडत्या ची बटणे काढून तो खजिना खुला केला.मी वेडा झालो तुझे वक्ष पाहून....हातात मावत नव्हते माझ्या ते प्रमाणबद्ध आणि सुडौल...हळूच तोंडात घेवून कीस केले आणि चोखू लागलो तु पण खुप बेभान साथ देत होतीस स्वर्गीय अनुभव होता तो..माझ्या आयुष्यातला पहिलाच..!!!आता मात्र मी स्वताला सावरले....हे काही ठीक नाही असे मनाला बजावले आणि बाजूला झालो..“सुनिधी चल आवर, जाउया आता ग्रुप वाट पहात असेल..”थोड्याच वेळांत तु स्वताला “ठाक ठीक “ केलेस आणि आपण निघालो “सुनिधी माफ कर मला असा वेडेपणा मी करायला नको होता न ?“नाही रे निशी उलट तुझे मला आभार मानायला हवेत तु वेळीच स्वताला सावरलेस नाहीतर आगळीक झाली असती..आणि दोष माझा पण होता की..”“ हो पण मला असले काहीच करायचे नव्हते ग सगळे चुकून झाले “माझा हात दाबून तु म्हणालीस “मी समजू शकते रे..”त्या दिवशी आपले एकमेकावर प्रेम आहे का या विषयी काहीच बोलणे झाले नाही आपण त्यानंतर दोन तीन दिवस भेटलोच नाही.माझे मन अस्वस्थ होते तु पण शांत होतीस,तुझ्या मनात काय चाललेय याचा पत्ता लागत नव्हता म्हणूनच हे पत्र लिहितो आहे तुला अजून लहान आहोत आपण..शिक्षण पूर्ण करायचे आहे नवीन क्षितिजे धुंडाळायची आहेत बरेच काही मनात आहे त्यात तुझी साथ हवीय.. देशील न ?पत्रोत्तराची वाट पाहतो.आज vallentine day आहे न म्हणुन तुला प्रपोज करतो आहे मी तुझ्या शिवाय नाही राहु शकत ग..मला तुझ्या सोबत आयुष्यभर राहायचे आहे B MY VALLENTINE ….DEAR फक्त तुझाच..निशी...