देवाचे ठाणे

(0)
  • 48
  • 0
  • 6.5k

आज मी आपणहून एका संशोधनासाठी बाहेर पडली होतो.रत्नागिरी जिल्ह्यातील 'देवाचे ठाणे ' इथल्या कातळ शिल्प याबद्दल मी व्हिडिओ पाहिले होते व वाचलेली होते.माझ्या पुरातन वस्तूसंग्रहालयाची जबाबदारी मी आईवर सोपवली होती. आईला सुद्धा पुरातत्त्व विषयाची आवड होती. ती सहंग्रालयाला भेट देणाऱ्या लोकांना छान माहिती देते.अर्थात काही वस्तु माझ्या जवळ कश्या आल्या हे मी आईलाही सांगितले नव्हते.ते कळले असते तर तिने मला संशोधनच बंद करायला लावले असते.

1

देवाचे ठाणे - 1

देवाचे ठाणे १( कथा पूर्णतः काल्पनिक आहे.)आज मी आपणहून एका संशोधनासाठी बाहेर पडली होतो.रत्नागिरी जिल्ह्यातील 'देवाचे ठाणे ' इथल्या शिल्प याबद्दल मी व्हिडिओ पाहिले होते व वाचलेली होते.माझ्या पुरातन वस्तूसंग्रहालयाची जबाबदारी मी आईवर सोपवली होती. आईला सुद्धा पुरातत्त्व विषयाची आवड होती. ती सहंग्रालयाला भेट देणाऱ्या लोकांना छान माहिती देते.अर्थात काही वस्तु माझ्या जवळ कश्या आल्या हे मी आईलाही सांगितले नव्हते.ते कळले असते तर तिने मलासंशोधनच बंद करायला लावले असते." तूझ्या सोबत काम करायला लवकरच हक्काचा माणूसआण." ही नेहमीची सूचना करायला ती विसरली नाही.मी हसलो व म्हणालो.." हल्लीच्या मुलींना अश्या गोष्टी अजिबात आवडत नाहीत."" कोणीतरी असेलच ना? मी किती दिवस ...Read More

2

देवाचे ठाणे - 2

देवाचे ठाणे २( कथा पूर्णतः काल्पनिक आहे.)पुढे चालू...मी पार काळोख पडेपर्यंत काम करत होतो.खरतर मलारात्री तिथेच तंबू लावून राहायचे त्या शिल्पा पासून २०फूटांवर एक छान जागा दिसली होती.तिथे पाणी नव्हतं.पण मला काही गोष्टी स्कॅन करायच्या होत्या.लॅपटाॅपवर काहीआराखडे तयार करायचे होते.माझा अंदाज होता की ते शिल्पकिमान दहा हजार वर्षांपूर्वीचे असावे.शिवाय माझ्या सिस्मोग्राफ मध्ये काही विचित्र कंपने दिसली होती.त्याचे विश्लेषण करायचे होते.त्यासाठी टेबल खुर्ची व लाईट लागणार होती.म्हणून मी त्या रात्री खाली गावात राहायचे ठरवले. मी माझं सगळं सामान आवरलं .मी गाडीवरून खाली उतरलो.चौकशी करता कळलं की गावात एकच होम स्टे होता. मी तिथे पोहचलो.ते एक मजली घर होतं.खाली बाहेरच्या रुममध्ये ...Read More

3

देवाचे ठाणे - 3

देवाचे ठाणे ३आम्ही दोघ दोन दिशांना गेलो.ती फुलांच्या ताटव्यात शिरली.मी उजवीकडे वळलो.मला अजून पाच एक मिनिटे चालावं लागणार होतं.चालता माझं लक्ष काल रात्रीच्या त्या आंब्याच्या कलमाकडे गेले. मी सहज तिथे गेलो.कालच्या दो-या...फाटक शर्ट..बोळा तिथेच होता.पण त्या सोबत आणखी काही अचंबित करणा-या गोष्टी तिथे होत्या.एक आयफोन व एक हजार रुपये एका कागदावर ठेवलेले होते. मला कळेना की हे काय गौडबंगाल आहे ते. काल रात्रीनिश्चितच तिथे फोन व पैसे नव्हते. मग आता कुठून आले ?जर चोरांनी राकेशला मारुन त्याच्याकडचा फोन व पैसेपळवले होते तर आता ते इथे कसे आले ते समजत नव्हते.मी सुजाताला हाक मारली पण तिला ती ऐकू आली नाही.ती ...Read More

4

देवाचे ठाणे - 4

देवाचे ठाणे ४ मी माझं सामान गाडीला बांधून बाहेर पडलो.गाडीला किक्मारणार तेवढ्यात माझं लक्ष वर गॅलरीत उभ्या असलेल्या कडे गेले.ती एकटक माझ्याकडे बघत होती.खरतर मी ठरवलं होतं की काही झाले तरी वर पाहायचं नाही पण शेवटी वर लक्ष गेलेच होते.मी सहज राहायचं ठरवलं व हात हलवला.तिनेही हात हलवला. जर त्या सड्यावर एखादी अमानवीय शक्ती असेल तर ती रात्रीच्या वेळी सक्रीय होईल असा माझा कायास होता.शिवाय अफाट माळावर राहून आकाशातले तारे न्याहाळत रात्र घालवायची गंमत मला अनुभवायची होती.मी सड्यावर पोहचलो तेव्हा रात्रीचे दहा वाजले होते.मी त्या कातळ शिल्पाला लागूनच असलेल्या उंचवट्यावर टेन्ट उभा केला.आत कोणताही सरपटणारा प्राणी शिरणार ...Read More

5

देवाचे ठाणे - 5

देवाचे ठाणे ५ मी इन्स्पेक्टरची परवानगी घेतली व रुम वर परतलो.आंघोळ करून मी थोडी विश्रांती घ्यावी म्हणून बेडवरपहुडलो.काही डोळे बंद करून तसाच राहिलो.अर्धा तास मी नुसता पडून होतो.मला झोपायच होत पणझोप येत नव्हती.काल रात्रीची घटना डोळ्यासमोर सारखीफिरत होती. मी उठून ' धर्मानंद वर्मा ' माहिती मिळवायला सुरुवात केली.मोबाईलवर सर्च केल्यावर सुमारे सहा धर्मानंदवर्मा दिसले.मला हवा असलेला धर्मानंद वर्मा त्यातच होता.दिल्लीत केंद्रीय मंत्रालयात सचिव म्हणून त्याने तीन वेगवेगळ्या खात्यांमध्ये काम केले होते.त्याचे अनेक मंत्र्या सोबत व खासदारां सोबत मैत्रीचे व अर्थपूर्ण संबंध होते.निवृत्त झाल्यावर त्याच लक्ष कोकणातील जमीनींकडे गेले.त्यानेकोकणातल्या किना-या लगतच्या जमीनी खरेदी करायला सुरुवात केली.तो अत्यंत अधाशी व ...Read More

6

देवाचे ठाणे - 6

देवाचे ठाणे६ दश दिशातून हवा शिल्पा भोवताली ओढली जावू लागली. बघता - बघता हवेचा एक भोवरा परीसरात झाला. तो भोवरा एवढा शक्तीशाली होता की सुरुंग पेरणारी माणसंही त्यात ओढली जावू लागली. माझ्या कपाळावर लावलेली गन त्या माणसाच्या हातून निसटली व त्या भोव-यात सामावली.तो गुंड सुध्दा ओढला जावू लागला.त्याने चि-याच्या दगडी कुंपणाचा आधार घेण्याचा प्रयत्न केला.मी सहज मनगटावरील घड्याळाकडे नजर टाकली ते बंद पडले होते.पेरलेलेसगळे सुरुंग व वायर्स गरगरा सभोवताली भिरभिरु लागले.या सगळ्या गडबडीत मी व माझा तंबू जागच्या जागी होता.सभोवतालची वावटळ ही हवेच्या दाबातील फरकाने झाली नव्हती तर ती चुंबकीय क्षेत्रातील बदलामुळे निर्माण झाली होती. तो चुंबकीय ...Read More

7

देवाचे ठाणे - 7

देवाचे ठाणे ७मागील भागकेला.तेव्हा अवकाशयानातून दोन तेजस्वी पुरुष खाली उतरले. डोक्यावर हिरेजडित मूकूट,कानात चमकदार कुंडल, गळ्यात रत्नखचित हार,कमरेला पिवळं खडावा.अगदी राजा रविवर्मा यांच्या चरित्रातील देवासारखा वेष होता. तोपर्यंत आदिमानवांची जमात ओरडत तिथपर्यंतआली. समोरचे दिव्य पुरुष पाहून ते सारे गुढग्यावर बसूनहात जोडून तसेच राहिले. पुढे सुरू.... समोरच दृश्य माझ्यासाठी धूसर होत गेले.काही काळ फक्त अंधार जाणवत राहिला.एका खोल विवरातून मी बाहेर पडत आहे असं मला जाणवू लागले.जेव्हा जाणीव झाली तेव्हा मीकातळ सड्यावर उभा होतो.समोर त्या शिल्पाच्या मानव माझ्या समोर उभा होता." तू जे बघितलेस ते दृश्य दहा हजार वर्षांपूर्वीचे होते.ती आमची पृथ्वीवरील पहिली भेट होती."" पण तुम्ही नेमके कुठून ...Read More