निषाद पर्व

(7)
  • 135
  • 0
  • 7.5k

“प्रभासक्षेत्री यादव वीरांचा संहार झाला. बलराम, श्रीकृष्ण यांचीही अवतार समाप्ती झाली. सिंधुसागर कणाकणाने द्वारकापुरी आपल्या उदरात घेऊ लागला. यादवीतून वाचलेले वृध्द, नारीजन आणि बालके यांना पार्थाने द्वारकेतून हस्तिनापुरात आणावे. त्यांचा प्रतिपाळ करावयाची जबाबदारी योगेश्वर श्रीकृष्णानी पार्थावर सोपवलेली आहे...” दारूकाच्या मुखातून हे वृत्त ऐकून पांडव शोकाकुल झाले. श्रीकृष्णांनी सोपविलेले कार्य आपल्या हातून पार पडेल की नाही या शंकेने पार्थ ग्रासला त्याच्या सर्वांगाला कंप सुटला, हृदयाचे स्पंदन वाढले. आपण वृद्ध झाल्याची जाणीव त्याला प्रकर्षाने होऊ लागली. केवळ कर्तव्य भावनेनेच पार्थ प्रवासाला सिद्ध झाला. प्रवास दीर्घ पल्ल्याचा! अरण्य मार्गात हिंस्त्र श्वापदे, दस्यू आणि वनवासी लुटारू यांचाही धोका संभवत होता. म्हणून गांडीव धनुष्य, अक्षय भाता यासह सज्ज होऊन पार्थाने रथारूढ होऊन द्वारकेकडे प्रयाण केले.

1

निषाद पर्व - भाग 1

निषादपर्व भाग १“प्रभासक्षेत्री यादव वीरांचा संहार झाला. बलराम, श्रीकृष्ण यांचीही अवतार समाप्ती झाली. सिंधुसागर कणाकणाने द्वारकापुरी आपल्या उदरात घेऊ यादवीतून वाचलेले वृध्द, नारीजन आणि बालके यांना पार्थाने द्वारकेतून हस्तिनापुरात आणावे. त्यांचा प्रतिपाळ करावयाची जबाबदारी योगेश्वर श्रीकृष्णानी पार्थावर सोपवलेली आहे...” दारूकाच्या मुखातून हे वृत्त ऐकून पांडव शोकाकुल झाले. श्रीकृष्णांनी सोपविलेले कार्य आपल्या हातून पार पडेल की नाही या शंकेने पार्थ ग्रासला त्याच्या सर्वांगाला कंप सुटला, हृदया ...Read More

2

निषाद पर्व - भाग 2

निषादपर्व भाग २ पांथस्थाना अडवून, लुटमार करून उदरनिर्वाह करणाऱ्या दस्यूंबद्दल त्याला कमालीची घृणा वाटायची. आता दस्यू लुटारू हल्ला करतील तेव्हा अर्जुनाच्या अमोघ शर वर्षावामुळे त्यांना चांगली अद्दल घडेल. अगदी अकल्पितपणे धनुर्विद्येचे एक अद्भुत गारूड आपल्याला पहावयास मिळेल. या विचारांनी त्याची उत्कंठा शिगेला पोचली. तथापि दस्यूंनी यादव समूहावर हल्ला केला, त्यानंतर अर्जुनाची झालेली केविलवाणी अवस्था पाहून त्याचा पुरता भ्रमनिरास झाला. हस्तिनापुराचा बलसंपन्न राजा, गुरूद्रोणाचा पट्ट शिष्य अर्जुन... महाभारत युद्धात अस्त्रविद्येच्या बळावर शत्रू पक्षाचा निष्पात करणारा श्रेष्ठ धनुर्धर अर्जुन...! त्याची दुःस्थिती पाहून हळहळणारा निषाद, द्रव्य आणि नारींचे अपहरण करून विजायोन्मादाने गर्जना करीत मार्गस्थ होणारा दस्यू समूह पाहून आपल्या व्रतापासून ...Read More

3

निषाद पर्व - भाग 3

निषादपर्व भाग ३पांथस्थाना अडवून, लुटमार करून उदरनिर्वाह करणाऱ्या दस्यूंबद्दल त्याला कमालीची घृणा वाटायची. आता दस्यू लुटारू यदुवंशीयांवर हल्ला करतील अर्जुनाच्या अमोघ शर वर्षावामुळे त्यांना चांगली अद्दल घडेल. अगदी अकल्पितपणे धनुर्विद्येचे एक अद्भुत गारूड आपल्याला पहावयास मिळेल. या विचारांनी त्याची उत्कंठा शिगेला पोचली. तथापि दस्यूंनी यादव समूहावर हल्ला केला, त्यानंतर अर्जुनाची झालेली केविलवाणी अवस्था पाहून त्याचा पुरता भ्रमनिरास झाला. हस्तिनापुराचा बलसंपन्न राजा, गुरूद्रोणाचा पट्ट शिष्य अर्जुन... महाभारत युद्धात अस्त्रविद्येच्या बळावर शत्रू पक्षाचा निष्पात करणारा श्रेष्ठ धनुर्धर अर्जुन...! त्याची दुःस्थिती पाहून हळहळणारा निषाद, द्रव्य आणि नारींचे अपहरण करून विजायोन्मादाने गर्जना करीत मार्गस्थ होणारा दस्यू समूह पाहून आपल्या व्रतापासून ढळला. निषादाने आपला ...Read More

4

निषाद पर्व - भाग 4

निषादपर्व भाग ४"सकृत् दर्शनी, पूर्व परिचय नाही अशी धारणा असतानाही मला तुच्छ लेखीत वनचर म्हणून तू संबोधिलेस. पण मागाहून शरसंधानाचा प्रत्यय आल्यावर मात्र त्याच वनचराला दांभिकतेने गुरूबंधू म्हणून संबोधिण्याचे तुझे धारिष्ट्य, तुझ्या अंगी मुरलेल्या कुटील राजनीतीला अन् सर्पफणेप्रमाणे केवळ दिखावू अशा तुझ्या विनयी वृत्तीला शोभणारे आहे! इतक्या प्रदीर्घ कालावधीनंतर, आयुष्याच्या उतरणीला लागल्यामुळे, असहाय्य अगतिक झाल्यामुळे तरी मला भेटल्यावर-निदान माझी ओळख पटल्यावर तरी पश्चात्तापाचे दोन कामचलाऊ शब्दही तू उद्‌गारले नाहीस. उलट अंगुष्ठरुपाने जीवन सर्वस्व गमावल्यावरही मी अद्यापि जिवंत आहे, एवढेच नव्हे तर माझे शरसंधान कौशल्यही शाबूत आहे, ते खंडित झाले नाही या बद्दल खदखदणारे वैषम्य... शिष्टाचार म्हणून तरी कृतक आनंद ...Read More

5

निषाद पर्व - भाग 5

निषाद पर्व भाग५आम्हां निषादांची बोली म्हणजे पैशाची! नियमादिंचेकसलेही बंधन नसलेली आम्हा निषादांची ती आदिम बोली! आतानगरजनांशी क्वचित येणाऱ्या संपर्कातून भारती-देववाणी मधील काही शब्द मला अवगत आहेत इतकेच. त्यातहीआश्चर्याचा काही भाग नाही की कसले रहस्यही नाही. अर्जुनाभाषा हा तर मानवाचा सहजाविष्कार...तो विशिष्टजनसमूहापुरता मर्यादित कसा राहणार? त्यामुळे कदाचितमाझ्या बोलीने तिच्या मर्यादा ओलांडिल्या असणे संभवते.""पण अर्जुना! धर्माज्ञाओलांडून, जनक्षोभ पत्करून आम्हा निषादांना देववाणी,मंत्रविद्या अन् अस्त्रविद्या शिकवायला तरी कोण गुरू धजावेल?खेरीज एकदा गुरू द्रोणांनी मला शिष्यत्व नाकारील्यावर कोणाज्ञानवंताचा अनुग्रह प्राप्त होईल अशी अपेक्षा तरी मी कशी बरे करू धजावेन?वाक्पटू अर्जुना, वनामध्ये विहारकरणारे म्हणून आम्ही वनचर अशी उपाधी देववाणी पारंगत असलेला तू...मोठ्या मानभावीपणाने देत ...Read More

6

निषाद पर्व - भाग 6

निषाद पर्व -भाग ६"अर्जुना, पूर्व स्मृतिंनी मीआजही इतके व्यथित व्हावे याचे आश्चर्य तुझ्या मुखावर दिसत आहे. अरे, क्रीडेखातर केवळकरमणूक मनोरंजनाच्या हेतूने मृगयेच्या नावाखाली निष्पाप पशुपक्षांची निघृणहत्या...कत्तल करून धर्म कृत्याच्या साफल्य प्राप्तीचा आनंद मानणारे तुम्ही शासक... गुरू द्रोणांचे शिष्यत्व पत्करण्याची इच्छा वनचर निषादाने बाळगावी हेच मुळी तुमच्या लेखी औध्दत्यठरते.अर्जुना... अगुंष्ठ छेदामुळेही झाले नाही एवढे दारुण दुःख द्रोणांनी मला नाकारल्यामुळे झाले. त्यावेळी तुम्हीराजपुत्रांनी परस्परांना नेत्रपल्लव्या करीत केलेली कुत्सित स्मिते आणि उपहासपूर्ण भाषणे...त्यांनी माझ्या काळजावर झालेल्या व्रणांची खपली काढताच आजही मी व्यथित झालो कारण अर्जुना... निषाद, वनचर असलो तरी त्यावेळी मी सुद्धा निषाद राज हिरण्यधनूचा पुत्र... तुम्हा सारखाच... राजपुत्रच नव्हतो का?""तुम्हा ...Read More

7

निषाद पर्व - भाग 7

निषाद पर्व भाग ७ज्यांच्याकडे पाहून आपल्या जवळच्या कातीव कोरीव इंद्रधनुष्यी रंग छटा असलेल्या धनुष्यांशी अन् नाजूक सुबक आखीव रेखीव तुलना करीत तुम्ही नाके मुरडून कुचेष्टा केलीत... तो कामठा नी ते तीरसुद्धा मी स्वतः बनविलेले होते. शस्त्रशाळेतील पोटार्थी कारागिरांनीघडविलेली नक्षीदार धनुष्ये आणि आखीव रेखीव बाण आयते वापरणाऱ्या तुला क्षत्रियालायामागचे तत्व तरी कसे कळावे? धनुष्य हे स्त्री सारखे आहे. त्याच्या वरपांगी सौंदर्यावरुन त्याचे श्रेष्ठत्व ठरत नसते. ज्या धनुर्धराला तीरकामठा स्वतः बनविता येत नाही, तो शरसंधानातले कौशल्य कसे काय हस्तगत करणार...?""तिरकामठा स्वतःबनविल्यावरच लक्ष्यवेधातले खरे इंगित समजते. 'धनुर्विद्यारहस्या' सारख्या तुझ्या जडजंबाल ग्रंथराजांच्या वाटेलाही न गेलेला मी अक्षर शत्रू निषाद! पण तिरकामठ्याचे माझे ...Read More

8

निषाद पर्व - भाग 8

निषाद पर्व भाग ८एकलव्य भूमीवर आसनस्थ झाला. दोन्ही पायांच्या अंगठ्यांनी वेत्र काष्टावर पकड घेऊन त्याने ते जमिनी समांतर स्थिर दोन्ही ओठांमध्ये धरून त्यावर तीर सज्ज केला.मग ओठानीच प्रत्यंचेसह तीरावर घट्ट पकड घेत त्याने प्रत्यंचा ताणली अन् मानेला हिसका दिला.यावेळीथरथरणाऱ्या प्रत्यंचेने सर्प फुत्काराप्रमाणे ध्वनी निर्माण केला. तो ऐकून एखादा बलिष्ट नागराज तर समीप आला नाही ना या भीतीने पार्थ दचकून मागे सरकला. या वेळचा तीर शरचक्रात भूमीलगत रिंगण घेऊ लागला. त्याचा वेग एवढा तीव्र की शरचक्रातील इतर तीरांपूर्वीच त्याचे मंडल पूर्ण होऊ लागले.यावेळी शरचक्रामधील मंदगती तीर बदलताना एकलव्याने डावा हात, एक हात, एक पाय, यांचा वापर करूनही तीर सोडून ...Read More